✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जात जातच नाही ... काय करू??

द
दीपकशेठ यांनी
Mon, 02/04/2013 - 11:12  ·  लेख
लेख
खूप प्रयत्न केले आणि अजुनहि करतोय आणि करेल.... पण यश काही येताच नाही आहे... काय करू जात जाताच नाही आहे ना.... मी माळी आणि ती मराठा.. एकमेकांवर खऱ प्रेम.. हो अगदी खर.. खूप प्रयत्न केले, ६-८ महिने झाले ती तिच्या घरी सांगतेय तरी सुद्धा तिचे वडील तयार होत नाही आणि त्यामुळे बाकी कोणीही पाठींबा देत नाही.. तिचे वडील गावी असतात.. गावी सर्व जन त्यांना खूप मान देतात, एकत्र कुटुंब, आणि घरात पण सर्वच मान देतात..आणी माझी मुलगी असा करतेय?? बरेच जनांना हा अनुभव येतो तसा आम्हाला सुद्धा आला, तीला धमकी देण्यात आली.. आम्ही सगळे किव्वा तो.. आणि असा काही केला तर मी माझ्या ..... हेच तर आम्हाला नको आहे ना... विचार केला २-३ वेळा म्हणून बघू होतील तयार, पण नाही :( आता वडिलाने असा पवित्र्रा घेतल्यावर मुलगी तरी काय करणार? कुणाला वाटणार असा काही झाले म्हणून.. आणि हि धमकी खरी ठरली तर?? तरीही हिम्मत हरली नाही आहे.. लढतो आहे पण हे मात्र खरा आहे, वडील धाऱ्याना समाज महत्वाचा असतो... पण मुलांच्या ख़ुशी साठी कुठे तरी थोडी तरी तयारी दाखवली तर काय हरकत आहे? तुम्हीच सुचवा अश्या वेळी काय केले पाहिजे?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मत
सल्ला
मदत

प्रतिक्रिया द्या
24975 वाचन

💬 प्रतिसाद (160)

प्रतिक्रिया

_/\_

बॅटमॅन
Mon, 02/04/2013 - 16:07 नवीन
=)) =)) =)) =)) _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

५० मी फक्त निर्वतलो आहे......

अत्रुप्त आत्मा
Mon, 02/04/2013 - 17:31 नवीन
५० मी फक्त निर्वतलो आहे.........Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

हा हा..

दादा कोंडके
Mon, 02/04/2013 - 18:17 नवीन
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

अरे देवा..

चिगो
Mon, 02/04/2013 - 18:27 नवीन
अरे, काय चाललंय काय? =)) =)) =)) तो काय बोलतोय नी तुमचं आपलं भलतंच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

=))

वपाडाव
Mon, 02/04/2013 - 18:31 नवीन
ओ मालक, काय हे...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

अरे, काय चाललंय काय? तो काय बोलतोय नी तुमचं आपलं भलतंच

संजय क्षीरसागर
Mon, 02/04/2013 - 20:11 नवीन
आम्ही आधी केलं! (आणि घरी सांगितलं नाही) त्यामुळे `जात..जातच नाही काय करू?' असा प्रश्न पडला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

धाग्यात पहिला शब्दच नसता तर

जेनी...
Mon, 02/04/2013 - 22:41 नवीन
धाग्यात पहिला शब्दच नसता तर आणखी मज्जा आली असती =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

आपण डुड आहात का?

वपाडाव
Wed, 02/06/2013 - 18:19 नवीन
आपण डुड आहात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

.

मालोजीराव
गुरुवार, 02/07/2013 - 15:46 नवीन
तुम्ही ब्याचलर आहात का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

१२+

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 02/07/2013 - 15:50 नवीन
त्यांच शिक्षण चालु आहे वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

software अभियंता आहे...

दीपकशेठ
Fri, 02/08/2013 - 07:18 नवीन
मी software अभियंता आहे, आणि सध्या अमेरिकेत नौकरी करत आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

-१

श्री गावसेना प्रमुख
Fri, 02/08/2013 - 15:59 नवीन
मालोजीराव श्री वडापाव रावांना बॅचलर म्हटले त्यावर ती कॉमेंट्स होती तुम्हाला उद्देशुन नव्हे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपकशेठ

तरी मुलीचे वडील नाही म्हणले??

पिलीयन रायडर
Fri, 02/08/2013 - 16:02 नवीन
तरी मुलीचे वडील नाही म्हणले???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपकशेठ

वाईट परीस्थीती आहे राव्

श्री गावसेना प्रमुख
Fri, 02/08/2013 - 16:05 नवीन
वाईट परीस्थीती आहे राव्,काहीतरी खोट असावी मुलात असे अगोदर म्हणायचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

सिनेमा ष्टाईल

चावटमेला
Mon, 02/04/2013 - 15:36 नवीन
हिंदी शिणेमा ष्टाईल काय तरी करा की राव, दो मासूम दिलों की मोहब्बत, जालिम दुश्मन जमान, जुदाई, परत मिलन असलं काहीतरी, लै भारी वाटेल. टांगा पलटी, घोडे फरार...
  • Log in or register to post comments

टांगापल्टीच्या आधीचं

बॅटमॅन
Mon, 02/04/2013 - 15:47 नवीन
टांगापल्टीच्या आधीचं काटाकिर्र विसर्लात काय हो चावटमेले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला

टांगा पल्टी असं वेगवेगळं

५० फक्त
Mon, 02/04/2013 - 15:52 नवीन
टांगा पल्टी असं वेगवेगळं लिहावं असं म्ह्णायाचं का तुम्हाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अर्रर्र, हे कनेक्शन तं इसरलोच

बॅटमॅन
Mon, 02/04/2013 - 16:06 नवीन
अर्रर्र, हे कनेक्शन तं इसरलोच होतो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

दीपकशेठ

प्रसाद गोडबोले
Mon, 02/04/2013 - 16:14 नवीन
पुढचं आयुष्य तुम्हाला कोणा सोबत जगायचं आहे ? फक्त त्या माणसांची पर्वा करा ... बाकीचे गेले उडत . आणि हाच प्रश्न युमच्या प्रेयसीला विचारा ... पुढचं आयुष्य कोणा सोबत जगायचं आहे ? ती जर आईवडील म्हणाली तर विषयच संपला ( तुमचा पोपट झाला =)) ) पण ती जर तुमच्या सोबत जगायचे असे म्हणाली...अन तुमची खरच स्वतःच्या एकट्याच्या जीवावर सुखाचा संसार करण्याची औकात असेल , आत्मविश्वास असेल , तर कोणाला घाबरु नका ... सरळ पळवुन न्या पोरीला ....आळंदीला जाऊन लग्न करा . पुण्यात एखादं छोटं घर घेवुन संसार सुरु करा .( मुलीचे आईवडील त्रास देणार असे वातत असेल तर आधीच पोलीसांना तशी कल्पना देवुन ठेवा , ट्रस्ट मी , अशावेळी पोलीस नक्कीच मदत करतात !) (वेळप्रसंगी मी मदतीला उभी राहेन ...)
  • Log in or register to post comments

पुण्यात एखादं छोटं घर घेवुन

काळा पहाड
Mon, 02/04/2013 - 19:42 नवीन
पुण्यात एखादं छोटं घर घेवुन संसार सुरु करा
अग आई ग !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

खूप आभार, मदतीला तयारी दाखवली..

दीपकशेठ
गुरुवार, 02/07/2013 - 14:07 नवीन
मुलीचे वडील: हे शक्य नाही, मला गाव वाळीत टाकणार, आणि मला जीव देण्याशिवाय पर्याय नाही.. मला समजून घ्या.. माझे वडील पुढे तरी काय बोलणार?? मला हेच त्यांनी सांगितल आणि बघ तुझा विचार काय वाटते ते.. त्यांचा तर हाच निर्णय आहे... तुमच्या मुळे एक जीव जाऊ शकतो, आणि हे ओझे तुम्हाला आयुष्यभर वाहावे लागणार.. आम्ही तडजोड करत आहोत.. मुलीच्या वडिलांचा जीव बळी नाही पडू देऊ शकत आमच्या सुखासाठी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मला १ वरीस लागल,

कोल्हापुरवाले
Mon, 02/04/2013 - 16:50 नवीन
माझ पण असच होत कि गा! मी शींपी आणि ती -४ ( ९६ कुळी मराठा) मी गावात्ला न ती पुन्यातली. तस्सा सगळ्यास्नी समजावयाला १ वरीस लगल बगा. आमीपण घरातल्यास्नी घेतल्याशीवाय लगीनच करायच नाही अस ठरीवल हुत. शेवटी तयार झाली सगळी, कालच्या १ तार्खीला ७ महीने झले लग्न हुन ! १ जमेची बाजू म्ह्जी दोन्ही बजुचे तसे शीकलेले होते.
  • Log in or register to post comments

"१ जमेची बाजू म्ह्जी दोन्ही

टवाळ कार्टा
Fri, 02/08/2013 - 01:00 नवीन
"१ जमेची बाजू म्ह्जी दोन्ही बजुचे तसे शीकलेले होते." ?? शिकलेले होते म्हणुन "फक्त" १ वर्श लागले असे म्हणायचे आहे का? इथल्या किती मिपाकरांमधे आपल्या पालकांना "स्वताच्या जातीची लाज वाटते" असे सांगायची हिंम्मत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोल्हापुरवाले

ज्ये बात बघा गिरिजाजी पण तेच

घाशीराम कोतवाल १.२
Mon, 02/04/2013 - 16:50 नवीन
ज्ये बात बघा गिरिजाजी पण तेच म्हणतात विचार करा अन तुमची खरच स्वतःच्या एकट्याच्या जीवावर सुखाचा संसार करण्याची औकात असेल , आत्मविश्वास असेल , तर कोणाला घाबरु नका ... सरळ पळवुन न्या पोरीला ....आळंदीला जाऊन लग्न करा हा पॉईंट महत्वाचा नाही तर तुमच दुनियादारीतल्या त्या पोरासारख व्हायच त्याच नाव आता आठवत नाही आहे :dash J)
  • Log in or register to post comments

पुढचं आयुष्य कोणा सोबत जगायचं

इरसाल
Mon, 02/04/2013 - 16:58 नवीन
पुढचं आयुष्य कोणा सोबत जगायचं आहे ? ती जर आईवडील म्हणाली तर विषयच संपला
म्हणजे ती काय आयुष्यभर लग्न करणार नाही की काय? मग तर असाही आणी तसाही पोपट ठरलेलाच. पण जर तुम्ही जीवनात बायकोची काळजी घेण्याइतके परिपुर्ण असाल तर बाकीचे पर्याय चाळु शकता. बाकी रक्षाबंधन, भाउबीज, दिवाळसण, धोंड्याचा महिना, लक्ष्मीपुजन विसरावे लागेल.
  • Log in or register to post comments

कशाला उगाच

प्रसाद गोडबोले
Mon, 02/04/2013 - 17:34 नवीन
पुढचं आयुष्य कोणा सोबत जगायचं आहे ? ती जर आईवडील म्हणाली तर विषयच संपला म्हणजे ती काय आयुष्यभर लग्न करणार नाही की काय? मग तर असाही आणी तसाही पोपट ठरलेलाच. >>>काही पोरी असतात हो , आई वडील अशी बाजु घेणार्‍या ! त्याआधी आगदी मिठ्याबिठ्या मारुन प्रेमाच्या आणाभाकाही घेतलेल्या असतात ...पण ऐन वेळेला डाव पल्टी होतो....पोरीची आई आत्महत्या करायची धमकी देते ... मुलीच्या वडीलांना माईल्ड हार्ट अ‍ॅटॅक येतो ... वगैरे वगैरे .... जाउनद्या ....कशाला उगाच जुन्या जखमांवर मीठ चोळताय इरसाल्राव ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

अग्गाई गं!

इरसाल
Mon, 02/04/2013 - 17:40 नवीन
तसल्या पोरींचा निषेधच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ऑ?

आजानुकर्ण
Mon, 02/04/2013 - 22:36 नवीन
गिरीजाकाकू तुम्हाला असे एखाद्या मुलीने गंडवले आहे की काय? उघड्या पुन्हा झाल्या जखमा उरातल्या वगैरे म्हणता म्हणून विचारले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

काकूंच्या उरातल्या जखमा एका

काळा पहाड
Mon, 02/04/2013 - 22:52 नवीन
काकूंच्या उरातल्या जखमा एका मुलीमुळे? अग बाबो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

रिक्षा मोड ऑन

प्रसाद गोडबोले
Mon, 02/04/2013 - 22:53 नवीन
आमची ही कविता वाचा http://www.misalpav.com/node/23686 :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

सुखी जीवनासाठी मानसशास्त्र

अनुराधा१९८०
Mon, 02/04/2013 - 17:05 नवीन
सुखी जीवनासाठी मानसशास्त्र आणि आपल्या संतानी सांगीतलेले "reduce your options" हे तत्व पाळा. तुम्ही एकाच वेळेला २ दगडांवर पाय ठेवायचा प्रयत्न करत आहात. एक ठरवा आणि ते मनापासुन प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करा.
  • Log in or register to post comments

दिपकशेठ,

विलासिनि
Mon, 02/04/2013 - 17:54 नवीन
दिपकशेठ, “Think Thousand times before taking a decision But - After taking decison never turn back even if you get Thousand difficulties!!” एकदा स्वतःच्या निर्णयाची खात्री करुन घ्या व तो पक्का करा.
  • Log in or register to post comments

आणि अजुन एक नम्र विनंती, तो

५० फक्त
Tue, 02/05/2013 - 07:48 नवीन
आणि अजुन एक नम्र विनंती, तो जो काय निर्णय वगैरे घेतलात ना की मग इथंच किमान याच धाग्यावर अपडेट तरी करा, काय झालं ते नाहीतर या आधी असे बरेच टैमपास धागे आले आणि गेले अगदी गुलाबजामुंच्या पाकापासुन शेजा-या-या बोक्याच्या मुतापर्यंत. मग कधी इथं कुणी खरंच मदत मागायला आला तरी त्याची चेष्टाच होईल. मा. संपादक मंडळ, असे मदत मागणारे धागे प्रकाशित करण्यापुर्वी सदर धागाकर्त्यांशी व्यनि किंवा फोनवर संपर्क साधुन संपादक मंडळ अशा मदतीच्या गरजेची खात्री करुन घेउ शकते का ? असा एक विचार आला उगीच मनात. बाकी दंगाच करायचा असेल तर काय तो कुठेही करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासिनि

निर्णय...

दीपकशेठ
Wed, 02/06/2013 - 11:30 नवीन
आधी सर्वांचे आभार... चांगले सल्ले दिलेत म्हणून... शेवटी आम्ही वडिलांच्या आणि सर्वांच्या ख़ुशी साठी तडजोडीचा हा कडू प्याला पिण्यास तयार झालो... :( :'( ४-५ वेळा माघार घेऊन प्रत्येक वेळी खूप हिम्मतीने लढलो, पण शेवटी हेच... आमच्या वडिलांचे आणि घरच्यांचे खूप आभार, जे मला इतका पाठींबा दिला आणि माझ्या साठी तिच्या वडिलांबरोबर पुढे होऊन चर्चा केली म्हणून...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

कै च्या कै

परिकथेतील राजकुमार
Wed, 02/06/2013 - 13:33 नवीन
४-५ वेळा माघार घेऊन प्रत्येक वेळी खूप हिम्मतीने लढलो, पण शेवटी हेच...
आपण लढल्याचे आपल्या लेखनातून कुठेच जाणवले नाही. तो शब्द 'रडलो' असा आहे का ? पण हिम्मतीने कसे रडतात हा प्रश्न आलाच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपकशेठ

बराच काळ तुमच्याशी सहमत

गवि
Wed, 02/06/2013 - 13:37 नवीन
बराच काळ तुमच्याशी सहमत होण्याचं निमित्त शोधत होतो. धन्यवाद. मला मुळातच या नात्यातल्या पक्केपणाबद्दल खात्री नव्हती वाटत. अन्यथा दोघेही तयार असताना काय करु असा प्रश्नच पडला नसता..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

गवि, आम्ही ४ तारखेला दुपारी १.५९ लाच सांगितलं होतं :

संजय क्षीरसागर
Wed, 02/06/2013 - 16:14 नवीन
लग्न करणारा कुणाला जुमानत नाही आणि चर्चा करणारा डेरींग करत नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

सूपर्ब

मन१
Wed, 02/06/2013 - 18:50 नवीन
bulls eye. क्लिमान शब्द. अचूक संदेश.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

प्रश्न एक जीवाचा पण होता...

दीपकशेठ
गुरुवार, 02/07/2013 - 13:43 नवीन
नाते खरेच आहे, शंका नसावी... परीस्तिथी वाइऎत आहे... ६-८ महिन्यात काय काय झाला ते सर्व नाही लिहतां आला या धाग्यात, थोडक्यात परीस्तीही लिहिली आहे.. सतत प्रयत्न चालू होते, तिचे आत्या, मामा, भाऊ, बहिण,आई, दाजी सर्वांची मदद घेतली आम्ही, पण शेवटी तिच्या वडिलांनी जीवाचा बारा वाईट करण्याचा निर्णय मागे घेतलाच नाही.. आणि आम्ही आमच्या साठी एक जीव जावा?? ते पण वडिलांचा??? किती म्हटला तरी हे सुद्धा आयुष्यभर पुरला असता... माफी असावी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

याला काउंटर म्हणुन तुमच्या

५० फक्त
गुरुवार, 02/07/2013 - 14:43 नवीन
याला काउंटर म्हणुन तुमच्या दोघांपैकी कुणी जीव देण्याची धमकी दिली असती तर वडिलांनी असाच विचार केला असता का ? आणि तसा केला असता तर एका जिवंत माणसासाठी तुम्ही केलेला प्रेमाचा त्याग अर्थपुर्ण आहे असं म्हणता येईल, नाहीतर नाही. असं माझं वैयक्तिक मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपकशेठ

आयला !!

सूड
गुरुवार, 02/07/2013 - 18:37 नवीन
मला कळतच नाही लोकं चार चार वर्षांचं एखाद्या व्यक्तीसोबत असलेलं नातं कसं विसरतात. घरचे नाही म्हणाले मोडा लग्नं, कोणीतरी स्वामी म्हणाले पत्रिका जुळत नाही मग मोडा लग्न, मुलीची आई/ मुलाचे बाबा जीव देतो म्हणता चला मोडा लग्न. नाती येवढी सहज विसरता येतात? जेव्हा एक जाउन दुसरी व्यक्ती आयुष्यात येते तेव्हा प्रेम होतंच ना? मग आधीच्या व्यक्तीबरोबर केलेला सगळा टाईमपास असतो का? पहिलंच पाऊल पुढे टाकताना हा विचार का होत नाही आणि तो जर पहिल्यांदा केला नाही तर नंतर मागेपुढे पाहू नये असं माझं तरी मत आहे न पेक्षा घरचे जे ठरवून देतील ते आपल्याला पसंत पडत असेल तर हो म्हणावं, असला हो नाहीचा व्याप करत बसू नये. दीपक हे तुम्हाला असं नाहीये आजपर्यंत जी प्रकरणं पाहिली / ऐकली त्यावरुन सहज मनात येऊन गेलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपकशेठ

पटले. मला तरी दिपकशेठ काहितरी

अनुराधा१९८०
गुरुवार, 02/07/2013 - 18:57 नवीन
पटले. मला तरी दिपकशेठ काहितरी कारणे देत आहेत असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

एक्झॅकटली हेच म्हणायचं होतं,

५० फक्त
गुरुवार, 02/07/2013 - 22:16 नवीन
एक्झॅकटली हेच म्हणायचं होतं, या धरसोडीच्या विषयावरचा उत्तम चित्रपतत तनु वेड्स मनु, जबरा विषय तेवढाच जबरी हाताळला आहे, कुणी त्या सहनायिकेचं नाव सांगेल का, ती जिच्या लग्नात निम्मा सिनेमा होतो ती, नंतर एका चहाच्या जाहिरातीत होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुराधा१९८०

अदिती राव

अभ्या..
Fri, 02/08/2013 - 01:18 नवीन
पन्नासराव तिचं नांव अदिती राव हैदरी. ती ये साली जिंदगी मध्ये पण होती. पण तिथे चित्रांगदा सिंग असल्याने ही लक्षात आली नव्हती ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

बरेच प्रयत्न केले

दीपकशेठ
गुरुवार, 02/07/2013 - 13:30 नवीन
६-८ महिन्यात काय काय झाला ते सर्व नाही लिहतां आला या धाग्यात, थोडक्यात परीस्तीही लिहिली आहे.. सतत प्रयत्न चालू होते, तिचे आत्या, मामा, भाऊ, बहिण,आई, दाजी सर्वांची मदद घेतली आम्ही, पण शेवटी तिच्या वडिलांनी जीवाचा बारा वाईट करण्याचा निर्णय मागे घेतलाच नाही.. आणि आम्ही आमच्या साठी एक जीव जावा?? ते पण वडिलांचा??? किती म्हटला तरी हे सुद्धा आयुष्यभर पुरला असता... माफी असावी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

छे.. माफी वगैरे मागून कशाला

गवि
गुरुवार, 02/07/2013 - 15:21 नवीन
छे.. माफी वगैरे मागून कशाला हो लाजवताय.. इनफॅक्ट वरवर सल्ला दिला असेल तर आम्हीच दिलगिरी व्यक्त करतो.. शिवाय, तुम्ही जितकी माहिती दिलीत त्यावरच आधरित सर्वांनी मत दिलं. न दिलेल्या माहितीवर, बीटवीन द लाईन्स माहीत नसताना कसं मत देणार कोणी? कोणी जीव वगैरे देण्याची धमकी दिली तर ते इमोशनल ब्लॅकमेलिंग असू शकतं, पण त्यातून त्यांचा तीव्र विरोधही दिसतो हे खरंच. अशा वेळी तुम्ही हे सर्ब समोरासमोर फेस करुन, पाहून, जोखूनच निर्णय घेतला आहे. यू वेअर द बेस्ट जज..आता त्याविषयी खंत बाळगू नका. आगे बढो.. नवीन स्वप्न पडतील आणि खरीही होतील ही ग्यारंटी आम्ही देऊ इच्छितो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपकशेठ

हम्म...

दादा कोंडके
गुरुवार, 02/07/2013 - 16:19 नवीन
नवीन स्वप्न पडतील आणि खरीही होतील ही ग्यारंटी आम्ही देऊ इच्छितो.
कशी काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

लाईफ शुअरली मूव्हज ऑन..

गवि
गुरुवार, 02/07/2013 - 17:04 नवीन
लाईफ शुअरली मूव्हज ऑन.. तसं होतं असं प्रत्यक्ष अनुभवात, स्वतःच्या आणि आजुबाजूच्यांच्या, असल्याने त्यांना तो दिलासा देतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

ओ हो...

दादा कोंडके
गुरुवार, 02/07/2013 - 18:45 नवीन
तसं होतं असं प्रत्यक्ष अनुभवात, स्वतःच्या आणि आजुबाजूच्यांच्या, असल्याने त्यांना तो दिलासा देतो आहे
धन्यवाद! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

नवीन स्वप्न पडतील आणि खरीही

५० फक्त
गुरुवार, 02/07/2013 - 17:56 नवीन
नवीन स्वप्न पडतील आणि खरीही होतील ही ग्यारंटी आम्ही देऊ इच्छितो.. बरं झालं अशी ग्यारंटी ब-याच जणांना हवी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा