आपला झाडांवरचा हा लेख वाचून मला इंदिरा संतांच्या "बाभळी" कवितेची आठवण झाली.
अमेरिकेत झाडांवर झळकणारे फॉल कलर्स पाहून मलाही एक कविता सुचली होती..
लेख अतिशय आवडला... चित्रेही सुंदर.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
अतिशय सुंदर लेख. कवितांचे आणि माझे अगदी वाकडे नसले तरी स्वतःला सुचत नाहीत हे कटू वास्तव आहे. पण कवितांचा माझ्या कुवतीनुसार आस्वाद जरूर घेतो.
वृक्ष-वल्लीं वरील हा लेख अगदी वाचनिय झाला आहे.
माझ्या दहिसरचे वर्णन, माझ्या 'विद्या-मंदिर' शाळेचे चित्र पाहून मन भरून आले.
गुरूवारच्या प्रतिक्षेत.
नंदन जे झाडांवरचे गाणे गातो
आहे झाडच दुसरे पुन्हा त्या गाण्यात
नंदन जे झाडांवरचे गातो
आहे पक्षी दुसरा गाण्यांतच त्या पुन्हा
झाडांवरचे जे नंदन गातो..
मागे बनीने म्हण्टल्याचे आठवते आहे ? एक खूप श्रीमंत माणूस रहातो क्यालिफोर्नियाच्या "त्या" भागात. ही जाणीवेची श्रीमंती - जिला ज्ञानेश्वराने जाणीवेची राणीव म्हण्टले आहे कुठे तरी - अशी खानदानी आहे की तिचे उठवळ प्रदर्शन नाही होत कधी. "साठिषण्मासीं परंतु" ज्या शलाका येतात ना, तेव्हा मात्र एकदम डवरून येते हे झाड.
या श्रीमंत लेखाच्या सुरवातीचा परिच्छेद वाचत होतो आणि वाचून झाल्यावर श्वास कोंडल्यासारखे झाले. एखाद्याने तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यातील एका गोष्टीवर इतके नेमके बोट ठेवले असावे , की बस्स. नंदनच्या या सुरेख लेखावरची दाद अशी शब्दबंबाळ द्यावी लागावी यातली विसंगती मला दिसते. पण काय करणार , त्याच्यासारखे आपण सारे थोडेच श्रीमंत आहोत ? :-)
नंदन असेच लिहीत जा कधीतरी. अति वाट पाहायला लावणेही चूकच ; कसे म्हणता ?
या श्रीमंत लेखाच्या सुरवातीचा परिच्छेद वाचत होतो आणि वाचून झाल्यावर श्वास कोंडल्यासारखे झाले. एखाद्याने तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यातील एका गोष्टीवर इतके नेमके बोट ठेवले असावे , की बस्स. नंदनच्या या सुरेख लेखावरची दाद अशी शब्दबंबाळ द्यावी लागावी यातली विसंगती मला दिसते. पण काय करणार , त्याच्यासारखे आपण सारे थोडेच श्रीमंत आहोत ?
अगदी खरं! मुक्तराव तुझ्याशी सहमत आहे रे! :)
तात्या.
नंदन जे झाडांवरचे गाणे गातो
आहे झाडच दुसरे पुन्हा त्या गाण्यात
नंदन जे झाडांवरचे गातो
आहे पक्षी दुसरा गाण्यांतच त्या पुन्हा
झाडांवरचे जे नंदन गातो..
नंदनचा लेख सुरेख आहेच पण ही प्रेमकविता ही सुरेख आहे. पूर्ण करा ना कविता.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
नंदन,
अतिशय उत्तम लेख. लेखाची कल्पना, मांडाणी आणि सर्वच आवडले. पुढचा भाग लवकरच वाचतो.
>>ही जाणीवेची श्रीमंती - जिला ज्ञानेश्वराने जाणीवेची राणीव म्हण्टले आहे कुठे तरी - अशी खानदानी आहे की तिचे उठवळ प्रदर्शन नाही होत कधी. "साठिषण्मासीं परंतु" ज्या शलाका येतात ना, तेव्हा मात्र एकदम डवरून येते हे झाड. <<
उत्तम लेखाला उत्तम प्रतिसाद.
--लिखाळ.
नंदनसायबा,
मिपाच्या वैभवात भर घालणारा, अतिशय सुंदर शब्दात मांडलेला, झाडांशी मैत्री करणारा लेख आवडला. आज सकाळी सकाळीच इतका सुरेख लेख वाचून केवळ आजच्या दिवसाचीच नव्हे, तर सबंध आठवड्याचीच सुरवात अत्यंत प्रसन्न झाली आहे!
सायबा, इतक्या सुरेख लेखाकरता मुंबईला आलास की बक्षिस म्हणून, कौतुक म्हणून, तुला समर्थ भोजनालयात एक पार्टी माझ्यातर्फे लागू! :)
येत्या गुरुवारी म्होरल्या भागाची वाट पाहात आहे!
बाकी, शाळेचा फोटू पाहून जीव एवढास्सा झाला! गेल्या आता त्या शाळा...!
अवांतर -
लेख अधिक रंगतदार करण्याकरता, सर्वांगसुंदर करण्याकरता रेग्यांच्या/बोरकरांच्या दिलेल्या काव्यपंक्ति वाचून मिपाच्या या धोरणातल्या,
एखाद्या लेखा/चर्चेदरम्यान केवळ संदर्भाकरता म्हणून अन्य ठिकाणच्या दोनचार ओळी किंवा एखादा लहानसा परिच्छेद देण्यास हरकत नाही. जर काही आस्वादात्मक, कलात्मक, अनुवादात्मक भाष्य करायचे असेल तरच मिपाव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रसिद्ध झालेली एखादी कविता/गझल/लेख/ संदर्भाकरता म्हणून मिपावर प्रसिद्ध करण्यास हरकत नाही....
या दोन कलमांचा फार सुंदर उपयोग केला आहे असे आवर्जून सांगावेसे वाटते!
जियो...!
(नंदनसायबाचं मैतर लाभलेला एक भाग्यवान!) तात्या.
आता जाता जाता थोडेसे ह घा.. :)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
तुका रे मेल्या खय कळता त्या मराठी साहित्यात?! :)
आपला,
(शिंदुदुर्ग जिल्ह्यातला) तात्या देवगडकर. :)
लेख खूप आवडला ... फोटो सगळेच अप्रतीम... शांतादुर्गेच्या तळ्याचा , आणि , माड असलेल्या समुद्र किनार्याचा खूप आवडला .
रेग्यांची आणि बोरकरांची कविता सुरेखच आहेत
झाड माझें लाखमोली लाल ज्याला फक्त पानें,
नेणतां ये एक ज्याला शुभ्र कांही जीवघेणें....... किती छान लिहीलं आहे
आणि बोरकरांची कविता तर सुंदरच आहे ..
http://vipravani.wordpress.com/
एका माणसाला त्याच्या संपूर्ण आयुष्यात लागणारा ऑक्सिजन एक झाड पुरवते. तरीसुद्धा त्यांची तोड सुरुच आहे बर्याच वेळी कारण नसताना.
आजपर्यंत सुमारे १०००० हजार रोपे लावुन त्यांना जगवलेला
वि.प्र.
बाहेर धो धो पाउस पडत असतांना वर्गात शिकवणार्या बाई आठवल्या, शेवटी आवाज प्रचंड वाढल्यावर शिकवणे शेवटपर्यंत एकु येत नसे, मग चालु होई कवितेचे पाठांतर !!
सुरेख याद जागवलीस :)
फार वाट पाहायला लावणे चूकच. पण असले काही हाताला लागणार असेल, तर ही वाट पाहणेही कबूल आहे. कुणी काही लिहिल्याबद्दल आभार मानावे, असे प्रसंग अपवादानेच येतात. त्यांतला हा एक. आभार नंदन.
नंदन ,फार सुंदर लेख.लेखाचे शीर्षकही फार आवडले.
लेखाच्या विषयामुळे कृत्रिम होईल अशी भीती व्यक्त केली आहेस पण अजिबात कृत्रिमता नाही.
हिरवी सावली धरणारे माड,लेकुरवाळे फणस - हे फार आवडलं.
गुरूवारची वाट पाहत आहे,:)
स्वाती
लेख अतिशय सहज आणि ओघवता झाला आहे. दहिसरपासून अमेरिकेपर्यंतची झाडे डोळ्यासमोरून हलली. :)
मुंबईला माझ्या घराबाहेर करंज्याचे झाड आहे. एप्रिलमधे त्याला नवी पालवी आणि शुभ्र फुलांचा बहर येतो. पावसात पानं पाण्या वार्याने सळसळत असतात. सदैव सळसळत्या चैतन्याची सोबत आणि जिवंतपणाची आठवण करून देणारे झाड आहे. त्याची प्रकर्षाने आठवण झाली.
काही लेखन वाचल्यानंतर काही काळ काहीच बोलू नये, लिहू नये, वाचू नये अशी मनाची अवस्था होते ना घायाळ, थिजलेली, तशी झाली माझी.
लेख दोनदा वाचला. आणखीही काही वेळा वाचणार आहे आणखी सवडीने.
आमच्या दहावीच्या वर्गावर असलेल्या पत्र्यांवर तडतडणारा, झोड उठवणारा पाऊस जेव्हा कान बहिरे करुन टाकी आणि मराठीचा तास असला तर एस्.डी.कुलकर्णी सर आम्हाला घेऊन दारा खिडक्यातून आजूबाजूच्या निसर्गाचे, झाडांचे ते रौद्र रुप पहायला लावत तेव्हा त्यांचे ते निशःब्द शिकवणे आता अंगावर काटा आणते! त्याची आठवण करुन दिलीस.
आणि काय लिहू? त्यापेक्षा झाडाचेच एक चित्र टाकणे जास्त संयुक्तिक ठरावे.
नायग्राच्या अमेरिकन बाजूला ग्रँड रॅपिड्स वर पडलेले एक झाड त्याही अवस्थेत खोडातून नवी पालवी घेऊन पुन्हा फुटले ते असे
चतुरंग
यापेक्षा जास्त शब्द नाहीत!
गडद पावसाळी दिवसांत अंधारून येऊन पाऊस पडायला लागला की तिथली झाडं अक्षरशः झोडपून निघायची. क्वचित बाईही मग शिकवणं थांबवायच्या. अंधारल्या वर्गात बसून ढगांच्या गडगडाटात, डोळेभरुन ती गदगदणारी झाडं मग सगळे पाहत राहत.
शाळेतले दिवस आठवले, पाऊस आठवला आणि ते पाणी डोळ्यात आले.
रेवती
तुम्हां सर्वांच्या प्रोत्साहनपर प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार.
मनीषा, 'शुभ्र काही जीवघेणे' हा खरंच डोक्यात काही काळ रूतून रहावा असा शब्दप्रयोग आहे. अमरेन्द्र धनेश्वरांचे याच नावाचे एक संगीतातील व्यक्तींबाबत पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. स्वातीताई, शीर्षकाचे श्रेय द. भा. धामणस्करांना. त्यांचा या नावाचा कवितासंग्रह आहे. झाडांवरच्या कवितांचा. पुढच्या भागात मुख्यत्वे त्याबद्दलच लिहीन. चतुरंगराव, झाडाचा फोटो आवडला. जगण्याच्या चिवट इच्छेचं अजून एक उदाहरण.
साहित्यात झाडांवर झालेल्या मानवी भावभावनांच्या रोपणाबद्दलचा आणि द. भा. धामणस्करांच्या काव्यसंग्रहाबद्दलचा दुसरा (थोडा रुक्ष वाटू शकेल असा) भाग उद्या प्रकाशित करेन. विस्तारभयास्तव काही झाडांबद्दल लिहिता आले नाही, त्यापैकी काहींचे फोटोज येथे आहेत.
>>> अमरेन्द्र धनेश्वरांचे याच नावाचे एक संगीतातील व्यक्तींबाबत पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.
नंदन तुम्हाला अंबरीष मिश्र तर म्हणायचे नव्हते ? मोठा फरक आहे दोन लेखकांत :-)
चुकलो, अंबरीश मिश्र म्हणायचे होते - घोटाळा झाला :(
बेगम अख्तर, पार्श्वनाथ आळतेकर, सआदत हसन मंटो, शोभा गुर्टू, सज्जाद हुसैन आदी दिग्गजांबद्दल त्यांनी लिहिले आहे.
