Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user अनिकेतदळवी
Submitted by अनिकेतदळवी on गुरुवार, 02/21/2013 - 12:20
हिटलरचा इतिहास माहीत नसताना फक्त त्याने युद्धात केलेला संहार आणि ज्युंची केलेली कत्तल म्हणून त्याला शिव्या देणारे भरपूर जण आहेत. जर आपल प्रभुत्व गाजवायच असेल तर प्रथम त्या लायकीच व्हाव लागत आणि हिटलरने तेच केल.मी हिटलरने महायुद्धात नेमक काय जिँकल होत तेच सांगतो-: 1) फ्रान्सकडुन व्हर्सायच्या तहान्वये गेलेला RHINELAND प्रांत सार प्रांत, AUSTRIYA हा 70 लाख लोकसंख्येचा प्रदेश, त्याचप्रमाणे झेकोस्लोवहाकिया, हंगेरी हे देश फक्त धमकीच्या जोरावर रक्ताचा एकही थेंब न गाळता त्याने युद्धाआधीच मिळवले. 2) पोलंडचा तीन आठवड्यात फडशा पाडुन पोलंड मिळवला. 3) 15 दिवसात डेन्मार्क आणि नाँर्वेच्या राजांना बिनशर्त शरणागती पत्करायला लावली. 4) ज्या फ्रान्सने पहिल्या महायुद्धात जर्मनीला रेल्वेच्या डब्यात शरणागती पत्करायला लावुन आपल्या शौर्याचे प्रतिक म्हणुन तो डबा आपल्या देशात नेला होता त्याच फ्रान्सचा महिन्याच्या आत पाडाव करुन देशाच्या अपमानाचा बदला घेताना त्याच रेल्वेच्या डब्यात फ्रान्सच्या प्रमुखांना 22 जुन 1940 ला शरणागती पत्कारत शस्त्रसंधी करार करायला लावला. फ्रान्सच्या लष्करी कमकुवतपणाचा अंदाज फक्त हिटलरलाच आला होता त्यामुळे सेनानीँच्या विरोधाला न जुमानता त्याने फ्रान्सचा पराभव केला. 5) ज्या ब्रिटीशांच्या संपुर्ण जगात वसाहती होत्या त्या ब्रिटीशांना एकट्या हिटलरने BLITZCREIG तंत्राचा वापर करुन पळता भुई थोडी केली. भुमध्य समुद्रातील क्रिट बेट मिळवत ब्रिटीशांना पाऊल ठेवायला जागा ठेवली नाही आणि रोमेलच्या साहाय्याने इजिप्तला पराभुत करुन इंग्लंडला सगळ्या बाजुंनी कोँडले. 6) बाल्कन प्रदेशात हिटलरने युद्ध करुन ग्रीकांना पराभुत केले आणि युगोस्लोव्हाकियाचा घास गिळला. 7) मुत्सद्देगिरीच्या जोरावरच रुसो-जर्मन कराराची अभुतपुर्व घटना हिटलरने घडवुन आणली. पहिल्या महायुद्धात पश्चिम आघाडी उद्ध्वस्त करण्यासाठी जर्मनीला 4 वर्ष लागली होती पण हा चमत्कार हिटलरने केवळ सव्वा महिन्यात केला. इतरांचे राष्ट्रीय नेत्रुत्व दुबळे पडत असेल तर ती दुर्बलता अचुक हेरुन वाढवली हिटलरनेच...! त्याच्या या सर्व विजयाची तुलना केवळ फ्रेडरिक द ग्रेट किँवा नेपोलियन बोनापार्ट यांच्याशीच होऊ शकत होती.हिटलर 19 व्या शतकातील सर्वशक्तीमान व्यक्तिमत्व होते. जर्मन राष्ट्रवादाला त्याने अशी फुंकर घातली की सारे जग स्तिमीत झाले. जर्मनीवर अखंड 12 वर्षे तर युरोपवर 4 वर्षे सत्ता प्रस्थापित केली. पहिल्या महायुद्धात झालेल्या अपमानाचा सुड घेतल्याचे समाधान त्याने जर्मनीला मिळवुन दिले. लक्षात ठेवा कोणतेही युद्ध भयानकच असते पण देशाची बेईज्जत त्यापेक्षा भयानक असते. हिटलरच्या ज्या विकासाविषयी मी सांगतोय तो काय होता ते सांगतो-: 1) हिटलरने शिक्षणाव्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवत शारिरीक शिक्षण सक्तीचे केले. 2) शेतक-यांची हलाखीची परिस्थिती सुधारण्यासाठी शेतजमिनीची विक्री बेकायदेशीर ठरवल्याने शेतकरी आपल्या शेतावर बांधला गेला. राईश अन्नसाठा यंत्रणेत शेतक-यांना अन्नधान्याच्या पुरेशा कायदेशीर व निश्चित किँमती बांधुन दिल्याने जर्मनी अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाला. 3) जे कारखानदार रोजगार वाढवुन बेकारी नष्ट करतील अशा कारखानदारांना करमाफी देण्यात आली. त्यामुळे कारखानदार व कामगार वर्ग हिटलरवर खुष होते. 4) जर्मनीने आर्थिक क्षेत्रातप्रगती केली ती शस्त्रोत्पादनां च्या धोरणामुळेच. या सर्व योजनेला युद्धकालीन अर्थकारण म्हणतात. 5) हिटलरने CHANCELLER होताच सर्व राजकीय व सामाजिक संघटनांना शरणागती पत्करण्यास सांगुन पुर्ण जर्मनीला "एक विधान एक निशाण एक प्रधान" मिळवुन दिले. जे कार्य करण्याचे धारिष्ट्य प्रिन्स बिस्मार्क व वायमर प्रजासत्ताकला झाले नाही ते कार्य रक्ताचा एक थेंब न सांडता हिटलरने प्रत्यक्षात उतरवले. हिटलर राजवटीत 3 वर्षातच बेकारी नष्ट होऊन उद्योग आणि व्यापार यांची चक्रे प्रचंड गतीने फिरताना दिसु लागली. कोणत्याही अन्य राजवटीने 3 वर्षात एवढे यश मिळवले नसेल. हिटलरच्या या विकासाच महत्व अजुन वाढत कारण त्यावेळी जर्मनीतील परिस्थिती पुर्णतः प्रतिकुल होती. अशा परिस्थितीत हिटलर 30 जानेवारी 1933 ला जर्मनीचा CHANCELLER झाला आणि पुढील 5 वर्षात त्याने जर्मनीचा जो काही विकास केला त्यामुळे जर्मनीची गणती जगातील सर्वशक्तीमान राष्ट्रात होऊ लागली आणि 1 सप्टेँबर 1939 पर्यँत दुस-या महायुद्धास सामोरे जाऊन आपल्या अपमानाचा बदला घेण्याची ताकद या राष्ट्रात आली. हिटलरने कोणत्या परिस्थितीत विकास साधला हे जाणुन घ्यायला अगोदर जर्मनीतील प्रतिकुल परिस्थिती जाणुन घेणे आवश्यक आहे. 1) पहिल्या महायुद्धातील पराभवानंतर 1$ ला 4 MARKS असलेली जर्मन चलनाची किंमत 1$ ला 10000 MARKS एवढी कमी झाली होती. 2) व्हर्सायच्या तहाने जर्मनीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन जाचक अटी लादण्यात आल्या होत्या. प्रत्येक गोष्टीत जर्मनीला बाकी राष्ट्रांकडुन प्रथम परवानगी घ्यावी लागत होती अशा परिस्थितीत अन्यायाने त्रस्त जर्मनीला सावरले ते हिटलरनेच...!!! या तहाच्या सर्व अटी झुगारुन देत चतुराईने त्याने इंग्लंडकडुन 35% आरमार उभारण्याचे स्वातंत्र्य मिळवले आणि थोड्याच काळात जर्मनीला एवढे बलशाली बनवले की. ज्या इंग्लंड सारख्या देशांनी जर्मनीवर अटी लादल्या होत्या तेच देश युद्धाच्या भितीने हिटलरच्या अटी मान्य करु लागले होते. देशाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावणाऱ्या राष्ट्रभक्त हिटलरला माझा सलाम....! राष्ट्रभक्त हिटलरला माझा सलाम....!
  • Log in or register to post comments
  • 66599 views

प्रतिक्रिया

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 02/21/2013 - 12:22

Permalink

टाळ्या!! जोर्दार टाळ्या!!

टाळ्या!! जोर्दार टाळ्या!! मिपावर बाकीचे लोक जरा मूर्खच आहेत, असले लेख वारंवार वाचल्यास सिलेक्टिव्ह रीडिंगचे उत्तम शिक्षण मिळेल त्यांना, च्यायला कोणी ऐकतच नै.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अनिकेतदळवी

Submitted by अनिकेतदळवी on गुरुवार, 02/21/2013 - 12:24

In reply to टाळ्या!! जोर्दार टाळ्या!! by बॅटमॅन

Permalink

धन्यवाद

धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on गुरुवार, 02/21/2013 - 13:06

In reply to टाळ्या!! जोर्दार टाळ्या!! by बॅटमॅन

Permalink

जोरदार अनुमोदन

बॅट्याला जोरदार अनुमोदन. राष्ट्रभक्तीने थबथबून ओथंबणारा धबाबा प्रेरणेचा धबधबा लिहिणार्‍यांनी इतक्यातच थांबू नये. ज्ञानाचे तुषारकण असेच मिपावर उडवित रहावेत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 02/21/2013 - 13:23

In reply to जोरदार अनुमोदन by मन१

Permalink

+२

सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by लॉरी टांगटूंगकर on गुरुवार, 02/21/2013 - 13:37

In reply to जोरदार अनुमोदन by मन१

Permalink

+३

मी पण सहमत !!!
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on गुरुवार, 02/21/2013 - 15:04

In reply to जोरदार अनुमोदन by मन१

Permalink

+४

ह्येच बोलतो....
  • Log in or register to post comments

Submitted by मालोजीराव on गुरुवार, 02/21/2013 - 17:49

In reply to जोरदार अनुमोदन by मन१

Permalink

माझ्याकडून धागा लेखकाला या

माझ्याकडून धागा लेखकाला या हाटेलात एक झाक्क कॉफी ! Image removed.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on गुरुवार, 02/21/2013 - 22:12

In reply to जोरदार अनुमोदन by मन१

Permalink

+५

कॉफि संपल्यावर धागा लेखकाला हॉटेलात एक मिसळपावही देण्यात येइल...
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 02/21/2013 - 13:19

Permalink

रक्ताचा एक थेंब न सांडता

रक्ताचा एक थेंब न गाळता, न सांडता कार्य करणार्‍या लोकांचे कौतुक वाटते. लोक कायमच नावे ठेवतातच म्हणे गळा दाबुन , विषारी गॅस देउन, आगीत जाळून, विरोधात गेलेल्या सगळ्यांना तुरुंगात डांबून, सुप्रीम आर्यन रेस करायच्या नादात जिप्सी, ज्यु, अन्य वंशीय यांना विशिष्ट वैद्यकीय सेवा देउन, व नंतर तुरुंगात, छावण्यात विल्हेवाट लावून इ मार्गाने पण जमवले बॉ हिटलरने. मान्य केलेच पाहीजे ह्या हिटलरने स्वताचे व करोडो लोकांचे रक्त आट्वले. आता संचारबंदी तोडून बेकायदा गोळा होणार्‍या बेशीस्त लोकांना धडा शिकवणार्‍या कार्यक्षम सरकारी अधिकार्यावर म्हणजे आपले जनरल डायर हो, एक फर्मास लेख येउ द्या!
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on गुरुवार, 02/21/2013 - 13:40

In reply to रक्ताचा एक थेंब न सांडता by सहज

Permalink

उ त्त म क ल्प ना स् ह ज्रा व

उ त्त म क ल्प ना स् ह ज्रा व
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on गुरुवार, 02/21/2013 - 13:46

In reply to रक्ताचा एक थेंब न सांडता by सहज

Permalink

पोल पॉट आणि मुगाबे या प्रखर

पोल पॉट आणि मुगाबे या प्रखर राष्ट्रभक्तांवरही एक एक लेख पाहिजे
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on गुरुवार, 02/21/2013 - 13:21

Permalink

अरे ब्बापरे! असं आहे होय!

अरे ब्बापरे! असं आहे होय!
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 02/21/2013 - 13:31

Permalink

कोणत्याही माणसाच्या दोन बाजू

कोणत्याही माणसाच्या दोन बाजू असतात. काळी आणि पांढरी... आणि माणूस कधीच फक्त काळा किंवा फक्त पांढरा नसतो. तो नेहमीच राखाडी असतो. फिकट किंवा काळपट एवढाच काय तो फरक. हे सगळे मान्य असल्यामुळे, किंबहुना हे माझेच मत असल्यामुळे, हिटलरमधेही काही चांगल्या गोष्टी होत्या याबद्दल मला संशय नाहीच. मात्र वर उल्लेखिलेल्या कोणत्याही 'अचिव्हमेंट्स' या केवळ त्याच्यामुळे होऊ शकल्या नाहीत तर त्यात अजूनही काही लोकांचा हातभार लागला होता. तसा तो प्रत्येकच नायकाच्या बाबतीत असतो. त्यामुळे कोणत्याही अचिव्हमेंट्सचं श्रेय सर्वस्वी एकाच माणसाला जात नाही... ते टीमला जातं. दुसरा मुद्दा असा की, वर उल्लेखिलेल्या सगळ्या गोष्टी खरंच अचिव्हमेंट होत्या का? उदा. तीन आठवड्यात पाडलेला पोलंडचा 'फडशा'! ही सरळ सरळ युद्धखोरी होती. Lebensraum अथवा Ostsiedlung वगैरे संकल्पनांचा तो वास्तवात आणलेला नंगानाच होता. याला तुम्ही अचिव्हमेंट म्हणत असाल तर म्हणा बापडे! अजून एक उदाहरण बघू... शारिरीक शिक्षण सक्तीचे केले वगैरे... जर्मन समाजाचे सरळ सरळ रेजिमेंटेशन केले गेले. ही पण बहुधा 'अचिव्हमेंट'च. असेल बापडी.. असं बरंच काही बोलता येईल... बरं हे ही जौद्या... एखाद्या माणसाला माणूस म्हणून स्वीकारणं आणि मग तो सलाम करण्याजोगा आहे की नाही हे ठरवणं... यासाठी त्या माणसाचा संपूर्णत्वाने विचार केला पाहिजे. चांगल्या आणि वाईट बाजू बघताना, जर का चांगल्या बाजू जास्त असतील तर मग सलाम वगैरे म्हणण्यात अर्थ आहे... अन्यथा, नुसत्या चांगल्या बाजूंपुरतंच ते कौतुक सिमित रहावं... हिटलरने जे काही केलं त्याचा साकल्याने विचार करता, 'माणसा'ला सलाम करण्याचं धार्ष्ट्य माझ्यात नाही. *** जाता जाता : मी सातवीत असताना, पहिल्यांदा, 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' वाचलं. त्यानंतर अजून काही वाचलं. त्या वयात मी प्रचंड हिटलर फॅन होतो. नंतर जसजसा मोठा होत गेलो तसतशी क्षितिजं विस्तारली, वाचन वाढलं.. आणि पुढे तर काही युरोपिअन लोकांशी चर्चा होऊ शकली. आणि मग पूर्ण भान आल्यावर माझी मतं बदलली. तुम्हालाही शुभेच्छा! (अजून काही मांडावंसं वाटलं तर नंतर सवडीने!) *** बादवे, तुम्हाला नरेंद्र मोदींनाही सलाम करावासा वाटतो का? जाणून घेण्यास उत्सुक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on गुरुवार, 02/21/2013 - 15:53

In reply to कोणत्याही माणसाच्या दोन बाजू by बिपिन कार्यकर्ते

Permalink

त्यात तुमची चूक नाही व

त्यात तुमची चूक नाही व प्रस्तूत लेखकाचीही नाही. पूर्वीची अनेक पुस्तके (मराठी) वाचली की हिटलर हा हिरोच वाटतो. मी लिहिलेले पुस्तक अजून तीन चार महिन्यात प्रकाशीत होईल त्यात हिटलर हा सर्व आघाड्यांवर शेवटी कसा पराभूत झाला हे कळेल व त्याला कारणीभूत तो नाझी होता हेच कारण कसे होते हे कळेल..............
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 02/21/2013 - 16:52

In reply to त्यात तुमची चूक नाही व by जयंत कुलकर्णी

Permalink

चला...

मी लिहिलेले पुस्तक अजून तीन चार महिन्यात प्रकाशीत होईल त्यात हिटलर हा सर्व आघाड्यांवर शेवटी कसा पराभूत झाला हे कळेल व त्याला कारणीभूत तो नाझी होता हेच कारण कसे होते हे कळेल..............
म्हणजे इतक्या वर्षांनी का होईना पण जगासमोर सत्य काय ते येणार म्हणा की.
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on गुरुवार, 02/21/2013 - 16:59

In reply to चला... by परिकथेतील राजकुमार

Permalink

परा सत्य सगळ्यांनाच माहीत आहे

परा सत्य सगळ्यांनाच माहीत आहे. फक्त नव नवीन माहिती प्रकाशात येत असते व त्यानुसार काही अनुमाने समोर ठेवावे लागतात. ती या पुस्तकात ठेवली आहेत. तसेच सगळ्या माहितीचा स्त्रोतही लिहिला आहे जेणे करुन वाचकाला पाहिजे असल्यास तेही वाचता येईल.....
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 02/21/2013 - 17:02

In reply to परा सत्य सगळ्यांनाच माहीत आहे by जयंत कुलकर्णी

Permalink

चिल्ल हो

जकुकाका. मी आपला उगा काड्या सारतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on गुरुवार, 02/21/2013 - 17:09

In reply to चिल्ल हो by परिकथेतील राजकुमार

Permalink

चील म्हणजे आता गोठलेले अस्वल

:-) चील म्हणजे आता गोठलेले अस्वल शोधणे आले. बघतो घरात आहे का कुठे ते...............
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on गुरुवार, 02/21/2013 - 18:45

In reply to कोणत्याही माणसाच्या दोन बाजू by बिपिन कार्यकर्ते

Permalink

सहमत आहे

बिपीनदाशी सहमत आहे. आपण कुठल्याही मानसाला आपल्याला हवा तसा रंगवाता येतो. आणि आपल्या देशात तर याची चढाओढच आहे. एखादा मानुस चांगला मानला की त्याचं सगळं अगदी १००% चांगलं आणि एखादा माणुस वाईट म्हणजे त्याचं सर्वच वाईट असं आपण मानतो. जे की १००% खरं नाही. प्रत्येक मानसात चांगल्यावाईटाची सरमिसळ असते. त्यात जो गुण एकूणात चांगला त्याला आपण चांगला म्हणतो आणि असंच उलट सुध्दा. तर आपण किंवा जग हिटलरला युध्दपिपासू मानतो. त्याने जर्मणीच्या मानभंगाचा सूड वगैरे घेतला असेल आणि जर्मणीचा प्रचंड विकास केला असेल मात्र तो अत्यंत क्रुर होता आणि वंशद्वेशी सुध्दा होता. त्याने केलेले हत्याकांड आज सुध्दा लोकांना तेवढ्याच तिव्रतेने आठवतात. यातनातळाच्या कथा आज सुद्धा चर्चील्या जातात. त्यामुळे एकूणात हिटलर म्हटल्यास मला तरी हेकेखोर, पाशवी, युध्दपिपासू, वंशद्वेष्टा व हिंसक असेच रंग ठळक होताना दिसतात. त्यामुळे हिटलरचे समर्थन नाही करू शकत. एकंदरीत तुमचा प्रयत्न छान आहे. लेखन करताना आत्मविश्वास दिसतोय. आपल्याला सकारात्मक व आवश्यक तेवढाच संदर्भ घ्यावा व मुद्दा सिध्दं झाल्यासारखा लिहावा असा दिसतो. (मी चुकत असेन कदाचित.) या प्रकारे लिहीतो म्हटल्यावर रावण, अनेक असूर, भारतावरील परकिय आक्रमक सुध्दा असेच गौरविता येतील. मला तरी हे पटत नाही. - नीलकांत
  • Log in or register to post comments
Profile picture for user अनिकेतदळवी

Submitted by अनिकेतदळवी on गुरुवार, 02/21/2013 - 23:05

In reply to सहमत आहे by नीलकांत

Permalink

तुमंच म्ह्णनं बरोबर आहे थोडंस

तुमंच म्ह्णनं बरोबर आहे थोडंस. पण आपण त्याच्या वाईट बाजुच जास्त ऐकुन आहोत. पण त्याला अशी नांव ठेवण्यापुर्वी त्याची चांगली बाजू सुद्धा समजून घेतली पाहिजे ना
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचंड तापट on Fri, 02/22/2013 - 11:26

In reply to तुमंच म्ह्णनं बरोबर आहे थोडंस by अनिकेतदळवी

Permalink

सहमत....

सहमत....
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल खरे on गुरुवार, 02/21/2013 - 20:53

In reply to कोणत्याही माणसाच्या दोन बाजू by बिपिन कार्यकर्ते

Permalink

कैच्याकै

हिटलर आणि मोदींची तुलना ??? हिटलर आणि जनरल डायरची तुलना नाही. हिटलर आणि दिल्लीमधील शीख दंगलीतील आरोपींची तुलना नाही. हिटलर आणि काश्मीर मध्ये हिंदुंना ठार मारणा-या दहशतवाद्यांची तुलना नाही. हिटलर आणि तालिबानी लोकांची तुलना नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील. पुर्वीचे बॅलन्स्ड बिका कोणी परत आणु शकेल का ?
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on गुरुवार, 02/21/2013 - 22:50

In reply to कैच्याकै by अमोल खरे

Permalink

+१

माओवाद्यांना नि:शस्त्र गांधीवादी म्हणवणार्‍या लोकांच्या कळपात वावरणार्‍यांकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचंड तापट on Fri, 02/22/2013 - 11:27

In reply to +१ by पुण्याचे वटवाघूळ

Permalink

एक नंबर.... मला कमेंट खुपच

एक नंबर.... मला कमेंट खुपच आवडली....
  • Log in or register to post comments

Submitted by आदिजोशी on गुरुवार, 02/21/2013 - 21:13

In reply to कोणत्याही माणसाच्या दोन बाजू by बिपिन कार्यकर्ते

Permalink

अती झालं

हिटलर आणी मोदींची तुलना खूप म्हणजे खूपच अती झाली. एक तर तुम्हाला मोदींची माहिती नाही अथवा हिटलरची माहिती नाही. अर्थात प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य असल्याने कुणीही कसाही विचार करावा. मला मात्र मोदींन सलाम करावासा नक्कीच वाटतो. आणि भारताचे पंतप्रधान म्हणूनही त्यांना बघायला आवडेल. आजच हैदराबाद मधे झालेल्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर तर गां*त दम असलेला (सगळ्याच बाबतीत) मोदींसारखाच पंतप्रधान भारताला हवा हे माझं मत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on गुरुवार, 02/21/2013 - 21:42

In reply to अती झालं by आदिजोशी

Permalink

+१

+१ मोदी दुरद्रुष्टी असणारे नेते आहेत. प्रधानमंत्री म्हणुन त्यांना पहायला नक्कीच आवडेल. मोदी आणि हिटलर ची तुलना होऊ शकत नाही. राष्ट्र्भक्ती हा हिटलर चा गुण चांगला होता. तसेच तो एक उत्क्रुष्ट सेनानी होता. पण तरीही ज्युंच्या हत्याकांडाचं समर्थन करता येऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 02/21/2013 - 21:43

In reply to अती झालं by आदिजोशी

Permalink

आदी, तुलना मोदी आणि हिटलरची

आदी, तुलना मोदी आणि हिटलरची केलेली नाहीये... असो.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 02/21/2013 - 21:51

In reply to आदी, तुलना मोदी आणि हिटलरची by बिपिन कार्यकर्ते

Permalink

ओह्ह!

ओह्ह! मला वाटलं दोघे "तत्त्वतः सारखेच".
  • Log in or register to post comments

Submitted by हारुन शेख on गुरुवार, 02/21/2013 - 21:59

In reply to ओह्ह! by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

तुल्यबळ नाही

आपल्या अधिकाराखाली असलेल्या यंत्रणेचा उपयोग लोकांना मारण्यासाठी करण्याचा निकष लावला तर तुलना होऊ शकते. पण तुल्यबळ नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 02/21/2013 - 22:25

In reply to तुल्यबळ नाही by हारुन शेख

Permalink

+१

एक हिटलर मुळात होऊन गेल्यानंतर पुन्हा तसाच राक्षस उभा रहाणं आणखी कठीण होतं. लोकं थोडे अधिक हुशार होतात. हिटलरला त्या काळच्या जर्मन विचारवंतांनी पाठींबा दिला होता. अनेक हुशार, श्रीमंत, प्रभावशाली जर्मन ज्यू लोकांनीही सुरूवातीला हिटलरकडे दुर्लक्ष करण्याची चूक केली होतीच. आता वेगवेगळ्या देशातल्या हिटलर बनू पहाणार्‍या लोकांना एवढं सपाट मैदान मिळत नाही. विचारवंत आरडाओरडा सुरू करतात. (याचं समांतर उदाहरण शेअर बाजारातल्या घोटाळ्यांकडे पहाता येईल. एकदा घोटाळा झाल्यावर सेबी वगैरे प्रकार झाले, घोटाळे करणं आणखी कठीण झालं.) तत्त्व म्हणून (ज्यात आकडे वगळता येतात) "आपल्या अधिकाराखाली असलेल्या यंत्रणेचा उपयोग वेगळ्या धर्माच्या लोकांना मारण्यासाठी" केला यात दोघांमधे साधर्म्य आहेच. (तिरका ठसा माझा.) हे एक झालं. आता दुसरं पहा: इथे हे सापडलं:
To keep up the purity of the Race and its culture, Germany shocked the world by her purging the country of the Semitic races—the Jews. Race pride at its highest has been manifested here. Germany has also shown how well nigh impossible it is for Races and cultures, having differences going to the root, to be assimilated into one united whole, a good lesson for us in Hindustan to learn and profit by"[34][35] — M. S. Golwalkar
ज्या संघात मोदींच्या भाजपची मुळं शोधता येतात, त्यांच्या माजी प्रमुखांचं जर्मनीच्या वांशिक अशुद्धता हटवण्याच्या कार्यक्रमाबद्दल उच्च मत होतं.
  • Log in or register to post comments

Submitted by हारुन शेख on गुरुवार, 02/21/2013 - 22:54

In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

सहमत!

सहमत आहे तुमच्या मताशी. तुमचा प्रतिसाद वाचून खालील अवतरण आठवले. First they came for the Socialists, and I did not speak out-- Because I was not a Socialist. Then they came for the Trade Unionists, and I did not speak out-- Because I was not a Trade Unionist. Then they came for the Jews, and I did not speak out-- Because I was not a Jew. Then they came for me--and there was no one left to speak for me. -- Martin Niemöller
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sat, 02/23/2013 - 00:50

In reply to सहमत! by हारुन शेख

Permalink

काश्मीर

हेच आता पाकीस्तान आणि दहशतावादी म्हणजे काय हे समजल्यावर काश्मीरींमधे होत आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on गुरुवार, 02/21/2013 - 22:57

In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

कैच्याकै

तत्त्व म्हणून (ज्यात आकडे वगळता येतात) "आपल्या अधिकाराखाली असलेल्या यंत्रणेचा उपयोग वेगळ्या धर्माच्या लोकांना मारण्यासाठी" केला यात दोघांमधे साधर्म्य आहेच.
सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या एस.आय.टी नेच मोदींविरूध्द खटला भरण्याइतका पुरावा नाही असे म्हटले आहे त्याचे काय? म्हणजे मोदींनी दुसर्‍या धर्माच्या लोकांना मारायला सरकारी यंत्रणेचा वापर केला असे तुम्हाला वाटत असले तरी ती सत्य परिस्थिती नाही हे सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या यंत्रणेनेच म्हटले आहे. तेव्हा हिटलरबरोबर मोदींचे नाव घ्यायचे कारण समजले नाही. विषय काहीही असला तरी बादरायण संबंध लावून त्यात संघ इत्यादींवर गरळ ओकण्यात तुमचा हात कोणीच धरू शकणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by हारुन शेख on गुरुवार, 02/21/2013 - 23:32

In reply to कैच्याकै by पुण्याचे वटवाघूळ

Permalink

यंत्रणेचा वापर न करणे हा देखील यंत्रणेचा वापरच.

यंत्रणेचा वापर न करणे हा देखील यंत्रणेचा वापरच. माननीय वाजपेयी साहेबांनी दिलेले 'राजधर्माचे पालन करा' वैगेरे घरचे अहेर कसे विसरता. वाजपेयींसारखे नेते भाजपला परत घडविता येतील अशी अपेक्षा आहे त्या पक्षाकडून. कारण कॉंग्रेसचा अतिशय कंटाळा आला आहे आता.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 02/21/2013 - 23:36

In reply to यंत्रणेचा वापर न करणे हा देखील यंत्रणेचा वापरच. by हारुन शेख

Permalink

वापर नव्हे गैरवापर

यंत्रणेचा वापर न करणे हा देखील यंत्रणेचा वापरच
यंत्रणेचा वापर न करणे हा देखील यंत्रणेचा गैरवापरच. या धाग्यावर हा प्रमुख विषय आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 02/21/2013 - 23:40

In reply to कैच्याकै by पुण्याचे वटवाघूळ

Permalink

धन्यवाद

Any publicity is good publicity. तेव्हा माझं महत्त्व वाढवण्याबद्दल अनेक आभार. हे तर होत राहिलच. असो. माया कोदनानी, अमित (शहा बहुदा) हे मोदींच्या मंत्रीमंडळातले तेव्हाचे मंत्री, बाबू बजरंगी वगैरेंवर अंमळ गूगल करणार का?
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on Fri, 02/22/2013 - 07:38

In reply to धन्यवाद by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

वा वा

माया कोदनानी, अमित (शहा बहुदा) हे मोदींच्या मंत्रीमंडळातले तेव्हाचे मंत्री, बाबू बजरंगी वगैरेंवर अंमळ गूगल करणार का?
अमित शहांचा गुजरात २००२ दंगलींमध्ये काहीही हात नव्हता.आणि त्यांच्यावर जो काही आरोप आहे तो नंतरचा (सोहराबुद्दिन एनकाऊंटर) आणि तो ही सिध्द व्हायचा आहे. गुन्हा सिध्द व्हायचा आहे तोपर्यंत कोणाला मंत्रीमंडळात ठेवायचे हा मोदींचा प्रश्न आहे. तुमच्यासारख्या विचारवंतांनी काही बोलले तरी त्यावर त्याप्रमाणे कृती करायला मोदी अजिबात बांधिल नाहीत. राहिली गोष्ट माया कोडनानींची. आणि राजीव गांधींच्या मंत्रीमंडळात हरकिशनलाल भगत होते, जगदिश टायटलर अगदी २००५ पर्यंत मंत्री होते, सज्जन कुमार अगदी अलीकडच्या काळापर्यंत खासदार होते हे प्रश्न तुमच्यासारखे विचारवंत का विचारायला जात नाहीत?
  • Log in or register to post comments

Submitted by रामपुरी on Tue, 02/26/2013 - 03:39

In reply to वा वा by पुण्याचे वटवाघूळ

Permalink

खिक्क

हल्ली "विचारवंत" हा शब्द वाचला की "विचारजंत" हाच शब्द जास्त योग्य वाटायला लागतो... असो
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on गुरुवार, 02/21/2013 - 23:31

In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

आदिती देवीं नंतर

आदिती देवीं नंतर ते ठराविक लोक नाही आले
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचंड तापट on Fri, 02/22/2013 - 11:30

In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

विक्षीप्त... अजुन काय बोलणार

विक्षीप्त... अजुन काय बोलणार आपणास....
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sat, 02/23/2013 - 00:47

In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

चावून चावून चोथा

इथे हे सापडलं:
तुम्हाला ते वाक्य जिथे सापडले तेथेच "The neutrality of this article is disputed." असे देखील लिहीलेले आहे. असो. त्या व्यतिरीक्त असल्या (तुम्ही वर उर्धृत केलेल्या) कोटेशन्सना Contextomy - Fallacy of quoting out of context म्हणतात. ती डाव्या/कम्युनिस्टांमधे जास्त आढळणारी पद्धत आहे. गोबेल्सच्या तंत्रासारखेच काहीतरी. गोळवलकरांचे ते विधान ज्या वर्षातले आहे, त्याच सुमारास (किंचित आधीच) जेंव्हा टाईम मॅगझिनने हिटलरला पर्सन ऑफ दी इयर म्हणलेले होते. त्याच वर्षात हिटलरला नोबेल शांतता पुरस्कारासाठी देखील विचारात घेतले होते. विकीवर गोळवलकरांची अजूनही दोन नंतरची विधाने सापडली: "The Christians committed all sorts of atrocities on the Jews by giving them the label “Killers of Christ”. Hitler is not an exception but a culmination of the 2000-year long oppression of the Jews by the Christians." आणि "The Jews had maintained their race, religion, culture and language; and all they wanted was their natural territory to complete their Nationality" अजून बरेच काही लिहीता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 02/21/2013 - 22:58

In reply to तुल्यबळ नाही by हारुन शेख

Permalink

@अदिती : हो... हारून शेख

@अदिती : हो... हारून शेख म्हणतात त्याप्रमाणे तत्त्वतः सारखेच. (मात्र अजूनही मोदींवरचे आरोप न्यायालयात सिद्ध व्हायचे आहेतच.) तुझ्याशी सहमत आहे. मात्र स्केलचा फरक असल्याने तुल्यबळ नाही. बाकी माझ्या मूळ प्रतिसादात मी फक्त प्रश्न विचारला होता, त्याला तुलना समजणार्‍यांबद्दल काय बोलावे! :)
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on गुरुवार, 02/21/2013 - 23:06

In reply to @अदिती : हो... हारून शेख by बिपिन कार्यकर्ते

Permalink

>>>>हो... हारून शेख म्हणतात

>>>>हो... हारून शेख म्हणतात त्याप्रमाणे तत्त्वतः सारखेच. (मात्र अजूनही मोदींवरचे आरोप न्यायालयात सिद्ध व्हायचे आहेतच.) तुझ्याशी सहमत आहे. मात्र स्केलचा फरक असल्याने तुल्यबळ नाही. आरोप सिद्ध झाले नसतील तर तत्वतः सारखे कसे म्हणता येईल? तत्वतः सारखे म्हणण्यासाठी कृतीतील साधर्म्य सिद्ध व्हायला हवे, तुल्यबळता त्यानंतर विचारात घेता येईल. आरोप सिद्ध होण्यापूर्वी साधर्म्य आहे असे मानणे / लिहिणे / प्रतिपादन करणे याचा अर्थ आरोप सिद्ध होवो न होवो साधर्म्य मानले आहे असे दिसते. न्यायालयात आरोप सिद्ध झाल्यास वक्तव्याला पुष्टी मिळेल परंतु न्यायालयात आरोप सिद्ध न झाल्यास वक्तव्य मागे घ्यावे लागेल. न घेतल्यास न्यायालयीन प्रक्रियेला किंमत देत नाही असे होते, आणि असे वक्तव्य मागे घेतल्यास न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्यापुर्वीच निष्कर्ष तो सुद्धा सोईस्कर काढून मोकळे झाले होते असे सिद्ध होईल. एकंदरीत केवळ विचारवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी केलेला आटापीटा एवढंच ह्या वक्तव्याचा अर्थ. बिका, माफ करा पण इतके हास्यास्पद विचार कधीच नव्हते तुमचे. वाईट वाटले.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 02/21/2013 - 23:28

In reply to @अदिती : हो... हारून शेख by बिपिन कार्यकर्ते

Permalink

माया कोदनानी, अमित ....

माया कोदनानी, अमित .... (आडनाव विसरले, शहा बहुतेक) या मोदींच्या मंत्रीमंडळातल्या लोकांवरचे आरोप आधीच सिद्ध झालेले आहेत. लिंका शोधून आणू का स्वतःच्या स्वतः शोधणार? त्यातून कोदनानी सिंधी म्हणून मोदींनी त्यांना पाठीशी घातलं नाही, गुजराथी मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न केला वगैरेंच्या लिंकाही स्वतःच शोधून घेतल्यात तर बरं. (मला व्यक्तिशः) "तत्त्वतः सारखेच" याचा (सध्याचा) अर्थ वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 02/21/2013 - 23:45

In reply to तुल्यबळ नाही by हारुन शेख

Permalink

हे तुम्ही

हे तुम्ही काश्मीरमध्ये जे ९० सालापासून चालू आहे त्याबद्दल म्हणत आहात का?
  • Log in or register to post comments

Submitted by गब्रिएल on Fri, 02/22/2013 - 12:34

In reply to तुल्यबळ नाही by हारुन शेख

Permalink

तशी सिद्ध झालेली अनेक एकजाम्पलस इतिहासात आणि आतासुद्धा

तशी सिद्ध झालेली अनेक एकजाम्पलस इतिहासात आणि आतासुद्धा आहेतच की, हिटलरपरयन्त जायची पन गरज नाय... फक्त डोळे उघडून आजूबाजुला बघायला शिकले पाहिजे आणि खरे स्विकारण्याची हिम्मत असायला पाहिजे, बस. मात्र सिद्ध न झालेल्या गोष्टी सतत उगाळत राहण्याला आणि सिद्ध झालेल्या गोष्टींकडे ब्लाइंड आय करण्याला हायपोक्रसी म्हणतात असे वाचले आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अनिकेतदळवी

Submitted by अनिकेतदळवी on गुरुवार, 02/21/2013 - 22:36

In reply to कोणत्याही माणसाच्या दोन बाजू by बिपिन कार्यकर्ते

Permalink

फक्त ज्युची ह्त्या केली

फक्त ज्युची ह्त्या केली एवढ्याच गोष्टी जास्त पुढारपणाने सांगितल्या जातात. पण का केली ह्या मागे हिट्लरची भावना काय होती. जर्मनीचा पहिल्या महायुद्धात झालेला पराभव हा ज्यु मुळे झाला म्ह्णुन त्याने त्यांचीच कत्तल केली. आणि आपल्या राष्ट्रावर झालेल्या अन्यायाचा हिटलरने सुड उगवला. ज्या प्रकारे स्व:ता च्या राष्ट्राला पुन्हा जो मान मिळ्वुन दिला. हिटलर मध्ल्या त्या राष्ट्र्भक्ताला सलाम. आणि आता राहिलं मोदीं च्या सलामाचं तर असे बरेच राजकारणी आपल्या देशात आहेत. पण ते फक्त खाण्यातच व्यस्त.खाण्याबद्द्ल माझ काही म्ह्णणे नाही. पण ते फक्त लोकांना दिसेल असा पैसाच खात आहेत. त्यांना दिसतील अशी काम करण्याच्या नावाने मात्र बोंब आहे
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on गुरुवार, 02/21/2013 - 13:37

Permalink

अ य्या म्है त च न्ह व तं

अ य्या म्है त च न्ह व तं चा न चा न
  • Log in or register to post comments

Submitted by राही on गुरुवार, 02/21/2013 - 13:57

Permalink

बरे आहात ना?

वी हाय्झन झी? कस्काय चाल्लंय?रुडी हाय ना?
  • Log in or register to post comments

Submitted by आनंद घारे on गुरुवार, 02/21/2013 - 17:23

Permalink

आणखी बरेच आहेत

चंगेजखान, नादिरशाह, महम्मद घोरी, अल्लाउद्दीन खिलजी वगैरे इतिहासातले अनेक दाखले आहेत. या सगळ्या क्रूरकर्म्यांनी त्यांच्या तथाकथित 'राष्ट्रां'चा भरपूर विस्तार केला होता. पुराणकालात तर वृत्रासुरापासून भस्मासुरापर्यंत अनेक असुरांनी माणसांचा संहार करून त्यांच्या लोकसंख्येला आळा घातला होता आणि त्यांना दानवांच्या अधिपत्याखाली आणले होते. त्या लोकांच्या दृष्टीने ते सगळे हिटलर इतकेच महान होते असे म्हणावे लागेल. त्या सर्वांचा जयजयकार करणारे त्यांचे चाहते त्यांच्या काळात उदंड होतेच, पण आता नव्याने त्यांचे गुणगान करणारे तयार झाले आहेत वाटते!
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page पुढे ›
  • Last page शेवटी »

© 2026 Misalpav.com