✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कॅमेरा /जुगार्/जुगाड

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
Tue, 04/23/2013 - 14:24  ·  लेख
लेख
चांगला कॅमेरा पाहिजे असे मनाने घेतले.. तसा माझ्या कडे ओलिंफस चा एका डिजिटल कॅमेरा आहे.. पण पेन्सिल ब्याटरिवाला, वैतागवाडी काम.. तसेच तो थोडा बोजड पण आहे.. त्या मुळे त्याची ब्याग घेवून तो बाळगणे पण कंटाळवाणे व्हायचे... शिवाय ४ मेगा पिक्सल चा तो कॅमेरा.. नेट वर कलरपिस्कचे कॅमेरे पाहिले अन सिगारेट केसच्या आकाराचे ते हॅन्डी कॅमेरे मनात भरले.. निकॉन कंपनिचाच कॅमेरा घ्यायचा घेतला तर असे मनात ठरवले पण किमतीत बसेना.. १०-१२हजार घालवायाचे जीवावर आले.. तसे ते कॅमेरे ५-६ हजारा पासुन आहेत पण दर्जा कमी प्रतिचा. त्यातून एकाचा सल्ला घेतला त्याने तर डि‌एसेल‌आर वगैरे घे असे सुचवले.. त्याच्या किमती तर आणखीनच आभाळाला पोहोचलेल्या.. त्यातून त्याचे फिल्टर.. लेन्सचे पैसे निराळे असे बरेच झांगड गुत्ते होते.. खर तर कधी पार्ट्या होतात वा मित्र भेटतात त्या प्रसंगाच्या आठवणी म्हणुन ऑन दि स्पोट फोटो असा साधा विचार होता. त्यासाठी एव्हढा खर्च करणे बरोबर वाटत नव्हते... शेवटी ओ‌एलक्स सा‌ईट वर गेलो तिथे जुन्या वस्तु मिळतात.. मेकॅनिकल ईंजिनि‌अर व कारखान्यात उभि हयात गेल्यामुळे जुनी मशीन्स, टुल्स घेवुन ति रिपे‌अर करणे, जुगाड करणे व वापरणे हा छंदच होता.. अर्थात हे असे कारखान्यात काम करणारे मेकॅनिकल ईंजिनि‌अरच करु शकतात.. ईंजिनि‌अर चे कागदी सर्टीफिकिट घे‌ऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि.. असो. सर्च केल्यावर एका कॅमेरावर ट्राय मारायचा ठरवले.. किंमत पण आवाक्यातली होति. फोन नंबर दिलेला होता त्यावर वर फोन केला.. व भेटायला गेलो.. भेटीत गप्पा सुरु झाल्या एम आय डि सि मधली एकाची जुनी ओळख निघाली.. मुळ विषयाला हात घातल्यावर कळाले. कॅमेरा बिघडलेला आहे.. डिस्प्ले येत नाहि.. मनात ठरवले जुगार खेळायचा.. व म्हटले ठिक आहे ह्याचे फारतर ५०० रुपये देवु शकेल.. काय़?? अहो हा मी १२ हजाराला घेतला होता.. तो म्हणाला.. बरोबर आहे सर... पण समजा रिपेर नाहि झाला कि मला बोंबलत बसावे लागणार.. शेवटी हो नाहि करत १००० रु ला सौदा ठरला.. व कॅमेरा त्याच्या कॉर्डस घे‌ऊन निघालो... कॅमेरा रिपेर करणारा मित्रच होता.. त्याने ६०० रु घेतले व कॅमेरा टकाटक झाला.. फोटो.. व्हीडि‌ओ.. वाय फ़ाय सारे मस्त चालते.. जुगार फायद्यात पडला होता.. नमुन्या साठी २ फोटु.. .. ...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण

प्रतिक्रिया द्या
11013 वाचन

💬 प्रतिसाद (71)

प्रतिक्रिया

मान गये उस्ताद

स्पा
Tue, 04/23/2013 - 14:43 नवीन
मान गये उस्ताद भारी काम झालं तुमचं
  • Log in or register to post comments

मानले राव...

मुक्त विहारि
Tue, 04/23/2013 - 14:46 नवीन
आम्ही दुसर्‍या पार्टी तले.. त्यामुळे जरा जास्तच..
  • Log in or register to post comments

लेख वैग्रे जौ दे..

परिकथेतील राजकुमार
Tue, 04/23/2013 - 14:54 नवीन
मेकॅनिकल ईंजिनि‌अर व कारखान्यात उभि हयात गेल्यामुळे जुनी मशीन्स, टुल्स घेवुन ति रिपे‌अर करणे, जुगाड करणे व वापरणे हा छंदच होता.. अर्थात हे असे कारखान्यात काम करणारे मेकॅनिकल ईंजिनि‌अरच करु शकतात.. ईंजिनि‌अर चे कागदी सर्टीफिकिट घे‌ऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि.. असो.
ही राळ उडवायची गरज नव्हती. असो...
  • Log in or register to post comments

अनुमोदन.. ज्याचा त्याचा घास

चंबु गबाळे
Tue, 04/23/2013 - 15:00 नवीन
अनुमोदन.. ज्याचा त्याचा घास ज्याने त्याने खावा.. तो घास कोणाचा आहे, कोणाचा नाही, ही बडबड व्यर्थ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

+१

चंबु गबाळे
Tue, 04/23/2013 - 15:00 नवीन
अनुमोदन.. ज्याचा त्याचा घास ज्याने त्याने खावा.. तो घास कोणाचा आहे, कोणाचा नाही, ही बडबड व्यर्थ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

+१

नितिन थत्ते
Tue, 04/23/2013 - 16:42 नवीन
शिवाय फ़ायनली क्यामेरा स्वत: जुगाड करून दुरुस्त केला नसल्याने कॉमेंट आणखीनच अस्थानी वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सही राहिली

नितिन थत्ते
Tue, 04/23/2013 - 16:45 नवीन
. . . . (आयटीत असूनही हाताने काम करायला आवडणारा म्याक्यानिकल विंजनेर) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

BTW ज्याने हा कॅमेरा विकला

चंबु गबाळे
Tue, 04/23/2013 - 15:05 नवीन
BTW ज्याने हा कॅमेरा विकला मला त्याच्याबद्द्ल कमालीची सहानुभुती वाटयेत.. :(
  • Log in or register to post comments

कशाला...

पिलीयन रायडर
Tue, 04/23/2013 - 15:13 नवीन
ज्याला द्स्प्ले गेला तर तो दुरुस्त करुन घेता येतो एवढी अक्कल नाही त्याची कशाला सहानुभुती???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंबु गबाळे

कशाला...

पिलीयन रायडर
Tue, 04/23/2013 - 15:13 नवीन
ज्याला डिस्प्ले गेला तर तो दुरुस्त करुन घेता येतो एवढी अक्कल नाही त्याची कशाला सहानुभुती???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंबु गबाळे

बरोबर

इरसाल
Tue, 04/23/2013 - 15:24 नवीन
पि.रा. तो कदाचित बायको भुण्भुण करते मग विका ओएलक्स वर ह्या कॅटॅगिरीतला असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

अहो मला अशी तशी नाही तर

चंबु गबाळे
Tue, 04/23/2013 - 15:39 नवीन
अहो मला अशी तशी नाही तर "कमालीची" सहानुभुती वाटतेय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मेकॅनिकल ईंजिनि‌अर व

पिलीयन रायडर
Tue, 04/23/2013 - 15:10 नवीन
मेकॅनिकल ईंजिनि‌अर व कारखान्यात उभि हयात गेल्यामुळे जुनी मशीन्स, टुल्स घेवुन ति रिपे‌अर करणे, जुगाड करणे व वापरणे हा छंदच होता.. अर्थात हे असे कारखान्यात काम करणारे मेकॅनिकल ईंजिनि‌अरच करु शकतात.. ईंजिनि‌अर चे कागदी सर्टीफिकिट घे‌ऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि.. असो.
तुम्ही असं म्हणताय खरं पण तुम्ही तरी स्वतः कुठे दुरुस्त केलं? मित्रानीच केलं ना? आणि हो, मी मेमॅनिकल इंजिनिअर आहे. पण मी ए.सी मध्ये बसुन कॉम्पुटरवर अ‍ॅनेलिसिस करते. म्हणजे माझी डिग्री व्यर्थ आहे असं तुम्हाला वाटत असेल तर दुर्दैवाने तुम्हाला मॅकेनिकल बद्दल बरेच गैर्समज आहेत असं दिसतय.. असो..
  • Log in or register to post comments

असेच म्हणते

स्मिता चौगुले
Tue, 04/23/2013 - 15:44 नवीन
मी मेमॅनिकल इंजिनिअर आहे. पण मी ए.सी मध्ये बसुन कॉम्पुटरवर अ‍ॅनेलिसिस करते. म्हणजे माझी डिग्री व्यर्थ आहे असं तुम्हाला वाटत असेल तर दुर्दैवाने तुम्हाला मॅकेनिकल बद्दल बरेच गैर्समज आहेत असं दिसतय..
मी देखिल मेकॅनिकल ईंजिनि‌अर आहे आणि कॉम्पुटरवर काम करते म्ह्णून काही त्याचा अर्थ हे "अविनाशकुलकर्णी" बोलतात असा होत नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

तुम्हाला काय दगडाच सर्टीफिकिट दिल क हो अन्ब्रेकेबल

कोल्हापुरवाले
Tue, 04/23/2013 - 15:17 नवीन
ईंजिनि‌अर चे कागदी सर्टीफिकिट घे‌ऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि.. असो.
आम्हाला तर कागदी सर्टीफिकिट मिळाल हुत , तुम्हाला काय दगडाच सर्टीफिकिट दिल का हो? अन्ब्रेकेबल !! :) बाकी आयटी त मेकॅनिकल ईंजिनि‌अर पण आसत्यात कि
  • Log in or register to post comments

दगडाच सर्टीफिकिट

वामन देशमुख
Tue, 04/23/2013 - 17:18 नवीन
दगडाच सर्टीफिकिट
हे पहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोल्हापुरवाले

आवडेश...

कोमल
Tue, 04/23/2013 - 20:01 नवीन
लै भारी वीडीओ... :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

तुफान

सुज्ञ माणुस
Wed, 04/24/2013 - 09:35 नवीन
दगडाचे सर्टीफिकिट तुफान :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोल्हापुरवाले

ईंजिनि‌अर चे कागदी सर्टीफिकिट

चंबु गबाळे
Tue, 04/23/2013 - 15:41 नवीन
ईंजिनि‌अर चे कागदी सर्टीफिकिट घे‌ऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि.. असो
ह्या वाक्याने वाचकांचा ह्या अनुभवावरचा "फोकस" जरा हटत चाललाय :)
  • Log in or register to post comments

आणि तोच त्यांचा ट्यार्पी

पिलीयन रायडर
Tue, 04/23/2013 - 15:56 नवीन
आणि तोच त्यांचा ट्यार्पी खेचायचा हुकमी एक्का आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंबु गबाळे

नाही. अकु जास्त हुशार झाले

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 04/24/2013 - 00:15 नवीन
नाही. अकु जास्त हुशार झाले आहेत. एकोळी धागा न काढता साधाय धाग्यात एकच ओळ टाकून तोच परिणाम कसा साधायचा ते त्यांना जमले आहे. मिपाकर नेहमीप्रमाणे trap मध्ये अडकले :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंबु गबाळे

+111111111111111111

मालोजीराव
Wed, 04/24/2013 - 01:07 नवीन
वि मे एकदम खत्री
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

हेच खरं बघा विमेगारु!!

बॅटमॅन
Wed, 04/24/2013 - 12:07 नवीन
हेच खरं बघा विमेगारु!! अकुकाकांच्या युक्त्या आता अ‍ॅडव्हान्स्ड होऊ लागल्यात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

विमे नोबेल तुम्ही पळवलेत,,,

चौकटराजा
Wed, 04/24/2013 - 15:40 नवीन
अकुंच्या या युक्तीचे रहस्य मला कळले. वाटले नोबेल मला मिळणार! खाली खाली वाचत आलो.. हा हन्त ...विमेने नोबेल नेले हो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

हाहाहा !!! धागा वाचला तेव्हा

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 04/25/2013 - 00:43 नवीन
हाहाहा !!! धागा वाचला तेव्हा लगेच भविष्य दिसले होते. तेव्हा एकही प्रतिसाद नव्हता. पण साला हापिसातून प्रतिसाद देता येत नाही ना :-) नाही तर नोबेल आणि म्यागसेसे दोन्ही मिळाले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

मी अभियंता नाही आहे आणि मी

निनाद मुक्काम …
गुरुवार, 04/25/2013 - 23:14 नवीन
मी अभियंता नाही आहे आणि मी काही दुरुस्त करण्याच्या फंदात सुद्धा पडत नाही.. तरी येथे प्रतिसाद आमच्या आडनाव बंधूंच्या माझ्या आभासी जगतातील काकांच्या कल्पकतेला सलाम करण्यासाठी दिला आहे. शब्दाचा तीर चालवल्या गेला , आता जर कोणाला वाटेल की काका सगळ्या प्रतिसादावर प्रत्युत्तर देऊन वाद वाढवतील , दगडी आणि कागदी सर्टीफिकेट असा कलगीतुरा रंगेन, त्यांना काका अजून कळलेच नाहीत असे मला वाटते. बाकी फोटो मस्तच आला आहे. खूप दिवसांनी फोटोतून का होईना चिंतू काकांचे दर्शन झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

ईंजिनि‌अर चे कागदी सर्टीफिकिट

योगी९००
Tue, 04/23/2013 - 15:55 नवीन
मेकॅनिकल ईंजिनि‌अर व कारखान्यात उभि हयात गेल्यामुळे जुनी मशीन्स, टुल्स घेवुन ति रिपे‌अर करणे, जुगाड करणे व वापरणे हा छंदच होता.. अर्थात हे असे कारखान्यात काम करणारे मेकॅनिकल ईंजिनि‌अरच करु शकतात.. ईंजिनि‌अर चे कागदी सर्टीफिकिट घे‌ऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि.. असो. मी मेकॅनिकल ईंजिनि‌अर आहे आणि मी आय टीतच आहे. माझे फिजिक्सचे knowledge मला game development मध्ये उपयोगी पडते. माझे automobile मधील knowledge मला ABS embeddedd systems मध्ये काम करताना उपयोगी पडते. आणि हो.. मी घरचा AC व बरीच उपकरणे स्वतःच दुरूस्त करतो.
  • Log in or register to post comments

मेकॅनिकल ईंजिनि‌अर व

इरसाल
Tue, 04/23/2013 - 16:22 नवीन
मेकॅनिकल ईंजिनि‌अर व कारखान्यात उभि हयात गेल्यामुळे जुनी मशीन्स, टुल्स घेवुन ति रिपे‌अर करणे, जुगाड करणे व वापरणे हा छंदच होता.. अर्थात हे असे कारखान्यात काम करणारे मेकॅनिकल ईंजिनि‌अरच करु शकतात.. ईंजिनि‌अर चे कागदी सर्टीफिकिट घे‌ऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि.. असो. मी कोणताच इंजिनेर नाही पण घरच्या घरी,मिक्सर्,फ्रीज,एफेम रेडो, टेपरेकॉर्डर, छ्त्री, शिवणयंत्र, उसवले तर शर्ट पॅन्ट कधी कदी चप्पलचा अंगठा, पुस्तक फाटले की दाभण घेवुन त्याला टाके टाकतो,बाईक स्वतः धुतो, कधी कधी सर्व्हिसिंग पण आणी चारचाकी ही स्वतः स्वच्छ करतो. एवढेच काय घरी अचानक पाहुणे आले आणी बाजुचा कोंबडी कापुन देणारा मुलगा घरी नसेल तर ते पण काम मीच करतो. हाय काय त्यात. वर एवढ करता-करता नोकरीही सांभाळतो.
  • Log in or register to post comments

आपल्या घरी मिक्सर्,फ्रीज,एफेम

गणपा
Tue, 04/23/2013 - 16:27 नवीन
आपल्या घरी मिक्सर्,फ्रीज,एफेम रेडो, टेपरेकॉर्डर, छ्त्री, शिवणयंत्र,, उसवले शर्ट पॅन्ट, अंगठा तुटलेली चप्पल, फाटलेली पुस्तकं,बाईकं, चारचाकी इत्यादी इत्यादी आहे हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

च्यायला

इरसाल
Tue, 04/23/2013 - 16:23 नवीन
महत्वाचे रायले एवढ करुन मिपावर पण येतोच ना !!!!!!!!
  • Log in or register to post comments

या शिवाय इंटरनेट्, संगणक

गणपा
Tue, 04/23/2013 - 16:28 नवीन
या शिवाय इंटरनेट्, संगणक/स्मार्ट्फोन हे राहिलच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

अर्थात

इरसाल
Tue, 04/23/2013 - 16:31 नवीन
आम्ही स्वस्तुती करत नाही. कृपया याची नोंद घ्यावी. उद्या तुम्ही आमच्या वर घरी भांडी घासता असाही आळ घ्याल(खरा असला तरी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

उद्या तुम्ही आमच्या वर घरी

गणपा
Tue, 04/23/2013 - 16:37 नवीन
उद्या तुम्ही आमच्या वर घरी भांडी घासता असाही आळ घ्याल(खरा असला तरी)
गरज नाही आळ घ्यायची. एकदा लग्न झालय म्हटलं की हे सगळं ओघाओघाने आलंच. ;) (अनुभवी) -गणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

खर्र???

कोमल
Tue, 04/23/2013 - 20:11 नवीन
एकदा लग्न झालय म्हटलं की हे सगळं ओघाओघाने आलंच.
एकदा सबंध विवाहीत महिला वर्गास विचारले पाहीजे,हे खरं आहे की उगा काहितरीच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

मेकॅनिकल ईंजिनि‌अर व

नगरीनिरंजन
Tue, 04/23/2013 - 16:28 नवीन
मेकॅनिकल ईंजिनि‌अर व कारखान्यात उभि हयात गेल्यामुळे जुनी मशीन्स, टुल्स घेवुन ति रिपे‌अर करणे, जुगाड करणे व वापरणे हा छंदच होता.. अर्थात हे असे कारखान्यात काम करणारे मेकॅनिकल ईंजिनि‌अरच करु शकतात.. ईंजिनि‌अर चे कागदी सर्टीफिकिट घे‌ऊन आय़ टी मधे कळ फलक बडवणा~याचा हा घास नाहि.. असो.
हे वाक्य आणि
कॅमेरा रिपेर करणारा मित्रच होता.. त्याने ६०० रु घेतले व कॅमेरा टकाटक झाला..
हे वाक्य वाचले. सुसंगत लिहिणे हा तुमचा घास नाही हे कळले. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

ओह मास्तर सेकंड हॅण्ड कॅमेरा

माझीही शॅम्पेन
Tue, 04/23/2013 - 18:24 नवीन
ओह मास्तर सेकंड हॅण्ड कॅमेरा स्वस्तात घेऊन तो मित्रा कडून दुरुस्त केला हेच ते तुमच (सो कॉल्ड) कर्तुत्व , एवढ्या वरुन स्वता:ला बाजीराव समजायला लागला की काय :) ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

कॅमेरा रिपेर करणारा मित्रच

बंडा मामा
Tue, 04/23/2013 - 21:13 नवीन
कॅमेरा रिपेर करणारा मित्रच होता.. त्याने ६०० रु घेतले व कॅमेरा टकाटक झाला.. ही आणखी एक विसंगती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

ट्यार्पी खेचायचा क्षीण

बॅटमॅन
Tue, 04/23/2013 - 16:33 नवीन
ट्यार्पी खेचायचा क्षीण प्रयत्न. (मेक्यानिकल इंजिनियर-संख्याशास्त्री-ऐटीवाला त्रिवर्णिक) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments

क्षीण कसा रे बाबा ?? यशस्वी

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 04/24/2013 - 00:17 नवीन
क्षीण कसा रे बाबा ?? यशस्वी प्रयत्न असे म्हण...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हम्म तेही आहेच..अजूनपर्यंत लै

बॅटमॅन
Wed, 04/24/2013 - 12:07 नवीन
हम्म तेही आहेच..अजूनपर्यंत लै खडाजंगी नै झाली आधीच्या मानाने म्हणून म्हणालो इतकेच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

सर्व मेक्यानिकल इंजिनियर हमरी

स्पा
Tue, 04/23/2013 - 16:36 नवीन
सर्व मेक्यानिकल इंजिनियर हमरी तुमरी वर आलेले पाहून मौज वाटत आहे :) अवांतर : वाघुळा हल्ली तुझं गळू खूपच हळव झालंय का रे ;) - अंगठाछाप स्पा
  • Log in or register to post comments

गळू? हे काय असतं बॉ?

बॅटमॅन
Tue, 04/23/2013 - 18:30 नवीन
गळू? हे काय असतं बॉ? ;) (अज्ञानी) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

@वाघुळा हल्ली तुझं गळू खूपच

अत्रुप्त आत्मा
Tue, 04/23/2013 - 20:00 नवीन
@वाघुळा हल्ली तुझं गळू खूपच हळव झालंय का रे >>> Image removed. @बॅटमॅन - Tue, 23/04/2013 - 19:00 नवीन गळू? हे काय असतं बॉ? >>> ते स्पांडुच सांगु शकेल... त्याला रायडिंगच्या किड्यामुळे जिवंत अनुभव असेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

सुपरमार्केटच उठविलेत की हो

बॅटमॅन
Tue, 04/23/2013 - 21:50 नवीन
=)) =)) सुपरमार्केटच उठविलेत की हो बिचार्‍या स्पांडूचे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

फोटो भारीच हं काका...

साळसकर
Tue, 04/23/2013 - 16:43 नवीन
बाकी उठसूठ फोटोची आवड असल्यास मोबाईल चांगल्या कॅमेर्‍याचा घ्यावा म्हणजे सतत हाताशी राहतो. :)
  • Log in or register to post comments

मेकॅनिकल इंजिनिअर फोटोग्राफर चे काम

वेताळ
Tue, 04/23/2013 - 17:02 नवीन
करतो हे खरोखरच चांगले उदाहरण आहे. माणसाने काम करताना लाज बाळगु नये हेच खरे आहे.
  • Log in or register to post comments

लाज..?

योगी९००
Tue, 04/23/2013 - 18:43 नवीन
माणसाने काम करताना लाज बाळगु नये हेच खरे आहे. हे एकदम बरोबर. काम करताना लाज बाळगायची नाही. पण लाजल्याशिवाय कामात मजा सुद्धा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

मस्तच..

मुक्त विहारि
Tue, 04/23/2013 - 21:48 नवीन
मराठी भाषा, वळवावी तशी वळते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

लई भारी कोटी हो !!!!

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 04/24/2013 - 00:16 नवीन
लई भारी कोटी हो !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

आमचाही दंडवत घ्या....

पिलीयन रायडर
Wed, 04/24/2013 - 12:04 नवीन
___/\___ धागा काय.. चर्चा कसली आणि तुम्ही तर एक्दम ट्विस्टच दिलात...!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा