णमस्कार्स लोक्स,
हा श्लोक आम्ही प्रथम गोनीदांच्या दुर्गभ्रमणगाथेत वाचला. त्यांनी तो श्लोक बहुधा महादेवशास्त्री जोशी किंवा शां.वि.आवळसकर यांच्याकडून ऐकला असावा असे वाचल्याचे आठवते. तदुपरि मूळ श्लोक कुठला, कुणाचा, काहीही माहिती नाही. मोठा मजेदार वाटल्याने इथे मिपाकरांसोबत शेअर करतोय. संस्कृतमध्ये अध्यात्मासारखे जडजड विषय अन सुभाषितांसारखे एरंडेली काढे अन कामसूत्रांसारखे एकदम खंग्री डोस सोडूनही साधी सोपी सरळ काव्यरचना बरीच होत असे. त्याचा एक नमुना म्हणून हा श्लोक देत आहे. अजूनही बरेच श्लोक आहेत, तेही कधी प्रसंगोपात शेअर करेनच.
कस्येयं तरणि: प्रपा पथिक नः किं पेयमस्यां पयः |
धेनोर्वा उत माहिषं बधिर रे वारः कथं मंगल: |
भौमो वाऽथ शनेश्वरोऽमृतमिदं तत्तेऽधरे दृश्यते |
श्रीमत्पान्थ विलाससुन्दर सखे, यद् रोचते तत्पिब ||
तर एक वाटसरू एका गावी आला आहे. त्याला तहान लागलीये. पण विहीर समोर दिसली तरी समोर एक तरुणी दिसल्यावर बोलायला काहीतरी निमित्त हुडकले तर पाहिजेच नैका? मग साहेबांनी विचारले,
"कस्येयं तरणि: प्रपा?-तहानेपासून तारणारी ही विहीर कुणाची आहे?"
"पथिक, नः- रे वाटसरू, आमची आहे."
"किं पेयं अस्यां? - यात पेय काय आहे?"
तरुणी मोठी सुंदर असावी. नपेक्षा आता यापुढे बोलण्यासारखे काही फारसे नसले तरी वाटसरू साहेब परत पीजे मारू लागले. ती काय दुधातुपाची विहीर थोडीच असणार होती? पण बोलायची हौस दांडगी ;)
"पयः-पाणी".
आता पय शब्दाची मजा अशी की त्याचा अर्थ दूध अन पाणी असा दोन्ही होतो. प्रवाश्याने दूध असा अर्थ घेऊन पुन्हा वेळ काढण्यासाठी पीजे मारणे सुरू केले.
"धेनोर्वा उत माहिषं?-गायीचं आहे की म्हशीचं?"
मुलगीही लगेच त्याची संभावना करते.
"बधिर रे, वारः- अरे बहिर्या, वार आहे ते!!!"
आता वार शब्दाची मजा अशी की वारि म्हंजे पाणी अन वार म्हंजे दिवस. [खरे तर व्याकरणदृष्ट्या श्लोकातले रूप चुकलेले आहे, पण कोटीच्या विनोदास्तव तिकडे जरा दुर्लक्ष करू.] मग प्रवासी तरुणाने अजून पीजे मारत संभाषण सुरू ठेवले.
"कथं मंगलः, भौमो वाऽथ शनेश्वरः?-वार म्हंजे काय मंगळवार आहे, रविवार आहे की शनिवार?"
आता मात्र तरुणीने सांगितले,
"अमृतमिदम्- अरे, हे अमृत आहे!"
आता इथे चांगला मौका मिळालासे पाहून तरुणाने चौका मारला-एकदम हेलिकॉप्टर शॉट!
"तत्तेऽधरे दृश्यते- ते तर तुझ्या ओठात दिसतंय" फुल्टू फ्लर्टिंग :D
आता या इतक्या बोल्ड उत्तरावर तरुणीची प्रतिक्रिया काय आहे?
"श्रीमत्पान्थ विलाससुन्दर सखे- अरे विलासी प्रवासी मित्रा,
यद् रोचते तत्पिब- जे आवडते ते पी!!! " ;) ;)
फुल ऑन ग्रीन शिग्नलच दिला की हो एकदम तिने. यापुढे काय झाले हे कवी सांगत नाही, अन सांगायला तरी कशाला पाहिजे म्हणा. राजकन्येबरोबरच्या अशाच कैक अनुभवांवरती त्या कुणा "चोर" नामक डेअरिंगबाज कवीने पंच्याऐंशी श्लोक रचले, सुळावर जातानाही त्याला तेच आठवत होते म्हणे. तेव्हा राजाने सुळावरून त्याला उतरवले. ते नंतर कधीतरी शेअर अवश्य करेन. लै मसाला आहे त्यात ;)
वाचने
23435
प्रतिक्रिया
124
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तं
अयि सातीमहोदये, भवत्या:
In reply to मस्तं by साती
महोदय, मम अनाहूता सूचना-
In reply to अयि सातीमहोदये, भवत्या: by बॅटमॅन
महोदय, मम अनाहूता सूचना-
In reply to महोदय, मम अनाहूता सूचना- by पिशी अबोली
नेत्रे अश्रुपूर्णे अभवताम्
In reply to महोदय, मम अनाहूता सूचना- by बॅटमॅन
अनाहिताया: एकेनेव प्रतिसादेन
In reply to नेत्रे अश्रुपूर्णे अभवताम् by पिशी अबोली
मी वाचतांय हां!
In reply to अनाहिताया: एकेनेव प्रतिसादेन by बॅटमॅन
आयो......४ प्याक अॅब्स??
In reply to मी वाचतांय हां! by पैसा
रेझ्युमे?
In reply to आयो......४ प्याक अॅब्स?? by बॅटमॅन
लाईन मारल्यानंतर उत्तरपण
In reply to आयो......४ प्याक अॅब्स?? by बॅटमॅन
हम्म.
In reply to आयो......४ प्याक अॅब्स?? by बॅटमॅन
नक्कीच!
In reply to हम्म. by प्रचेतस
बॅट्या हेच काय ते "फ्लर्टींग
In reply to नक्कीच! by बॅटमॅन
अगदी अगदी त्वमेव असि, भवतः
In reply to बॅट्या हेच काय ते "फ्लर्टींग by अभ्या..
नीट गंतव्य स्थान सीसीडी,
In reply to बॅट्या हेच काय ते "फ्लर्टींग by अभ्या..
अय्या कूल
In reply to नीट गंतव्य स्थान सीसीडी, by पिशी अबोली
(No subject)
In reply to अय्या कूल by अभ्या..
नाह!
In reply to नीट गंतव्य स्थान सीसीडी, by पिशी अबोली
बरेच काही नवीन शिकतोय...
In reply to नाह! by बॅटमॅन
दत्तगुरूंचा कित्ता गिरवतोय..
In reply to बरेच काही नवीन शिकतोय... by मोदक
अवधूत चिंतन श्री गुरु देवदत्त
In reply to दत्तगुरूंचा कित्ता गिरवतोय.. by बॅटमॅन
अगदी अगदी
In reply to अवधूत चिंतन श्री गुरु देवदत्त by अत्रुप्त आत्मा
वत्सा,
In reply to नाह! by बॅटमॅन
अनुभवाचें बोल दिसताहेंत
In reply to वत्सा, by पिशी अबोली
कसला अनुभव, जीवनोन्नतीचा???
In reply to अनुभवाचें बोल दिसताहेंत by बॅटमॅन
हीहीही
In reply to कसला अनुभव, जीवनोन्नतीचा??? by पिशी अबोली
कसलं खत्रा बे , कोणती कविता
In reply to हीहीही by अभ्या..
अब्या डब्या >>> अत्यंत सहमत!!
In reply to हीहीही by अभ्या..
__/\__ दंडवत स्विकारावा.
+१
In reply to __/\__ दंडवत स्विकारावा. by गणपा
तिला पाऊस खूप आवडतो..
ओल्ड बट गुड वन!
In reply to तिला पाऊस खूप आवडतो.. by मोदक
भर्तृहरी रॉक्क्स्स्स !!
In reply to ओल्ड बट गुड वन! by बॅटमॅन
भर्तृहरी इंडीड रॉक्स!!!!
In reply to भर्तृहरी रॉक्क्स्स्स !! by प्रसाद गोडबोले
@म्हणून खड्ड्यात गेला पाऊस
In reply to तिला पाऊस खूप आवडतो.. by मोदक
@धिक्कार असो तिचा(तरुणी क्र.
जबरी... शाळेत संस्कृतमधील
फायनल अपडेटः चौरपंचाशिका
ऊप्स लिंका गंडल्या. पुन्हा
In reply to फायनल अपडेटः चौरपंचाशिका by बॅटमॅन
स्वस्त्री घरात नसता
वटवाघुळ मानवा... पळवाट शोधुन
मगनबाण साहेब, शरद यांच्या
In reply to वटवाघुळ मानवा... पळवाट शोधुन by मदनबाण
<a href="http:/
In reply to मगनबाण साहेब, शरद यांच्या by बॅटमॅन
च्यायला या लिंकच्या.
वरच्या दुव्या बद्धल धन्स !
In reply to च्यायला या लिंकच्या. by बॅटमॅन
च्यायला-वाल्या लिंकमधल्या
In reply to च्यायला या लिंकच्या. by बॅटमॅन
वाघुळराव
भारी ! (y)
जबरी लेखन. :)
अता
कशाला नुसती आठवण!
ब्याटम्यानला परत बोलवा!
= ?
In reply to ब्याटम्यानला परत बोलवा! by गामा पैलवान
खलु युक्तमेव कथितं गामामल्लेन
In reply to ब्याटम्यानला परत बोलवा! by गामा पैलवान