Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by दीपकशेठ on Mon, 02/04/2013 - 11:12
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मत
सल्ला
मदत
खूप प्रयत्न केले आणि अजुनहि करतोय आणि करेल.... पण यश काही येताच नाही आहे... काय करू जात जाताच नाही आहे ना.... मी माळी आणि ती मराठा.. एकमेकांवर खऱ प्रेम.. हो अगदी खर.. खूप प्रयत्न केले, ६-८ महिने झाले ती तिच्या घरी सांगतेय तरी सुद्धा तिचे वडील तयार होत नाही आणि त्यामुळे बाकी कोणीही पाठींबा देत नाही.. तिचे वडील गावी असतात.. गावी सर्व जन त्यांना खूप मान देतात, एकत्र कुटुंब, आणि घरात पण सर्वच मान देतात..आणी माझी मुलगी असा करतेय?? बरेच जनांना हा अनुभव येतो तसा आम्हाला सुद्धा आला, तीला धमकी देण्यात आली.. आम्ही सगळे किव्वा तो.. आणि असा काही केला तर मी माझ्या ..... हेच तर आम्हाला नको आहे ना... विचार केला २-३ वेळा म्हणून बघू होतील तयार, पण नाही :( आता वडिलाने असा पवित्र्रा घेतल्यावर मुलगी तरी काय करणार? कुणाला वाटणार असा काही झाले म्हणून.. आणि हि धमकी खरी ठरली तर?? तरीही हिम्मत हरली नाही आहे.. लढतो आहे पण हे मात्र खरा आहे, वडील धाऱ्याना समाज महत्वाचा असतो... पण मुलांच्या ख़ुशी साठी कुठे तरी थोडी तरी तयारी दाखवली तर काय हरकत आहे? तुम्हीच सुचवा अश्या वेळी काय केले पाहिजे?
  • Log in or register to post comments
  • 24975 views

प्रतिक्रिया

Submitted by स्पंदना on Mon, 02/04/2013 - 12:01

Permalink

सुचवा? काय सुचवा?

पुढ जाण्यासाठी पाउल उचललेल्यांच्या मागच्यांच जळीत विचारा मला. उअरलेल्या भावंडांच आयुष्य विचारा मला.त्यातल्यात्यात मुलगी म्हणुन आता जा तुही कुणाचा हात धरुन असा जनकांनी दिलेला सल्ला विचारा मला. घराच्या चार भिंतीत बसलेला घरचा कर्ता विचारा मला. अगदी लग्न झाल्यावरही मी चटकेच सोसतेय. जाणारे पुढे बघुन जातात अन मागचे भोगतात. माझा सल्ला? शहरात चालेल हे. छोट्या गावात, खेडेगावात जेथे मानाने राह्ञल जात तेथे त्या माणसाला गावात तोंड बाहेर दाखवण अशक्य होतं. घरची बाकिची भावंड अक्षरशः होरपळतात. अजुनही हा बदल घडणार नाही आपल्या पालकांच्या बाबतीत खेडेगावात, पण आपण आपल्या मुलांना हे स्वतंत्र्य देउ. तुमची बाजु समजुन घेतलेली नाही अस समजु नका. तुमची स्वप्न, एकमेकाला न विसरण, सगळ सगळ माहिताय, पण जर वडिलांचा हा स्टॅंड असेल तर तुम्ही त्यांच आयुष्य उध्वस्त करताय. जन्मभर ते ज्या मानाने राहिले, स्वतःच्या पिढीच्या पुढे एक पाउल जाउन त्यांनी मुली शिकवल्या, त्यांना तुम्ही शंभर पावल फरफटताय. याच्या पुढच जातीपाती तिलांजलीच कार्य आपण आपल्या मुलांच्या बाबतीत करू अस निदान मी तरी ठरवलय. तुम्ही जी अपेक्षा करताय त्याच्या विरुद्ध सल्ला आहे माहित आहे. पण हे जळजळीत स्वतः भोगलेल सत्य आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Mon, 02/04/2013 - 14:39

In reply to सुचवा? काय सुचवा? by स्पंदना

Permalink

+१

सहमत आहे. रीतीनेच लग्न करा. लग्न हा एक सामाजिक व्यवहार आहे त्याचा प्रेमाशी काहीही संबंध नाही. एका बाजूनेही प्रॉब्लेम असेल तरी पुढे खूप त्रास होतो. जुनी खोडं आता सुधारणे शक्य नाही. तुमच्या मुलांना मात्र चांगल्याच गोष्टी शिकवा आणि जात-पात न पाहता त्यांच्या निवडीला पाठिंबा द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Mon, 02/04/2013 - 22:38

In reply to +१ by नगरीनिरंजन

Permalink

सहमत

सहमत. पुढचा होणारा त्रास जर खूप जास्त असेल तर इट इज नॉट वर्थ इट. all cats are grey in the dark...
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दिता on Mon, 02/04/2013 - 20:23

In reply to सुचवा? काय सुचवा? by स्पंदना

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 02/04/2013 - 12:19

Permalink

पोलिस...वकिल...सामाजिक संस्था

पोलिस...वकिल...सामाजिक संस्था...मिडिया सगळ्यांची मदत घ्या... आणि बिनधास्त पळून जाऊन लग्न करा... आणि ह्या http://antisuperstition.org/# दिलेल्या लिंकवरुन जा... तिथल्या पेजवर डाविकडे खाली
''जोडीदाराची विवेकी निवड युवा संकल्प परिषद - आंतरजातीय, धर्मीय, सत्यशोधकी विवाह''
असं लिहिलेलं आहे...त्याची माहिती वाचा...तिथे बर्‍याच कार्यकर्त्यांचे फोन नंबर्स आहेत. बेलाशक फोन करा...मदत मिळेल. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by मालोजीराव on Mon, 02/04/2013 - 15:09

In reply to पोलिस...वकिल...सामाजिक संस्था by अत्रुप्त आत्मा

Permalink

पळून जाऊन लग्न करा...

पळून जाऊन लग्न करा...
बुवा परतीकिर्येच्या खाली तुमचा भ्रमण-ध्वनी क्र टाकायचा विसरले जणू तुम्ही ...ऑ :D :P
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Mon, 02/04/2013 - 12:26

Permalink

माझे

माझे मतः दोघांच्याही आई वडीलांचे समुपदेशन करुन, त्यांची सहमती मिळवूनच पुढे जा. आणि त्या साठी अआंनी दिलेल्या माहीतीवरुन मदत मिळवा. पळून जाऊन तुम्ही फक्त आणि फक्त तुम्हा दोघांसाठी व तुमच्या दोघांच्या आईवडिलांसाठी वेदनाच विकत घ्याल.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 02/04/2013 - 12:54

Permalink

दीपक शेठ, घोडा शिकून घ्या!

घोडा म्हणजे पळणारा, अंडरवर्ल्डमधे वापरतात तो नाही. तुमच्या डियरला एसेमेस पाठवा, `आय एम कमिंग, बी रेडी' मग दौडत सासरी जा, तिला मागे बसवा आणि स्ट्रेट ऑर्थरसीट पॉइंटवर जा (महाबळेश्वर). तिथून सासर्‍याला कॉल करा : `आय एम ऑन ऑर्थरसीट पॉइंट विथ योर डॉटर बिहाइंड' (घोड्यावर आहात ही खबर वार्‍यासारखी पसरलेली असेल त्यामुळे ते वेगळं सांगायची गरज नाही). कुणाची काय बिशाद आहे नाही म्हणायची? मग घोडा विकून टाका महाबळेश्वरात आणि एसटीनं घरी येऊन लग्न करा.
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Mon, 02/04/2013 - 13:09

Permalink

सल्ला

सल्ला क्र.१ तुम्ही तुमच्या वडिलधार्‍यांशी व्यवस्थितपणे बोला.म्हणा मी जर दुसर्‍या मुलीशी लग्न केले तर ते फक्त नातं निभावुन नेणे हा प्रकार होईल.व या प्रकारने ना मी ना ती(दुसरी मुलगी) सुखी राहिल. आणी आम्ही दुखी म्हणजेच तुम्हीही दु:खी व्हाल. सल्ला क्र. २ हाच एपिसोड तुमच्या बरोबरीच्या सवंगड्याने आपल्या घरी करावा. सल्ला क्र.३ जर दोन्ही घरी तरीही नकार असेल तर तुम्ही एकमेकांना विसरुन जाणे व वडिलधारे म्हणतील त्या जोडीदाराबरोबर नवा डाव सुरु करणे ह्यातच दोन्ही कुटुंबांचे भले राहिल. वर अपर्णाअक्षय यांनी म्हटल्याप्रमाणे जर तुम्ही दोघांनी बंड करुन जरी लग्न केले तर तुम्ही दोघच सुखी असाल व तुमच्या व तिच्या लहान भाउ-बहिण, किंवा आईवडिल यांचे समाज जिणे मुश्कील करेल. तरी ह्रुदयाने विचार न करता बुद्धीने सारासार विचार करुन योग्य निर्णय घ्यावा. देव करो दोन्ही कुटुंब ह्या प्रकाराला सहमत होवोत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Mon, 02/04/2013 - 16:05

In reply to सल्ला by इरसाल

Permalink

गॅरंटी काय?

तुम्ही दोघांनी बंड करुन जरी लग्न केले तर तुम्ही दोघच सुखी असाल
ह्याची तरी गॅरंटी काय?
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Mon, 02/04/2013 - 16:44

In reply to गॅरंटी काय? by प्रभाकर पेठकर

Permalink

काका

त्याचीही गॅरंटी नाही पण इतके जीवापाड प्रेम करत आहेत तर राहतील सुखी असा आपला ठोकताळा वर्तवला.
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Mon, 02/04/2013 - 13:09

Permalink

सगळे प्रतिसाद बालिश आहेत.

सगळे प्रतिसाद बालिश आहेत. अपर्णा अक्षय चा सोडला तर. या प्रश्नाला सध्या उत्तर नाही. एकतर तुम्हाला त्रास होईल किंवा त्या बापाला (आणि पर्यायाने त्या मुलीला). कुणाला त्रास द्यायचा हे तुमच्यावर आहे. कटू आहे, पण सत्य आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Mon, 02/04/2013 - 13:13

Permalink

उरलेलं

अश्याच एका मित्राला १३/१४ वर्षे झालीत अजुन घरच्यांनी स्वीकारले नाही. भावाचा प्रेमविवाहाचा चान्स घालवला म्हणुन तो कोपलाय बहिणी म्हणतात तु आमचा भाउ नाहीस पुन्हा फोन करु नकोस.मुलीचे आईवडिल, नात झाली म्हणुन आले नी गोड झाले हेच एक समाधान.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 02/04/2013 - 13:32

Permalink

कहर आहे हा !

हे आधी लक्षात आले नाही का? आता 'विरोध' आहे म्हणून मुलीची साथ सोडून देणार का काय ? हा त्या पोरीवरती अन्याय नाही का ? चांगले शिकले सवरलेले दिसता, आणि हे असले वागत होय ? (हेच प्रश्न त्या पोरीला देखील विचारा)
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 02/04/2013 - 13:38

In reply to कहर आहे हा ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

परा - ही नीडस डेरींग, नॉट सल्ला

म्हणून मी घोड्याचा पर्याय सुचवलाय
  • Log in or register to post comments

Submitted by नक्शत्त्रा on Mon, 02/04/2013 - 13:34

Permalink

धीराने जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांना समजावण्याचा प्रयत

जात सोडून तुमचे इतर गुणां्चा उहापोह करा. माज्या मैत्रीने मैत्रिणीची हकीकत. त्यांनी ३वर्ष वाट पा ि हली े. मग एक कि कडचे पालक तैयार झाले े आि ण सहा महिन्यांनी दुसरे. आता स्र्व ठीक आहे. एकमेकांचे सुख्दुख वाटून घेतात. पण ...................... पण मुलीचे भावाचे लग्न जमले नाही २ वर्ष. आणि मुलाच्या बहिणेचे अजूनही नाही लग्न जमलेले. भावनेच्य भरात निर्णय नका घेवूत. वेळ द्या ..............आणि स्वताला सिद्ध करां. जात सोडून तुमचे इतर गुणां्चा उहापोह करा. मुलीचे पालक मुलीच भवितव्यं आणि सामाजिक बदिल्की बघतात. अत्य्नच्य साठी इकडे आड आणि तिकडे विहीर असते. इतर जवळच्या नात्लागणं विश्वासात घ्या. आणि मदत घ्या त्यांची. तुम्हीही धीराने जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांना समजावण्याचा प्रयत करा. किमयेची अपेक्षा नाकात करू. सत्य स्वीकारा.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 02/04/2013 - 13:38

Permalink

वेडी आशा रे

वेडी आशा ती हिच रे. त्यावेळी पण वाटले असेल सगळं सुरळीत होईल म्हणून. आतापण वाटतेय त्यांना मिपावर काहीतरी उत्तम सोल्युशन मिळेल म्हणून. वेडी आशा, दुसरे काय? पोरगी तु दिलेले उत्तरच देईल. हे आधी लक्षात आले नाही का?
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 02/04/2013 - 14:47

In reply to वेडी आशा रे by अभ्या..

Permalink

तेच म्हणतोय !

पोरगी तु दिलेले उत्तरच देईल. हे आधी लक्षात आले नाही का?
म्हणून तर आधी हे प्रश्न पोरीला पण विचारा असा सल्ला दिलेला आहे. आणि तिने जर 'हेच' उत्तर दिले तर तिला सरळ कोपरापासून हात जोडा आणि एकटेच चालायला लागा. कारण मुलीच्या बाजूने देखील प्रेम करण्या आधी विचार व्हायलाच हवा होता. बाकी राहिली जात-बिरादारी वैग्रेची गोष्ट, तर सरळ सरळ फाट्यावरती मारा. आज तुम्हीच हा धडा घालून दिलात, तर तुमच्या भावा-बहिणींसमोर, पुढच्या येणार्‍या पिढी समोर एक आदर्श निर्माण होईल, त्यांना देखील धाडस मिळेल. कुठलीही चुकीची व्यवस्था बदलताना त्रास हा सहन करावाच लागणार आहे. नुसती 'आदर्श' लोकांची चरित्रे वाचून आणि त्यांच्या त्यागाचे गोडवे गाऊन काही होत नाही, वेळ आली की त्यांनी जी वाट चालली, त्या वाटेवर दोन पावले टाकायचे धाडस देखील असायलाच हवे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Mon, 02/04/2013 - 16:04

In reply to तेच म्हणतोय ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

पण त्रास कोणाला?

बाकी राहिली जात-बिरादारी वैग्रेची गोष्ट, तर सरळ सरळ फाट्यावरती मारा. आज तुम्हीच हा धडा घालून दिलात, तर तुमच्या भावा-बहिणींसमोर, पुढच्या येणार्‍या पिढी समोर एक आदर्श निर्माण होईल, त्यांना देखील धाडस मिळेल. कुठलीही चुकीची व्यवस्था बदलताना त्रास हा सहन करावाच लागणार आहे. नुसती 'आदर्श' लोकांची चरित्रे वाचून आणि त्यांच्या त्यागाचे गोडवे गाऊन काही होत नाही, वेळ आली की त्यांनी जी वाट चालली, त्या वाटेवर दोन पावले टाकायचे धाडस देखील असायलाच हवे
. परा काय सांगतो आहेस ते कळतय का? महाराष्ट्रात ऑनर किलिंग नाही आहे. अन त्या दोघांना त्रास होइल अस कुणीच म्हंटलेल नाही आहे. त्रास होतो ते त्यांच्या बहिण भावांना? यांचीच फक्त लग्न होतात. बाकिच्या बहिण भावांच्या नशिबी त्यांची काहीही चुक नसताना त्रास अन अवहेलना. आईच्या नशिबी प्रचंड मानसिक छळ, अन वडिल जे आजवर चार चौघात त्यांच्या मते ताठ मानेने उभे रहात होते ते या (त्यांच्या मते) मानहानीपायी घरात कोंडुन घेतात. आता होउ दे काय व्हायच ते मला तरी मला पाहिजे तो जोडिदार (अगदी स्पष्ट म्हणावस वाटतय पण नाही म्हणत) मिळतोय ना म्हणुन डोळ्यावर स्वार्थाची झापड ओढुन बाकिच्या भावंडांना बिन लग्नाच ठेवायच असेल अन आजवर नांदलो त्या घराला एक घास सुद्धा घश्याखाली उतरवेना अश्या वातावरणात ढकलायच असेल तर करा बापडे. फेडा पांग! हेच शहरात आजकाल सगळीकडेच आहे असु दे म्हणुन चालत, अन तेथे तुम्ही एक सामान्य असता. खेडगावाची गोष्ट वेगळी. तिथे मग काल पर्यंत तुमचे भाउबंद म्हणुन असणारेही "हे आमच्यातले नव्हेत "म्हणुन रिकामे होतात.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 02/04/2013 - 13:48

Permalink

द्विधा मनःस्थिती आहे ना? काय

द्विधा मनःस्थिती आहे ना? काय करु असा प्रश्न पडतोय ना? अडून राहिलाय ना निर्णय? मग त्या मुलीशी लग्न करु नका. आईबापांना तुमच्या आयुष्यातून मागे टाकू शकणारी पोरगी मिळेल तेव्हाच तिच्याशी लग्न करा कारण तीही तुमच्यासाठी तेच करणार आहे.. कारण तीच आयुष्याला पुरणार आहे. गविकाकांचा सल्ला: व्हेन देअर इज डाउट, देअर इज नो डाउट..
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 02/04/2013 - 13:59

In reply to द्विधा मनःस्थिती आहे ना? काय by गवि

Permalink

गवि, सोपी गोष्ट आहे

लग्न करणारा कुणाला जुमानत नाही आणि चर्चा करणारा डेरींग करत नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Mon, 02/04/2013 - 15:35

In reply to गवि, सोपी गोष्ट आहे by संजय क्षीरसागर

Permalink

माझ्या माहितीतलं वाक्य '

माझ्या माहितीतलं वाक्य ' कामातुराणां भयं न लज्जा' असं आहे, लग्नातुराणां भयं न लज्जा' असं आताच ऐकतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Mon, 02/04/2013 - 14:02

Permalink

मुळात जात जाण्याचा इतका हट्ट

मुळात जात जाण्याचा इतका हट्ट का? समरसता महत्वाची .. जात घालवण्याच्या विचारा मागे धर्मान्तराचा मोठा डाव शिजत आहे का??
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 02/04/2013 - 14:04

In reply to मुळात जात जाण्याचा इतका हट्ट by अविनाशकुलकर्णी

Permalink

अभ्यासपूर्ण प्रतिसाद. अतिशय

अभ्यासपूर्ण प्रतिसाद. अतिशय काथ्यागर्भ वाक्ये. १.मुळात जात जाण्याचा इतका हट्ट का??? २.समरसता महत्वाची .. ३.जात घालवण्याच्या विचारा मागे धर्मान्तराचा मोठा डाव शिजत आहे का?? आयला, इथेच तीन टॉपिक तयार झाले की =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Mon, 02/04/2013 - 14:08

Permalink

ति जर ब्राह्मण असति तर हा

ति जर ब्राह्मण असति तर हा प्र्श्ण उभा राहिला असता का?
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 02/04/2013 - 14:12

In reply to ति जर ब्राह्मण असति तर हा by अविनाशकुलकर्णी

Permalink

ते सर्व N.A. आहे असं वाटत

ते सर्व N.A. आहे असं वाटत नाही का? सध्या जे आहे ते असं आहे आणि त्यांना प्रश्न पडलाय, जी स्थिती आहे ती "अंडर गिव्हन कंडिशन्स ऑफ टेंपरेचर अँड प्रेशर" अशी आहे.. तेव्हा हेच लग्न आयर्लंडमधे होणार असतं तर? किंवा स्वतः प्रश्नकर्ता सौदी असता तर, अशा प्रकारे विचार करुन काही उपाय मिळेलसं वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by भिकापाटील on Mon, 02/04/2013 - 14:10

Permalink

मस्त चाललय आमचं

घाबरु नको. एकमेकांच्या आईवडीलांना कन्व्हेन्स करा. मलाही १२ वर्शापूर्वी असाच प्रोब्लेम आला होता आता सोल्ह झाला आहे. आता नातवंडांना मांडीवर खेलवताअत. आता मस्त चाललय आमच
  • Log in or register to post comments

Submitted by भिकापाटील on Mon, 02/04/2013 - 14:12

Permalink

वेलप्रसंगी जात बदलु शकत्ता

वेलप्रसंगी जात बदलु शकत्ता कालजी नसावी
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on Mon, 02/04/2013 - 14:17

Permalink

मायला सोपा उपाय घरच्यांना

मायला सोपा उपाय घरच्यांना सांगा धर्म बदलोत आम्ही दोघ विषय संपला जोक्स अपार्ट पण प्रेम करताना हा विचार केला होतात का नाही ना ? मग आता मागे का हटताय सरळ कोर्ट मॅरेज करा आणि वेगळे रहा आज ना उदया सगळे सरळ होतात
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Mon, 02/04/2013 - 14:31

In reply to मायला सोपा उपाय घरच्यांना by घाशीराम कोतवाल १.२

Permalink

तोच मोठा डाव शिजत आहे

तोच मोठा डाव शिजत आहे
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on Mon, 02/04/2013 - 15:33

In reply to तोच मोठा डाव शिजत आहे by अविनाशकुलकर्णी

Permalink

समजल नाही ह्यात कसला डाव अकु?

समजल नाही ह्यात कसला डाव अकु?
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Mon, 02/04/2013 - 15:56

In reply to समजल नाही ह्यात कसला डाव अकु? by घाशीराम कोतवाल १.२

Permalink

सामुहि धर्मान्तर

सामुहि धर्मान्तर
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Mon, 02/04/2013 - 14:28

Permalink

नका करु हो . जाउ दे हे लफडं!

नका करु हो . जाउ दे हे लफडं! :) ( इथे एकामागोमाग एक लोकांनी हो-नको-हो-नको-.... अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता माझ्या नम्बरला 'नको' येतय- म्हणून "नको!")
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 02/04/2013 - 14:43

In reply to नका करु हो . जाउ दे हे लफडं! by कवितानागेश

Permalink

जावा हो पळून

पळून जावा हो. लै मज्जा येती. पोलीस, मित्र, नातेवाईक, पालक, काही शत्रू (असतील तर), भटजी, वकील्, मोबाईल कंपन्या सगळेच जण कामाला लागतेत. आपण फक्त पळून जायचे. बाकीचं सगळं आपोआप होतय. ;) मला हाय आणभव. (मौतै आता मी हो नंबरचा प्रतिसाद दिलाय बघ ;))
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Mon, 02/04/2013 - 18:38

In reply to जावा हो पळून by अभ्या..

Permalink

मी ' हो ' म्हणु कि ' नको '

मी ' हो ' म्हणु कि ' नको ' म्हणु ??? :(
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 02/04/2013 - 18:40

In reply to मी ' हो ' म्हणु कि ' नको ' by जेनी...

Permalink

काहीच नको म्हणूस, बैस गपचिप.

काहीच नको म्हणूस, बैस गपचिप. बघू जमतंय का =))
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Mon, 02/04/2013 - 18:44

In reply to काहीच नको म्हणूस, बैस गपचिप. by बॅटमॅन

Permalink

जा बाबा कट्टी

:-/ जा बाबा कट्टी :-/ :-/
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 02/04/2013 - 18:45

In reply to जा बाबा कट्टी by जेनी...

Permalink

क्या बात है!

क्या बात है!
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Mon, 02/04/2013 - 18:48

In reply to क्या बात है! by बॅटमॅन

Permalink

भौराया इथे मस्ती नक्को ...

भौराया इथे मस्ती नक्को ... :-/ शीरेस विशये हा ... नैतर दीपू काका म्हणतील .. " जाता जात नाहित ....... मी काय करु ??? " :( =))
  • Log in or register to post comments

Submitted by मालोजीराव on Mon, 02/04/2013 - 18:52

In reply to भौराया इथे मस्ती नक्को ... by जेनी...

Permalink

आवरा !!!

:))
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 02/04/2013 - 18:54

In reply to भौराया इथे मस्ती नक्को ... by जेनी...

Permalink

कायचं म्हणे भौराया. गप बघू

कायचं म्हणे भौराया. गप बघू आधी!
  • Log in or register to post comments

Submitted by अधिराज on Mon, 02/04/2013 - 14:54

Permalink

साम, दाम, दंड, भेद सगळे

साम, दाम, दंड, भेद सगळे प्रयत्न करा. आता रणांगणातून पळ काढू नका. आणि महत्वाचं म्हंजे लगिन झाल्यानंतर सासरच्यांना अभिमान वाटेल असे काम करा. होईल समदं सुरळीत.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 02/04/2013 - 15:25

In reply to साम, दाम, दंड, भेद सगळे by अधिराज

Permalink

लगिन झाल्यानंतर सासरच्यांना अभिमान वाटेल असे काम करा.

लवकरात लवकर त्यांना आजी-आजोबा करा. नायतर पुन्हा याच शीर्षकाखाली धागा काढाल!
  • Log in or register to post comments

Submitted by अधिराज on Mon, 02/04/2013 - 15:29

In reply to लगिन झाल्यानंतर सासरच्यांना अभिमान वाटेल असे काम करा. by संजय क्षीरसागर

Permalink

हा हा हा, सर तुम्ही म्हंजे ना

हा हा हा, सर तुम्ही म्हंजे ना अगदी हे आहात. कुणाचा अनुभव म्हणायचा हा?
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Mon, 02/04/2013 - 15:50

In reply to लगिन झाल्यानंतर सासरच्यांना अभिमान वाटेल असे काम करा. by संजय क्षीरसागर

Permalink

तुम्हाला धाग्याचं पहिलं अक्षर

तुम्हाला धाग्याचं पहिलं अक्षर बदला असं सुचित करावयाचं आहे काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by नि३सोलपुरकर on Mon, 02/04/2013 - 15:52

In reply to तुम्हाला धाग्याचं पहिलं अक्षर by ५० फक्त

Permalink

५० भाऊ

__/\___
  • Log in or register to post comments

Submitted by मालोजीराव on Mon, 02/04/2013 - 15:57

In reply to तुम्हाला धाग्याचं पहिलं अक्षर by ५० फक्त

Permalink

(No subject)

:)) :)) :))
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 02/04/2013 - 15:58

In reply to तुम्हाला धाग्याचं पहिलं अक्षर by ५० फक्त

Permalink

तुम्हाला धाग्याचं पहिलं अक्षर बदला असं सुचित करावयाचं आहे काय ?

ते असलं काय आणि नसलं काय... काही फरक पडत नाही
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 02/04/2013 - 16:04

In reply to तुम्हाला धाग्याचं पहिलं अक्षर बदला असं सुचित करावयाचं आहे काय ? by संजय क्षीरसागर

Permalink

अगागागागागा

अगागागागागा _____/\______
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 02/04/2013 - 16:12

In reply to तुम्हाला धाग्याचं पहिलं अक्षर बदला असं सुचित करावयाचं आहे काय ? by संजय क्षीरसागर

Permalink

पडतो की हो, कर्ते अन प्रेक्षक

पडतो की हो, कर्ते अन प्रेक्षक दोगांनाबी..हां अर्थात ते सर्वं खल्विदं भ्रम इव वगैरे सोडून हां.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com