Skip to main content

हुकुमाचा एक्का टाकण्यात आलेला आहे. कसाबला फाशी?

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 21/11/2012 08:35 या दिवशी प्रकाशित केले.
गुजराथ निवडणुका, महागाई, सत्ताधा-यांवर सतत होणारे अपहाराचे आरोप, देशांतर्गत वाढता विरोध, मा.बाळासाहेबांचे अंत्यविधीचे वेळी उसळलेला जनसागर इत्यादी गोष्टीपासुन लक्ष वळवण्यासाठी हुकुमाचा एक्का काढण्यात आलेला आहे. वरिल अनेक मुद्यांप्रमाणे अजून एक मुद्दा वारंवार उपस्थीत केला जातो. तो म्हणजे "अफजल गुरू" आणि "कसाब" यांची फाशी. अफजल गुरूची फाशी अजून होत नाही कारण सत्ताधारी आघाडितील घटकपक्षाचा असलेला विरोध. पण गुजराथ निवडणूक, मुंबईत उसळ्लेला जनसागर, मोदी करीश्मा या गोष्टींचा प्रभाव कमी करण्यासाठी हुकुमाचा एक्का वापरणार असे दिसत आहे. आत्ताच म.टा.च्या इआवृत्तीत एक महत्वाची बातमी वाचण्यात आली. कसाबला पुण्यात देणार फाशी? त्यात म्हणले आहे की पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद अजमल कसाब याचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला असून कसाबला पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात ( जेल ) हलवण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते . त्यामुळे कसाबच्या फाशीची अंमलबजावणी पुण्यामध्येच केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे . पुढे असे म्हणले आहे की राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सकाळी पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेत कसाबच्या संदर्भात काही महत्त्वाची माहिती दिली जाण्याची तसेच फाशीची वेळ अधिकृतरित्या जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. म.टा.ने चे.पु.वर हद्द केली आहे. तीथे म्हणले आहे "दहशतवादी कसाबला पुण्यात दिली फाशी - आर आर पाटील". आत्ताच इसकाळनेसुध्दा चे.पु.वर बातमी अपलोड केली आहे "अजमल कसाबला लटकविले फासावर" - सूत्र बाळासाहेबांचा करीश्मा आणि मोदींचा प्रभाव या दोन मुख्य गोष्टींना लक्ष करण्यासाठी हुकुमाचा एक्का वापरण्यात आलेला आहे.

वाचने 28898
प्रतिक्रिया 135

प्रतिक्रिया

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

एक्झॅक्टली हेच सुचवायचे आहे. हा धागाप्रस्तावच पहा ना. कसाबला फाशी देण्याविषयी आनंद किंवा तत्सम काहीतरी भावना व्यक्त करायच्या ऐवजी त्यात कसे राजकारणच आहे वगैरे दिशेनेच धाग्यातला मजकूर आहे. सरकार कसाबला फाशी देणारच नाही आणि आपण त्यावरून एकसारखा ओरडा करू अशी खूणगाठ बांधलेल्या सदस्यांनी मग "डिनायल मोड"मध्ये जाऊन तो डेंग्यूनेच मेला असावा; डेंग्यूने मरण्यापूर्वी घाईने फासावर लटकावले वगैरे मुक्ताफळे उधळली आहेत. [बाळासाहेबांनी प्रणवमुखर्जींशी डील केले होते वगैरे प्रतिसादांबाबत वरील प्रतिपादन नाही. ते प्रतिसाद मला ओके वाटतात].

In reply to by नितिन थत्ते

सरकार कसाबला फाशी देणारच नाही आणि आपण त्यावरून एकसारखा ओरडा करू अशी खूणगाठ बांधलेल्या सदस्यांनी मग "डिनायल मोड"मध्ये जाऊन सुखद धक्का बसला आहे हो लोकांना. एवढ्या अपेक्षा नव्हत्या सरकारकडुन लोकांच्या. बादवे अफझल गुरु निर्दोष आहे काय? नाही म्हणजे कसाब आधी सुप्रीम कोर्टाकडुन फाशीवर शिक्कामोर्तब होउन देखील अजुन राष्ट्रपती त्याच्या फाशीवर शिक्कामोर्तब करत नाहीत म्हणुन विचारले. बाकी कसाबला डेंग्यु झाला आणि मग त्याला फाशी झाली हा योगायोग असु शकतो. पण मग काय आता गुरुलाही डेंग्यु होण्याची वाट बघत बसावी की काय? परत असा गोड योगायोग जुळुन यावा म्हणुन? बाकी मी काय म्हणतो. या धाग्यावरच्या काही प्रतिक्रिया "बघा आमच्या सरकारने कसाबला फाशी देउन दाखविली आणि तरीही देशद्रोही शंका काढतात" या छापाच्या आहेत ते बघुन आश्चर्य वाटले. जणु काही कसाबला फाशी देउन सरकारने लोकांवर फार मोठे उपकार केले आहेत. ही म्हणजे " बघा सरकारी अधिकार्‍याने पैसे न खाता काम केले तरी त्याने एक दुसरे काम पैशासाठी अडवुन ठेवले आहे म्हणुन कपाळकरंटे उर बडवत आहेत " अश्या छापाची प्रतिक्रिया वाटते. अहो त्याने पैसे खाउन काम करु नये हे त्याचे कर्तव्यच आहे. फार अवाजवी अपेक्षा नाही ही. बाकी तुम्ही लक्ष नका हो देउ. मिपावरच्या करंट्यांना आपल्या काँग्रेसला शिव्या देण्याची वाइइट्ट सवय आहे. खुप खुप वाइट्ट लोक आहेत ही.

In reply to by नितिन थत्ते

डेंग्यूने मरण्यापूर्वी घाईने फासावर लटकावले वगैरे मुक्ताफळे उधळली आहेत. 1 हे घ्या थत्ते चाचा डांस कुणी का मारेना डास किंवा सरकार किंवा न्यायपालीका आपल्याला काय, मेला एकदाचा सा...

In reply to by नितिन थत्ते

हा धागाप्रस्तावच पहा ना. कसाबला फाशी देण्याविषयी आनंद किंवा तत्सम काहीतरी भावना व्यक्त करायच्या ऐवजी त्यात कसे राजकारणच आहे वगैरे दिशेनेच धाग्यातला मजकूर आहे.
प्रथमतः नम्रपणे सांगु इच्छीतो की आपल्या संस्कृतीमुळे, संस्कारामुळे कोणाच्याही मृत्युबद्दल आनंद व्यक्त करणे जड जाते. दुसरी महत्वाची गोष्ट. ताकाला जाउन भांडे लपवणे असा प्रकार येथे केला नाही. लेखनविषय:: राजकारण असे धागा टाकताना स्पष्टपणे म्हणले आहे. त्यामुळे मजकुराची दिशा तीच असणार यात चुकीचे काय.

In reply to by प्रदीप

सकाळी घाईत हा दुवा फक्त दिला. आता सविस्तर लिहीतो आहे (मूळ प्रतिसादावर इतर कुठलीही प्रतिक्रिया नसतांना देखील, आता येथे प्रतिसाद संपादित करता येत नाही, सबब हे उत्तर लिहीत आहे). ऋषिकेशने इतरस्त्र कसाबच्या तात्काळ फाशीचे श्रेय केवळा एकट्या काँग्रेसचे नाही, तर त्यात भारतीय न्यायव्यवस्था, पोलिस, नागरीकांच्या संयमाचेही महत्वाचे वाटे आहेत हे बजावले आहे. पण इथे थोडी गल्लत आहे. केंद्रातील काँग्रेस सरकारने, राष्ट्रपतिंनी माफी नाकारल्यावर लगेच फाशी देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ह्याचे पालकत्व बहुतांश त्या सरकारकडे जाते. बाकी न्यायव्यवस्था, पोलिस, सरकारी यंत्रणेचे ह्या कमी लागलेले सर्व घटक निर्णयाचे फक्त execution करत होते, ते त्यांनी कसोशीने केले व उत्तम प्रकारे पार पाडले, हे व इतकेच काय ते ह्यातील त्यांचे 'योगदान' होय. लोकसत्तेचा अग्रलेख काही महत्वाचे मुद्दे उपस्थित करतो. * कसाब परकीय नागरीक असल्याने त्याच्या फाशीमुळे देशातील कुठल्याही भागात काही विपरीत होण्याची शक्यता शून्य होती. * आंतरराष्ट्रीय स्तरावरही ह्यात काहीच धोका नव्हता. पाकिस्तानलाही खरे तर ह्यामुळे आता हायसे वाटले असावे, कारण एकार्थी ह्यामुळे २६/११ च्या दुर्घटनेवर पडदा पडला आहे. The event has been brought to a closure असे जागतिक स्तरावर समजले जावे. * कसाबच्या दयेच्या अर्जाच्याही अगोदर तीन महत्वाचे अर्ज दाखल झालेले आहेत -- (१) अफझल गुरू (२) राजीव गांधींच्या हत्येत कटात सामिल असलेले संथान, मुरूगन व पेरारीवेलन हे श्रीलंकन तामिळ (३)पंजाबचे माजी मुख्यमंत्री बियांत सिंग ह्यांचा मारेकरी बलवंत सिंग रोजाना. ह्या तिन्ही केसेसमधे राजकारण गुंतलेले आहे. पहिल्या केसमधे जम्मू-काश्मिर, दुसर्‍या केसमधे तामिळनाडू (काँग्रेसच्या सध्याच्या आघाडीतील भागिदार द्रमुक दुखावला जाईल ही भीति) आणि तिसर्‍या केसमध्ये पंजाबचे राजकारण (काँग्रेस तसेच भाजपाचेही). तेव्हा, अग्रलेख पुढे म्हणतो की, अशा तर्‍हेने ह्या तिन्ही केसेसबाबत चालढकल करत राहून पण कसाबची झटपट विल्हेवाट लावून आपले सरकार (आपली सरकारे, असे म्हणणे जास्त इष्ट ठरावे)एक अत्यंत घातक संदेश दहशतवाद्यांना देत आहे-- तुम्ही भारतीय दहशतवादी असाल, तर तुमचा निकाल लावला जाणार नाही. परदेशस्थ दहशतवादी ह्याचा फायदा उचलण्याची भीति अग्रलेखात पुढे व्यक्त करण्यात आलेली आहे. बर्‍याच दिवसांनी भारतीय वर्तमानपत्रात चांगला, मुद्देसूद व माहितीचा नीट वापर करून लिहीलेला अग्रलेख वाचावयास मिळाला.

In reply to by प्रदीप

अग्रलेख वाचनीय आहे. सर्वथा पटला नसला तरीही बहुतांश मुद्दे ग्राह्य आहेत. बाकी,
केंद्रातील काँग्रेस सरकारने, राष्ट्रपतिंनी माफी नाकारल्यावर लगेच फाशी देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ह्याचे पालकत्व बहुतांश त्या सरकारकडे जाते.
हे चुकीचे आहे. राष्ट्रपतींनी अर्ज फेटाळल्यावर फाशीची तारीख न्यायालयाने ठरविली आहे असे वाचले (शोधून दुवा देतो). राष्ट्रपतींनी कोणाचा अर्ज कधी फेटाळावा हा त्यांचा विषेशाधिकार आहे. यावर इतक्या जलद कायवाई होण्याचे कारण जनतेने हळू कारवाईवर वेळोवेळी दाखवलेला असंतोष, पत्रकारांनी या प्रकरणाचा सतत केलेला पाठपुरावा, पोलिसांनी तयार केलेली बर्‍यापैकी 'गॅपलेस' केस आहे असे दिसते. तेव्हा भारताने जलद न्याय दिल्यावरही तो केवळ काँग्रेसच्या कारकिर्दीत दिला गेला म्हणून त्याचा निषेध करणे मला न्यायव्यवस्थेचा, त्या घटनेतील बळींचा आणि नागरीकांचाही अपमान केल्यासारखे वाटते शिवाय कसाब हा अगदी 'तळातील' मोहरा असल्याने त्याच्याकडून हवी ती माहिती मिळवून झाली होती. इतर वरील व्यक्ती त्या त्यासंघटनांमधे इतक्या खालच्या दर्जाचे नाहित तेव्हा त्यांचा उपयोग साक्षीदार म्हणून होऊ शकतो याकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. (राष्ट्रपतींनी अर्ज फेटाळल्यावर जर त्यांच्यावर त्वरीत कारवाई झाली नाही तर सरकारला थेट दोष देता येईल.. इतर तिघांचेही अर्ज राष्ट्रपतींनी आपल्याकडेच ठेवले होते)

In reply to by अविनाशकुलकर्णी

१०.डेंगू ने मेलेल्या कसाब ला फाशी देऊन मारले असा खोटा प्रचार करून कॉंग्रेस स्वताची इमेज चमकवत तर नाही ना ?
हेच म्हणतो. फाशी खरंच "कसाब"ला झाली का? फाशी खरंच "कसाब"ला झाली की त्याच्या प्रेताला? तो डेंग्यू तापीने मेला आणि म्हणून त्याला फाशी दिली असे घाईघाईने जाहीर करण्यात आले असावे असे वाटते.

In reply to by वामन देशमुख

इकडे लक्ष वेधू इच्छितो. यात कसाबकडून त्याच्या डेथ वॉरंटवर सही घेण्यात आली असे म्हटले आहे. (अर्थात शंकाच घ्यायची तर कशावरही घेता येऊ शकते).

In reply to by नितिन थत्ते

अशा शंका घेऊन आपण आपल्याच देशाला बदनाम करतो हे लक्षात घ्यावे.

In reply to by नितिन थत्ते

अशा शंका घेऊन आपण आपल्याच देशाला बदनाम करतो हे लक्षात घ्यावे.
+१ अगदी हेच म्हणायचे होते. काँग्रेसला विरोध करणे/न करणे हे वैयक्तीक राजकीय मत झाले. पण कॉग्रेसद्वेषाने (किंवा कोणाच्याही द्वेषाने) इतकेही आंधळे होऊ नये की आपण एखाद्या पक्षाचा द्वेष व्यक्त करण्यासाठी देशालाही बदनाम करत आहोत याचे भान सुटावे. बाकी, रेडीफच्या लाईव्ह बातम्यांच्या पानावरील १५:४४च्या अपडेट नूसार गृहमंत्री श्री. शिंदे म्हणाले आहेत "The government is working quickly on everything, but we want to say that the government will not take credit or claim political mileage for the hanging." हे मला स्वागतार्ह वाटते

In reply to by ऋषिकेश

काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी, श्री. दिग्विजय सिंग यांच्या खालील ट्वीट केलेल्या वाक्यातून पॉलीटीकल मायलेज घेत नसल्याचे स्पष्टच होते. ;) Will Modi and BJP tell us why NDA Govt. didn't carry out death sentence to Rajiv Gandhi's killers, who were sentenced in 1998.

In reply to by विकास

दिग्विजय सिंग गृहमंत्र्यांचे ऐकत नाहीत असे वाटते ;) (आणि ऐकत असल्यास अगदी तांत्रिक आधारावरच बोलायचे तर श्री सिंग 'Government मध्ये कुठायत? ;) ) ह घेणे. बाकी, माझा मुद्दा लक्षात आला असेलच. हा निर्णय पक्षाधारित नाहीत.. एका पक्षाल्;आ त्याचे श्रेय/अपश्रेय देण्यात काहीच हशील नाही. त्यावरील मत समजल्यास अधिक उत्तम!

In reply to by ऋषिकेश

म्हणजे उद्या काँग्रेसच्या प्रचारसभेत राहूल-सोनीया आदी त्याचे श्रेय घ्यायला लागल्यावर म्हणणार, ते काँग्रेस घेत आहे, सरकारने घेतलेले नाही :-)

In reply to by विकास

राजीव गंधींवरील हल्ला जरी दहशतवादी असला, तरी तो धोरणांवरील हल्ला होता. हा देशाच्या सार्वभौमत्वाला दिलेले आव्हान होते. लिट्टेपेक्षा ह्या हल्ल्याचे गांभीर्य नक्कीच जास्त होते.

In reply to by आनन्दा

सर्वात महत्वाची गोष्ट दिग्गीराजांना माहीत नाही का न्यायालयीन प्रक्रीया अजून चालू आहे आहे. आणि त्यांची दैवते असणा-या प्रियांकाने काय प्रतिक्रीया दिली होती त्या खुन्यांबद्दल.

In reply to by अविनाशकुलकर्णी

प्रणब मुकर्जींनी दयेचा अर्ज फेटाळल्याची बातमी काल (किंवा परवा) मी वाचली होती. कुठे ते आता आठवत नाही! (म्हणजे टाइम्स कीं डॉन ते आठवत नाहीं) पण सरकारकडून इतका "तडफदार" निर्णय होईल असे मात्र वाटले नव्हते! दालमें कुछ काला जरूर है!

In reply to by सुधीर काळे

दालमें कुछ काला जरूर है!नही पुरी दालहीच काली है काळे अंकल पार जर्जर झालेय हो हे,थोडा डोस घेताहेत ते

In reply to by अविनाशकुलकर्णी

ऑपरेशन x इज ओव्हर. १] सूर्योदयापूर्वी फाशी दिली. २] अनुक्रमे फाशी दिली पाहिजे, असं काही असल्याचे माहित नाही. ३] दया अर्ज अजिबात गुप्त ठेवला नाही. कार्यवाही चालूच होती. [बातमी] ४] सूर्यास्तापूर्वी येरवड्यातच दफन केले गेले आहे. [वृत्त वाहिन्या] ५] काँग्रेसची रखेल अशा शब्दप्रयोगाची काका आपल्याकडून अपेक्षित नाही. दया अर्ज फेटाळल्याची बातमी होती. ६] कसाबचा डेंग्यु बरा झाला असावा. 'फाशीची माहिती आईला द्यावी,असं कसाबनं म्हटलं होतं. [वृत्त वाहिन्या] ७] डॉक्टरांचं पथक त्याच्या आरोग्याची काळजी घेत होतेच. ८] डेंग्यु बरा झाला असावा. ९] पाकिस्तानी गृहमंत्र्यांनी भारतानं कसाबच्या फाशीबाबत कळवलं होतं असं म्हटलं आहे. १०] तळागाळातील लोक आता काँग्रेसलाच मतदान करतील असं काही नाही. बातम्यांमधुन असे दिसते महाराष्ट्राच्या गृह विभागाच्या २५ सप्टेंबरच्या कार्यवाहीनंतर, राष्ट्रपतीनी कसाबचा दयेचा अर्ज ५/७ नोव्हेंबरला फेटाळला. सुशीलकुमार शिंदे यांनी ८ नोव्हेंबरला फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याबाबत राज्य सरकारला माहिती दिली. राज्याच्या गृह मंत्रालयाने त्याच्या फाशीच्या शिक्षेची तयारी पूर्ण करुन त्याला १९ नोव्हेंबरला रात्री येरवडा जेलमध्ये हलविण्यात आले होते. एकुणच काय कसाबला फाशी देण्यापूर्वी सर्व नियमांचे पालन करुन येरवड्यात ही प्रक्रिया पार पाड्ण्यात आली. आपण राजकीय पक्षांवर शंका व्यक्त करतांना व्यवस्थेवर संशय व्यक्त करत आहोत असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by बाळ सप्रे

सहमत. डासांना अटक करून ते कारवाई पूर्ण होईपर्यंत डेंग्यूने मरू नयेत यासाठी त्याना ओडोमॉस लावण्यात यावे.

.

सगळ्यात जास्त अभिनंदनास पात्र आहेत ते श्री. उज्ज्वल निकम! वा, पठ्ठे!! तसेच 'एअर इंडिया'चे आणखी एक विमान अपहृत करण्याआधीच तो लटकला हे बरे झाले. आता अफजल गुरूला (कुणाचा?) लटकवा!

सर्वात जास्त अभिनंदनास पात्र आहेत ते श्री. उज्ज्वल निकम! वा पठ्ठे!! शिवाय एअर इण्डियाचे आणखी एक विमान अपहृत होण्याआधी कसाब लटकला हे बरे झाले! आता पाळी अफजल गुरूची! (हा कुणाचा गुरू?)

१०.डेंगू ने मेलेल्या कसाब ला फाशी देऊन मारले असा खोटा प्रचार करून कॉंग्रेस स्वताची इमेज चमकवत तर नाही ना ?

चला पाकड्यांनी पाठवलेला आणि इतके दिवस आपण पोसलेल्या ह्या सापड्याला लटकवला एकदाचे ! :) आता नंबर अफजल्याचा ! बघुया त्याच्या गळ्यात फाशीचा फंदा कधी अडकतो ते ! पाकडे आणि त्यांनी पोसलेले हे असे आणि अगणित सापडे आपण ठेचुन ठेचुन मारले पाहिजेत.अजुन किती निरपराध नागरिकांचे आणि सैनिकांचे बळी आपण देणार आहोत ?

आता समस्या आहे ती पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या आणि हेरगिरीच्या आरोपांसाठी शिक्षा भोगत असलेल्या सरबजित सिंग ह्यांच्या भविष्याबद्दल.

बर झाल गुपचूप फाशी दिली ते. नाहीतर मिडियाने त्याचाही इव्हेंट केला असता. खर तर दहशतवाद हा आपला खरा शत्रू आहे; दहशतवादी नव्हे. तो तर भारवाही आहे. कसाब हे फक्त प्याद त्याचा बोलविता धनी पाकिस्तानात आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

बर झाल गुपचूप फाशी दिली ते. नाहीतर मिडियाने त्याचाही इव्हेंट केला असता. सहमत. आणि प्रश्नं विचारायची परवानगी दिली असती तर त्याला "कसं वाटतंय फासावर जाताना?" असे प्रश्न पण विचारले असते.

काहिहि म्हणा बातमी चे हेडिंग आवड्ल्या गेले आहे.... :)

बाळासाहेब लागले कामाला आदेश दिला यमाला आधी पळत जा आणि घेऊन ये पहिले कसाबला !! पण खूपच स्वस्त मरण मिळाले त्याला..एखाद्या संध्याकाळी छ शि ट स्थानकात लोकांच्या पायात आणून टाकायला हवे होते...असो.....

हे ठरलेल्या वेळेलाच येणार, एक दिवस आधी नाही की नंतर नाही!

अजमल आमीर कसाब नावाच्या इस्लामी दहशतवाद्याला सरकारने गुपचुप का होईना पण फाशी दिले(नक्की फाशी दिले कि तो डँग्युने मेला हा संशोधनाचा विषय आहे) याचा आनंद मानावा कि इस्लामी दहशतवादाच्या जागतिक इतिहासात पकडल्या गेलेला एकमेव जिवंत दहशतवाद्याला संपवून भारताने इस्लामी दहशतवादाचे जागतिक केंद्रस्थान असणार्‍या पाकिस्तान विरुद्धचा सबळ पुरावा नष्ट केल्याचे दु:ख करावे....च्यामारी !हा प्रकार म्हणजे धरल तर चावतय आणि सोडल तर पळतय असाच आहे कि?बाकी सोलापूरच्या शिंदेंनी राणा भिमदेवी थाटात कसाबला फाशी देऊन फार मोठी मर्दुमकी गाजवल्याचा माध्यमांसमोर आणि देशासमोर आव आणला खरा! पण आता हा फाशी फाशी चा खेळ त्यांच्याच अंगाशी आलाय ...अफजल गुरुचा निकाल कधी लावताय? ते बोला असे विचारताच यांची बोलती बंद झाली...करा म्हणाव अजून राजकारण?काँग्रेसने ६० वर्षात इतकी घाण घालून ठेवली आहे या देशात कि ती निस्तरायला यांना किती कसाब आणि किती गुरू हलाल करावे लागतील याची मोजदादच करता येऊ शकत नाही...शिंदेची स्मरणशक्ती जरी अगदीच माफक असली तरी जनतेची स्मरणशक्ती एकदम चांगली आहे....काँग्रेसने एकच लक्षात घ्यावे "जो बुंद से गई वो हौद से नही आती"..."आधी बाप दाखवा आणि मग श्राद्ध घाला "या न्यायाने कसाबला संपवल्याचा पुरावा द्या आधी..

In reply to by अनामिका

या न्यायाने कसाबला संपवल्याचा पुरावा द्या आधी.. मला उगाच चाचांचा कॉन्स्पिरसी थिअरीज हा धागा आठवला ! ;) मी उगाच माझे टाळके चालवुन काही थिअरीज / शक्यता मांडुन पाहतो... ;) १)कसाब डेंग्यूच्या तापाने फणफणला होता आणि थंडी भरुन कुडकुक्डुन मेला,त्याला फासावर लटकवले हे जाणुन बुजुन सांगण्यात आले. २)मेला तो कसाब नव्हताच ! मग खरा कसाब कुठे आहे ? ३)खर्‍या कसाबच्या बदल्यात सरबजित सिंगची सुटका अशी मांडवली झालेली आहे,त्यामुळे ज्या बोटीतुन कसाब आला होता त्या बोटीतुनच त्याला गुपचुप्पणे परत पाठवण्यात आले. ४)कसाब अजुन जिवंत असावा... मग येरवड्याला नक्की कोणाला नेण्यात आले ? ५)काय म्हणे तर ऑपरेशन X, नावा वरुनच हे ऑपरेशन बोगस वाटते. ( हे वरील ५ पर्याय टिपी म्हणुन लिहले आहेत, उद्या यातील एक जरी चुकुन खरा ठरला तर मला खरड/व्यनी करु नये.);)

In reply to by अनामिका

अफ्झल गुरूला आम्ही कधी,कुठे,कशा रीतीने मारणार आहोत हे सर्व सुशीलकुमार शिंदे यांनी डिट्टेलवार जागतिक मीडिया समोर एक्ष्प्लेन करावे अशी आमची रिक्वेस्टडिमांड आहे.

उत्तम बातमी. इथे अनेकांना त्यात राजकीय वास आला. त्यात काही आश्चर्य नाही. राजकारणी व्यक्तीने श्वास घेतला तरी त्यात राजकारणाचा विचार असू शकतो, त्यामुळे कसाबला फाशी देण्याच्या टाईमिंग मधे तसे काही नाही असे म्हणणे दुधखुळेपणाचे ठरेल. तरी देखील याचा अर्थ यात सरकारने घेतलेल्या निर्णयाचे महत्व कमी होत नाही. मुख्यत्वे जेंव्हा प्रमुख पक्ष काँग्रेस असलेले सरकार असते तेंव्हा. त्यांनी तो का घेतला असावा याच्याशी काही देणेघेणे तुर्तास कुणाला नसावे, यशस्वीरीत्या अमलात आणला हे महत्वाचे. मात्र असा निर्णय घेतल्याने काही राजकीय उपाय ठरला नाही, तरी अपाय होत नाही, इतके जर काँग्रेसनेतृत्वास समजले तर ते त्या पक्षासाठी आणि देशासाठी चांगलेच ठरेल अशी आशा आहे. बाकी या सर्व प्रकरणात खालील व्यक्ती.संस्थांचे (उलट क्रमाने) मनःपूर्वक अभिनंदन ! ७. राष्ट्रपती, केंद्र आणि राज्य सरकार - ज्यांनी निर्णय घेतला ते ६. तो निर्णय अतिशय गोपनियता राखून अमलात आणणारी महाराष्ट्र पोलीसी यंत्रणा ५. कसाबचे काय हे सातत्याने दबाव ठेवणारे पब्लीक, काही अंशी माध्यमे आणि राजकीय नेते ४. कसाबचे गुन्हे कितीही जगजाहीर असले आणि फाशीची शिक्षा होणे अटळ असले, तरी त्यासाठी कुठल्याही इतर खटल्याप्रमाणेच गांभिर्याने खटला चालवणारे अ‍ॅड. उज्वल निकम आणि त्यांची टीम (हे एकाच व्यक्तीचे काम नसते!) ३. परदेशी अतिरेक्यास जिवंत पकडले असताना देखील त्याला लोकशाही तत्वाने संपूर्ण न्यायालयीन निर्णयातून नेणारी भारतीय न्यायव्यवस्था आणि न्यायाधिश २. कसाबच्या सुरक्षाव्यवस्थेवर टिका आणि विनोद झाले आहेत. पण त्याला मारे पर्यंत जोखिम म्हणून सांभाळणारी सुरक्षा यंत्रणा आणि सर्वात शेवटी, सगळ्यात महत्वाचे, १. ज्याच्या शिवाय हे शक्य नव्हते. तो शिपाई गडी .... कसाबकडून स्वतःच्या अंगावर गोळ्यांचा भडीमार होत असताना देखील ज्याने त्याला सोडले नाही आणि ज्याच्या ह्या कर्तव्यतत्पर जिद्दीमुळे कसाब मिळाला ते, हुतात्मा तुकाराम ओंबळे!
________________________________
आज २६/११ च्या खालील मोहर्‍यांना आणि इतर निनावी हुतात्म्यांना तसेच त्यात हत्या झालेल्या निरापराधी सामान्य जनतेला खरी श्रद्धांजली मिळाली. 1.Sri Hemant Karkare, Joint Commissioner of Police, ATS, Mumbai 2.Sri Ashok Kamte, ACP, Mumbai East 3.Sri Jaywant Patil, Police Constable 4.Sri Yogesh Patil, Police Constable 5.Sri Ambadas Pawar, Police Constable 6.Sri Mukesh B.Jadhav, Home Guard 7.Sri Rahul Shinde, Constable, State Reserve Police Force 8.Sri M.Chowdhary, Constable, Railway Police Force 9.Sri Arun Chitte, Police Constable 10.Sri Balasaheb Bhosale, Asst. Police Sub-Inspector 11.Sri Tukaram G.Omble, Asst. Police Sub-Inspector, D.B.Marg PS 12.Sri Bapusaheb Durugade, Asst.Police Sub-Inspector, Naigaon PS 13.Sri Prakash P.More, Police Sub-Inspector,L.T.Marg PS 14.Sri Shashank Shinde, CST Railway PS 15.Sri Vijay Saluskar, Police Inspector, Anti-extortion cell, Mumbai 16.Major Sandeep Unnikrishnan, NSG Commando 17.Sri Gajendraji, NSG Commando

In reply to by विकास

विकास च्या पूर्ण मताशी सहमत . अ‍ॅडव्होकेट उज्वल निकम यांचं अभिनंदन . हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या कर्तुत्वाला सलाम आणि भावपूर्ण श्रद्धांजली .

In reply to by विकास

१. ज्याच्या शिवाय हे शक्य नव्हते. तो शिपाई गडी .... कसाबकडून स्वतःच्या अंगावर गोळ्यांचा भडीमार होत असताना देखील ज्याने त्याला सोडले नाही आणि ज्याच्या ह्या कर्तव्यतत्पर जिद्दीमुळे कसाब मिळाला ते, हुतात्मा तुकाराम ओंबळे!
१००% सहमत.
७. राष्ट्रपती, केंद्र आणि राज्य सरकार - ज्यांनी निर्णय घेतला ते
ठीक.
२. कसाबच्या सुरक्षाव्यवस्थेवर टिका आणि विनोद झाले आहेत. पण त्याला मारे पर्यंत जोखिम म्हणून सांभाळणारी सुरक्षा यंत्रणा ६. तो निर्णय अतिशय गोपनियता राखून अमलात आणणारी महाराष्ट्र पोलीसी यंत्रणा
पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा ह्या स्वतंत्रपणे काम करतात की क्रमांक ७ मध्ये सांगितल्याप्रमाणे राज्य-केंद्र सरकारच्या आदेशानुसारे?

In reply to by सुनील

पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा ह्या स्वतंत्रपणे काम करतात की क्रमांक ७ मध्ये सांगितल्याप्रमाणे राज्य-केंद्र सरकारच्या आदेशानुसारे?
तसे सगळेच म्हणजे राज्य-केंद्र सरकारे, पोलीस-सुरक्षा यंत्रणा वगैरे घटनेत सांगितल्याप्रमाणे कामे करतात. किंबहूना तसे करायला हेव. तसे होतेच असे नाही... त्याच पद्धतीने, या यंत्रणा जरी राज्य-केंद्राच्या अख्त्यारीत असल्या तरी जोखिम सांभाळताना, त्याचे प्लॅनिंग करताना आणि नंतर नियंत्रण करताना स्वतंत्रपणेच करतात, भले ते वर रीपोर्ट देत असले (असावेत) तरी. नाहीतर काय पालघर प्रकरणात पोलीसांवर ठपका ठेवण्याऐवजी महाराष्ट्र सरकारवरच ठेवला असता की!

In reply to by विकास

ठीक आहे. आता त्या यंत्रणांकडून चोख काम झाले हे उत्तमच. पण जर का कुठे ढिसाळपणा झाला असता तर, ते अपश्रेय कुणाचे? जर अपश्रेयदेखिल फक्त त्या-त्या यंत्रणांचेच (सरकारांचे नाही) असे म्हणणे असेल तर, फक्त श्रेय त्यांचेच हे ठीक. पण जर अपश्रेयाचे धनी सरकारदेखिल ठरणार असेल तर, श्रेयात त्यांचा वाटा का नाही?

In reply to by सुनील

सरकारला जिथे प्रत्यक्ष श्रेय देयचे आहे तिथे दिले आहे. पण जेंव्हा एखादी सरकारी यंत्रणा असते तेंव्हा ती यंत्रणा (तिच्या हक्कांतर्गत) स्वतंत्रपणे कशी काम करते याला देखील महत्व असतेच. , न्यायाधिश, अ‍ॅड उज्वल निकम (पब्लीक प्रॉसिक्यूटर म्हणून) सगळेस सरकारी आहेत. अजून ताणून म्हणायचे झाले तर, तुकाराम ओंबळे पण सरकारी पोलीसच होते, त्यामुळे कसाबला सरकारनेच पकडले असे म्हणता येईल... तिथे पण तुम्ही म्हण्ता तसे म्हणता येईल. जेंव्हा "जोखिम म्हणून सांभाळणारी सुरक्षा यंत्रणा" असे म्हणतो तेंव्हा जी जबाबदारी आहे ती योग्य रीतीने पार पाडणारे या अर्थी म्हणतो. कसाबला पकडल्यावर त्याला अँब्यूलन्समधून नेत असल्यापासून गेली चार वर्षे ज्या पद्धतीने सांभाळले गेले, ते देखील मुंबईसारख्या गजबजलेल्या भागात त्याचे श्रेय हे त्या यंत्रणेचेच असते. सुदैवानी काही घडले नाही पण, जर अघटीत घडून तो पळाला असता, पळवला गेला असता किंवा अगदी त्याने स्वतःला गळफास लावून आधीच मारून घेतले असते, तरी त्यासंदर्भात टिका (अपश्रेय) ही त्या सुरक्षा यंत्रणेवरच झाली असती. अगदी त्या संदर्भात विधानसभा/संसदेत प्रश्न विचारताना देखील तेच घडले असते. अपश्रेय / टिका सरकारवर झालीच असती तर त्यांनी (कायद्याची आणि वास्तव) योग्य शस्त्रे हातात दिली नसती तर... २६/११ हल्ल्याच्या वेळेस पण टिका ही (राष्ट्रीय) गृहमंत्रालयावर होण्यापेक्षा ती अधिक सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेवरच झाली होती. (आणि देशावरील गंभीर हल्ला असताना सतत फॅन्सीड्रेस सारखे कपडे बदलण्यावर झाली). महाराष्ट्र गृहमंत्रालयावर आणि मुख्यमंत्र्यांवर झालेली टीका ही बुलेटप्रूफ जॅकेट्स न देणे पासून ते फिल्मी दिग्दर्शकांना ताज चा अ‍ॅक्सेस देणे यावर झाली. तेच अगदी इंदीरा गांधीच्या हत्येच्या वेळेसही झाले होते. असो.

आज सकाळी ११ ला विकिपेडियावर कसाबचे पान पाहीले. त्यात मॄत्यूचे कारण डेंगू होते. नंतर बदललेले दिसले. पण डेंगूच खरा कारण बडे बडे शहरो मे... आपण जाणताच

खरच फाशी दिली की सरकार काही लपवायचा प्रयत्न करतय?

सांगलीतील ४ मशिदीत आज नमाज झाला नाही अशी बातमी समजतीय. अजुन कन्फर्म नाही.. फेबु मित्र मंडळ

तो मेला आणि पाकिस्तानात शहीद झाला. आता त्यांचे उदाहरण देऊन अजून बेरोजगार पोरांना धर्मांध केले जाईन. ये तो मोहरा था. वजीर अभी जिंदा हे, आणी हो हे अजून जिवंत आहेत.

हुकुमाचा एक्का टाकण्यात आलेला आहे
हुकुमाचा एक्का (एकाकडून) टाकण्यात आला आहे की हुकुमाचा एक्का (दुसर्‍याच्या) हातातून गेला आहे! वरील बर्‍याच प्रतिक्रिया वाचून असेच वाटते आहे!! ;)

यावर आपल्या 'एका समुहाची' प्रतिक्रिया काय हे पाहणे फार महत्वाचे...........

http://en.wikipedia.org/wiki/Ajmal_Kasab हे पहावे यात अगदी वरती काय लिहीले आहे ते महत्वाचे This article is about a person who has recently died. Some information, such as that pertaining to the circumstances of the person's death and surrounding events, may change as more facts become known.

सरकारची एक मुख्य जवावदारी असते ती म्हणजे सामान्य लोकांच्या संरक्षणाची. २६/११ ला सरकारने सिद्ध केले की ते त्या कामात कमकुवत आहे. हेरखाते व अन्य विभागांना काही कळले नाही. एक नराधम अतिरेकी जिवंत सापडला तर त्याच्या फाशीचे घोंगडे इतके भिजत ठेवले. इतका ढळढळीत पुरावा असताना कसाबला फाशी द्यायला इतका विलंब लागतो तर बाकी बाबतीत काय आनंद असेल ते विचार करण्याजोगे आहे. सरकारने आपले कर्तव्य केले आहे आणि त्यात अनाकलनीय दिरंगाई केली आहे. त्याबद्दल जल्लोष करण्याजोगे काही आहे असे मला वाटत नाही. ज्या करता सरकारला नेमले आहे ते काम त्यांनी बर्‍याच विलंबाने केले. सुप्रीम कोर्टाने फाशी निश्चित केल्यावर इतका वेळ का गेला आणि संबंधित मंडळींनी त्यावर काय विचार विनिमय केला ह्याचा तपशील माहिती अधिकाराखाली मिळाला तर बरे होईल. एका गरीब तरूणाला रानटी तत्वज्ञान शिकवून, क्रूर अतिरेकी बनवून शेकडो मैल दूर जाऊन शेकडो निरपराध लोकांना थंडपणे ठार करण्याची प्रेरणा देणारे इस्लामी अतिरेक्यांचे म्होरके ह्यांना कोण आणि कसे संपवणार हा एक प्रश्न आहेच. एव्हाना आणखी डझनभर कसाब पाकिस्तानात तयार होऊन संधीची वाट बघत असतील.

In reply to by हुप्प्या

इतका ढळढळीत पुरावा असताना कसाबला फाशी द्यायला इतका विलंब लागतो
कारण भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे. भारताच्या लोकशाही व्यवस्थेला संपूर्ण जगात मान मिळतो. जगातील बहुतांश देश आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांचे भारताबरोबर प्रत्यार्पण करतात. याविषयी मी वर अधिक लिहिलेच आहे. चीन किंवा अरब राष्ट्रांमध्ये एवढा वेळ लागला असता तर ती आश्चर्याची बाब असती. पण आपल्याबाबतीत इतर अनेक प्रकरणांपेक्षा कमी वेळेत या प्रकरणाला पूर्णत्वाकडे पोचवले गेले.

In reply to by श्रीरंग_जोशी

लोकशाहीत न्यायदानात विलंब व्हावा असा संकेत आहे का? का बरे? उशिराने दिलेला न्याय हा अन्यायाच्या तोडीचा असतो असे म्हणतात ते का? की ते लोकशाहीत लागू नाही? झाले ते उत्तम झाले पण हा सरकारने फार पराक्रम केला आहे असे नाही.

In reply to by हुप्प्या

प्रत्यक्ष फाशी देण्यात आलेली आजवरची सर्व प्रकरणे बघा... त्यापैकी एखादेच यापेक्षा अधिक वेगाने पूर्णत्वाला पोचले आहे. न्यायालयात खटल्याचे कामकाज प्रत्यक्ष सुरू व्हायलाच घटनेनंतरचे ६ महिने गेले. सर्व साक्षी, पुरावे गोळा करणे त्यांचे विश्लेषण करून तार्किक क्रमाने त्यांची मांडणी करणे. दोन्ही बाजूंचे वकील,विशेष सत्र न्यायालयाचे स्वतः न्यायमूर्ती व त्यांचे कर्मचारी या सर्वांनी नेहमीपेक्षा अधिक तास काम करून वर्षाच्या आत खटला संपवला होता. समजा घिसाडघाईने एखादा खटला चालवून प्रत्यक्ष दोषी नसणार्‍याला मृत्यूदंड दिला गेला तर? न्यायदेवता आंधळी असते अन ती तशीच असावी कारण आपण स्वतः अथवा आपल्या जवळचा कुणीही फौजदारी शिक्षा होऊ शकेल अशा प्रकरणात अडकला तर स्वतःला वाचवायची संधी नाही मिळाली तरी चालेल पण काही आठवड्यात वा काही महिन्यांत खटला पूर्णत्वाला पोचवलाच पाहिजे असा आग्रह आपण धरू का? जर या प्रश्नाचे उत्तर हो असेल तर मग आपला आक्षेप संयुक्तिक आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

इथे फौजदारी शिक्षेचे प्रकरण नाहीये इथे देशाविरुद्ध युद्ध पुकारणे असा आरोप होता वाटते, त्यामुळे त्याला फाशी लवकर झाली पाहीजे हे देशवासीयांना वाटने स्वाभावीकच आहे ना.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

# गासेप्र - हो हा खटला देशासाठी अत्यंत महत्त्वाचा होता म्हणूनच इतर कुठल्याहीपेक्षा अधिक वेगाने कार्यवाही होऊन फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सुरक्षेच्या बाबतीत धोका बघता विशेष सत्र न्यायालय तुरुंगाच्या आवारातच चालवले गेले. ते या खटल्यासाठीच स्थापन केले गेले होते. उच्च व सर्वोच्च न्यायालयांनीही प्राधान्य देऊन नेहमीपेक्षा वेगाने निकाल दिले. सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यापासून केवळ ३ महिन्यांच्या आत प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली. त्यादरम्यान राष्ट्रपतींचे कार्यालय, केंद्रीय गृह मंत्रालय व राज्य सरकार या तीनही घटकांनी कुठलीही चालढकल केली नाही व दयेचा अर्ज निकाली निघाला. याच खटल्यात विशेष सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी इतर दोन आरोपी - फहीम + १ (भारतीय नागरिक) यांना पुराव्याअभावी निर्दोष ठरवून मुक्त केली. कदाचित पोलिसांना अधिक वेळ मिळाला असता तर असे झाले नसते. नागरिकांच्या भावनांचा आदर करूनच लोकशाहीच्या दोन स्तंभांनी (सरकार व न्यायालय) यांनी प्राधान्यक्रमाने हे प्रकरण तडीस नेले आहे. भावनांच्या आधारे न्यायालय व सरकारने काम करू नये व ते केलेही जात नाहीच (काही अपवाद वगळता).

कसाबला फाशी दिली. योग्य तेच झालं. न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्या बद्दल अर्थातच राजकारण्यांनी (राज्य सरकार + केन्द्र सरकार) चढाओढ करत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. फार छान. श्रेय घेणे चांगलेच. या कसाब बाबतच्या निर्णयाच्या अंमलबजावणीचे श्रेय घेण्या सोबतच अफजल गुरूशी संबंधित न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी केल्या बद्दलचे श्रेय सुद्धा तेव्हढ्याच चढाओढीने घेतील ही आशा ठेवतो. अवांतर : कसाब हा दुर्दैवी होता. पाकिस्तान ऐवजी भारतात जन्मला असता तर आणखी बरीच वर्षे जगू शकला असता (तुरूंगात राहून का होईना) :)

बातमी वाचून विचित्र वाटतय हे खरं. असल्या मनुष्याला झाली ती शिक्षा बरोबर आहे पण कोणीतरी मेल्यावर काहीतरीच वाटत राहतं.

In reply to by रेवती

आक्का तो कोनीतरी नव्हता,तो अजमल कसाब होता, त्याने त्याच्या साथीदारांनी मिळुन १६६ लोकांना मारले होते त्यामुळे त्याच्याबद्दल काहीतरीच वाटायला नको.

कसाब ला फाशी देण्यामागे राजकारण आहे , असा आरोप अनेक जण करत आहेत. पण आजच्या काळात सगळेच पक्ष आपल्या सोयीचे राजकारण करतात. आणि कोणत्याही घटनेतून राजकीय फायदा घ्यायला टपले असतात. लादेन व कसाब ह्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या मृत्यू बद्दल अनेक तर्क वितर्क करण्यात आले , त्यामागे अनेक थिअरी मांडण्यात आल्या. ह्याचे कारण भारत व अमेरिकेने ही कारवाई अत्यंत गुप्ततेने उरकली. आता कसाब कसा मेला ह्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे तो फासावर चढला ही जगात अधिकृत बातमी आहे. आज समजा भाजपाचे सरकार सत्तेवर आले व मोदी ह्यांनी पंत प्रधान झाल्यावर लगेच कसाब ला फाशी दिली असती तर ह्याचे भांडवल केले नसते का ? येथे आभासी जगतात आपण आपली लाल करायची ,चमकोगिरी करायची एकही संधी सोडत नाही राजकारणी तर १ नंबरचे संधी साधू तो मोहरा होता , वजीर अजून जिवंत आहे.

संयुक्त राष्ट्रे, दि. २० (वृत्तसंस्था) - मृत्युदंड-ाची शिक्षा कायमस्वरूपी हद्दपार करावी अशा आशयाच्या संयुक्त राष्ट्र सभेत (युनो) मांडलेल्या प्रस्तावाला हिंदुस्थानसह ३९ देशांनी कडाडून विरोध केला आहे. प्रत्येक देशाला आपापले कायदे ठरविण्याचा अधिकार आहे, असा जोरदार युक्तिवाद हिंदुस्थानने युनोच्या आमसभेत केला. या प्रस्तावाला ११० देशांनी पाठिंबा दर्शविला असून ३६ देशांनी तटस्थ राहणे पसंत केले आहे. आताच्या प्रगत युगात गुन्हेगारांना मृत्युदंडासारखी रानटी शिक्षा देणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे सर्व देशांनी या शिक्षेबाबत फेरविचार करून ती रद्द करावी असा ठराव युनोच्या आमसभेत आज मांडण्यात आला. ११० विरुद्ध ३९ अशा मतांनी तो मंजूरही केला. मात्र प्रस्तावाची अंमलबजावणी बंधनकारक नसून स्वैच्छिक असली तरी त्याच्यासाठी जागतिक जनमताचा दबाव विरोध करणार्‍या देशांवर पडणार आहे.............................. ही कालच्या सामन्या मधे बातमी आली आहे , आणि लगेच कसाब ला फाशी देण्यामागे काही संबंध असू शकेल का आणि नसला तरी जगात समोर आपले म्हणणे ठामपणे मांडून ते जगातील प्रगत देशांच्या मताची पर्वा न करता प्रत्यक्ष कृतीत आणणार्‍या आपल्या सरकारचे अभिनंदन

आमच्या देशाविरुद्ध युद्ध पुकारणारा कसाब मेला. आणि शहीद हेमंत करकरे,विजय साळस्कर, तुकाराम ओंबाळे, संदीप उन्नीकृष्णन आणि मुंबई हल्ल्यात शहीद झालेले इतर निरपराध नागरिक यांच्या आत्म्यांना काही प्रमाणात न्याय मिळाला.