लागणार नाही सूर केंव्हा, वेड्यापरी गाशील
हवे एक वचन तरी, गात तू रहाशील
प्रवास होईल वाळवंटी उन्हातून उष्ण
रुक्ष होतील ओठ तुझे,गळा होईल तृष्ण
भेगाळल्या वाटेवर रक्ताळल्या पायी
जडावल्या पावलांनी चालत तू राही
अंती येशी किनार्याशी सुखावेल मन
पायांखाली सायीपरी वाळूचे अंगण
क्षितिजावर जमून येईल मेघांची नक्षी
साद घालतील प्रेमाची आकाशातले पक्षी
सोन्याच्या होडीसारखा सूर्य समुद्रावर
खुणावेल येण्या तुला नव्या प्रवासावर
पुसतील तुझ्या पाऊलखुणा लाटा अलगद
गोंजारेल गाल वारा करुनिया नाद
शीळ हवी ओठांवर तुझ्याही त्यावेळी
सुरांमध्ये ओल हवी कोमल कोवळी
खंत नको परतीच्या वाटेवर वेडी
शेवटचे स्वप्न आता निद्रा उरे थोडी
जागे होण्या नव्या जगी डोळे मिटून पहा
लागेल तेव्हा सूर तुझा गाणे गात रहा
| लेखनविषय: |
|---|
वाचने
16677
प्रतिक्रिया
78
मिसळपाव
प्रतिक्रिया
आर्त आशयघन कविता आवडली.
+१ सहमत
In reply to आर्त आशयघन कविता आवडली. by सस्नेह
कविता आवडली
लागेल तेव्हा सूर तुझा गाणे
फक्त यमक सोडता कश्याचा कशाला पत्ता नाही
उत्तम कविता. बाकी प्रतिसाद
रोज नाही कधीतरी
In reply to उत्तम कविता. बाकी प्रतिसाद by बॅटमॅन
माफ करा
हे पद्याचे भाषांतर आहे का? नाही पद्यच आहे फक्त यमक जुळवत लिहिलय
In reply to माफ करा by परिकथेतील राजकुमार
संजय काका यु आ सो रुड कट्टी
In reply to हे पद्याचे भाषांतर आहे का? नाही पद्यच आहे फक्त यमक जुळवत लिहिलय by संजय क्षीरसागर
हे बरंय!
In reply to संजय काका यु आ सो रुड कट्टी by जेनी...
=))
In reply to हे बरंय! by संजय क्षीरसागर
कवितेत तीन गोष्टी हव्या
In reply to =)) by जेनी...
क्या बात है!!
In reply to कवितेत तीन गोष्टी हव्या by संजय क्षीरसागर
कवितेला सुद्धा रियाजाची गरज असते .. हे बहुतेक कवी विसरतात
In reply to कवितेत तीन गोष्टी हव्या by संजय क्षीरसागर
आपल्याशी सहमत.
हारुन शेख हार नका मानु.
In reply to आपल्याशी सहमत. by हारुन शेख
हारुनभाई
In reply to आपल्याशी सहमत. by हारुन शेख
हारून, तुमचा हा स्वभाव तुम्हाला कवितेप्रत नेईल
कविता नेहमी छंदोबद्ध असते हे
खट्याक नि चपखल ..
In reply to कविता नेहमी छंदोबद्ध असते हे by बॅटमॅन
+१.... अभ्यासपूर्ण प्रतिसाद !
In reply to कविता नेहमी छंदोबद्ध असते हे by बॅटमॅन
प्रतिसाद अतिशय आवडला.
In reply to कविता नेहमी छंदोबद्ध असते हे by बॅटमॅन
क्या मारा...क्या मारा... हाय हाय... ;-)
In reply to कविता नेहमी छंदोबद्ध असते हे by बॅटमॅन
ब्याटम्याना... उत्कॄष्ट
In reply to कविता नेहमी छंदोबद्ध असते हे by बॅटमॅन
नादखुळा..!!
In reply to कविता नेहमी छंदोबद्ध असते हे by बॅटमॅन
उत्तम विवेचन रे बॅटमॅन.
In reply to कविता नेहमी छंदोबद्ध असते हे by बॅटमॅन
ब्यात्म्यानाचा इजय सो
सबी गवाहो को मद्दे नजर रखते
एक्झॅक्टली...!
In reply to सबी गवाहो को मद्दे नजर रखते by जेनी...
@ बॅटमॅन : कविता नेहमी छंदोबद्ध असते हे म्हणणे चूक आहे?
कविता आणि गाणं (पद) यात
In reply to @ बॅटमॅन : कविता नेहमी छंदोबद्ध असते हे म्हणणे चूक आहे? by संजय क्षीरसागर
वॉल्ट व्हिट्मनची ही कविता
In reply to @ बॅटमॅन : कविता नेहमी छंदोबद्ध असते हे म्हणणे चूक आहे? by संजय क्षीरसागर
अत्यंत अभ्यासपूर्ण पण निरूपयोगी प्रतिसाद
In reply to वॉल्ट व्हिट्मनची ही कविता by बॅटमॅन
ज्या कालिदास, भगवद्गीता
In reply to अत्यंत अभ्यासपूर्ण पण निरूपयोगी प्रतिसाद by संजय क्षीरसागर
सहमत
In reply to वॉल्ट व्हिट्मनची ही कविता by बॅटमॅन
मस्त हो आबा, ढसाळ आणि तत्सम
In reply to सहमत by आबा
@ पूजा, खरं तर तुझ्यामुळे ही चर्चा झाली म्हणून तुझे आभार
:( :-/
In reply to @ पूजा, खरं तर तुझ्यामुळे ही चर्चा झाली म्हणून तुझे आभार by संजय क्षीरसागर
@ मराठे : कविता आणि गाणं (पद) यात तुमच्या दृष्टीने काय फरक आहे?
कविता आवडली.
च्यायला !
बाकी वाचता वाचताच जी गुणगुणली
संक्षीजी आणि बॅटमॅन दोघांना
५० जी - ते गुण नाहीत काय , मी
परा, माऊस स्क्रोल करायला सहभागी असलेल्या दोघांचे प्रतिसाद
पहा...
In reply to परा, माऊस स्क्रोल करायला सहभागी असलेल्या दोघांचे प्रतिसाद by संजय क्षीरसागर
गवि, सालं किती सोपं, साधं आणि तरीही चित्रमय आणि आशयपूर्ण
In reply to पहा... by गवि
मुक्तछंद
चेपुवरुन साभार...
कथिन आहे.
In reply to चेपुवरुन साभार... by ५० फक्त
कथिन आहे का कुथून आहे?
In reply to कथिन आहे. by बॅटमॅन
कथिन अहे अस मल वातत.
In reply to कथिन आहे का कुथून आहे? by प्रचेतस
मुक्तछंदात लयीचं अस्तित्व हवंच यासाठी इथे झालेली ही दीर्घ चर्चा
संजयजी आता बास करा राव.
In reply to मुक्तछंदात लयीचं अस्तित्व हवंच यासाठी इथे झालेली ही दीर्घ चर्चा by संजय क्षीरसागर
खल्लास...! :-)
In reply to संजयजी आता बास करा राव. by हारुन शेख
ती चर्चा मी वाचलीये, लय
In reply to मुक्तछंदात लयीचं अस्तित्व हवंच यासाठी इथे झालेली ही दीर्घ चर्चा by संजय क्षीरसागर
चिल माडी सार!
In reply to ती चर्चा मी वाचलीये, लय by बॅटमॅन
रैट्ट यू आर विशेषतः
In reply to चिल माडी सार! by दादा कोंडके
मिपाकर झाल्याचं चीज झालं...
छान
मायबाप मिपाकरांचे आभार.
हारुन,
शेख च्चच्चा कविता आवडली .
पवारा प्राण तळमळला
In reply to शेख च्चच्चा कविता आवडली . by जेनी...
काय म्ह्नायचं मग तुमाला ??
In reply to पवारा प्राण तळमळला by हारुन शेख
तीला थोडीच माहीत होतं तुमचं
माझ्या प्रतिसादाचा खुद्द कविला उपयोग झाला यातच सर्व सार्थक झालं
धन्यवाद...
In reply to माझ्या प्रतिसादाचा खुद्द कविला उपयोग झाला यातच सर्व सार्थक झालं by संजय क्षीरसागर
चर्चा संपन्न करतो.मनापासून आभार. या निमित्ताने तुमची काव्यक्षेत्रातली जाणकारी पाहून एक नम्र सुचवणूक. तुम्ही "कविता - वृत्त, मात्रा आणि गेयता" या संदर्भाने थोडे विश्लेषणात्मक लिखाण केले तर माझ्यासारख्या सदस्यांना काव्य विभागात सक्रिय सहभागी होता येईल. आम्ही केलेल्या प्रयत्नांना तुमचे नेहमीप्रमाणे सहकार्य राहिलच अशी अपेक्षा आहे.अवांतर गंमत
In reply to धन्यवाद... by मोदक