Skip to main content

गाणे गात रहा

लेखक हारुन शेख यांनी मंगळवार, 04/12/2012 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
लागणार नाही सूर केंव्हा, वेड्यापरी गाशील हवे एक वचन तरी, गात तू रहाशील प्रवास होईल वाळवंटी उन्हातून उष्ण रुक्ष होतील ओठ तुझे,गळा होईल तृष्ण भेगाळल्या वाटेवर रक्ताळल्या पायी जडावल्या पावलांनी चालत तू राही अंती येशी किनार्याशी सुखावेल मन पायांखाली सायीपरी वाळूचे अंगण क्षितिजावर जमून येईल मेघांची नक्षी साद घालतील प्रेमाची आकाशातले पक्षी सोन्याच्या होडीसारखा सूर्य समुद्रावर खुणावेल येण्या तुला नव्या प्रवासावर पुसतील तुझ्या पाऊलखुणा लाटा अलगद गोंजारेल गाल वारा करुनिया नाद शीळ हवी ओठांवर तुझ्याही त्यावेळी सुरांमध्ये ओल हवी कोमल कोवळी खंत नको परतीच्या वाटेवर वेडी शेवटचे स्वप्न आता निद्रा उरे थोडी जागे होण्या नव्या जगी डोळे मिटून पहा लागेल तेव्हा सूर तुझा गाणे गात रहा
लेखनविषय:

वाचने 16677
प्रतिक्रिया 78

प्रतिक्रिया

In reply to by मोदक

अखिल सिंव्हगड रोद अधिक धायरी प्रभाग साहित्य संघाच्या सदस्यांना ' "कविता - वृत्त, मात्रा आणि गेयता" या संदर्भाने थोडे विश्लेषणात्मक ' याची गरज काय, एखादा /दी नवकवी व त्यांच्या जिलेब्या एवढ्या भांडवलावर तुम्ही प्रतिसादांची साम्राज्यं उभारु शकता,

In reply to by संजय क्षीरसागर

संजय काका आभार कसले मानताय ?? लहानाना आशिर्वाद द्यावेत , आभार नसतात मानायचे :-/ आगेसे याद रखो हं :-/

आता 'समीक्षा करत रहा' असे एक विडंबनही यायला हरकत नाही.

चर्चा आवडली. एका मुलाखतीत (बोरकरांच्या जन्मशताब्दी निमित्त झालेल्या कार्यक्रमात) असं ऐकलं होतं की, बोरकरांसारख्या प्रतिभावान माणसाला कविता चालितच सुचायच्या. आता सगळेच कवी त्या प्रतिभेचे नसतील कदाचित. पण बर्‍याचवेळा छंद, मात्रा, यमक नसलेली भावस्पर्शी कविता (कुणी गद्य म्हणेल) खूप आवडून जाते आणि "दाद द्याविशी वाटते".

इतकी साल काढू नका हो कवितेची... संदिप दा मला एकदा म्हणाला होता...
जे सुचतय तसचं उतरवायचं राव, ते मीटर, वृत्त, यमक गेलं चुलीत.. आधी खुप वाच, सगळं वाच, बहीणाबाई पासून ते अगदी चेपूवरच्या नवकवींपर्यंत सगळ वाचत जा... पण तेच लिही जे तुझ्या आतून येतं. तुझ्यात प्रतिभा असेल तर ती दिसेलचं, नसली तरी काही बिघडत नाही, तुझा तुला आनंद नक्की मिळेल.
आता असे काही ऐकल्यानंतर कोणाला हात आवरता येणार आहे सांगा? म्हणून मी लिहीतो ;)

मला वाटते कवितेचे दोनच प्रकार असतात. एक तुम्हाला भावते ती आणि दुसरी जी भावत नाही. बाकी सगळे झूट ! कवितांच्या टिकाकारांचे अनेक ग्रंथ वाचून मी हे मत बनविलेले आहे. "उदा. "मोकालाया दाही दिशा" ही सर्वोकृष्ट विनोदी कविता आहे तर "मोकळ्या दाही दिशा" हीही एक चांगली कविता आहे. संदीपच्या बायकी कविता काही जणांना भावतात तर काहींना सावरकरांच्या दाहक.........तर हे असे आहे.......... मग चांगली कविता व वाईट कविता हा वाद का होतो ? कारण स्पष्ट आहे आणि ते आपल्या सगळ्यांच्या विचारसरणीत आहे. असो. मला स्वतःला श्री. खान यांची पहिली गज़ल आवडली होती त्या तुलनेत ही एवढी नाही आवडली.......पण मी फक्त एवढेच म्हणेन......कारण वर दिलेलीच आहेत.

काहि म्हणा ... आत्तापर्यंत साध्या कवितेवर इतकि चर्चा कुठेहि वाचायला मिळाली नव्हती . मागे एकदा सांजसंध्याच्या कवितेवर चौराकाक्सनी पण अशीच चर्चा केली होती . पण हारुन्याला कविता मिपावर टाकल्याचं सार्थक झालं असं वाटायला हरकत नाहि ;) ( आता च्चच्चा नाहि म्हटलं हं .... दोस्तीमे ' हारुन्या ' बोलाय देखो :-/ )

मग आता संदीपची "नास्तिक” ही कविता हाय का नाय? नाही म्हणजे यमकाबिमकात फारशी अडकत नाही म्हणून म्हटलं..