✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बरेच काही उगवून आलेले...[भाग १]

न
नंदन यांनी
Mon, 09/22/2008 - 07:47  ·  लेख
लेख
  • बरेच काही उगवून आलेले...[अंतिम भाग]

Book traversal links for बरेच काही उगवून आलेले...[भाग १]

  • बरेच काही उगवून आलेले...[अंतिम भाग] ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
24250 वाचन

💬 प्रतिसाद (52)

प्रतिक्रिया

अतिशय सुरेख..

प्राजु
Mon, 09/22/2008 - 08:12 नवीन
आपला झाडांवरचा हा लेख वाचून मला इंदिरा संतांच्या "बाभळी" कवितेची आठवण झाली. अमेरिकेत झाडांवर झळकणारे फॉल कलर्स पाहून मलाही एक कविता सुचली होती.. लेख अतिशय आवडला... चित्रेही सुंदर. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

व्वा.. मस्त...

प्रभाकर पेठकर
Mon, 09/22/2008 - 08:20 नवीन
अतिशय सुंदर लेख. कवितांचे आणि माझे अगदी वाकडे नसले तरी स्वतःला सुचत नाहीत हे कटू वास्तव आहे. पण कवितांचा माझ्या कुवतीनुसार आस्वाद जरूर घेतो. वृक्ष-वल्लीं वरील हा लेख अगदी वाचनिय झाला आहे. माझ्या दहिसरचे वर्णन, माझ्या 'विद्या-मंदिर' शाळेचे चित्र पाहून मन भरून आले. गुरूवारच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

दुसरा पक्षी

मुक्तसुनीत
Mon, 09/22/2008 - 08:49 नवीन
नंदन जे झाडांवरचे गाणे गातो आहे झाडच दुसरे पुन्हा त्या गाण्यात नंदन जे झाडांवरचे गातो आहे पक्षी दुसरा गाण्यांतच त्या पुन्हा झाडांवरचे जे नंदन गातो.. मागे बनीने म्हण्टल्याचे आठवते आहे ? एक खूप श्रीमंत माणूस रहातो क्यालिफोर्नियाच्या "त्या" भागात. ही जाणीवेची श्रीमंती - जिला ज्ञानेश्वराने जाणीवेची राणीव म्हण्टले आहे कुठे तरी - अशी खानदानी आहे की तिचे उठवळ प्रदर्शन नाही होत कधी. "साठिषण्मासीं परंतु" ज्या शलाका येतात ना, तेव्हा मात्र एकदम डवरून येते हे झाड. या श्रीमंत लेखाच्या सुरवातीचा परिच्छेद वाचत होतो आणि वाचून झाल्यावर श्वास कोंडल्यासारखे झाले. एखाद्याने तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यातील एका गोष्टीवर इतके नेमके बोट ठेवले असावे , की बस्स. नंदनच्या या सुरेख लेखावरची दाद अशी शब्दबंबाळ द्यावी लागावी यातली विसंगती मला दिसते. पण काय करणार , त्याच्यासारखे आपण सारे थोडेच श्रीमंत आहोत ? :-) नंदन असेच लिहीत जा कधीतरी. अति वाट पाहायला लावणेही चूकच ; कसे म्हणता ?
  • Log in or register to post comments

सहमत..

विसोबा खेचर
Mon, 09/22/2008 - 08:57 नवीन
या श्रीमंत लेखाच्या सुरवातीचा परिच्छेद वाचत होतो आणि वाचून झाल्यावर श्वास कोंडल्यासारखे झाले. एखाद्याने तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यातील एका गोष्टीवर इतके नेमके बोट ठेवले असावे , की बस्स. नंदनच्या या सुरेख लेखावरची दाद अशी शब्दबंबाळ द्यावी लागावी यातली विसंगती मला दिसते. पण काय करणार , त्याच्यासारखे आपण सारे थोडेच श्रीमंत आहोत ? अगदी खरं! मुक्तराव तुझ्याशी सहमत आहे रे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

सुरेख प्रेमकविता!

धम्मकलाडू
Mon, 09/22/2008 - 18:22 नवीन
नंदन जे झाडांवरचे गाणे गातो आहे झाडच दुसरे पुन्हा त्या गाण्यात नंदन जे झाडांवरचे गातो आहे पक्षी दुसरा गाण्यांतच त्या पुन्हा झाडांवरचे जे नंदन गातो.. नंदनचा लेख सुरेख आहेच पण ही प्रेमकविता ही सुरेख आहे. पूर्ण करा ना कविता. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

वहवा

लिखाळ
Mon, 09/29/2008 - 19:59 नवीन
नंदन, अतिशय उत्तम लेख. लेखाची कल्पना, मांडाणी आणि सर्वच आवडले. पुढचा भाग लवकरच वाचतो. >>ही जाणीवेची श्रीमंती - जिला ज्ञानेश्वराने जाणीवेची राणीव म्हण्टले आहे कुठे तरी - अशी खानदानी आहे की तिचे उठवळ प्रदर्शन नाही होत कधी. "साठिषण्मासीं परंतु" ज्या शलाका येतात ना, तेव्हा मात्र एकदम डवरून येते हे झाड. << उत्तम लेखाला उत्तम प्रतिसाद. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

मिपाचे वैभव वाढवणारा लेख...!

विसोबा खेचर
Mon, 09/22/2008 - 08:55 नवीन
नंदनसायबा, मिपाच्या वैभवात भर घालणारा, अतिशय सुंदर शब्दात मांडलेला, झाडांशी मैत्री करणारा लेख आवडला. आज सकाळी सकाळीच इतका सुरेख लेख वाचून केवळ आजच्या दिवसाचीच नव्हे, तर सबंध आठवड्याचीच सुरवात अत्यंत प्रसन्न झाली आहे! सायबा, इतक्या सुरेख लेखाकरता मुंबईला आलास की बक्षिस म्हणून, कौतुक म्हणून, तुला समर्थ भोजनालयात एक पार्टी माझ्यातर्फे लागू! :) येत्या गुरुवारी म्होरल्या भागाची वाट पाहात आहे! बाकी, शाळेचा फोटू पाहून जीव एवढास्सा झाला! गेल्या आता त्या शाळा...! अवांतर - लेख अधिक रंगतदार करण्याकरता, सर्वांगसुंदर करण्याकरता रेग्यांच्या/बोरकरांच्या दिलेल्या काव्यपंक्ति वाचून मिपाच्या या धोरणातल्या, एखाद्या लेखा/चर्चेदरम्यान केवळ संदर्भाकरता म्हणून अन्य ठिकाणच्या दोनचार ओळी किंवा एखादा लहानसा परिच्छेद देण्यास हरकत नाही. जर काही आस्वादात्मक, कलात्मक, अनुवादात्मक भाष्य करायचे असेल तरच मिपाव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रसिद्ध झालेली एखादी कविता/गझल/लेख/ संदर्भाकरता म्हणून मिपावर प्रसिद्ध करण्यास हरकत नाही.... या दोन कलमांचा फार सुंदर उपयोग केला आहे असे आवर्जून सांगावेसे वाटते! जियो...! (नंदनसायबाचं मैतर लाभलेला एक भाग्यवान!) तात्या. आता जाता जाता थोडेसे ह घा.. :) नंदन मराठी साहित्यविषयक अनुदिनी तुका रे मेल्या खय कळता त्या मराठी साहित्यात?! :) आपला, (शिंदुदुर्ग जिल्ह्यातला) तात्या देवगडकर. :)
  • Log in or register to post comments

इतक्या

यशोधरा
Mon, 09/22/2008 - 09:15 नवीन
इतक्या सुंदर शब्दांत गुंफलेल्या लेखाला दाद द्यायला तितकेच सुंदर शब्द कुठून आणायचे नंदन? लिहीत जा रे..
  • Log in or register to post comments

मस्त!

प्रमोद देव
Mon, 09/22/2008 - 09:18 नवीन
"मन करा रे प्रसन्न" ह्या उक्तीची प्रचिती देणारा ताजातवाना सचित्र लेख!
  • Log in or register to post comments

छान..

पद्मश्री चित्रे
Mon, 09/22/2008 - 09:34 नवीन
खूप छान लिहिलं आहे.. "मन करा रे प्रसन्न" ह्या उक्तीची प्रचिती देणारा लेख- >>अगदी खरं
  • Log in or register to post comments

सुंदर ..

मनीषा
Mon, 09/22/2008 - 09:47 नवीन
लेख खूप आवडला ... फोटो सगळेच अप्रतीम... शांतादुर्गेच्या तळ्याचा , आणि , माड असलेल्या समुद्र किनार्‍याचा खूप आवडला . रेग्यांची आणि बोरकरांची कविता सुरेखच आहेत झाड माझें लाखमोली लाल ज्याला फक्त पानें, नेणतां ये एक ज्याला शुभ्र कांही जीवघेणें....... किती छान लिहीलं आहे आणि बोरकरांची कविता तर सुंदरच आहे ..
  • Log in or register to post comments

तोड्तो

विनायक प्रभू
Mon, 09/22/2008 - 10:13 नवीन
http://vipravani.wordpress.com/ एका माणसाला त्याच्या संपूर्ण आयुष्यात लागणारा ऑक्सिजन एक झाड पुरवते. तरीसुद्धा त्यांची तोड सुरुच आहे बर्याच वेळी कारण नसताना. आजपर्यंत सुमारे १०००० हजार रोपे लावुन त्यांना जगवलेला वि.प्र.
  • Log in or register to post comments

मस्त

आनंदयात्री
Mon, 09/22/2008 - 10:34 नवीन
बाहेर धो धो पाउस पडत असतांना वर्गात शिकवणार्‍या बाई आठवल्या, शेवटी आवाज प्रचंड वाढल्यावर शिकवणे शेवटपर्यंत एकु येत नसे, मग चालु होई कवितेचे पाठांतर !! सुरेख याद जागवलीस :)
  • Log in or register to post comments

फार वाट

मेघना भुस्कुटे
Mon, 09/22/2008 - 11:10 नवीन
फार वाट पाहायला लावणे चूकच. पण असले काही हाताला लागणार असेल, तर ही वाट पाहणेही कबूल आहे. कुणी काही लिहिल्याबद्दल आभार मानावे, असे प्रसंग अपवादानेच येतात. त्यांतला हा एक. आभार नंदन.
  • Log in or register to post comments

अगदी अगदी !

भाग्यश्री
Mon, 09/22/2008 - 22:50 नवीन
अगदी अगदी ! आभार नंदन ! मस्तच लेख.. (विजेने चिरफळ्या उडालेलं,तरीही पालवी फुटलेलं झाड पाहून काटा आला.. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे

सुंदर..

स्वाती दिनेश
Mon, 09/22/2008 - 13:45 नवीन
नंदन ,फार सुंदर लेख.लेखाचे शीर्षकही फार आवडले. लेखाच्या विषयामुळे कृत्रिम होईल अशी भीती व्यक्त केली आहेस पण अजिबात कृत्रिमता नाही. हिरवी सावली धरणारे माड,लेकुरवाळे फणस - हे फार आवडलं. गुरूवारची वाट पाहत आहे,:) स्वाती
  • Log in or register to post comments

हळुवार लेखन

विसुनाना
Mon, 09/22/2008 - 14:42 नवीन
मृदू आणि भावूक लेखन. लेख अत्यंत आवडला.
  • Log in or register to post comments

लेखन आवडले

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 09/22/2008 - 18:29 नवीन
मृदू आणि भावूक लेखन. लेख अत्यंत आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

लेख अतिशय आवडला

प्रियाली
Mon, 09/22/2008 - 18:27 नवीन
लेख अतिशय सहज आणि ओघवता झाला आहे. दहिसरपासून अमेरिकेपर्यंतची झाडे डोळ्यासमोरून हलली. :) मुंबईला माझ्या घराबाहेर करंज्याचे झाड आहे. एप्रिलमधे त्याला नवी पालवी आणि शुभ्र फुलांचा बहर येतो. पावसात पानं पाण्या वार्‍याने सळसळत असतात. सदैव सळसळत्या चैतन्याची सोबत आणि जिवंतपणाची आठवण करून देणारे झाड आहे. त्याची प्रकर्षाने आठवण झाली.
  • Log in or register to post comments

उत्तम

चित्तरंजन भट
Mon, 09/22/2008 - 18:44 नवीन
उत्तम लेखन. लेखकाच्या वाचनाची आणि व्यासंगाची सहजरीत्या जाणीव करून देणारे. अभिनंदन नंदन! चित्तरंजन
  • Log in or register to post comments

फारच सुंदर

भोचक
Mon, 09/22/2008 - 18:58 नवीन
नंदन, तू इतकं छान कसं लिहू शकतोस? तुझ्या लेखनाचा चक्क हेवा वाटतो रे. फारच सुंदर.
  • Log in or register to post comments

नंदन,

चतुरंग
Mon, 09/22/2008 - 19:18 नवीन
काही लेखन वाचल्यानंतर काही काळ काहीच बोलू नये, लिहू नये, वाचू नये अशी मनाची अवस्था होते ना घायाळ, थिजलेली, तशी झाली माझी. लेख दोनदा वाचला. आणखीही काही वेळा वाचणार आहे आणखी सवडीने. आमच्या दहावीच्या वर्गावर असलेल्या पत्र्यांवर तडतडणारा, झोड उठवणारा पाऊस जेव्हा कान बहिरे करुन टाकी आणि मराठीचा तास असला तर एस्.डी.कुलकर्णी सर आम्हाला घेऊन दारा खिडक्यातून आजूबाजूच्या निसर्गाचे, झाडांचे ते रौद्र रुप पहायला लावत तेव्हा त्यांचे ते निशःब्द शिकवणे आता अंगावर काटा आणते! त्याची आठवण करुन दिलीस. आणि काय लिहू? त्यापेक्षा झाडाचेच एक चित्र टाकणे जास्त संयुक्तिक ठरावे. नायग्राच्या अमेरिकन बाजूला ग्रँड रॅपिड्स वर पडलेले एक झाड त्याही अवस्थेत खोडातून नवी पालवी घेऊन पुन्हा फुटले ते असे Image removed. चतुरंग
  • Log in or register to post comments

सुंदर

विसोबा खेचर
Mon, 09/22/2008 - 22:40 नवीन
सुंदर चित्र रे रंगा..! एकाकी झाड आवडलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

खूप छान लेख!

रेवती
Mon, 09/22/2008 - 19:38 नवीन
यापेक्षा जास्त शब्द नाहीत! गडद पावसाळी दिवसांत अंधारून येऊन पाऊस पडायला लागला की तिथली झाडं अक्षरशः झोडपून निघायची. क्वचित बाईही मग शिकवणं थांबवायच्या. अंधारल्या वर्गात बसून ढगांच्या गडगडाटात, डोळेभरुन ती गदगदणारी झाडं मग सगळे पाहत राहत. शाळेतले दिवस आठवले, पाऊस आठवला आणि ते पाणी डोळ्यात आले. रेवती
  • Log in or register to post comments

वा!

चित्रा
Mon, 09/22/2008 - 20:44 नवीन
नंदन, फारच सुरेख लिहीले आहे. मस्त म्हणण्यापलिकडचे. फारच छान! चित्रा
  • Log in or register to post comments

वा वा वा!

सर्वसाक्षी
Mon, 09/22/2008 - 21:43 नवीन
नंदन, वाचुन प्रश्न पडला, अधिक दाद कशाला द्यावी? या लेखाला की जोपासलेल्या व्यासंगाला? एक अप्रतिम निसर्गलेख! धन्यवाद. साक्षी
  • Log in or register to post comments

अफलातून

घाटावरचे भट
Mon, 09/22/2008 - 22:42 नवीन
अफलातून लेख!!! असंच अजून लिवा!!! लै ग्वाड वाटतया वाचाया!!!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर लिखाण

दत्ता काळे
Tue, 09/23/2008 - 10:43 नवीन
अप्र तिम वाचनिय लेख
  • Log in or register to post comments

नि:शब्द

ऋषिकेश
Tue, 09/23/2008 - 16:30 नवीन
नि:शब्द केलंस गड्या! -(.....) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

