लेखनप्रकार
णमस्कार्स लोक्स,
हा श्लोक आम्ही प्रथम गोनीदांच्या दुर्गभ्रमणगाथेत वाचला. त्यांनी तो श्लोक बहुधा महादेवशास्त्री जोशी किंवा शां.वि.आवळसकर यांच्याकडून ऐकला असावा असे वाचल्याचे आठवते. तदुपरि मूळ श्लोक कुठला, कुणाचा, काहीही माहिती नाही. मोठा मजेदार वाटल्याने इथे मिपाकरांसोबत शेअर करतोय. संस्कृतमध्ये अध्यात्मासारखे जडजड विषय अन सुभाषितांसारखे एरंडेली काढे अन कामसूत्रांसारखे एकदम खंग्री डोस सोडूनही साधी सोपी सरळ काव्यरचना बरीच होत असे. त्याचा एक नमुना म्हणून हा श्लोक देत आहे. अजूनही बरेच श्लोक आहेत, तेही कधी प्रसंगोपात शेअर करेनच.
कस्येयं तरणि: प्रपा पथिक नः किं पेयमस्यां पयः |
धेनोर्वा उत माहिषं बधिर रे वारः कथं मंगल: |
भौमो वाऽथ शनेश्वरोऽमृतमिदं तत्तेऽधरे दृश्यते |
श्रीमत्पान्थ विलाससुन्दर सखे, यद् रोचते तत्पिब ||
तर एक वाटसरू एका गावी आला आहे. त्याला तहान लागलीये. पण विहीर समोर दिसली तरी समोर एक तरुणी दिसल्यावर बोलायला काहीतरी निमित्त हुडकले तर पाहिजेच नैका? मग साहेबांनी विचारले,
"कस्येयं तरणि: प्रपा?-तहानेपासून तारणारी ही विहीर कुणाची आहे?"
"पथिक, नः- रे वाटसरू, आमची आहे."
"किं पेयं अस्यां? - यात पेय काय आहे?"
तरुणी मोठी सुंदर असावी. नपेक्षा आता यापुढे बोलण्यासारखे काही फारसे नसले तरी वाटसरू साहेब परत पीजे मारू लागले. ती काय दुधातुपाची विहीर थोडीच असणार होती? पण बोलायची हौस दांडगी ;)
"पयः-पाणी".
आता पय शब्दाची मजा अशी की त्याचा अर्थ दूध अन पाणी असा दोन्ही होतो. प्रवाश्याने दूध असा अर्थ घेऊन पुन्हा वेळ काढण्यासाठी पीजे मारणे सुरू केले.
"धेनोर्वा उत माहिषं?-गायीचं आहे की म्हशीचं?"
मुलगीही लगेच त्याची संभावना करते.
"बधिर रे, वारः- अरे बहिर्या, वार आहे ते!!!"
आता वार शब्दाची मजा अशी की वारि म्हंजे पाणी अन वार म्हंजे दिवस. [खरे तर व्याकरणदृष्ट्या श्लोकातले रूप चुकलेले आहे, पण कोटीच्या विनोदास्तव तिकडे जरा दुर्लक्ष करू.] मग प्रवासी तरुणाने अजून पीजे मारत संभाषण सुरू ठेवले.
"कथं मंगलः, भौमो वाऽथ शनेश्वरः?-वार म्हंजे काय मंगळवार आहे, रविवार आहे की शनिवार?"
आता मात्र तरुणीने सांगितले,
"अमृतमिदम्- अरे, हे अमृत आहे!"
आता इथे चांगला मौका मिळालासे पाहून तरुणाने चौका मारला-एकदम हेलिकॉप्टर शॉट!
"तत्तेऽधरे दृश्यते- ते तर तुझ्या ओठात दिसतंय" फुल्टू फ्लर्टिंग :D
आता या इतक्या बोल्ड उत्तरावर तरुणीची प्रतिक्रिया काय आहे?
"श्रीमत्पान्थ विलाससुन्दर सखे- अरे विलासी प्रवासी मित्रा,
यद् रोचते तत्पिब- जे आवडते ते पी!!! " ;) ;)
फुल ऑन ग्रीन शिग्नलच दिला की हो एकदम तिने. यापुढे काय झाले हे कवी सांगत नाही, अन सांगायला तरी कशाला पाहिजे म्हणा. राजकन्येबरोबरच्या अशाच कैक अनुभवांवरती त्या कुणा "चोर" नामक डेअरिंगबाज कवीने पंच्याऐंशी श्लोक रचले, सुळावर जातानाही त्याला तेच आठवत होते म्हणे. तेव्हा राजाने सुळावरून त्याला उतरवले. ते नंतर कधीतरी शेअर अवश्य करेन. लै मसाला आहे त्यात ;)
मिसळपाव
फुल फाडू है हे
लै भारी
चांगला चाललाय संस्कृतचा
In reply to चांगला चाललाय संस्कृतचा by आतिवास
पण कोणतीही भाषा जोवर रोजच्या
In reply to पण कोणतीही भाषा जोवर रोजच्या by बॅटमॅन
म्हूनशान..
In reply to म्हूनशान.. by चौकटराजा
बर.. डास आणी पाणी सहन व्हायच
भारी
जे आवडते ते पी!!!
यद् रोचते तत्पिब- जे आवडते ते
हाहाहा!
In reply to हाहाहा! by पैसा
चपला..
In reply to चपला.. by प्रभाकर पेठकर
@मुली 'चप्पल' काढतात.>>>
In reply to चपला.. by प्रभाकर पेठकर
आयो.....काय जबरा मारलाय काका,
बॅटमनच्या संस्कृतचं,
In reply to बॅटमनच्या संस्कृतचं, by प्यारे१
+1
हेहेहे भारीच.
पुण्यात हाती बिसलेरीची बाटली
In reply to पुण्यात हाती बिसलेरीची बाटली by मालोजीराव
:)
In reply to पुण्यात हाती बिसलेरीची बाटली by मालोजीराव
"डिपेंड्स" हेच खरे उत्तर आहे
In reply to "डिपेंड्स" हेच खरे उत्तर आहे by बॅटमॅन
डीपेंड्स
In reply to डीपेंड्स by आनंदी गोपाळ
अर्थातच. बाकी पीजेबद्दल
In reply to पुण्यात हाती बिसलेरीची बाटली by मालोजीराव
ललनेला संस्कृत कळत असेल तर
बॅट्या
सुंदर !
हे अवांतर फ्लर्टिंग
वा !!
संस्कृत रोमिओ... __/\__
वाहवा, मस्त मस्त मस्त.
In reply to वाहवा, मस्त मस्त मस्त. by चित्रगुप्त
चित्रे आवडली चित्रगुप्तजी!!
In reply to वाहवा, मस्त मस्त मस्त. by चित्रगुप्त
ही चित्रे पाहून अजून एक श्लोक
In reply to ही चित्रे पाहून अजून एक श्लोक by प्रचेतस
हा श्लोक तुझ्या सिग्नेचरमध्ये
मस्त रे बॅट्या.
In reply to मस्त रे बॅट्या. by प्रचेतस
वल्लीशेठ काही संदर्भ लागले
In reply to वल्लीशेठ काही संदर्भ लागले by बॅटमॅन
डोकेफोड केल्यावर शेवटी एका
In reply to डोकेफोड केल्यावर शेवटी एका by बॅटमॅन
येस. श्लोक जबरीच आहे.
In reply to येस. श्लोक जबरीच आहे. by प्रचेतस
मला वाटले...
In reply to डोकेफोड केल्यावर शेवटी एका by बॅटमॅन
हायला ! बॅटमन्राव,
In reply to हायला ! बॅटमन्राव, by डॉ सुहास म्हात्रे
ते ८५ श्लोक टाका लवकर !
In reply to ते ८५ श्लोक टाका लवकर ! by डॉ सुहास म्हात्रे
बॅटमॅन चाल लेख म्हणजे मानसिक
In reply to बॅटमॅन चाल लेख म्हणजे मानसिक by पाषाणभेद
धन्यवाद पाभेजी
In reply to ते ८५ श्लोक टाका लवकर ! by डॉ सुहास म्हात्रे
लौकरच टाकतो एक्कासाहेब! काही
@आता इथे चांगला मौका मिळालासे
स्मायली आत्मा असे नाव पाहिजे
In reply to स्मायली आत्मा असे नाव पाहिजे by बॅटमॅन
स्माइली आमुच्या तळहतांवरिल
महाराष्ट्र बोर्डाला हे सुभाषित दाखवा !
हे भारीये की.
अग्गागा! जबरा.
In reply to अग्गागा! जबरा. by अग्निकोल्हा
+१
मस्त है रे बॅट्या, ८५ श्लोक
बॅटमॅन पंच्यांऐशी ची वाट पहात
In reply to बॅटमॅन पंच्यांऐशी ची वाट पहात by स्पंदना
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by बॅटमॅन
हात्तुझी!
मस्त ओळख
मस्त!!! मस्त!!
हाहाहा...
अपूर्व लाभ
In reply to अपूर्व लाभ by श्रीनिवास टिळक
@मला वाटत असल्या प्रयोगांमुळे
मस्त रे..
पर्यायी शीर्षक
संस्कृत श्लोकांच्या धाग्याला आंग्ल भाषेतील नाव?
मस्त
समस्त प्रतिसादकांचे आभार!
In reply to समस्त प्रतिसादकांचे आभार! by बॅटमॅन
ढम्यासाठी तरी टाकच
In reply to ढम्यासाठी तरी टाकच by अभ्या..
>>>> त्याला सिक्स्टीफाईव्ह,
In reply to ढम्यासाठी तरी टाकच by अभ्या..
तरी बरं सिक्स्टीफाईव्ह अन
एक लंबर! दोन्ही सायडींनी
मज्जेदार !!!!
लै भारी फ्लर्टिंग !
In reply to लै भारी फ्लर्टिंग ! by सस्नेह
तुमच्यासाठी कायपण जबरीच!
जबरदस्त. लवकरच इतर लेख पुर्ण
मस्तं
In reply to मस्तं by साती
अयि सातीमहोदये, भवत्या:
In reply to अयि सातीमहोदये, भवत्या: by बॅटमॅन
महोदय, मम अनाहूता सूचना-
In reply to महोदय, मम अनाहूता सूचना- by पिशी अबोली
महोदय, मम अनाहूता सूचना-
In reply to महोदय, मम अनाहूता सूचना- by बॅटमॅन
नेत्रे अश्रुपूर्णे अभवताम्
In reply to नेत्रे अश्रुपूर्णे अभवताम् by पिशी अबोली
अनाहिताया: एकेनेव प्रतिसादेन
In reply to अनाहिताया: एकेनेव प्रतिसादेन by बॅटमॅन
मी वाचतांय हां!
In reply to मी वाचतांय हां! by पैसा
आयो......४ प्याक अॅब्स??
In reply to आयो......४ प्याक अॅब्स?? by बॅटमॅन
रेझ्युमे?
In reply to आयो......४ प्याक अॅब्स?? by बॅटमॅन
लाईन मारल्यानंतर उत्तरपण
In reply to आयो......४ प्याक अॅब्स?? by बॅटमॅन
हम्म.
In reply to हम्म. by प्रचेतस
नक्कीच!
In reply to नक्कीच! by बॅटमॅन
बॅट्या हेच काय ते "फ्लर्टींग
In reply to बॅट्या हेच काय ते "फ्लर्टींग by अभ्या..
अगदी अगदी त्वमेव असि, भवतः
In reply to बॅट्या हेच काय ते "फ्लर्टींग by अभ्या..
नीट गंतव्य स्थान सीसीडी,
In reply to नीट गंतव्य स्थान सीसीडी, by पिशी अबोली
अय्या कूल
In reply to अय्या कूल by अभ्या..
(No subject)
In reply to नीट गंतव्य स्थान सीसीडी, by पिशी अबोली
नाह!
In reply to नाह! by बॅटमॅन
बरेच काही नवीन शिकतोय...
In reply to बरेच काही नवीन शिकतोय... by मोदक
दत्तगुरूंचा कित्ता गिरवतोय..
Pagination