गाणे गात रहा
लागणार नाही सूर केंव्हा, वेड्यापरी गाशील
हवे एक वचन तरी, गात तू रहाशील
प्रवास होईल वाळवंटी उन्हातून उष्ण
रुक्ष होतील ओठ तुझे,गळा होईल तृष्ण
भेगाळल्या वाटेवर रक्ताळल्या पायी
जडावल्या पावलांनी चालत तू राही
अंती येशी किनार्याशी सुखावेल मन
पायांखाली सायीपरी वाळूचे अंगण
क्षितिजावर जमून येईल मेघांची नक्षी
साद घालतील प्रेमाची आकाशातले पक्षी
सोन्याच्या होडीसारखा सूर्य समुद्रावर
खुणावेल येण्या तुला नव्या प्रवासावर
पुसतील तुझ्या पाऊलखुणा लाटा अलगद
गोंजारेल गाल वारा करुनिया नाद
शीळ हवी ओठांवर तुझ्याही त्यावेळी
सुरांमध्ये ओल हवी कोमल कोवळी
खंत नको परतीच्या वाटेवर वेडी
शेवटचे स्वप्न आता निद्रा उरे थोडी
जागे होण्या नव्या जगी डोळे मिटून पहा
लागेल तेव्हा सूर तुझा गाणे गात रहा
आर्त आशयघन कविता आवडली.
+१ सहमत
कविता आवडली
लागेल तेव्हा सूर तुझा गाणे
फक्त यमक सोडता कश्याचा कशाला पत्ता नाही
उत्तम कविता. बाकी प्रतिसाद
रोज नाही कधीतरी
माफ करा
हे पद्याचे भाषांतर आहे का? नाही पद्यच आहे फक्त यमक जुळवत लिहिलय
संजय काका यु आ सो रुड कट्टी
हे बरंय!
=))
कवितेत तीन गोष्टी हव्या
क्या बात है!!
कवितेला सुद्धा रियाजाची गरज असते .. हे बहुतेक कवी विसरतात
आपल्याशी सहमत.
हारुन शेख हार नका मानु.
हारुनभाई
हारून, तुमचा हा स्वभाव तुम्हाला कवितेप्रत नेईल
कविता नेहमी छंदोबद्ध असते हे
खट्याक नि चपखल ..
+१.... अभ्यासपूर्ण प्रतिसाद !
प्रतिसाद अतिशय आवडला.
क्या मारा...क्या मारा... हाय हाय... ;-)
ब्याटम्याना... उत्कॄष्ट
नादखुळा..!!
उत्तम विवेचन रे बॅटमॅन.
ब्यात्म्यानाचा इजय सो
सबी गवाहो को मद्दे नजर रखते
एक्झॅक्टली...!
@ बॅटमॅन : कविता नेहमी छंदोबद्ध असते हे म्हणणे चूक आहे?
कविता आणि गाणं (पद) यात
वॉल्ट व्हिट्मनची ही कविता
अत्यंत अभ्यासपूर्ण पण निरूपयोगी प्रतिसाद
ज्या कालिदास, भगवद्गीता
सहमत
मस्त हो आबा, ढसाळ आणि तत्सम
@ पूजा, खरं तर तुझ्यामुळे ही चर्चा झाली म्हणून तुझे आभार
:( :-/
@ मराठे : कविता आणि गाणं (पद) यात तुमच्या दृष्टीने काय फरक आहे?
कविता आवडली.
च्यायला !
बाकी वाचता वाचताच जी गुणगुणली
संक्षीजी आणि बॅटमॅन दोघांना
५० जी - ते गुण नाहीत काय , मी
परा, माऊस स्क्रोल करायला सहभागी असलेल्या दोघांचे प्रतिसाद
पहा...
गवि, सालं किती सोपं, साधं आणि तरीही चित्रमय आणि आशयपूर्ण
मुक्तछंद
चेपुवरुन साभार...