मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वाड्यातील भांडणे-भाग १

अत्रुप्त आत्मा · · जे न देखे रवी...
काव्यरस
वाचक आणी (विशेषतः महिलांसाठी http://mimarathi.net/smile/vroam.gif) खुलासा---सदर काव्य/गीत हे आंम्हाला पुण्यातील नामातच-शेष राहिलेल्या ''वाडा'' या संस्कृतिच्या नाश्टेलजियातून सुचलेले आहे. पाणी प्रश्न सध्या बिकट असला,तरी मुबलक पाणी असलेल्या काळातही काव्यात वर्णिलेले भांडण पाहाता तो किती चिकट होता,याचा वाचकांस प्रचिती यावी. म्हणुन हे गीत-कुंजन ;) चालत चालत जिन्यातुन जाता बादली बदकन सांडली वरच्या मजल्या वरची शिंदिण देशपांड्यांशी भांडली॥धृ॥ का गं मेले फुटले डोळे,बघून चाल्तीस कोठे??? अत्ता भरूनी आणली बाद्ली,घालू का डोक्यात गोटे कशी मेलि ती अवचित वेळी,येथे येउन उलथली...॥१॥ ठाऊक आहे तुझा हा तोरा,भारी शिस्तिची तू तुझ्या कार्ट्याने टुथपेस्ट लाऊन,जिन्यात केली थू थू तिथेच घसरून पडले मी ना,यात मी काय चूक केली? ॥२॥ दहा ला गं पाणी गेले,अता कोठूनी आणू??? एकच हंडा घरी राहिला,कुणाच्या डोक्यात हाणू येकच बाद्ली र्‍हाय्ली होती,ती बचकन तू सांडली...! ॥३॥ असु दे आता घेऊन जा ग, माझ्या घरनं पाणी डोके दुखले ऐकून तुझी ही ,सक्काळी सक्काळी पिपाणी एका बादलिनी माझी इश्टेट,कुठे गं खाक्कन जळ्ली?...॥४॥ ठेव तुझी ती बाद्ली तुलाच,घे डोसक्यावर ओतून मि ही पाणी ड्र्मातले काढीन,भरलाय तो काल पासून जा जा तुझे उपकार नको,इश्टेट तुझिही कळ्ली..! ॥५॥ ========================================================== या नंतर सदरहू दोन्ही महिला...एकमेकिस... ''ह्हूं...!!!'' असा केवळ स्त्रीजन्य आवाज काढून हुसकाऊन लावल्याच्या आनंदात घरी गेल्या...पुढे संध्याकाळी काय जाहले... ते पुढिल भागात पाहू ;-)

वाचने 12946 वाचनखूण प्रतिक्रिया 57

प्रचेतस गुरुवार, 03/14/2013 - 13:49
aaaaa महान आहात.
का गं मेले फुटले डोळे,बघून चाल्तीस कोठे??? अत्ता भरूनी आणली बाद्ली,घालू का डोक्यात गोटे
a काय हे हिंसक विचार.

किसन शिंदे Fri, 03/15/2013 - 04:06
वा वा!! बुवा नॉस्टॅल्जिक केलंत तुम्ही. तुमच्या या वाड्यातील भांडणांवरून मला आमच्या चाळीतली नळावरची भांडणं आठवली.

लीलाधर Fri, 03/15/2013 - 08:37
पुढे संध्याकाळी काय काय जाहले हे प्ण लौकरच सांगा ओ :)) खर्र्च आप्ण महाण आहाट.

चौकटराजा Fri, 03/15/2013 - 09:24
फारच सौम्य शब्दात भांडण. मी यापेक्षाही भन्नाट भांडण पाण्यावरून ते ही स्त्री व पुरूषात झालेले पाहिले आहे. ( तळेगाव येथे १९६६ चे सुमारास )पण पाण्यावरूनचे खरे भांडण ऐकावयाचे असेलच तर फर्गसन मागची झोपडपटी, भैय्यावाडी शिवाजीनगर किंवा काशेवाडी भवानी पेठ येथे जाउन ऐकावे. ऐसी अक्षरे कलहे जी जहराते पैजा जिंकी चा अनुभव येईल.

क्रान्ति Fri, 03/15/2013 - 14:16
हसून हसून मेले........................ सांजसंध्या म्हणते तसंच बरेच दिवसांनंतर दृपल आणि मेंटेनन्सच्या पाट्या न दिसता थेट मिपा दिसलं आणि उघडलं तर हे भन्नाट जलकाव्य वाचायला मिळालं त्यामुळे जीव पाण्याच्या [रिकाम्या] बादलीत पडला. :D :D :D

सूड Fri, 03/15/2013 - 15:07
बायका इतक्या शांतपणे भांडत नाहीत हो आणि पाण्याबद्दलचं भांडण असेल तर नाहीच नाही. अवांतरः भांडणारी 'शिंदीण' असल्यामुळे हा सभ्यपणा आला असावा का?

जेनी... Fri, 03/15/2013 - 15:50
हिहिहि गुर्जि भांडायला कधी यु मग ??? ;) मत्त मत्त भांदण =))

In reply to by पैसा

जेनी... Fri, 03/15/2013 - 18:41
:-/ शी बै :-/ कित्ती प्रेमाने विचारलं होतं यु का भांडायला म्हुण :-/ दीवेकरीन येनार असेल तं आपली सपशेल मागार :-/ मेली खुप घाण शिव्या देते :(

In reply to by जेनी...

जेनी... Sat, 03/16/2013 - 00:51
सॉरी हं .. ही दीवेकरीण म्हणजे गुर्जिन्ची बायकू हे खुप उशिरा लक्षात आलं .. तरिपण जर दीवेकरिण पवारीण बैंशी भांडली तर ते भांडण असं होईल : अगं सटवे कितीदा सांगितले , नादी लागु नकोस तु माझ्या ह्यांना सांगितले तर यंदा गणपतीस जाणवे कोण घालील गं तुझ्या ??? भदाड्या अंगाच्या ठुमक्यानं तु मुद्दामच बादली माझी सांडली अन जगाला वाट्टेल आता कि ही दीवेकरीणच पवारणीशी भांडली || धु || =)) स्वारी बर्का गुर्जि ;)

अनन्न्या Fri, 03/15/2013 - 18:55
त्या स्मायल्या कशा टाकायच्या यावर एक धागा टाका, त्यांचे उगमस्थान, उत्क्रांती, प्रगती आणि काय ते करंट मस्त सारखे तपशीलवार येऊ दे.

चिगो Fri, 03/15/2013 - 23:56
सभ्य जल-भांडणकाव्य आवडले.. अवांतर- आमच्या एका गुर्जींचा किस्सा आठवला. ते त्यांच्या लहाणपणी म्हणे नळावरच्या भांडणाच्यावेळी कागद-पेन घेऊन बसले होते म्हणे, चकमकीतल्या अस्सल म्हणींना टिपून घ्यायला.. :-D . भांडण झाल्यावर त्यांच्या आजींना वही दाखवली, तर बदडला त्यांना..

In reply to by चिगो

मोदक Sat, 03/16/2013 - 00:11
ते त्यांच्या लहाणपणी म्हणे नळावरच्या भांडणाच्यावेळी कागद-पेन घेऊन बसले होते म्हणे, चकमकीतल्या अस्सल म्हणींना टिपून घ्यायला.. :-))

अभ्या.. Sat, 03/16/2013 - 00:03
वरच्या मजल्या वरची शिंदिण देशपांड्यांशी भांडली
काय झाले होते रे किसना? जाउदे चल आपण हाटीलात जाऊ आपल्या. :)

पप्पु अंकल Mon, 03/18/2013 - 21:26
सत्यनारायण सांगताना अचानक सुर्सुरी आली (कविता करण्याची) तर जरा जपुन हो मालक बाकी धमाल आली.

मास्टर ब्लास्टर - वृत्तराज - मिस्टर.बॅटमॅन ऊर्फ वाघुळशास्त्री यांनी आमच्या काव्यकिड्याला वृत्तात नीट-बसवून त्याचा पतंग न होता एकदम Fullपाखरू केले आहे. ;-) मला त्यांनी व्यनीतून पाठवलेला हा अप्रतिम रचना प्रकार आपल्या आस्वादासाठी सादर करत आहे. ============================================================================== @वृत्तराज मास्टर ब्लास्टर.बॅटमॅन ऊर्फ वाघुळशास्त्री पुनर्रचित- =============================जलाष्टक=================================
चालः आली लग्नघटी समीप नवरा
जातां चाळजिन्यातुनी लगबगी, जैं बादली सांडली | तेव्हा येवुनि देशपाण्डिणिसवे, शिंदीण ती भांडली ||धृ.|| डोळे ते जणु पूर्णतःचि फुटले, आहे पुढे लक्ष का? आत्ता आणलि बादली भरुनिया, गोटे शिरी घालु का? मेली ही इकडे कशी कडमडे, आत्ताचि ऐशा पळीं...||१|| तोरा तो तव सर्व ठाउक मला, भारीच शिस्तीचि तू कार्ट्याने तव टूथपेस्ट गिळुनी , केली जिन्याते थु-थू मी तेथे पडले पहा घसरुनी, ही चूक का जाहली? ||२|| गेले ते जल वाजती जधि दहा, आणू कुठूनी अता? हंडा एकचि जो घरी मम; शिरी हाणू कुणाच्या अता? होती एकच बादली तवगुणे तीही अशी सांडली ||३|| आसो देचि अता; घरोन मम तू घेवोन पाण्यासि जा प्रातःकाळि पिपाणि ऐकुनि तुझी डोस्क्यास होई सजा एका बादलिने जणों मम पुरी इष्टेट का नष्टली? ||४|| ठेवी गे तव बादली तुजसवे, घे मस्तकी ओतुनी काढी थांब जळा ड्रमामधुनिया, जो पूर्ण काल् पासुनी नक्को जा, उपकार ते तव, तुझी इष्टेट ती दीसली ||५|| ऐसे भांडण भांडिता उभयतां "हूऽ" कार तो काढुनी गेल्या त्या परि एकमेक जणु हो निष्कासनें मोदुनी ;-) ==== बोला सुमुर्त ब्याट-म्यान ;-)

In reply to by जेनी...

अभ्या.. Tue, 03/19/2013 - 02:15
भौराया ह्याला काय शार्दूलविक्रीडीत का काय म्हणायचे रे? ते मासाजासतताग जुळतेत की बरोब्बर. :)

In reply to by बॅटमॅन

स्पंदना Tue, 03/19/2013 - 06:25
बॅटॅ एक वृत्ताचा क्लास घे मिपावर सविस्तर. फार गरज आहे. इतक काही विसरल आणि आम्हाला शिकवणारी बाई काय फार ईंटरेस्ट्न शिकवत नव्हती त्यामुळे डोक्यात काय प्रकाश पडला नव्हता तेंव्हा. आता तरी पडतो का पाहु. ही रिक्वेस्ट समजावी, कोल्लापुरी असल्याने रिक्वेस्ट सुद्धा अशी दनदणीत करायची सवं आहे

अत्रुप्त आत्मा गुर्जींचा "कोल्हापूरी ठेचा-कांदा-भाकरी" आणि कविराज वाघुळशास्त्रींचा "वरण-भात-मटारची उसळ-शिक्रण" हे दोन्ही बेत एकदम फक्कड आहेत. काय काय भन्नाट प्रतिभावान मंडळी आहेत मिपावर... दिल यकदमच गार्डन गार्डन हो गया :)) :)) :))