✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

राष्ट्रभक्त हिटलरला

अ
अनिकेतदळवी यांनी
गुरुवार, 02/21/2013 - 12:20  ·  लेख
लेख
हिटलरचा इतिहास माहीत नसताना फक्त त्याने युद्धात केलेला संहार आणि ज्युंची केलेली कत्तल म्हणून त्याला शिव्या देणारे भरपूर जण आहेत. जर आपल प्रभुत्व गाजवायच असेल तर प्रथम त्या लायकीच व्हाव लागत आणि हिटलरने तेच केल.मी हिटलरने महायुद्धात नेमक काय जिँकल होत तेच सांगतो-: 1) फ्रान्सकडुन व्हर्सायच्या तहान्वये गेलेला RHINELAND प्रांत सार प्रांत, AUSTRIYA हा 70 लाख लोकसंख्येचा प्रदेश, त्याचप्रमाणे झेकोस्लोवहाकिया, हंगेरी हे देश फक्त धमकीच्या जोरावर रक्ताचा एकही थेंब न गाळता त्याने युद्धाआधीच मिळवले. 2) पोलंडचा तीन आठवड्यात फडशा पाडुन पोलंड मिळवला. 3) 15 दिवसात डेन्मार्क आणि नाँर्वेच्या राजांना बिनशर्त शरणागती पत्करायला लावली. 4) ज्या फ्रान्सने पहिल्या महायुद्धात जर्मनीला रेल्वेच्या डब्यात शरणागती पत्करायला लावुन आपल्या शौर्याचे प्रतिक म्हणुन तो डबा आपल्या देशात नेला होता त्याच फ्रान्सचा महिन्याच्या आत पाडाव करुन देशाच्या अपमानाचा बदला घेताना त्याच रेल्वेच्या डब्यात फ्रान्सच्या प्रमुखांना 22 जुन 1940 ला शरणागती पत्कारत शस्त्रसंधी करार करायला लावला. फ्रान्सच्या लष्करी कमकुवतपणाचा अंदाज फक्त हिटलरलाच आला होता त्यामुळे सेनानीँच्या विरोधाला न जुमानता त्याने फ्रान्सचा पराभव केला. 5) ज्या ब्रिटीशांच्या संपुर्ण जगात वसाहती होत्या त्या ब्रिटीशांना एकट्या हिटलरने BLITZCREIG तंत्राचा वापर करुन पळता भुई थोडी केली. भुमध्य समुद्रातील क्रिट बेट मिळवत ब्रिटीशांना पाऊल ठेवायला जागा ठेवली नाही आणि रोमेलच्या साहाय्याने इजिप्तला पराभुत करुन इंग्लंडला सगळ्या बाजुंनी कोँडले. 6) बाल्कन प्रदेशात हिटलरने युद्ध करुन ग्रीकांना पराभुत केले आणि युगोस्लोव्हाकियाचा घास गिळला. 7) मुत्सद्देगिरीच्या जोरावरच रुसो-जर्मन कराराची अभुतपुर्व घटना हिटलरने घडवुन आणली. पहिल्या महायुद्धात पश्चिम आघाडी उद्ध्वस्त करण्यासाठी जर्मनीला 4 वर्ष लागली होती पण हा चमत्कार हिटलरने केवळ सव्वा महिन्यात केला. इतरांचे राष्ट्रीय नेत्रुत्व दुबळे पडत असेल तर ती दुर्बलता अचुक हेरुन वाढवली हिटलरनेच...! त्याच्या या सर्व विजयाची तुलना केवळ फ्रेडरिक द ग्रेट किँवा नेपोलियन बोनापार्ट यांच्याशीच होऊ शकत होती.हिटलर 19 व्या शतकातील सर्वशक्तीमान व्यक्तिमत्व होते. जर्मन राष्ट्रवादाला त्याने अशी फुंकर घातली की सारे जग स्तिमीत झाले. जर्मनीवर अखंड 12 वर्षे तर युरोपवर 4 वर्षे सत्ता प्रस्थापित केली. पहिल्या महायुद्धात झालेल्या अपमानाचा सुड घेतल्याचे समाधान त्याने जर्मनीला मिळवुन दिले. लक्षात ठेवा कोणतेही युद्ध भयानकच असते पण देशाची बेईज्जत त्यापेक्षा भयानक असते. हिटलरच्या ज्या विकासाविषयी मी सांगतोय तो काय होता ते सांगतो-: 1) हिटलरने शिक्षणाव्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवत शारिरीक शिक्षण सक्तीचे केले. 2) शेतक-यांची हलाखीची परिस्थिती सुधारण्यासाठी शेतजमिनीची विक्री बेकायदेशीर ठरवल्याने शेतकरी आपल्या शेतावर बांधला गेला. राईश अन्नसाठा यंत्रणेत शेतक-यांना अन्नधान्याच्या पुरेशा कायदेशीर व निश्चित किँमती बांधुन दिल्याने जर्मनी अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाला. 3) जे कारखानदार रोजगार वाढवुन बेकारी नष्ट करतील अशा कारखानदारांना करमाफी देण्यात आली. त्यामुळे कारखानदार व कामगार वर्ग हिटलरवर खुष होते. 4) जर्मनीने आर्थिक क्षेत्रातप्रगती केली ती शस्त्रोत्पादनां च्या धोरणामुळेच. या सर्व योजनेला युद्धकालीन अर्थकारण म्हणतात. 5) हिटलरने CHANCELLER होताच सर्व राजकीय व सामाजिक संघटनांना शरणागती पत्करण्यास सांगुन पुर्ण जर्मनीला "एक विधान एक निशाण एक प्रधान" मिळवुन दिले. जे कार्य करण्याचे धारिष्ट्य प्रिन्स बिस्मार्क व वायमर प्रजासत्ताकला झाले नाही ते कार्य रक्ताचा एक थेंब न सांडता हिटलरने प्रत्यक्षात उतरवले. हिटलर राजवटीत 3 वर्षातच बेकारी नष्ट होऊन उद्योग आणि व्यापार यांची चक्रे प्रचंड गतीने फिरताना दिसु लागली. कोणत्याही अन्य राजवटीने 3 वर्षात एवढे यश मिळवले नसेल. हिटलरच्या या विकासाच महत्व अजुन वाढत कारण त्यावेळी जर्मनीतील परिस्थिती पुर्णतः प्रतिकुल होती. अशा परिस्थितीत हिटलर 30 जानेवारी 1933 ला जर्मनीचा CHANCELLER झाला आणि पुढील 5 वर्षात त्याने जर्मनीचा जो काही विकास केला त्यामुळे जर्मनीची गणती जगातील सर्वशक्तीमान राष्ट्रात होऊ लागली आणि 1 सप्टेँबर 1939 पर्यँत दुस-या महायुद्धास सामोरे जाऊन आपल्या अपमानाचा बदला घेण्याची ताकद या राष्ट्रात आली. हिटलरने कोणत्या परिस्थितीत विकास साधला हे जाणुन घ्यायला अगोदर जर्मनीतील प्रतिकुल परिस्थिती जाणुन घेणे आवश्यक आहे. 1) पहिल्या महायुद्धातील पराभवानंतर 1$ ला 4 MARKS असलेली जर्मन चलनाची किंमत 1$ ला 10000 MARKS एवढी कमी झाली होती. 2) व्हर्सायच्या तहाने जर्मनीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन जाचक अटी लादण्यात आल्या होत्या. प्रत्येक गोष्टीत जर्मनीला बाकी राष्ट्रांकडुन प्रथम परवानगी घ्यावी लागत होती अशा परिस्थितीत अन्यायाने त्रस्त जर्मनीला सावरले ते हिटलरनेच...!!! या तहाच्या सर्व अटी झुगारुन देत चतुराईने त्याने इंग्लंडकडुन 35% आरमार उभारण्याचे स्वातंत्र्य मिळवले आणि थोड्याच काळात जर्मनीला एवढे बलशाली बनवले की. ज्या इंग्लंड सारख्या देशांनी जर्मनीवर अटी लादल्या होत्या तेच देश युद्धाच्या भितीने हिटलरच्या अटी मान्य करु लागले होते. देशाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावणाऱ्या राष्ट्रभक्त हिटलरला माझा सलाम....! राष्ट्रभक्त हिटलरला माझा सलाम....!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
66599 वाचन

💬 प्रतिसाद (213)

प्रतिक्रिया

ते ही आहेच

अर्धवटराव
Fri, 02/22/2013 - 23:14 नवीन
साम्राज्यवादी ब्रीटीश राजनेता चर्चील हिटलरशी देखील हात मिळवणी करु बघत होता हा माझा स्टँड अजुनही कायम आहे. असो. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

असहमत.

आनंदी गोपाळ
गुरुवार, 02/28/2013 - 21:48 नवीन
अमुक एका धर्माचा द्वेष करणे = फॅसिझम. मोदी = फॅसिस्ट. अर्धवटराव, तुम्ही जर कुणा धर्माचा द्वेष करता, तर तुम्हीदेखिल फॅसिस्टच. अन फॅसिझमचा अतिरेक हा फक्त जिनोसाईड अन कत्तलींत होतो. मोदी नामक एका मनुष्यावर 'आजपर्यंत गुन्हा सिद्ध झाला नाही' म्हणून तो 'क्लीन' असे बोलताना, भारतातल्या हजारो भ्रष्ट राजकारण्यांवर देखिल गुन्हे 'सिद्ध' झालेले नाहीत हे सोयिस्कर रित्या विसरता का तुम्ही?
हिटलर आणि मोदींची तुलना करणे हे बौद्धीक दिवाळखोरीचे आणखी एक अघोरी लक्षण. धन्य आहेत विचारवंत.
अजिब्बात नाही. ते विचार करून बोलतात म्हणूनच त्यांना विचारवंत तुम्ही देखिल म्हणता. तुम्हाला ती दिवाळखोरी वाटते हे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांवर बांधून घेतलेल्या झापडांचे ढळढळीत लक्षण आहे. अन अशीच झापडे बहुसंख्य जर्मन लोकांनी अन सुरुवातीच्या काळात अगदी ब्रिटीशांनीही बांधून घेतली होती, हा इतिहास आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

वरील प्रतिसादात,

आनंदी गोपाळ
गुरुवार, 02/28/2013 - 21:53 नवीन
हिटलर आणि मोदींची तुलना करणे हे बौद्धीक दिवाळखोरीचे आणखी एक अघोरी लक्षण. धन्य आहेत विचारवंत. अर्धवटाराव -रेडि टु थिंक
हे कोट कसे काय आले नाही ते नकळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

तर मग...

विकास
गुरुवार, 02/28/2013 - 22:20 नवीन
अमुक एका धर्माचा द्वेष करणे = फॅसिझम.
तर मग डावे विचारवंत, कम्युनिस्ट आणि त्यांच्या सारखाच विचार करणारे स्युडोसेक्यूलर्स हे सर्व फॅसिस्ट आहेत. शिवाय तुमच्या व्याख्येप्रमाणे मोदी हे द्वेष करतात असे कुठे दिसलेले नाहीत.
मोदी नामक एका मनुष्यावर 'आजपर्यंत गुन्हा सिद्ध झाला नाही' म्हणून तो 'क्लीन' असे बोलताना, भारतातल्या हजारो भ्रष्ट राजकारण्यांवर देखिल गुन्हे 'सिद्ध' झालेले नाहीत हे सोयिस्कर रित्या विसरता का तुम्ही?
ज्या हजारो भ्रष्ट राजकारण्यांवर गुन्हे सिद्ध झालेले नाहीत त्यांच्या त्याच (कोर्टात असलेल्या) गुन्ह्यांना माध्यमे आणि स्युडोसेक्यूलर्स रोज उगाळत बसत नाहीत. पण मोदींच्या बाबतीत तसे होताना दिसत नाही. त्याहूनही महत्वाचे म्हणजे ज्या टीस्टा सेटलवाडने ह्यात स्वत:ची प्रसिद्धी करून घेतली, त्या टीस्टा सेटलवाडने अनेक खोट्या गोष्टी सांगितल्या हे नंतर जगजाहीर झाले आहे. त्यामुळे मोदी कसे आहेत हा येथे प्रश्न नाही, ते जर दोषी असले तर त्यांना जास्तीत जास्त शिक्षा मिळूंदेत पण कोण खोटे बोलून विचहंट करणारे सर्व अतिरेक करत आहेत हा मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

असहमत

अर्धवटराव
गुरुवार, 02/28/2013 - 22:54 नवीन
>>अमुक एका धर्माचा द्वेष करणे = फॅसिझम. -- चूक. या न्यायाने ९०% मुस्लीम जगत फॅसीस्ट होते.. ते ही कुराण सर्टीफाईड फॅसीस्ट (ही थोडी अतीशयोक्ती आहे, मान्य). मला तुमची फॅसीझमची व्याख्या क्ळु देत. >>मोदी = फॅसिस्ट. -- परत चुक. भारतात (जागतीक पातळीवर देखील म्हणता येईल... पण सध्या भारताबद्दल मर्यादीत ठेवतो) धार्मीक द्वेष का आणि कसे आलेत याचा अर्थ-राज्य-न्याय-समाज शास्त्राने एकदा अभ्यास करुन बघा...अशी फॅसीस्ट लेबलं कुणाला लावण्याआधी शंभरदा विचार कराल. मोदीं आगमनापुर्वी धार्मीक सलोख्याच्या वातावरणात नांदणारं गुजरात एक मोदी आल्यावर अचानक धार्मीक कत्तलींचं केंद्र बनलं, असं काहिसा विचार करत असाल तर तुम्ही गुजराथी लोकांवर अत्यंत अन्याय करत आहात. (तसंही असा अन्याय टीस्टा मॅडम सारख्या मंडळी जाणुन बुजुन, चवीने करतात म्हणा) >>अर्धवटराव, तुम्ही जर कुणा धर्माचा द्वेष करता, तर तुम्हीदेखिल फॅसिस्टच. -- नो कमेण्ट्स. >>अन फॅसिझमचा अतिरेक हा फक्त जिनोसाईड अन कत्तलींत होतो. -- हिरोशीमा, नागासाकी, इराक, अफगाणीस्तान... जिनोसाईडची किती रुपं वर्णावी? >>मोदी नामक एका मनुष्यावर 'आजपर्यंत गुन्हा सिद्ध झाला नाही' म्हणून तो 'क्लीन' असे बोलताना, भारतातल्या हजारो भ्रष्ट राजकारण्यांवर देखिल गुन्हे 'सिद्ध' झालेले नाहीत हे सोयिस्कर रित्या विसरता का तुम्ही? -- तसं असेल तर मग भारतातले भ्रष्ट राजकारणी मोदी नामक मनुष्यापेक्षा कितीतरी जास्त घातक, गलीच्छ आणि राक्षसी वृत्तीचे झाले. गुजरात दंगलींमध्ये हजारोंच्या कत्तली झाल्या, पण या भ्रष्ट राजकारण्यंनी करोडो लोकांना हालहाल होऊन मरायची परिस्थीती निर्माण केली, त्यांच्या शरीराचीच नव्हे तर अक्ख्या भविष्याची नरकमय वाट लावली. मोदींवर फॅसीझमचे आरोप करणारी लेखणी जर प्रामाणीक असेल तर त्या लेखणीला धारण करणारे हात भ्रष्ट राजकारण्यांचा गळा दाबायला चिडुन उठले पाहिजेत. पण तसं दिसत नाहि. हि हिपॉक्रसी आहे डॉक्टर. >>तुम्हाला ती दिवाळखोरी वाटते हे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांवर बांधून घेतलेल्या झापडांचे ढळढळीत लक्षण आहे. -- अर्थात ती बौद्धीक दिवाळखोरी आहे. मोदी नामक कावीळ झाल्याचा तो परिणाम आहे, म्हणुन सर्व पिवळे दिसते आहे. अन्यथा भविष्यात भारताला काय दिवस बघावे लागणार आहेत याची झलक मुंबईच्या एका मैदानावर काहि महिन्यांपूर्वी रझा अ‍ॅकॅडमीने दाखवली आहे. अफझल गुरुच्या फाशी नंतर भारत मुर्दाबादच्या घोषणा अलीगड विद्यापीठावर निघालेल्या मोर्च्याने दिल्या, त्याही अजुन ताज्या आहेत. त्याकडे संपूर्ण दूर्लक्ष्य करण्याची झापडबंद दुर्बुद्धी विचारवंत दाखवतेच ना. भारतातले धार्मीक अंतर्प्रवाह कसे आहेत, त्यांचा इतीहास काय, राजकारणावर त्याचा कसा प्रभाव पडला, सध्याच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिमाणांवरुन त्यात भविष्यात काय फरक पडेल... याचा कुठलाही विचार न करता मोदीला हिटलरच्या वळाचणीला उभा करणे हे अक्षरशः बौद्धीक दिवाळाखोरीचे लक्षण आहे (ही दिवाळाखोरी जाहीर करायला देखील फार विचार करावा लागतो, हाच काय तो विचारवंतपणा) >>अन अशीच झापडे बहुसंख्य जर्मन लोकांनी अन सुरुवातीच्या काळात अगदी ब्रिटीशांनीही बांधून घेतली होती, हा इतिहास आहे. -- प्रथम विश्वयुद्धानंतर गाळात गेलेली जर्मन जनता आणि अत्यंत व्यवहारी ब्रीटीश व इतर तत्कालीन साम्राज्यशासकांना मोदी समर्थकांच्या लायनीत उभं केलेलं बघुन फेफरं भरलं मला. तत्कालीन युरोप-अमेरीका साम्राज्यशाही व सद्यस्थीतीतली भारतीय राज्यव्यवस्था (लोकशाही, व समाज व्यवस्था सुद्धा) यांचा तौलनीक अभ्यास करा एव्हढं सुचवावसं वाटतं. असो. मुस्लीमांना सतत मायनॉरीटी म्हणुन भिती दाखवत व्हॉटबँकेचं गलिच्छ राजकारण अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासुन चालु आहे. भविष्यात देखील त्यात बदल व्हायचे चान्सेस नाहित. ओढुन ताणुन केलेली मोदी-हिटलर समानता देखील त्याच राजकारणाचा भाग. त्याला इलाज नाहि. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

नक्की ????

अर्धवटराव
Fri, 02/22/2013 - 07:41 नवीन
>>"१० मे १९४० ... नात्झींवर टीका करत असे" फॉर दॅट मॅटर एक हर मॅजिस्टी आणि दुसरे आपण स्वतः सोडुन चर्चील कोणावर टीका करत नव्हता?? कॅमरून साहेब आता आता जालियनवाला बाग हत्याकांडावर हळहळ वगैरे व्यक्त करताहेत, पण असल्या (याच म्हणुन नाहि) घटनांचे पडासाद राणिच्या देशात उमटत असताना चर्चील साहेबांनी चकार शब्द काढल्याचे माझ्या तरी वाचनात नाहि. राजकीय, आर्थीक हितसंबंध दिसत असताना टीकापात्र हिटलर तेव्हढा काहि कोणाला झोंबला नाहि. स्तालीन, चर्चील, वहाबींच्या कृष्ण्कृत्यांचं कौतुक तसंही डायरेक्ट वाचायला मिळणार नाहिच. या लेखात देखील हिटलरच्या देशप्रेमाचं कौतुक केलं आहे, ज्यु हत्याकांडाचं नाहि. बाकी स्तालीन आणि इतर रशीयन नेत्यांबद्दल कौतुक ऐकले नाहि म्हणाल तर तुमचा कम्युनीस्टांशी फारसा संवाद झालेला दिसत नाहि असं म्हणावं लागेल. वेळीच अमेरीकेची मदत मिळवुन हिटलरला रोखणारा हिरो चर्चील स्वतंत्र भारताच्या फुटीर भविष्याबद्दल कसं पर्फेक्ट आकलन करायचा याच्या चर्चा याची देही याची डोळा भरपूर ऐकल्या आहेत, बघितल्या आहेत. वहाबींचं कौतुक सभ्य युरोपीय, अमेरीकन माध्यमांमधुन दिसुन येणार नाहि... त्याकरता भारताच्या थोडं अंतरंगात डोकाऊन बघावं लागेल... किर्तनकारांची मांदीयाळी दिसेल. अमानुषतेची शंभरी गाठणारा हिटलर टिकाकारांच्या पायताणाखाली आला पण याच परिक्षेत शंभर नाहि पण ८५, ९० मार्कं मिळवणारे तत्कालीन (आणि नंतरचेही) राज्यकर्ते आपापले भाटांचे कंपू अगदी व्यवस्थीत सांभाळुन राखु शकले हे वास्तव आहे. अवांतरः गोळवलकर गुरुजींना (आणि सो कॉल्ड पाठीराख्यांना) हिटलरच्या ज्यु हत्याकांडाचे कौतुक होते, आदर्श होते, अशा आशयाचे विधानं वाचुन पहिले खुप हसलो... चश्म्यांचं दुकान १२ महिने २४ तास खुलं असतं याची खात्री पटली. असो. चालायचच. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

+१००००० याला,-- अमानुषतेची

५० फक्त
Fri, 02/22/2013 - 08:05 नवीन
+१००००० याला,-- अमानुषतेची शंभरी गाठणारा हिटलर टिकाकारांच्या पायताणाखाली आला पण याच परिक्षेत शंभर नाहि पण ८५, ९० मार्कं मिळवणारे तत्कालीन (आणि नंतरचेही) राज्यकर्ते आपापले भाटांचे कंपू अगदी व्यवस्थीत सांभाळुन राखु शकले हे वास्तव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

चर्चिल

पैसा
Fri, 02/22/2013 - 08:20 नवीन
आणि बंगालचा दुष्काळ http://www.misalpav.com/node/14439
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

संबंध काय?

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 02/22/2013 - 11:10 नवीन
एक प्रयत्न करते, तुमच्या तर्काप्रमाणे विचार करण्याचा. काही दिवसांपूर्वीच मिपावर अरूंधती रॉयवर आगपाखड करणारा लेख आला होता. तिथे तुमचा रॉयबाईंवर टीका करणारा प्रतिसाद दिसला नाही. म्हणजे तुम्ही नक्कीच रॉयबाईंचे भाट असणार. (मी रॉयबाईंवर अन्य धाग्यात दोनेक दिवस आधीच टीका केली होती, माझे हात स्वच्छ आहेत.) ---- आता पुन्हा माझ्या पद्धतीनेच विचार.
वेळीच अमेरीकेची मदत मिळवुन हिटलरला रोखणारा हिरो चर्चील स्वतंत्र भारताच्या फुटीर भविष्याबद्दल कसं पर्फेक्ट आकलन करायचा याच्या चर्चा याची देही याची डोळा भरपूर ऐकल्या आहेत, बघितल्या आहेत. वहाबींचं कौतुक सभ्य युरोपीय, अमेरीकन माध्यमांमधुन दिसुन येणार नाहि... त्याकरता भारताच्या थोडं अंतरंगात डोकाऊन बघावं लागेल... किर्तनकारांची मांदीयाळी दिसेल.
संबंध काय? हिटलर वाईट होता म्हणजेच बाय डीफॉल्ट चर्चिल, चेंबरलेन, स्तालिन, वहाबी, जॉर्ज बुश, टोनी ब्लेअर, डेव्हीड कॅमरून, अरूंधती रॉय, अफजल गुरूला घाईघाईत फाशी देणारे, अरिंदम चौधरी, राम जेठमलानी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होतात असं कोणीही म्हटल्याचं मला तरी दिसलेलं नाही. अमका-फलाणा तस्संच करतो म्हणून त्याचा जाब मला किंवा इथल्या अन्य प्रतिसादकांना विचारण्यामागचा किंवा त्याबद्दल जबाबदार मानण्यामागचा तर्क, विचार इ. काय ते समजेल का? हे सगळं त्या कीर्तनकारांना सांगा; इथे कोणी काही असं बोललंय का? (अरूंधती रॉय किंवा दिग्विजय सिंग काही बरळले तर त्याचा जाब काय आशिष नंदी किंवा योगेंद्र यादवांना विचारणार का?) धागा हिटलरबद्दल आहे, तर लगे हाथ हिटलरच्या शत्रूंचीही पापं मोजा असं होईलच असं नाही. आणि हिटलरच्या शत्रूंची पापं मोजली नाहीत म्हणून लगेच हिटलर गरीब-बिचारा वगैरे होत नाही. "जो दुसर्‍यावरी विश्वासला, त्याचा कार्यभाग बुडाला". तेव्हा दुसर्‍यांवर विसंबण्यापेक्षा तुम्हीही त्याबद्दल धागा, प्रतिसाद लिहा. यथामती बाकीचे वाचक, प्रतिसादक लिहीतीलच.
हिटलरच्या देशप्रेमाचं कौतुक केलं आहे, ज्यु हत्याकांडाचं नाहि.
पहिले सहा मुद्दे तर चक्क आक्रमक युद्धखोरी आहे. याला राष्ट्रप्रेम म्हणत असाल तर आपल्या व्याख्या फारच वेगवेगळ्या आहेत. या लेखात सक्तीच्या लष्करभरती/शारीरिक शिक्षणाचंही कौतुक केलेलं आहे. अशी सक्ती माझ्या मते टीकार्हच आहे. (नशीब भारतात असलं काही होत नाही.) आणि बरंच काही अपूर्ण माहितीवर आधारितही आहे. पण ज्यू, पोलिश, जिप्सीं, समलैंगिकांचं हत्याकांड या सगळ्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक वाईट आहे म्हणून त्याच्या नावाने प्रचंड शंख होतो. (त्यातही पोलिश आम जनता, ख्रिश्चनही, जिप्सी आणि समलैंगिकांवर त्याने केलेले अत्याचार एवढ्या उच्चरवात आळवले जात नाहीत.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

मलाही नाहि कळालं

अर्धवटराव
Fri, 02/22/2013 - 20:37 नवीन
"काही दिवसांपूर्वीच...हात स्वच्छ आहेत.)" >> याचा माझ्या विचारसरणीशी काय संबंध? तुम्हाला काय विचारसरणी दिसली मला अजीबात कळलं नाहि. "अमका-फलाणा तस्संच करतो म्हणून त्याचा जाब मला किंवा इथल्या अन्य प्रतिसादकांना विचारण्यामागचा किंवा त्याबद्दल जबाबदार मानण्यामागचा तर्क, विचार इ. काय ते समजेल का? हे सगळं त्या कीर्तनकारांना सांगा; इथे कोणी काही असं बोललंय का?" -- तुम्ही हे वैयक्तीक का घेताय? तुम्हाला कोणी भाट म्हटलं? हिटलर व तत्कालीन राजकीय नेत्यांसंदर्भात मी जी काहि वाचलं, ऐकलं, त्याचा गोषवारा म्हणुन मी सगळ्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. हिटलरशिवाय इतर कुठल्या युरोपीय नेत्याचा उल्लेख या चर्चेत आलेला नाहि हे मलाही स्वच्छ दिसतय. >>पहिले सहा मुद्दे तर चक्क आक्रमक युद्धखोरी आहे. याला राष्ट्रप्रेम म्हणत असाल तर आपल्या व्याख्या फारच वेगवेगळ्या आहेत. -- हिटलरच्या देशप्रेमाचा दावा धागाकर्त्याने केला आहे, मी नाहि. आता इथे म्हणुन सांगतो, कि हिटलर फक्त महत्वाकांक्षी होता, त्याला देशाप्रती प्रेम बीम काहि नव्हतं असं मला तरी वाटत नाहि. असो. चर्चा उगाच वैयक्तीक वळण घेत आहे. मी इथेच थांबतो. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही हे वैयक्तीक का घेताय?

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 02/22/2013 - 23:32 नवीन
तुम्ही हे वैयक्तीक का घेताय? तुम्हाला कोणी भाट म्हटलं?
स्वारी. एस डबल ओ आर ई. वैयक्तिक अजिबात घेतलेलं नाही. (अगदी माझं नाव घेऊन किंवा माझ्या प्रतिक्रियेला प्रतिप्रतिक्रिया लिहीताना लोकांनी व्यक्तिगत आरोप केले तरी मला फक्त लोकांचं माझ्यावर असणारं प्रेमच दिसतं.) माझ्या प्रतिसादातली वाक्य उद्धृत करून पुढे भाट, कीर्तनकार अशा संज्ञा आल्यामुळे "संबंध काय?" असा प्रश्न विचारला. (त्याचं उत्तर मिळालेलं नाही.) माझं वाक्य उद्धृत न करता लिहीलं असतंत तर संबंध लावण्यासाठी दुसरी बाजूच नसती. किंवा तुम्ही अरुंधती रॉय यांच्यावर टीका न करण्याचा विषयही मी काढला नसता. --- स्वगतः अमक्यावर टीका केलीत तर तमक्यावरही करा अशा प्रकारचे प्रतिसाद देऊन नक्की काय साधतं कोण जाणे? अभिव्यक्तीस्वातंत्र्यात एखाद्यावर टीका न करण्याचंही स्वातंत्र्य आहे. माहिती नाही किंवा अन्य काही कारणांसाठीही गप्प बसण्याचं स्वातंत्र्य सामान्यांना आहे. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला राज्यातली माणसं मरत असताना काहीही न करण्याचं स्वातंत्र्य नसतं, पण सामान्य असण्याच्या पावरमुळे हे स्वातंत्र्य मिळतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

असो.

अर्धवटराव
Sat, 02/23/2013 - 00:02 नवीन
थोडं विषयांतर होईल, पण डीटेलमध्ये सांगतो. विज्ञानाने पारंपारीक समजुतींचा पर्दाफाश करत ज्ञानाची अजस्त्र कवाडे खुली केली ति बघुन दिपून जायल होते. विसाव्या शतकाच्या पुर्वार्धात वैज्ञानीक प्रगतीने प्रचंड स्पीड पकडली होती. मनुष्यकल्याणाचा राजमार्ग दिसत असताना त्याच विज्ञानाचा आधार घेऊन माणासाने अत्यंत विनाशक अशी महायुद्धे का लढली हा प्रश्न मला फार सतवायचा. थोडा अभ्यास केल्यावर लक्षात आलं कि विज्ञानाची गोडी तत्कालीन राज्यकर्त्यांना त्यांच्या पारंपारीक साम्राज्यवादी भुमीकेपासुन हटवु शकली नाहि. त्याकाळात असा एकही लीडर झाला नाहि ज्याने विश्वशांती करता आपल्या राजकीय महत्वकांक्षेला मुरड घातली. किंबहुना आहे त्या शक्तीला आणखी अफाट वाढवुन जगावर राज्य करायचीच स्वप्न सगळी बघत होती. हिटलरने वंशद्वेषाचा कळस गाठला. पण त्याची चुक उघड आहे व आज जर कोणि त्यामार्गे जातो म्हटलं तर त्याचा विरोध करण्याची जगाची मानसीकता आहे. त्याच्या अगदी विरुद्ध, अजस्त्र शक्ती संपादन करुन जगाला वेठीला धरण्याची वृत्ती आजही व्हाईट कॉलर धारण करुन राजरोसपणे वावरते आहे व माझ्या मते हे जास्त खतरनाक आहे. अशा वृत्तींना विरोध तर सोडाच, पण त्यांचं कौतुक करणारे लोक त्याकाळीही होते व आजही आहेत (त्यांनाच मी भाट, किर्तनकार वगैरे म्हटलं) चर्चा हिटलरवर चालली आहे, पण त्या हिटलरी वृत्तीपेक्षा जास्त घातक अशा वृत्ती हिटलरच्या कृष्ण्कृत्यांच्या कळोखात लपुन बसु नयेत म्हणुन हा प्रतिसाद प्रपंच. असो. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आत्ता समजलं!

रामपुरी
Tue, 02/26/2013 - 04:36 नवीन
कोणतीतरी असंबद्ध वाक्ये निवडून हिटलरचा संघाशी संबंध जोडणे आणि त्याच प्रकारे चर्चिलचा हिटलरशी संबंध जोडणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पहिली चालते दुसरी चालत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

देशप्रेम?

सुनील
Fri, 02/22/2013 - 08:07 नवीन
आपला पराभव समोर दिसत असताना, बर्लीनची भूमिगत रेल्वे पाण्याने भरून टाकण्याचे आदेश देऊन आपल्याच (बहुतांश जर्मन ख्रिस्ती) नागरीकांची हत्या करणार्‍या हिटलरच्या "देशप्रेमा"ची जातकुळी कुठली हो? त्याने मारलेले जर्मन ज्यू त्याचे नागरीक नव्हते, असे तूर्तास समजून चालू!
  • Log in or register to post comments

अगदी मार्मिक मुद्दा !

बांवरे
Fri, 02/22/2013 - 08:32 नवीन
अगदी मार्मिक मुद्दा ! बाकीचे प्रतिसाद वाचतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

विवेक !!

अर्धवटराव
Fri, 02/22/2013 - 09:05 नवीन
हिटलर मानसीक दृष्ट्या फार आधीच कमकुवत झाला होता. अन्यथा त्याने बरच अगोदर शरणागती पत्करून देशाची हानी टाळली असती. संपन्न जर्मनी उभी करण्याचा अजेंडा कधी विरुन गेला आणि जगावर राज्य करण्याची हुकुमशाही कधी अंगात भिनली हे हिटलरला कळलच नाहि. हे डोईजड स्वप्न भंग होताना दिसत असुन देखील हिटलर ते मान्य करायला तयार नव्हता. अशा अवस्थेत एक पागल व्यक्ती जसं वागेल तसच तोही वागला. अशा खुज्यांनी भरलेल्या जगाच्या इतीहासात एक शिवछत्रपतीच काय ते उत्तुंग दिसुन येतात (छत्रपतींची ऊंची त्यांच्याच वारसदारांना पेलली नाहि, आजही उमगली नाहि हे दुर्दैव देखील ठळ्क आहेच) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

..

मनीषा
Fri, 02/22/2013 - 09:15 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

पुरोगाम्यांची कावीळ

हुप्प्या
Fri, 02/22/2013 - 08:18 नवीन
पुरोगाम्यांना रा. स्व. संघाविषयी वाईट बोलायला काहीही सबब पुरते. त्याकरता दुसर्‍या कुठल्यातरी तशाच प्रकारची कावीळ असणार्‍याची साक्ष काढायची आणि आपली थियरी सिद्ध झाल्याबद्दल पाठ थोपटून घ्यायची. दुसरे महायुद्ध चालू असताना भारतीय लोकांना हिटलरविषयी कौतुक असण्याचे एकमेव कारण म्हणजे तो शत्रूचा (पक्षी ब्रिटनचा) शत्रू होता हेच. त्याचे ज्यू लोकांचे हत्याकांड हा कौतुकाचा विषय नव्हता. खुद्द भारतात छोट्या संख्येने ज्यू होते/आहेत. कोकणात ज्यू लोक आढळतात. किती ज्यू लोकांना भारतीय लोकांनी छळले आहे? उलट भारत हा एकमेव देश आहे जिथे ज्यूंना वर्णद्वेष्टेपणाचा त्रास झालेला नाही. असे असताना गोळवलकरांविरुद्ध नसते गरळ का ओकले जाते आहे? हिटलरच्या छळछावण्या, त्यातील क्रूर अत्याचार हे अगदी शेवटी शेवटी उघडकीस आले. असे नृशंस अत्याचार चालू आहेत हे माहित असताना किंबहुना माहित होते म्हणूनच गोळवलकर हिटलरवर खूश होते हा अपप्रचार अस्सल पुरोगामीच करु जाणे! पुरोगाम्यांच्या गळ्यातील ताईत मोहनदास गांधींनी ज्यू लोकांना काय उपदेश केला होता? नाझी लोक लुटतायत? त्यांना लुटू द्या. तुम्हाला ठार मारत आहेत? शांतपणे मारले जा. कुठलाही प्रतिकार करु नका. यथावकाश नाझी लोकांना पश्चाताप होईल आणि मग ते आपोआपच सुधारतील! तुमचा देवही तुमच्याचर खूश होईल! वा! किती शुद्ध अहिंसक उपदेश आहे!
  • Log in or register to post comments

+१

नन्दादीप
Fri, 02/22/2013 - 08:55 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

पुरोगाम्यांच्या गळ्यातील ताईत

ऋषिकेश
Fri, 02/22/2013 - 09:08 नवीन
पुरोगाम्यांच्या गळ्यातील ताईत मोहनदास गांधींनी
गांधींना ताईत बनवणार्‍यांना पुरोगामी म्हटलेत.. चला हे ही नसे थोडके!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

जाउद्या...

नाखु
Fri, 02/22/2013 - 09:33 नवीन
हुप्प्या दादा : विचारवंताचे "विचारधन" (ज्ञानामृत) जसेच्या तसे डकवत आहे जे एखद्या संघटनेला लागु पडते: बरं हे ही जौद्या... एखाद्या माणसाला माणूस म्हणून स्वीकारणं आणि मग तो सलाम करण्याजोगा आहे की नाही हे ठरवणं... यासाठी त्या माणसाचा संपूर्णत्वाने विचार केला पाहिजे. चांगल्या आणि वाईट बाजू बघताना, जर का चांगल्या बाजू जास्त असतील तर मग सलाम वगैरे म्हणण्यात अर्थ आहे... अन्यथा, नुसत्या चांगल्या बाजूंपुरतंच ते कौतुक सिमित रहावं... आनि याव्रून असे लक्शात येते कि : .संघात फक्त आणी फक्त वाईट कामेच चाल्तात. .दुसरी बाजू बघण्याची आम्ही तसदी घीत नाही ( छ्या त्याकडे बघायचे पण नाही) .एखादी चुकिची बाजू दिसली रे दिसली कि त्याने "जीवन समर्पीत केलेल्या संघसेवकांवर गरळ ॒ओकायचीच ( ते थोडेच प्रतीवाद करायला येणारेत मि.पा.वर? .बाकि चालू द्या... .बाजारात फक्त "किडकी" भाजी शोधणार्या मि.पा.करांबद्दल अनुकंपा असलेला (खुळा) नाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

गोळवलकर

आजानुकर्ण
Fri, 02/22/2013 - 21:20 नवीन
उलट भारत हा एकमेव देश आहे जिथे ज्यूंना वर्णद्वेष्टेपणाचा त्रास झालेला नाही. असे असताना गोळवलकरांविरुद्ध नसते गरळ का ओकले जाते आहे?
भारतात ज्यू लोकांना त्रास झालेला नाही याचा गोळवलकरांशी काय संबंध आहे? गोळवलकरांना अपेक्षित असलेले भारतातील ज्यू हे हिरवे. हिटलरला अपेक्षित असलेले ज्यू नव्हेत! प्रतिसाद शेवटी गांधींवर घसरल्याचे पाहून संतोष झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

अपेक्षाभंग

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 02/22/2013 - 21:32 नवीन
तुमच्याकडून अधिक अपेक्षा होत्या, आजानुकर्ण. "भारत सोडून यू.एस आणि इस्रायल या देशांमधेही ज्यूद्वेषाचा इतिहास नाही." अशा अर्थाचं वाक्यही इथे अपेक्षित होतं. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

फरक

विकास
Fri, 02/22/2013 - 22:52 नवीन
"भारत सोडून यू.एस आणि इस्रायल या देशांमधेही ज्यूद्वेषाचा इतिहास नाही."
भारतात १००/१५०० वर्षे ज्यू रहात आहेत. अमेरीका तेंव्हा जन्माला देखील आली नव्हती. त्यावेळेस ज्यूंना सगळीकडून सापत्न वागणू़क मिळत होती. त्याचे प्रमुख कारण त्यांच्या असलेल्या वेगळ्या श्रद्धा. त्यावेळेस एक भारत होता जेथे त्यांना त्यांच्या श्रद्धा, आचार-विचार, भाषा, वगैरे वेगळे असूनही द्वेष केला नाही. तीच गोष्ट भारतात मला वाटते, सिरीयातून आलेल्या मुस्लीमांच्या संबंधात देखील वाचल्याची आठवते. त्यांना कुणी हाकलले म्हणून येथे आले नव्हते, पण व्यापारी म्हणून येथे आले होते पण द्वेष केला गेला नाही. पारशांचे उदाहरण तर प्रसिद्धच आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

संबंध काय?

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 02/22/2013 - 23:01 नवीन
याचा अर्थ यू.एस. आणि इस्रायल या देशांमधे ज्यूद्वेषाचा इतिहास आहे असा होतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

तुम्ही विचार करा

विकास
Fri, 02/22/2013 - 23:45 नवीन
इस्त्रायल मधे ऑलमोस्ट २००० वर्षे (१९४८ पर्यंत) ज्यूंना रहाण्यास त्रास होत होता. हिटलर काय आहे, ह्याची पूर्ण कल्पना आल्यावर देखील अमेरीकेने त्याविरोधात तात्काळ पाऊले उचलली नाहीत या बद्दलचे अनेक संदर्भ जालावर आणि पुस्तकात आहेत. तरी देखील एक म्हणता येईल की अमेरीकेने जशी कृष्णवर्णीयांच्या बाबतीत सापत्नता दाखवली तशी ज्यूंच्या बाबतीत कायद्याने दाखवली नाही. तशी भावना "स्वातंत्र्य, समता, बंधूता" याचा जगाला आदर्श देणार्‍या फ्रेंचांनी दाखवली आणि त्यासंदर्भात एमॅन्सिपेशन हे १७९१ ला जाहीर करून समान हक्क दिले. ग्रीसने १८३० तर ब्रिटन ने १८५८, इटली १८७० तर जर्मनी १८७१...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आक्षेपार्ह

विकास
Fri, 02/22/2013 - 22:47 नवीन
गोळवलकरांना अपेक्षित असलेले भारतातील ज्यू हे हिरवे.
काही ऐतिहासीक पुरावा नसताना केलेले हे विधान आक्षेपार्ह आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

हु केअर्स ??

अर्धवटराव
Fri, 02/22/2013 - 22:52 नवीन
शेवटी लेबलं चिटकवायशी मतलब. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

चालायचंच. सगळेच रेडी टू थिंक

नाना चेंगट
Fri, 02/22/2013 - 22:54 नवीन
चालायचंच. सगळेच रेडी टू थिंक झाल्यावर पिंक कोण टाकणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

संघाचे प्रचारक दामुअण्णा दाते

आजानुकर्ण
Sat, 02/23/2013 - 00:58 नवीन
संघाचे प्रचारक दामुअण्णा दाते यांच्या स्मरणशिल्पे या पुस्तकातील पान क्र. १६७ व १६८ पाहा. तुमच्या माहितीकरिता जसाच्या तसा येथे देतो. जे मला हिटलरसाऱखे धोरण वाटते ते ठळक करत आहे. "गुरुजी लालबहादूर शास्त्रींना म्हणाले 'बाहेरून आलेले मुसलमान हे अराष्ट्रीय आहेत व अशा अराष्ट्रीय मुसलमानांना जे सामावून घेतात ते राष्ट्रद्रोही आहेत. एक उपाय करा सर्वांनाच बाहेर घालवा. पण तुम्ही हे करणार नाही कारण तुम्हाला पोलिटिकल कंपल्शन्स आहेत. त्यामुळे तुम्हाला मुसलमानांची मते मिळणार नाहीत. सध्या जगात सर्वमान्य असलेला उपाय सांगतो. ज्यांच्या राष्ट्रीयत्वाबद्दल शंका आहेत त्यांचा मतदानाचा हक्क रद्द करा. ते या राष्ट्राचे नाहीत आणि त्यांना मत नाही हे प्रस्थापित करा' या पुस्तकात अशी अनेक मौक्तिके सापडतील. संघसंस्थापकांचे एका पत्रातील मत वाचायला मिळेल जे असे "मुसलमान मनोवृत्ती नेहमी सत्कार्यात विघ्न आणणारी असते'. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

पत्रकारांशी बातचीत

विकास
Sat, 02/23/2013 - 01:37 नवीन
दिल्लीत १९७० साली पत्रकारांशी झालेल्या प्रश्नोत्तरातील...त्यातील उत्तरामधील ठळक केलेल्या भागात तुम्हाला गुरूजींना काय म्हणायचे होते ते समजेल. Obviously, you want the ascendancy of the Hindus. Do you want to demand amendment of the Constitution for the purpose? A : There is no question of the ascendancy of any one. What we want is a healthy society. Ours is a Constitution which gives equal rights to all and there is no need to amend the Constitution. The Hindu is born secular. He accepts the truth that there are different paths to God realization. त्या व्यतिरीक्त मी काही दामुअण्णा दात्यांचे पुस्तक वाचलेले नाही. त्यामुळे संपूर्ण संदर्भ माहीत नाही. तरी देखील जे काही तुम्ही दिलेले आहे त्यातून काय समजते? तर "बाहेरून आलेले..." ह शब्द प्रयोग. आता हा शब्दप्रयोग कधी, कोणत्या संदर्भात केला आहे वगैरे बघितले पाहीजेच, पण त्यांनी या देशातील (अर्थात भारतातील) कुणाबद्दलच म्हणलेले दिसत नाही. संदर्भाशिवाय कुणाचीही वक्तव्ये देणे हे अगदी टिपिकल दिशाभूल करण्याचे लक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

+१००००००००००

रामपुरी
Tue, 02/26/2013 - 04:41 नवीन
"संदर्भाशिवाय कुणाचीही वक्तव्ये देणे हे अगदी टिपिकल दिशाभूल करण्याचे लक्षण आहे." ही वॄत्ती फारच बोकाळत चालली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

थुंकी

आजानुकर्ण
Tue, 02/26/2013 - 19:19 नवीन
तुमचे कोणत्याही चर्चेमध्ये बरेवाईट काहीच कॉँट्रिब्युशन दिसत नाही. असे प्रतिसाद विनाकारण थुंकत बसल्याने फक्त परिसर घाण होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी

तुमच्यासारख्या विशिष्ट

रामपुरी
Wed, 02/27/2013 - 05:28 नवीन
तुमच्यासारख्या विशिष्ट प्रकारच्या थुंक्या उडवत राहण्यापेक्षा बरं आहे की. तुमच्या थुंका/पिंका परीसर जास्त घाण करत आहेत. बाकी तुमच्या प्रतिसादावरून पातळी लक्षात आली. एवढ्या खालच्या पातळीवर उतरण्याची आमची योग्यता नाही. त्यामुळे तुमच्या आणि तुमच्या दर्जाच्या प्रतिसादांना आमच्याजवळ उत्तर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

कोणतीही चर्चा

आजानुकर्ण
गुरुवार, 02/28/2013 - 03:27 नवीन
तुम्ही कोणत्याही चर्चेत विश्लेषणात्मक, सोदाहरण आणि विस्तृत असे बरेवाईट काही स्पष्टीकरण दिल्याचे दाखवून माझे दात माझ्याच घशात घालावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी

हॅ हॅ हॅ

रामपुरी
गुरुवार, 02/28/2013 - 23:00 नवीन
तुमच्यासारख्याला उदाहरणं देण्याची गरज वाटत नाही आणि इच्छा तर मुळीच नाही. बाकी दात घशात घालून घ्यायचे असल्यास संपर्क साधावा. ते काम विनाविलंब मोफत केल्या जाईल. ईत्यलम! (दात घशात घालायचा विषय काढला म्हणून एवढा प्रतिसाद प्रपंच अन्यथा तुमच्या पातळीवर उतरून प्रतिसाद द्यायची इच्छा नाही हे पूर्वी स्पष्ट केलेच आहे. बाकी चालू द्यावे हि विनंती)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

आणखी काही विचार

आजानुकर्ण
Tue, 02/26/2013 - 19:18 नवीन
गोळवलकर यांचे आणखी काही विचार. येथून साभार http://www.golwalkarguruji.org/shri-guruji/interviews/shri-gurujis-interviews/issues-with-indian-muslims तिथे सर्व संदर्भही सापडतील. हे विचार आणि हिटलरचे विचार यामध्ये काडीमात्र फरक दिसत नाही. १. The main reason for Hindu-Muslim tension is that the Indian Muslim is yet to identify himself fully with India, its people and its culture. Let the Indian Muslim feel and say that this is his country and these are his people, and the problem will cease. It is a matter of changing his psychology २. The Muslims are already consolidated. They think separately, act separately and plan separately. It is the Muslim who think that all non-Muslims will go to hell after death. ३. And how many Muslims bothered to follow Azad? The secular Hindu is the rule; the communal Hindu is the exception. But among Muslims, the communal Muslim is the rule and the secular Muslims the exception. That is the difference. ४. The Muslim looks upon Partition only as a springboard for further aggression. ५. This outlook of showing special consideration and of praising and publicizing predominantly the Muslim goodness is dangerous. The name of Abdul Hameed is publicized too much, but others who displayed equal valor are not much in the news. Our leaders are suffering from a peculiar Muslim-infatuation! ६. Q : Muslims and Christians belong to this land. Why do you not consider them as one of your own? A : Suppose one of our countrymen goes to America, settles there and wants to become a citizen of America, but refuses to accept Lincoln, Washington, Jefferson and others as his national heroes. Do you then call him a national of America? Tell me frankly. Q : Of course, no. A : Why should not the same criterion be applied to our country also? How can you say that we should call such people nationals who, while living here, work against the honor and traditions of the country, and insult our national heroes and objects of national veneration? (आणि गोळवलकर यांचे नॅशनल हीरोज कोण तर उदा. श्री. राम ) Some Muslims say that Rustom is their national hero. But Rustom was a Persian hero. He has nothing to do with them. He was born long before Islam. If he could be considered a hero by the Muslims, why not Sri Rama? I say, why don't you accept this history ? ७. Many persons came to this country from various parts of the world. They have chosen to stay here, live here. They have adapted themselves to the life here, the ideology and the philosophy here. Some have even made their own contribution towards enriching this mainstream. The Muslims, unfortunately, stayed apart. ८. We do not regard them separate. It is they who regard themselves as separate. मुळात हिंदू विचारसरणी ही सर्वसमावेशक आणि सबगोलंकार आहे. हिंदूंना कोणताही देव चालतो किंवा देव नसला तरी चालतो. मात्र इतर धर्मीयांनीही याच विचारसरणीचे अनुसरण करावे अन्यथा तुम्ही राष्ट्रद्रोही ठरण्याची शक्यता असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

गोळवलकर हे खरेच असे बोलले

श्री गावसेना प्रमुख
Tue, 02/26/2013 - 19:33 नवीन
गोळवलकर हे खरेच असे बोलले होते का की आमचे राष्ट्रीय हिरो राम आहेत, व्यवस्थीत वाचुन घ्या एकवार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

हे वाक्य

आजानुकर्ण
Tue, 02/26/2013 - 19:42 नवीन
Some Muslims say that Rustom is their national hero. But Rustom was a Persian hero. He has nothing to do with them. He was born long before Islam. If he could be considered a hero by the Muslims, why not Sri Rama? I say, why don't you accept this history ? ह्या गोळवलकरांच्या वाक्याचा कसा अर्थ लावायचा तो तुम्ही लावा. रामकथा हा इतिहास आहे की हिंदूंचे पुराण? मग हिंदूंची मायथॉलॉजी इतर धर्मीयांनी स्वीकारावी का? शंबूक वध प्रकरणानंतर हिंदूंमधीलच दलित आता रामाची परंपरा सांगण्याचे टाळतात हेही नमूद करावेसे वाटते. शिवाय रामदेखील पर्शियन होता असे काही लोक म्हणतात. मग पर्शियन रुस्तम चालत नाही मात्र पर्शियन राम गोळवकरांना का चालतो? http://khattamitha.blogspot.com/2008/03/1.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

एक अवांतरः

बॅटमॅन
Tue, 02/26/2013 - 20:01 नवीन
एक अवांतरः तुम्ही दिलेला लेख निव्वळ त्या प्रवादांचा उल्लेख करून थांबतो, बाकी काही बोलत नाही. तसेही रामकथा प्रत्यक्ष घडली असो किंवा नसो, वाल्मिकीरामायणातले उल्लेख तरी आजच्या भारतातलेच आहेत. बाकी गोळवलकरांचे विचाराबद्दल बोलायचं झालं तर, त्यातला अतिरेक बाजूला ठेवला तरी बरेच मुसलमान विचारजंत या देशाशी स्वतःला नीट आयडेंटिफाय करत नाहीत हे सत्यच आहे. त्यांना रेमेडोके अनुयायी मिळतात, आणि ते इस्लामच्या नावाखाली झपाट्याने डी-नॅशनलाईझ होतात. झकिर नाईकासारखे विचारजंत या कामात विशेष आघाडीवर आहेत. मुसलमान विचारजंतांचा सेन्स ऑफ एन्टायटलमेंट हा फार उद्धट आणि चिंताजनक वाटतो. हे जर चूक म्हणायचे असेल तर तुमच्या स्वाक्षरीप्रमाणेच मीही म्हणेन, "बाकी चालू द्या". :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

माफ करा पण हे जरा सरसकटीकरण

पिंपातला उंदीर
Tue, 02/26/2013 - 20:42 नवीन
माफ करा पण हे जरा सरसकटीकरण होत नाहीए का? हा देश एवढा मोठा आहे आआणी परस्पर अंतरविरोधानी भरला आहे की इथे तोगडिया ना पण अनुयायी मिळतात आणि ओवैसी सारख्याना पण. त्यामुळे फक़त मुस्लिम याना हा वेगळा न्याय लावणे योग्य आहे का? मुस्लिम जर एवढे धर्मांधले असते तर ते आज मुलायम सिंग सारख्या हिंदू पुढार्याणा का मत देत बसते. आजही राष्ट्रीय स्तरावर मुस्लिमांचा म्हणून असा एक पक्ष नाही हे कशाचे लक्षण आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हिंदू पुढार्‍यांना मुसलमान

बॅटमॅन
Tue, 02/26/2013 - 21:59 नवीन
हिंदू पुढार्‍यांना मुसलमान मते मिळतात याचे कारण म्हंजे त्यांची अपीजमेंट होईल असेच निर्णय कायम घेतले जातात. मोदीचा अपवाद सोडून. ओवेसी अन तोगडिया या दोघांनाही अनुयायी मिळतातच की, कोण नाही म्हणतो. पण मुख्यतः मुस्लिम विचारजंत आणि मीडियाबद्दल म्हणतोय. देशाऐवजी इस्लामचे ढोल बडवण्याइतके त्यांचे धैर्य पाहून आश्चर्य वाटते. संघवाले किमान असे तरी करत नाहीत. राष्ट्रीय स्तरावर मुस्लिम पाठिंबा देतात असा एक पक्ष आहे ना-काँग्रेस!! त्याने आणि इतरांनी इतकी अपीजमेंट ऑलरेडी केलीय की गरजच काय? माझा मुद्दा इतकाच आहे की देश, त्याच्या परंपरा, संस्कृती, सहिष्णुता, सहजीवन, इ. सोडून कडवा इस्लाम हेच होल अँड सोल ध्येय असे मानणार्‍यांचे काय करावे. हे लोक एकदा मेजॉरिटी झाले की तिथे मायनॉरिटीची काय हालत होते हे बघायला पाकिस्तान किंवा इजिप्त किंवा अजून कुठलीही उदाहरणे बघावीत. यांना जाऊ तिथे इतरांनी आपल्या धर्मासाठी वेगळ्या सोयीसुविधा सरकारने द्याव्यात अशी अपेक्षा असते पण इतरांच्या धर्म-परंपरांना कवडीची किंमत हे लोक देत नाहीत. युरोपात यांनी सध्या किती उच्छाद मांडलाय ते बघा. युरोपमधले मुस्लिम हा असला उच्छाद भारतात हे मांडत नाहीत कारण आधीपासून राहतात. पण इस्लामचे अरबीकरण सध्या इतक्या झपाट्याने सुरू आहे की हे असले भारतात झाले तर काय होईल त्याची कल्पनाच करवत नाही. असो. या विषयाबद्दल बोलावे तितके कमीच आहे. यांचा कडवेपणा इतर कुणापेक्षाही जास्त आहे. येत्या काही वर्षांत युरोपात याचे प्रत्यंतर वाईट रूपाने येईल हे नक्कीच. असो. बाकी चालू द्या. सरसकटीकरण मी करत नाहीये. कॉमन मुसलमान माणसाला हे लागू नाही. विचारजंतांना लागू आहे. शिवाय मुसलमान समाजात मतभिन्नता नामक प्रकार इतका टॉलरेट होत नसल्याने विशिष्ट विचारसरणी रुजवण्यासाठी हा वर्ग अतिशय जास्त ससेप्टिबल आहे. त्यामुळे हे विचारजंत दाबात ठेवलेच पाहिजेत या मताचा मी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

कसे काय?

आजानुकर्ण
गुरुवार, 02/28/2013 - 03:36 नवीन
भारतात समजा २५ टक्के मुस्लिम आहेत असे गृहित धरु. या २५ टक्के मतांसाठी त्यांचे सो कॉल्ड अपीजमेंट करुन त्यावर कोणत्याही पक्षाचे सरकार कसे काय येऊ शकते? मुस्लिम अपीजमेंटचे काही ठोस परिणामही दिसले आहेत असे नाही. सरकारी किंवा खाजगी नोकऱ्यामधील प्रतिनिधित्व किंवा आर्थिक उन्नयन वगैरे कोणत्याही निर्देशांकावर या अपीजमेंटचे काही प्रतिबिंब दिसते का? मग हे अपीजमेंट नक्की कोणत्या प्रकारचे आहे? हे विचारले तर हज यात्रा आणि शाहबानो खटल्याचे तुणतुणे वगळता फारसे काही हाती लागेल असे दिसत नाही. गोळवलकर यांचे मत उच्चशिक्षित मुसलमान विचारवंतांबाबत आहे की एकंदर मुस्लिम समाजाबाबत हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. कुरुंदकरांचा लेख आता माझ्याजवळ नाही पण मला आठवते त्यानुसार त्यांचे विश्लेषण हे अलीगढ विद्यापीठ टाईप मुसलमानांबाबत होते ज्यात त्यांना सर सय्यद अहमदखान यांच्या उदाहरणावरुन ते स्पष्ट केले होते. (चू.भू.द्या.घ्या.) शिवाय एका त्रयस्थ अभ्यासकाचे मत आणि एका धर्माधारित हिंसक संघटनेच्या प्रमुखाचे मत यामागचा कार्यकारणभाव वेगळा असण्याची जास्त शक्यता आहे. हिटलरने घटनादुरुस्ती करुन ज्यूंची कत्तल केली की काय याबाबतचा थोडा शोध घेऊन गोळवलकरांच्या घटनादुरुस्तीबाबत मत व्यक्त करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

धर्माधारित हिंसक संघटना

अर्धवटराव
गुरुवार, 02/28/2013 - 03:54 नवीन
>>शिवाय एका त्रयस्थ अभ्यासकाचे मत आणि एका धर्माधारित हिंसक संघटनेच्या प्रमुखाचे मत यामागचा कार्यकारणभाव वेगळा असण्याची जास्त शक्यता आहे. -- संघाला धर्माधारीत हिंसक संघटना म्हणणं पूर्वग्रहदुषीत परिणामांतुन आलं असेल, दिग्वीजयसींग साहेबांसारखे काहि बोलायचे असेल, किंवा आपल्या भुमीकेला सपोर्टींग काहितरी लिहायचं म्हणुन लिहीलं असेल तर एक वेळ समजु शकतो (समाजहिताला अशी वृत्ती फार घातक असते हे मात्र निश्चीत). अदरवाईज तुमची मते अगदी मुळापासुन तपासुन बघा, तेव्हढा स्वतःला वेळ द्या, असा सल्ला मित्रत्वाच्या नात्याने, एक हितचिंतक म्हणुन देतो. देव करो, आणि तुमाला धर्माधारीत हिंसक संघटनेचा कधि वैयक्तीत अनुभव न येवो. असो. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

टायपो

आजानुकर्ण
गुरुवार, 02/28/2013 - 05:01 नवीन
माफ करा मला धर्माधारित अहिंसक संघटना म्हणायचे होते. तेवढा अ राहिला. क्षमस्व. रंगूनी रंगात साऱ्या, संघ माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय त्याचा मोकळा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

थोडी माहितीत भर

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 02/28/2013 - 04:16 नवीन
हे अपीजमेंट नक्की कोणत्या प्रकारचे आहे? हे विचारले तर हज यात्रा आणि शाहबानो खटल्याचे तुणतुणे वगळता फारसे काही हाती लागेल असे दिसत नाही.
हज यात्रेला जी सबसिडी मिळते, ती हवी असल्यास मुंबई (किंवा भारत) - सौदी अरेबिया हा प्रवास एअर इंडीयानेच करावा लागतो. एअर इंडीयाची ही तिकीटं हजच्या यात्रेच्या काळात सौदीया आणि कदाचित अन्य काही परदेशी विमान कंपन्यांच्या तुलनेत बरीच अधिक महाग असतात. सरकारी सबसिडी घेऊन भाविकांचे पैसे फार वाचत नाहीतच. त्यामुळे काही मुस्लिम विचारवंतांची मागणी आहे ही सबसिडी रद्द करण्याची. त्याची दोन कारणं ते सहसा देतात. १. एअर इंडीयातली बेबंदशाही. नफा कमावण्याऐवजी अनुत्पादक नोकर्‍या वाढवणार्‍या कंपनीला करदात्यांचे पैसे कशाला द्यायचे? २. सबसिडीचा फायदा खरोखर गरीब यात्रिकाला होत नाही तर सबसिडी घेऊन संपूर्ण मुस्लिम समाजाचं नाव बदनाम कशाला? (व्हायचंच असेल तर एअर इंडीयाचं होऊ देत.) २०११ साली जनगणना झाली. त्यात जात नोंदवावी का नोंदवू नये याबद्दल भारी चर्चा झाल्या. या जनगणनेनुसार हिंदू आणि मुस्लिम समाजाचं दरडोई उत्पन्न, शिक्षण, बेरोजगारी अशी वेगवेगळी मानकं कुठे सापडतील? (चटकन गूगलून सापडलं नाही.) मुस्लिमांचं तुष्टीकरण म्हणजे नक्की काय याचे आकडेही त्यातून समजतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

काळ बदलला आहे..

विकास
गुरुवार, 02/28/2013 - 06:35 नवीन
मग हे अपीजमेंट नक्की कोणत्या प्रकारचे आहे? हे विचारले तर हज यात्रा आणि शाहबानो खटल्याचे तुणतुणे वगळता फारसे काही हाती लागेल असे दिसत नाही.
इतकेच नव्हते... तुम्हाला माहीत आहे का कल्पना नाही, मला दुवा मिळायची शक्यता आत्ता तरी नाही, त्यामुळे विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा... पण ठाणे-भिवंडी मध्ये शिवजयंतीस परवानगी नव्हती. (आणि हो यात शिवसेनेचा काहीच संबंध नव्हता. ) ती ज्या वर्षी दिली गेली, मला वाटते १९८२-८३ साली, त्यावर्षी तेथे प्रचंड दंगली झाल्या होत्या. (ज्यात अर्थात शिवसैनिक देखील असू शकतात). सलमान रश्दीचे लेखन अयातुल्ला खोमेनीला खूप आवडायचे. आपल्याकडे सेटानेकी वर्सेसवर बंदी येई पर्यंत मुस्लीम जगाला कल्पना देखील नव्हती... आणि नंतर त्याला फतव्याला तोंड द्यावे लागले. असे अनेक प्रकार हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते १९९० च्या दशकापर्यंत चालले होते. अजूनही चालू आहे हे गृहमंत्री श्री. सुशीलकुमार शिंदे यांनी ज्या पद्धतीने अफझल गुरूच्या फाशीच्या आधी उगाच "हिंदू दहशतवाद" शब्द आणला त्यातून दिसून येते. शहाबानो निकालानंतरचा राजीव गांधीचा अप्रत्यक्ष घटना दुरूस्ती करून सुप्रिम कोर्टाचा निकालच रदबादल करण्याचा प्रकार हा या सर्व प्रकारातील निचांक (अँटीक्लायमॅक्स) होता. त्याशिवाय त्या नंतर ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये दहशतवाद चालू झाला त्याला वेळीच उखडायच्या ऐवजी खतपाणी घातले गेले असे म्हणावेसे वाटते...
गोळवलकर यांचे मत उच्चशिक्षित मुसलमान विचारवंतांबाबत आहे की एकंदर मुस्लिम समाजाबाबत हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही.
तुम्हीच दिलेल्या इतर वाक्यांप्रमाणे त्याच दुव्यात गोळवलकरांनी म्हणलेले तुम्ही वाचलेले दिसत नाही: According to our ways of religious belief and philosophy, a Muslim is as good as a Hindu. It is not the Hindu alone who will reach the ultimate Godhead. Everyone has the right to follow his path according to his own persuasion. त्या व्यतिरीक्त मदरलँड आणि मला वाटते ऑरगानाजरमध्ये देखील आलेल्या १९७२ च्या त्यांच्या मुलाखतीतले वाचण्यासारखे आहे: “I think uniformity is the death knell of nations. Nature abhors uniformity. I am all for the protection of various ways of life. However all the variety must supplement the unity of the nation and not range itself against it” When Guruji was asked, “does he not think that the common civil code is necessary for promoting the feeling of nationalism” he gave a straight answer in a very unambiguous term “ I don’t”. He was aware of the superficial debate on this issue. He did not forget to add, “this may surprise you or many others. But this is my opinion .I must speak the truth as I see it”
कुरुंदकरांचा लेख आता माझ्याजवळ नाही पण मला आठवते त्यानुसार त्यांचे विश्लेषण हे अलीगढ विद्यापीठ टाईप मुसलमानांबाबत होते ज्यात त्यांना सर सय्यद अहमदखान यांच्या उदाहरणावरुन ते स्पष्ट केले होते.
तसे नाही. ,त्यांनी अलिगढचा उल्लेख केला असेलही, पण त्यांचा मूळ मुद्दा हा दारूल उलूम देवबंद संस्थेवर होता जिथून फतवे निघतात आणि जी संस्था भारतीय उपखंडातील + अफगाणिस्तानातील मुस्लीमांच्या मनावर प्रभाव ठेवून आहे. त्यातूनच सामाजीक प्रश्न या समाजात तयार झाले आहेत. कुरंदकरांच्या मते या संस्थेने कधी फाळणीस पाठींबा दिला नाही, कारण त्यांना संपुर्ण भारतालाच इस्लाम करायचे होते, वगैरे... बाकी तुम्ही ज्या "उच्च शिक्षित विचारवंतांबद्दल" बोलत आहात, तेच समाजाला घडवण्यासाठी जबाबदार असतात. पण बर्‍याचदा ते घडवण्याऐवजी, भेद करून बिघडवण्यातच जास्त रस घेताना दिसतात. आणि हे काही मी कुठल्याही धार्मिक संदर्भाने म्हणत नाही - हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन आणि निधर्मी सगळेच त्यात आले.
शिवाय एका त्रयस्थ अभ्यासकाचे मत आणि एका धर्माधारित हिंसक संघटनेच्या प्रमुखाचे मत यामागचा कार्यकारणभाव वेगळा असण्याची जास्त शक्यता आहे.
रा.स्व. संघ ही धर्माधारीत हिंसक संघटना नाही. आपल्यास ठोस पुरावे माहीत असल्यास येथे लिहावेत. नाहीतर फुकटचे लिहीणे आहे. कुरंदकर हे डावे विचारवंत आहेत, जरी त्यांचे लेखन हे बहुतांशी समतोल आहे असे म्हणता येत असले तरी. पण त्यांच्या लेखनास (मी त्यांच्या लेखनाच पंखा आहे तरी देखील) तटस्थ म्हणणार नाही. हा विषय वेगळा असल्याने तुर्तास इतकेच.
हिटलरने घटनादुरुस्ती करुन ज्यूंची कत्तल केली की काय याबाबतचा थोडा शोध घेऊन गोळवलकरांच्या घटनादुरुस्तीबाबत मत व्यक्त करता येईल.
याला बादरायण संबंध लावत वाटेल ते लिहीणे असे म्हणता येईल. जे केवळ आत्यंतिक स्वार्थ अथवा द्वेषापोटी होऊ शकते. मला कल्पना नाही आपण यात कुठे बसता का आपल्यावर असा कुणाचा प्रभाव आहे. असो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

लांगूलचालन

श्रीगुरुजी
Sun, 03/03/2013 - 20:54 नवीन
>>> मग हे अपीजमेंट नक्की कोणत्या प्रकारचे आहे? हे विचारले तर हज यात्रा आणि शाहबानो खटल्याचे तुणतुणे वगळता फारसे काही हाती लागेल असे दिसत नाही. हे लांगूलचालन फक्त हज किंवा शहाबानोपुरते मर्यादित नाही. त्यात अनेक गोष्टी येतात. काही गोष्टी येणेप्रमाणे, (१) मुस्लिम मौलवींना भारत सरकारकडून वेतन व पेन्शन मिळते. हे वफ्फ बोर्डाच्या माध्यमातून दिले जाते. वफ्फ बोर्डाला थेट केंद्र सरकार आर्थिक सहाय्य देते. इतर कोणत्या धर्मातील पुजारी, फादर, ग्रंथी इ. ना भारत सरकारकडून वेतन व पेन्शन मिळते? (२) मुस्लिम पुरूषांना घटस्फोटासाठी न्यायालयात जावे लागत नाही. ३ वेळा तलाक म्हटले की (किंवा तसा एसेमेस पाठविला) तरी त्याच क्षणी घटस्फोट होतो. इतर कोणत्या धर्मातील पुरूषांचे असे लाड होतात? (३) मुस्लिम पुरूषाला पत्नीला घटस्फोट न देता तब्बल ४ लग्ने करण्याची कायदेशीर परवानगी आहे. या अत्यंत पक्षपाती व अन्यायी कायद्याचा अनेकांनी गैरफायदा घेतलेला आहे. उदा. दिलीपकुमार, सलीम्-जावेद जोडीतील सलीम व जावेद हे दोघेही, महेश भट व इतर अनेक जण इतर कोणत्या धर्मातील पुरूषांना घटस्फोट न देता ४-४ लग्ने करण्याची कायदेशीर परवानगी आहे? (४) शहाबानो प्रकरणात अशी कायदादुरुस्ती करण्यात आली आहे की, मुस्लिम पुरूषाने ३ वेळा तलाक म्हणून बायकोला घटस्फोट दिल्यानंतर त्याच्याकडून तिला पोटगी मिळत नाही व जास्तीत जास्त ३ महिन्यांचा देखभाल खर्च मिळतो. त्यानंतर तिच्या माहेरच्या माणसांनी तिची देखभाल करणे आवश्यक आहे. जर तिच्या माहेरच्या माणसांनी देखील तिचा खर्च उचलण्यास नकार दिला तर तिचा खर्च वफ्फ बोर्डाने करायचा आहे (म्हणजे केंद्र सरकारने). इतर कोणत्या धर्मातील पुरूषांचे आपल्या बायकोला घटस्फोट दिल्यावर इतके लाड होतात? >>> मग हे अपीजमेंट नक्की कोणत्या प्रकारचे आहे? हे विचारले तर हज यात्रा आणि शाहबानो खटल्याचे तुणतुणे वगळता फारसे काही हाती लागेल असे दिसत नाही. हे लांगूलचालन फक्त हज किंवा शहाबानोपुरते मर्यादित नाही. त्यात अनेक गोष्टी येतात. काही गोष्टी येणेप्रमाणे, (१) मुस्लिम मौलवींना भारत सरकारकडून वेतन व पेन्शन मिळते. हे वफ्फ बोर्डाच्या माध्यमातून दिले जाते. वफ्फ बोर्डाला थेट केंद्र सरकार आर्थिक सहाय्य देते. इतर कोणत्या धर्मातील पुजारी, फादर, ग्रंथी इ. ना भारत सरकारकडून वेतन व पेन्शन मिळते? (२) मुस्लिम पुरूषांना घटस्फोटासाठी न्यायालयात जावे लागत नाही. ३ वेळा तलाक म्हटले की (किंवा तसा एसेमेस पाठविला) तरी त्याच क्षणी घटस्फोट होतो. इतर कोणत्या धर्मातील पुरूषांचे असे लाड होतात? (३) मुस्लिम पुरूषाला पत्नीला घटस्फोट न देता तब्बल ४ लग्ने करण्याची कायदेशीर परवानगी आहे. या अत्यंत पक्षपाती व अन्यायी कायद्याचा अनेकांनी गैरफायदा घेतलेला आहे. उदा. दिलीपकुमार, सलीम्-जावेद जोडीतील सलीम व जावेद हे दोघेही, महेश भट व इतर अनेक जण इतर कोणत्या धर्मातील पुरूषांना घटस्फोट न देता ४-४ लग्ने करण्याची कायदेशीर परवानगी आहे? (३) शहाबानो प्रकरणात अशी कायदादुरुस्ती करण्यात आली आहे की, मुस्लिम पुरूषाने ३ वेळा तलाक म्हणून बायकोला घटस्फोट दिल्यानंतर त्याच्याकडून तिला पोटगी मिळत नाही व जास्तीत जास्त ३ महिन्यांचा देखभाल खर्च मिळतो. त्यानंतर तिच्या माहेरच्या माणसांनी तिची देखभाल करणे आवश्यक आहे. जर तिच्या माहेरच्या माणसांनी देखील तिचा खर्च उचलण्यास नकार दिला तर तिचा खर्च वफ्फ बोर्डाने करायचा आहे (म्हणजे केंद्र सरकारने). इतर कोणत्या धर्मातील बायकांची घटस्फोटानंतरची आर्थिक जबाबदारी सरकार घेते? (५) कायद्यानुसार घटस्फोटानंतर मुलांचा ताबा मुस्लिम पुरूषाकडेच असतो. जर त्याने ताबा घ्यायचा नाकारला तरच घटस्फोटित बायकोला मुलांचा ताबा मिळतो. इतर कोणत्या धर्मातील पुरूषांना हा हक्क आहे? (६) कायद्यानुसार मुस्लिमांमध्ये दत्तक घेण्यास परवानगी नाही. इतर कोणत्या धर्मातील नागरिकांना हा हक्क आहे? (७) मुस्लिम स्त्रीला मतदान करताना बुरखा काढायची व स्वतःची आयडेंटिटी सिद्ध करण्याची सक्ती नाही. इतर कोणत्या धर्मातील स्त्रियांना हा हक्क आहे? (८) मक्कायात्रेसाठी मुस्लिमांना सवलतीच्या दरात विमानप्रवास करता येतो. इतर कोणत्या धर्मातील नागरिकांना ही सवलत आहे? (९) भारतातील एकमेव मुस्लिमबहुल राज्य जम्मू-काश्मिरला विशिष्ट दर्जा देऊन त्या राज्यात स्थायिक होण्यास इतरांना कायद्यानुसार परवानगी नाकारली आहे. मात्र त्या राज्यातील नागरिकांना देशाच्या कोणत्याही भागात स्थायिक होता येते. भारताच्या संसदेने मंजूर केलेले बहुसंख्य कायदे जर जम्मू-काश्मिरच्या विधानसभेने मंजूर केले तरच तिथे लागू होतात, अन्यथा नाही. इतर कोणत्या राज्यावर अशी कायदेशीर खैरात केली आहे? (१०) संसदेचे अधिवेशन सुरू असताना दर शुक्रवारी दुपारी २ तास नमाजासाठी अधिवेशनाला सुट्टी असते. इतर कोणत्या धर्मियांच्या प्रार्थनेसाठी संसद नियमित बंद ठेवली जाते? आपल्याला माहित नसलेल्या अजूनही बर्‍याच गोष्टी आहेत ज्यात मुस्लिमांचे लांगूलचालन उघडउघड दिसून येते. त्या जशा आठवतील/सापडतील तशा मी टाकीन. मुस्लिम लांगूलचालन हे फक्त हज किंवा वेगळा वैयक्तिक कायद्यापुरते मर्यादित नाही. त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. दुर्दैवाने या गोष्टी माध्यमातून फारशा चर्चिल्या जात नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

वरील प्रतिसादात थोडी कॉपी

श्रीगुरुजी
Sun, 03/03/2013 - 20:57 नवीन
वरील प्रतिसादात थोडी कॉपी-पेस्टची सरमिसळ झाली आहे. मला हा प्रतिसाद एडीट करता येत नसल्याने अनावश्यक भाग काढता येत नाही. मी एकूण (१) ते (१०) असे १० मुद्दे मांडले आहेत. ते त्या क्रमाने वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ापीजमेण्ट चा मुद्दा फारसा पटत

पिंपातला उंदीर
गुरुवार, 02/28/2013 - 11:44 नवीन
ापीजमेण्ट चा मुद्दा फारसा पटत नाही. कुठल्याही सरकारने मुस्लिमांसाठी काहीही भरीव केलेले नाही. सचर आयोगाचा रिपोर्ट काय सांगतो बघा http://en.wikipedia.org/wiki/Sachar_Committee_Report
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा