विखुरलेला चंद्र - ३
विखुरलेला चंद्र - १
विखुरलेला चंद्र - २
त्या रात्री चंद्रही जरा उशीराच उठला
शिकार्यात तुझ्या समोर बसून
मोहवणार्या धुक्यातून फिरतांना
जणू आरश्यासमोर बसलो होतो
-----
हे विधिलिखित कां योगायोग?
-----
तुझ्या त्या डायरीतून
तू एक एक दु:खपान
वाचतही होतीस फाडतही होतीस
माझ्या डोळ्यातून चार थेंब ओघळले
अगदी ठरल्यासारखे, ठरविल्यासारखे..
------
काळाने एका विचित्र वळणावर आणून दगा दिला
शिकार्याचे वल्हे पाण्यात छोटुल्या लाटा पसरवत होते
आणि सरणारा काळ हृदयात घण घण वाजत होता
अगदी ठरल्यासारखे, ठरविल्यासारखे..
------
पाण्यावर दूरवर पानेच पाने तरंगत होती
घरंगळत ती पाने त्या पाण्यातल्या चंद्रावर
जाऊन आदळली... आणि
खळ्ळकन आवाज झाला
------
हे ही विधिलिखित कां योगायोग?
------
मी इतकचं म्ह्टलं,
तेवढे चांद्रकण घेऊन जा
त्या विखुरलेल्या चंद्राची आठवण म्हणून...
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२९/१२/२०१२)
२/१० नंतर डायरेक्ट ३०/१२.
माघार
मधे बराच वेळ गेलेला असला,तरी
आह्ह्ह...
क्या बात, क्या बात, क्या बात.
मिका = उत्कृष्ट दर्जाची काव्यं