Skip to main content

मुली शोधाण्यातले frustration

लेखक टवाळ कार्टा यांनी रविवार, 30/12/2012 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
मुली शोधाण्यातले frustration नाव वाचूनच समजले असेल की सध्या मुली शोधण्याचा कार्यक्रम चालू आहे ..अगदी बरोबर..अर्थात लग्नासाठी आणि लेख फक्त आणि फक्त frustration मुळे लिहिला आहे माझा traditional match making वर अजिबात विश्वास नाहीये कारण त्यात स्वभाव किती जुळतात याला सगळ्यात कमी importance आहे ...so i prefer to chat with girls before actually deciding future aspects पण जे अनुभव आले ते इथे लिहित आहे पण मला फक्त जाणून घ्यायचे आहे की सगळ्याच so called forward मुली अशा असतात कि मलाच हे "नग" मिळाले (त्याच बरोबर मिपाकरांना दंगा करायला मोकळे रान मिळणार आहे याचीही जाणीव आहे ) मुलगी type १ डॉक्टर - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली पहिल्याच chat मध्ये म्हणाली ...चुकुन +ve reply केला :( मुलगी type २ मार्केटिंग professional - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली २-३ वेळा chat केल्यावर एके दिवशी मला expected असलेल्या गुणाविषयी बोलत होतो तर सहज म्हणालो "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची मुलगी मी शोधत आहे लगेच रेप्ली आला ....माझ्या expectations खूप फिल्मी आहेत ....आणि दुसर्या क्षणापासून chat बंद मुलगी type ३ engineer - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली ७-८ chat नंतर चेपू वर add झालो ...आणखी ४-५ chat नंतर तिने upload केलेल्या फोटोवर comment लिहिली "rose with rose"...तो फोटो बागेतल्या गुलाबाबरोबर काढला होता त्यानंतर चेपुच्या फ्रेंड लिस्ट मधून बाहेर आणि chat contact blocked उरलेल्यांपैकी बर्याच matrimony site वर माझ्या request ला +ve/-ve कसलाच reply नाही चेपुवर message पाठवला तर तिथेही काही reply नाही जर वाट बघून call केला तर खालीलपैकी १ उत्तर तयार दिवसाला ५० mails येतात ....किती जणांना reply करणार ....(अर्रे मग profile hidden का नाही ठेवत ????) किंवा (this is classic) नकार देऊन कुणाला दुखवायला नाही आवडत...(चायला दुसर्यांना वाट बघायला लाऊन काय सुख मिळते???) किंवा घरच्यांना जातीबाहेराचा मुलगा नाही चालणार...(तरी मी so called उच्च जातीतला आहे) जर तिला तिचे स्वतःचे मत विचारले तर उत्तर ....तिला जातीचा फरक पडत नाही पण ती parents चे ऐकणार because she respects her parents...उद्या नवर्याने त्याच्या आई-वडिलांचे चुकीचे म्हणणे सुद्धा "respect" साठी ऐकले ....तर ते सुद्धा बरोबरच love marriage असेल तर तिच्या घरच्यांना जातीचा काहीही प्रॉब्लेम नाही पण arrange marriage जातीबाहेर नाही करायचे जवळपास सगळ्याच मुलींचे reply असेच ...(almost १००+)...आणि almost सगळ्या highly educated आजच्या जमान्यात सुद्धा सगळ्यांचे अनुभव असेच आहेत??? (पुढील लेखांमध्ये शुद्धलेखनाच्या चुका हळूहळू कमी होतील)

वाचने 126761
प्रतिक्रिया 511

प्रतिक्रिया

In reply to by वपाडाव

>>मग ती इतके दिवस अविवाहित कशी काय? वरच्या प्रतिसादात शांती अविवाहित असल्याचं कुठेतरी म्हटलंय का ?

ह्याला डिवचणे म्हणतात का रे भाऊ? :-)))

मित्रा , आता हा धागा तु चेछ्टा म्हणुन टाकला होतास की सीरीयसली ? चेछ्टा म्हणुन टाकला असशील तर तु जोरदार यशस्वी झाला आहेस . अभिनंदन ! आता सीरीयसली लेहिले असशील तर तर मात्र तु गंडला आहेस ... इतकी पर्सनल गोष्ट मिपावर टाकतात का भावा ? हायला इथे " कोणी तरी मेलं " असा धागा काढला तरी लोकं त्याचा विनोद करतील .( अर्थात काही प्रतिसादानंतर मी ही सामील हिईन त्यांन्ना =)) )

In reply to by प्रसाद गोडबोले

>>हायला इथे " कोणी तरी मेलं " असा धागा काढला तरी लोकं त्याचा विनोद करतील अहो राष्ट्रकाकू, त्या अफजल गुरु ला फाशी दिल्याच्या धाग्यावर दंगा चालूच होता की.. सोयर नाही आणि सूतक त्याहून नाही! :))

"honest, frank, outgoing, well educated, jolly, confident, independent thinker
यातले सगळे गुण तुमच्यात आहेत? बाआआआपरे.. ग्रेटच राव तुम्ही.. पण हे सगळे गुण असणार्‍या मुलींच्या या लिस्टमधे अजून एक गुण असतो.. mature.. असेल तुमच्यात,तर शुभेच्छा.. भेटेलच अशी मुलगी मग.. बाय द वे,एका मुलीला तुम्ही मुक्ता बर्वेच्या कॅरॅक्टर सारखी हवी असं म्हणता..दुसरीला डायरेक्ट रोझ सारखी म्हणून कॉम्प्लिमेंट..अपेक्षांची आणि स्वप्नांची रेंज काय हो तुम्च्या? मानलं..

In reply to by प्यारे१

मग काय? फुलांच्या कुळातल्या उपमा देतायत टवाळराव..तेवढ्यापुरतं तरी बोलावं म्हटलं..

श्या : काय हे ? :-/ काय रे जमतय का कुठे ?? कि मी बघुन देवु एखादी ...?? बघ .. नैतर काँटॅक्ट कर मला .. आयविल हेल्प्यु .

In reply to by जेनी...

आमच्या एका मित्राला फार्फार गरज आहे मदतीची....काशी मदत करू शकाल आपण?

In reply to by रमेश भिडे

काशी मदत करू शकाल आपण?
ओ तुम्ही कोणाला काय विचारताय? मदतीची काशी करेल ती नक्की! ;)

मला तर वाटतेय भारत सरकार ने नवीन कायदा करून विवाह मंत्रालय स्थापन करावे ,आणि लग्न न होवू शकणार्याव सगळ्यानी तिकडे नावे नोंदवावीत . मग सरकार योग्य टी कार्यवाही करून matchmaking करून देईल ............ जी गोष्ट सामाजिकदृष्ट्या नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा सरकारी हस्तक्षेप करावाच लागतो. मुलींनी किती अपेक्षा ठेवाव्या(ताणाव्या) ? इत्यादि गोष्टीत व्यक्तिस्वातंत्र्य आणि तत्सम गोष्टींना फाट्यावर मारून लग्ने जमवावीत ,अशा मताचा मी आहे. याचे कारण आजकाल सर्रास बोकाळलेले प्रेमविवाह आणि अंतरजातीय /अंतरधर्मीय विवाहामुळे सो-कॉल्ड उच्च जातीतील मुलांची फारच कुचंबणा होत आहे हो!

In reply to by रमेश भिडे

बहुतांश ब्राह्मण मुली अंतरजातीय /अंतरधर्मीय विवाह करतात ,त्याचा जबरदस्त फटका ब्राह्मण मुलांना बसून आजकाल लग्नाला मुलगी मिळणे महामुश्किल काम झाले आहे, त्या उद्विग्न्तेतून आलेले हे विचार आहेत, काही चुकीचे असल्यास क्षमा करा....................

In reply to by रमेश भिडे

क्षमा कसली मागताय? अजून उद्विग्नता येईल अशाने. ब्राह्मण मुलींचा कित्ता तुम्ही गिरवा. नैय्या पार. एकदम शिंपल.

.

एक अवांतर किस्सा : अरेन्ज्ड लग्न न जमण्याच्या स्थितीमुळे कंटाळलेल्या माझ्या एका मित्राला वधूवर सूचक मंडळातल्या एका प्रौढ बैन्नी विचारले," त्यापेक्षा तुम्ही प्रेमविवाह का नाही करत?" .. आधीच वैतागलेल्या त्याने सर्व राग आवरून त्यांना म्हटले, " अहो ते जमले असते तर इथे कशाला झक मारायला आलो असतो रोज रोज?"

माझ्या एका मित्राला आलेली काही स्थळं: या डील साठी त्यांच्या असलेल्या अटी: १) महिना एक लाख पगार हवा २) बहीण भाऊ नको (?!?) (काही दिवसांनी आईवडील नको असंही म्हणतील) ३) किमान ३ बीएचके घर हवं. ४) फॉरेन सेटल हवा इत्यादी.

In reply to by वेल्लाभट

अशा अटी घालणार्‍या पोरीला काय म्हणावे ? १) महिना एक लाख पगार हवा > ४) फॉरेन सेटल हवा ही फॉरेन मधे एक लाखात कसे काय घर चालवणार देव जाणे =))

In reply to by प्रसाद गोडबोले

ही फॉरेन मधे एक लाखात कसे काय घर चालवणार देव जाणे
तो तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही फार वैयक्तिक होवु पहात आहात. माझ्याकडे यापेक्षाही भयंकर शब्द आहेत तुम्हाला बोलायला. पण जावु दे ;)

In reply to by अधिराज

त्यांना मेंदुचा आजार जडलाय्,गजनीसारखा त्यामुळे ते दिसेल त्याला टोकतात(ह घ्या)

जर निर्णय लवकर घेतला नाही तर हे frustration असेच चालु राहील..इथे तुमच्या लेखाला प्रतिक्रिया बर्‍याच आल्या पण त्यातील काहीवर अंमलबजावनी केली तरच तुमचे लग्न लवकर होइल एवढे नक्की...

In reply to by टवाळ कार्टा

OK!! Please provide details about total number of Du-ID on Misalpav.com with ID names! Baki nav gav Patta CTC etc kundali mandu aamhi... Tu fakt Mipa var chi mahiti De!

In reply to by टवाळ कार्टा

बहुधा मिपावरच्याच एखाद्या सुकन्येचे स्थळ असावे. तुझा मिपावावर पाहता तिला जरा धाकधुक वाटली असावी. हा अंदाज बरोबर ठरल्यास दोघांनाही शुभेच्छा!!

In reply to by पिलीयन रायडर

ते आम्चे आम्ही बघून घेउ...बाकी अत्तापर्यंत फक्त एकच मिपाकरीण ठिक वाटलीये...भेटायचा योग आला नाहीये अज्जून ;)

In reply to by टवाळ कार्टा

एखादी मुलगी तुला सुचवायच्या आधी आम्हाला तुझी सगळी माहिती नको का?! डु आयदीने केलेला धिंगाणा पाहुन मग आम्ही तुझी जालीय कुंडली मांडु.. तुझे मानसिक विश्लेषण करु.. सरांच्या पायावर सुद्धा घालुन आणु.. आणि मग ठरवु पुढे काय करयाचं ते!

In reply to by पिलीयन रायडर

बसा वाट बघत.... ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु

In reply to by टवाळ कार्टा

आमच्याकडे ते कुणी ल्ल्ल्ल्ल्ल्लुऊऊऊ करत आले की हाड हाड करायचीच पद्धत आहे.. ह्यात झेपण्या न झेपण्याचा सवालच काय वो?

चार वर्ष झाली हे कार्टं शोधतंच आहे वाटतं अजून! जर्रा म्हणून तडजोड करत नाही का रे तुम्ही पोरं?

In reply to by अजया

ओ तै, धाग्याला केवळ तीन वर्षे अन सहा आठवडे होत आले आहेत. उगाच तीनाचे चार करून टक्याचे frustration वाढवू नका. टक्या मित्रा - आशा सोडू नकोस रे बाबा...

In reply to by टवाळ कार्टा

अपेक्षा ठेवुच नको! अपेक्षाभंगासारखे दुःख नाही.पहिल्या वेळी सूर मारायला शिकवताना कसं धाडकन उडी मारतात तसं आलेली नेक्स्ट मुलगी बघ आणि संपवून टाक विषय ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

ते टक्या सारख्यांचे** आदर्श (की प्रेरणास्थान ?) आहेत असे आम्चे निरि़क्षण आहे. चर्चा सामान्य वाचक नाखु. यात त्या त्या इच्छीतांनी आपली नावे डकवावीत.

आयला आता फक्त 'मुली सोडा मुलं बघायला सुरुवात करा' असा सल्ला द्यायचा राहिलंय.... बाळ टवाळा, प्रतिक्रिया वाचून डिप्रेस होऊन सज्जनगडाची वाट धरू नको हो.....

=))) तीन वर्षात बर्याच ठिकाणचे कांदेपोहे खाल्ले असतील टक्याने.मजा आहे बुवा ;) लोकांकडचे कांपो छान लागतात!

In reply to by अजया

कांदे पोहे खायची इच्छा राहूनच गेली. चारच मुली पाहिल्या. एक सार्वजनिक ठिकाणी आणि तीन आमच्याच घरी. तिसरीशी लग्न झालं. आमच्या सासूबाई कांदेपोहे चांगले करत पण लग्नानंतरचे कांदेपोहे वेगळे. लग्नाआधी दुसऱ्याच्या घरी जाऊन त्याच्याच मुलीकडे न लाजता सरळ पाहत त्यांचेच चहा पोहे खाण्याची मजा काही औरच आहे(असावी). त्यातून घराचा एखादा वरिष्ठ माणूस म्हणून जातो-- नीट "बघून घे" मुलगी. टक्या अजून एंजॉय करून घे.

टकाबालकास वधूसंशोधनासाठी शुभेच्छा... लग्न ठरल्यावर अत्मूगुर्जींपेक्षा कमी रेटमध्ये वैदिक/गांधर्व/राक्षस पाहिजे त्या पद्धतीने विवाह लावणेत येईल याची नोंद घ्यावी. ;)