Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user अनिकेतदळवी
Submitted by अनिकेतदळवी on गुरुवार, 02/21/2013 - 12:20
हिटलरचा इतिहास माहीत नसताना फक्त त्याने युद्धात केलेला संहार आणि ज्युंची केलेली कत्तल म्हणून त्याला शिव्या देणारे भरपूर जण आहेत. जर आपल प्रभुत्व गाजवायच असेल तर प्रथम त्या लायकीच व्हाव लागत आणि हिटलरने तेच केल.मी हिटलरने महायुद्धात नेमक काय जिँकल होत तेच सांगतो-: 1) फ्रान्सकडुन व्हर्सायच्या तहान्वये गेलेला RHINELAND प्रांत सार प्रांत, AUSTRIYA हा 70 लाख लोकसंख्येचा प्रदेश, त्याचप्रमाणे झेकोस्लोवहाकिया, हंगेरी हे देश फक्त धमकीच्या जोरावर रक्ताचा एकही थेंब न गाळता त्याने युद्धाआधीच मिळवले. 2) पोलंडचा तीन आठवड्यात फडशा पाडुन पोलंड मिळवला. 3) 15 दिवसात डेन्मार्क आणि नाँर्वेच्या राजांना बिनशर्त शरणागती पत्करायला लावली. 4) ज्या फ्रान्सने पहिल्या महायुद्धात जर्मनीला रेल्वेच्या डब्यात शरणागती पत्करायला लावुन आपल्या शौर्याचे प्रतिक म्हणुन तो डबा आपल्या देशात नेला होता त्याच फ्रान्सचा महिन्याच्या आत पाडाव करुन देशाच्या अपमानाचा बदला घेताना त्याच रेल्वेच्या डब्यात फ्रान्सच्या प्रमुखांना 22 जुन 1940 ला शरणागती पत्कारत शस्त्रसंधी करार करायला लावला. फ्रान्सच्या लष्करी कमकुवतपणाचा अंदाज फक्त हिटलरलाच आला होता त्यामुळे सेनानीँच्या विरोधाला न जुमानता त्याने फ्रान्सचा पराभव केला. 5) ज्या ब्रिटीशांच्या संपुर्ण जगात वसाहती होत्या त्या ब्रिटीशांना एकट्या हिटलरने BLITZCREIG तंत्राचा वापर करुन पळता भुई थोडी केली. भुमध्य समुद्रातील क्रिट बेट मिळवत ब्रिटीशांना पाऊल ठेवायला जागा ठेवली नाही आणि रोमेलच्या साहाय्याने इजिप्तला पराभुत करुन इंग्लंडला सगळ्या बाजुंनी कोँडले. 6) बाल्कन प्रदेशात हिटलरने युद्ध करुन ग्रीकांना पराभुत केले आणि युगोस्लोव्हाकियाचा घास गिळला. 7) मुत्सद्देगिरीच्या जोरावरच रुसो-जर्मन कराराची अभुतपुर्व घटना हिटलरने घडवुन आणली. पहिल्या महायुद्धात पश्चिम आघाडी उद्ध्वस्त करण्यासाठी जर्मनीला 4 वर्ष लागली होती पण हा चमत्कार हिटलरने केवळ सव्वा महिन्यात केला. इतरांचे राष्ट्रीय नेत्रुत्व दुबळे पडत असेल तर ती दुर्बलता अचुक हेरुन वाढवली हिटलरनेच...! त्याच्या या सर्व विजयाची तुलना केवळ फ्रेडरिक द ग्रेट किँवा नेपोलियन बोनापार्ट यांच्याशीच होऊ शकत होती.हिटलर 19 व्या शतकातील सर्वशक्तीमान व्यक्तिमत्व होते. जर्मन राष्ट्रवादाला त्याने अशी फुंकर घातली की सारे जग स्तिमीत झाले. जर्मनीवर अखंड 12 वर्षे तर युरोपवर 4 वर्षे सत्ता प्रस्थापित केली. पहिल्या महायुद्धात झालेल्या अपमानाचा सुड घेतल्याचे समाधान त्याने जर्मनीला मिळवुन दिले. लक्षात ठेवा कोणतेही युद्ध भयानकच असते पण देशाची बेईज्जत त्यापेक्षा भयानक असते. हिटलरच्या ज्या विकासाविषयी मी सांगतोय तो काय होता ते सांगतो-: 1) हिटलरने शिक्षणाव्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवत शारिरीक शिक्षण सक्तीचे केले. 2) शेतक-यांची हलाखीची परिस्थिती सुधारण्यासाठी शेतजमिनीची विक्री बेकायदेशीर ठरवल्याने शेतकरी आपल्या शेतावर बांधला गेला. राईश अन्नसाठा यंत्रणेत शेतक-यांना अन्नधान्याच्या पुरेशा कायदेशीर व निश्चित किँमती बांधुन दिल्याने जर्मनी अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाला. 3) जे कारखानदार रोजगार वाढवुन बेकारी नष्ट करतील अशा कारखानदारांना करमाफी देण्यात आली. त्यामुळे कारखानदार व कामगार वर्ग हिटलरवर खुष होते. 4) जर्मनीने आर्थिक क्षेत्रातप्रगती केली ती शस्त्रोत्पादनां च्या धोरणामुळेच. या सर्व योजनेला युद्धकालीन अर्थकारण म्हणतात. 5) हिटलरने CHANCELLER होताच सर्व राजकीय व सामाजिक संघटनांना शरणागती पत्करण्यास सांगुन पुर्ण जर्मनीला "एक विधान एक निशाण एक प्रधान" मिळवुन दिले. जे कार्य करण्याचे धारिष्ट्य प्रिन्स बिस्मार्क व वायमर प्रजासत्ताकला झाले नाही ते कार्य रक्ताचा एक थेंब न सांडता हिटलरने प्रत्यक्षात उतरवले. हिटलर राजवटीत 3 वर्षातच बेकारी नष्ट होऊन उद्योग आणि व्यापार यांची चक्रे प्रचंड गतीने फिरताना दिसु लागली. कोणत्याही अन्य राजवटीने 3 वर्षात एवढे यश मिळवले नसेल. हिटलरच्या या विकासाच महत्व अजुन वाढत कारण त्यावेळी जर्मनीतील परिस्थिती पुर्णतः प्रतिकुल होती. अशा परिस्थितीत हिटलर 30 जानेवारी 1933 ला जर्मनीचा CHANCELLER झाला आणि पुढील 5 वर्षात त्याने जर्मनीचा जो काही विकास केला त्यामुळे जर्मनीची गणती जगातील सर्वशक्तीमान राष्ट्रात होऊ लागली आणि 1 सप्टेँबर 1939 पर्यँत दुस-या महायुद्धास सामोरे जाऊन आपल्या अपमानाचा बदला घेण्याची ताकद या राष्ट्रात आली. हिटलरने कोणत्या परिस्थितीत विकास साधला हे जाणुन घ्यायला अगोदर जर्मनीतील प्रतिकुल परिस्थिती जाणुन घेणे आवश्यक आहे. 1) पहिल्या महायुद्धातील पराभवानंतर 1$ ला 4 MARKS असलेली जर्मन चलनाची किंमत 1$ ला 10000 MARKS एवढी कमी झाली होती. 2) व्हर्सायच्या तहाने जर्मनीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन जाचक अटी लादण्यात आल्या होत्या. प्रत्येक गोष्टीत जर्मनीला बाकी राष्ट्रांकडुन प्रथम परवानगी घ्यावी लागत होती अशा परिस्थितीत अन्यायाने त्रस्त जर्मनीला सावरले ते हिटलरनेच...!!! या तहाच्या सर्व अटी झुगारुन देत चतुराईने त्याने इंग्लंडकडुन 35% आरमार उभारण्याचे स्वातंत्र्य मिळवले आणि थोड्याच काळात जर्मनीला एवढे बलशाली बनवले की. ज्या इंग्लंड सारख्या देशांनी जर्मनीवर अटी लादल्या होत्या तेच देश युद्धाच्या भितीने हिटलरच्या अटी मान्य करु लागले होते. देशाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावणाऱ्या राष्ट्रभक्त हिटलरला माझा सलाम....! राष्ट्रभक्त हिटलरला माझा सलाम....!
  • Log in or register to post comments
  • 66599 views

प्रतिक्रिया

Submitted by मन१ on गुरुवार, 02/21/2013 - 17:33

In reply to आणखी बरेच आहेत by आनंद घारे

Permalink

चंगेझ खान

चंगेझ खान ह्या व्यक्तीला आख्खे मंगोलिया राष्ट्र खरोखरच मंगोलियाचा संस्थापक मानते. तिथे त्याला जबरादस्त मान आहे. जो मान फ्रान्स मध्ये नेपोलियनला; महाराष्ट्रात शिवाजींना त्याच धर्तीवरचा संस्थापकाचा मान खरोखरच त्याला तिकडे दिला जातो. बाकी तुम्ही जी नावे घेतली त्यातले कुणी एकदम देशाचे कायमचे आयकॉन अजून बनलेले नाहित. पण नादिरशहाचा आधीचा सरदार आणि नंतर त्याच्या बहुतांश साम्राज्याचा वरसदार अहमदशाह अब्दाली/दुर्रानी ह्याला मात्र अफगाणिस्तानात तोच मान आहे. त्याला जणू राष्ट्रनिर्माता मान्तात.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on गुरुवार, 02/21/2013 - 17:43

In reply to चंगेझ खान by मन१

Permalink

चंगिझ मंगोलियाच काय ८%

चंगिझ मंगोलियाच काय ८% आशियाचा आद्य पितामह आणि म्हणूनच सर्वात 'सक्सेसफुल' अल्फा मेल आहे. ;) बाकी कोणाचे तसे कर्तृत्त्व कुठे? :P बाकी घारे सरांशी सहमत आहेच.. फक्त हे सम्यक मत इथे- या धाग्यावर - अरण्यरुदन ठरण्याचीच शक्यता अधिक
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on गुरुवार, 02/21/2013 - 17:29

Permalink

"राष्ट्रभक्त" ?? संविधानिक

"राष्ट्रभक्त" ?? संविधानिक आहे का आधी पाहून घ्या !! मग पुढची चर्चा ..
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 02/21/2013 - 17:42

In reply to "राष्ट्रभक्त" ?? संविधानिक by बाळ सप्रे

Permalink

??

त्यांच्या देशाच्या संविधानाशी आपल्याला काय देणे घेणे ? तसे आपल्या देशाच्या संविधानाशी पण कुठे आहे म्हणा.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on गुरुवार, 02/21/2013 - 21:44

In reply to ?? by परिकथेतील राजकुमार

Permalink

तसे आपल्या देशाच्या

तसे आपल्या देशाच्या संविधानाशी पण कुठे आहे म्हणा.
सहमत...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 02/22/2013 - 13:22

In reply to "राष्ट्रभक्त" ?? संविधानिक by बाळ सप्रे

Permalink

वाह

"राष्ट्रभक्त" ?? संविधानिक आहे का आधी पाहून घ्या !! >>>वाह बाळ साहेब !! आजि म्या धन्य जाहलो ! --------------------------------------------------- धन्योSहं धन्योSहं कर्तव्यं मे न विद्यते क्वचित् ||
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on गुरुवार, 02/21/2013 - 18:37

Permalink

हिटलर हा राष्ट्रभक्त होता..

हिटलर हा राष्ट्रभक्त होता.. आणि त्याने जो नरसंहार केला तो त्याच्या राष्ट्रप्रेमामुळे हे अजिबात सत्य नाहीये. त्याने सुरूवातीचे जे विजय मिळवले ते धक्का तंत्राचा वापर करून. सारे जण बेसावध होते. जर्मनीने केलेल्या प्रचंड युद्ध तयारीची कानोकान खबर कुणाला नव्हती. इतके की इंग्लंडचे पंतप्रधान चेंबर्लेन हे जर्मन भेटीवर आले असताना त्याना जराही संशय आला नाही. पण सुरूवातीच्या काही नेत्रदीपक विजयां नंतर पराभवांची मालीका सुरू झाली. विशेषतः रशिया आणि अफ्रिका मधे. त्यामुळे तुम्ही वर्णन केलेल्या त्याच्या अचिव्हमेंटस काही काळापुरत्याच होत्या. १९३९ मधे युद्ध सुरू झाले, आणि साधारण १९४२ नंतर त्याला कुठल्याच आघाडीवर विजय मिळवता आला नाही. ( काही जण म्हणतात हिटलर चे जे युद्धखोर साथी होते जोडल, कायटेल वगैरे त्यांनी बर्‍याच बाबतीत त्याला अंधारातच ठेवले होते.) पहिल्या महायुद्धात तो एक मेसेंजर म्हणून सैन्यात काम करीत होता . पण त्याला एक कलाकार व्हायचे होते. व्हिएना च्या प्रसिद्ध आर्ट्स्कूल ची प्रवेश परीक्षा त्याने दिली त्यात त्याची निवड झाली नाही. त्याच्याकडे काम नव्हते, हाती पैसा नव्हता. त्यावेळी त्याच्या वाचनात ज्यु धर्मियांच्या विरोधातील काही पत्रकं लागली. ती वाचून त्याने त्या लेखकाचे (आत्ता नाव आठवत नाहीये ) सर्वं साहित्य वाचले. ही त्याच्या ज्यु द्वेषाची सुरूवात होती. त्याच्या मागे कसलीही वैचारीक बैठक अथवा अनुभव नाही. त्या काळात जर्मनीतच नाही तर युरोप मधील अनेक देशात ज्यु द्वेष होता कारण ज्यु लोकं हे सावकारी करीत. आणि त्या जोरावर देशातील आर्थिक व्यवस्थेत त्यांचा वरचष्मा असे. तसेच ते ऑर्थोडॉक्स आणि समाजापासून काहीसे वेगळे रहाणारे असे होते. त्यामुळे ज्यु द्वेष पसरवणे अथवा त्याबद्दल भाषण करणे हे लोकमत आपल्याकडे वळवण्याचे आमिष होते. हिटलर ने त्याचा पुरेपुर वापर केला. त्याने सत्ता मिळवण्यासाठी अनेक बर्‍यावाईट तंत्रांचा वापर केला, प्रसंगी आपल्या निष्ठावान मित्रांचा विश्वासघात करण्यास मागेपुढे पाहिले नाही. एक म्हणता येईल की जो नरसंहार झाला त्यात अनेक जण सहभागी होते. म्हणजे या पापात बरेच वाटेकरी होते (ज्यांनी शरणागती पत्करल्यावर ही जबाबदारी नाकारली आणि सर्व दोष हिटलरच्या माथी मारले ) पण म्हणून या पापाची तिव्रता कमी होत नाही. हिटलर बद्दल त्याच्या पितृभूमितच तिरस्काराची भावना आहे. आज तेथे कुणीही हिटलर हे अडनाव लावित नाही. त्याच्या नातेवाईकांनी देखिल युद्धानंतर ते नाव सोडून हाईडलर किंवा असेच दूसरे नाव स्विकारले. हेन्री शिरेर हा त्या काळात युद्धवार्ताहार म्हणून काम करीत होता. त्याने लिहिलेले ' राईज अ‍ॅण्ड फॉल ऑफ थर्ड राईश' हे पुस्तक जरूर वाचा. मग हिटलर स्तुतीचा लेख तुम्हाला परत लिहावासा वाटणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 02/28/2013 - 11:49

In reply to हिटलर हा राष्ट्रभक्त होता.. by मनीषा

Permalink

तुम्ही स्वतः The Rise and

तुम्ही स्वतः The Rise and Fall of the Third Reich हे पुस्तक वाचले आहे का? तसे वाटत नाही. कारण १. मूळातच या पुस्तकावर हिटलरच्या उदात्तीकरणाचा उदंड आरोप होतो. मी स्वत: ते वाचलेले आहे आणि मलाही तसेच वाटले. २. पुस्तकाचे लेखक हेन्री शिरर नव्हे तर विल्यम एल शिरर आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by nishant on गुरुवार, 02/21/2013 - 19:02

Permalink

धमकी नव्हे....

त्याचप्रमाणे झेकोस्लोवहाकिया, हंगेरी हे देश फक्त धमकीच्या जोरावर रक्ताचा एकही थेंब न गाळता त्याने
धमकी न्व्हे कपटाच्या जोरावर मिळवले असेच मी म्हणेन!
  • Log in or register to post comments

Submitted by हारुन शेख on गुरुवार, 02/21/2013 - 19:23

Permalink

हिटलरचे उदात्तीकरण नकोच

हिटलर राष्ट्रभक्त असेलही पण प्रखर राष्ट्रवादाचे स्तोम माजवून त्याने मानवतेला काळिमा फासणारी जी अघोर कृत्ये केली ती समर्थनीय ठरू नयेत. एका ज्यू छळछावणीतल्या निष्पाप लहान मुलांनी गॅसचेंबरच्या भिंतींवर मरण्यापूर्वी फुलपाखरे काढली होती त्याची छायाचित्रे holocaust संग्रहालयात बघितलेली आहेत. डोळ्यात पाणी आले होते. आणि आश्चर्य म्हणजे ह्या सगळ्या क्रूर कृत्यात जर्मन समाज उस्फुर्तपणे सहभागी होता. शिक्षित असूनही, आधुनिक मुल्ये मानणारा असुनही, विज्ञाननिष्ठ असुनही हा समाज आंधळेपणाने हिटलरच्या मागे गेला. प्रखर राष्ट्रवाद हि फार भयाण मोहिनी आहे. शिक्षण, विज्ञान, माणुसकी यांना ती पुरून उरते आणि रक्तरंजित इतिहास लिहिला जातो. राष्ट्रभक्ती आणि माणुसकी यात प्राथमिकता द्यायची वेळ आली तर ती माणुसकीला द्यावी.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 02/21/2013 - 22:15

In reply to हिटलरचे उदात्तीकरण नकोच by हारुन शेख

Permalink

+१

राष्ट्रभक्ती आणि माणुसकी यात प्राथमिकता द्यायची वेळ आली तर ती माणुसकीला द्यावी.
या वाक्याशी संपूर्ण सहमत. कुठ्ल्याही गोष्टीचे आंधळे समर्थन व आंधळा विरोध हे चूकीचेच.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अनिकेतदळवी

Submitted by अनिकेतदळवी on गुरुवार, 02/21/2013 - 22:55

In reply to +१ by श्रीरंग_जोशी

Permalink

श्रीरंगजी मी तुमच्या मताशी

श्रीरंगजी मी तुमच्या मताशी पुर्ण सहमत आहे. आज अमेरिकेला सर्व बलाढ्य,प्रगत राष्ट्र म्हणतात. पण त्यांनी ही दोन अणुसंहारक ह्ल्ले केले. त्यात निष्पाप लोक नव्ह्ती का मेली? तरी गाता ना अमेरिकेचे गोडवे

जहा सच ना चले वहा झुठ सही, जहा हक ना मिले वहा लुट सही

  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 02/21/2013 - 23:11

In reply to श्रीरंगजी मी तुमच्या मताशी by अनिकेतदळवी

Permalink

गोडवे?

अनिकेतभाऊ - मी कधीही कुठेही कुणाच्याही युद्धखेरीचे समर्थन केलेले नाहीये. एखाद्या व्यक्तिच्या अथवा देशाच्या चांगल्या गुणांचे कौतुक करणे म्हणजे त्यांच्या वाईट कृत्यांचे समर्थन करणे नव्हे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अनिकेतदळवी

Submitted by अनिकेतदळवी on Fri, 02/22/2013 - 22:57

In reply to गोडवे? by श्रीरंग_जोशी

Permalink

exactly श्रीरंग दादा माझं

exactly श्रीरंग दादा माझं देखील हेच म्हणणं आहे मी हिटलरच्या चांगल्या गुणाचं कौतूक केले आहे त्याच्या वाईट गोष्टींच समर्थन नाही, (काही वाक्ंयातून असा आशय निघत असल्यास क्षमस्व)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Fri, 02/22/2013 - 23:15

In reply to exactly श्रीरंग दादा माझं by अनिकेतदळवी

Permalink

अधिक संतुलन राखायला हवं होतं

लेखामध्ये माहितीचे संकलन नक्कीच चांगले आहे. परंतु जी सुरूवात आहे त्यात "हिटलरची अमानवी कार्ये काही वेळाकरिता बाजूला ठेवल्यास त्याचे जे कार्यकर्तृत्व आहे त्याचा लेखाजोखा मांडायचा प्रयत्न मी करतोय" असे काहीसे लिहिले असते तर थोडे अधिक संतुलन साधले गेले असते. माणसाची थोडी वाईट कामेही त्याच्या चांगल्या कामांवर पांघरूण घालतात अन इथे तर वाईटपणाचा काही अंतच नाही. एका वेगळ्या प्रयत्नाबद्दल अभिनंदन. अशाच विषयांवर अधिक वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Sat, 02/23/2013 - 21:26

In reply to अधिक संतुलन राखायला हवं होतं by श्रीरंग_जोशी

Permalink

रंगाभौ.

हिटलरची अमानवी कार्ये काही वेळाकरिता बाजूला ठेवल्यास त्याचे जे कार्यकर्तृत्व आहे त्याचा लेखाजोखा मांडायचा प्रयत्न मी करतोय
बात हजम नही होती है. त्याची अमानवी कार्ये सोडल्यास खाली शून्य उरते, हे कृपया ध्यानी घ्या. पण तुम्ही चांगली बाजू पहातच आहात, तर वीरप्पन, ओसामा बिन लादेन, सद्दाम हुसेन, जनरल डायर, गझनीचा मोहम्मद, झालेच तर परवाच्या दिल्ली केस मधले आरोपी, यांच्या चांगल्या बाजूंवर लेख येऊ द्या. वाचनोत्सुक आनंदी (गोपाळ)
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Sat, 02/23/2013 - 21:28

In reply to रंगाभौ. by आनंदी गोपाळ

Permalink

$#%#ला या स्वयंसंपादनाच्या.

डायरेट बूच लाग्तं राव आजकाल मिपावर. रंगाभौ, माफी! ते वर्चं अनिकेतभौसाठी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Fri, 02/22/2013 - 07:40

In reply to +१ by श्रीरंग_जोशी

Permalink

राष्ट्रभक्ती आणि माणुसकी यात

राष्ट्रभक्ती आणि माणुसकी यात प्राथमिकता द्यायची वेळ आली तर ती माणुसकीला द्यावी. या वाक्याशी संपूर्ण सहमत. कुठ्ल्याही गोष्टीचे आंधळे समर्थन व आंधळा विरोध हे चूकीचेच. या वाक्याशी संपूर्ण सहमत. - अगदी प्रत्येक वेळी बोटचेप्या मांणुसकीचेही आंधळे समर्थन चुकीचेच.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 02/22/2013 - 07:52

In reply to राष्ट्रभक्ती आणि माणुसकी यात by ५० फक्त

Permalink

बॉर्डर सिनेमा आठवला

अक्षय खन्ना म्हणतो, "तो पाकिस्तानी सैनिक माझ्यासारखा माणूस आहे, मी त्याला का गोळ्या घालू?" त्यावर सन्नी म्हणतो, "जर तू त्याला गोळ्या घातल्या नाहीस तर तो तुला गोळ्या घालेल."
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Fri, 02/22/2013 - 19:39

In reply to बॉर्डर सिनेमा आठवला by पैसा

Permalink

+१

+१ >> राष्ट्रभक्ती आणि माणुसकी यात प्राथमिकता द्यायची वेळ आली तर ती माणुसकीला द्यावी >> ह्म्म्म.. depends.. case to case basis.. माणुसकीची व्याख्या काय? कसाब आणी अफजल ला फाशी द्याल का माणुसकी म्हणुन सोडाल? --------------------- १ म्हणः- ओल्याबरोबर सुकं पण जळतं.. ---------------------
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Fri, 02/22/2013 - 23:05

In reply to +१ by यसवायजी

Permalink

अजिबात नाही

जयंत कुलकर्णी यांच्या जुन्या लेखांमध्ये एक खूपच महत्वाचे ऐतिहासिक उदाहरण आहे. बहुधा रोमेल बाबत. द्वितीय महायुद्धातला जर्मनीचा शूर सेनानी हिटलरच्या विरुद्ध गेल्यावर हिटलरचे दूत त्याच्याकडे जातात व म्हणतात की तू राष्ट्रद्रोह केला आहेस, त्यावर त्याचे उत्तर होते, मी राष्ट्रद्रोह नव्हे हिटलरद्रोह केला आहे केवळ हिटलर (तत्कालिन राष्ट्रप्रमुख असल्याने) म्हणतो तेच राष्ट्रहित हे मी मानत नाही अन हाच माझा गुन्हा... आणखी एक उदाहरण म्हणजे, ग्वांटानामो बे येथील तुरूंगात अमेरिकेने पकडून आणलेल्या संशयितांना ठेवले जाते व अमानवी अत्याचार केले जातात तेही राष्ट्रहिताच्या नावाखाली. इथे माणूसकी महत्वाची. कदाचित साध्वी प्रज्ञासिंह व कर्नल पूरोहित यांच्यावरचा खटला पूर्णत्वाला पोचला अन ते निर्दोष सिद्ध झाले तर तथाकथित राष्ट्रवादासाठी माणूसकीचा बळी दिला गेला असे खेदाने म्हणावे लागेल. सीमेवर सीमेपलिकडून घुसखोरी करणार्‍यां सशस्त्र अतिरेक्यांना यमसदनी धाडणे हे राष्ट्रहिताचे व वाट चुकून सीमेपलिकडला एखादा मेंढपाळ आल्यास त्याला जीवे न मारता संपूर्ण चौकशीअंती परत पाठवणे हे माणूसकीचे. सीमेवर असे प्रसंग नक्कीच येतात जेव्हा या दोहोंमध्ये नेमका निर्णय (बरोबर वा चूकीचा) न केल्यास उशीर होऊन निर्णय न घेणार्‍याचा जीवही जाऊ शकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Sat, 02/23/2013 - 00:23

In reply to अजिबात नाही by श्रीरंग_जोशी

Permalink

सगळी उदाहरणे पटली.

सगळी उदाहरणे पटली. काही निर्णय डिप्लोमॅटिक असावेत. बांग्लादेशातल्या बर्‍याच जणांना माणुसकीच्या नावावर बॉर्डर क्रॉस करु दिली जाते. मी त्यासाठीच case to case basis म्हणालो.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Sat, 02/23/2013 - 01:33

In reply to सगळी उदाहरणे पटली. by यसवायजी

Permalink

हे उदाहरण पटले नाही

बांग्लादेशी निर्वासितांना ७१ युद्दापूर्वी शरणागती दिली गेली ते माणसकीच्या नावावर होते. बांग्लादेश स्वतंत्र झाल्यावर त्यांना येऊ दिले गेले किंवा जात आहे तिथे माणूसकीचा मुद्दा कुणी वापरला? ते लोक अवैधरित्या येतात अन सीमेवरील अन मग सीमेअलिकडील भ्रष्ट व्यवस्थेमूळे त्यांना निवांतपणे राहणे शक्य होते.
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Sat, 02/23/2013 - 11:10

In reply to हे उदाहरण पटले नाही by श्रीरंग_जोशी

Permalink

मी ७१ पुर्वीचं नाही, सध्याचं

मी ७१ पुर्वीचं नाही, सध्याचं सांगतोय. (माफ करा आता लिंक उपलब्ध नाही). पण अजुनही कुणाची दादीमां शेवटच्या घटका मोजतिये असं थोडा रड्वेला चेहरा करुन सांगीतलं, की सोडलं जातय. (अर्थातच पैसे घेउन.. पण सॉफ्ट कॉर्नर दाखवतात.) कारण बर्‍याच जणांचे नातेवाईक बॉर्डरच्या आस्-पास राहतात.
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Sat, 02/23/2013 - 08:46

In reply to अजिबात नाही by श्रीरंग_जोशी

Permalink

हे पेड प्रतीसाद आहेत काय्

हे पेड प्रतीसाद आहेत काय्?म्हणजे तुम्हाला संस्थळावर पैसे देउन वावरायला सांगीतले गेले आहे काय? साध्वीला तुम्ही दोषी मानता काय?वरच्या तुमच्या उल्लेखात तस मला तरी वाटतय. मालेगावात जेथे बाँबस्फोट झालेत त्या (इस्तेमाच्या)ठिकाणी चुकुनही दुसर्या समाजाचा माणुस जाउच शकत नाही.मालेगावात बहुत ऐसे जागा आहेत तिथे पोलीससुद्धा जायला घाबरतात.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 02/21/2013 - 23:51

In reply to हिटलरचे उदात्तीकरण नकोच by हारुन शेख

Permalink

+/-

हिटलरचे उदात्तीकरण नकोच
१००% सहमत. हिटलर हा विकृत नेता होता. साठ लाख निष्पाप ज्यूंना, सत्तर लाख निष्पाप जिप्सींना ज्याने मारले त्याची कुठलिही गोष्ट अगदी राष्ट्रभक्ती देखील आदर्श नाही असेच म्हणेन.
राष्ट्रभक्ती आणि माणुसकी यात प्राथमिकता द्यायची वेळ आली तर ती माणुसकीला द्यावी.
प्रसंगानुसार ठरते असे वाटते. एक उदाहरण म्हणून... ज्या अफझल गुरूने स्वतः मरताना देखील शेवटी लिहीलेल्या पत्रात "I request my family that they should not feel any remorse for me rather they should respect this honor," असे म्हणतो, त्याबाबतीत माणूसकी वगैरे काही दाखवायचा संबंध येत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by नानबा on गुरुवार, 02/21/2013 - 20:11

Permalink

माझं निरीक्षण - तरूण वयात बर्

माझं निरीक्षण - तरूण वयात बर्‍याचशा लोकांना हिटलर हा देवसमान किंवा हिरो वाटतो.. पण नंतर विचारांच्या कक्षा रूंदावल्या की वास्तवाचं भान येतं. काही वर्षांपूर्वी मी अ‍ॅडॉल्फ आईशमान वरचं एक पुस्तक वाचलं होतं. त्यात असा उल्लेख आढळला की ज्यूंच्या बाबतीत सगळे अधिकार हिटलरने आईशमानला दिले होते. म्हणजे रूढार्थाने त्यांना मारावं की जिवंत ठेवावं, आणि मारायचं असल्यास कोणत्या पद्धतीने मारावं हे सगळे निर्णय आईशमान घ्यायचा म्हणे. कोणी याबद्दल जास्त माहिती देऊ शकेल काय?
  • Log in or register to post comments

Submitted by आबा on गुरुवार, 02/21/2013 - 20:29

Permalink

?!

राष्ट्र म्हणजे काय ? कशापासून बनतं राष्ट्र ? नागरिक हे राष्ट्राचा भाग असतात का, की राष्ट्र म्हणजे फक्त दगड धोंडे आणि झाडं एवढंच? स्वतःच्याच देशाचे दोन अडिच लाख* लोक फक्त वर्णवर्चस्वाच्या मूर्ख मुद्द्यापाई मारून टाकणारा माणूस राष्ट्रभक्त कसा काय असू शकेल ?! (* ही दोन अडीच लाख संख्या फक्त जर्मनी मधली आहे जगभरामध्ये केलेल्या ज्यूंच्या हत्यांची संख्या ६ मिलियनच्या आसपास जाते, असो)
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on गुरुवार, 02/21/2013 - 20:35

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on गुरुवार, 02/21/2013 - 20:37

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अन्तर्यामी on गुरुवार, 02/21/2013 - 22:30

Permalink

हित्लेर भक्त!!!!!!!!!!!!

सुरेख लिखान !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on गुरुवार, 02/21/2013 - 22:32

Permalink

मजेशीर धागा आणि प्रतिसाद

मजेशीर धागा आणि प्रतिसाद
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on गुरुवार, 02/21/2013 - 23:59

In reply to मजेशीर धागा आणि प्रतिसाद by नाना चेंगट

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Fri, 02/22/2013 - 08:09

In reply to +१ by कवितानागेश

Permalink

+२

+२
  • Log in or register to post comments

Submitted by इष्टुर फाकडा on गुरुवार, 02/21/2013 - 22:33

Permalink

:)

अर्ध्या हळकुंडान्नी हल्ली मिपा पिवळे पडायला लागले आहे. अक्कल आम्हाला फार आहे असे म्हणणे नाही पण ती नाही म्हणून आमचे 'म्हणणे' हि फार नसतेच.
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on गुरुवार, 02/21/2013 - 23:38

Permalink

काही लोकांना असे लेखन झेपत

काही लोकांना असे लेखन झेपत नाही. का ते कळत नाही. पहिलीत शिकलेल्यापेक्षा वेगळे काही ऐकले की बुद्धिला अपचन होते त्यांच्या असो धागा माहीतीपूर्ण आहे खूप नवी माहीती मिळाली ४ आणि ५ वा मुद्दा पटला आज जर्मनीच्या प्रगतीचे एक कारण हिटलरचे योगदान हे आहे. --
  • Log in or register to post comments

Submitted by इष्टुर फाकडा on Tue, 02/26/2013 - 03:10

In reply to काही लोकांना असे लेखन झेपत by आशु जोग

Permalink

:)

आलं लक्षात !
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Fri, 02/22/2013 - 02:23

Permalink

नाझी भस्मासूर !!

करण्यार्‍याचे हात दिसतात, सपोर्टर्स नामानिराळे राहातात. हिटलरने नृशंस हत्याकांड करवले (त्याला झोप कशी येत असेल कोण जाणे) म्हणुन त्याच्यावर इतकी आगपाखड. त्याच हिटलरच्या गळ्यात गळे घालुन छळछावण्यांना मनोरंजनांचे अड्डे समजणार्‍या मुस्लीम कट्टरपंथी वहाबी धर्मगुरु/राजकारण्यांना मात्र वेगळा न्याय. तोच हिटलर युद्ध सुरु होण्यापुर्वी अगदी जवळचा मित्र होऊ शकतो का हे चाचपडणारे चर्चील व इतर युरोपीय नेते तर जगभरात गौरवलेले. साठ लाख निष्पाप लोकांच्या मृत्युला (प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष )जबाबदार हिटलर राक्षसी, पण करोडो लोकांचे प्राण घेणारे पहिले महायुद्ध पेटवणारे ज्यु बँकर्स मात्र कोणाच्या गावीही नाहि. हिटलर काजळापेक्षाही काळा. त्याचे रक्तलांछीत हात कधीच धुवुन निघणार नाहि. इतर कृरकर्मे, जे कदाचीत हिटलरच्या बरोबरीने/हिटलरपेक्षा जास्त ओंगळवाणे वागले त्यांना अंधारात गुडुप होण्याचा फायदा. हिटलर आणि मोदींची तुलना करणे हे बौद्धीक दिवाळखोरीचे आणखी एक अघोरी लक्षण. धन्य आहेत विचारवंत. अर्धवटाराव
  • Log in or register to post comments

Submitted by अवतार on Fri, 02/22/2013 - 02:34

In reply to नाझी भस्मासूर !! by अर्धवटराव

Permalink

ह्याच हिटलरला

ह्याच हिटलरला १९३८ साली Man of the year घोषित करणाऱ्या टाईम मेगझीनची प्रतिमा मात्र आजही निष्कलंक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 02/22/2013 - 06:15

In reply to नाझी भस्मासूर !! by अर्धवटराव

Permalink

नक्की?

१० मे १९४० ला चर्चिल ब्रिटीश पंतप्रधान झाला तेव्हा दुसरं महायुद्ध आधीच पेटलं होतं. तिशीच्या दशकातच चर्चिलने 'Mein Kampf' वाचलं होतं आणि हिटलर भयंकर असू शकतो याची कल्पना आली होती. ऑस्ट्रीया, चेकचा जर्मन भाग वगैरे चेंबरलेनच्या (तत्कालिन, चर्चिलच्या आधीचे ब्रिटीश पंतप्रधान) नाकाखालून हिटलरने गिळला तेव्हा चेंबरलेनच्या पॉलिश्यांवर टीका करण्यात चर्चिल फार पुढे होता. चेंबरलेननाही युद्ध टाळायचं होतं म्हणून त्यांची सामोपचाराची भूमिका होती. ब्रिटन विरूद्ध जर्मनी अशी युद्धाची वेळ आली तेव्हा चेंबरलेन आणि चर्चिल दोघांनी एकमेकांना सहकार्य केलंच, पण चर्चिल सुरूवातीपासूनच हिटलर आणि नात्झींवर टीका करत असे. रश्यन स्तालिनचा पाठींबा मिळवण्यासाठी चेंबरलेन, फ्रेंच आणि हिटलर फार उत्सुक होते. तिघंही कम्युनिझमला नावं ठेवणारे! त्या स्तालिननेही पुढे उजेड पाडलाच. महायुद्ध सुरू असतानाच स्तालिनने पोलंडमधेही दिवे लावलेच. कातिनचं हत्याकांडही पुरेसं कुप्रसिद्ध आहे. गांधी आणि भारतातल्या तत्कालिन दुष्काळाबद्दल चर्चिलचे अनुदार उद्गारही कुप्रसिद्ध आहेत, पण त्याबद्दल स्तालिन, चर्चिल किंवा (फॉर द्याट म्याटर) वहाबी धर्मगुरूंचंही कोणी कौतुक केल्याचं माझ्या वाचनात नाही. हिटलरवर टीका करण्यात "मजा" येते कारण त्याला आदर्श मानणारे, आणि त्याला आदर्श मानणार्‍यांना आदर्श मानणारे आजूबाजूला चिक्कार सापडतात. कोणी कम्युनिष्ठ सापडला तर स्तालिन, लेनिन किंवा गेलाबाजार केजीबीने पूर्व केजीबी हेरांना मारण्याची यादी काढता येतेच. बाकी चालू राहिलच. मी तसं वेगळं म्हणायची आवश्यकता नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Fri, 02/22/2013 - 07:43

In reply to नाझी भस्मासूर !! by अर्धवटराव

Permalink

त्यातल्या त्यात संतुलित

त्यातल्या त्यात संतुलित प्रतिसाद, दुसरी बाजु हा माझा नेहमीचाच आवडता विषय.
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Fri, 02/22/2013 - 09:02

In reply to नाझी भस्मासूर !! by अर्धवटराव

Permalink

नाही

हिट्लर् च्या मैत्रीसाठी चर्चिल अजिबात आसुसलेले किंवा चाचपदत वगैरे नव्हते. हिट्लर च्या अतिरेकी विस्तारवादी राष्ट्रवादाचे भविष्यातील विनाशकारी परिणाम सर्वांत आधी चर्चिल च्याच लक्षात आले.आणि त्यांनी चेंबर्लेन च्या मवाळ धोरणाचा कडाडून विरोध-अगदी एकांड्या शिलेदाराप्रमाणे विरोध-केला. चेंबर्लेन एक लांब दांड्याची छत्री बरोबर बाळगत.आपल्या इंदिरा गांधींच्या नाकाप्रमाणे ही छत्री हा तत्कालीन व्यंगचित्रकारांचा एक आवडता विषय बनला होता.छत्रीधारी चेंबर्लेन व त्यासोबत चर्चिलची एखादी टोकदार टिपणी अशी व्यंगचित्रे त्या काली प्रसिद्ध होत.चेम्बर्लेनची रेवडी उडवण्यामागे त्याला हिटलरचा न कळलेला धोका हेच मुख्य कारण चर्चिल च्या दृष्टीने होते. आता धागालेखकासाठी: मुख्य लेखातले आणखी एक वाक्य खटकले. 'हिट्लरची चांगली बाजू लोकांसमोर यावी म्हणून'...वगैरे. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धाची बीजे,हिट्लर चा आक्रमक राष्ट्रवाद,नात्सि तत्त्वज्ञानाचा उदय,ऑ‍ॅटोबान,क्रप कंपनीला दिलेला जित राष्ट्रांमध्ये मुक्तहस्ते लुटीचा (तिथल्या कंपन्या सक्तीने ताब्यात घेण्याचा)परवाना- यात स्कोडाही लुटली गेली- ,आपल्याच वेषांतरित सैनिकांकडून लुटुपुटीच्या लढाईत आपलेच सीमेवरचे ठाणे शत्रूराष्ट्राने ताब्यात घेतल्याची आवई उठवून दुसर्‍या महायुद्धाची केलेली सुरुवात ह्या सर्व बाजू लोकांना माहीत नाहीत असे आपण समजता की काय? दुसरे महायुद्ध,हिट्लर चा उदय,त्याची कार्यपद्धती इतकेच नव्हे तर त्याचे मनोवैज्ञानिक विश्लेषण याविषयी भरपूर लिहिले गेले आहे.हिट्लर हे जगाला पडलेले एक भयानक दु:स्वप्न होते. ते दु:स्वप्नवत यातनाकांड अल्पकाळात संपले आणि अतिरेकी राष्ट्रवादाची गुंगी उतरून पाठीराख्यांचा पुरता भ्रमनिरास झाला याबद्दल नियतीचे आभारी राहिले पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on Fri, 02/22/2013 - 09:19

In reply to नाही by राही

Permalink

हिट्लर हे जगाला पडलेले एक

हिट्लर हे जगाला पडलेले एक भयानक दु:स्वप्न होते.
सहमत
आणि अतिरेकी राष्ट्रवादाची गुंगी उतरून पाठीराख्यांचा पुरता भ्रमनिरास झाला
याबद्दल साशंक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on गुरुवार, 02/28/2013 - 21:50

In reply to हिट्लर हे जगाला पडलेले एक by मनीषा

Permalink

धिस

इज द मोस्ट सेन्सिबल रिप्लाय आय रेड ऑन धिस थ्रेड.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Fri, 02/22/2013 - 09:21

In reply to नाही by राही

Permalink

मी उलट वाचलय

"हिट्लर् च्या मैत्रीसाठी..कारण चर्चिल च्या दृष्टीने होते" >> जर्मन आणि ब्रीटीश शक्ती, खास करुन आरमार, एकत्र आले तर जगात त्याला प्रत्युत्तर नसेल हा चर्चीलचा होरा होता व त्यासाठी शक्यतोवर हिटलरशी जुळवुन घ्यायचं अशा मताचे चर्चील होते, असं मी नक्की वाचलय. शिवाय तुम्ही म्हणता तसं चर्चीलला हिटलरच्या साम्राज्य विस्ताराची भिती होती त्याच्या अमानुष ज्यु द्वेषाची नाहि. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 02/22/2013 - 11:18

In reply to मी उलट वाचलय by अर्धवटराव

Permalink

... चर्चीलला हिटलरच्या

... चर्चीलला हिटलरच्या साम्राज्य विस्ताराची भिती होती त्याच्या अमानुष ज्यु द्वेषाची नाहि.
म्हणजे यातून नक्की काय सिद्ध होतं? १. चर्चिल आणि हिटलर यांच्यात मित्रवत संबंध होते. २. चर्चिलकडून प्रेमभावना होते, हिटलरकडून वैर होतं. ३. चर्चिलकडून वैरभावना होती, हिटलर चर्चिलच्या प्रेमात होता. ४. चर्चिल आणि हिटलर दोघांनाही एकमेकांबद्दल वैरभावनाच होती.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Fri, 02/22/2013 - 18:34

In reply to ... चर्चीलला हिटलरच्या by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

पाचवा ऑप्शन पण हवा होता...

५)यापैकी काहिच नाहि. क्रौर्याच्या बाबतीत हिटलर आणि वर मेन्शन केलेली महामंडळी यात फार डावं-उजवं करता येत नाहि हा सिंपल मुद्दा. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Fri, 02/22/2013 - 11:51

In reply to मी उलट वाचलय by अर्धवटराव

Permalink

तज्ज्ञांचे बहुमत

पहिल्या महायुद्धाच्या अंतिम टप्प्यात जर्मनीविरुद्ध तिरस्काराची भावना ब्रिटिशांमध्ये इतकी तीव्र होती की खुद्द ब्रिटिश राजघराण्याने आपला प्रकर्षाने जर्मन वारसा दर्शवणारे झाक्से-कोबर्ग नाव झिडकारून वुइंड्सर हे नाव धारण केले.बॅटनबर्ग सारखे मातबर सरदारही त्यांचे अनुकरण करीत माउंट्बॅटन बनले. अशा परिस्थितीत राजनिष्ठ चर्चिल जर्मनांशी हातमिळवणी करण्याची स्वप्ने पाहील हे खरे वाटत नाही. एखाद्या इतिहासकाराने तसे लिहिले असेलही पण बहुसंख्य इतिहासकार काय म्हणतात ते पाहिले पाहिजे. एखाद्या स्टॅन्ली वॉल्पर्ट्ला नेहरूंमध्ये समलिंगी स्वभाव जाणवला तरी इतर तसे मानत नाहीत. उलट नेहरू-एडविना संबंधांतील तथ्य बहुतेकांनी मान्य केले आहे. गांधी जवळच्यांना 'काय,आज तुझा कोठा कसा काय आहे?(हाउ आर योर बॉवेल्स टुडे)'असे विचारीत यावरून गांधींना विकृत मनोवृत्तीचे ठरवण्याचे धाडसही (बहुधा) याच इतिहासकाराने केलेले आहे. कोठा साफ राखणे या क्रियेला भारतीय लोक परंपरेने फार महत्त्व देतात हे मलावरोधाची संस्कृती असणार्‍या त्या पाश्चिमात्य गृहस्थाला ठाऊक असणे शक्य नाही. सरस्वती नदीच्या बाबतीतही एक अल्पमतातील इतिहासतज्ज्ञ गट हेलमंड नदी हीच वेदकालीन सरस्वती असे मानतो. अशी मतमतांतरे असायचीच. सध्या मान्य असलेले मतही पुढे जाऊन अमान्य होणारच नाही असे नाही. सध्याचा सर्वसाधारण मतप्रवाह लक्षात घेतला पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Fri, 02/22/2013 - 20:23

In reply to तज्ज्ञांचे बहुमत by राही

Permalink

देअर यु आर...

महायुद्धाच्या अखेरी किंवा त्यानंतर शत्रुराष्ट्रांप्रती उफाळुन आलेली घृणा राजकीय/आर्थीक फायद्या-तोट्यांवर आधारलेली आहे, माणुसकीच्या/करुणेच्या पोटी नाहि. साम्राज्य(आर्थीक, सामरीक, राजकीय)हितासाठी प्रसंगी जागतीक शांतता धोक्यात घालण्याची, महायुद्धे लढण्याची महासत्तांची वृत्ती हिटलरच्या वंशद्वेषापेक्षा फारशी धवल नाहि. (त्या वृत्तीत आजही बदल झालेला नाहि) अर्धवटाराव
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Fri, 02/22/2013 - 20:36

In reply to देअर यु आर... by अर्धवटराव

Permalink

मुद्दा

मुद्दा चर्चिलने हिट्लरशी हातमिळवणीची इच्छा धरली असावी की नसावी हा होता. राजनिष्ठ चर्चिल कडून तसे घडणे शक्य नव्हते असे सांगण्याचा आणि त्याचे कारण देण्याचा प्रयत्न प्रतिसादात केला होता.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com