Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by हारुन शेख on Tue, 12/04/2012 - 21:05
लागणार नाही सूर केंव्हा, वेड्यापरी गाशील हवे एक वचन तरी, गात तू रहाशील प्रवास होईल वाळवंटी उन्हातून उष्ण रुक्ष होतील ओठ तुझे,गळा होईल तृष्ण भेगाळल्या वाटेवर रक्ताळल्या पायी जडावल्या पावलांनी चालत तू राही अंती येशी किनार्याशी सुखावेल मन पायांखाली सायीपरी वाळूचे अंगण क्षितिजावर जमून येईल मेघांची नक्षी साद घालतील प्रेमाची आकाशातले पक्षी सोन्याच्या होडीसारखा सूर्य समुद्रावर खुणावेल येण्या तुला नव्या प्रवासावर पुसतील तुझ्या पाऊलखुणा लाटा अलगद गोंजारेल गाल वारा करुनिया नाद शीळ हवी ओठांवर तुझ्याही त्यावेळी सुरांमध्ये ओल हवी कोमल कोवळी खंत नको परतीच्या वाटेवर वेडी शेवटचे स्वप्न आता निद्रा उरे थोडी जागे होण्या नव्या जगी डोळे मिटून पहा लागेल तेव्हा सूर तुझा गाणे गात रहा

Submitted by बॅटमॅन on Fri, 12/07/2012 - 21:56

In reply to चेपुवरुन साभार... by ५० फक्त

Permalink

कथिन आहे.

कथिन आहे. अखंड बद्धकोष्ठीकर.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 12/07/2012 - 21:59

In reply to कथिन आहे. by बॅटमॅन

Permalink

कथिन आहे का कुथून आहे?

कथिन आहे का कुथून आहे? - कवी कुंथलगिरीकर
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sat, 12/08/2012 - 01:38

In reply to कथिन आहे का कुथून आहे? by प्रचेतस

Permalink

कथिन अहे अस मल वातत.

कथिन अहे अस मल वातत. -कवी बॅटेश्चंद्रा दोशी ( कविता: कोकलाया ऊर्ध्व दिश्या)
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Fri, 12/07/2012 - 23:23

Permalink

मुक्तछंदात लयीचं अस्तित्व हवंच यासाठी इथे झालेली ही दीर्घ चर्चा

वाचण्यासारखी आहे मुक्तछंद म्हणजे नक्की काय? विषेशत: मिकाचा हा प्रतिसाद आणि हे कन्क्लूजन :
...पण तरीही त्या कवितेच्या अर्थाच्या दृष्टीने ते तिथे तसेच हवे आहे. तर हि फारकत त्या कवितेला अर्थाची जोड देऊनही त्या रचनेची गेयता आणि लय कायम ठेवते आहे.
आणि माझा इथे दिलेला पहिला प्रतिसाद :
...कवितेवरच्या अभिप्रायाबद्दल असेल तर कवितेला लय असणं नितांत आवश्यक आहे. शिवाय शब्दांच नादमाधुर्य बघणं तितकंच महत्त्वाचय. नाही तर गद्य आणि पद्य यात फरक तो काय?
आता मजा म्हणजे बॅटमॅन स्वतःचा स्टँड बदलायला लागलेत : पहिला प्रतिसाद :
कविता नेहमी छंदोबद्ध असते हे म्हणणे चूक आहे
आताचे प्रतिसाद :
बरं. आता माझ्या मते गद्य आणि पद्य रसनिष्पत्ति यांत फरक लयीचा आहेच..
मग त्यातील रसनिर्मिती आणि गद्य रसनिर्मिती यांत फरक नाही असं म्हणायचं आहे का?
लय ही गेयतेशी निगडित असावी असा सूर कुठे ध्वनित होतोय?
तुम्हाला गद्य आणि पद्य यातला फरकच कळत नसेल किंवा लयबद्धता म्हणजे काय ते समजत नसेल तर चर्चा पुढे नेण्यात अर्थ नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by हारुन शेख on Fri, 12/07/2012 - 23:35

In reply to मुक्तछंदात लयीचं अस्तित्व हवंच यासाठी इथे झालेली ही दीर्घ चर्चा by संजय क्षीरसागर

Permalink

संजयजी आता बास करा राव.

संजयजी आता बास करा राव. उत्तम चर्चा करून झाली आहे आणि प्रकार खाजवून खरुज काढण्याकडे वळतोय आता. उगाच धाग्याची गाझापट्टी करू नका. प्रतिक्रियांबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Sat, 12/08/2012 - 01:19

In reply to संजयजी आता बास करा राव. by हारुन शेख

Permalink

खल्लास...! :-)

खल्लास...! :-)
उगाच धाग्याची गाझापट्टी करू नका.
भिडलं!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sat, 12/08/2012 - 00:54

In reply to मुक्तछंदात लयीचं अस्तित्व हवंच यासाठी इथे झालेली ही दीर्घ चर्चा by संजय क्षीरसागर

Permalink

ती चर्चा मी वाचलीये, लय

ती चर्चा मी वाचलीये, लय म्हणजे गेयतेशी निगडितच असावी असे नाही हेही सांगून झालंय, पण तुमचं आपलं एकच. शिवाय हायकू हा काव्यप्रकार तुमच्या समीकरणांत बसत नाही, त्याला डावललेत बरे? असो. तुमच्या व्याख्या मी सरसकट स्वीकाराव्यात हा तुमचा आग्रह मला मान्य नाही, सबब या चर्चेत आता अर्थ उरलेला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Sat, 12/08/2012 - 01:33

In reply to ती चर्चा मी वाचलीये, लय by बॅटमॅन

Permalink

चिल माडी सार!

वास्तविक तुमच्यात मतभेद असले तरी तुमची चर्चा आमच्या सारख्यांना वाचनिय झालिय. आणि तुमचे मुद्दे लॉगिकली बरोबर असले आणी पटलेदेखिल असले तरीही, मला स्वतःला संजय यांच्यासारखंच कवितेची डेफिनिशन संकुचित असलेलीच आवडेल (पण तशी नाही हे मान्य). आणि कवितेला सिरीयस घेणार्‍या कवींनी/कवयत्रींनी सध्या एका क्लिकने जरी ती प्रकाशित करता येत असली तरीही आधी पण्णास कविता जमल्या नाहीत म्हणून फाडून टाकायला हव्यात. आणि अरूण म्हात्रेंच्या कवितेसारखं, जीर्ण ह्या पत्रातुनी मी चाळतो मजला असे ती जशी हलक्या हाताने भाकरी परतायची गवतही भोळे असे की साप खेळू द्यायचे सोडताना गाव त्यांची कात हिरवी व्हायची फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची काही लिहिलं की पुढे जन्मभर काही लिहिण्याची गरज नाही! :)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sat, 12/08/2012 - 01:42

In reply to चिल माडी सार! by दादा कोंडके

Permalink

रैट्ट यू आर विशेषतः

रैट्ट यू आर :) विशेषतः
फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची काही लिहिलं की पुढे जन्मभर काही लिहिण्याची गरज नाही!
याच्याशी दिलोजानसे तुंबा सहमत :)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 12/08/2012 - 00:03

Permalink

मिपाकर झाल्याचं चीज झालं...

असे प्रतिसाद वाचले की मिपाकर झाल्याचं चीज झालं असच वाटतं... इतकी करमणूक करणारा दुसरा गद्य अथवा पद्य कलाविष्कार पहाण्यात नाही ! ज्ञानाच्या अभिषेकांने चिंब आणि वर हहपुवा झालेला...
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Sat, 12/08/2012 - 01:24

Permalink

छान

छान. मी कविता वाचली, तर मला आघातांच्या ठेक्याची लय जाणवली. अधूनमधून चरणांत ओढाताण होत असली, तरी बहुतेक ठिकाणी माझ्याकरिता लय स्पष्ट होती. (अतिशय स्पष्ट लय :
हवे एक वचन तरी, गात तू रहाशील ... भेगाळल्या वाटेवर रक्ताळल्या पायी जडावल्या पावलांनी चालत तू राही ...
माझ्याकरिता लय अगदीच हरवलेली ओळ :
पुसतील तुझ्या पाऊलखुणा लाटा अलगद
काही यमके आवडली (समुद्रावर/प्रवासावर हे यमक अनपेक्षित, आधी चुकचुकणारे, पण लयीमुळे चपखल होणारे यमक!), तर काही बेडौल वाटली (मन/अंगण? त्यावेळी/कोवळी? यमक साधायचे ठरवले, तर आघातांच्या लयीचा विचका होतो). आता कवी हारून शेख यांनीच म्हटले आहे, "आपल्याशी सहमत." ही सहमती म्हणजे काय? हारून शेखना रचण्याच्या वेळीसुद्धा कुठलीही लय जाणवली नाही अशी सहमती आहे काय? खुद्द कवीला लय जाणवत नसेल, तर मला लय जाणवते, असा आग्रह मी करणार नाही. ("मला लय जाणवली नाही" असा शब्दही फिरवणार नाही. आग्रह करणार नाही, इतकेच.) लयीत आणि यमकांत सफाई नाही, इतपत कवीची सहमती असेल, तर चांगले. मलाही तसेच जाणवते. पण सरावाने सफाई येईल. हा प्रयत्न छान झाला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by हारुन शेख on Sat, 12/08/2012 - 02:54

Permalink

मायबाप मिपाकरांचे आभार.

अजून कवितेत सफाईदारपणा नाही याचीच सहमती. कविता अगदी फसली नाहीय तरी एकदम जमलीपण नाहीय. मनातले एक चित्र आणि कल्पना मांडतांना यमकांची ओढाताण झालीय हे प्रामाणिकपणे कबूल करतो. कवितेचे पहिले कडवे सुचले तीच लय उचलून ती उलगडायचा प्रयत्न केला. लय आहेच त्यामुळे ती जवळ जवळ सगळ्यांना जाणवली आहे. एक आर्त भाव मनात होता तोपण पोचता होतोय. टाकतांना घाई केली हेही मान्य. पण नवे काही केले कि ते share करण्याच्या अनावर वृत्तीवर संयम आता शिकून घ्यावा लागेल. खूप जोरात पळता आले कि हवेतही उडता येते असे वाटणार्यांना मिपाकर बरोब्बर आंटीधप्पा देऊन पाडतात. मायबाप मिपाकरांचे आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by इष्टुर फाकडा on Sat, 12/08/2012 - 03:45

Permalink

हारुन,

कविता भिडली ! पराशी सहमत, प्रतिसाद वाचून चिकित्सेत दु:ख असते असे का म्हणतात याचा पुनह्प्रत्यय आला :)
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Sat, 12/08/2012 - 05:41

Permalink

शेख च्चच्चा कविता आवडली .

शेख च्चच्चा कविता आवडली . पूढिल लेखनास शुभेच्छा ! आणि जे जे वाटेल ते लिहा आणि शेअर करा . तरच त्यातल्या चांगल्या वाईट गोष्टीन्चा प्रत्यय येईल . ( डरो मत .. मय हु ना ! :) )
  • Log in or register to post comments

Submitted by हारुन शेख on Sat, 12/08/2012 - 08:14

In reply to शेख च्चच्चा कविता आवडली . by जेनी...

Permalink

पवारा प्राण तळमळला

शेख च्चच्चा, दुसरं संबोधन नाही काय हो सुचलं. चचा हे वयाने अंमळ वडिल माणसाला वापरायचं संबोधन आहे. निदान मला तरी तसे वाटते. आत्ता कुठे २९ सुरु आहे. तेवढ्यात चचा. एक तुम्हाला म्हणून सांगतो ज्याचं 'चचण्याचं' वय जवळ आले आहे ते 'चचा' अशी एक व्याख्या आहे ब्वा आपली. :) आणि हो आपका सल्ला सरआंखो पर. उसको लक्षात रक्खेंगे. ThanQ.
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Sat, 12/08/2012 - 09:46

In reply to पवारा प्राण तळमळला by हारुन शेख

Permalink

काय म्ह्नायचं मग तुमाला ??

:-/ काय म्ह्नायचं मग तुमाला ?? शी बै .. आजकाल प्रेमाने कुणाला कायपण म्हणायची सोयच राहिलि नै .. :-/
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानराम on Sat, 12/08/2012 - 10:42

Permalink

तीला थोडीच माहीत होतं तुमचं

तीला थोडीच माहीत होतं तुमचं वय २९ आहे ते....!!! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Sat, 12/08/2012 - 11:15

Permalink

माझ्या प्रतिसादाचा खुद्द कविला उपयोग झाला यातच सर्व सार्थक झालं

पूजामुळे चर्चा झाली तीचे आभार. या चर्चेतून संकेतस्थळावरच्या कवितांचा दर्जा सुधारेल अशी आशा व्यक्त करून चर्चा संपन्न करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Sat, 12/08/2012 - 17:45

In reply to माझ्या प्रतिसादाचा खुद्द कविला उपयोग झाला यातच सर्व सार्थक झालं by संजय क्षीरसागर

Permalink

धन्यवाद...

चर्चा संपन्न करतो. मनापासून आभार. या निमित्ताने तुमची काव्यक्षेत्रातली जाणकारी पाहून एक नम्र सुचवणूक. तुम्ही "कविता - वृत्त, मात्रा आणि गेयता" या संदर्भाने थोडे विश्लेषणात्मक लिखाण केले तर माझ्यासारख्या सदस्यांना काव्य विभागात सक्रिय सहभागी होता येईल. आम्ही केलेल्या प्रयत्नांना तुमचे नेहमीप्रमाणे सहकार्य राहिलच अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sat, 12/08/2012 - 17:47

In reply to धन्यवाद... by मोदक

Permalink

अवांतर गंमत

आम्ही केलेल्या प्रयत्नांना तुमचे नेहमीप्रमाणे सहकार्य राहिलच अशी अपेक्षा आहे.
आता काय पाळणाघर काढणार का काय संजय काका? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Sun, 12/09/2012 - 07:19

In reply to धन्यवाद... by मोदक

Permalink

अखिल सिंव्हगड रोद अधिक धायरी

अखिल सिंव्हगड रोद अधिक धायरी प्रभाग साहित्य संघाच्या सदस्यांना ' "कविता - वृत्त, मात्रा आणि गेयता" या संदर्भाने थोडे विश्लेषणात्मक ' याची गरज काय, एखादा /दी नवकवी व त्यांच्या जिलेब्या एवढ्या भांडवलावर तुम्ही प्रतिसादांची साम्राज्यं उभारु शकता,
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Sat, 12/08/2012 - 20:32

In reply to माझ्या प्रतिसादाचा खुद्द कविला उपयोग झाला यातच सर्व सार्थक झालं by संजय क्षीरसागर

Permalink

संजय काका आभार कसले मानताय ?

संजय काका आभार कसले मानताय ?? लहानाना आशिर्वाद द्यावेत , आभार नसतात मानायचे :-/ आगेसे याद रखो हं :-/
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Sat, 12/08/2012 - 11:28

Permalink

ऊत्तम विचार.

आता 'समीक्षा करत रहा' असे एक विडंबनही यायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर on Sat, 12/08/2012 - 15:01

Permalink

चर्चा आवडली

चर्चा आवडली. एका मुलाखतीत (बोरकरांच्या जन्मशताब्दी निमित्त झालेल्या कार्यक्रमात) असं ऐकलं होतं की, बोरकरांसारख्या प्रतिभावान माणसाला कविता चालितच सुचायच्या. आता सगळेच कवी त्या प्रतिभेचे नसतील कदाचित. पण बर्‍याचवेळा छंद, मात्रा, यमक नसलेली भावस्पर्शी कविता (कुणी गद्य म्हणेल) खूप आवडून जाते आणि "दाद द्याविशी वाटते".
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Sat, 12/08/2012 - 15:56

Permalink

नको हो नको

इतकी साल काढू नका हो कवितेची... संदिप दा मला एकदा म्हणाला होता...
जे सुचतय तसचं उतरवायचं राव, ते मीटर, वृत्त, यमक गेलं चुलीत.. आधी खुप वाच, सगळं वाच, बहीणाबाई पासून ते अगदी चेपूवरच्या नवकवींपर्यंत सगळ वाचत जा... पण तेच लिही जे तुझ्या आतून येतं. तुझ्यात प्रतिभा असेल तर ती दिसेलचं, नसली तरी काही बिघडत नाही, तुझा तुला आनंद नक्की मिळेल.
आता असे काही ऐकल्यानंतर कोणाला हात आवरता येणार आहे सांगा? म्हणून मी लिहीतो ;)
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Sat, 12/08/2012 - 16:25

Permalink

मला वाटते कवितेचे दोनच प्रकार

मला वाटते कवितेचे दोनच प्रकार असतात. एक तुम्हाला भावते ती आणि दुसरी जी भावत नाही. बाकी सगळे झूट ! कवितांच्या टिकाकारांचे अनेक ग्रंथ वाचून मी हे मत बनविलेले आहे. "उदा. "मोकालाया दाही दिशा" ही सर्वोकृष्ट विनोदी कविता आहे तर "मोकळ्या दाही दिशा" हीही एक चांगली कविता आहे. संदीपच्या बायकी कविता काही जणांना भावतात तर काहींना सावरकरांच्या दाहक.........तर हे असे आहे.......... मग चांगली कविता व वाईट कविता हा वाद का होतो ? कारण स्पष्ट आहे आणि ते आपल्या सगळ्यांच्या विचारसरणीत आहे. असो. मला स्वतःला श्री. खान यांची पहिली गज़ल आवडली होती त्या तुलनेत ही एवढी नाही आवडली.......पण मी फक्त एवढेच म्हणेन......कारण वर दिलेलीच आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Sat, 12/08/2012 - 20:28

Permalink

काहि म्हणा ...

काहि म्हणा ... आत्तापर्यंत साध्या कवितेवर इतकि चर्चा कुठेहि वाचायला मिळाली नव्हती . मागे एकदा सांजसंध्याच्या कवितेवर चौराकाक्सनी पण अशीच चर्चा केली होती . पण हारुन्याला कविता मिपावर टाकल्याचं सार्थक झालं असं वाटायला हरकत नाहि ;) ( आता च्चच्चा नाहि म्हटलं हं .... दोस्तीमे ' हारुन्या ' बोलाय देखो :-/ )
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Sun, 12/09/2012 - 23:37

Permalink

बार्र..

मग आता संदीपची "नास्तिक” ही कविता हाय का नाय? नाही म्हणजे यमकाबिमकात फारशी अडकत नाही म्हणून म्हटलं..
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • Log in or register to post comments
  • 16589 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com