चांगला कॅमेरा पाहिजे असे मनाने घेतले..
तसा माझ्या कडे ओलिंफस चा एका डिजिटल कॅमेरा आहे..
पण पेन्सिल ब्याटरिवाला, वैतागवाडी काम.. तसेच तो थोडा बोजड पण आहे..
त्या मुळे त्याची ब्याग घेवून तो बाळगणे पण कंटाळवाणे व्हायचे... शिवाय ४ मेगा पिक्सल चा तो कॅमेरा..
नेट वर कलरपिस्कचे कॅमेरे पाहिले अन सिगारेट केसच्या आकाराचे ते हॅन्डी कॅमेरे मनात भरले.. निकॉन कंपनिचाच कॅमेरा घ्यायचा घेतला तर असे मनात ठरवले
पण किमतीत बसेना.. १०-१२हजार घालवायाचे जीवावर आले.. तसे ते कॅमेरे ५-६ हजारा पासुन आहेत पण दर्जा कमी प्रतिचा. त्यातून एकाचा सल्ला घेतला त्याने तर डिएसेलआर वगैरे घे असे सुचवले..
त्याच्या किमती तर आणखीनच आभाळाला पोहोचलेल्या.. त्यातून त्याचे फिल्टर.. लेन्सचे पैसे निराळे असे बरेच झांगड गुत्ते होते..
खर तर कधी पार्ट्या होतात वा मित्र भेटतात त्या प्रसंगाच्या आठवणी म्हणुन ऑन दि स्पोट फोटो असा साधा विचार होता.
त्यासाठी एव्हढा खर्च करणे बरोबर वाटत नव्हते...
शेवटी ओएलक्स साईट वर गेलो तिथे जुन्या वस्तु मिळतात..
मेकॅनिकल ईंजिनिअर व कारखान्यात उभि हयात गेल्यामुळे जुनी मशीन्स, टुल्स घेवुन ति रिपेअर करणे, जुगाड करणे व वापरणे हा छंदच होता.. अर्थात हे असे कारखान्यात काम करणारे मेकॅनिकल ईंजिनिअरच करु शकतात.. ईंजिनिअर चे कागदी सर्टीफिकिट घेऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि.. असो.
सर्च केल्यावर एका कॅमेरावर ट्राय मारायचा ठरवले.. किंमत पण आवाक्यातली होति. फोन नंबर दिलेला होता त्यावर वर फोन केला.. व भेटायला गेलो..
भेटीत गप्पा सुरु झाल्या एम आय डि सि मधली एकाची जुनी ओळख निघाली..
मुळ विषयाला हात घातल्यावर कळाले. कॅमेरा बिघडलेला आहे.. डिस्प्ले येत नाहि..
मनात ठरवले जुगार खेळायचा.. व म्हटले ठिक आहे ह्याचे फारतर ५०० रुपये देवु शकेल..
काय़?? अहो हा मी १२ हजाराला घेतला होता.. तो म्हणाला..
बरोबर आहे सर... पण समजा रिपेर नाहि झाला कि मला बोंबलत बसावे लागणार..
शेवटी हो नाहि करत १००० रु ला सौदा ठरला.. व कॅमेरा त्याच्या कॉर्डस घेऊन निघालो...
कॅमेरा रिपेर करणारा मित्रच होता.. त्याने ६०० रु घेतले व कॅमेरा टकाटक झाला..
फोटो.. व्हीडिओ.. वाय फ़ाय सारे मस्त चालते..
जुगार फायद्यात पडला होता..
नमुन्या साठी २ फोटु..


| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
मान गये उस्ताद
मान गये उस्ताद
भारी काम झालं तुमचं
मानले राव...
आम्ही दुसर्या पार्टी तले.. त्यामुळे जरा जास्तच..
लेख वैग्रे जौ दे..
ही राळ उडवायची गरज नव्हती.
असो...
अनुमोदन.. ज्याचा त्याचा घास
In reply to लेख वैग्रे जौ दे.. by परिकथेतील राजकुमार
अनुमोदन.. ज्याचा त्याचा घास ज्याने त्याने खावा.. तो घास कोणाचा आहे, कोणाचा नाही, ही बडबड व्यर्थ..
+१
In reply to लेख वैग्रे जौ दे.. by परिकथेतील राजकुमार
अनुमोदन.. ज्याचा त्याचा घास ज्याने त्याने खावा.. तो घास कोणाचा आहे, कोणाचा नाही, ही बडबड व्यर्थ..
+१
In reply to लेख वैग्रे जौ दे.. by परिकथेतील राजकुमार
शिवाय फ़ायनली क्यामेरा स्वत: जुगाड करून दुरुस्त केला नसल्याने कॉमेंट आणखीनच अस्थानी वाटते.
सही राहिली
In reply to +१ by नितिन थत्ते
.
.
.
.
(आयटीत असूनही हाताने काम करायला आवडणारा म्याक्यानिकल विंजनेर) नितिन थत्ते
BTW ज्याने हा कॅमेरा विकला
BTW ज्याने हा कॅमेरा विकला मला त्याच्याबद्द्ल कमालीची सहानुभुती वाटयेत.. :(
कशाला...
In reply to BTW ज्याने हा कॅमेरा विकला by चंबु गबाळे
ज्याला द्स्प्ले गेला तर तो दुरुस्त करुन घेता येतो एवढी अक्कल नाही त्याची कशाला सहानुभुती???
कशाला...
In reply to BTW ज्याने हा कॅमेरा विकला by चंबु गबाळे
ज्याला डिस्प्ले गेला तर तो दुरुस्त करुन घेता येतो एवढी अक्कल नाही त्याची कशाला सहानुभुती???
बरोबर
In reply to कशाला... by पिलीयन रायडर
पि.रा. तो कदाचित बायको भुण्भुण करते मग विका ओएलक्स वर ह्या कॅटॅगिरीतला असावा.
अहो मला अशी तशी नाही तर
In reply to कशाला... by पिलीयन रायडर
अहो मला अशी तशी नाही तर "कमालीची" सहानुभुती वाटतेय..
मेकॅनिकल ईंजिनिअर व
तुम्ही असं म्हणताय खरं पण तुम्ही तरी स्वतः कुठे दुरुस्त केलं? मित्रानीच केलं ना?
आणि हो, मी मेमॅनिकल इंजिनिअर आहे. पण मी ए.सी मध्ये बसुन कॉम्पुटरवर अॅनेलिसिस करते. म्हणजे माझी डिग्री व्यर्थ आहे असं तुम्हाला वाटत असेल तर दुर्दैवाने तुम्हाला मॅकेनिकल बद्दल बरेच गैर्समज आहेत असं दिसतय..
असो..
असेच म्हणते
In reply to मेकॅनिकल ईंजिनिअर व by पिलीयन रायडर
मी देखिल मेकॅनिकल ईंजिनिअर आहे आणि कॉम्पुटरवर काम करते म्ह्णून काही त्याचा अर्थ हे "अविनाशकुलकर्णी" बोलतात असा होत नाही...
तुम्हाला काय दगडाच सर्टीफिकिट दिल क हो अन्ब्रेकेबल
आम्हाला तर कागदी सर्टीफिकिट मिळाल हुत , तुम्हाला काय दगडाच सर्टीफिकिट दिल का हो? अन्ब्रेकेबल !! :)
बाकी आयटी त मेकॅनिकल ईंजिनिअर पण आसत्यात कि
दगडाच सर्टीफिकिट
In reply to तुम्हाला काय दगडाच सर्टीफिकिट दिल क हो अन्ब्रेकेबल by कोल्हापुरवाले
हे पहा
आवडेश...
In reply to दगडाच सर्टीफिकिट by वामन देशमुख
लै भारी वीडीओ... :))
तुफान
In reply to तुम्हाला काय दगडाच सर्टीफिकिट दिल क हो अन्ब्रेकेबल by कोल्हापुरवाले
दगडाचे सर्टीफिकिट
तुफान :)
ईंजिनिअर चे कागदी सर्टीफिकिट
ह्या वाक्याने वाचकांचा ह्या अनुभवावरचा "फोकस" जरा हटत चाललाय :)
आणि तोच त्यांचा ट्यार्पी
In reply to ईंजिनिअर चे कागदी सर्टीफिकिट by चंबु गबाळे
आणि तोच त्यांचा ट्यार्पी खेचायचा हुकमी एक्का आहे...
नाही. अकु जास्त हुशार झाले
In reply to ईंजिनिअर चे कागदी सर्टीफिकिट by चंबु गबाळे
नाही. अकु जास्त हुशार झाले आहेत. एकोळी धागा न काढता साधाय धाग्यात एकच ओळ टाकून तोच परिणाम कसा साधायचा ते त्यांना जमले आहे. मिपाकर नेहमीप्रमाणे trap मध्ये अडकले :-)
+111111111111111111
In reply to नाही. अकु जास्त हुशार झाले by विश्वनाथ मेहेंदळे
वि मे एकदम खत्री
हेच खरं बघा विमेगारु!!
In reply to नाही. अकु जास्त हुशार झाले by विश्वनाथ मेहेंदळे
हेच खरं बघा विमेगारु!! अकुकाकांच्या युक्त्या आता अॅडव्हान्स्ड होऊ लागल्यात ;)
विमे नोबेल तुम्ही पळवलेत,,,
In reply to नाही. अकु जास्त हुशार झाले by विश्वनाथ मेहेंदळे
अकुंच्या या युक्तीचे रहस्य मला कळले. वाटले नोबेल मला मिळणार! खाली खाली वाचत आलो.. हा हन्त ...विमेने नोबेल नेले हो !
हाहाहा !!! धागा वाचला तेव्हा
In reply to विमे नोबेल तुम्ही पळवलेत,,, by चौकटराजा
हाहाहा !!! धागा वाचला तेव्हा लगेच भविष्य दिसले होते. तेव्हा एकही प्रतिसाद नव्हता. पण साला हापिसातून प्रतिसाद देता येत नाही ना :-) नाही तर नोबेल आणि म्यागसेसे दोन्ही मिळाले असते.
मी अभियंता नाही आहे आणि मी
In reply to नाही. अकु जास्त हुशार झाले by विश्वनाथ मेहेंदळे
मी अभियंता नाही आहे आणि मी काही दुरुस्त करण्याच्या फंदात सुद्धा पडत नाही..
तरी येथे प्रतिसाद आमच्या आडनाव बंधूंच्या माझ्या आभासी जगतातील काकांच्या कल्पकतेला सलाम करण्यासाठी दिला आहे.
शब्दाचा तीर चालवल्या गेला , आता जर कोणाला वाटेल की काका सगळ्या प्रतिसादावर प्रत्युत्तर देऊन वाद वाढवतील , दगडी आणि कागदी सर्टीफिकेट असा कलगीतुरा रंगेन,
त्यांना काका अजून कळलेच नाहीत असे मला वाटते.
बाकी फोटो मस्तच आला आहे.
खूप दिवसांनी फोटोतून का होईना चिंतू काकांचे दर्शन झाले.
ईंजिनिअर चे कागदी सर्टीफिकिट
मेकॅनिकल ईंजिनिअर व कारखान्यात उभि हयात गेल्यामुळे जुनी मशीन्स, टुल्स घेवुन ति रिपेअर करणे, जुगाड करणे व वापरणे हा छंदच होता.. अर्थात हे असे कारखान्यात काम करणारे मेकॅनिकल ईंजिनिअरच करु शकतात.. ईंजिनिअर चे कागदी सर्टीफिकिट घेऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि.. असो.
मी मेकॅनिकल ईंजिनिअर आहे आणि मी आय टीतच आहे. माझे फिजिक्सचे knowledge मला game development मध्ये उपयोगी पडते. माझे automobile मधील knowledge मला ABS embeddedd systems मध्ये काम करताना उपयोगी पडते.
आणि हो.. मी घरचा AC व बरीच उपकरणे स्वतःच दुरूस्त करतो.
मेकॅनिकल ईंजिनिअर व
मेकॅनिकल ईंजिनिअर व कारखान्यात उभि हयात गेल्यामुळे जुनी मशीन्स, टुल्स घेवुन ति रिपेअर करणे, जुगाड करणे व वापरणे हा छंदच होता.. अर्थात हे असे कारखान्यात काम करणारे मेकॅनिकल ईंजिनिअरच करु शकतात.. ईंजिनिअर चे कागदी सर्टीफिकिट घेऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि.. असो.
मी कोणताच इंजिनेर नाही पण घरच्या घरी,मिक्सर्,फ्रीज,एफेम रेडो, टेपरेकॉर्डर, छ्त्री, शिवणयंत्र, उसवले तर शर्ट पॅन्ट कधी कदी चप्पलचा अंगठा, पुस्तक फाटले की दाभण घेवुन त्याला टाके टाकतो,बाईक स्वतः धुतो, कधी कधी सर्व्हिसिंग पण आणी चारचाकी ही स्वतः स्वच्छ करतो.
एवढेच काय घरी अचानक पाहुणे आले आणी बाजुचा कोंबडी कापुन देणारा मुलगा घरी नसेल तर ते पण काम मीच करतो. हाय काय त्यात.
वर एवढ करता-करता नोकरीही सांभाळतो.
आपल्या घरी मिक्सर्,फ्रीज,एफेम
In reply to मेकॅनिकल ईंजिनिअर व by इरसाल
आपल्या घरी मिक्सर्,फ्रीज,एफेम रेडो, टेपरेकॉर्डर, छ्त्री, शिवणयंत्र,, उसवले शर्ट पॅन्ट, अंगठा तुटलेली चप्पल, फाटलेली पुस्तकं,बाईकं, चारचाकी इत्यादी इत्यादी आहे हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न.
;)
च्यायला
महत्वाचे रायले
एवढ करुन मिपावर पण येतोच ना !!!!!!!!
या शिवाय इंटरनेट्, संगणक
In reply to च्यायला by इरसाल
या शिवाय इंटरनेट्, संगणक/स्मार्ट्फोन हे राहिलच. ;)
अर्थात
In reply to या शिवाय इंटरनेट्, संगणक by गणपा
आम्ही स्वस्तुती करत नाही. कृपया याची नोंद घ्यावी.
उद्या तुम्ही आमच्या वर घरी भांडी घासता असाही आळ घ्याल(खरा असला तरी)
उद्या तुम्ही आमच्या वर घरी
In reply to अर्थात by इरसाल
गरज नाही आळ घ्यायची.
एकदा लग्न झालय म्हटलं की हे सगळं ओघाओघाने आलंच. ;)
(अनुभवी) -गणा
खर्र???
In reply to उद्या तुम्ही आमच्या वर घरी by गणपा
एकदा सबंध विवाहीत महिला वर्गास विचारले पाहीजे,हे खरं आहे की उगा काहितरीच...
मेकॅनिकल ईंजिनिअर व
हे वाक्य आणि
हे वाक्य वाचले.
सुसंगत लिहिणे हा तुमचा घास नाही हे कळले. धन्यवाद.
ओह मास्तर सेकंड हॅण्ड कॅमेरा
In reply to मेकॅनिकल ईंजिनिअर व by नगरीनिरंजन
ओह मास्तर सेकंड हॅण्ड कॅमेरा स्वस्तात घेऊन तो मित्रा कडून दुरुस्त केला हेच ते तुमच (सो कॉल्ड) कर्तुत्व , एवढ्या वरुन स्वता:ला बाजीराव समजायला लागला की काय :) ?
कॅमेरा रिपेर करणारा मित्रच
In reply to मेकॅनिकल ईंजिनिअर व by नगरीनिरंजन
कॅमेरा रिपेर करणारा मित्रच होता.. त्याने ६०० रु घेतले व कॅमेरा टकाटक झाला..
ही आणखी एक विसंगती
ट्यार्पी खेचायचा क्षीण
ट्यार्पी खेचायचा क्षीण प्रयत्न.
(मेक्यानिकल इंजिनियर-संख्याशास्त्री-ऐटीवाला त्रिवर्णिक) बॅटमॅन.
क्षीण कसा रे बाबा ?? यशस्वी
In reply to ट्यार्पी खेचायचा क्षीण by बॅटमॅन
क्षीण कसा रे बाबा ?? यशस्वी प्रयत्न असे म्हण...
हम्म तेही आहेच..अजूनपर्यंत लै
In reply to क्षीण कसा रे बाबा ?? यशस्वी by विश्वनाथ मेहेंदळे
हम्म तेही आहेच..अजूनपर्यंत लै खडाजंगी नै झाली आधीच्या मानाने म्हणून म्हणालो इतकेच :)
सर्व मेक्यानिकल इंजिनियर हमरी
सर्व मेक्यानिकल इंजिनियर हमरी तुमरी वर आलेले पाहून मौज वाटत आहे :)
अवांतर : वाघुळा हल्ली तुझं गळू खूपच हळव झालंय का रे ;)
- अंगठाछाप स्पा
गळू? हे काय असतं बॉ?
In reply to सर्व मेक्यानिकल इंजिनियर हमरी by स्पा
गळू? हे काय असतं बॉ? ;)
(अज्ञानी) बॅटमॅन.
@वाघुळा हल्ली तुझं गळू खूपच
In reply to सर्व मेक्यानिकल इंजिनियर हमरी by स्पा
@वाघुळा हल्ली तुझं गळू खूपच हळव झालंय का रे >>>
@बॅटमॅन - Tue, 23/04/2013 - 19:00
नवीन
गळू? हे काय असतं बॉ? >>> ते स्पांडुच सांगु शकेल... त्याला रायडिंगच्या किड्यामुळे जिवंत अनुभव असेल. ;)
सुपरमार्केटच उठविलेत की हो
In reply to @वाघुळा हल्ली तुझं गळू खूपच by अत्रुप्त आत्मा
=)) =)) सुपरमार्केटच उठविलेत की हो बिचार्या स्पांडूचे!!
फोटो भारीच हं काका...
बाकी उठसूठ फोटोची आवड असल्यास मोबाईल चांगल्या कॅमेर्याचा घ्यावा म्हणजे सतत हाताशी राहतो. :)
मेकॅनिकल इंजिनिअर फोटोग्राफर चे काम
करतो हे खरोखरच चांगले उदाहरण आहे. माणसाने काम करताना लाज बाळगु नये हेच खरे आहे.
लाज..?
In reply to मेकॅनिकल इंजिनिअर फोटोग्राफर चे काम by वेताळ
माणसाने काम करताना लाज बाळगु नये हेच खरे आहे.
हे एकदम बरोबर. काम करताना लाज बाळगायची नाही. पण लाजल्याशिवाय कामात मजा सुद्धा नाही.
मस्तच..
In reply to लाज..? by योगी९००
मराठी भाषा, वळवावी तशी वळते..
लई भारी कोटी हो !!!!
In reply to लाज..? by योगी९००
लई भारी कोटी हो !!!!
आमचाही दंडवत घ्या....
In reply to लाज..? by योगी९००
___/\___
धागा काय.. चर्चा कसली आणि तुम्ही तर एक्दम ट्विस्टच दिलात...!!!
हे मराठीमधुन वाचु का
In reply to मेकॅनिकल इंजिनिअर फोटोग्राफर चे काम by वेताळ
हे मराठीमधुन वाचु का संस्क्रुत मधुन ;).
कॅमेरा विकला गेला १००० ला अन दुरुस्तिचा खर्च ६०० ???
कॅमेरा विकणारा कहर आहे.
पहिला फोटो पाहून
पहिला फोटो पाहून झंडू केसरी जीवन वाल्या आजोबांनाही पुढचे मॉडेलिंगचे काम हातचे जायची भिती वाटली असेल :-).

अविनाश राव आपके पाव तो बहुत
अविनाश राव आपके पाव तो बहुत खुबसुरत है इन्हे जमी पर मत रखो,
गोष्टीचा नायक
या सगळ्यात या गोष्टीचा नायक ( जो असावयास पाहिजे होता पण एका डासाने लोकांची संधी हिरावून घेतली तशी इथे एका वाक्याने त्या क्यामेराची हिरोची संधी गेली ) तो जुगाडी क्यामेरा दिसलाच नाही.
ओके ओके तो मेणबत्तीच्या कॅटेगरीतला असावा बहुतेक .. स्वतः अंधारात राहून दुसर्याला प्रकाश वैगरे …
चालू द्या :)
एक खुलासा ………
एक खुलासा ………
*मी सेवानिवृत्त असल्याने आता कारखान्याशी संबंध नाहि……. त्या मुळे मशिन्स व रिपेअर पासून दुर.
*६०० रुपये हि कार्ड ची किंमत व मजुरी आहे …
म्हणजे तो "घास" आता तुमचाही
In reply to एक खुलासा ……… by अविनाशकुलकर्णी
म्हणजे तो "घास" आता तुमचाही राहीला नाही !!
+१
In reply to म्हणजे तो "घास" आता तुमचाही by बाळ सप्रे
+१
चालायचेच..वयानुसार सारेच
चालायचेच..वयानुसार सारेच बदलते..निसर्ग नियम आहे....
पण जिगर व मानसिकता आहे ..स्वता करता आले नाहि तरी मार्ग दर्शन करुन मोटिव्हेट करुन काम काढुन घेता येते
फोटो झक्कास हं अविकाका...
दुसर्यामध्ये ते चिंतामणीकाका आहेत का?
विषयावर बोलायचे तर १६०० रुपयांत काम झाले खरेच.. ३-४ वर्षे चालला तर फायदे का सौदा..
काका, तुमचा सौदा झक्कास झाला
काका, तुमचा सौदा झक्कास झाला हे नक्की. फोटोज पण बरे आहेत. फक्त त्या एक वाक्याने घात केला आणि मंडळी चवताळली. :)
ईंजिनिअर चे कागदी सर्टीफिकिट
आता जिथून लोगिन होताय तोच संगणक बिघडला कि त्या "कागदी सर्टीफिकेट " वाल्या कडेच जाणार तुम्ही . .
उगाच आपलं काही तरी
आणि तोच त्यांचा ट्यार्पी
आणि तोच त्यांचा ट्यार्पी खेचायचा हुकमी एक्का आहे...
.......................................
अस नाहि हो दादा....ट्यार्पी आम्हा काय सोयर सुतक?? १८०० च्या वर धागे गुंफले आहेत अनेक समुह मिळुन..काहि वर तर १००० च्या वर प्रतिक्रिया आहेत...
धागे चालले काय ...उडवले काय .दुर्लक्षिले ....धागे गुंफणे चालु असतेच..
धन्यवाद
मी ताई आहे .. दादा नाही..
In reply to आणि तोच त्यांचा ट्यार्पी by अविनाशकुलकर्णी
मी ताई आहे .. दादा नाही..
आणि जर ट्यार्पी खेचायचा नाही आहे तर मग इथे मी अजुन एक प्रतिक्रिया दिलेली आहे. तुमच्याच एका वाक्याबद्दल.. त्या बद्दलही बोला..
मामापफ करा ताई...असे वाचावे
मामापफ करा ताई...असे वाचावे
माफ करा "ताई" असे वाचावे
माफ करा "ताई" असे वाचावे
कॅमेरा कुठला हो?
मेक, माॅडल नंबर काही सांगा की..
छया!!
छया!!
पब्लिकला अजून अकु कळालेच नाहीत..
चाकूला धार काढणारा कसा थोडं पायडल फिरवून मग उडणार्या ठिणग्या बघत बसतो, ठिणग्या कमी झाल्या की परत उगाच आपला जरा जोर देतो, पण त्या ठिणग्यांचे चटके त्याला कधीच बसत नाही..
अकुंना जालिय मोक्ष साधलाय मंडळी..
:-)
In reply to छया!! by शैलेन्द्र
उपमा आवडली!!
प्रतिसाद.
असहमत. ईंजिनिअरींग कुठल्या ब्रँच मधुन केलयं किंवा दिवसभर तुम्ही काय काम करताय ह्याच्यावर तुमचा अनुभव ठरतो, कार्यकौशल्य नाही. माझा एक मित्र काँप्युटर ईंजिनिअर आहे, ए.एम.डी. मधे काम करतो. कितीतरी वेळा असं होतं की मशिन ऑटोमेशन किंवा फ्ल्यूईड पॉवर सिस्टीम मधे एखादी अडचण मला आली तर बिनदिक्कत त्याला विचारतो. आजपर्यंत एकदाही चुकीचा सल्ला मिळालेला नाही. त्याच्या गेल्या २८० पिढ्यांनी मशिन डिझाईन केलेलं नाही तरी जमतचं ना त्याला हे? गोष्टींमागचं लॉगिक तुम्ही कसं हँडल करता त्यावर तुमचं प्रॉब्लेम सोल्वींग स्किल अवलंबुन असतं. आपलं काम सोपं करणारी कितीतरी डिझाईन, अॅनालिसिस किंवा सिम्युलेशन ची सोफ्ट्वेअर्स हिचं किबोर्ड बडवणारी मंडळी बनवतं असतात.
Ultimate aim of an engineer should be building nearly flawless systems in his core. No engineering branch is self sufficient to achieve this goal. We have to go hand in hand with other branches to achieve it.
असो.
(सॉफ्ट्वेअर ईंजिनिअर बदकांमधला एकमेव मे़कॅनिकल राजहंस) मन उधाण वार्याचे.
काका, काय रुबाबदार दिसताहेत
काका, काय रुबाबदार दिसताहेत तुम्ही फोटो लाईक हं.
बाकी, म्याकेनिकल इंजिनियरनी लैच जीवाला लावून घेतलं वाटतं.
-दिलीप बिरुटे