Skip to main content

ऑफिस आणि फॉर्मल कपडे

लेखक बॅटमॅन यांनी बुधवार, 17/04/2013 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स मिपाकर्स, बरेच मिपाकर या ना त्या ऑफिसात काम करतात. आयटीपासून कोअरपर्यंत, प्रोग्रॅमर-अशिष्टंट इंजिनिअर-क्लार्क पासून सीनिअर मॅनेजरपर्यंत, तसेच गल्ली-दिल्ली-आम्रविकेपर्यंत मिपाकर जगभरात अनेक प्रकारच्या नोकरी-धंद्यांत असलेले आढळून येतील. काहींचा तर स्वतःचा व्यवसायदेखील आहे. या व्यामिश्र समूहाला काही साधे प्रश्न आहेत. बर्‍याच दिवसांपासून मनात घोळत आहेत. १. फॉर्मल ड्रेस या कल्पनेबद्दल आपल्याला काय वाटते? ऑफिसात येड्यागत काहीतरी घालून येऊ नये हे मान्य पण सूट-बूट यांचा सरसकट आग्रह कितपत ग्राह्य? वेस्टर्न संकल्पनेचा गरजेपेक्षा जास्त प्रभाव आहे असे वाटते का? २. फॉर्मल ड्रेसची पुरुषांवरच सक्ती का? स्त्रियांचा फॉर्मल ड्रेस म्हंजे नक्की काय याची कोणी व्याख्या केली आहे का? असल्यास लिंक इ. द्यावी अशी विनंती. नसल्यास का नाही? ही बातमी यासंबंधात रोचक ठरावी. आय आय एम अहमदाबाद इथे होणार्‍या प्लेसमेंट इंटरव्ह्यूंसाठी आता साडी नेसणे ग्राह्य समजले जाणार आहे. जर साडी ग्राह्य ठरणार असेल तर माझ्या मते कुर्ता-पँट हेही ग्राह्य ठरण्यास अडचण नसावी. या मुद्द्यावर स्त्री-पुरुषांचे मत जाणण्यास आवडेल. बुटांचा अस्थानी आग्रह आणि स्त्री-पुरुष यांच्यातील 'फॉर्मल' भेदभाव हे मला तरी ऑड आणि चूक वाटते. मिपाकरांना याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यास उत्सुक आहे. एक एम्प्लॉयी आणि एम्प्लॉयर म्हणून आपल्या मतांत काही अंतर असेल का, हेही जाणण्यास आवडेल. धण्यवाद इण अ‍ॅडव्हान्स :)

वाचने 42600
प्रतिक्रिया 180

प्रतिक्रिया

हातातली, कानातली, गळ्यातली आभूषणं कशी नसावीत यावर बराच उहापोह होता. हे माझ्या नवर्याच्या कंपनीत आहे पण ते 'सजावट म्हणून नको' असे नसून लॅबमध्ये विद्युतप्रवाहाशी कामे असतात म्हणून (सुरक्षिततेच्या कारणास्तव). त्याने गळ्यातील साखळी, अंगठी घरीच ठेवली नंतर नंतर मग घालायची सवयच मोडली. एकदा दिवाळीनंतर चुकून ब्रेसलेट तसेच राहिले तेंव्हा सहकार्‍याने आठवण करून दिली. मी पोहायला शिकताना इंस्ट्रक्टरने मंगळसूत्र, पायातील जोडवी सुरक्षिततेच्या कारणास्तव काढायला सांगितली. नंतर मग माझीच सवय मोडली.

माझ्या महाविद्यालयात आम्हाला ड्रेसची सक्ती नाही. पण, टीशर्ट आणि शॉर्ट शर्टला तशी अलिखित बंदी आहे. शुज आवश्यकच आहेत असं नाही. चप्पलही चालून जाते. जीन्स पँट चालते. महिला प्राध्यापिका बहुतांशी साडी परिधान करुन येतात. काही पंजाबी मधे असतात पण कधी असं तर कधी तसं. बाकी, ड्रेसकोड बद्दलचा अतिआग्रह मला मान्य नाही. व्यवस्थितपणा असावा, फार वेगळेपणा वाटू नये इतपत ड्रेस असावेत असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाकी, ड्रेसकोड बद्दलचा अतिआग्रह मला मान्य नाही. व्यवस्थितपणा असावा, फार वेगळेपणा वाटू नये इतपत ड्रेस असावेत असे वाटते.
पूर्ण सहमत.

हापिसात घालण्यासाठी खालील प्रमाणे वस्त्रे असावीत, असे सुचवितो: a b d f

In reply to by चित्रगुप्त

च्यामारी ते तलवारवाल्याचा ड्रेस भारीय. डोक्यावरच्या तुर्‍याने मॉनिटर न कीबोर्ड साफ करता येईल. ;) बाकी भुताननरेशासारखे कपडे शिवायला दोन वर्शाचे प्याकेज खर्च होईल एकदम. (मिशेस सहीत म्हनलं तर ५ वर्शाचे)

शब्दन शब्द बरोबर असेल असे नाही पण http://en.wikipedia.org/wiki/Formal_wear यांच्या म्हणण्याप्रमाणे सुरुवातीला फुल्ल ड्रेस हा शब्दप्रयोग वापरात होता, त्याचा नंतर फॉर्मल ड्रेस झाला. भारतात धोती (दक्षिणेत लुंगी) आणि साडी हे फॉर्मल ड्रेस आहेत. शीखांना सगळीकडे पगडी घालण्याचा विशेष अधिकार आहेच.

In reply to by पैसा

धन्यवाद माहितीकरिता. पण विविध हपिसांच्या संहितांमध्ये धोतर-लुंगीचा समावेश आहे का? आमच्या हपीसचं आता विसरलो काय आहे ते.

In reply to by बॅटमॅन

बंगलोरात असताना पाहिले होते की सणावारांना आमच्या ब्रिटीश कंपनीत पुरुषांना लुंगी नेसून व उपरणे घेऊन येण्यास मान्यता होती.

In reply to by यशोधरा

हे पुण्यात माझ्या कंपनीतही होतं-पण सणावारी नव्हे तर ट्रॅडिशनल डे ला वैग्रे. पण जणरल सणवार सोडून नेहमीची काय स्थिती आहे? मुळात कटाक्षाने पारंपरिक कपड्यांचा आग्रह धरणारेच कमी म्हणूनही नियम जाचत नसण्याची शक्यता जास्त.

In reply to by बॅटमॅन

मी मद्रासेत कामाला गेले आणि तिथे जर बरेचजण लुंगी नेसत असले तर काही बोलता येणार नाही पण बदलत्या काळानुसार कोणत्याही राज्यात आपण नोकरी करतो. निदान मला तरी लुंगी हा प्रकार किळसवाणा वाटतो. नेहमी भीती असते की या बुवाची लुंगी सुटली बिटली तर काय करायचे. अशीच भीती आजकालच्या जीन्सबद्दल वाटते. भारतात बहुतेक नसाव्यात पण हामेरिकेत आता निसटेल की मग निसटेल अश्या घालतात. एवढे पारंपारीक/फ्याशनेबल नसल्यास चालेल, निदान हापिसात तरी! काही नियम हे उगीच जाचक नसले तर रेटून न्यावे लागतील. उदा. शर्ट पँट किंवा त्यासदृश कपडे. त्यात कुर्ता पायजमा/सलवार आलेच.

In reply to by रेवती

निदान मला तरी लुंगी हा प्रकार किळसवाणा वाटतो. नेहमी भीती असते की या बुवाची लुंगी सुटली बिटली तर काय करायचे. हॅहॅहॅ ! आज्जे तू पण ना ! काय करायचे ते बुवा बघेल ना !;) बाकी कंपनीचे नियम म्हंटल्यावर ते फॉलो करावेच लागतात त्याला पर्याय नाही.पावसाळ्याच सुद्धा यांना लेदरचेच शुज लागतात ! पावसाळ्यात मी एक जोड हापिसातच ठेवुन जातो...काय करणार मजबुरी का नाम *** ** ! बाकी आठवड्यातुन एकदाच का होईना मनासारखे कपडे घालण्याचे स्वातंत्र्य (यालाही काही बंधन आहेच.) मिळते हेही नसे थोडके !बाकी पाखरांच्या बद्धल काय बोलणार ? म्हणजे बोलावे तितके कमीच... च्यामारी यांच्या केस बांधण्याच्या"बो" मधेच इतकी व्हरायटी असते तर कपड्यांची काय विचारणा करावी !मुळात "व्हरायटी" हा शब्दच पाखरांमुळे जन्माला आला असावा असे वाटते ! ;) ड्रेसिंग बाबत आयटी,कॉल सेंटर्,बीपीओ, या ठिकाणी जास्त व्हरायटी आणि ट्रेंड्स पहायला मिळतात.कॉल सेंटर मधील मुल अगदी छपरी टाईप पोशाखात तर मुलीची विचाराल तर सगळं काम हलेडुले ! प्रमाणाच्या बाहेर काहीच्या काही अवांतर :--- A black baby is given a pair of wings by God. He smiles asks "Does dis mean I'm an Angel ?" God laughed Are nai re Kaalu...Batman Banaya Tereko. ;) माझ्या WhatsApp ढकल संदेशातुन... हलकं घे रे वटवाघुळ मानवा ! ;)

In reply to by स्पंदना

अचाट हसतोय ...कसला व्हिडीयो आहे हा =)) लुंगी च्या ऐवजी पॅन्ट घातलेली असती तर काय हालत झाली असती लुंगी जय हो !!

In reply to by बॅटमॅन

नेहमी सहसा शर्ट प्यांट घालतानाच पाहिले पण पुण्यातलाच एक अनुभव सांगते. एका इंजिनियरिंग कंपनीत असताना, सेल्स मॅनेजरला (तामिळ) एक काही धार्मिक ritual पार पाडायचे होते, आणि त्यात बरीच बंधने असतात (म्हणे) तर १ महिना तो गृहस्थ ऑफिसमध्ये अनवाणी, लुंगी नेसून, वर साधा शर्ट - उपरणे व दाढी करायची नाही म्हणून तीही वाढवून येत होता. हीसुद्धा युरोपिअन कंपनीच होती.

In reply to by यशोधरा

अय्यप्पा वारी साठी जायचा असावा किंवा साधारण ते लोक आपण जसा श्रावण पाळतो तसा तो एक महिना अय्यप्पाच्या कारणाने पाळतात. हे तुला जास्त प्रमाणात मलेशियात दिसुन येइल.

In reply to by शुचि

हो! काळा पोषाख असतो त्यांचा. पण वारीला न जाणारे काय घालतात माहित नाही, दाढी मात्र करत नाहीत.

In reply to by यशोधरा

अय्यो अम्मा, त्ये शबरीमला हाय की वो! शबरीमला आनि अय्यप्पा येकच काय? आमाला मायती इल्लल्ला! पन काळं कापड व्युथ दाढी यान्ड नो खेटरं इज शबरीमला फॉर शुव्वर्र!

In reply to by प्यारे१

अवांतर होतंय पण असो.. शबरीमला हे जागेचे नाव आहे (मला - डोंगर), अय्यप्पा हे देवाचे नाव आहे - हा किशोर / कुमार रुपातला कार्तिकेय मानला जातो. पण हे काळे कपडे / काळी लुंगी, एक काळे उपरणे, दाढी न करणे, पायात चप्पल / बूट न घालणे हे सगळं शबरीमलाचंच.. संक्रांत हा मुख्य दिवस त्याच्या आधी ४० दिवस हे व्रतासारखं करतात आणि संक्रांतीच्या दिवशी किंवा सोयीनुसार थोडे आधी तिथे जाऊन दर्शन घेतात. शक्यतो पंपा इथून ३०-४० किमी चालत जातात .. किमान डोंगर तरी आहे त्या कच्च्या पक्क्या वाटेने चढावाच लागतो.

In reply to by बॅटमॅन

वर्षातून दोन तीनदा संणांनिमित्त जसे गुढी पाडवा, दसरा भारतीय पारंपारिक पोशाख घालण्यास काही मा.त. कंपन्यांमध्ये विशेष सुट दिली जाते. काही वेळा त्याची स्पर्धाही ठेवली . एकदा मी माझ्या टीमसाठी कापडी पगड्या भाड्याने आणल्या होत्या.

छान विषय . फार पुर्वी ह्यावर एक चिंतन केले होते ते ह्या प्रमाणे १)एकुणच फॉरमल हा एक खुप मोठ्ठा घोळ आहे . युरोपात सहसा थंड वातावरण असते म्हणुन ब्लेझर ची श्टाईल आसावी . उथे मुंबैत आम्हाला अगदी घामाच्या धारा लागत असतील तरीही ब्लेझर घालावा लागतो ...अन त्यातुन साऊथ मुंबैतील मीटींग निघाली की मग तर काय पंचाग्नी तपस्या करत असल्याचा फील येतो. थोडक्यात पाश्चात्यांचं हे असलं अंधानुकरण टार गाढवपणा आहे ...( पण सध्या आम्ही ओझीवाहु गाढवच असल्याने विद्रोह करण्याचा **त दम नाही . पुढे मागे स्वतःची कंपनी टाकली तर नॅचरॅलीस्ट कल्चर एब्रेस करायचा विचार आहे कंपनीत ;) ) २) फॉर्मल ड्रेसकोद पुरुष अन स्त्री असमानता : डिसेंट साधी साडी / पॉवर सुट / वन पीस हा आमच्या कंपनीत लेदीज फॉर्मल मानला जातो . ह्यात एक ऑब्झरवेशन असे की ... स्त्रीयांचे फॉरमल कपडे ( आणि एकुणच सर्वच कपडे ) हे त्यांच्या स्त्रीत्वाच्या खुणा ठळक करुन दाखवतील असे असतात (उदाहरणे देवु का ?) अन पुरुषांच्या बाबतीत अगदीच विरुध म्हणजे जितक्या काही विशेष पुरुषत्वाच्या खुणा आहेत त्या दडपायच्या रफ टफ स्कीन नको म्हणुन मग फुल शर्ट फुलपॅन्ट , दाढी नको म्हणुन गुळगुळीत करणे , छातीवरचे केस दिसु नयेत म्हणुन मग गळ्याचे बटन लावुन वरुन टाय सुध्दा . हा म्हणजे फारच असमानता झाली राव ( पण एच आर नको बुवा सांगायला ... चुकुनमाकुन त्यांना पटलं तर पेन्सिल्हील्स+मिनी स्कर्ट जायचे अन बुरखे यायचे ;) अवांतर : आमची एच आर काय दिसती राव मिनिस्कर्टात ६ इंच चे हील्स घालती ...कसे जमतं बुवा देव जाणे ) सरते शेवटी कंफर्टेबल ते फॉरमल असा नियम असावा असे राहुन राहुन वाटते . तसे झाले तर पायात कोल्हापुरी , वर पांढरे शुभ्र धोतर वर काळा कोट अन वर कडक काळी टोपी असा पेहराव करुन ऑफीसला जायला फार आवडेल .. अवांतर : हा धागा पुरुष विभागात का नै काढला ? जरा अजुन स्पष्ट बोलता आले असते ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

ते पुरुषी खुणा दडपण्याबद्दल पूर्ण सहमत बघा!!!!!!! अन अंधानुकरणाबद्दलही :) धागा पुरुष विभागात काढला असता खरा. लक्षातच आलं नाही :)

ज्या दिवशी मीटीन्ग कीवा क्लायन्ट वीझीट असेल तेव्हा फॉर्मल आणी बाकी वेळेस जीन्स टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज असा पेहेराव असण्यास हरकत नसावी.

रोचक धागा व चर्चा. >>>> फॉर्मल ड्रेस या कल्पनेबद्दल आपल्याला काय वाटते? ऑफिसात येड्यागत काहीतरी घालून येऊ नये हे मान्य पण सूट-बूट यांचा सरसकट आग्रह कितपत ग्राह्य? वेस्टर्न संकल्पनेचा गरजेपेक्षा जास्त प्रभाव आहे असे वाटते का? "फॉर्मल ड्रेस"बद्दल एखाद्या नोकरदाराला काय वाटते ते कितपत महत्त्वाचं आहे ? एखादी नोकरी स्वीकारल्यानंतर त्या नोकरीच्या नियमांनुसार कपडे घालणं आवश्यक ठरतं. शेवटी अनेकानेक इतर गोष्टींप्रमाणे वेषभूषेबद्दलचे नियम म्हणजे नोकरीच्या वेळी स्वीकारलेल्या लिखित-अलिखित नियमांचा एक भाग आहे. काही नोकर्‍यांमधे गणवेष असतो. त्या नोकर्‍यांच्या संदर्भात घालावयाच्या कपड्यांचे अधिक कडक नियम असतात. हा शेवटी तुम्ही स्वीकारलेल्या अटींचा भाग आहे असं मला वाटतं. शहरी भागातल्या नोकर्‍यांमधे किमान शर्ट पँट घालण्याचा रीतीरिवाज ही भारतीय संदर्भातली गेल्या पन्नासेक वर्षांमधली घटना आहे. तर मग याला पाश्चात्य विचारसरणीचा प्रभाव असं कितपत म्हणता येईल ? >> फॉर्मल ड्रेसची पुरुषांवरच सक्ती का? स्त्रियांचा फॉर्मल ड्रेस म्हंजे नक्की काय याची कोणी व्याख्या केली आहे का? असल्यास लिंक इ. द्यावी अशी विनंती. नसल्यास का नाही? "फॉर्मल ड्रेस"ची सक्ती केवळ पुरुषांवरच असते असं वाटत नाही. निरनिराळ्या संदर्भात ती वेगवगळी , वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या शैथिल्याची असू शकते. परंतु काही लिखित-अलिखित नियम हे सर्व नोकरदारांसाठी असतात. स्त्रियांसाठी असले नियमच नसतात किंवा ते नीटसे लिहिलेले किंवा पुरेसे स्पष्ट नसतात असं मला वाटत नाही. तसं तुम्हाला वाटत असेल तर असं प्रतिपादन करणारे या नात्याने ते दाखवून देण्याची जबाबदारी तुमची :)

In reply to by मुक्तसुनीत

"फॉर्मल ड्रेस"बद्दल एखाद्या नोकरदाराला काय वाटते ते कितपत महत्त्वाचं आहे ? एखादी नोकरी स्वीकारल्यानंतर त्या नोकरीच्या नियमांनुसार कपडे घालणं आवश्यक ठरतं. शेवटी अनेकानेक इतर गोष्टींप्रमाणे वेषभूषेबद्दलचे नियम म्हणजे नोकरीच्या वेळी स्वीकारलेल्या लिखित-अलिखित नियमांचा एक भाग आहे. काही नोकर्‍यांमधे गणवेष असतो. त्या नोकर्‍यांच्या संदर्भात घालावयाच्या कपड्यांचे अधिक कडक नियम असतात. हा शेवटी तुम्ही स्वीकारलेल्या अटींचा भाग आहे असं मला वाटतं. शहरी भागातल्या नोकर्‍यांमधे किमान शर्ट पँट घालण्याचा रीतीरिवाज ही भारतीय संदर्भातली गेल्या पन्नासेक वर्षांमधली घटना आहे. तर मग याला पाश्चात्य विचारसरणीचा प्रभाव असं कितपत म्हणता येईल ?
नोकरदाराला काय वाटतं हे तादृश महत्वाचं कदाचित नसेलही- पण मला तरी वाटतं की ते महत्वाचं आहे. शिवाय त्या अटी न स्वीकारून सांगतोय कुणाला? जिथे अगदी जिवावर बेतू शकेल म्हणून काही नियम असतात ते सोडून बाकी केसेसबद्दल म्हणतोय. आणि शर्ट पँट बद्दल म्हणायचे तर पाश्चात्य रीतिरिवाज खोलवर भिनल्यामुळेच त्यांचा वेष स्वीकारला, नपेक्षा दुसरे कारण काय होते? शर्टप्यांट हे धोतर-सदर्‍यापेक्षा जास्त कम्फर्टेबल असतात असे काही मला वाटत नाही. तंग सुरवार हा प्रकारही अगदीच अनहर्ड ऑफ नव्हता. पण रोजबरोज प्यँट घालणे हा अनुकरणातूनच आलेला प्रकार आहे.
"फॉर्मल ड्रेस"ची सक्ती केवळ पुरुषांवरच असते असं वाटत नाही. निरनिराळ्या संदर्भात ती वेगवगळी , वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या शैथिल्याची असू शकते. परंतु काही लिखित-अलिखित नियम हे सर्व नोकरदारांसाठी असतात. स्त्रियांसाठी असले नियमच नसतात किंवा ते नीटसे लिहिलेले किंवा पुरेसे स्पष्ट नसतात असं मला वाटत नाही. तसं तुम्हाला वाटत असेल तर असं प्रतिपादन करणारे या नात्याने ते दाखवून देण्याची जबाबदारी तुमची
चर्चाप्रस्ताव अजून नेमकेपणे लिहायला पाहिजे होता बहुतेक :) असो. स्त्रियांसाठीचे नियम पुरेसे स्पष्ट असतात हे वर काही प्रतिसादांतून दिसतंच आहे. पण पुरुषांना फॉर्मलच्या नावाखाली ऑप्शन्स बैकांच्या तुलनेत लै कमी अलाउड आहेत ही मुख्य रड/तक्रार आहे.

In reply to by बॅटमॅन

>> तंग सुरवार हा प्रकारही अगदीच अनहर्ड ऑफ नव्हता. पण रोजबरोज प्यँट घालणे हा अनुकरणातूनच आलेला प्रकार आहे. याबद्दल दुमत नाही. परंतु, ही घटना आजची नसेल, अनेक दशकांपासूनची असेल तर तुमची या संदर्भातली तक्रार काय ते मला नीटसं समजलेलं नाही असं म्हणतो. पाश्चात्यांच्या जीवनशैलीचं किंवा विचारसरणीचं अनुकरण करण्याचा मुद्दा अधिक विस्तृत स्वरूपाचा आहे आणि प्रस्तुत धाग्याच्या विषयाशी (म्हणजे मला जो प्रमुख विषय वाटतो आहे त्याच्याशी) ताळमेळ राखणारा वाटत नाही. >>>पुरुषांना फॉर्मलच्या नावाखाली ऑप्शन्स बैकांच्या तुलनेत लै कमी अलाउड आहेत ही मुख्य रड/तक्रार आहे. एका भारतीय पुरुषाला भारतीय स्त्रियांना अन्य अगणित संदर्भात उपलब्ध असलेल्या "ऑप्शन्स"च्या तुलनेत ही रड कितपत महत्त्वाची ठरू शकेल ? :)

In reply to by मुक्तसुनीत

मुद्दा साधा आहे. शर्ट/कोट अन प्यांट ही जोडी इंग्रजांमुळेच भारतात रूढ झाली आणि फॉर्मल ड्रेस म्हणून हे काँबिनेशन रूढ झाले. बर्‍याचदा गरज नसताना, उकडतबिकडत असतानाही हे पोषाख घालण्याचा आग्रह अस्थानी आहे आणि सबब अजून ऑप्शन्स हवेत. बायकांनी साडी नेसली म्हणून कोणी बोंब मारत नाही. पण तसेच पुरुषांनी धोतर किंवा तत्सम वेष केल्यास ओरड होते. आदूबाळ यांचा प्रतिसाद या दृष्टीने बोलका आहे. तस्मात पुरुषांना फॉर्मल्स मध्ये दिलेले ऑप्शन्स नुस्त थिओरेटिकल नसावेत किंवा दिलेले तरी असावेत. कैक ठिकाणी असे काही नसते. हे चूक आहे, इतकेच सांगणे. बाकी स्त्रियांना जास्त ऑप्शन्स आणि आम्हाला कमी वगैरे छापाची ही रड नाहीच. स्त्रियांना नटायची हौस जास्त, सबब त्यांच्यासाठीचे ऑप्शन्स ज्स्त हे ओघाने आलेच. त्यात काही विशेष नाही. पण जेवढे ऑप्शन्स अगोदरपासून उपलब्ध आहेत, तेवढे वापरायची मुभा तरी दिली जावी. :)

In reply to by बॅटमॅन

बाकी स्त्रियांना जास्त ऑप्शन्स आणि आम्हाला कमी वगैरे छापाची ही रड नाहीच. स्त्रियांना नटायची हौस जास्त, सबब त्यांच्यासाठीचे ऑप्शन्स ज्स्त हे ओघाने आलेच. त्यात काही विशेष नाही. पण जेवढे ऑप्शन्स अगोदरपासून उपलब्ध आहेत, तेवढे वापरायची मुभा तरी दिली जावी
हे फारसे पटले नाही. कामाच्या ठिकाणी कोणी स्त्रिया नटून थटून येताना सहसा पाहिले नाहीये. साडी, सलवार- कमीज, ट्राऊझर्स, फॉर्मल स्कर्ट असे ऑप्शन्स असतात. पुरुषांनी भारतीय वेषभूषा करावी ना. तुमच्या नोकरीत एचारकडे तुम्ही विचारणा केली अहे का? त्यांना पटवून दिले आहे का? आणि नटण्याचे म्हणाल, तर चेन, कानात, ब्रेसलेट, इत्यादि जामानिमा बर्‍यापैकी पुरुष सहकार्‍यांचा पाहिला आहे. बर्‍यापैकी केस वाढवून पोनीटेल घालणारे सहकारी आहेत.

In reply to by यशोधरा

कामाच्या ठिकाणी कोणी स्त्रिया नटून थटून येताना सहसा पाहिले नाहीये.
नटणे थटणे हे बहुधा लिंगसापेक्ष असावे अर्थात स्त्रीया फेशीयल ब्लीच व्यॅक्सिंग हेयर कर्लिंग / आयर्निंग थ्रेडनिंग टोनिंग स्क्रबिंग मॉइश्चरायझिंह हे झाल्या नंतर लिप्स्टिक लिप्ग्लॉस लिप्लायनर बॉडी टोनर बॉडीलोशन आय शॅडो आय मस्करा फांडेशन फेसपावडर रिंग्स ब्रेसलेट नेकलेस नेलपेन्ट चकचकीत वनपीस हाय हील्स मॅचिंग इयररिंग (२ दिवसांच्या प्रवासाचे सामान मावेल येवढी)पर्स त्यात किमान एक परफुम एक आरसा एक डिओ आणि बर्‍याच अज्ञात गोश्टी घेवुन तयार झाल्या की म्हणतात " आज वेळच नाही मिळाला आवरायला ... तशीच गडबडीत निघुन आले " =)) =)) =))

In reply to by यशोधरा

स्त्रिया गरज नसताना उगीच नट्टापट्टा करतात वगैरे माझे मत आजिबात नाही. त्यांचे शरीर, त्यांची इच्छा, मला काय त्याचे? मुद्दा इतकाच आहे की स्त्रियांच्या वेषभूषेत (फॉर्मल ऑर नॉन फॉर्मल) पुरुषांपेक्षा जास्त पर्याय उपलब्ध आहेत. हे का आहेत त्याचे कारण माझ्या मते म्हंजे स्त्रिया पुरुषांपेक्षा स्वतःच्या दिसण्याबद्दल जास्त जागरूक असतात असे असावे. बाकी आमच्या नोकरीत असला त्रास अजूनतरी नाही, सबब विचारणा करण्याचा प्रसंग आला नाही. आला प्रसंग तर अवश्य विचारेन.

In reply to by बॅटमॅन

वेगवेगळे पर्याय असले तरी भारतात साडीला जी प्रतिष्ठा आहे ती पंजाबी किंवा जीन्स-कुर्त्याला नाही. साडी घातली की लोक्स भलतेच आदबशीर वागतात असा अनुभव आहे...

गुपचुप गुपचुप चित्रपटातला प्रो. धोंड जेव्हा त्याच्या कालेजात धोतर,पगडी वगैरे जामानिमा घालून जातो आणि त्याची कशी कानउघाडणी होते तो सिन आठवला.

बंगरुळात एका छोट्या कंपनीत पांढरी शुभ्र लुंगी, पांढरा पारदर्शक शर्ट,उपरणं आणि उभा गंध असा गणवेश आहे. बाकी सर्विस बेस्ड कंपन्यात फ्वार्मलची सक्ती जास्तच असते. त्यामानाने बाकीच्या कंपन्यात एव्हडी सक्ती नसते. परवाच एका टेलेक्वानवर एकाने भारतातलं तापमान ऐकल्यावर मग तिकडे तुम्ही श्वार्ट वगैरे घालून आलात का असा निरागस प्रश्न विचारला. थोडक्यात सर्वीसबेस्ड कंपनीने चड्डीत रहावं. :)

In reply to by बॅटमॅन

हॅ हॅ. आपलं काय हो पंत, सायेब म्हणाला कोट घालून या, आलो. उद्या सायेब म्हणाला तसच या, तसच येइन. - दादा भिंगार्डे धागा वाचून एकदम आठवलं, गेल्या पाच-सहा वर्षांपासून फ्वार्मल प्यांटच घेतली आणि घातली नाहीये. मध्यंतरी मुलाखतीला देखिल जिन्सवर जात होतो. :D

In reply to by दादा कोंडके

गेल्या पाच-सहा वर्षांपासून फ्वार्मल प्यांटच घेतली आणि घातली नाहीये. मध्यंतरी मुलाखतीला देखिल जिन्सवर जात होतो.
नशीब थोर आहे तुमचं दादानुं...

In reply to by आदूबाळ

कै नशीब थोर नै. फ्वार्मल ड्रेस घालणं परवडत सुद्धा नै हो. उत्पादन विभागात काम करत असल्यामुळे जिन्स बरी पडती. कष्टमर (कष्ट करायला लाउन मारणारा) मिटींग असली तर ट-सदर्‍या ऐवजी फ्वार्मल शर्ट घालतो, झालं. बाकी बायका जास्त नैत. खूप ठिकाणी जाळीचे जिने असल्यामुळे त्या साडी, स्कर्ट वैग्रे घालून येत नाहीत. (म्हणजे दुसरं कैतरी घालतात)

पुण्यासारख्या शहरात एखादा भिकबाळी घालून हापिसात जात असेल तरी लोक 'अजि म्या ब्रह्म पाहिले' असा चेहरा करतात. कान त्याचा, टोचून घेणारा तो, खर्च करणारा तो आणि यांना नसत्या पंचायती.

In reply to by सूड

सेम अनुभव मलाही आला होता ...

In reply to by सूड

उलट पुण्यातच मी बरेचसे लोक भिकबाळी घालताना पाहिले आहेत. सांगली-मिरजेत असताना लहानपणापासून एखादाही भिकबाळीवाला पाहिल्याचे आठवत नाही.

In reply to by बॅटमॅन

अगदी सहमत रे. बालीवाले (कुंडल) मात्र सर्रास. निष्कर्ष सांग की लगेच याचा. ;) फास्टेस्ट फीफ्टी तर झालीच हाय. दबल चेंचुली पन व्हईल.

In reply to by अभ्या..

दबल चेंचुली
दाबून चेचल्यागत वाटायलंय =)) चो च्वीट इ.इ., यू नो द ड्रिल =))

एक अरब सोडले तर बाकी सार्‍यांनी ब्रिटीशबुवांना प्रमाण मानुन फॉर्मल वेअर ठरवलेले दिसते. साडी छान दिसते, पण ती नेसुन जेंव्हा तुम्ही गर्दीच्या ठिकाणांहुन प्रवास करता तेंव्हा ती फारशी व्यवस्थीत टिकणे अशक्य. अर्थात हे मी मुंबईच्या लोकल प्रवासाच्या, बसच्या अनुभवाने बोलते आहे. अन नोकरीचे ठिकाण जर असे दुर प्रवासाचे असेल तर तिथवर पोहोचेपर्यंत शेप मध्ये रहातील असे कपडे सर्वांनीच वापरलेले ठिक. म्हणजे जो साडीचा प्रॉब्लेम आहे तो धोतराचा पण होउ शकतो आणि तुम्ही ऑफीसमध्ये गबाळे पोहोचु शकता. बाकी लेखात बरेच संस्कृत शब्द असताना एकदम फॉर्मल हा शब्द थोडा (अगदी थोडा) खटकला.

In reply to by स्पंदना

मान्य. जण्रल तुमचे म्हण्णे पटलेच. फक्त सक्ती होऊ नये इतकंच मागणंय. :) अन फॉर्मल हा शब्द वापरायचे कारण म्हंजे त्याला शिंपीनिर्मित प्रतिशब्द माहिती नसणे हे होय ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

हम्म....औपचारिक म्हंजे वरवरचा असल्याचा एक भास होतो त्यातून. पण तो सोडल्यास अन्य शब्दही सुचत नाहीये. कार्यालयीन हा शब्द इथे जरा अप्रस्तुत ठरावा काय?

In reply to by बॅटमॅन

"मान्यताप्राप्त कार्यालयीन परिवेष??" (पण इथं कार्यालय मान्यताप्राप्त असावं असं वाटतंय) :-) किंवा मग "कार्यालयीन मान्यताप्राप्त परिवेष?"

खुळेपणाचा कळस आहे आपल्याकडे. तरी बरं, लेखात अन प्रतिसादात दिलेली बहुतांश उदाहरणं ही आयटी कंपन्यांमधली आहेत. मला सर्वात जास्त दया येते ती मार्केटिंगवाल्या पोरांची. :( भर उन्हाळ्यात ३८-३९ डिग्रीमध्ये वणवण करत हिंडत असतात अन बहुतेक जणांना ते टाय आवळण्याची जबरदस्ती असते हापिसातून. अरे काय बिनडोकपणा आहे हा? नियम अन पॉलिसी करणारे फोकलीचे बसणार गारेगार हापिसात अन ह्या वरावरा हिंडणार्‍या पोरांच्या नरड्याला कशाला तो फास? काय घोंगड्या गोधड्या पांघरायच्या त्या एसी हापिसात पांघरुन बसावं की चिप. आयटीच्या हापिसातल्या तर्‍हा जरा जास्तच. क्लायंट आला की म्यानेजरं वगैरे बेंदरादिवशी झूल चढवल्यागत कोट, गळ्याभोवती टाय..(आणि दिवसातून शंभरदा बंद असलेल्या कॉलरमधून बोटं फिरवून आत हवा जाऊ देण्याचा प्रयत्न). बरं, हे एकवेळ ठीक...पण लोकांनी फक्त इंग्रजीतच बोलायचं! अरे? हे काय तिच्यायला? त्या क्लायंटशी बोलताना लोकं त्याला कळेल असंच बोलतायत ना? आपापसातही कशाला ते? वर आमचे मुसुशेठ म्हणतात,
"फॉर्मल ड्रेस"बद्दल एखाद्या नोकरदाराला काय वाटते ते कितपत महत्त्वाचं आहे ? एखादी नोकरी स्वीकारल्यानंतर त्या नोकरीच्या नियमांनुसार कपडे घालणं आवश्यक ठरतं. शेवटी अनेकानेक इतर गोष्टींप्रमाणे वेषभूषेबद्दलचे नियम म्हणजे नोकरीच्या वेळी स्वीकारलेल्या लिखित-अलिखित नियमांचा एक भाग आहे........
मान्य! पर्याय नाहीच. गरजवंताला अक्कल नसते. 'रेडा दूध देतो का रे? तर 'होय सायेब...चांगला चार शेर दूध देतो' हे आलंच. पण मला असं वाटतं, की मुळात हवामानाशी जुळवून न घेता येण्याजोग्या पोषाखाच्या अट्टाहासाची गरज नाही. शर्ट-प्यांटबद्दल आपलं काही म्हणणं नाही..धोतर,सदरा, सुरवार, झब्बा ह्यापेक्षा सुटसुटीत अन वापरायला सोपा प्रकार असल्यानं त्याविरोधात मत नाही. अहो, भर गर्दीत रस्ता ओलांडताना किंवा हापिसात एका हातात जेवणाचं ताट अन दुसर्‍या हातात पाण्याची बाटली/ग्लास घेऊन टेबलापर्यंत जाताना अचानक सोगा सुटला तर किती पंचाईत? त्यापेक्षा प्यांट उत्तम. होल्डऑल आवळल्यासारखी पट्ट्यानं आवळून बांधता तरी येते :) तसंच शर्टाचं! एकदा तो प्यांटमध्ये खोचला की संपला विषय. झब्बा झालं, सदरा झालं, अंमळ घोळदार खाली फिरत असतो, अन अचानक मूड आला..मस्तपैकी कलकत्ता साधं किंवा एकसो-बीस-तीनसो असं दणदणीत पान खाऊन ब्रम्हानंदी लागली असताना पिचकारी मारल्यावर तीचे शिंतोडे जर (जर कसले? शिंचे शंभरातल्या सत्तरदा तरी नक्कीच) आपल्याच सदर्‍यावर/ झब्ब्यावर उडले तर कितक्याला पडलं ते? तेव्हा प्र्याक्टिकली विचार करता शर्टप्यांट हे प्रकरण विरोध करण्यासारखं नाही. हां, त्यापुढचे प्रकार म्हणजे नरड्याला फास, ती लोकरीची झूल, चामड्याचे बंद बुट ह्या भानगडी मात्र गाढवपणाच्या आहेत. बाकी, कुणी काही म्हणो, दिडशे वर्षांच्या गुलामीनंतर देश स्वतंत्र झाला...पण अजून आमची मानसिक गुलामगिरी गेली नाही हेच खरं!

In reply to by धमाल मुलगा

माझ्या लिखाणाला उधृत केलेलं आहे आणि त्याच्याशी (बिनशर्त !) सहमती आहे असं दिसतं आहे. बहुत काय लिहिणें. :)

In reply to by धमाल मुलगा

पूर्ण प्रतिसादाशी बिनशर्त सहमती!!!!!!!!!!!! मार्केटिंगवाल्यांचे हाल तर कुत्रा खात नाही. :( आणि मानसिक गुलामगिरी अजूनही गेली नाही ते बाकी एकदमच खरं!!!!

कधी-कधी हे नियम जाचक वाटू शकतात हे खरं असलं तरी असे नियम असावेत असं वाटतं. हे नियम असतानाही ते हवे तसे वाकवून वाट्टेल ते कपडे घालणारे लोक पहिलेत. नियमच काढून टाकले तर काय होईल? बाकी कंठलंगोट हा भयंकर त्रासाचा प्रकार आहे याबाबत सहमत. (हापिसात कंठलंगोट घालणारा)सुमीत

इंटरव्यू घेतानाच बॉस म्हणाला . "you will have to wear formals.. at least 4 days in the week.. not my rules . . even i hate it.. on the rest of the days.. you can wear anything you want.. just make sure you don't come half naked" मी म्हणालो . . thats ok sir.. but.. I wont be wearing any tie.. I dont' think you want your employee to suffocate while talking to your clients.." हसला मस्त. . हा पण . .हापिसात जी मुलगी आहे . ती अक्षरशः काहीही घालून येते. . हि चीटिंग आहे

कार्यालयीन वेशभूषा हा एक अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. मध्यंतरी आमच्या कुंपणीतही कंठलंगोटची टुम निघाली होती. एका शनिवारी गोर्‍या वकिलाबरोबर मीटिंगा होत्या त्यामुळे आम्ही सगळे कंठलंगोट, कोट पाटलूण घालुन गेलो तर हा पट्ठ्या चक्क जीन्स टी शर्ट वर आला होता. स्याटर्डे आहे तर कशाला हा सगळा बोझा असा त्याचा सूज्ञ विचार. आमचे चेहरे बहुधा पाहण्यासारखे असावेत. त्यानंतर ही टुम जशी अचानक आली होती तशी अचानल मेली आणि आम्ही आमच्या रोजच्या कपड्यांवर आलो. त्यानंतर एका मे महिन्यात अजुन एक गोरा आमच्या मुंबैच्या हापिसात सगळा जामानिमा करुन आला. उकाड्याने पार हैराण होउन (तरी बरे वातानुकुलित गाडीतुन आणला होता त्याला). आम्हाला साध्या शर्ट प्यांट वर बघुन गडी लैच खुष झाला. दुसर्‍या दिवसापासुन त्यानेही कोट आणी कंठलंगोट त्याजले. मुंबैच्या वातावरणाला हा पोशाख साजेसाच नाही हे पण त्याने मान्य केले. थोडक्यात इंग्रजाचे अंधानुकरण करण्याची गरज नाही. त्याच्या वातावरणाला कोट, ऑव्हरकॉट, कंठलंगोट सगळे हवे, थंडीपासुन बचाव म्हणुन. इथे घाम घाम होत असताना साधे लंगोट नको वाटते तर हे झेंगट कोणी सांभाळावे. बाकी शर्ट प्यांट सुटसुटीत वाटते. आणी त्याची सवयही झाली आहे. त्यामुळे त्याचा काही त्रास नाही. पारंपारिक झब्बा पायजमा घातला की श्रीखंड पुरी आणी भजी हादडुन वर एक मसाला मघई लावुन ताणुन द्यावी किंवा मित्रपरिवाराबरोबर पत्ते कुटायला बसाबे असे वाटायला लागते. एरवी अमुकच प्रकारचा पोशाख हवा अश्या अट्टाहासाशी मीदेखील असहमत आहे. परंतु हपिसात शिस्त असावी याचा तो एक भाग आहे. सैन्यदलांमध्ये प्रत्येक प्रसंगासाठी आणी कार्यासाठी पोशाख ठरलेला असतो. तो या शिस्तीचाच एक भाग आहे. एक सामान्य नागरिक म्हणुन एवढ्या कडक शिस्तीचा पोशाख कर्मचार्‍यांना आवश्यक नाही. पण अगदीचे सूट दिली की पोरी नितकोर चड्ड्या आणि पोरे पार्श्वभागावरुन खाली घसरणार्‍या जीन्स किंवा केशरी पोपटी रंगाच्या बर्म्युडा घालुन हापिसात येतात. त्यामुळे सुवर्णमध्य म्हणुन फॉर्मल ड्रेस नावाचा पर्याय असण्यास काही हरकत नसावी.

पारंपारिक झब्बा पायजमा घातला की श्रीखंड पुरी आणी भजी हादडुन वर एक मसाला मघई लावुन ताणुन द्यावी किंवा मित्रपरिवाराबरोबर पत्ते कुटायला बसाबे असे वाटायला लागते.
हाहाहा अतिशय पटलेलं आहे हे :D

आमच्या ऑफिसमध्ये देखिल ड्रेसकोड बाबत अगदी जाचक अटी आणि नियम आहेत. सोम-गुरु ला फॉर्मल्स (लांब बाह्याचा शर्ट, ट्राऊजर व चामड्याचे बुट) आणि शुक्र ला जिन्स-टिशर्ट (जिन्स फेडेड, कातरलेली, मळकी, ई नसावी व फक्त कॉलर असलेले टिशर्ट). पण हे फक्त पुरुषांसाठीच; बायकांना काहीही घालण्याचि मोकळीक आहे. वरील ड्रेसकोड जर पुरुष कर्मचार्यांनी पाळला नाही तर त्यांना कंपनीचे सिक्युरिटी आत येण्यास मज्जाव करतात (मला देखील एकदा हा अनुभव आलेला आहे :( ) मला एक कळ्त नाही की कंपनीला कर्मचारी महत्वाचा की त्याचे कपडे? टिशर्टला कॉलर असली काय नसली काय, काय फरक पडतो?

भारताल्या कडाक्याच्या उन्हात गळ्यात कुत्र्यासारखा पट्टा आडकुन आणी त्यावर जाड कोटाची फर पांघरुन या लोकांना कस काय राहता येत, देवाक ठावुक! आपण तर आपल्या ओपीडीत जिन्स- टी शर्ट पासुन पुर्ण खादीपर्यंत काय वाटेल ते घालतो.हा फक्त दवाखाना सोडुन जर एखाद्या जागेच्या व्यवहाराची मिटींग असेल तर मात्र पुर्णपणे खादीच वापरतो....

In reply to by नितिन थत्ते

ही गोष्ट केल्यामुळे मला गांधीजींबद्दल प्रचंड आदर आहे. गोर्‍या साहेबाला भेटायला जायचे म्हणुन उगा आपल्या नेहमीच्या पोषाखाला काडी नाही लावली. आहे हे असे आहे. नंगा फकीर म्हणा किंवा अजुन काही म्हणा. मला शष्प फरक पडत नाही. तुमचंच जळतय. हा अ‍ॅटिट्युड लैच आवडतो आपल्याला.