Skip to main content

जात जातच नाही ... काय करू??

लेखक दीपकशेठ यांनी सोमवार, 04/02/2013 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
खूप प्रयत्न केले आणि अजुनहि करतोय आणि करेल.... पण यश काही येताच नाही आहे... काय करू जात जाताच नाही आहे ना.... मी माळी आणि ती मराठा.. एकमेकांवर खऱ प्रेम.. हो अगदी खर.. खूप प्रयत्न केले, ६-८ महिने झाले ती तिच्या घरी सांगतेय तरी सुद्धा तिचे वडील तयार होत नाही आणि त्यामुळे बाकी कोणीही पाठींबा देत नाही.. तिचे वडील गावी असतात.. गावी सर्व जन त्यांना खूप मान देतात, एकत्र कुटुंब, आणि घरात पण सर्वच मान देतात..आणी माझी मुलगी असा करतेय?? बरेच जनांना हा अनुभव येतो तसा आम्हाला सुद्धा आला, तीला धमकी देण्यात आली.. आम्ही सगळे किव्वा तो.. आणि असा काही केला तर मी माझ्या ..... हेच तर आम्हाला नको आहे ना... विचार केला २-३ वेळा म्हणून बघू होतील तयार, पण नाही :( आता वडिलाने असा पवित्र्रा घेतल्यावर मुलगी तरी काय करणार? कुणाला वाटणार असा काही झाले म्हणून.. आणि हि धमकी खरी ठरली तर?? तरीही हिम्मत हरली नाही आहे.. लढतो आहे पण हे मात्र खरा आहे, वडील धाऱ्याना समाज महत्वाचा असतो... पण मुलांच्या ख़ुशी साठी कुठे तरी थोडी तरी तयारी दाखवली तर काय हरकत आहे? तुम्हीच सुचवा अश्या वेळी काय केले पाहिजे?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 25025
प्रतिक्रिया 160

प्रतिक्रिया

In reply to by प्रसाद गोडबोले

मुलीचे वडील: हे शक्य नाही, मला गाव वाळीत टाकणार, आणि मला जीव देण्याशिवाय पर्याय नाही.. मला समजून घ्या.. माझे वडील पुढे तरी काय बोलणार?? मला हेच त्यांनी सांगितल आणि बघ तुझा विचार काय वाटते ते.. त्यांचा तर हाच निर्णय आहे... तुमच्या मुळे एक जीव जाऊ शकतो, आणि हे ओझे तुम्हाला आयुष्यभर वाहावे लागणार.. आम्ही तडजोड करत आहोत.. मुलीच्या वडिलांचा जीव बळी नाही पडू देऊ शकत आमच्या सुखासाठी...

माझ पण असच होत कि गा! मी शींपी आणि ती -४ ( ९६ कुळी मराठा) मी गावात्ला न ती पुन्यातली. तस्सा सगळ्यास्नी समजावयाला १ वरीस लगल बगा. आमीपण घरातल्यास्नी घेतल्याशीवाय लगीनच करायच नाही अस ठरीवल हुत. शेवटी तयार झाली सगळी, कालच्या १ तार्खीला ७ महीने झले लग्न हुन ! १ जमेची बाजू म्ह्जी दोन्ही बजुचे तसे शीकलेले होते.

In reply to by कोल्हापुरवाले

"१ जमेची बाजू म्ह्जी दोन्ही बजुचे तसे शीकलेले होते." ?? शिकलेले होते म्हणुन "फक्त" १ वर्श लागले असे म्हणायचे आहे का? इथल्या किती मिपाकरांमधे आपल्या पालकांना "स्वताच्या जातीची लाज वाटते" असे सांगायची हिंम्मत आहे?

ज्ये बात बघा गिरिजाजी पण तेच म्हणतात विचार करा अन तुमची खरच स्वतःच्या एकट्याच्या जीवावर सुखाचा संसार करण्याची औकात असेल , आत्मविश्वास असेल , तर कोणाला घाबरु नका ... सरळ पळवुन न्या पोरीला ....आळंदीला जाऊन लग्न करा हा पॉईंट महत्वाचा नाही तर तुमच दुनियादारीतल्या त्या पोरासारख व्हायच त्याच नाव आता आठवत नाही आहे :dash J)

पुढचं आयुष्य कोणा सोबत जगायचं आहे ? ती जर आईवडील म्हणाली तर विषयच संपला
म्हणजे ती काय आयुष्यभर लग्न करणार नाही की काय? मग तर असाही आणी तसाही पोपट ठरलेलाच. पण जर तुम्ही जीवनात बायकोची काळजी घेण्याइतके परिपुर्ण असाल तर बाकीचे पर्याय चाळु शकता. बाकी रक्षाबंधन, भाउबीज, दिवाळसण, धोंड्याचा महिना, लक्ष्मीपुजन विसरावे लागेल.

In reply to by इरसाल

पुढचं आयुष्य कोणा सोबत जगायचं आहे ? ती जर आईवडील म्हणाली तर विषयच संपला म्हणजे ती काय आयुष्यभर लग्न करणार नाही की काय? मग तर असाही आणी तसाही पोपट ठरलेलाच. >>>काही पोरी असतात हो , आई वडील अशी बाजु घेणार्‍या ! त्याआधी आगदी मिठ्याबिठ्या मारुन प्रेमाच्या आणाभाकाही घेतलेल्या असतात ...पण ऐन वेळेला डाव पल्टी होतो....पोरीची आई आत्महत्या करायची धमकी देते ... मुलीच्या वडीलांना माईल्ड हार्ट अ‍ॅटॅक येतो ... वगैरे वगैरे .... जाउनद्या ....कशाला उगाच जुन्या जखमांवर मीठ चोळताय इरसाल्राव ??

In reply to by प्रसाद गोडबोले

गिरीजाकाकू तुम्हाला असे एखाद्या मुलीने गंडवले आहे की काय? उघड्या पुन्हा झाल्या जखमा उरातल्या वगैरे म्हणता म्हणून विचारले.

सुखी जीवनासाठी मानसशास्त्र आणि आपल्या संतानी सांगीतलेले "reduce your options" हे तत्व पाळा. तुम्ही एकाच वेळेला २ दगडांवर पाय ठेवायचा प्रयत्न करत आहात. एक ठरवा आणि ते मनापासुन प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करा.

दिपकशेठ, “Think Thousand times before taking a decision But - After taking decison never turn back even if you get Thousand difficulties!!” एकदा स्वतःच्या निर्णयाची खात्री करुन घ्या व तो पक्का करा.

In reply to by विलासिनि

आणि अजुन एक नम्र विनंती, तो जो काय निर्णय वगैरे घेतलात ना की मग इथंच किमान याच धाग्यावर अपडेट तरी करा, काय झालं ते नाहीतर या आधी असे बरेच टैमपास धागे आले आणि गेले अगदी गुलाबजामुंच्या पाकापासुन शेजा-या-या बोक्याच्या मुतापर्यंत. मग कधी इथं कुणी खरंच मदत मागायला आला तरी त्याची चेष्टाच होईल. मा. संपादक मंडळ, असे मदत मागणारे धागे प्रकाशित करण्यापुर्वी सदर धागाकर्त्यांशी व्यनि किंवा फोनवर संपर्क साधुन संपादक मंडळ अशा मदतीच्या गरजेची खात्री करुन घेउ शकते का ? असा एक विचार आला उगीच मनात. बाकी दंगाच करायचा असेल तर काय तो कुठेही करता येईल.

In reply to by ५० फक्त

आधी सर्वांचे आभार... चांगले सल्ले दिलेत म्हणून... शेवटी आम्ही वडिलांच्या आणि सर्वांच्या ख़ुशी साठी तडजोडीचा हा कडू प्याला पिण्यास तयार झालो... :( :'( ४-५ वेळा माघार घेऊन प्रत्येक वेळी खूप हिम्मतीने लढलो, पण शेवटी हेच... आमच्या वडिलांचे आणि घरच्यांचे खूप आभार, जे मला इतका पाठींबा दिला आणि माझ्या साठी तिच्या वडिलांबरोबर पुढे होऊन चर्चा केली म्हणून...

In reply to by दीपकशेठ

४-५ वेळा माघार घेऊन प्रत्येक वेळी खूप हिम्मतीने लढलो, पण शेवटी हेच...
आपण लढल्याचे आपल्या लेखनातून कुठेच जाणवले नाही. तो शब्द 'रडलो' असा आहे का ? पण हिम्मतीने कसे रडतात हा प्रश्न आलाच...

In reply to by परिकथेतील राजकुमार

बराच काळ तुमच्याशी सहमत होण्याचं निमित्त शोधत होतो. धन्यवाद. मला मुळातच या नात्यातल्या पक्केपणाबद्दल खात्री नव्हती वाटत. अन्यथा दोघेही तयार असताना काय करु असा प्रश्नच पडला नसता..

In reply to by गवि

लग्न करणारा कुणाला जुमानत नाही आणि चर्चा करणारा डेरींग करत नाही!

In reply to by गवि

नाते खरेच आहे, शंका नसावी... परीस्तिथी वाइऎत आहे... ६-८ महिन्यात काय काय झाला ते सर्व नाही लिहतां आला या धाग्यात, थोडक्यात परीस्तीही लिहिली आहे.. सतत प्रयत्न चालू होते, तिचे आत्या, मामा, भाऊ, बहिण,आई, दाजी सर्वांची मदद घेतली आम्ही, पण शेवटी तिच्या वडिलांनी जीवाचा बारा वाईट करण्याचा निर्णय मागे घेतलाच नाही.. आणि आम्ही आमच्या साठी एक जीव जावा?? ते पण वडिलांचा??? किती म्हटला तरी हे सुद्धा आयुष्यभर पुरला असता... माफी असावी..

In reply to by दीपकशेठ

याला काउंटर म्हणुन तुमच्या दोघांपैकी कुणी जीव देण्याची धमकी दिली असती तर वडिलांनी असाच विचार केला असता का ? आणि तसा केला असता तर एका जिवंत माणसासाठी तुम्ही केलेला प्रेमाचा त्याग अर्थपुर्ण आहे असं म्हणता येईल, नाहीतर नाही. असं माझं वैयक्तिक मत आहे.

In reply to by दीपकशेठ

मला कळतच नाही लोकं चार चार वर्षांचं एखाद्या व्यक्तीसोबत असलेलं नातं कसं विसरतात. घरचे नाही म्हणाले मोडा लग्नं, कोणीतरी स्वामी म्हणाले पत्रिका जुळत नाही मग मोडा लग्न, मुलीची आई/ मुलाचे बाबा जीव देतो म्हणता चला मोडा लग्न. नाती येवढी सहज विसरता येतात? जेव्हा एक जाउन दुसरी व्यक्ती आयुष्यात येते तेव्हा प्रेम होतंच ना? मग आधीच्या व्यक्तीबरोबर केलेला सगळा टाईमपास असतो का? पहिलंच पाऊल पुढे टाकताना हा विचार का होत नाही आणि तो जर पहिल्यांदा केला नाही तर नंतर मागेपुढे पाहू नये असं माझं तरी मत आहे न पेक्षा घरचे जे ठरवून देतील ते आपल्याला पसंत पडत असेल तर हो म्हणावं, असला हो नाहीचा व्याप करत बसू नये. दीपक हे तुम्हाला असं नाहीये आजपर्यंत जी प्रकरणं पाहिली / ऐकली त्यावरुन सहज मनात येऊन गेलं.

In reply to by अनुराधा१९८०

एक्झॅकटली हेच म्हणायचं होतं, या धरसोडीच्या विषयावरचा उत्तम चित्रपतत तनु वेड्स मनु, जबरा विषय तेवढाच जबरी हाताळला आहे, कुणी त्या सहनायिकेचं नाव सांगेल का, ती जिच्या लग्नात निम्मा सिनेमा होतो ती, नंतर एका चहाच्या जाहिरातीत होती.

In reply to by ५० फक्त

पन्नासराव तिचं नांव अदिती राव हैदरी. ती ये साली जिंदगी मध्ये पण होती. पण तिथे चित्रांगदा सिंग असल्याने ही लक्षात आली नव्हती ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

६-८ महिन्यात काय काय झाला ते सर्व नाही लिहतां आला या धाग्यात, थोडक्यात परीस्तीही लिहिली आहे.. सतत प्रयत्न चालू होते, तिचे आत्या, मामा, भाऊ, बहिण,आई, दाजी सर्वांची मदद घेतली आम्ही, पण शेवटी तिच्या वडिलांनी जीवाचा बारा वाईट करण्याचा निर्णय मागे घेतलाच नाही.. आणि आम्ही आमच्या साठी एक जीव जावा?? ते पण वडिलांचा??? किती म्हटला तरी हे सुद्धा आयुष्यभर पुरला असता... माफी असावी..

In reply to by दीपकशेठ

छे.. माफी वगैरे मागून कशाला हो लाजवताय.. इनफॅक्ट वरवर सल्ला दिला असेल तर आम्हीच दिलगिरी व्यक्त करतो.. शिवाय, तुम्ही जितकी माहिती दिलीत त्यावरच आधरित सर्वांनी मत दिलं. न दिलेल्या माहितीवर, बीटवीन द लाईन्स माहीत नसताना कसं मत देणार कोणी? कोणी जीव वगैरे देण्याची धमकी दिली तर ते इमोशनल ब्लॅकमेलिंग असू शकतं, पण त्यातून त्यांचा तीव्र विरोधही दिसतो हे खरंच. अशा वेळी तुम्ही हे सर्ब समोरासमोर फेस करुन, पाहून, जोखूनच निर्णय घेतला आहे. यू वेअर द बेस्ट जज..आता त्याविषयी खंत बाळगू नका. आगे बढो.. नवीन स्वप्न पडतील आणि खरीही होतील ही ग्यारंटी आम्ही देऊ इच्छितो..

In reply to by दादा कोंडके

लाईफ शुअरली मूव्हज ऑन.. तसं होतं असं प्रत्यक्ष अनुभवात, स्वतःच्या आणि आजुबाजूच्यांच्या, असल्याने त्यांना तो दिलासा देतो आहे.

In reply to by गवि

तसं होतं असं प्रत्यक्ष अनुभवात, स्वतःच्या आणि आजुबाजूच्यांच्या, असल्याने त्यांना तो दिलासा देतो आहे
धन्यवाद! ;)

In reply to by गवि

नवीन स्वप्न पडतील आणि खरीही होतील ही ग्यारंटी आम्ही देऊ इच्छितो.. बरं झालं अशी ग्यारंटी ब-याच जणांना हवी आहे.

In reply to by ५० फक्त

तुम्हि कॉन्ट्रॅक्ट घेता/देता का ग्यरंटीचे... ?? तसं असेल तर काही जणांना तुमचा णंबर देऊन टाकतो...... ;)

In reply to by गवि

हो हो आम्ही घेतो कॉन्ट्रेक्ट ग्यारंटीचे, स्वप्न पडायच्या पण ती खरी करण्यासाठी अंथरुणातुन उठुन अंथरुणापेक्षा अंमळ लांब पाय पसरायची डेरिंग पाहिजे.

दादा समाज म्हणून तुम्हाला फायदे हवेत कि प्रेम ? शहरात जातसमाजातून बहिष्कृत केलं तरी फरक पडत नाही. लग्न आणि दु:खद प्रसंगात काय ते तेव्हढेच नातेवाईक एकत्र येणं इतकंच सामान्यांच्या बाबतीत नातेसंबंध आणि जातीचं महत्व आहे. राजकिय व्यक्तींना मात्र जातीचं महत्व आहेच आहे.

आणखी एक मार्ग आहे. पण खडतर आहे. सामाजिक सुधारणेचं व्रत हाती घ्या. जातीभेद संपवा आणि मग सुरजभाऊच्या शिनुमामातल्यासारखं सगळ्यांनी एकत्र क्लोज अप फोटु काढुन घेत लगीन करा. लग्नात नातवंडांना मांडीवर बसू द्या

दीपकशेठ, ती मुलगी जर मराठा असेल अन तेही छोट्या खेड्यातील, तर खरंच १०० वेळा विचार करा पळून वगैरे जाण्याआधी... तिच्या घरच्यांच्या आयुष्य नरक होऊन जाईल.. पुढे कदाचित माफ करतील ही तुम्हाला पण त्यांच्या जखमा कधीही भरून येणार नाहीत...

In reply to by आनन्दिता

ती मुलगी जर मराठा असेल अन तेही छोट्या खेड्यातील, तर खरंच १०० वेळा विचार करा पळून वगैरे जाण्याआधी... तिच्या घरच्यांच्या आयुष्य नरक होऊन जाईल.
त्यपेक्षा तुम्ही लवकर स्वर्गात जाण्याची शक्यता जास्त आहे. ;)

In reply to by आनन्दिता

हिंसा-अहिंसा धाग्याची प्रिंटआऊट काढून त्यांना वाचायला दिल्याने काही फरक पडण्याची शक्यता आहे का?

In reply to by काळा पहाड

इथल्या भल्याभल्यांच्या भाषा ऐकुन आमचे डोळे पांढरे व्हायची वेळ आलीय.. तर त्यांना प्रिंटा दाखवून काय करू!

In reply to by आनन्दिता

ह्म्म याला मात्र मीहि सहमत आहे ... अहो दिपक काका ... बेक्कार लोक असतात आमच्या ९६ कुळात ... :( आमच्याकडे तर गावी एका मुलीने तीच्याच मामाच्या गावातला मुलगा पण जराशीच खालच्या जातीतला होता ... तर त्याच्यासोबत पळुन जाऊन लग्न केलं मग तिच्या बाबांनी आणि चुलत्यांनी त्यांना शोधुन त्या मुलाला तिथेच मारुन टाकलं :( आणि मुलीला घरी आणुन विष पाजुन मारुन टाकलं :( आणि स्वताहा पोलिस स्टेशन ला जावुन सांगितलं आम्हि केलं हे सगळं गावच्या पोलिस पाटलाला हाताशी धरुन केस दाबुन टाकली .... हे सगळं आणि अश्या अनेक गोष्टी आई मला वरचेवर सांगत असते ..... :( :-/ घाबरायला होतं न मग मला :( ..... पण तिला नै न समजत ते :-/

In reply to by जेनी...

अहो दिपक काका ... बेक्कार लोक असतात आमच्या ९६ कुळात ... smiley
हे म्हणजे तुम्ही ९६ कुळी आहात याची जाहिरात ना?

In reply to by जेनी...

हे सगळं आणि अश्या अनेक गोष्टी आई मला वरचेवर सांगत असते .....
पुजाताई, बरोबरे, तुम्हाला सारखं सांगावं लागणारच. काय भरोसा नाही तुमचा.

In reply to by अधिराज

ओ अधिकाका .... आमच्याकडे नडला त्याला फोडला हे ब्रिदवाक्य असतय लोकांचं ... तुमी मला नडु नका हं ... सांगुन ठेवते :-/ माझ्या दादालाच नाव सांगिन :-/

In reply to by अधिराज

आँ ?? मंजी तुमी माझ्या दादाला शिंगाव घेणार ??? मला आधीपासनच डावुट होता बगा .. कि तुमी शिंग असणारा प्राणि हाय म्हणुन =))

In reply to by जेनी...

मी कोणत्या पक्षाचा खास माणूस हाये हे तुम्ही ओळखलं नाय अजुन,म्हणून आसली मजा सुचतीए. जौ दे काय बोलणार, शेवटी आपलेच दात आन् आपलेच होट.

In reply to by दादा कोंडके

दादा कोंडके तुमची प्रतिक्रिया वाचताना सहज एका वाक्याने लक्ष वेधून घेतले.....~तिच्या घरच्यांच्या आयुष्य नरक होऊन जाईल.. ~ म्हणजे नक्की काय होईल?

In reply to by आनन्दिता

नड्ला तर फोडला हिच आमचि संक्रुति आहे ! खेड्यतलि मग विचार करा !

दिपकराव जरा पोरीच्या बापाचे आणी भावाचे बॅकग्राउण्ड सांगता काय ? शक्य ती मदत मिळवुन देउ,पन लक्षात ठेवा normally वाय झेड पब्लिक असत आमच्, खर्‍या खोट्या इभ्रतीसाठी मारायची आणी मरायची तयारी असते यांची त्यामुळे विचार करुन निर्णय घ्या.....

In reply to by बाबा पाटील

मुलीचा बाप शेती करतो, १-भाऊ एम टेक, १-व्यवसाय आणि एक शिक्षण घेतो.. खरा आहे तुमचा, त्यांनी मुलीला मारायची धमकी सुद्धा दिली होती आणि स्वतः पण मरण्याची तयारी होती. आणि आम्ही असा केला तर ते जीव देणार हेच उत्तर ४-५ वेळा भेटला.. त्यांच्या अश्या निर्णयामुळेच आम्ही तडजोड करत आहोत.. मुलीच्या वडिलांचा जीव बळी नाही पडू देऊ शकत आमच्या सुखासाठी...

पाटीलबाबा तुमची तयारी समजू शकतो हो पण तुम्ही म्हणता तसे
खर्‍या खोट्या इभ्रतीसाठी मारायची आणी मरायची तयारी असते यांची
हे गुण मुलीत पण असले म्हणजे? त्यामुळे तुमच्या इशार्‍याशी सहमत. दिपकराव विचार करून निर्णय घ्या

:) चालुद्या, सह्या करायच्या असतील तेंव्हा बोलवा.. पुण्याच काम आहे, आम्ही नाही म्हणत नाही,,..

तुम्हीच विचार करा. - तुम्ही कुठे रहाता? गावात की शहरात? तुमचे उत्पन्नाचे साधन काय? समजा तुमचे काही बरे-वाइट झाले तर भावी पत्नी एकटीने जगू शकेल काय? - दोघांना भाउ-बहीण आहेत काय? असतील तर त्यांची लग्ने झाली आहेत काय? बहीणींना जास्त त्रास होतो लग्न जुळवायला अशावेळी. - तुमचे प्रेम आहे म्हणजे काय आहे? - म्हणजे मैत्री मग प्रेम? बघता-क्षणीच प्रेम? - समाजामधे सगळी उदाहरणे दिसतील अशा प्रकरणामधील. - सुखांत (सगळे सरळ झाले), दु:खांत (खून, म्रुत्यु, घटस्फोट ... सगळे प्रकार होतात) त्यामुळे उदाहरणे शोधून उत्तर मिळणार नाही. तुमचे उत्तर तुम्हालाच ठरवावे लागेल. - तुम्हाला कधितरी सामाजिक प्रश्नांवषयी आवड होती? असेल तर तुम्हाला त्यातील त्रासाची कल्पना आहे. - तुम्ही पूर्वी कधी जे बरोबर वाटते त्यासाठी विरोध पत्करून वाटते ते केले आहे काय?

In reply to by सुकु

बापरे !! म्हणजे ह्या सगळ्यांचा विचार करुन प्रेम करायचं असतं ??? :( मग नक्कोच बै :-/ एवढा विचार करत बसण्यापेक्षा आईपप्पाणी बघुन दिलेल्याशीच लग्न सोयिस्करे ... तिथे आपलं डोकं लावाय लागत नाय :P :D

In reply to by ५० फक्त

हो क्का??? इतका त्रास होत असेल तर वाचु नये अशुद्ध ... कुणी जबरदस्ती तुमचे डॉळे अशुद्ध लिहिलेल्या अक्षरावर फोकस करुन नाय धरलेले ... :-/

मुलिचे वडिल ज्या व्यक्तिला मानतात/ शक्यतो अशी व्यक्ति जिच्यावर आर्थिक कमाइची गणितेही अवलंबुन असतात मान असतो, त्यांच्याकडुनच जर मध्यस्ति करता आलि तर तुमचं काम होउ शकतं कोणालाच त्रास न होता. अन्यथा...

दिपकशेठ प्रश्न विचारुन गायबलात तुम्ही.. इतके सगळेजण इथे डोकी खाजवत बसलेत तुमच्यासाठी.. सांगा तरी तुम्हाला यातले उपाय पट्तायत की नाय ते....

In reply to by आनन्दिता

दिपकशेठ बहूधा इथले नाना उपाय वाचून पळून गेले असतील.... हिमालयात. अवांतरः मी शिर्षक जाता जातच नाही असे वाचले :P

In reply to by आनन्दिता

गायब कसा होणार, अडकलो होतो सर्वांची जमवा जमाव करण्यात आणि शेवटचा प्रयत्न करण्यात.. झाला निर्णय.. आम्ही तडजोड करत आहोत.. मुलीच्या वडिलांचा जीव बळी नाही पडू देऊ शकत आमच्या सुखासाठी...

तु नही और सही और नही और सही असा दृष्टीकोन ठेउन जगणे जमत असेल (तुम्हाला ही आणि तिलाही) तर विसरा तिला आणी पुढे जा. नपेक्षा तिच्याशीच संसार मांडणे उत्तम. तुम्ही तिलाच मनात ठेउन दुसृया कोणाशी लग्न केलेत तर तुमच्या २चे आणि तुमाच्य जोडीदारांचे अश्या ४ जणांचे आयुष्य बरबाद कराल. बाकी राहिला प्रश्न भावंडांचा आणि घरच्यांचा तर त्यला काही इलाज नाही. होइल हळु हळू सगळे ठीक. सगळ्यांचे भले होइल. लग्न नाही केलेत तर मात्र तुमचे नुकसान होइल.

In reply to by मृत्युन्जय

आम्ही तडजोड करत आहोत.. मुलीच्या वडिलांचा जीव बळी नाही पडू देऊ शकत आमच्या सुखासाठी...

आधी सर्वांचे आभार... चांगले सल्ले दिलेत म्हणून... शेवटी आम्ही वडिलांच्या आणि सर्वांच्या ख़ुशी साठी तडजोडीचा हा कडू प्याला पिण्यास तयार झालो... :( :'( ४-५ वेळा माघार घेऊन प्रत्येक वेळी खूप हिम्मतीने लढलो, पण शेवटी हेच... तिच्या वडिलांनी काही पर्याय नाही ठेवला म्हणून.. हरलो आम्ही... एक जीव वाचविण्यासाठी :( आमच्याच स्वप्न्नाना आम्ही स्वप्नाच ठेवणार... आमच्या वडिलांचे आणि घरच्यांचे खूप आभार, जे मला इतका पाठींबा दिला आणि माझ्या साठी तिच्या वडिलांबरोबर पुढे होऊन चर्चा केली म्हणून...