✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कॅमेरा /जुगार्/जुगाड

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
Tue, 04/23/2013 - 14:24  ·  लेख
लेख
चांगला कॅमेरा पाहिजे असे मनाने घेतले.. तसा माझ्या कडे ओलिंफस चा एका डिजिटल कॅमेरा आहे.. पण पेन्सिल ब्याटरिवाला, वैतागवाडी काम.. तसेच तो थोडा बोजड पण आहे.. त्या मुळे त्याची ब्याग घेवून तो बाळगणे पण कंटाळवाणे व्हायचे... शिवाय ४ मेगा पिक्सल चा तो कॅमेरा.. नेट वर कलरपिस्कचे कॅमेरे पाहिले अन सिगारेट केसच्या आकाराचे ते हॅन्डी कॅमेरे मनात भरले.. निकॉन कंपनिचाच कॅमेरा घ्यायचा घेतला तर असे मनात ठरवले पण किमतीत बसेना.. १०-१२हजार घालवायाचे जीवावर आले.. तसे ते कॅमेरे ५-६ हजारा पासुन आहेत पण दर्जा कमी प्रतिचा. त्यातून एकाचा सल्ला घेतला त्याने तर डि‌एसेल‌आर वगैरे घे असे सुचवले.. त्याच्या किमती तर आणखीनच आभाळाला पोहोचलेल्या.. त्यातून त्याचे फिल्टर.. लेन्सचे पैसे निराळे असे बरेच झांगड गुत्ते होते.. खर तर कधी पार्ट्या होतात वा मित्र भेटतात त्या प्रसंगाच्या आठवणी म्हणुन ऑन दि स्पोट फोटो असा साधा विचार होता. त्यासाठी एव्हढा खर्च करणे बरोबर वाटत नव्हते... शेवटी ओ‌एलक्स सा‌ईट वर गेलो तिथे जुन्या वस्तु मिळतात.. मेकॅनिकल ईंजिनि‌अर व कारखान्यात उभि हयात गेल्यामुळे जुनी मशीन्स, टुल्स घेवुन ति रिपे‌अर करणे, जुगाड करणे व वापरणे हा छंदच होता.. अर्थात हे असे कारखान्यात काम करणारे मेकॅनिकल ईंजिनि‌अरच करु शकतात.. ईंजिनि‌अर चे कागदी सर्टीफिकिट घे‌ऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि.. असो. सर्च केल्यावर एका कॅमेरावर ट्राय मारायचा ठरवले.. किंमत पण आवाक्यातली होति. फोन नंबर दिलेला होता त्यावर वर फोन केला.. व भेटायला गेलो.. भेटीत गप्पा सुरु झाल्या एम आय डि सि मधली एकाची जुनी ओळख निघाली.. मुळ विषयाला हात घातल्यावर कळाले. कॅमेरा बिघडलेला आहे.. डिस्प्ले येत नाहि.. मनात ठरवले जुगार खेळायचा.. व म्हटले ठिक आहे ह्याचे फारतर ५०० रुपये देवु शकेल.. काय़?? अहो हा मी १२ हजाराला घेतला होता.. तो म्हणाला.. बरोबर आहे सर... पण समजा रिपेर नाहि झाला कि मला बोंबलत बसावे लागणार.. शेवटी हो नाहि करत १००० रु ला सौदा ठरला.. व कॅमेरा त्याच्या कॉर्डस घे‌ऊन निघालो... कॅमेरा रिपेर करणारा मित्रच होता.. त्याने ६०० रु घेतले व कॅमेरा टकाटक झाला.. फोटो.. व्हीडि‌ओ.. वाय फ़ाय सारे मस्त चालते.. जुगार फायद्यात पडला होता.. नमुन्या साठी २ फोटु.. .. ...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण

प्रतिक्रिया द्या
11013 वाचन

💬 प्रतिसाद (71)

प्रतिक्रिया

हे मराठीमधुन वाचु का

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 04/28/2013 - 10:39 नवीन
हे मराठीमधुन वाचु का संस्क्रुत मधुन ;).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

कॅमेरा विकला गेला १००० ला अन दुरुस्तिचा खर्च ६०० ???

अग्निकोल्हा
Tue, 04/23/2013 - 19:08 नवीन
कॅमेरा विकणारा कहर आहे.
  • Log in or register to post comments

पहिला फोटो पाहून

श्रीरंग_जोशी
Tue, 04/23/2013 - 21:53 नवीन
पहिला फोटो पाहून झंडू केसरी जीवन वाल्या आजोबांनाही पुढचे मॉडेलिंगचे काम हातचे जायची भिती वाटली असेल :-). Image removed.
  • Log in or register to post comments

अविनाश राव आपके पाव तो बहुत

श्री गावसेना प्रमुख
Wed, 04/24/2013 - 09:15 नवीन
अविनाश राव आपके पाव तो बहुत खुबसुरत है इन्हे जमी पर मत रखो,Image removed.
  • Log in or register to post comments

गोष्टीचा नायक

सुज्ञ माणुस
Wed, 04/24/2013 - 09:47 नवीन
या सगळ्यात या गोष्टीचा नायक ( जो असावयास पाहिजे होता पण एका डासाने लोकांची संधी हिरावून घेतली तशी इथे एका वाक्याने त्या क्यामेराची हिरोची संधी गेली ) तो जुगाडी क्यामेरा दिसलाच नाही. ओके ओके तो मेणबत्तीच्या कॅटेगरीतला असावा बहुतेक .. स्वतः अंधारात राहून दुसर्याला प्रकाश वैगरे … चालू द्या :)
  • Log in or register to post comments

एक खुलासा ………

अविनाशकुलकर्णी
Wed, 04/24/2013 - 13:03 नवीन
एक खुलासा ……… *मी सेवानिवृत्त असल्याने आता कारखान्याशी संबंध नाहि……. त्या मुळे मशिन्स व रिपेअर पासून दुर. *६०० रुपये हि कार्ड ची किंमत व मजुरी आहे …
  • Log in or register to post comments

म्हणजे तो "घास" आता तुमचाही

बाळ सप्रे
Wed, 04/24/2013 - 13:50 नवीन
म्हणजे तो "घास" आता तुमचाही राहीला नाही !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

+१

रुस्तम
Sat, 04/27/2013 - 07:56 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

चालायचेच..वयानुसार सारेच

अविनाशकुलकर्णी
Wed, 04/24/2013 - 14:03 नवीन
चालायचेच..वयानुसार सारेच बदलते..निसर्ग नियम आहे.... पण जिगर व मानसिकता आहे ..स्वता करता आले नाहि तरी मार्ग दर्शन करुन मोटिव्हेट करुन काम काढुन घेता येते
  • Log in or register to post comments

फोटो झक्कास हं अविकाका...

तुमचा अभिषेक
Wed, 04/24/2013 - 15:06 नवीन
दुसर्‍यामध्ये ते चिंतामणीकाका आहेत का? विषयावर बोलायचे तर १६०० रुपयांत काम झाले खरेच.. ३-४ वर्षे चालला तर फायदे का सौदा..
  • Log in or register to post comments

काका, तुमचा सौदा झक्कास झाला

मी_देव
Wed, 04/24/2013 - 15:18 नवीन
काका, तुमचा सौदा झक्कास झाला हे नक्की. फोटोज पण बरे आहेत. फक्त त्या एक वाक्याने घात केला आणि मंडळी चवताळली. :)
  • Log in or register to post comments

ईंजिनि‌अर चे कागदी सर्टीफिकिट

अद्द्या
Wed, 04/24/2013 - 15:49 नवीन
ईंजिनि‌अर चे कागदी सर्टीफिकिट घे‌ऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि..
आता जिथून लोगिन होताय तोच संगणक बिघडला कि त्या "कागदी सर्टीफिकेट " वाल्या कडेच जाणार तुम्ही . . उगाच आपलं काही तरी
  • Log in or register to post comments

आणि तोच त्यांचा ट्यार्पी

अविनाशकुलकर्णी
Wed, 04/24/2013 - 17:27 नवीन
आणि तोच त्यांचा ट्यार्पी खेचायचा हुकमी एक्का आहे... ....................................... अस नाहि हो दादा....ट्यार्पी आम्हा काय सोयर सुतक?? १८०० च्या वर धागे गुंफले आहेत अनेक समुह मिळुन..काहि वर तर १००० च्या वर प्रतिक्रिया आहेत... धागे चालले काय ...उडवले काय .दुर्लक्षिले ....धागे गुंफणे चालु असतेच.. धन्यवाद
  • Log in or register to post comments

मी ताई आहे .. दादा नाही..

पिलीयन रायडर
Wed, 04/24/2013 - 18:28 नवीन
मी ताई आहे .. दादा नाही.. आणि जर ट्यार्पी खेचायचा नाही आहे तर मग इथे मी अजुन एक प्रतिक्रिया दिलेली आहे. तुमच्याच एका वाक्याबद्दल.. त्या बद्दलही बोला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

मामापफ करा ताई...असे वाचावे

अविनाशकुलकर्णी
Wed, 04/24/2013 - 18:30 नवीन
मामापफ करा ताई...असे वाचावे
  • Log in or register to post comments

माफ करा "ताई" असे वाचावे

अविनाशकुलकर्णी
Wed, 04/24/2013 - 18:33 नवीन
माफ करा "ताई" असे वाचावे
  • Log in or register to post comments

कॅमेरा कुठला हो?

चिगो
Wed, 04/24/2013 - 23:55 नवीन
मेक, माॅडल नंबर काही सांगा की..
  • Log in or register to post comments

छया!!

शैलेन्द्र
Sat, 04/27/2013 - 10:46 नवीन
छया!! पब्लिकला अजून अकु कळालेच नाहीत.. चाकूला धार काढणारा कसा थोडं पायडल फिरवून मग उडणार्‍या ठिणग्या बघत बसतो, ठिणग्या कमी झाल्या की परत उगाच आपला जरा जोर देतो, पण त्या ठिणग्यांचे चटके त्याला कधीच बसत नाही.. अकुंना जालिय मोक्ष साधलाय मंडळी..
  • Log in or register to post comments

:-)

श्रीरंग_जोशी
Sun, 04/28/2013 - 09:35 नवीन
उपमा आवडली!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

प्रतिसाद.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 04/28/2013 - 10:23 नवीन
अर्थात हे असे कारखान्यात काम करणारे मेकॅनिकल ईंजिनि‌अरच करु शकतात.. ईंजिनि‌अर चे कागदी सर्टीफिकिट घे‌ऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि..
असहमत. ईंजिनिअरींग कुठल्या ब्रँच मधुन केलयं किंवा दिवसभर तुम्ही काय काम करताय ह्याच्यावर तुमचा अनुभव ठरतो, कार्यकौशल्य नाही. माझा एक मित्र काँप्युटर ईंजिनिअर आहे, ए.एम.डी. मधे काम करतो. कितीतरी वेळा असं होतं की मशिन ऑटोमेशन किंवा फ्ल्यूईड पॉवर सिस्टीम मधे एखादी अडचण मला आली तर बिनदिक्कत त्याला विचारतो. आजपर्यंत एकदाही चुकीचा सल्ला मिळालेला नाही. त्याच्या गेल्या २८० पिढ्यांनी मशिन डिझाईन केलेलं नाही तरी जमतचं ना त्याला हे? गोष्टींमागचं लॉगिक तुम्ही कसं हँडल करता त्यावर तुमचं प्रॉब्लेम सोल्वींग स्किल अवलंबुन असतं. आपलं काम सोपं करणारी कितीतरी डिझाईन, अ‍ॅनालिसिस किंवा सिम्युलेशन ची सोफ्ट्वेअर्स हिचं किबोर्ड बडवणारी मंडळी बनवतं असतात. Ultimate aim of an engineer should be building nearly flawless systems in his core. No engineering branch is self sufficient to achieve this goal. We have to go hand in hand with other branches to achieve it. असो. (सॉफ्ट्वेअर ईंजिनिअर बदकांमधला एकमेव मे़कॅनिकल राजहंस) मन उधाण वार्‍याचे.
  • Log in or register to post comments

काका, काय रुबाबदार दिसताहेत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/28/2013 - 13:00 नवीन
काका, काय रुबाबदार दिसताहेत तुम्ही फोटो लाईक हं. बाकी, म्याकेनिकल इंजिनियरनी लैच जीवाला लावून घेतलं वाटतं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा