Skip to main content

आंतरजालीय शिमगा : बोंबलु नका रे ऽऽऽ ...!!! भाग-२

लेखक छोटा डॉन यांनी बुधवार, 11/03/2009 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
फास्टेस्ट हाफसेंच्युरी मारत रेकार्ड ब्रेक करणार्‍या आंतरजालीय शिमगा : बोंबलु नका रे ऽऽऽ ...!!! ह्या धाग्याचा हा दुसरा भाग ... मुळ धाग्यात प्रतिसादांची संख्या "५० + " झाल्याने तो वाचण्यास त्रास होत आहे. सबब नवे लेखन ह्या धाग्यावर करावे ही विनंती. जो असे करणार नाही त्याच्या बैलाला ऑलरेडी हो ऽऽऽऽ ह्या ही धाग्याची तीच हालत झाल्यास "भाग-३" परस्पर चालु करावा, माझी वाट पाहु नये. आमची वाट पाहणार्‍याच्या बैलाला हो ऽऽऽ * डिस्क्लेमर : १. सर्व लिखाण केवळ मौजमज्जा व टाईमपास म्हणुन घ्यावे, ह्या निमीताने कुणाशी भांडण काढुन हाताची खाज मिटवु नये. २. व्यक्तीगत आरोप करु"च" नयेत ... ३. सर्वांनीच हलकेच घेऊन फक्त आनंद लुटावा, न आवडल्यास तसे स्पष्त सांगावे, अशी जास्त मते आल्यास मी स्वतःच हे लिखाण इथुन उडवुन लावीन ... मारा मग बोंबा तिच्यायला ...!!! लेट्स फन कंटिन्युज ...!!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 27994
प्रतिक्रिया 93

प्रतिक्रिया

१५ मिनटात ५० प्रतिसाद खेचणार्‍या डान्याच्या बैलाला..............

In reply to by सहज

कंपुबाजी करुन झाल्याने व लिहायला काही न उरल्याने दुसरा भाग तसाच सोडणार्‍या सर्व लेखकांच्या.......................................... छानसे वाचलेले विनायक पाचलग

धाग्यावर धागे टाकुन मिपाकरंचा गळा आवळणारया लेखकांच्या बैलाला भोऽऽऽऽ

होळीचा पक्क्का रंग लाउन कायम आमचीच लाल म्हणणार्‍या उणेकरांच्या बैलाला होऽऽऽऽ

In reply to by कुंदन

उणेकर की ठाणेकर ? ;) आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी

अवजड टोमणे मारुन "ह.घ्या." म्हणनारयाच्या बैलाला भोऽऽऽऽ

सर्व संस्थळ चालकांच्या बैलाचा घो...! नादान, स्त्रीलंपट तात्या अभ्यंकराच्या नानाची टांग, आबाचा ढोल अन् त्याच्या बैलाचा घो..! :) शिमगा चालू द्या...! :) आपला, (शिमगाप्रेमी) तात्या.

मिपावर येउन सगळा लेख न वाचता लगेच प्रतिक्रिया देणार्‍याच्या बैलाला हो ऽऽऽऽ सम्द्याना होळिच्या शुभेच्या !!! सचिन

हे खास मागणी वरुन प्रेषक : कुंदन, बुध, 03/11/2009 - 14:09 राम राम नाना.... शिमग्याच्या धाग्यावर आम्हा अनिवासींची आठवण न काढल्याबद्दल तुमचा निषेध !!!! सर्व अनिवासी भारतीयांच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽ वाळवंटातील उंटावरच्या शहाण्यांच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽ आणि हो, कुंदनच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ --अवलिया

In reply to by अवलिया

कुंदनच्या उंटालापण होऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ कुंदनच्या मॅनेजरच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

ल्टी किंकुंदनच्या बैलाला हो.... आबाचा ढोल.... नानाची टांग.... ऑबॉबॉबॉबॉ बिपिन कार्यकर्ते

लेखाचा रतीब घालणार्‍या सामंताच्या बैलाच्या नावानी भोऽऽऽऽऽऽ - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

कंपुबाजी मुळे वाचलेल्या च्या बैलाला ऽऽ प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

मायला, काकाच्या नावाची राहिलीच की... ही घ्या काकाच्या नावाने... *&*&$#$&%(*) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सहमत :) --अवलिया

आमच्या गाववाल्याला कंपुबाज म्हणणार्‍यांच्या बैलाला ऽऽऽऽऽऽ - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

उठसुठ मंदिची भीती दाखवणार्‍या नानाच्या बैलाला ऽऽऽऽऽऽ ---"आमच्यात पैसे मिळवण्यासाठी भाग्यांकाची वाट बघत नाहित."

बाप्पाला स्वेटर घातल्यामुळे ज्याच्यां ज्याच्यां पोटात "कळ" येते त्यांच्या बैलाला ऽऽऽऽऽऽ मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

In reply to by मदनबाण

बाप्पांना "स्वेटर" घालुन स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी लोकांना "टोप्या" घालणार्‍यांच्या बैलाला ऽऽऽऽऽऽ ------ ( स्वेटरफेम ) छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

=)) =)) लै भारी हो डानराव. टोपिवाल्यांच्या नावाने ... अदिती आमच्यात बोंब मारण्यासाठी शिमग्याची वाट पहात नाहीत.

कंपूबाजांच्या नावाने शिमगा करणार्‍या बिनकंपूवाल्या लोकांच्या बैलालाऽऽऽऽऽऽऽ

In reply to by घाटावरचे भट

भटा.. आरं, बिनकंपूचे आसं नाय म्हनायचं... फलाटवरचे आसं म्हनायचं... आरं फलाटावरच्या लोकांनाबी डब्यात यायचि इच्चा आसते रे... फलाटावर आसतात तंवर बोंबलतात आन यकदा डब्यात घुसले की मंग हेच आतून दरूजा घट दाबून धरत्यात... ;) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बरुबर हाय....डब्यात येईपतुर त्ये 'आमचा सोताचा येकल्याचा कंपू' म्हून चार्टर गाड्या चालवतात, त्ये बी फलाटावरनंच...

In reply to by घाटावरचे भट

फलाटावरून गाडी!!!! बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

काय चाललेय रे कंपिष्टांनो!!! --अवलिया

In reply to by अवलिया

अरे कंपिष्टांनो काय चालु आहे ? दगडं खायचीत का पाध्येंकडुन ? आणि हो, त्या निमीत्ताने ... जाऊ द्या नंतर कधीतरी. ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

आणि हो, त्या निमीत्ताने ... जाऊ द्या नंतर कधीतरी. आणि हो, त्या निमीत्ताने ... तुला पाध्येंच्या नावाने मारायची आहे का रे बोंब? अरे मग घाबरतोस काय? आज होळी आहे ना? मार खच्चून... ही घे... पाध्येंच्या बैलाला............... ;) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

आम्हाला "जेवुन आलो" असे सांगुन कल्टी मारणार्‍या व आता पाध्यांचे नाव निघाल्याबरोबर धावत येऊन उष्ट्या हाताने प्रतिसाद टंकणार्‍या बिकांच्या बैलाला हो ऽऽऽऽऽ ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

"जेवून येतो" असा निरोप फक्त डॉन्याला देणार्‍या बिकाच्या बैलाला .... अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

In reply to by छोटा डॉन

आम्हाला "जेवुन आलो" असे सांगुन कल्टी मारणार्‍या व आता पाध्यांचे नाव निघाल्याबरोबर धावत येऊन उष्ट्या हाताने प्रतिसाद टंकणार्‍या बिकांच्या बैलाला हो
अबब .. तो शब्द बरोबर आहे ना रे भो ?

सगळ्या आंतरजालीय काकांच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽ - टिंग्या

In reply to by ब्रिटिश टिंग्या

वरातीमागुन आपले घोडे नाचवणार्‍या हलकट ब्रिटीश टिंग्याच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽ ------ छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

उगाचच चिडुन खव बंद करणा-यांच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ --अवलिया

In reply to by अवलिया

टिंग्याने खव माझ्यामुळेच उघडली असे वाटणार्‍या प्रत्येकाच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ

In reply to by ब्रिटिश टिंग्या

स्वतः 'लष्कर-ए-खरडा' उघडून स्वतःच ताटी बंद करणार्‍या टींग्याच्या बैलाला हो....... अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

In reply to by ब्रिटिश टिंग्या

टिंग्यानं खव बंद केल्ती ह्ये ठावं बी नसनार्‍यांच्या बैलान्लाऽऽऽऽऽऽ

In reply to by घाटावरचे भट

=)) --अवलिया

In reply to by घाटावरचे भट

हा आपल्या कंपुत आहे की नाही हे माहिती नसनार्‍यांच्या बैलान्लाऽऽऽऽऽऽ

In reply to by ब्रिटिश टिंग्या

आपल्या कंपूतली म्येंब्रं धड ठावकी नसनार्‍यांच्या अन तरीपन कंपूबाजीवं कविता करनार्‍यांच्या बैलान्लाऽऽऽऽऽऽऽऽ

In reply to by छोटा डॉन

शिमग्याच्या दिवशी लांबलचक लेख लिहुन स्वत:च्या बोटांची खाज शमवणार्‍या डान्याच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽ

फलाटावरच्या, डब्यातल्या आणि ठेसनाच्या बाहेर असलेल्या सर्वांच्या बैलाला घोऽऽऽऽऽऽऽ

अरे अजुन एक फार फार फार महत्वाची व्यक्ती राहुनच गेली मिपाचे विश्वकर्मा नीलकांतच्या बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ --अवलिया

समस्त मिपाकरांच्या बैलाला हो , नानाची टांग ,आबाचा खुळखुळा !!! समस्त मिपाकरांच्या बैलाला हो , नानाची टांग ,आबाचा खुळखुळा !!! समस्त मिपाकरांच्या बैलाला हो , नानाची टांग ,आबाचा खुळखुळा !!!

In reply to by मुक्तसुनीत

समस्त मिपाकरांच्या बैलाला हो , नानाची टांग आणी आबाचा खुळखुळा म्हणणार्‍याच्या बैलाला हो $$$$$$$$$$$$ समस्त मिपाकरांच्या बैलाला हो , नानाची टांग आणी आबाचा खुळखुळा म्हणणार्‍याच्या नानाची टांग समस्त मिपाकरांच्या बैलाला हो , नानाची टांग आणी आबाचा खुळखुळा म्हणणार्‍याच्या आबाचा खुळखुळा सुहास.. "व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे," "वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "

बैलाला होऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ म्हणजे काय ?? खरच नाही माहीत ... कोणी सांगेल का ?? यासगळ्यां मध्ये बैल कोण आहे ?? अन त्याला हो का म्हणायचे ?? :? How confusing ! :-(

In reply to by वाहीदा

या सगळ्यांमधे बैल कोणीच नाही... सगळ्यांचा बैल आहे... आणि हो म्हणजे काय माहित नाही... पण सगळे म्हणतात म्हणून म्हणायचं... विचारच नाही करायचा, मग कन्फ्यूज नाही होणार... बिपिन कार्यकर्ते

In reply to by वाहीदा

"बैल" हा एक प्राणी आहे.चराचर जगात ह्याच वास्तव्य असते.माझे तिर्थरूप सहसा मला ह्याच नावाने हाक मारतात. शेतकर्‍याकडे गाडी हाकण्यास तसेच ईतर कामासाठी ह्याचा वापर होतो. ह्या जनावराचे खाद्य खाऊन आणखी एक जनावर भारतात रेल्वे म॑त्री झाल आहे. हो म्हणजे होय म्हणणे,काहीजण सगळ्याच कामाला हो म्हणतात(positive attitude). हा हो जसा खो-खो खेळ्ताना "खो" उच्चारला जातो तसा "बैलाला हो"म्हणताना वापरायचा असतो.आणी असा (ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ)ला॑बवायचा असतो. बैलाला हो म्हणजे त्या काळी सर्वाकडे एकतरी बैल असायचा(आजकाल आपणच बैल झालो आहोत,ओझ्याचे) आणी त्यावरुन बहुधा ही शिवी(वर्षभराच्या उखाळ्या-पाखाळ्या काढण्यासाठी ) असावी. सुहास बैलोबा "व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे," "वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "

आयला . . सगळे जन येउन गेले की. च्यायला एवढी चढवायला नको होती. माझ्या ह्या बोंबा . . ऐन होळीच्या दिवशी आमच्या खांद्यावर प्रोजेक्ट चे ओझे देउन हवाईला मजा करायाला गेलेल्या मॅनेजर च्या बैलाला हो ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ समस्त मिपाकरांच्या बैलाला हो ऽऽऽऽऽऽऽऽऽ समस्त मिपाकरांच्या बैलाला हो ऽऽऽऽऽऽऽऽऽ समस्त मिपाकरांच्या बैलाला हो ऽऽऽऽऽऽऽऽऽ समस्त मिपाकरांच्या बैलाला हो ऽऽऽऽऽऽऽऽऽ सुक्या (बोंबील) सध्या आम्ही चंद्रावर आहोत.

बैलं थकली आता.. मला एक कळत नाही फक्त बैलच का? गाईंच काय? गाई झोपल्यात वाटतं मराठमोळा. काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नाच्यापधिष्टति!!

आभाळातनं पडला चाकू, कोण बोंबलत नै *&& डाकू!!!! मिपा, मिपाकर्स अन समस्त मराठी आंजाच्या बैलाला हो!!!!!!!!!!!!! बोंबला रे बोंबला ऑबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ!!!!!!!!!!!

In reply to by बॅटमॅन

आभाळातनं पडलं हेलीकॉप्टर, कोण बोंबलत नै *&& डॉक्टर!!!! मिपा, मिपाकर्स अन समस्त आंजाच्या बैलाला हो!!!!!!!!!!!!! बोंबला रे बोंबला ऑबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ!!!!!!!!!!!

In reply to by बॅटमॅन

बॅट्या अजून एक :) जिलबी चौकात वाजली तुतारी, न बोंबलणार्‍याची ....................................... पुढचे सार्वजनिक ड्वायलॉग माहीती हायत नव्हं?

In reply to by जेनी...

ते ना? ते म्हण्जे न बॉबलणार्‍याच्या दारासमोर मिरज सांगली कुपवाड महानगरपालिकेचे सार्वजनिक स्वच्छतागृह असे आहे. :) यमक वगैरे जुळवत बसलो तर संपादक लोकं होळीचा टैम संपला म्हणून प्रतिसाद ऊडवतील :(

मिसळपाव चालू झालं का नाही हे पाहण्यासाठी सारखं पानावर रिफ्रेश मारणार्‍याच्या बैलाला हो....!! मिपावर काय चालू आहे, वाकू वाकू पाहणार्‍याच्या बैलाला हो.....!!! २१ बहुउपयोगी संकेतस्थळे - (ई-पुस्तक) असे शिर्षक टाकून धाग्यात कैच न लिहिणार्‍याच्या बैलाला हो....!!! मिपा मालक,संपादक, सल्लागार, तंत्रज्ञ आणि समस्त मिपाकरांच्या बैलाला हो... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१०० फक्त धागे भरकटवण्यासाठी मिपावर येणारे आणि मराठी येत असताना मुद्दाम अर्धे इंग्रजी लिहिणारे हुच्चभ्रू हे राहिले की वो!

In reply to by पैसा

मिपावरच्या समस्त म्हैलांच्या बैलाला हो........ स्त्रीवाद, स्त्रीमुक्ती, आधूनिक स्त्री, पारंपरिक स्त्री, अमूक स्त्री आणि धमूक स्त्री, विनाकारण स्त्रीच्या नावानं शंखध्वनी करणार्‍याच्या बैलाला हो.... आम्हाला बै काय लिहावं कै समजतच नै असे म्हणून वाचनमात्र राहणार्‍या स्त्रीयांच्या बैलाला हो... -दिलीप बिरुटे

आजच्या दिवशी Project Demo मिटींग ठेवण्यार्‍या क्लाईंट मॅनेजरच्या बैलाला हो....ऽऽऽऽऽऽऽऽऽ होळी रे होळी...पुरणाची पोळी, साहेबाच्या xxवर बंदुकीची गोळी.