✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बरेच काही उगवून आलेले...[अंतिम भाग]

न
नंदन यांनी
Fri, 09/26/2008 - 21:47  ·  लेख
लेख

Book traversal links for बरेच काही उगवून आलेले...[अंतिम भाग]

  • ‹ बरेच काही उगवून आलेले...[भाग १]
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13586 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

य
यशोधरा Fri, 09/26/2008 - 21:53 नवीन

किती, किती

किती, किती सुंदर लिहिशील.... लिहिता रहा रे, अजून काय सांगू?
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 09/29/2008 - 16:32 नवीन

सहमत

अत्यंत सुंदर लेखन, प्रसन्न करणारे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ऋ
ऋषिकेश Fri, 09/26/2008 - 21:59 नवीन

नितांतसुंदर

अहाहा! नितांतसुंदर आणि ओघवता भाग.. खूप खूप आवडला मात्र मला पहिला भाग फार म्हणजे फारच जास्त आवडला (कदाचित दहिसरच्या उल्लेखामुळे व शाळेच्या चित्रामुळे असेल :) ). पण हा भागही उ त्त म!!!! विषेशतः धामणस्करांची 'परिपक्व' कविता भन्नाट - ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 09/26/2008 - 22:18 नवीन

शब्दांच्या पलिकडे...

अतिशय ओघवती भाषा आणि सुंदर वर्णन. लेखनात दिलेले झाडांच्याबद्दलचे कवितेतले, गीतातले, गद्यातले दाखले... लेखनाला साज चढला आहे यांनी. अभिनंदन. विषेशतः धामणस्करांची 'परिपक्व' कविता भन्नाट हेच म्हणते.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत Fri, 09/26/2008 - 22:20 नवीन

दुबळी माझी झोळी

नंदन, हे दोन्ही लेख प्रकाशित करून आमचे अनुभवविश्व समृद्ध केल्याबद्दल मनापासुन आभार. तुम्ही इतकं भरभरून लिहिले आहे की वाचता वाचता मला असे वाटत राहिले की 'देणार्‍याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी' .. पुन्हा एकदा फिरुन धन्यवाद...
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 09/26/2008 - 22:37 नवीन

+१

हेच म्हणतो . उत्तम लेखाचा उत्तम उत्तरार्ध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत
म
मनिष Sat, 09/27/2008 - 08:29 नवीन

+१

सहमत!!! धामणकरांच्या कवितेसारखाच परिपक्व आणि सुरेख! अजून लिहा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत
म
मुक्तसुनीत Fri, 09/26/2008 - 23:26 नवीन

शांता शेळक्यांच्या एका लेखातून

शांता शेळक्यांच्या एका लेखाची आठवण आली हे वाचताना. त्यानी म्हण्टले होते ( विचार शांताबाईंचे, शब्द माझे) : "आमच्या घराच्या मागे पारिजातकाचे एक झाड होते. दरवर्षी त्याला बहर यायचा ; अगदी न चुकता. पूर्ण डवरून जायचे ते झाड. आजकाल लेखकाची बांधिलकी , त्याचे कर्तव्य या गोष्टीची बरीच चर्चा साहित्याच्या विमर्शात होते. या पारिजातकाचे पहा. कुणीही कसलाही उपदेश न करता हे झाड कसे नेमाने आपले बहरून येण्याचे काम चोख बजावत होते ! आपल्या कामाशी असणार्‍या बांधिलकीचे याहून सुंदर उदाहरण कुठे सापडणार !" झाडांच्या या चर्चेत गीतेतील त्या सुप्रसिद्ध अश्वत्थाची आठवण आल्याशिवाय रहावत नाही : छंद हीच ज्याची पर्णे . ज्याची मुळे जमिनीवर असून फांद्या जमिनिखाली आहेत.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 09/26/2008 - 23:43 नवीन

वा वा वा, नंदन!!

उत्तमोत्तम साहित्याचे वाचन, मनन आणि चिंतन ह्या चक्रातून यशस्वी पार होऊन, त्यात अनुभवांचे सार मिसळून तृप्त झालेल्या तुझ्या मनातून हा लेख आपोआप भरुन वाहिलेला आहे, शब्दशः उतू गेलेला आहे! असे उतू जाणे वरचेवर घडो. (तुझ्या लेखनात मला रवींद्र पिंग्यांच्या लेखनातली सहजता आणि अनुभवांचा व्यापक पट दिसला. जियो!!) चतुरंग
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sat, 09/27/2008 - 00:06 नवीन

सहमत आहे

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ऋ
ऋषिकेश Sat, 09/27/2008 - 00:08 नवीन

सहमत

वा! काय बोललात रंगराव... अगदी सहमत आहे :) (+१) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
पिवळा डांबिस Sat, 09/27/2008 - 00:34 नवीन

अप्रतिम!

लेख अतिशय सुंदर उतरला आहे! पुनःपुन्हा वाचत रहावे असे वाटणारा लेख!!! जियो, नंदन!!! -डांबिसकाका (स्वगतः त्या दळवींच्या तात्या रेडकरासारखो (रेफः सारे प्रवासी घडीचे) हो पण एक तरूण तात्या रेडकर मिपावर इलेलो दिसतांसा!!! ह. घे.) :)
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sat, 09/27/2008 - 00:41 नवीन

फारच सुंदर

वर इतके कौतुक झाले आहे की पुन्हा तेच शब्द लिहित नाही. पण इतके समग्र संदर्भ कसे गोळा केलेस. ते कसे तुझ्यापुढे येत राहिले आणि आठवणीत राहिले त्याबद्दल अवश्य काहीतरी लिहि.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 09/27/2008 - 03:10 नवीन

आणखी काय म्हणावे

बहुतेक संदर्भ मी वाचलेले नाहीत, पण त्यांच्या अवतरणातून नंदन यांनी काही प्रमाणात तरी त्यांचे सार माझ्यापर्यंत पोचवले. ज्या कविता, कडवी उद्धृत केली आहेत - फारच नेमका आणि हळुवार परिणाम करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
म
मृदुला Sat, 09/27/2008 - 03:18 नवीन

उत्तम

लेखमाला संपू नये असे वाटते आहे. आणखी भरपूर लिहावे.
पण इतके समग्र संदर्भ कसे गोळा केलेस. ते कसे तुझ्यापुढे येत राहिले
प्रियालीशीही सहमत.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 09/27/2008 - 08:16 नवीन

नंदनसायबा,

नंदनसायबा, आपण तर साला तुझा व्यासंग पाहून खलासच झालो! 'देणाराचे हात हजारो, दुबळी माझी झोळी..' या अभिजितच्या म्हणण्याशी आणि 'लेखमाला संपूच नये..' या मृदुलाच्या म्हणण्याशी पूर्ण सहमत... अवांतर - शांता शेळकेंची विद्यार्थीनी आणि मराठीची शिक्षिका असलेल्या माझ्या म्हातारीला तुझ्या लेखाचा प्रथम भाग अतिशय आवडला होता. आज हा दुसराही भाग प्रकाशित झाल्याचे मी तिला सांगितले तेव्हा ती मला म्हणाली, "मला लवकरात लवकर या लेखाचाही प्रिन्ट आऊट काढून वाचायला दे. हातातली सगळी कामं बाजूला ठेवून सर्वप्रथम तो लेख वाचला पाहिजे!" आता लगेचंच या लेखाचा प्रिन्ट आऊट काढून तिला वाचायला देतो आहे. ती वाट पाहते आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सुनील Sat, 09/27/2008 - 08:30 नवीन

दोन्ही लेख अत्युत्कृष्ठ

दोन्ही लेख वाचले. फार सुंदर आणि ओघवत्या भाषेत लिहिले आहे! वाचनाचा व्यासंग तर ठायी ठायी जाणवतो. कोंक्रिटच्या जंगलात राहाणार्‍यांसाठी तर असे लेख म्हणजे वार्‍याच्या सुखद लहरींसारखेच. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Sat, 09/27/2008 - 12:42 नवीन

नंदन

नंदन साहेब, तुमचा लेख किती आवडला ह्याचं वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाहीत... तुम्ही अजून खूप लिहायला हवं, एवढीच अपेक्षा!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sat, 09/27/2008 - 14:16 नवीन

सुंदर लेख!!!

इतके संदर्भ ...आणि त्याची गुंफणही तशीच देखणी. असे लेख वाचताना असच म्हणावसं वाटतं .." --------शब्द आणि रेषांचं जग बरोबरीनं अनुभवता आलं तर आपलं जगाकडे पाहणं अधिक सुंदर होतं म्हणूनच 'वाचू आनंदे'...." (माधुरी पुरंदरें "वाचू आनंदे " )
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 09/27/2008 - 16:51 नवीन

व्वा..

नंदन ,सुरेख लिहिलं आहेस रे.. अप्रतिम..,तुझं कौतुक कोणत्या शब्दांत करू? स्वाती
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 09/29/2008 - 12:50 नवीन

धन्यवाद

आपल्या सार्‍यांच्या प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार. हे दोन भाग लिहिण्यापूर्वी त्यांचा फॉर्माट कसा असेल, याबद्दल डोक्यात काहीच पक्कं नव्हतं. सुदैवाने लिहिता लिहिता दोन वेगळे भाग तयार झाले. झाडे पाहून आठवलेल्या कवितांबद्दल लिहायचे बराच वेळ डोक्यात होतेच, पण पुलं-सुनीताबाईंनी केलेल्या बोरकरांच्या काव्यवाचनाच्या सीडीज ऐकताना झाडांच्या चेतनागुणोक्ती अलंकाराबद्दल लिहायचं सुचलं. बरेचसे संदर्भ त्या सीडीमुळेच आठवणीत होते. कोंभाची लवलव... हा त्यातलाच. लेख लिहिताना मग ओघाने त्यावरून तुकाराम-सावतामाळी यांचे आठवले. दासू वैद्यांची कविता , रेग्यांची त्रिधा राधा आणि मर्ढेकरांच्या न्हालेल्या जणू... या कवितांवर मागे अनुदिनीवर लिहिले असल्याने, तेही डोक्यात होते. मराठी अनुदिनींवर सुरू असणार्‍या कवितांच्या खो-खो या खेळात रामाणींची कविता सापडली. गदिमांचे भारलेले झाड, अंतू बर्व्याचा हापूस, चौकट राजा, ग्रेसचे झाडांत पुन्हा उगवाया लिहितानाच सुचले. ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी वाचताना शकुंतलेचे वर्णन आणि अदिती/संहिता यांच्या मिपावरील एका प्रतिक्रियेत (रसेलवरील एका लेखाच्या) 'गर्भश्रीमंतीचे झाड'चा उल्लेख सापडला. इंदिरा संत, महानोर, विंदा, अनिल यांचे कवितासंग्रह वाचून त्यातले काही उल्लेख टिपून ठेवले होते, (तरी अनिलांची काठावरून वाकून सावळे रूप पाहणारी बाभळ राहिलीच.) ते हा लेख लिहिताना वापरले. त्यामुळे प्रियाली यांच्या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर द्यायचे झाले तर, दुसरा भाग हा पहिल्याइतका उत्स्फूर्त नाही. जवळची पुस्तकं धुंडाळून किंवा वाचताना काही सापडले, तर त्याची नोंद करून ठेवून, ते संदर्भ येथे वापरलेले आहेत.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 09/29/2008 - 20:44 नवीन

फार सुंदर

>>'कोंभाची लवलव, सांगे मातीचे मार्दव << वहवा. नंदन, हा भाग सुद्धा अतिशय छान. वरील सर्व प्रतिसादातून कौतूकाचे सर्व चपखल शब्द वापरुन झाले आहेत. त्या सर्वांना समहत असे लिहितो. चतुरंगांनी केलेले कौतूक तर फारच छान आहे. -- (आनंदित) लिखाळ.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 10/09/2008 - 01:32 नवीन

वा!!

नंदनशेठ, आज बरेच दिवसांनी निवांत वेळ मिळाला..तात्याने दिलेल्या प्रतिसादात ह्या लेखाचा दुवा मिळाला.. वाचन खूण करूर ठेवावे असे लेख..दोन्ही लेख अतिशय सहज आणि ओघवते झाले आहेत अभिनंदन.. केशवसुमार
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/09/2008 - 11:02 नवीन

सुरेख !!!

केवळ सुरेख !!! आपल्या साहित्यअभिरुचीची ही एक अप्रतिम ओळख.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक गुरुवार, 10/09/2008 - 16:15 नवीन

झाडे...

ही संदर्भचौकट ध्यानी घेतली तर ही सुंदर लेखमाला इथेच थांबवली हेच छान. कारण विस्तारात पुढे भटकंती होण्याची भीती दाट आहे.
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 06/18/2010 - 13:49 नवीन

.

.
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे Fri, 06/18/2010 - 19:32 नवीन

अप्रतिम

निव्वळ निखळ वाचनानंद.
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 10/30/2015 - 14:50 नवीन

मिपा क्लासिक-४-ब

मिपा क्लासिक-४-ब
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा