गाणे गात रहा
लागणार नाही सूर केंव्हा, वेड्यापरी गाशील
हवे एक वचन तरी, गात तू रहाशील
प्रवास होईल वाळवंटी उन्हातून उष्ण
रुक्ष होतील ओठ तुझे,गळा होईल तृष्ण
भेगाळल्या वाटेवर रक्ताळल्या पायी
जडावल्या पावलांनी चालत तू राही
अंती येशी किनार्याशी सुखावेल मन
पायांखाली सायीपरी वाळूचे अंगण
क्षितिजावर जमून येईल मेघांची नक्षी
साद घालतील प्रेमाची आकाशातले पक्षी
सोन्याच्या होडीसारखा सूर्य समुद्रावर
खुणावेल येण्या तुला नव्या प्रवासावर
पुसतील तुझ्या पाऊलखुणा लाटा अलगद
गोंजारेल गाल वारा करुनिया नाद
शीळ हवी ओठांवर तुझ्याही त्यावेळी
सुरांमध्ये ओल हवी कोमल कोवळी
खंत नको परतीच्या वाटेवर वेडी
शेवटचे स्वप्न आता निद्रा उरे थोडी
जागे होण्या नव्या जगी डोळे मिटून पहा
लागेल तेव्हा सूर तुझा गाणे गात रहा
कथिन आहे.
कथिन आहे का कुथून आहे?
कथिन अहे अस मल वातत.
मुक्तछंदात लयीचं अस्तित्व हवंच यासाठी इथे झालेली ही दीर्घ चर्चा
संजयजी आता बास करा राव.
खल्लास...! :-)
ती चर्चा मी वाचलीये, लय
चिल माडी सार!
रैट्ट यू आर विशेषतः
मिपाकर झाल्याचं चीज झालं...
छान
मायबाप मिपाकरांचे आभार.
हारुन,
शेख च्चच्चा कविता आवडली .
पवारा प्राण तळमळला
काय म्ह्नायचं मग तुमाला ??
तीला थोडीच माहीत होतं तुमचं
माझ्या प्रतिसादाचा खुद्द कविला उपयोग झाला यातच सर्व सार्थक झालं
धन्यवाद...
चर्चा संपन्न करतो.मनापासून आभार. या निमित्ताने तुमची काव्यक्षेत्रातली जाणकारी पाहून एक नम्र सुचवणूक. तुम्ही "कविता - वृत्त, मात्रा आणि गेयता" या संदर्भाने थोडे विश्लेषणात्मक लिखाण केले तर माझ्यासारख्या सदस्यांना काव्य विभागात सक्रिय सहभागी होता येईल. आम्ही केलेल्या प्रयत्नांना तुमचे नेहमीप्रमाणे सहकार्य राहिलच अशी अपेक्षा आहे.अवांतर गंमत
अखिल सिंव्हगड रोद अधिक धायरी
संजय काका आभार कसले मानताय ?
ऊत्तम विचार.
चर्चा आवडली
नको हो नको
मला वाटते कवितेचे दोनच प्रकार
काहि म्हणा ...
बार्र..