नंदन -- हा लेख म्हणजे खरच एक सुंदर मेजवानीच होती. शीर्षकावरून द. भा. धामणस्कर यांच्य पुस्तकाची आठवण झाली, मी मागे त्यावर इथे एक लेख लिहिला होता - त्याची आठवण झाली. ह्या झाडांच्या हिरव्या आठवणी खूप आवडल्या - पुढच्या भागाची वाट पाहतोय! :)
- मनिष
tI दिव्यांनी मढवलेली निष्पर्ण तरुंची राईचा फोटो सुरेख!
लेख फारच सुंदर लिहिला आहे.
पाच-सहा झाडांतलं एक उगाच तिरपं, जमिनीशी अधिक सलगी साधत वाढलेलं असतं. एखाद्या फॅमिली फोटोसाठी प्रौढ मंडळी गंभीरपणे उभी आहेत, आणि मध्येच एखादा गोटू गंमतीने जरा वाकड्याच पोझमध्ये उभा राहला आहे
मध्यंतरी आमच्या इथे असाच एक जमिनीशी सलगी केलेला गोटू दिसला होता.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..
--शाल्मली
खरे तर अतिपरिचयात अवज्ञा झालेली झाडे आणि काही काव्यपंक्ती सुद्धा.
असे लेख वाचले की त्यांचे महत्त्व नव्याने जाणवते.
'पावसाळ्यातील गडद अंधार्या वर्गाची' आठवण तर अक्षरशः जीव घेउन गेली.
नंदन - तुमची साहित्यिक जाण तर चांगली आहेच पण संवेदनशीलताही तितकीच तरल आहे हे वाचून खूपच जाणवत.
+१
यशोताई, तुझ्यामुळे आज परत वाचला गेला हा भाग. परत आवडला हे सांगायलाच नको. नंदनने नियमितपणे लिहावे ही अपेक्षा आहेच. तो लिहिणार नाहीच हे ही आता गृहित धरले आहे. :(
बिपिन कार्यकर्ते
तुमच्यामुळे हा लेख वाचायला मिळाला.
लेखाचं सौंदर्य वर्णन करायला शब्द सापडत नाहीत. सापडतात ते पुरेसे पडत नाहीत. इतकं प्रगल्भ लेखन वाचायला मिळणं विरळा. जालावर तर नाहीच नाही. चित्रं, काव्य, आठवणी यांचं भुलवून टाकणारं कोलाज.
मुखपृष्ठावरील दुव्यामुळे हा निसटून गेलेला सुरेख लेख वाचायला मिळाला. तात्यांची आभार आणि नंदनरावांचे अभिनंदन!
लेखाचा पुढचा भाग प्रसिद्ध झालेला दिसला नाही.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
प्रतिक्रिया
अतिशय सुरेख..
व्वा.. मस्त...
दुसरा पक्षी
सहमत..
सुरेख प्रेमकविता!
वहवा
मिपाचे वैभव वाढवणारा लेख...!
इतक्या
मस्त!
छान..
सुंदर ..
तोड्तो
मस्त
फार वाट
अगदी अगदी !
सुंदर..
हळुवार लेखन
लेखन आवडले
लेख अतिशय आवडला
उत्तम
फारच सुंदर
नंदन,
सुंदर
खूप छान लेख!
वा!
वा वा वा!
अफलातून
अतिशय सुंदर लिखाण
नि:शब्द
धन्यवाद
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
शंका
अंबरीश मिश्र
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मस्त क्रमशः
अतिशय उत्कृष्ट लेख
+१
मेजवानी...
सुंदर लेख
अप्रतिम लेख
उत्तम लेख
वा! लेख आवड्ला, सुरेख
आहाहा!!!
सुरेख
पुन्हा
+१ यशोताई,
धन्यवाद +२
नंदनजी
सुरेख
झाला आहे. इथे आहे. - http:/
मिपा क्लासिक -४-अ
कालातीत लेखांपैकी एक!