Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चिंतामणी on Wed, 11/21/2012 - 08:35
गुजराथ निवडणुका, महागाई, सत्ताधा-यांवर सतत होणारे अपहाराचे आरोप, देशांतर्गत वाढता विरोध, मा.बाळासाहेबांचे अंत्यविधीचे वेळी उसळलेला जनसागर इत्यादी गोष्टीपासुन लक्ष वळवण्यासाठी हुकुमाचा एक्का काढण्यात आलेला आहे. वरिल अनेक मुद्यांप्रमाणे अजून एक मुद्दा वारंवार उपस्थीत केला जातो. तो म्हणजे "अफजल गुरू" आणि "कसाब" यांची फाशी. अफजल गुरूची फाशी अजून होत नाही कारण सत्ताधारी आघाडितील घटकपक्षाचा असलेला विरोध. पण गुजराथ निवडणूक, मुंबईत उसळ्लेला जनसागर, मोदी करीश्मा या गोष्टींचा प्रभाव कमी करण्यासाठी हुकुमाचा एक्का वापरणार असे दिसत आहे. आत्ताच म.टा.च्या इआवृत्तीत एक महत्वाची बातमी वाचण्यात आली. कसाबला पुण्यात देणार फाशी? त्यात म्हणले आहे की पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद अजमल कसाब याचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला असून कसाबला पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात ( जेल ) हलवण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते . त्यामुळे कसाबच्या फाशीची अंमलबजावणी पुण्यामध्येच केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे . पुढे असे म्हणले आहे की राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सकाळी पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेत कसाबच्या संदर्भात काही महत्त्वाची माहिती दिली जाण्याची तसेच फाशीची वेळ अधिकृतरित्या जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. म.टा.ने चे.पु.वर हद्द केली आहे. तीथे म्हणले आहे "दहशतवादी कसाबला पुण्यात दिली फाशी - आर आर पाटील". आत्ताच इसकाळनेसुध्दा चे.पु.वर बातमी अपलोड केली आहे "अजमल कसाबला लटकविले फासावर" - सूत्र बाळासाहेबांचा करीश्मा आणि मोदींचा प्रभाव या दोन मुख्य गोष्टींना लक्ष करण्यासाठी हुकुमाचा एक्का वापरण्यात आलेला आहे.
  • Log in or register to post comments
  • 28640 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रकाश घाटपांडे on Wed, 11/21/2012 - 16:38

Permalink

बर झाल गुपचूप फाशी दिली ते.

बर झाल गुपचूप फाशी दिली ते. नाहीतर मिडियाने त्याचाही इव्हेंट केला असता. खर तर दहशतवाद हा आपला खरा शत्रू आहे; दहशतवादी नव्हे. तो तर भारवाही आहे. कसाब हे फक्त प्याद त्याचा बोलविता धनी पाकिस्तानात आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Wed, 11/21/2012 - 18:33

In reply to बर झाल गुपचूप फाशी दिली ते. by प्रकाश घाटपांडे

Permalink

बर झाल गुपचूप फाशी दिली ते.

बर झाल गुपचूप फाशी दिली ते. नाहीतर मिडियाने त्याचाही इव्हेंट केला असता. सहमत. आणि प्रश्नं विचारायची परवानगी दिली असती तर त्याला "कसं वाटतंय फासावर जाताना?" असे प्रश्न पण विचारले असते.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुरोध on Wed, 11/21/2012 - 16:48

Permalink

हेडिंग आवडले

काहिहि म्हणा बातमी चे हेडिंग आवड्ल्या गेले आहे.... :)
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on Wed, 11/21/2012 - 17:13

Permalink

वंदे मातरम !!

बाळासाहेब लागले कामाला आदेश दिला यमाला आधी पळत जा आणि घेऊन ये पहिले कसाबला !! पण खूपच स्वस्त मरण मिळाले त्याला..एखाद्या संध्याकाळी छ शि ट स्थानकात लोकांच्या पायात आणून टाकायला हवे होते...असो.....
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Wed, 11/21/2012 - 18:24

Permalink

मरण

हे ठरलेल्या वेळेलाच येणार, एक दिवस आधी नाही की नंतर नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिका on Wed, 11/21/2012 - 20:04

Permalink

अजमल आमीर कसाब नावाच्या

अजमल आमीर कसाब नावाच्या इस्लामी दहशतवाद्याला सरकारने गुपचुप का होईना पण फाशी दिले(नक्की फाशी दिले कि तो डँग्युने मेला हा संशोधनाचा विषय आहे) याचा आनंद मानावा कि इस्लामी दहशतवादाच्या जागतिक इतिहासात पकडल्या गेलेला एकमेव जिवंत दहशतवाद्याला संपवून भारताने इस्लामी दहशतवादाचे जागतिक केंद्रस्थान असणार्‍या पाकिस्तान विरुद्धचा सबळ पुरावा नष्ट केल्याचे दु:ख करावे....च्यामारी !हा प्रकार म्हणजे धरल तर चावतय आणि सोडल तर पळतय असाच आहे कि?बाकी सोलापूरच्या शिंदेंनी राणा भिमदेवी थाटात कसाबला फाशी देऊन फार मोठी मर्दुमकी गाजवल्याचा माध्यमांसमोर आणि देशासमोर आव आणला खरा! पण आता हा फाशी फाशी चा खेळ त्यांच्याच अंगाशी आलाय ...अफजल गुरुचा निकाल कधी लावताय? ते बोला असे विचारताच यांची बोलती बंद झाली...करा म्हणाव अजून राजकारण?काँग्रेसने ६० वर्षात इतकी घाण घालून ठेवली आहे या देशात कि ती निस्तरायला यांना किती कसाब आणि किती गुरू हलाल करावे लागतील याची मोजदादच करता येऊ शकत नाही...शिंदेची स्मरणशक्ती जरी अगदीच माफक असली तरी जनतेची स्मरणशक्ती एकदम चांगली आहे....काँग्रेसने एकच लक्षात घ्यावे "जो बुंद से गई वो हौद से नही आती"..."आधी बाप दाखवा आणि मग श्राद्ध घाला "या न्यायाने कसाबला संपवल्याचा पुरावा द्या आधी..
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 11/21/2012 - 20:19

In reply to अजमल आमीर कसाब नावाच्या by अनामिका

Permalink

या न्यायाने कसाबला संपवल्याचा

या न्यायाने कसाबला संपवल्याचा पुरावा द्या आधी.. मला उगाच चाचांचा कॉन्स्पिरसी थिअरीज हा धागा आठवला ! ;) मी उगाच माझे टाळके चालवुन काही थिअरीज / शक्यता मांडुन पाहतो... ;) १)कसाब डेंग्यूच्या तापाने फणफणला होता आणि थंडी भरुन कुडकुक्डुन मेला,त्याला फासावर लटकवले हे जाणुन बुजुन सांगण्यात आले. २)मेला तो कसाब नव्हताच ! मग खरा कसाब कुठे आहे ? ३)खर्‍या कसाबच्या बदल्यात सरबजित सिंगची सुटका अशी मांडवली झालेली आहे,त्यामुळे ज्या बोटीतुन कसाब आला होता त्या बोटीतुनच त्याला गुपचुप्पणे परत पाठवण्यात आले. ४)कसाब अजुन जिवंत असावा... मग येरवड्याला नक्की कोणाला नेण्यात आले ? ५)काय म्हणे तर ऑपरेशन X, नावा वरुनच हे ऑपरेशन बोगस वाटते. ( हे वरील ५ पर्याय टिपी म्हणुन लिहले आहेत, उद्या यातील एक जरी चुकुन खरा ठरला तर मला खरड/व्यनी करु नये.);)
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Wed, 11/21/2012 - 20:31

In reply to अजमल आमीर कसाब नावाच्या by अनामिका

Permalink

कधी,कुठे,कसे

अफ्झल गुरूला आम्ही कधी,कुठे,कशा रीतीने मारणार आहोत हे सर्व सुशीलकुमार शिंदे यांनी डिट्टेलवार जागतिक मीडिया समोर एक्ष्प्लेन करावे अशी आमची रिक्वेस्टडिमांड आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 11/21/2012 - 20:20

Permalink

चांगली बातमी

उत्तम बातमी. इथे अनेकांना त्यात राजकीय वास आला. त्यात काही आश्चर्य नाही. राजकारणी व्यक्तीने श्वास घेतला तरी त्यात राजकारणाचा विचार असू शकतो, त्यामुळे कसाबला फाशी देण्याच्या टाईमिंग मधे तसे काही नाही असे म्हणणे दुधखुळेपणाचे ठरेल. तरी देखील याचा अर्थ यात सरकारने घेतलेल्या निर्णयाचे महत्व कमी होत नाही. मुख्यत्वे जेंव्हा प्रमुख पक्ष काँग्रेस असलेले सरकार असते तेंव्हा. त्यांनी तो का घेतला असावा याच्याशी काही देणेघेणे तुर्तास कुणाला नसावे, यशस्वीरीत्या अमलात आणला हे महत्वाचे. मात्र असा निर्णय घेतल्याने काही राजकीय उपाय ठरला नाही, तरी अपाय होत नाही, इतके जर काँग्रेसनेतृत्वास समजले तर ते त्या पक्षासाठी आणि देशासाठी चांगलेच ठरेल अशी आशा आहे. बाकी या सर्व प्रकरणात खालील व्यक्ती.संस्थांचे (उलट क्रमाने) मनःपूर्वक अभिनंदन ! ७. राष्ट्रपती, केंद्र आणि राज्य सरकार - ज्यांनी निर्णय घेतला ते ६. तो निर्णय अतिशय गोपनियता राखून अमलात आणणारी महाराष्ट्र पोलीसी यंत्रणा ५. कसाबचे काय हे सातत्याने दबाव ठेवणारे पब्लीक, काही अंशी माध्यमे आणि राजकीय नेते ४. कसाबचे गुन्हे कितीही जगजाहीर असले आणि फाशीची शिक्षा होणे अटळ असले, तरी त्यासाठी कुठल्याही इतर खटल्याप्रमाणेच गांभिर्याने खटला चालवणारे अ‍ॅड. उज्वल निकम आणि त्यांची टीम (हे एकाच व्यक्तीचे काम नसते!) ३. परदेशी अतिरेक्यास जिवंत पकडले असताना देखील त्याला लोकशाही तत्वाने संपूर्ण न्यायालयीन निर्णयातून नेणारी भारतीय न्यायव्यवस्था आणि न्यायाधिश २. कसाबच्या सुरक्षाव्यवस्थेवर टिका आणि विनोद झाले आहेत. पण त्याला मारे पर्यंत जोखिम म्हणून सांभाळणारी सुरक्षा यंत्रणा आणि सर्वात शेवटी, सगळ्यात महत्वाचे, १. ज्याच्या शिवाय हे शक्य नव्हते. तो शिपाई गडी .... कसाबकडून स्वतःच्या अंगावर गोळ्यांचा भडीमार होत असताना देखील ज्याने त्याला सोडले नाही आणि ज्याच्या ह्या कर्तव्यतत्पर जिद्दीमुळे कसाब मिळाला ते, हुतात्मा तुकाराम ओंबळे! ________________________________ आज २६/११ च्या खालील मोहर्‍यांना आणि इतर निनावी हुतात्म्यांना तसेच त्यात हत्या झालेल्या निरापराधी सामान्य जनतेला खरी श्रद्धांजली मिळाली. 1.Sri Hemant Karkare, Joint Commissioner of Police, ATS, Mumbai 2.Sri Ashok Kamte, ACP, Mumbai East 3.Sri Jaywant Patil, Police Constable 4.Sri Yogesh Patil, Police Constable 5.Sri Ambadas Pawar, Police Constable 6.Sri Mukesh B.Jadhav, Home Guard 7.Sri Rahul Shinde, Constable, State Reserve Police Force 8.Sri M.Chowdhary, Constable, Railway Police Force 9.Sri Arun Chitte, Police Constable 10.Sri Balasaheb Bhosale, Asst. Police Sub-Inspector 11.Sri Tukaram G.Omble, Asst. Police Sub-Inspector, D.B.Marg PS 12.Sri Bapusaheb Durugade, Asst.Police Sub-Inspector, Naigaon PS 13.Sri Prakash P.More, Police Sub-Inspector,L.T.Marg PS 14.Sri Shashank Shinde, CST Railway PS 15.Sri Vijay Saluskar, Police Inspector, Anti-extortion cell, Mumbai 16.Major Sandeep Unnikrishnan, NSG Commando 17.Sri Gajendraji, NSG Commando
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Wed, 11/21/2012 - 20:23

In reply to चांगली बातमी by विकास

Permalink

विकास च्या पूर्ण मताशी सहमत .

विकास च्या पूर्ण मताशी सहमत . अ‍ॅडव्होकेट उज्वल निकम यांचं अभिनंदन . हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या कर्तुत्वाला सलाम आणि भावपूर्ण श्रद्धांजली .
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Wed, 11/21/2012 - 21:50

In reply to चांगली बातमी by विकास

Permalink

बरीच सहमती, पण

१. ज्याच्या शिवाय हे शक्य नव्हते. तो शिपाई गडी .... कसाबकडून स्वतःच्या अंगावर गोळ्यांचा भडीमार होत असताना देखील ज्याने त्याला सोडले नाही आणि ज्याच्या ह्या कर्तव्यतत्पर जिद्दीमुळे कसाब मिळाला ते, हुतात्मा तुकाराम ओंबळे!
१००% सहमत.
७. राष्ट्रपती, केंद्र आणि राज्य सरकार - ज्यांनी निर्णय घेतला ते
ठीक.
२. कसाबच्या सुरक्षाव्यवस्थेवर टिका आणि विनोद झाले आहेत. पण त्याला मारे पर्यंत जोखिम म्हणून सांभाळणारी सुरक्षा यंत्रणा ६. तो निर्णय अतिशय गोपनियता राखून अमलात आणणारी महाराष्ट्र पोलीसी यंत्रणा
पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा ह्या स्वतंत्रपणे काम करतात की क्रमांक ७ मध्ये सांगितल्याप्रमाणे राज्य-केंद्र सरकारच्या आदेशानुसारे?
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 11/22/2012 - 00:11

In reply to बरीच सहमती, पण by सुनील

Permalink

पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा

पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा ह्या स्वतंत्रपणे काम करतात की क्रमांक ७ मध्ये सांगितल्याप्रमाणे राज्य-केंद्र सरकारच्या आदेशानुसारे?
तसे सगळेच म्हणजे राज्य-केंद्र सरकारे, पोलीस-सुरक्षा यंत्रणा वगैरे घटनेत सांगितल्याप्रमाणे कामे करतात. किंबहूना तसे करायला हेव. तसे होतेच असे नाही... त्याच पद्धतीने, या यंत्रणा जरी राज्य-केंद्राच्या अख्त्यारीत असल्या तरी जोखिम सांभाळताना, त्याचे प्लॅनिंग करताना आणि नंतर नियंत्रण करताना स्वतंत्रपणेच करतात, भले ते वर रीपोर्ट देत असले (असावेत) तरी. नाहीतर काय पालघर प्रकरणात पोलीसांवर ठपका ठेवण्याऐवजी महाराष्ट्र सरकारवरच ठेवला असता की!
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on गुरुवार, 11/22/2012 - 07:51

In reply to पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा by विकास

Permalink

श्रेय-अपश्रेय

ठीक आहे. आता त्या यंत्रणांकडून चोख काम झाले हे उत्तमच. पण जर का कुठे ढिसाळपणा झाला असता तर, ते अपश्रेय कुणाचे? जर अपश्रेयदेखिल फक्त त्या-त्या यंत्रणांचेच (सरकारांचे नाही) असे म्हणणे असेल तर, फक्त श्रेय त्यांचेच हे ठीक. पण जर अपश्रेयाचे धनी सरकारदेखिल ठरणार असेल तर, श्रेयात त्यांचा वाटा का नाही?
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 11/22/2012 - 20:13

In reply to श्रेय-अपश्रेय by सुनील

Permalink

सरकारला जिथे प्रत्यक्ष श्रेय

सरकारला जिथे प्रत्यक्ष श्रेय देयचे आहे तिथे दिले आहे. पण जेंव्हा एखादी सरकारी यंत्रणा असते तेंव्हा ती यंत्रणा (तिच्या हक्कांतर्गत) स्वतंत्रपणे कशी काम करते याला देखील महत्व असतेच. , न्यायाधिश, अ‍ॅड उज्वल निकम (पब्लीक प्रॉसिक्यूटर म्हणून) सगळेस सरकारी आहेत. अजून ताणून म्हणायचे झाले तर, तुकाराम ओंबळे पण सरकारी पोलीसच होते, त्यामुळे कसाबला सरकारनेच पकडले असे म्हणता येईल... तिथे पण तुम्ही म्हण्ता तसे म्हणता येईल. जेंव्हा "जोखिम म्हणून सांभाळणारी सुरक्षा यंत्रणा" असे म्हणतो तेंव्हा जी जबाबदारी आहे ती योग्य रीतीने पार पाडणारे या अर्थी म्हणतो. कसाबला पकडल्यावर त्याला अँब्यूलन्समधून नेत असल्यापासून गेली चार वर्षे ज्या पद्धतीने सांभाळले गेले, ते देखील मुंबईसारख्या गजबजलेल्या भागात त्याचे श्रेय हे त्या यंत्रणेचेच असते. सुदैवानी काही घडले नाही पण, जर अघटीत घडून तो पळाला असता, पळवला गेला असता किंवा अगदी त्याने स्वतःला गळफास लावून आधीच मारून घेतले असते, तरी त्यासंदर्भात टिका (अपश्रेय) ही त्या सुरक्षा यंत्रणेवरच झाली असती. अगदी त्या संदर्भात विधानसभा/संसदेत प्रश्न विचारताना देखील तेच घडले असते. अपश्रेय / टिका सरकारवर झालीच असती तर त्यांनी (कायद्याची आणि वास्तव) योग्य शस्त्रे हातात दिली नसती तर... २६/११ हल्ल्याच्या वेळेस पण टिका ही (राष्ट्रीय) गृहमंत्रालयावर होण्यापेक्षा ती अधिक सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेवरच झाली होती. (आणि देशावरील गंभीर हल्ला असताना सतत फॅन्सीड्रेस सारखे कपडे बदलण्यावर झाली). महाराष्ट्र गृहमंत्रालयावर आणि मुख्यमंत्र्यांवर झालेली टीका ही बुलेटप्रूफ जॅकेट्स न देणे पासून ते फिल्मी दिग्दर्शकांना ताज चा अ‍ॅक्सेस देणे यावर झाली. तेच अगदी इंदीरा गांधीच्या हत्येच्या वेळेसही झाले होते. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Wed, 11/21/2012 - 20:31

Permalink

आज सकाळी ११ ला विकिपेडियावर

आज सकाळी ११ ला विकिपेडियावर कसाबचे पान पाहीले. त्यात मॄत्यूचे कारण डेंगू होते. नंतर बदललेले दिसले. पण डेंगूच खरा कारण बडे बडे शहरो मे... आपण जाणताच
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Wed, 11/21/2012 - 20:46

Permalink

मला शन्का आहे.

खरच फाशी दिली की सरकार काही लपवायचा प्रयत्न करतय?
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Wed, 11/21/2012 - 21:24

Permalink

सांगलीतील ४ मशिदीत आज नमाज

सांगलीतील ४ मशिदीत आज नमाज झाला नाही अशी बातमी समजतीय. अजुन कन्फर्म नाही.. फेबु मित्र मंडळ
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Wed, 11/21/2012 - 21:34

Permalink

तो मेला आणि पाकिस्तानात शहीद

तो मेला आणि पाकिस्तानात शहीद झाला. आता त्यांचे उदाहरण देऊन अजून बेरोजगार पोरांना धर्मांध केले जाईन. ये तो मोहरा था. वजीर अभी जिंदा हे, आणी हो हे अजून जिवंत आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Wed, 11/21/2012 - 21:54

Permalink

(एकाने) टाकला की (दुसर्‍याच्या) हातातून गेला?

हुकुमाचा एक्का टाकण्यात आलेला आहे
हुकुमाचा एक्का (एकाकडून) टाकण्यात आला आहे की हुकुमाचा एक्का (दुसर्‍याच्या) हातातून गेला आहे! वरील बर्‍याच प्रतिक्रिया वाचून असेच वाटते आहे!! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by जानु on Wed, 11/21/2012 - 22:01

Permalink

मुख्य मुद्दा

यावर आपल्या 'एका समुहाची' प्रतिक्रिया काय हे पाहणे फार महत्वाचे...........
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Wed, 11/21/2012 - 22:19

Permalink

http://en.wikipedia.org/wiki

http://en.wikipedia.org/wiki/Ajmal_Kasab हे पहावे यात अगदी वरती काय लिहीले आहे ते महत्वाचे This article is about a person who has recently died. Some information, such as that pertaining to the circumstances of the person's death and surrounding events, may change as more facts become known.
  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on Wed, 11/21/2012 - 22:27

Permalink

खंत

सरकारची एक मुख्य जवावदारी असते ती म्हणजे सामान्य लोकांच्या संरक्षणाची. २६/११ ला सरकारने सिद्ध केले की ते त्या कामात कमकुवत आहे. हेरखाते व अन्य विभागांना काही कळले नाही. एक नराधम अतिरेकी जिवंत सापडला तर त्याच्या फाशीचे घोंगडे इतके भिजत ठेवले. इतका ढळढळीत पुरावा असताना कसाबला फाशी द्यायला इतका विलंब लागतो तर बाकी बाबतीत काय आनंद असेल ते विचार करण्याजोगे आहे. सरकारने आपले कर्तव्य केले आहे आणि त्यात अनाकलनीय दिरंगाई केली आहे. त्याबद्दल जल्लोष करण्याजोगे काही आहे असे मला वाटत नाही. ज्या करता सरकारला नेमले आहे ते काम त्यांनी बर्‍याच विलंबाने केले. सुप्रीम कोर्टाने फाशी निश्चित केल्यावर इतका वेळ का गेला आणि संबंधित मंडळींनी त्यावर काय विचार विनिमय केला ह्याचा तपशील माहिती अधिकाराखाली मिळाला तर बरे होईल. एका गरीब तरूणाला रानटी तत्वज्ञान शिकवून, क्रूर अतिरेकी बनवून शेकडो मैल दूर जाऊन शेकडो निरपराध लोकांना थंडपणे ठार करण्याची प्रेरणा देणारे इस्लामी अतिरेक्यांचे म्होरके ह्यांना कोण आणि कसे संपवणार हा एक प्रश्न आहेच. एव्हाना आणखी डझनभर कसाब पाकिस्तानात तयार होऊन संधीची वाट बघत असतील.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Wed, 11/21/2012 - 23:36

In reply to खंत by हुप्प्या

Permalink

विलंब?

इतका ढळढळीत पुरावा असताना कसाबला फाशी द्यायला इतका विलंब लागतो
कारण भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे. भारताच्या लोकशाही व्यवस्थेला संपूर्ण जगात मान मिळतो. जगातील बहुतांश देश आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांचे भारताबरोबर प्रत्यार्पण करतात. याविषयी मी वर अधिक लिहिलेच आहे. चीन किंवा अरब राष्ट्रांमध्ये एवढा वेळ लागला असता तर ती आश्चर्याची बाब असती. पण आपल्याबाबतीत इतर अनेक प्रकरणांपेक्षा कमी वेळेत या प्रकरणाला पूर्णत्वाकडे पोचवले गेले.
  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on गुरुवार, 11/22/2012 - 01:35

In reply to विलंब? by श्रीरंग_जोशी

Permalink

लोकशाही राष्ट्र आणि विलंब?

लोकशाहीत न्यायदानात विलंब व्हावा असा संकेत आहे का? का बरे? उशिराने दिलेला न्याय हा अन्यायाच्या तोडीचा असतो असे म्हणतात ते का? की ते लोकशाहीत लागू नाही? झाले ते उत्तम झाले पण हा सरकारने फार पराक्रम केला आहे असे नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 11/22/2012 - 02:13

In reply to लोकशाही राष्ट्र आणि विलंब? by हुप्प्या

Permalink

उशीर कुठे झालाय?

प्रत्यक्ष फाशी देण्यात आलेली आजवरची सर्व प्रकरणे बघा... त्यापैकी एखादेच यापेक्षा अधिक वेगाने पूर्णत्वाला पोचले आहे. न्यायालयात खटल्याचे कामकाज प्रत्यक्ष सुरू व्हायलाच घटनेनंतरचे ६ महिने गेले. सर्व साक्षी, पुरावे गोळा करणे त्यांचे विश्लेषण करून तार्किक क्रमाने त्यांची मांडणी करणे. दोन्ही बाजूंचे वकील,विशेष सत्र न्यायालयाचे स्वतः न्यायमूर्ती व त्यांचे कर्मचारी या सर्वांनी नेहमीपेक्षा अधिक तास काम करून वर्षाच्या आत खटला संपवला होता. समजा घिसाडघाईने एखादा खटला चालवून प्रत्यक्ष दोषी नसणार्‍याला मृत्यूदंड दिला गेला तर? न्यायदेवता आंधळी असते अन ती तशीच असावी कारण आपण स्वतः अथवा आपल्या जवळचा कुणीही फौजदारी शिक्षा होऊ शकेल अशा प्रकरणात अडकला तर स्वतःला वाचवायची संधी नाही मिळाली तरी चालेल पण काही आठवड्यात वा काही महिन्यांत खटला पूर्णत्वाला पोचवलाच पाहिजे असा आग्रह आपण धरू का? जर या प्रश्नाचे उत्तर हो असेल तर मग आपला आक्षेप संयुक्तिक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on गुरुवार, 11/22/2012 - 09:12

In reply to उशीर कुठे झालाय? by श्रीरंग_जोशी

Permalink

इथे फौजदारी शिक्षेचे प्रकरण

इथे फौजदारी शिक्षेचे प्रकरण नाहीये इथे देशाविरुद्ध युद्ध पुकारणे असा आरोप होता वाटते, त्यामुळे त्याला फाशी लवकर झाली पाहीजे हे देशवासीयांना वाटने स्वाभावीकच आहे ना.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 11/22/2012 - 09:53

In reply to इथे फौजदारी शिक्षेचे प्रकरण by श्री गावसेना प्रमुख

Permalink

लोकभावना

# गासेप्र - हो हा खटला देशासाठी अत्यंत महत्त्वाचा होता म्हणूनच इतर कुठल्याहीपेक्षा अधिक वेगाने कार्यवाही होऊन फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सुरक्षेच्या बाबतीत धोका बघता विशेष सत्र न्यायालय तुरुंगाच्या आवारातच चालवले गेले. ते या खटल्यासाठीच स्थापन केले गेले होते. उच्च व सर्वोच्च न्यायालयांनीही प्राधान्य देऊन नेहमीपेक्षा वेगाने निकाल दिले. सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यापासून केवळ ३ महिन्यांच्या आत प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली. त्यादरम्यान राष्ट्रपतींचे कार्यालय, केंद्रीय गृह मंत्रालय व राज्य सरकार या तीनही घटकांनी कुठलीही चालढकल केली नाही व दयेचा अर्ज निकाली निघाला. याच खटल्यात विशेष सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी इतर दोन आरोपी - फहीम + १ (भारतीय नागरिक) यांना पुराव्याअभावी निर्दोष ठरवून मुक्त केली. कदाचित पोलिसांना अधिक वेळ मिळाला असता तर असे झाले नसते. नागरिकांच्या भावनांचा आदर करूनच लोकशाहीच्या दोन स्तंभांनी (सरकार व न्यायालय) यांनी प्राधान्यक्रमाने हे प्रकरण तडीस नेले आहे. भावनांच्या आधारे न्यायालय व सरकारने काम करू नये व ते केलेही जात नाहीच (काही अपवाद वगळता).
  • Log in or register to post comments

Submitted by समंजस on Wed, 11/21/2012 - 22:35

Permalink

कसाबला

कसाबला फाशी दिली. योग्य तेच झालं. न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्या बद्दल अर्थातच राजकारण्यांनी (राज्य सरकार + केन्द्र सरकार) चढाओढ करत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. फार छान. श्रेय घेणे चांगलेच. या कसाब बाबतच्या निर्णयाच्या अंमलबजावणीचे श्रेय घेण्या सोबतच अफजल गुरूशी संबंधित न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी न केल्या बद्दलचे श्रेय सुद्धा तेव्हढ्याच चढाओढीने घेतील ही आशा ठेवतो. अवांतर : कसाब हा दुर्दैवी होता. पाकिस्तान ऐवजी भारतात जन्मला असता तर आणखी बरीच वर्षे जगू शकला असता (तुरूंगात राहून का होईना) :)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 11/22/2012 - 09:41

Permalink

बातमी वाचून विचित्र वाटतय हे

बातमी वाचून विचित्र वाटतय हे खरं. असल्या मनुष्याला झाली ती शिक्षा बरोबर आहे पण कोणीतरी मेल्यावर काहीतरीच वाटत राहतं.
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on गुरुवार, 11/22/2012 - 09:49

In reply to बातमी वाचून विचित्र वाटतय हे by रेवती

Permalink

आक्का तो कोनीतरी नव्हता,तो

आक्का तो कोनीतरी नव्हता,तो अजमल कसाब होता, त्याने त्याच्या साथीदारांनी मिळुन १६६ लोकांना मारले होते त्यामुळे त्याच्याबद्दल काहीतरीच वाटायला नको.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on गुरुवार, 11/22/2012 - 12:07

Permalink

संपादकीय

यानिमित्ताने (कोणत्याही) फाशीला सातत्याने विरोध करणारे वृत्तपत्र 'द हिंदू' मधील संपादकीय वाचनीय आहे
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Fri, 11/23/2012 - 01:57

Permalink

कसाब ला फाशी देण्यामागे

कसाब ला फाशी देण्यामागे राजकारण आहे , असा आरोप अनेक जण करत आहेत. पण आजच्या काळात सगळेच पक्ष आपल्या सोयीचे राजकारण करतात. आणि कोणत्याही घटनेतून राजकीय फायदा घ्यायला टपले असतात. लादेन व कसाब ह्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या मृत्यू बद्दल अनेक तर्क वितर्क करण्यात आले , त्यामागे अनेक थिअरी मांडण्यात आल्या. ह्याचे कारण भारत व अमेरिकेने ही कारवाई अत्यंत गुप्ततेने उरकली. आता कसाब कसा मेला ह्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे तो फासावर चढला ही जगात अधिकृत बातमी आहे. आज समजा भाजपाचे सरकार सत्तेवर आले व मोदी ह्यांनी पंत प्रधान झाल्यावर लगेच कसाब ला फाशी दिली असती तर ह्याचे भांडवल केले नसते का ? येथे आभासी जगतात आपण आपली लाल करायची ,चमकोगिरी करायची एकही संधी सोडत नाही राजकारणी तर १ नंबरचे संधी साधू तो मोहरा होता , वजीर अजून जिवंत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Fri, 11/23/2012 - 02:02

Permalink

संयुक्त राष्ट्रे, दि. २०

संयुक्त राष्ट्रे, दि. २० (वृत्तसंस्था) - मृत्युदंड-ाची शिक्षा कायमस्वरूपी हद्दपार करावी अशा आशयाच्या संयुक्त राष्ट्र सभेत (युनो) मांडलेल्या प्रस्तावाला हिंदुस्थानसह ३९ देशांनी कडाडून विरोध केला आहे. प्रत्येक देशाला आपापले कायदे ठरविण्याचा अधिकार आहे, असा जोरदार युक्तिवाद हिंदुस्थानने युनोच्या आमसभेत केला. या प्रस्तावाला ११० देशांनी पाठिंबा दर्शविला असून ३६ देशांनी तटस्थ राहणे पसंत केले आहे. आताच्या प्रगत युगात गुन्हेगारांना मृत्युदंडासारखी रानटी शिक्षा देणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे सर्व देशांनी या शिक्षेबाबत फेरविचार करून ती रद्द करावी असा ठराव युनोच्या आमसभेत आज मांडण्यात आला. ११० विरुद्ध ३९ अशा मतांनी तो मंजूरही केला. मात्र प्रस्तावाची अंमलबजावणी बंधनकारक नसून स्वैच्छिक असली तरी त्याच्यासाठी जागतिक जनमताचा दबाव विरोध करणार्‍या देशांवर पडणार आहे.............................. ही कालच्या सामन्या मधे बातमी आली आहे , आणि लगेच कसाब ला फाशी देण्यामागे काही संबंध असू शकेल का आणि नसला तरी जगात समोर आपले म्हणणे ठामपणे मांडून ते जगातील प्रगत देशांच्या मताची पर्वा न करता प्रत्यक्ष कृतीत आणणार्‍या आपल्या सरकारचे अभिनंदन
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sat, 11/24/2012 - 21:03

Permalink

काही असो.

आमच्या देशाविरुद्ध युद्ध पुकारणारा कसाब मेला. आणि शहीद हेमंत करकरे,विजय साळस्कर, तुकाराम ओंबाळे, संदीप उन्नीकृष्णन आणि मुंबई हल्ल्यात शहीद झालेले इतर निरपराध नागरिक यांच्या आत्म्यांना काही प्रमाणात न्याय मिळाला.
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Sat, 11/24/2012 - 22:15

Permalink

कसाब गेला तो गेला आणि कुणाला

कसाब गेला तो गेला आणि कुणाला घेऊन गेला ते पहा . .
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com