Skip to main content

ऑफिस आणि फॉर्मल कपडे

लेखक बॅटमॅन यांनी बुधवार, 17/04/2013 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स मिपाकर्स, बरेच मिपाकर या ना त्या ऑफिसात काम करतात. आयटीपासून कोअरपर्यंत, प्रोग्रॅमर-अशिष्टंट इंजिनिअर-क्लार्क पासून सीनिअर मॅनेजरपर्यंत, तसेच गल्ली-दिल्ली-आम्रविकेपर्यंत मिपाकर जगभरात अनेक प्रकारच्या नोकरी-धंद्यांत असलेले आढळून येतील. काहींचा तर स्वतःचा व्यवसायदेखील आहे. या व्यामिश्र समूहाला काही साधे प्रश्न आहेत. बर्‍याच दिवसांपासून मनात घोळत आहेत. १. फॉर्मल ड्रेस या कल्पनेबद्दल आपल्याला काय वाटते? ऑफिसात येड्यागत काहीतरी घालून येऊ नये हे मान्य पण सूट-बूट यांचा सरसकट आग्रह कितपत ग्राह्य? वेस्टर्न संकल्पनेचा गरजेपेक्षा जास्त प्रभाव आहे असे वाटते का? २. फॉर्मल ड्रेसची पुरुषांवरच सक्ती का? स्त्रियांचा फॉर्मल ड्रेस म्हंजे नक्की काय याची कोणी व्याख्या केली आहे का? असल्यास लिंक इ. द्यावी अशी विनंती. नसल्यास का नाही? ही बातमी यासंबंधात रोचक ठरावी. आय आय एम अहमदाबाद इथे होणार्‍या प्लेसमेंट इंटरव्ह्यूंसाठी आता साडी नेसणे ग्राह्य समजले जाणार आहे. जर साडी ग्राह्य ठरणार असेल तर माझ्या मते कुर्ता-पँट हेही ग्राह्य ठरण्यास अडचण नसावी. या मुद्द्यावर स्त्री-पुरुषांचे मत जाणण्यास आवडेल. बुटांचा अस्थानी आग्रह आणि स्त्री-पुरुष यांच्यातील 'फॉर्मल' भेदभाव हे मला तरी ऑड आणि चूक वाटते. मिपाकरांना याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यास उत्सुक आहे. एक एम्प्लॉयी आणि एम्प्लॉयर म्हणून आपल्या मतांत काही अंतर असेल का, हेही जाणण्यास आवडेल. धण्यवाद इण अ‍ॅडव्हान्स :)

वाचने 42600
प्रतिक्रिया 180

प्रतिक्रिया

गेल्या काही वर्षांत स्वतःला न अवघडवणारे अन शक्यतो आजूबाजूच्यांचे लक्ष विचलीत न होणारे कपडे कामाच्या ठिकाणी घालून जायचा प्रघात आहे (या गुणधर्मांच्या व्याख्या सापेक्ष आहेत). मा.त. मध्ये काम करणार्‍या बहुतांश कंपन्यांमध्ये पुरोषांनी सोमवार ते गुरूवार फॉर्मल शर्ट पँट (भडकपणा नसलेले) व शुक्रवारी इन्फॉर्मल / कॅज्युअल कपडे जीन्स टी शर्ट (कॉलरवाले) परिधान करावे असा नियम + मुभा असतो / असते. सोमवार ते गुरूवार चामड्याचे जोडे व शुक्रवारी खेळात वापरले जाणारे जोडे घालावे असाही उपनियम असतो. कंठलंगोट हा प्रकार कालबाह्य झालाय असे आजकाल म्हणतात. बाकी या नियमांना न पाळण्याच्या प्रवृत्तींबद्दल मी येथे लिहिले होते. बाकी अमेरिकेत इशान्येकडल्या राज्यांमध्ये सुटाबुटाचे फारच महत्व असते असे ऐकले आहे. कामानिमित्त तिकडे कधीच न गेल्याने काही निश्चित ठाऊक नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

धन्यवाद. कंठलंगोट हा तसाही हास्यास्पद प्रकार असतो (वैयक्तिक मत) . आयटीतील तुम्ही म्हणता तो नियम व उपनियम मला माहिती आहे, पण स्त्रियांसाठी ही कल्पना खूप धूसर आहे. त्याबद्दल काय मत आहे? कमेंट वाचली, त्यात काही अंशी उत्तर मिळाले.

In reply to by बॅटमॅन

स्त्रियांच्या फॉर्मल पोषाखाबद्दल एवढेच म्हणता येईल पाश्चात्य फॉर्मल परिधानाखेरीज स्थानिक परिधान (भडक दिसत नसणारे) बहुतांश ठिकाणी चालतात.

In reply to by बॅटमॅन

कंठलंगोट हा प्रकार कालबाह्य झालाय असे आजकाल म्हणतात.
तुम्हाला मा. तं कंपन्यांची काही माहितीच नाही. ("हाय कंबख्त, तूने पी ही नही" च्या चालीवर वाचावे.)

In reply to by धन्या

धन्याशेठ ते माझे विधान नाही हो. अर्थात आमच्या कुंपिणीत मीपण टायवाले कधी फार पाहिले नाहीत हा भाग वेगळा. तसेही आमचा करिअरमधील अणुभव फ्याशन टीव्हीवरच्या एकूण कपड्यांइतका तोकडाच म्हणा, त्यामुळे मा.तं. बद्दल आम्हाला माहिती नाही हेही बरोबरच आहे. :)

In reply to by बॅटमॅन

तसेही आमचा करिअरमधील अणुभव फ्याशन टीव्हीवरच्या एकूण कपड्यांइतका तोकडाच म्हणा
निबंध लिहा: फ्याशन टीव्हीवरचे कपडे फॉर्मल म्हणून मान्यता पावले तर.

In reply to by धन्या

या निबंधप्रस्तावाच्या उडतवाचनानेच आमचा ऊर्ध्व लागोन निर्वाण पावलो आहोत. "अगर फिर्दौस बर्रुएं जमी अस्त, हमीनस्तो, हमीनस्तो, हमीनस्त" याचे प्रत्यंतर याचि देही याचि डोळा येईल ;)

In reply to by बॅटमॅन

आमच्या हापिसच्या लोकांची जेव्हा कधी दारूची पार्टी असायची तेव्हा काही टारगट मंडळी सगळ्यांनी टाय लावून या असे सांगत. कशाला तर म्हणे जर कोणी दारू पिऊन झिंगला तर टायला धरून ओढत न्यायला बरे!

In reply to by बॅटमॅन

कंठलंगोट हा प्रकार मेडिकल रिप्रेझेंटीव्ह किंवा मग प्रयोगशाळांना रसायने/काचभांडी विकणारे हेच काय ते वापरत असतील. १०/१२ किलोचे बाड बाळगुन भर उन्हातान्हात फिरत असतात. आणी बर्‍यापैकी कंपनीतुन त्यांना नकारच मिळतो. कारण कंपन्यांचे आधीच व्हेंडर फिक्स असतात त्यात नवीन कोणाला ते सामावु इच्छित नाहीत. सध्याच्या कुंपणीमधे ड्रेसकोड आहे पण आठवड्याचा एक दिवस रंगीबेरंगी बनायला मुभा आहे पण तेही काही नीतीनियम पाळुनच.

In reply to by बॅटमॅन

कंठलंगोट हा प्रकार मेडिकल रिप्रेझेंटीव्ह किंवा मग प्रयोगशाळांना रसायने/काचभांडी विकणारे हेच काय ते वापरत असतील. १०/१२ किलोचे बाड बाळगुन भर उन्हातान्हात फिरत असतात. आणी बर्‍यापैकी कंपनीतुन त्यांना नकारच मिळतो. कारण कंपन्यांचे आधीच व्हेंडर फिक्स असतात त्यात नवीन कोणाला ते सामावु इच्छित नाहीत. सध्याच्या कुंपणीमधे ड्रेसकोड आहे पण आठवड्याचा एक दिवस रंगीबेरंगी बनायला मुभा आहे पण तेही काही नीतीनियम पाळुनच.

In reply to by इरसाल

कंठलंगोट हा प्रकार मेडिकल रिप्रेझेंटीव्ह किंवा मग प्रयोगशाळांना रसायने/काचभांडी विकणारे हेच काय ते वापरत असतील.
भारतात आय टी म्हटलं की जे नांव समोर येतं, तिकडे आजही सोमवारी आणि मंगळवारी कंठलंगोट घालावा लागतो. नाही घातला तर सुरक्षारक्षक नोंदवहीत कर्मचार्‍याच्या कर्मचारी क्रमांकाची नोंद करतात. महिना अखेरीला तीनशे रुपयाला बांबू !!!

In reply to by बॅटमॅन

कंठलंगोट हा तसाही हास्यास्पद प्रकार असतो
आहो पण तो गळ्याभोवती असतांना थोडी मनाची आणी थोडी जनाची लाज वाटुन आमच्या सारखे लोक ऑफिसची कामे देखिल करायची पण आता विना कंठलंगोट पुन्हा पहिले पाढे पंचावन...

In reply to by श्रीरंग_जोशी

अमेरिकेत इशान्येकडल्या राज्यांमध्ये सुटाबुटाचे फारच महत्व असते असे ऐकले आहे.
मी ईशान्येमध्येच काम करतो. हे आमचं फॉर्मल वेअर. http://www.timesunion.com/business/article/Nothing-nano-about-job-fair-…

In reply to by यशोधरा

बरेच दिवस नव्हते असेच दिसतेय बातमीवरून तरी. किमानपक्षी आय आय एम अहमदाबाद इथल्या प्लेसमेंट इंटरव्ह्यूपुरते बोलायचे झाले तर.

In reply to by बॅटमॅन

असे पहिल्यांदाच ऐकले. सर्व स्तरांवर काम करणार्‍या स्त्रिया फॉर्मल परिधान म्हणून साडी नेसताना पाहिल्या आहेत. असो.

In reply to by यशोधरा

सर्व स्तरांवर काम करणार्‍या स्त्रिया फॉर्मल परिधान म्हणून साडी नेसताना पाहिल्या आहेत. बाकी, चर्चेला चांगला विषय. धन्स. -दिलीप बिरुटे

In reply to by बॅटमॅन

पेप्सी च्या ceo इंदिरा (इंद्रा) नुयी यांनी अमेरिकेत म्यानेजमेंट ची डिग्री घेतल्यानंतर दिलेल्या पहिल्या नोकरीच्या interview मध्ये अमेरिकन पद्धतीचा फॉर्मल सूट घातला होता. त्यांची तेंह्वा निवड होऊ शकली नाही. त्यांच्या दुसर्या interview साठी त्यांच्या प्रोफेसर ने त्यांना साडी नेसायचा सल्ला दिला . या खेपेस त्यांची निवड झाली. आधार -अन्नपूर्णा यांनी लिहिलेले नुयी यांचे चरित्र.

In reply to by बॅटमॅन

बरेच दिवस नव्हते असेच दिसतेय बातमीवरून तरी. किमानपक्षी आय आय एम अहमदाबाद इथल्या प्लेसमेंट इंटरव्ह्यूपुरते बोलायचे झाले तर. ही बातमी बरीच दिशाभूल करणारी आहे असे वाटते.माझ्या माहितीत तरी साडीला आय.आय.एम अहमदाबादमध्ये आडकाठी कधीच नव्हती. मी तिथे २००९ ची आमची समर प्लेसमेन्ट,२०१० ची आमच्या सिनिअर बॅचची फायनल प्लेसमेन्ट, २०१० ची आमच्या ज्युनिअर बॅचची समर प्लेसमेन्ट आणि २०११ ची आमची फायनल प्लेसमेन्ट हे चार प्लेसमेन्ट सिझन बघितले आहेत.तिथे अगदी एकही मुलगी साडीत नव्हती.पण त्याचे कारण संस्थेची साडीला बंदी होती हे अजिबात नाही.पण इन जनरल नव्या पिढीतल्या मुलींना साडी आवडायचे प्रमाण कमी आहे असे वाटते.आणि कोणती मुलगी साडी नेसून तिथे आली असती तरी त्या कारणाने तिला परत नक्कीच पाठविले नसते.मला वाटते की साडी हा पण प्रोफेशनल वेशभूषेचा भाग आहे/असू शकतो याची आठवण करून द्यायला संस्थेने असे जाहिर केले असावे असे वाटते.

In reply to by श्रावण मोडक

क्लिंटन आणि अन्य लोकांनी दिलेल्या माहितीवरून चित्र स्पष्ट झाले. बातमी पूर्ण संदर्भ किंवा भूतकाळ नीट कथन करत नसल्याने मला तसे वाटले होते.

In reply to by बॅटमॅन

काय सांगता? पटवून घ्यावंच लागेल मला, तुम्ही म्हणताय म्हटल्यावर. शिवाय खाली
लोकांना उगीच काथ्या कुटायच्या कामाला बसवलंस तर!
या प्रतिसादावर तुम्ही
हांव हांव
म्हटल्यानं तर मान्य करावंच लागेल. पण... (आता अख्खी बातमीच जणू इथं पेस्ट करावी लागतीया)
The Indian ethnic wear has been recognised as a formal wear for business interviews held on the campus after a long hiatus, thanks to the efforts of the institute's first woman cultural representative in 52 years — Priyanshi Mathur.
हे वाक्यकाही वेगळंच सुचवतं का हो? विशेषतः मी आत्ता ठळक केलेले शब्द?
Mathur asked the placement committee to recognise sari as formalwear and got the nod.
हे आणखी एक वाक्य. ठळक शब्द माझेच हं...
While Mathur wasn't available for a comment, a student from her batch said, "Business suits were not compulsory for women in the last few years, but recommended by the institute to have a uniform dress code. Suits also met global trends. But I am not sure how many will wear it for interviews."
हेही वाक्य बातमीतलंच. ठळक आणि तिरपे ठसे माझेच हं... पण असोच. तुम्ही म्हणताय म्हणजे बातमी पूर्ण खरी नाहीच.
Professor Kirti Sharda, chairperson of the placements committee said, "We ask students to come in business formals for interviews. What they consider formal is up to them."
पुन्हा शब्द बातमीतलेच. जाड ठसा माझा.
Nayan Parikh, president of IIM-A Alumni Association, Ahmedabad chapter, believes the sari is the best way of showing global companies that these are Indian women managers.
ओह्ह... हेही वाक्य बातमीतलंच. ठळक शब्द माझा. जो आत्तापर्यंत मला कळलेला नव्हता. ग्लोबल ट्रेंड्स वगैरे इंडियन झाले की राव... मीच विसरलो.
Beena Handa, an IIM-A alumnus of the 1974 batch and vice-president, Claris Lifesciences, feels that appropriateness matters over dressing Indian or western. "Almost 40 years ago, the typical image of a professional woman manager was a plain sari with a thick border. Over time, both the sari and the business suit have gained acceptance for women. A sari gives a woman grace and adds maturity to her persona. But we need to have a flexible view of the dress code now, keeping the job profile and culture of the organisation in mind," Handa said.
आमची नजरच वाईट. नको तेच पाहते... चालायचंच. आयआयएम, आयआयटी वगैरे आयआय असलेले शब्द... झेपतच नाहीत हो... मी आणखी एक काम केलं. या बातमीचा काही इन्कार आयआयएम (बरोबर ना?) अहमदाबादनं केलाय का हे पाहिलं. तो तर दिसला नाही. प्लीssssssज, कोणी तरी मला दाखवा तो... म्हणजे या आयआय मधल्या एका तरी आयवर मला नीट विश्वास ठेवण्यासाठी एक (एकमेव नव्हे) आधार मिळेल... प्लीssssssज...

In reply to by श्रावण मोडक

ओक्के. प्रतिसाद मला उद्देशून असला तरी मी याचे उत्तर देण्यास असमर्थ आहे. बातमीला मी प्रमाण मानले, तर बाकीच्यांनी त्यात काही चुका आहेत असे दाखवले. चुका दाखवणारे प्रत्यक्षदर्शी असल्याने मी त्यांना दुजोरा देणार हेही साहजिकच. त्यात परत अजून नवीन माहिती कळाली तर अपडेटही करेन. विशेष ते काय? हांव हांव वगैरे मजेत म्हणालो होतो.

In reply to by बॅटमॅन

प्रतिसाद मला उद्देशून असला तरी मी याचे उत्तर देण्यास असमर्थ आहे. बातमीला मी प्रमाण मानले, तर बाकीच्यांनी त्यात काही चुका आहेत असे दाखवले. चुका दाखवणारे प्रत्यक्षदर्शी असल्याने मी त्यांना दुजोरा देणार हेही साहजिकच.
जाऊ दे रे.एक तर मिडियावाले आय.आय.एम विषयीची बातमी अगदी चवीने छापतात मग ती बरोबर आहे की नाही वगैरे विचार करायची गरज त्यांना वाटत नाही.आमच्या बॅचमध्ये डॉएश बँकेने एका विद्यार्थ्याला दीड कोटीचे पॅकेज दिल्याची बातमी अशीच मीठ मसाला लावून या मिडियावाल्यांनी छापली होती.आणि दुसरे इथले काही लोक त्यावर उगीचच चर्वितचर्वण करत असतात. असल्यांना आय.आय.एम वर विश्वास असला काय आणि नसला काय त्याचा *ट कोणाला फरक पडत नाही.आणि असल्यांकडून सर्टिफिकिटे घ्यायची किंवा त्यांच्या मताची दखल घ्यायचीही मलातरी कसलीही गरज वाटत नाही. बाकी माझ्या संस्थेचे नाव या चर्चेत आले आणि बॅटमॅन उगीचच मॅलिशिअस हेतूने ते देणार नाही याची खात्री आहे म्हणून मी तिथे बघितलेली परिस्थिती सांगितली. बाकी माझ्यावर, माझ्या संस्थेवर, तिथल्या प्राध्यापकांवर इतर कोणीही काहीही बरळले तरी त्याची दखल घ्यायची गरज मला तरी वाटत नाही.किंबहुना असले लोक असले आणि नसले तरी व्यक्तिशः माझ्यात काहीही फरक पडत नाही.तेव्हा माझ्यासाठी हा विषय संपला आहे.

In reply to by क्लिंटन

सब्बी वड्डे लोगोंको सलामालेकुम! काय्कु झगडा कर रहेले? जाना देव. सालों हो गए 'उस' किस्से को यारो! वोहीच डाली पकडके बैठोगे तो आगे का डाली कैसे पकडोगे? उधरीच रुकके झिंदगी चल्ती क्या मियां? मिट्टी डाल देव ना!

In reply to by क्लिंटन

झा की शा?

In reply to by बॅटमॅन

ओक्के. प्रतिसाद मला उद्देशून असला तरी मी याचे उत्तर देण्यास असमर्थ आहे.
हे बरं नाही राव... तुम्ही बातमीचा दुवा दिलात. तो मी वाचला, चर्चा वाचली. मग प्रश्न केले. आता तुम्ही असमर्थ म्हणजे... असो...
बातमीला मी प्रमाण मानले, तर बाकीच्यांनी त्यात काही चुका आहेत असे दाखवले.
कुणी, कुणी? मला तर वर कुठंही दिसलं नाही राव. जरा दुवे द्या, आणि दिल्याबद्दल दुवाही घ्या...
चुका दाखवणारे प्रत्यक्षदर्शी असल्याने मी त्यांना दुजोरा देणार हेही साहजिकच.
नक्की? २०१२, २०११, २०१० ते पुन्हा २०१२. आत्ता आपण २०१३ मध्ये आहोत.
त्यात परत अजून नवीन माहिती कळाली तर अपडेटही करेन. विशेष ते काय? हांव हांव वगैरे मजेत म्हणालो होतो.
ह्यात्तेरीकी... मी म्हटलं ना, मला कळतच नाही... पण चालायचंच.... आयआयएम... काण्ट हेल्प...

In reply to by श्रावण मोडक

वर पहिल्या मुद्द्यावरच्या कमेंटमध्ये शेवटी 'असो...' असा शब्द आहे, त्याचा अर्थ आयआयएम प्रश्नांची उत्तरे देत नसते, असा घ्यावा. बॅटमन उत्तरं देताहेत का हे पाहू...

"फॉर्मल ड्रेस" ही संकल्पना आपण पाश्चात्यांकडून उचललेली आहे. पश्चिम युरोपात ट्रेडीशनल कपड्यांना फॉर्मल समजलं जातं. टीशर्ट, जीन्स हे आणि असे आधुनिक कपडे इनफॉर्मल. (या हिशोबाने स्त्रियांनी ट्राऊजर्स* घालणंही इनफॉर्मल होतं. पण तिथे वेगळी परिमाणं वापरावी लागतात. त्याबद्दल अन्यत्र, कधी जमल्यास लिहेन.) अमेरिका हे एकूणच आधुनिक कडबोडं असल्यामुळे तिथल्या पारंपरिक म्हणवल्या जाणार्‍या कल्पना, संकल्पना या आधुनिकच म्हणाव्या लागतात; पण आपल्याकडे अमेरिका करते ते प्रमाण मग त्याची नक्कल किंवा त्याला विरोध हे योग्य असं मानणार्‍यांची बहुसंख्या दिसते. भारताच्या संदर्भात हीच व्याख्या वापरली तर स्त्रियांसाठी साडी, पंजाबी ड्रेस, हाफ सारी इ. सगळ्या गोष्टी फॉर्मल होतात. मराठी स्त्रियांनी नऊवारीच नेसावी का पंजाबी ड्रेसही मराठी मुलींसाठी फॉर्मल समजावा इतपत बारकाव्यांचा विचार मी केलेला नाही. करण्याची वेळ आलेली नाही. त्याच हिशोबात पुरुषांनी धोतर, सुरवार, झब्बा (कुडता हा शब्द, साडी या शब्दाप्रमाणे मराठीत हिंदीतून आयात केलेला असावा), कोल्हापुरी वहाणा वगैरे फॉर्मल समजता याव्यात. पण स्त्रियांनी काय ती (भारतीय) संस्कृती जपावी आणि पुरुषांनी काहीही शेण खाल्लं तरी चालतं अशा अर्थाचे वेगवेगळे पदर असणार्‍या, बहुसंख्य समाजाला मान्य असणार्‍या समजापोटी, पुरुषांचे फॉर्मल कपडे म्हणजे पाश्चात्यांचे ट्रेडीशनल कपडे असा समज भारतात बोकाळलेला असू शकतो. आता हे ग्राह्य का अग्राह्य हे ठरवण्याचा अधिकार माझ्याकडे नाही. मुळात फॉर्मल, पोशाखीपणाचीच चीड असल्यामुळे मला त्यात फार रसही नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्याच हिशोबात पुरुषांनी धोतर, सुरवार, झब्बा (कुडता हा शब्द, साडी या शब्दाप्रमाणे मराठीत हिंदीतून आयात केलेला असावा), कोल्हापुरी वहाणा वगैरे फॉर्मल समजता याव्यात. पण स्त्रियांनी काय ती (भारतीय) संस्कृती जपावी आणि पुरुषांनी काहीही शेण खाल्लं तरी चालतं अशा अर्थाचे वेगवेगळे पदर असणार्‍या, बहुसंख्य समाजाला मान्य असणार्‍या समजापोटी, पुरुषांचे फॉर्मल कपडे म्हणजे पाश्चात्यांचे ट्रेडीशनल कपडे असा समज भारतात बोकाळलेला असू शकतो. आता हे ग्राह्य का अग्राह्य हे ठरवण्याचा अधिकार माझ्याकडे नाही. मुळात फॉर्मल, पोशाखीपणाचीच चीड असल्यामुळे मला त्यात फार रसही नाही.
पूर्ण सहमत. धन्यवाद.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वरचा प्रतिसाद अश्लील (vulgar) वाटू शकतो याची कल्पना आहे. vulgar [vuhl-ger] adjective 1. characterized by ignorance of or lack of good breeding or taste: vulgar ostentation.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पण स्त्रियांनी काय ती (भारतीय) संस्कृती जपावी आणि पुरुषांनी काहीही शेण खाल्लं तरी चालतं अशा अर्थाचे वेगवेगळे पदर असणार्‍या
प्रस्तुत विषयासंदर्भात वरील शब्दरचना टाळता आली असती असे माझे मत आहे. आता हे ग्राह्य का अग्राह्य हे ठरवण्याचा अधिकार माझ्याकडे नाहीच नाही; पण मुळात वडाला पिंपळाची साल लावायच्या सवयीचीच चीड असल्याने मला त्यात फार रसही नाही. अन्या

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

उद्धृत विधान अश्लील आहे असे कुठेही म्हणालो नाहीये, फक्त त्याची गरज नव्हती इतकेच सांगण्याचा प्रतिसादाचा उद्देश होता.
स्पष्ट करण्याची इच्छा आहे, वेळ होईल तसं लिहेन.
धागा हायजॅक व्हायची दाट शक्यता असल्याने न लिहिल्यास उत्तम! बाकी आपली मर्जी.

In reply to by अन्या दातार

प्रस्तुत विषयासंदर्भात वरील शब्दरचना टाळता आली असती असे माझे मत आहे.
+१.
पण मुळात वडाला पिंपळाची साल लावायच्या सवयीचीच चीड असल्याने मला त्यात फार रसही नाही.
+१. या चर्चाप्रस्तावात ऑफिसमधील फॉर्मल कपड्यांविषयीचा उल्लेख आहे तेव्हा त्यात भारतीय संस्कृती आणि "स्त्री-मुक्ती" हे उल्लेख अस्थानी वाटले.

In reply to by क्लिंटन

या चर्चाप्रस्तावात ऑफिसमधील फॉर्मल कपड्यांविषयीचा उल्लेख आहे तेव्हा त्यात भारतीय संस्कृती आणि "स्त्री-मुक्ती" हे उल्लेख अस्थानी वाटले.
-१००००००००००० सदर विषय हा विश्व व्यापून दशांगुळे उरला आहे याची तुम्हाला कल्पना नसावी... सदर विषयावरील बायबल* वाचा म्हणजे डोळे उघडतील. * चाणाक्ष वाचकांना या पुस्तकाचे नाव माहित असेलच. इतरांनी व्यनि करावा.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>>> स्त्रियांनी काय ती (भारतीय) संस्कृती जपावी आणि पुरुषांनी काहीही शेण खाल्लं तरी चालतं प्रतिसादात स्त्री- पुरुष, संस्कृती, भेदभाव नक्कीच असेल अशी कल्पना केलीच होती. प्रतिसाद वाचून खात्री आणि हहपुवा झाली. =)) =)) =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसादात स्त्री- पुरुष, संस्कृती, भेदभाव नक्कीच असेल अशी कल्पना केलीच होती. प्रतिसाद वाचून खात्री आणि हहपुवा झाली. हॅहॅहॅ... ;)

In reply to by मदनबाण

मोबाईलवरुन बर्‍याच प्रतिक्रिया दिसल्या होत्या! इकडे दिसत नाहीत (डेस्क्टापावरुन) असं काय झालं नेमकं? ;)

In reply to by प्यारे१

प्यारेभाव सत्त्या पल्डा नं काय ह्ये मपलायबी. रातच्याल्या मोबायलात,डोळ्यावं झापाड येत आसतानिच वाच्ल्या व्हत्या. म्हंगालं रामाच्या पार्‍ही उजूक बईजवार वाचीन समदं.. पर आज तं समदं डव्हात बुल्डं नं काय ह्ये.

जिथे टेम्परवारी आहे तिथं लुंगी गुंडाळून गेलो तरी चालतंय. पुढे जिथं जायचंय तिकडे ड्रेस कोड सोडा राव, युनिफॉर्म आहे. श्या !!!!!! जिथं कस्टमरशी डायरेक्ट संबंध येत नाही मंजे बॅंका वगैरे मधले जॉब सोडले तर इतर ठिकाणी ड्रेस कोडची काही गरज नाही वाटतं. दोस्ताच्या हापिसात थ्री फोर्थ घालून आलं तरी चालायचं. लोकं स्लीपर ( :) ) वगैरेवर यायला लागल्यानंतर त्यांनी बिझनेस कॅज्युअलच्या नवा खाली काय चालतं याची यादी दिली म्हणे..

साडी, पंजाबी कपडे, शर्ट पँट (स्त्रीयांनी) यापैकी काहीही चालावे असे वाटते. जिला जे सोयिस्कर असेल, परवडत असेल, आवडत असेल ते! तसेच पुरुषांनाही शर्ट पॅंट, कुर्ता सलवार (किंवा जे काय म्हणत असतील ते) घालावयास हरकत नसावी. आता साडी म्हटल्यावर उगीच भरजरी नेसू नये तसेच पुरुषांनीही कुर्ता चालतोय म्हणून मणी, खडे लावलेले (लग्नातल्यसारखे) घालू नये. याशिवाय नको त्या भागाचे प्रदर्शन मांडणारे कपडे नकोत (हापिसात म्हणतीये, बाहेर काय करायचे ते करा). १. वेस्टर्न कपडे जर भारतात सर्रास वापरले जातात (मान्य केले जातात्)तर त्याचा प्रभाव आहे असे म्हणावे लागेल पण चांगल्या अर्थी. (आम्हीही स्पघेटी टॉप घातलेल्या मुली नेहमी बघतो किंवा मिनीज घालून मुली नेहमी दिसतात ही विधाने येथे ग्राह्य धरलेली नाही, हापिसबद्दल बोलणे चालले आहे म्हणून). २.माझ्यामते फॉर्मल कपडे हे अंग झाकणारे (उगीच जीव घुसमटवणारे नकोत्)असावेत (दोघांसाठीही). कामाच्या स्वरूपावर कपडे घालण्याची पद्धत बदलत जावी तशी ऋतूमानानुसार व देशानुसारही. कंपनीच्या महत्वाच्या बैठका, ज्यात बाहेरदेशातील व्यक्ती सामील आहेत अश्यावेळी त्याप्रकारचे कपडे, तर इतर वेळी सोमवार ते गुरुवारचा पेहराव व शुक्रवारचा पेहराव यातील फरक याबद्दल श्रीरंगपंत जे म्हणतायत ते बरेचदा असते. ते त्रासदायक नाही वाटत. बायकांचा फॉर्मल ड्रेस हापिसात शर्ट व पँट असावयास (तसेच भारतात पंजाबी कपडे) हरकत नसावी व शुक्रवारी आवडत असल्यास साडी किंवा अंग झाकणारे हवे ते कपडे. खरा वैताग तेंव्हा येतो जेंव्हा बाहेरदेशातील लोक हापिसात बैठकीस आल्यावर स्वागत म्हणून साडी नेसलेल्या बायकांनी ओवाळणे टाईप करतात तेंव्हा.

In reply to by रेवती

खरा वैताग तेंव्हा येतो जेंव्हा बाहेरदेशातील लोक हापिसात बैठकीस आल्यावर स्वागत म्हणून साडी नेसलेल्या बायकांनी ओवाळणे टाईप करतात तेंव्हा.
यास सहमत व यावरून आठवले. माझ्या पहिल्या कंपनीच्या एका कस्टमरचे लोक भेट द्यायला म्हणून आले होते तेव्हा संध्याकाळी पौडरोडवरच्या गार्डन कोर्ट नामक रिसॉर्टवर जंगी पार्टी होती (मी नेमका त्या अकौंटसाठी काम करत नव्हतो म्हणून प्रत्यक्ष उपस्थित). तर कस्टमरच्या काही मंडळींना तिथे उंट व घोड्यावरून मिरवत आणले गेले होते (त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली होती म्हणे). त्या कंपनीत कुठलिही कस्टमर व्हिजीट असली की सर्वच कर्मचार्‍यांना व्यवस्थित कपडे घालून या. डेस्कला नीट नेटके आवरून ठेवा, उगाच नेट ब्राउझिंग करत बसू नका, सकाळी आठच्या आत हापिसात पोचा असल्या सूचना असायच्या. त्याखेरीज काही वर्षांपूर्वी एक ढकलपत्र फिरत होते. त्यात भारताच्या सर्वात मोठ्या मा.त्. कंपनीचा एक व्यवस्थापक मुंबईत भाड्याने काही तासांसाठी हत्ती कुठे मिळेल या माहितीची काकुळतेने याचना करत होता. कारण तेच कस्टमर व्हिजिट.

In reply to by श्रीरंग_जोशी

मुंबईत भाड्याने काही तासांसाठी हत्ती कुठे मिळेल या माहितीची काकुळतेने याचना करत होता. काय रे बाबा! कठीण आहे!

बूट घालणे बोअर होते ज्याम. भारतात तरी चपला वापरता यायला हव्यात. बाकी हापिसात कुठलेही कपडे घातले तरी त्यानी काय फरक पडतो हे मला आजपर्यन्त कळले नाहीये.

In reply to by रेवती

लक्ष विचलित होणारच! सगळ्यांचच एकमेकांच्या कपड्यांकडे लक्ष असतं. समज आपण दोघी एकाच हापिसात आहोत आणि मी उद्या नवीन साडी नेसून आले, तर तू काम सोडून माझ्याजवळ येउन विचारशीलच ना, 'माहेरुन कोणी आले का गं? नवीन साडी?' इ.इ. =))

आमच्यात तसलं काय नसतंय रे बॅट्या. ;)

१. फॉर्मल ड्रेस या कल्पनेबद्दल आपल्याला काय वाटते? ऑफिसात येड्यागत काहीतरी घालून येऊ नये हे मान्य पण सूट-बूट यांचा सरसकट आग्रह कितपत ग्राह्य? वेस्टर्न संकल्पनेचा गरजेपेक्षा जास्त प्रभाव आहे असे वाटते का?
फॉर्मल ड्रेस हा खुळच्याटपणाचा कळस आहे. आमच्या हपीसात कंठलंगोट सक्तीचा होता. शुक्रवारी क्लायंटांना भेटायचं नसेल तर कॉलरवाला टीशर्ट आणि कॉटनची विजार चालायची. पण जीन्स नाही म्हंजे नाही! आमची कुंपणी जागतिक असल्याने यावर कोणाचाच इलाज चालायचा नाही.
२. फॉर्मल ड्रेसची पुरुषांवरच सक्ती का? स्त्रियांचा फॉर्मल ड्रेस म्हंजे नक्की काय याची कोणी व्याख्या केली आहे का? असल्यास लिंक इ. द्यावी अशी विनंती. नसल्यास का नाही?
"स्त्रियांचा फॉर्मल ड्रेस" म्हणजे नक्की काय - यावर आमच्या कुंपणीच्या "मानव संसाधन पोथी"त चांगला पानभर मजकूर होता. (मर्दांच्या फॉर्मल ड्रेसवर मात्र दोनच परिच्छेद!) त्यात पाश्चात्य वेषाबरोबर पंजाबी ड्रेस आणि साडी सुद्धा गणली जायची. हातातली, कानातली, गळ्यातली आभूषणं कशी नसावीत यावर बराच उहापोह होता. (नाकातली आभूषणं वापरायला सक्त मनाई होती!) स्कर्टाची लांबी वगैरे उल्लेख सुद्धा होते! -- थोडं अवांतरः या **पणाचा मला भयंकर तिटकारा येतो. त्यावरची माझी मतं मी बर्‍याचदा जाहीर (आणि मोठ्या आवाजात) व्यक्त करायचो म्हणून लोकांनी मला "युनियन लीडर" असं टोपणनाव दिलं होतं. एका वाढदिवसाला सगळ्यांनी मिळून मला लाल रंगाचा टाय भेट दिला होता. (बॉक्सवर "लाल सलाम" असं लिहिलं होतं.) पोथीनिष्ठ मानव संसाधन्यांच्या ससेमिरातून सुटण्यासाठी मी बर्‍याच लटपटी करून पाहिल्या. उदा. कोटाऐवजी नेहरू जाकीट वापरणे वगैरे. पण एकदा मानव संसाधन्यांच्या टोळीप्रमुखाचं प्रेमपत्र आल्यावर कामगार चळवळ बंद पडली! आयकर अपीलीय अधिकरणाने कायद्यात रीतसर पोशाखसंहिता लिहिली आहे. ती कटाक्षाने पाळली जाते. एकदा कोर्टाशी बोलताना मी कोट घातला नव्हता (आणला होता, पण उकडत होतं म्हणून खुर्चीच्या पाठीला लावला होता) म्हणून मला चांगलंच झाडलं होतं. त्या पोशाखसंहितेत धोतर-बंद गळ्याचा कोट असाही वेष चालतो. पण मी तरी आजपर्यंत असा वेष केलेला इसम अधिकरणात पाहिला नाही.

In reply to by आदूबाळ

मानव संसाधन्यांच्या टोळीप्रमुख
हा हा हा हा हा.....!! एकचं नंबर... एच.आर. मॅनेजर ह्या अत्यंत तापदायक व्यक्तीला मस्त शब्द वापरलाय. (सगळे नसतात तापदायक, उगीच इथला एखादा निघायचा एच.आर.मॅनेजर आणि "नेहेमीच्या सवयीनी" यायचा शिंग रोखुन ;). )

@अदिती: सहमत आहे. कारण काय असेल ही उत्सुकता आहे. @रेवती: संतुलित प्रतिसाद. @लीमाउजेटः प्रचंड सहमत. @अभ्या: भाग्यवान आहेस लेका. :)

In reply to by चावटमेला

अंगावर न येणारे कपडे अंगावर घालून ऑफिसला जावे
नक्कीच. मला स्वतःला बोल्ड (उठून दिसणारे अथवा एक फॅशन स्टेटमेंट करणारे) दागीने अतिशय आवडतात पण तारतम्य राखून मी सोबर कपड्यांवर एखादा बोल्ड पीस व उठून दिसणार्‍या कपड्यांवर नाजूक मोती वगैरे असे कॉम्बिनेशन करते. तसेच डोळे व ओठ दोन्ही जर उठावदार केले तर अति होते. वन शूड प्ले डाऊन वन ऑफ देम. डोळे जर उथावदार केले तर न्यूड्/लाईट लिप्स्टीक व जर ओठ उठावदार केले तर डोळे कमी उठावदार असा काहीसा बॅलन्स (संतुलन) करावे लागते. बाकी कितीही सोबर पेहराव करुन तुम्ही खिदळत, मुरकत बोलाल तर ते मूर्खासारखेच दिसेल. म्हणायचा मुद्दा हा की अतिशय सोबर व "नो नोन्सेन्स" ऑरा परीधान करणेही तितकेच महत्वाचे.

१. फॉर्मल ड्रेस या कल्पनेबद्दल आपल्याला काय वाटते? ऑफिसात येड्यागत काहीतरी घालून येऊ नये हे मान्य पण सूट-बूट यांचा सरसकट आग्रह कितपत ग्राह्य? वेस्टर्न संकल्पनेचा गरजेपेक्षा जास्त प्रभाव आहे असे वाटते का?
फॉर्मल ड्रेस हा खुळच्याटपणाचा कळस आहे. आमच्या हपीसात कंठलंगोट सक्तीचा होता. शुक्रवारी क्लायंटांना भेटायचं नसेल तर कॉलरवाला टीशर्ट आणि कॉटनची विजार चालायची. पण जीन्स नाही म्हंजे नाही! आमची कुंपणी जागतिक असल्याने यावर कोणाचाच इलाज चालायचा नाही.
२. फॉर्मल ड्रेसची पुरुषांवरच सक्ती का? स्त्रियांचा फॉर्मल ड्रेस म्हंजे नक्की काय याची कोणी व्याख्या केली आहे का? असल्यास लिंक इ. द्यावी अशी विनंती. नसल्यास का नाही?
"स्त्रियांचा फॉर्मल ड्रेस" म्हणजे नक्की काय - यावर आमच्या कुंपणीच्या "मानव संसाधन पोथी"त चांगला पानभर मजकूर होता. (मर्दांच्या फॉर्मल ड्रेसवर मात्र दोनच परिच्छेद!) त्यात पाश्चात्य वेषाबरोबर पंजाबी ड्रेस आणि साडी सुद्धा गणली जायची. हातातली, कानातली, गळ्यातली आभूषणं कशी नसावीत यावर बराच उहापोह होता. (नाकातली आभूषणं वापरायला सक्त मनाई होती!) स्कर्टाची लांबी वगैरे उल्लेख सुद्धा होते! थोडं अवांतरः या **पणाचा मला भयंकर तिटकारा येतो. त्यावरची माझी मतं मी बर्‍याचदा जाहीर (आणि मोठ्या आवाजात) व्यक्त करायचो म्हणून लोकांनी मला "युनियन लीडर" असं टोपणनाव दिलं होतं. एका वाढदिवसाला सगळ्यांनी मिळून मला लाल रंगाचा टाय भेट दिला होता. (बॉक्सवर "लाल सलाम" असं लिहिलं होतं.) पोथीनिष्ठ मानव संसाधन्यांच्या ससेमिरातून सुटण्यासाठी मी बर्‍याच लटपटी करून पाहिल्या. उदा. कोटाऐवजी नेहरू जाकीट वापरणे वगैरे. पण एकदा मानव संसाधन्यांच्या टोळीप्रमुखाचं प्रेमपत्र आल्यावर कामगार चळवळ बंद पडली! आयकर अपीलीय अधिकरणाने कायद्यात रीतसर पोशाखसंहिता लिहिली आहे. ती कटाक्षाने पाळली जाते. एकदा कोर्टाशी बोलताना मी कोट घातला नव्हता (आणला होता, पण उकडत होतं म्हणून खुर्चीच्या पाठीला लावला होता) म्हणून मला चांगलंच झाडलं होतं. त्या पोशाखसंहितेत धोतर-बंद गळ्याचा कोट असाही वेष चालतो. पण मी तरी आजपर्यंत असा वेष केलेला इसम अधिकरणात पाहिला नाही.

In reply to by आदूबाळ

पोथीनिष्ठ मानव संसाधन्यांच्या ससेमिरातून सुटण्यासाठी मी बर्‍याच लटपटी करून पाहिल्या. उदा. कोटाऐवजी नेहरू जाकीट वापरणे वगैरे. पण एकदा मानव संसाधन्यांच्या टोळीप्रमुखाचं प्रेमपत्र आल्यावर कामगार चळवळ बंद पडली!
हे असले पोथीनिष्ठ मूर्खागमनी ज्यामच डोक्यात जातात. आणि **पुढे आपला इलाजही नसतो :(
आयकर अपीलीय अधिकरणाने कायद्यात रीतसर पोशाखसंहिता लिहिली आहे. ती कटाक्षाने पाळली जाते. एकदा कोर्टाशी बोलताना मी कोट घातला नव्हता (आणला होता, पण उकडत होतं म्हणून खुर्चीच्या पाठीला लावला होता) म्हणून मला चांगलंच झाडलं होतं. त्या पोशाखसंहितेत धोतर-बंद गळ्याचा कोट असाही वेष चालतो. पण मी तरी आजपर्यंत असा वेष केलेला इसम अधिकरणात पाहिला नाही.
म्हंजे कुठल्या कोर्टात म्हणे? आणि धोतर चालत असेल तर कटाक्षाने तसेच जाऊन एकदा खोड मोडायला चांगली मजा येईल.
फॉर्मल ड्रेस हा खुळच्याटपणाचा कळस आहे.
या सारांशाशी बर्‍याच अंशी सहमत!!!

In reply to by बॅटमॅन

माझे आजोबा वकील होते. ते नेहमी धोतरच नेसायचे. आणि ट्रॅडिशनल ड्रेस म्हटलञ ना? मग तू पण बिनधास्त जा आणि वाद घाल की!

In reply to by आदूबाळ

पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टात एक वृद्धसे वकील धोतर नेसून येत हे बर्‍याचदा पाहिले होते. जुनी गोष्ट आहे अर्थात.