धन्यवाद

नंदन
Wed, 09/24/2008 - 07:46 नवीन
तुम्हां सर्वांच्या प्रोत्साहनपर प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार. मनीषा, 'शुभ्र काही जीवघेणे' हा खरंच डोक्यात काही काळ रूतून रहावा असा शब्दप्रयोग आहे. अमरेन्द्र धनेश्वरांचे याच नावाचे एक संगीतातील व्यक्तींबाबत पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. स्वातीताई, शीर्षकाचे श्रेय द. भा. धामणस्करांना. त्यांचा या नावाचा कवितासंग्रह आहे. झाडांवरच्या कवितांचा. पुढच्या भागात मुख्यत्वे त्याबद्दलच लिहीन. चतुरंगराव, झाडाचा फोटो आवडला. जगण्याच्या चिवट इच्छेचं अजून एक उदाहरण. साहित्यात झाडांवर झालेल्या मानवी भावभावनांच्या रोपणाबद्दलचा आणि द. भा. धामणस्करांच्या काव्यसंग्रहाबद्दलचा दुसरा (थोडा रुक्ष वाटू शकेल असा) भाग उद्या प्रकाशित करेन. विस्तारभयास्तव काही झाडांबद्दल लिहिता आले नाही, त्यापैकी काहींचे फोटोज येथे आहेत.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

शंका

मुक्तसुनीत
Wed, 09/24/2008 - 07:49 नवीन
>>> अमरेन्द्र धनेश्वरांचे याच नावाचे एक संगीतातील व्यक्तींबाबत पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. नंदन तुम्हाला अंबरीष मिश्र तर म्हणायचे नव्हते ? मोठा फरक आहे दोन लेखकांत :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

अंबरीश मिश्र

नंदन
Wed, 09/24/2008 - 07:57 नवीन
चुकलो, अंबरीश मिश्र म्हणायचे होते - घोटाळा झाला :( बेगम अख्तर, पार्श्वनाथ आळतेकर, सआदत हसन मंटो, शोभा गुर्टू, सज्जाद हुसैन आदी दिग्गजांबद्दल त्यांनी लिहिले आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

मस्त क्रमशः

धनंजय
Wed, 09/24/2008 - 08:19 नवीन
गुजगोष्टी करता करता बोरकरांची गुणगुण ओठांवर ठेवून गेला आहे हा भाग. अशा क्रमशःबद्दल कोण तक्रार करू शकेल?
  • Log in or register to post comments

अतिशय उत्कृष्ट लेख

बेसनलाडू
Wed, 09/24/2008 - 08:33 नवीन
फार म्हणजे फारच आवडला. (वृक्षवल्लीप्रेमी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

+१

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 09/24/2008 - 12:39 नवीन
असेच म्हणतो. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

मेजवानी...

मनिष
Wed, 09/24/2008 - 15:36 नवीन
नंदन -- हा लेख म्हणजे खरच एक सुंदर मेजवानीच होती. शीर्षकावरून द. भा. धामणस्कर यांच्य पुस्तकाची आठवण झाली, मी मागे त्यावर इथे एक लेख लिहिला होता - त्याची आठवण झाली. ह्या झाडांच्या हिरव्या आठवणी खूप आवडल्या - पुढच्या भागाची वाट पाहतोय! :) - मनिष tI दिव्यांनी मढवलेली निष्पर्ण तरुंची राईचा फोटो सुरेख!
  • Log in or register to post comments

सुंदर लेख

शाल्मली
Wed, 09/24/2008 - 19:27 नवीन
लेख फारच सुंदर लिहिला आहे. पाच-सहा झाडांतलं एक उगाच तिरपं, जमिनीशी अधिक सलगी साधत वाढलेलं असतं. एखाद्या फॅमिली फोटोसाठी प्रौढ मंडळी गंभीरपणे उभी आहेत, आणि मध्येच एखादा गोटू गंमतीने जरा वाकड्याच पोझमध्ये उभा राहला आहे मध्यंतरी आमच्या इथे असाच एक जमिनीशी सलगी केलेला गोटू दिसला होता. Image removed. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.. --शाल्मली
  • Log in or register to post comments

अप्रतिम लेख

वाचक
Wed, 09/24/2008 - 20:21 नवीन
खरे तर अतिपरिचयात अवज्ञा झालेली झाडे आणि काही काव्यपंक्ती सुद्धा. असे लेख वाचले की त्यांचे महत्त्व नव्याने जाणवते. 'पावसाळ्यातील गडद अंधार्‍या वर्गाची' आठवण तर अक्षरशः जीव घेउन गेली. नंदन - तुमची साहित्यिक जाण तर चांगली आहेच पण संवेदनशीलताही तितकीच तरल आहे हे वाचून खूपच जाणवत.
  • Log in or register to post comments

उत्तम लेख

मृदुला
गुरुवार, 09/25/2008 - 01:41 नवीन
लेख आवडला. काही अनुभवून काही आठवणे, विशेषत: कविता हाच एक उच्च अनुभव असतो. त्याचे इतके सुंदर वर्णन वाचायला आवडले.
  • Log in or register to post comments

वा! लेख आवड्ला, सुरेख

सुवर्णमयी
गुरुवार, 09/25/2008 - 01:57 नवीन
नंदन, लेखन अतिशय आवडले, सुरेख. सोनाली
  • Log in or register to post comments

आहाहा!!!

सहज
Sun, 09/28/2008 - 18:08 नवीन
नंदन सुरेख लेख! धनंजय म्हणतात तसे क्रमशः इतके छान कधीच वाटले नव्हते. वाट पहात आहे. :-)
  • Log in or register to post comments

सुरेख

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 09/28/2008 - 22:59 नवीन
नंदन, अप्रतिम लेख !!!
  • Log in or register to post comments

पुन्हा

यशोधरा
गुरुवार, 06/17/2010 - 13:26 नवीन
पुन्हा एकदा लेख वाचला नंदन... समर्पक दाद द्यायला शब्दच नाहीत माझ्याकडे.
  • Log in or register to post comments

+१ यशोताई,

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 06/17/2010 - 13:32 नवीन
+१ यशोताई, तुझ्यामुळे आज परत वाचला गेला हा भाग. परत आवडला हे सांगायलाच नको. नंदनने नियमितपणे लिहावे ही अपेक्षा आहेच. तो लिहिणार नाहीच हे ही आता गृहित धरले आहे. :( बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

धन्यवाद +२

राजेश घासकडवी
गुरुवार, 06/17/2010 - 20:19 नवीन
तुमच्यामुळे हा लेख वाचायला मिळाला. लेखाचं सौंदर्य वर्णन करायला शब्द सापडत नाहीत. सापडतात ते पुरेसे पडत नाहीत. इतकं प्रगल्भ लेखन वाचायला मिळणं विरळा. जालावर तर नाहीच नाही. चित्रं, काव्य, आठवणी यांचं भुलवून टाकणारं कोलाज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

नंदनजी

सहज
Fri, 06/18/2010 - 13:32 नवीन
लेखाचा पुढचा भाग कुठे आहे?
  • Log in or register to post comments

सुरेख

सुनील
Fri, 06/18/2010 - 17:57 नवीन
मुखपृष्ठावरील दुव्यामुळे हा निसटून गेलेला सुरेख लेख वाचायला मिळाला. तात्यांची आभार आणि नंदनरावांचे अभिनंदन! लेखाचा पुढचा भाग प्रसिद्ध झालेला दिसला नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

झाला आहे. इथे आहे. - http:/

यशोधरा
Fri, 10/30/2015 - 23:51 नवीन
झाला आहे. इथे आहे. - http://www.misalpav.com/node/3748
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

मिपा क्लासिक -४-अ

मारवा
Fri, 10/30/2015 - 14:49 नवीन
मिपा क्लासिक -४-अ
  • Log in or register to post comments

कालातीत लेखांपैकी एक!

प्यारे१
Fri, 10/30/2015 - 17:59 नवीन
कालातीत लेखांपैकी एक! नंदन मालकांचे शब्दप्रभुत्वाबद्दल काय बोलावं. ___/\___.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा