२६ जानेवारी १९८७!
दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान राजीव गांधींच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनाची परेड जोरात सुरू असते आणि त्याचवेळी दिल्लीतल्या तुघलक रोड पोलीस स्टेशनचा फोन खणखणतो. तो फोन सीबीआयच्या ऑफिसातून आलेला असतो. एका मंत्र्याच्या घरावर सीबीआयचा छापा टाकायचा आहे त्यासाठी पोलीसांची काही कुमक आपल्याला हवी असल्याचं सीबीआय अधिकारी पोलीस स्टेशनच्या सिनियर इन्स्पेक्टरला सांगतो. मग सीबीआयचे चार अधिकारी त्या इन्स्पेक्टरला आणि त्याच्यासोबत असलेल्या ३-४ कॉन्स्टेबल आणि एका महिला कॉन्स्टेबलला सोबत घेऊन मंत्र्याच्या
घरावर छापा टाकतात. मंत्र्याच्या घरावर मारलेल्या त्या छाप्यात साहजिकच सीबीआयला अमर्याद काळा पैसा सापडतो. इन्स्पेक्टरला तिथेच वाट बघायला सांगून सीबीआय अधिकारी जप्त केलेला तो सगळा पैसा आपल्या सोबत घेऊन जातात आणि मग इन्स्पेक्टरच्या लक्षात येतं कि छापा टाकलेले ते सगळे सीबीआय अधिकारी नकली होते आणि पोलिसांना मुर्ख बनवून ते त्यांच्याच मदतीने मंत्र्याला लुबाडून पसार झाले आहेत.:D
हि आहे नीरज पांडे दिग्दर्शित स्पेशल २६ या चित्रपटाची सुरूवात! अलिकडच्या काही सुमार चित्रपटातल्या अतिसुमार अभिनयामुळे अक्षय कुमारच्या चित्रपटांपासून मी जरा चार हात लांबच असतो पण फक्त आणि फक्त नीरज पांडेसाठी अक्षय कुमारचा टुकार अभिनय झेलायचा ह्या विचाराने सिनेमागृहात पाऊल ठेवलं. पाहतो तर तिथे फक्त एकच इसम शेवटच्या रांगेत आता फक्त आपल्याला एकट्याला चित्रपट बघावा लागतोय कि काय अशा चेहर्याने बसला होता. :O त्याची किव येऊन मग मग मी त्याच्या बाजूच्या सीटवर जावून बसलो. पण थोड्या वेळाने कोणास ठाऊक, कुठून कसं पब्लिक जमलं नि जवळ जवळ अर्ध्याच्या वर सिनेमागृह भरलं. इथे मग बाजूच्या त्या इसमाऐवजी मीच सुटकेचा निश्वास टाकला.;)
चित्रपट सुरू होतानाच त्यातल्या एका पाठोपाठ घडणार्या जलद घडामोडींमुळे प्रेक्षकांच लक्ष त्यात गुंतायला सुरूवात होते. नकली सीबीआयला मदत केल्यामुळे सिनियर इन्स्पेक्टर रणवीर सिंग्(जिम्मी शेरगिल) आणि लेडी कॉन्स्टेबल शांती(दिव्या दत्ता) ह्यांना पोलिस खात्यातून तात्पूरतं निलंबित केलं जातं. आणि इकडे आपापल्या शहरात रोजचं दैनंदिन आयुष्य जगत असलेले नकली सीबीआय ऑफिसर अजय सिंग(अक्षय कुमार) आणि त्याचे तीन साथीदार पी.के.मिश्रा(अनुपम खेर), जोगिंदर(राजेश शर्मा) आणि इक्बाल(किशोर कदम) हे कलकत्त्यातल्या एका व्यापार्यावर धाड टाकण्याच्या प्लॅन बनवतात आणि यशस्वीरित्या तो पारही पाडतात. त्याच दरम्यान नकली सीबीआयच्या या वाढत्या त्रासदायक प्रकरणांमुळे हि केस खर्याखूर्या सीबीआय ऑफिसर असलेल्या वासिम खान्(मनोज वाजपेयी) याच्याकडे येते. इज्जतीचा पंचनामा झालेला सि.इन्स्पेक्टर रणवीर सिंग त्याला ह्या प्रकरणात सर्वतोपरी मदत करण्यासाठी हजर होतो.
एकदाच खुप मोठ्ठा डल्ला मारायचा आणि हे सगळं सोडून द्यायचं ह्या विचाराने मग अजय सिंग आणि त्याचे साथीदार मुंबईतल्या ऑपेरा हाऊस विभागातील एका मोठ्ठ्या ज्वेलर्सची निवड करतात आणि इथून पुढे सिनेमाच्या थराराक क्लायमॅक्सला सुरूवात होते. आता हा क्लायमॅक्स इथे सांगण्यासारखा मुळीच नाहीये, क्लायमॅक्समधला तो थरार तुम्हाला अनुभवयाचा असेल तर सिनेमागृहाची वाट पकडण्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही. सुरूवातीपासूनच प्रेक्षकांवर घेतलेली पकड हा चित्रपट शेवटापर्यंत हमखास टिकवून ठेवतो. त्यातल्या त्यात फक्त काही ठिकाणी काजल अगरवाल आणि अक्षयमधल्या काही दृश्यांमुळे चित्रपट थोडासा रटाळ होतो पण तो रटाळपणा त्या क्षणापुरताच असतो. पुढच्याच क्षणी चित्रपट आपल्याला त्याच्या वेगवान लाटेत पुन्हा खेचतो. चित्रपटातली दृश्य एकापाठोपाठ जशी सरकत जातात तसं लगेचंच आपण त्या दृश्यांसोबतच शेवटाकडे काय घडेल ह्याचा विचार करू लागतो. जसं जसं आपल्याला हवा असणारा चित्रपटाचा शेवट आपण गृहीत धरत जातो तसं तसं शेवटाकडे चित्रपट आपल्याला धक्के देत जातो. आणि याचमुळे चित्रपटाचा शेवट एकदम धक्कादायक असा झाला आहे कि ज्याचा आपल्या मेंदूने विचारच केलेला नसतो. चित्रपट पाहून सिनेमागृहातून बाहेर पडल्यानंतर एक वेगळा चित्रपट पाहील्याचं समाधान आपल्याला नक्कीच मिळतं.
२००८ साली आलेल्या थरारक आणि वेगवान अश्या वेन्सडेसारख्या चित्रपटामुळे हिंदी चित्रपटसृष्टीला नीरज पांडे ह्या गुणी दिग्दर्शकाची दखल घ्यावीच लागली आणि नीरजच्या या चित्रपटाने त्या वर्षीचा स्टारचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा आणि कथानकाचा असे दोन पुरस्कार पदार्पणातच पटवले. वर सांगितल्याप्रमाणे हा चित्रपट मी फक्त ह्या गुणी दिग्दर्शकासाठीच बघायचा ठरवला होता. दिग्दर्शकीय कौशल्यासोबत त्याने ह्या चित्रपटाची कथासुध्दा लिहली आहे.
अभिनयाच्या बाबतीत म्हणाल तर अक्षय कुमारने माझा संपुर्ण अंदाज चुकवला. त्याने सर्वोत्तम अभिनय केलेल्या काही चित्रपटामध्ये या चित्रपटाचाही नक्कीच समावेश होऊ शकेल इतपत चांगला अभिनय त्याने या चित्रपटात केला आहे. नायकासाठी एखादी तरी नायिका असावीच या हिशोबाने विचार करूनच काजल अगरवाल या अभिनेत्रीला चित्रपटात घेतलं असावं असं वाटून जातं. तीच्या अभिनयाबद्दल म्या पामर काय बोलणार? सिनेमात काजल अगरवाल आणि अक्षय कुमारची छोटीसी लव स्टोरी दाखवण्यात मात्र दिग्दर्शक थोडासा कमीच पडतो. चित्रपटातल्या पी.के. मिश्राच्या भुमिकेत अनुपम खेरचा इतक्या वर्षांचा अनुभव नक्कीच दिसून येतो. राजेश शर्मा आणि आपल्या मराठमोळ्या किशोर कदमने बाकीच्या सीबीआय ऑफिसरची कामं छान केली आहेत. जिम्मी शेरगिलच्या लुक मध्ये साहिब, बिवी.. मधला जामिनदार डोकावतो तर अभिनयात वेन्सडे चित्रपटातल्या आरिफ खान या एटीएस ऑफिसरची थोडीशी झाक पाहायला मिळते. त्याच्यासोबतच्या दिव्या दत्तानेही ठिकठाक काम केलंय. तीचा 'असली काम तो यहीं कर रहें है सर, हम तो सिर्फ...' हा डायलॉग मस्तंय जो चित्रपटाच्या शेवटाकडे एकदम उलट होतो. खर्याखूर्या सीबीआय ऑफिसरच्या भुमिकेत मनोज वाजपेयी एकदम फिट्ट बसतो.
सिनेमातल्या गाण्याबद्दल आणि संगीताबद्दल लिहण्यात मला काडीमात्रही इंट्रेस्ट नाहीये पण आपल्या पहिल्याच चित्रपटात ८० च्या दशकातला लुक दाखवण्यात कला दिग्दर्शक वैष्णवी रेड्डी नक्कीच यशस्वी झाले आहेत. अगदी लहान लहान दृश्यातही याची काळजी घ्यायला ते विसरत नाही. सिनेमात दिसणार्या पद्मिनी मोटर पासून ते रोटरी डायल टेलिफोनपर्यंत आणि सरकारी ऑफिसातल्या टाईप रायटरवाल्या टेबलपासून ते फोटो काढणार्या कॅमेर्यापर्यंत सगळं सगळं आपल्याला ८०च्या दशकाची आठवण करून देतं.
एकूणात काय तर, सत्य घटनेवर आधारीत असलेल्या ह्या थरारक सिनेमात चोरावर मोर कोण ठरतं हे पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमागृहात जायला हरकत नसावी. :)
४/५
वाचने
12037
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
खट्याळ मोड ऑन> खट्याळ मोड ऑफ!
खट्याळ मोड ऑन- पोस्टर्वर बाकी
In reply to खट्याळ मोड ऑन> खट्याळ मोड ऑफ! by स्पंदना
घ्या द्येवा , तुमच्यासाठी कायपण
In reply to खट्याळ मोड ऑन- पोस्टर्वर बाकी by किसन शिंदे
हा हा हा
In reply to घ्या द्येवा , तुमच्यासाठी कायपण by स्पा
कहर!
In reply to घ्या द्येवा , तुमच्यासाठी कायपण by स्पा
हा फोटो नाही रे स्पा. दुसर्
In reply to घ्या द्येवा , तुमच्यासाठी कायपण by स्पा
सगळे मुच्छड ?
In reply to हा फोटो नाही रे स्पा. दुसर् by शुचि
(No subject)
In reply to घ्या द्येवा , तुमच्यासाठी कायपण by स्पा
रिव्यू आवडला
शिनुमा बघणार तर होतोच,आणी आता
हे परिक्षण वाचून चित्रपट
झक्कास लिहिलं आहे. हा सिनेमा
परिक्षण खूप सुरेख रे.
मस्त परीक्षण!
माफ
कालच छान डीवीडी प्रिंट उतरवली
च्यायला
परीक्षण खासच!
मस्त!
उद्या वॅलेंटाईन डे, सुटी
किसनने सांगितलंय म्हणजे नक्की
स्पेशल २६ हा पहावाच असा एक
धन्यवाद!
In reply to स्पेशल २६ हा पहावाच असा एक by मृत्युन्जय
किसनश्री, धन्यवाद!
चित्रपट पाहिला..किसनजीशी सहमत..
छान
बगिटलो बे पिच्चर परवाच. लै
स्पेशल २६ म्हणजे विशेष
मालोजी, याला म्हणतात
In reply to स्पेशल २६ म्हणजे विशेष by मालोजीराव
छान परीक्षण
special 26
In reply to छान परीक्षण by दिपक.कुवेत
पहाणार आज आपण.....
मस्तच चित्रपट आहे. पाहिल्यास
बंटि बबली चित्रपट आहे!
मस्त परिक्षण रे किस्ना...!
हिहिहि
In reply to मस्त परिक्षण रे किस्ना...! by प्यारे१
नाय त्या सवयी आपल्याला नायत
In reply to मस्त परिक्षण रे किस्ना...! by प्यारे१
बारका?
In reply to नाय त्या सवयी आपल्याला नायत by किसन शिंदे
अय्यो
In reply to बारका? by स्पंदना
खल्लास परीक्षण.
परीक्षण आवडले...
पाहिला आज स्पेशल छब्बीस.
आत्ताच शिनेमा पाहून येतीये.
चित्रपट पाहीन. धन्स.
ओके ओके.
मग...!जाऊ म्हंता सिनेमा
पाहिला..
मस्त रे....