✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

विखुरलेला चंद्र

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Sun, 09/30/2012 - 12:02
त्या खिडकीच्या काचेमागे एक चंद्र अडकलाय अन् काचेवर काजळी.. तिथेच आम्ही तिघे होतो ती होती, माझा एकटेपणा होता आणि हो, मी पण होतो असं वाटत होतं, जणू काही समुद्राच्या तळाशी एक बुडलेला दुसरा समुद्र पडलाय... पण आपण सगळे एकमेकांचे नक्की कोण होतो? -------- चंद्राच्या काही काही मागण्या अगदी विचित्र असतात एक तर त्याच्याबरोबर सगळी रात्र जागावे लागते आणि रात्रभर जागूनही बोललेले चालत नाही त्याला असचं एकदा त्याने तुला जागवले होते त्याचा डाग अजुनही अंगावर वागवतो आहे तो -------- तिला माहीत होते तिला जावेच लागेल ति थांबली नाही अन् मीही अडवू शकलो नाही किनार्‍यापासून पाण्यावर दुरवर चंद्र प्रकाशाचे एक शेपूट पसरले होते समुद्र आणि चंद्र दोघे मिळून झुलणार्‍या तारकांना अजूनच झोके देत होते.. जणू चंद्रच विखरुन पाण्यावर आपले चांद्रकण पसरत होता त्यातले काही कण गोळा करुन घेतले म्ह्टले, तेवढे घेऊन जा विखुरलेल्या चंद्राची आठवण म्हणून... -------- जातांना असे वळून पाहीलेस.. जणू सगळाच्या सगळा समुद्र एका नजरेत बांधून, गुंडाळून घेऊन निघाली होतीस... तेवढे चांद्रकण घेऊन जा विखुरलेल्या चंद्राची आठवण म्हणून... |- मिसळलेला काव्यप्रेमी -| ( ३०/०९/२०१२)
  • विखुरलेला चंद्र - २
  • विखुरलेला चंद्र - ३

Book traversal links for विखुरलेला चंद्र

  • विखुरलेला चंद्र - २ ›

प्रतिक्रिया द्या
7535 वाचन

💬 प्रतिसाद (23)

अप्रतिम काव्य रचना ..

ज्ञानराम
Sun, 09/30/2012 - 12:06 नवीन
"जणू काही समुद्राच्या तळाशी एक बुडलेला दुसरा समुद्र पडला किनार्‍यापासून पाण्यावर दुरवर चंद्र प्रकाशाचे एक शेपूट पसरले होते समुद्र आणि चंद्र दोघे मिळून झुलणार्‍या तारकांना अजूनच झोके देत होते.. जातांना असे वळून पाहीलेस.. जणू सगळाच्या सगळा समुद्र एका नजरेत बांधून, गुंडाळून घेऊन निघाली होतीस... तेवढे चांद्रकण घेऊन जा विखुरलेल्या चंद्राची आठवण म्हणून..." विशेष आवडले . खुपच सुंदर ... अप्रतिम काव्य रचना .. मस्तच..
  • Log in or register to post comments

शेवट

श्रावण मोडक
Sun, 09/30/2012 - 12:07 नवीन
शेवट एक स्वतंत्र कविताच आहे. :-)
  • Log in or register to post comments

लय भारी रे मित्रा !

सुहास..
Sun, 09/30/2012 - 12:38 नवीन
लय भारी रे मित्रा ! शेवटच कडव खरच खास !
  • Log in or register to post comments

पुन्हा पुन्हा वाचावी अशी

यकु
Sun, 09/30/2012 - 13:43 नवीन
पुन्हा पुन्हा वाचावी अशी झालीय..
  • Log in or register to post comments

खरच मस्त

चाणक्य
Sun, 09/30/2012 - 14:25 नवीन
झालीये. फुल आवडली
  • Log in or register to post comments

केवळ सुंदर कविता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 09/30/2012 - 14:38 नवीन
.
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर.

कवितानागेश
Sun, 09/30/2012 - 16:02 नवीन
अतिशय सुंदर. :)
  • Log in or register to post comments

व्वा क्या बात है!

सुधीर
Sun, 09/30/2012 - 16:19 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments

मिका

किसन शिंदे
Sun, 09/30/2012 - 16:28 नवीन
अप्रतिम कविता!! होतात कुठे इतके दिस?
  • Log in or register to post comments

तरल

तिमा
Sun, 09/30/2012 - 16:40 नवीन
तरल उत्कट कविता. अशा प्रेमकविता व्हायला आधी स्वतःचा 'गेम' व्हावा लागतो. तेवढंही कुठलं आमच्या नशिबात.
  • Log in or register to post comments

अप्रतिम ! ! !

निरन्जन वहालेकर
Sun, 09/30/2012 - 18:14 नवीन
अतिशय सुन्दर ! ! अप्रतिम ! ! !
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर. कविता फार आवडली.

इन्दुसुता
Sun, 09/30/2012 - 18:55 नवीन
अतिशय सुंदर. कविता फार आवडली.
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Sun, 09/30/2012 - 19:17 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

सुरेख

जाई.
Sun, 09/30/2012 - 20:41 नवीन
शेवटच कडव छान जमलय
  • Log in or register to post comments

सुदर!

पैसा
Sun, 09/30/2012 - 21:34 नवीन
फार छान झालीय कविता!
  • Log in or register to post comments

मिसळलेला काव्यप्रेमी साहेब, फार सुंदर कविता.

निश
Mon, 10/01/2012 - 12:27 नवीन
फार सुंदर कविता.
  • Log in or register to post comments

आहाच..

स्पा
Mon, 10/01/2012 - 12:50 नवीन
आहाच.. मिक्या तुझा क्लास वेगळाच आहे रे.. फुल टाईम कवी हो लेका किती सुंदर झालीये "विखुरलेला चंद्र".. मस्तच कल्पना पुन्हा पुन्हा वाचावी अशी झालीये रे.. फक्त मिकाच्याच कविता मला कळतात, अस वाटायला लागलंय :)
  • Log in or register to post comments

सुरेख.

यशोधरा
Tue, 10/02/2012 - 09:06 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments

कविता आवडली.. विशेषत: शेवटलं

मस्त कलंदर
Tue, 10/02/2012 - 12:03 नवीन
कविता आवडली.. विशेषत: शेवटलं कडवं. ती एक स्वतंत्र कविता होऊ शकते या श्रामोंच्या मताशी सहमत.
  • Log in or register to post comments

गुलझार

सहज
Tue, 10/02/2012 - 12:22 नवीन
गुलझार-मेरा कुछ सामान- एकसौ सोल चांद की राते वगैरे वगैरे आठवले.. असो करुण रस आहे असे वाटल्याने कविता नाही आवडली.
  • Log in or register to post comments

dusarya bhagapeksha khupach

गोमटेश पाटिल
Wed, 10/10/2012 - 13:12 नवीन
dusarya bhagapeksha khupach chaan aahe...
  • Log in or register to post comments

खुप सुंदर आहे रे मिका. लैच

मृत्युन्जय
Wed, 10/10/2012 - 13:21 नवीन
खुप सुंदर आहे रे मिका. लैच भारी कविता केलीस की. :)
  • Log in or register to post comments

कविता आवडली.!!

फिझा
Tue, 10/16/2012 - 03:09 नवीन
कविता आवडली.!!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा