Skip to main content

कॅमेरा /जुगार्/जुगाड

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 23/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
चांगला कॅमेरा पाहिजे असे मनाने घेतले.. तसा माझ्या कडे ओलिंफस चा एका डिजिटल कॅमेरा आहे.. पण पेन्सिल ब्याटरिवाला, वैतागवाडी काम.. तसेच तो थोडा बोजड पण आहे.. त्या मुळे त्याची ब्याग घेवून तो बाळगणे पण कंटाळवाणे व्हायचे... शिवाय ४ मेगा पिक्सल चा तो कॅमेरा.. नेट वर कलरपिस्कचे कॅमेरे पाहिले अन सिगारेट केसच्या आकाराचे ते हॅन्डी कॅमेरे मनात भरले.. निकॉन कंपनिचाच कॅमेरा घ्यायचा घेतला तर असे मनात ठरवले पण किमतीत बसेना.. १०-१२हजार घालवायाचे जीवावर आले.. तसे ते कॅमेरे ५-६ हजारा पासुन आहेत पण दर्जा कमी प्रतिचा. त्यातून एकाचा सल्ला घेतला त्याने तर डि‌एसेल‌आर वगैरे घे असे सुचवले.. त्याच्या किमती तर आणखीनच आभाळाला पोहोचलेल्या.. त्यातून त्याचे फिल्टर.. लेन्सचे पैसे निराळे असे बरेच झांगड गुत्ते होते.. खर तर कधी पार्ट्या होतात वा मित्र भेटतात त्या प्रसंगाच्या आठवणी म्हणुन ऑन दि स्पोट फोटो असा साधा विचार होता. त्यासाठी एव्हढा खर्च करणे बरोबर वाटत नव्हते... शेवटी ओ‌एलक्स सा‌ईट वर गेलो तिथे जुन्या वस्तु मिळतात.. मेकॅनिकल ईंजिनि‌अर व कारखान्यात उभि हयात गेल्यामुळे जुनी मशीन्स, टुल्स घेवुन ति रिपे‌अर करणे, जुगाड करणे व वापरणे हा छंदच होता.. अर्थात हे असे कारखान्यात काम करणारे मेकॅनिकल ईंजिनि‌अरच करु शकतात.. ईंजिनि‌अर चे कागदी सर्टीफिकिट घे‌ऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि.. असो. सर्च केल्यावर एका कॅमेरावर ट्राय मारायचा ठरवले.. किंमत पण आवाक्यातली होति. फोन नंबर दिलेला होता त्यावर वर फोन केला.. व भेटायला गेलो.. भेटीत गप्पा सुरु झाल्या एम आय डि सि मधली एकाची जुनी ओळख निघाली.. मुळ विषयाला हात घातल्यावर कळाले. कॅमेरा बिघडलेला आहे.. डिस्प्ले येत नाहि.. मनात ठरवले जुगार खेळायचा.. व म्हटले ठिक आहे ह्याचे फारतर ५०० रुपये देवु शकेल.. काय़?? अहो हा मी १२ हजाराला घेतला होता.. तो म्हणाला.. बरोबर आहे सर... पण समजा रिपेर नाहि झाला कि मला बोंबलत बसावे लागणार.. शेवटी हो नाहि करत १००० रु ला सौदा ठरला.. व कॅमेरा त्याच्या कॉर्डस घे‌ऊन निघालो... कॅमेरा रिपेर करणारा मित्रच होता.. त्याने ६०० रु घेतले व कॅमेरा टकाटक झाला.. फोटो.. व्हीडि‌ओ.. वाय फ़ाय सारे मस्त चालते.. जुगार फायद्यात पडला होता.. नमुन्या साठी २ फोटु.. .. ...
लेखनविषय:

वाचने 11074
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

आम्ही दुसर्‍या पार्टी तले.. त्यामुळे जरा जास्तच..

मेकॅनिकल ईंजिनि‌अर व कारखान्यात उभि हयात गेल्यामुळे जुनी मशीन्स, टुल्स घेवुन ति रिपे‌अर करणे, जुगाड करणे व वापरणे हा छंदच होता.. अर्थात हे असे कारखान्यात काम करणारे मेकॅनिकल ईंजिनि‌अरच करु शकतात.. ईंजिनि‌अर चे कागदी सर्टीफिकिट घे‌ऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि.. असो.
ही राळ उडवायची गरज नव्हती. असो...

In reply to by परिकथेतील राजकुमार

अनुमोदन.. ज्याचा त्याचा घास ज्याने त्याने खावा.. तो घास कोणाचा आहे, कोणाचा नाही, ही बडबड व्यर्थ..

In reply to by परिकथेतील राजकुमार

अनुमोदन.. ज्याचा त्याचा घास ज्याने त्याने खावा.. तो घास कोणाचा आहे, कोणाचा नाही, ही बडबड व्यर्थ..

In reply to by परिकथेतील राजकुमार

शिवाय फ़ायनली क्यामेरा स्वत: जुगाड करून दुरुस्त केला नसल्याने कॉमेंट आणखीनच अस्थानी वाटते.

In reply to by नितिन थत्ते

. . . . (आयटीत असूनही हाताने काम करायला आवडणारा म्याक्यानिकल विंजनेर) नितिन थत्ते

In reply to by पिलीयन रायडर

पि.रा. तो कदाचित बायको भुण्भुण करते मग विका ओएलक्स वर ह्या कॅटॅगिरीतला असावा.

मेकॅनिकल ईंजिनि‌अर व कारखान्यात उभि हयात गेल्यामुळे जुनी मशीन्स, टुल्स घेवुन ति रिपे‌अर करणे, जुगाड करणे व वापरणे हा छंदच होता.. अर्थात हे असे कारखान्यात काम करणारे मेकॅनिकल ईंजिनि‌अरच करु शकतात.. ईंजिनि‌अर चे कागदी सर्टीफिकिट घे‌ऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि.. असो.
तुम्ही असं म्हणताय खरं पण तुम्ही तरी स्वतः कुठे दुरुस्त केलं? मित्रानीच केलं ना? आणि हो, मी मेमॅनिकल इंजिनिअर आहे. पण मी ए.सी मध्ये बसुन कॉम्पुटरवर अ‍ॅनेलिसिस करते. म्हणजे माझी डिग्री व्यर्थ आहे असं तुम्हाला वाटत असेल तर दुर्दैवाने तुम्हाला मॅकेनिकल बद्दल बरेच गैर्समज आहेत असं दिसतय.. असो..

In reply to by पिलीयन रायडर

मी मेमॅनिकल इंजिनिअर आहे. पण मी ए.सी मध्ये बसुन कॉम्पुटरवर अ‍ॅनेलिसिस करते. म्हणजे माझी डिग्री व्यर्थ आहे असं तुम्हाला वाटत असेल तर दुर्दैवाने तुम्हाला मॅकेनिकल बद्दल बरेच गैर्समज आहेत असं दिसतय..
मी देखिल मेकॅनिकल ईंजिनि‌अर आहे आणि कॉम्पुटरवर काम करते म्ह्णून काही त्याचा अर्थ हे "अविनाशकुलकर्णी" बोलतात असा होत नाही...

ईंजिनि‌अर चे कागदी सर्टीफिकिट घे‌ऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि.. असो.
आम्हाला तर कागदी सर्टीफिकिट मिळाल हुत , तुम्हाला काय दगडाच सर्टीफिकिट दिल का हो? अन्ब्रेकेबल !! :) बाकी आयटी त मेकॅनिकल ईंजिनि‌अर पण आसत्यात कि

ईंजिनि‌अर चे कागदी सर्टीफिकिट घे‌ऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि.. असो
ह्या वाक्याने वाचकांचा ह्या अनुभवावरचा "फोकस" जरा हटत चाललाय :)

In reply to by चंबु गबाळे

नाही. अकु जास्त हुशार झाले आहेत. एकोळी धागा न काढता साधाय धाग्यात एकच ओळ टाकून तोच परिणाम कसा साधायचा ते त्यांना जमले आहे. मिपाकर नेहमीप्रमाणे trap मध्ये अडकले :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

अकुंच्या या युक्तीचे रहस्य मला कळले. वाटले नोबेल मला मिळणार! खाली खाली वाचत आलो.. हा हन्त ...विमेने नोबेल नेले हो !

In reply to by चौकटराजा

हाहाहा !!! धागा वाचला तेव्हा लगेच भविष्य दिसले होते. तेव्हा एकही प्रतिसाद नव्हता. पण साला हापिसातून प्रतिसाद देता येत नाही ना :-) नाही तर नोबेल आणि म्यागसेसे दोन्ही मिळाले असते.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मी अभियंता नाही आहे आणि मी काही दुरुस्त करण्याच्या फंदात सुद्धा पडत नाही.. तरी येथे प्रतिसाद आमच्या आडनाव बंधूंच्या माझ्या आभासी जगतातील काकांच्या कल्पकतेला सलाम करण्यासाठी दिला आहे. शब्दाचा तीर चालवल्या गेला , आता जर कोणाला वाटेल की काका सगळ्या प्रतिसादावर प्रत्युत्तर देऊन वाद वाढवतील , दगडी आणि कागदी सर्टीफिकेट असा कलगीतुरा रंगेन, त्यांना काका अजून कळलेच नाहीत असे मला वाटते. बाकी फोटो मस्तच आला आहे. खूप दिवसांनी फोटोतून का होईना चिंतू काकांचे दर्शन झाले.

मेकॅनिकल ईंजिनि‌अर व कारखान्यात उभि हयात गेल्यामुळे जुनी मशीन्स, टुल्स घेवुन ति रिपे‌अर करणे, जुगाड करणे व वापरणे हा छंदच होता.. अर्थात हे असे कारखान्यात काम करणारे मेकॅनिकल ईंजिनि‌अरच करु शकतात.. ईंजिनि‌अर चे कागदी सर्टीफिकिट घे‌ऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि.. असो. मी मेकॅनिकल ईंजिनि‌अर आहे आणि मी आय टीतच आहे. माझे फिजिक्सचे knowledge मला game development मध्ये उपयोगी पडते. माझे automobile मधील knowledge मला ABS embeddedd systems मध्ये काम करताना उपयोगी पडते. आणि हो.. मी घरचा AC व बरीच उपकरणे स्वतःच दुरूस्त करतो.

मेकॅनिकल ईंजिनि‌अर व कारखान्यात उभि हयात गेल्यामुळे जुनी मशीन्स, टुल्स घेवुन ति रिपे‌अर करणे, जुगाड करणे व वापरणे हा छंदच होता.. अर्थात हे असे कारखान्यात काम करणारे मेकॅनिकल ईंजिनि‌अरच करु शकतात.. ईंजिनि‌अर चे कागदी सर्टीफिकिट घे‌ऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि.. असो. मी कोणताच इंजिनेर नाही पण घरच्या घरी,मिक्सर्,फ्रीज,एफेम रेडो, टेपरेकॉर्डर, छ्त्री, शिवणयंत्र, उसवले तर शर्ट पॅन्ट कधी कदी चप्पलचा अंगठा, पुस्तक फाटले की दाभण घेवुन त्याला टाके टाकतो,बाईक स्वतः धुतो, कधी कधी सर्व्हिसिंग पण आणी चारचाकी ही स्वतः स्वच्छ करतो. एवढेच काय घरी अचानक पाहुणे आले आणी बाजुचा कोंबडी कापुन देणारा मुलगा घरी नसेल तर ते पण काम मीच करतो. हाय काय त्यात. वर एवढ करता-करता नोकरीही सांभाळतो.

In reply to by इरसाल

आपल्या घरी मिक्सर्,फ्रीज,एफेम रेडो, टेपरेकॉर्डर, छ्त्री, शिवणयंत्र,, उसवले शर्ट पॅन्ट, अंगठा तुटलेली चप्पल, फाटलेली पुस्तकं,बाईकं, चारचाकी इत्यादी इत्यादी आहे हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न. ;)

महत्वाचे रायले एवढ करुन मिपावर पण येतोच ना !!!!!!!!

In reply to by गणपा

आम्ही स्वस्तुती करत नाही. कृपया याची नोंद घ्यावी. उद्या तुम्ही आमच्या वर घरी भांडी घासता असाही आळ घ्याल(खरा असला तरी)

In reply to by इरसाल

उद्या तुम्ही आमच्या वर घरी भांडी घासता असाही आळ घ्याल(खरा असला तरी)
गरज नाही आळ घ्यायची. एकदा लग्न झालय म्हटलं की हे सगळं ओघाओघाने आलंच. ;) (अनुभवी) -गणा

In reply to by गणपा

एकदा लग्न झालय म्हटलं की हे सगळं ओघाओघाने आलंच.
एकदा सबंध विवाहीत महिला वर्गास विचारले पाहीजे,हे खरं आहे की उगा काहितरीच...

मेकॅनिकल ईंजिनि‌अर व कारखान्यात उभि हयात गेल्यामुळे जुनी मशीन्स, टुल्स घेवुन ति रिपे‌अर करणे, जुगाड करणे व वापरणे हा छंदच होता.. अर्थात हे असे कारखान्यात काम करणारे मेकॅनिकल ईंजिनि‌अरच करु शकतात.. ईंजिनि‌अर चे कागदी सर्टीफिकिट घे‌ऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि.. असो.
हे वाक्य आणि
कॅमेरा रिपेर करणारा मित्रच होता.. त्याने ६०० रु घेतले व कॅमेरा टकाटक झाला..
हे वाक्य वाचले. सुसंगत लिहिणे हा तुमचा घास नाही हे कळले. धन्यवाद.

In reply to by नगरीनिरंजन

ओह मास्तर सेकंड हॅण्ड कॅमेरा स्वस्तात घेऊन तो मित्रा कडून दुरुस्त केला हेच ते तुमच (सो कॉल्ड) कर्तुत्व , एवढ्या वरुन स्वता:ला बाजीराव समजायला लागला की काय :) ?

In reply to by नगरीनिरंजन

कॅमेरा रिपेर करणारा मित्रच होता.. त्याने ६०० रु घेतले व कॅमेरा टकाटक झाला.. ही आणखी एक विसंगती

ट्यार्पी खेचायचा क्षीण प्रयत्न. (मेक्यानिकल इंजिनियर-संख्याशास्त्री-ऐटीवाला त्रिवर्णिक) बॅटमॅन.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

हम्म तेही आहेच..अजूनपर्यंत लै खडाजंगी नै झाली आधीच्या मानाने म्हणून म्हणालो इतकेच :)

सर्व मेक्यानिकल इंजिनियर हमरी तुमरी वर आलेले पाहून मौज वाटत आहे :) अवांतर : वाघुळा हल्ली तुझं गळू खूपच हळव झालंय का रे ;) - अंगठाछाप स्पा

In reply to by स्पा

@वाघुळा हल्ली तुझं गळू खूपच हळव झालंय का रे >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing013.gif @बॅटमॅन - Tue, 23/04/2013 - 19:00 नवीन गळू? हे काय असतं बॉ? >>> ते स्पांडुच सांगु शकेल... त्याला रायडिंगच्या किड्यामुळे जिवंत अनुभव असेल. ;)

बाकी उठसूठ फोटोची आवड असल्यास मोबाईल चांगल्या कॅमेर्‍याचा घ्यावा म्हणजे सतत हाताशी राहतो. :)

In reply to by वेताळ

माणसाने काम करताना लाज बाळगु नये हेच खरे आहे. हे एकदम बरोबर. काम करताना लाज बाळगायची नाही. पण लाजल्याशिवाय कामात मजा सुद्धा नाही.

In reply to by योगी९००

मराठी भाषा, वळवावी तशी वळते..

पहिला फोटो पाहून झंडू केसरी जीवन वाल्या आजोबांनाही पुढचे मॉडेलिंगचे काम हातचे जायची भिती वाटली असेल :-). Zandoo

या सगळ्यात या गोष्टीचा नायक ( जो असावयास पाहिजे होता पण एका डासाने लोकांची संधी हिरावून घेतली तशी इथे एका वाक्याने त्या क्यामेराची हिरोची संधी गेली ) तो जुगाडी क्यामेरा दिसलाच नाही. ओके ओके तो मेणबत्तीच्या कॅटेगरीतला असावा बहुतेक .. स्वतः अंधारात राहून दुसर्याला प्रकाश वैगरे … चालू द्या :)

एक खुलासा ……… *मी सेवानिवृत्त असल्याने आता कारखान्याशी संबंध नाहि……. त्या मुळे मशिन्स व रिपेअर पासून दुर. *६०० रुपये हि कार्ड ची किंमत व मजुरी आहे …

चालायचेच..वयानुसार सारेच बदलते..निसर्ग नियम आहे.... पण जिगर व मानसिकता आहे ..स्वता करता आले नाहि तरी मार्ग दर्शन करुन मोटिव्हेट करुन काम काढुन घेता येते

दुसर्‍यामध्ये ते चिंतामणीकाका आहेत का? विषयावर बोलायचे तर १६०० रुपयांत काम झाले खरेच.. ३-४ वर्षे चालला तर फायदे का सौदा..

ईंजिनि‌अर चे कागदी सर्टीफिकिट घे‌ऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि..
आता जिथून लोगिन होताय तोच संगणक बिघडला कि त्या "कागदी सर्टीफिकेट " वाल्या कडेच जाणार तुम्ही . . उगाच आपलं काही तरी

आणि तोच त्यांचा ट्यार्पी खेचायचा हुकमी एक्का आहे... ....................................... अस नाहि हो दादा....ट्यार्पी आम्हा काय सोयर सुतक?? १८०० च्या वर धागे गुंफले आहेत अनेक समुह मिळुन..काहि वर तर १००० च्या वर प्रतिक्रिया आहेत... धागे चालले काय ...उडवले काय .दुर्लक्षिले ....धागे गुंफणे चालु असतेच.. धन्यवाद

In reply to by अविनाशकुलकर्णी

मी ताई आहे .. दादा नाही.. आणि जर ट्यार्पी खेचायचा नाही आहे तर मग इथे मी अजुन एक प्रतिक्रिया दिलेली आहे. तुमच्याच एका वाक्याबद्दल.. त्या बद्दलही बोला..

छया!! पब्लिकला अजून अकु कळालेच नाहीत.. चाकूला धार काढणारा कसा थोडं पायडल फिरवून मग उडणार्‍या ठिणग्या बघत बसतो, ठिणग्या कमी झाल्या की परत उगाच आपला जरा जोर देतो, पण त्या ठिणग्यांचे चटके त्याला कधीच बसत नाही.. अकुंना जालिय मोक्ष साधलाय मंडळी..

In reply to by शैलेन्द्र

उपमा आवडली!!

अर्थात हे असे कारखान्यात काम करणारे मेकॅनिकल ईंजिनि‌अरच करु शकतात.. ईंजिनि‌अर चे कागदी सर्टीफिकिट घे‌ऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि..
असहमत. ईंजिनिअरींग कुठल्या ब्रँच मधुन केलयं किंवा दिवसभर तुम्ही काय काम करताय ह्याच्यावर तुमचा अनुभव ठरतो, कार्यकौशल्य नाही. माझा एक मित्र काँप्युटर ईंजिनिअर आहे, ए.एम.डी. मधे काम करतो. कितीतरी वेळा असं होतं की मशिन ऑटोमेशन किंवा फ्ल्यूईड पॉवर सिस्टीम मधे एखादी अडचण मला आली तर बिनदिक्कत त्याला विचारतो. आजपर्यंत एकदाही चुकीचा सल्ला मिळालेला नाही. त्याच्या गेल्या २८० पिढ्यांनी मशिन डिझाईन केलेलं नाही तरी जमतचं ना त्याला हे? गोष्टींमागचं लॉगिक तुम्ही कसं हँडल करता त्यावर तुमचं प्रॉब्लेम सोल्वींग स्किल अवलंबुन असतं. आपलं काम सोपं करणारी कितीतरी डिझाईन, अ‍ॅनालिसिस किंवा सिम्युलेशन ची सोफ्ट्वेअर्स हिचं किबोर्ड बडवणारी मंडळी बनवतं असतात. Ultimate aim of an engineer should be building nearly flawless systems in his core. No engineering branch is self sufficient to achieve this goal. We have to go hand in hand with other branches to achieve it. असो. (सॉफ्ट्वेअर ईंजिनिअर बदकांमधला एकमेव मे़कॅनिकल राजहंस) मन उधाण वार्‍याचे.

काका, काय रुबाबदार दिसताहेत तुम्ही फोटो लाईक हं. बाकी, म्याकेनिकल इंजिनियरनी लैच जीवाला लावून घेतलं वाटतं. -दिलीप बिरुटे