Skip to main content

मोकलाया दाहि दिश्या

लेखक सतिश यांनी शनिवार, 28/02/2009 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
निसतेले सुर ओन्जलितुन ते मल कुन्वित आहे शावस घेत्तो मोकले की मी अत्ता निविरुत आहे एकु द्या मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातु नी म्रुदुगन्ध मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि रत्रिच्य तिमिरत होति धालली जी आसवे दवबिन्दु होउअन भेतलि मज उमलत्या पुश्पासवे पानाफुलातुन निर्झरतुन श्रुश्तिची ही स्पन्दने उतुन्ग लाता रानवारा देती मज ही आमन्त्रने हलूच ते धग चुम्बनि जाती फुलाचे तातवे औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते क्शितिजासही माझ्ह्या मनाचे कवदसे थाउक होते नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो सओअहले क्रुतुचे बघाया हा पहा मी चाललो आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झुकल्य जराश्या आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा कवि सुरेश्चन्द्रा जोशि ९५२५१२४९१५१३
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 271015
प्रतिक्रिया 334

प्रतिक्रिया

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नवीन मिपाकरांवर कृपा करून संपादकानी सर्व प्रतिसाद आणि धाग्याला जिवंत करावे. जमल्यास पूर्वप्रकाशनाचा नियम तोडून दिवाळी अंकाच्या पहिल्या पानावर प्रतिसादांसहित धागा टाकावा. दि. अं. रेकॉर्ड ब्रेक करेल.

अरे माझी लाडकी कविता :( गायबली कशी :( ह्या कवितेची एक आठवण म्हणजे .पर्‍याने मला मिपावर आल्या आल्या हि कविता 'गिफ्ट'केली होती ;) ( मिपावरचं मला मिळालेलं पैलंवैलं गिफ्ट :( :-/ ) =))

हीच खरी शुद्ध भाषा! तुम्ही लिहिता ती पुण्या-मुंबईची काय मराठी आहे ? असुद कुतले ? हलवले ते गवत लेका गवत लेका हलवले का ?

कं जाला कं ह्या कवतेला. फिरुनशिनी वर आयली.

हलूच ते धग चुम्बनि जाती फुलाचे तातवे

आकाश झाले ठेंगणे अन चांदण्या झुकल्या जराश्या आता न मी बंदा कुणाचा मज मोकळ्या दाही दिशा -दिलीप बिरुटे

अग्ग्ग्ग्ग्ग्ग्गाग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग.... साफ वारलो..... ऑफिसात सगळे विचित्र नजरेने बघतायत माझ्याकडे... :)

पुन्ह्यांदा एक्वार लै लै हाभार सतीस रावो.. ह.ह.मेले... :)) :)) :)) :)) हसय्च व्ह्तं म्हुन दागा वर कादला..

१५०. उच्च साहित्यमूल्य असलेल्या कोणत्याही कलाकृतीला लोक नेहमीच भरभरुन प्रतिसाद देतात हे पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे. आज मोकलाया दाहि दिश्या ने ही जी मजल गाठली आहे ते पाहता कविवर्यांपेक्षा हे नितांतसुंदर साहित्यपुष्प श्रोत्यांपर्यंत पोचवणार्‍या टंकनिक (आधी लिहीलेलं टंचनिका खोडून) आदरणीय सतिश ह्यांचे पुनश्च एकवार आभार. मोकलाया ची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहीलच हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची, नाडीवाल्याची गरज नाही. पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. - प्यार्वीण दवणे.

म. टा. च्या इन्टरनेट आवृत्तीतील प्रतिसाद बहुतेक वेळा याच भाषेत असतात. उदा :यात पोलीसान्चा दोष नही आहे. पोलिसांना स्वायत्तता द्या. सरकारचा होनारा हस्तक्षेप ताम्बवलयावर मग बाघा कसे सगळे सुतसरखे सरळ होतात ते.

पुन्हा एकदा वाचून पुन्हा एकदा हसून मरायला झालेय! :D

अरे माझे आधी दिलेले प्रतिसाद कुठे गेले?? (जेव्हा कविता आली होती तेव्हा, आम्ही घातलेला दंगा तर गेलाच आहे, दिसत नाही आहेत प्रतिसाद :( मी वरील कविता पुर्ण उलटी लिहली होती तो प्रतिसाद पण गायब आहे :( :( :( )

In reply to by अभ्या..

ब्लीच केलेले कावळे पेक्षा ट्यान झालेले हंस म्हण की बे, तेवढंच चांगलं वाटेल मनाला जरा ;) =))

In reply to by पिशी अबोली

'बगळे लागणे' म्हणजे अगोदरच दयनीय स्थिती असताना अजून जगासमोर सतत येऊन वाभाडे निघणे... ;)

In reply to by पिशी अबोली

वाभाडे वगैरे नाही गं :) ही कविता वाचली की मनापासून हसू येतं! इथले खूप मजेशीर प्रतिसाद दिसत नाहीयेत आता पण अख्खा धागा अतिशय मजेशीर आणि २ मिनिटं निखळ मनोरंजन करणारा आहे. त्या दिवशी ऑफिसातल्या नेहमीच्या कटकटींपासून ब्रेक म्हणून वाचायला घेतला होता... एकदम मस्त वाटलं वाचून झाल्यावर! :) मी वाचनखूणही साठवलीय ;)

ही कविता फिरून फिरून बरीच वर्षे वर येते आहे...इ मेलच्या माध्यमातूनही बरीच फिरली आहे. सुरूवातीला वाचली तेंव्हा माझंही क्षणैक मनोरंजन झालं होतं हेही आठवतं आहे. पण आता आज पुन्हा एकदा वाचल्यावर थोडा इतिहास आठवला; माझ्या आठवणीप्रमाणे, कुणा 'सुरेशचंद्र जोशीं'च्या 'सतीश' नामक [डोंबिवलीस्थित?] पुतण्याने ही कविता २८/२/२००९ रोजी मिपावर टाकली, खाली (बहुधा) जोशींचा मोबाईल क्रमांकही दिला, जेणेकरून कवितेचं कौतुक त्यांच्यापर्यंत पोहोचावं. पण 'सतीश' यांनी कविता सादर करतांना केलेल्या शुद्धलेखनातील (अक्षम्य) चुकांमुळे ही कविता कमालीची बदनाम झालीये. (बहुधा जोशींनी मोबाईल नंबर बदलला असणार!) पण मी मूळ कविता 'जशी जोशींना अभिप्रेत असावी तशी' खाली देतो आहे. आयुष्यभर नावडत्या नोकरीचं जोखड वागवून निवृत्त झालेल्या आणि आता थोडंसं निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याची आकांक्षा ठेवणार्‍या एका वृद्ध कर्मचार्‍याची ही कविता खरंच इतकी चेष्टा करण्यासारखी आहे का? निसटलेले सूर ओंजळीतून ते मला खुणवीत आहे श्वास घेतो मोकळे की मी आता निवृत्त आहे ऐकू द्या मज बासरी त्या बांबूच्या वेतांतुनी मृद्गंद्ध मोहक एकदा भरवू द्या मला श्वासातुनी रात्रीच्या तिमिरात होती ढाळली जी आसवे दवबिंदू होउन भेटली मज उमलत्या पुष्पांसवे पाना-फुलांतुन, निर्झरातून सृष्टीची ही स्पंदने उत्तुंग लता, रानवारा देती मज आमंत्रणे हळूच ते ढग चुंबूनी जाती फुलांचे ताटवे ओठ ओल्या पाकळ्यांचे धुंद होउन थरथरावे अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते क्षितिजासही माझ्या मनाचे कवडसे ठाउक होते नियम आणि अनुशासनाच्या चौकटीतून मुक्त झालो सोहळे ऋतुंचे बघाया हा पहा मी चाललो आकाश झाले ठेंगणे अन् चांदण्या झुकल्या जराश्या आता न मी बंदा कुणाचा मज मोकळ्या दाही दिशा - कवि सुरेशचंद्र जोशी

In reply to by बहुगुणी

ही कविता शुद्धलेखित स्वरुपात मागेही कोणीतरी इथे दिली होती आणि तिचे तेह्वाही कौतुकच झाले होते, हे पक्के आठवते :) कवितेची कोणी खिल्ली उडवते आहे असे वाटत नाही. खास करुन आधीपासून जे मिपावर आहेत त्यांना तरी तेह्वा झालेल्या गमतीजमती नक्कीच आठवून हसू येत असावे, मला तरी येते :)

In reply to by बहुगुणी

मूळ कविता खरेच चांगली आहे हो. पण जोश्यांचा त्यांच्या पुतण्याने घात केला. इथे काकांनीच "पुतण्या मला वाचव" म्हणुन आर्त साद घातली पाहिजे.

खरंय! जोश्यांची निवृत्तीनंतरची ही कदाचित पहिली-वहिली कविता त्यांची अखेरची ठरली असेल! मला नाही वाटत त्यांनी (निदान खर्‍या नावाने) पुन्हा कुठे कविता प्रकाशनाचं धाडस केलं असेल! :-)

मुल क्विता चान अहे हे त्र्र खरेछ, पन आमला ति इते जश्यी वाचय्ला मिलालि,तच्शिच ज्यास्त अवल्ली. अछा आखिण क्विता लिहा नागडे जि.

अक्षर साहित्यात गणना होणारी रचना. कितीदाही वाचा, प्रत्येक वेळी नवीनतेचा प्रत्यय देणारी. सलाम.

कृपया उडवलेले/गाळलेले इतर प्रतिसादही पाहता येतील का?

In reply to by मंदार कात्रे

हा धागा no holds barred टाईपचा होता. काहीही उडले नाह्ये. :) (अर्थात, भविष्याची खात्री नाही! ;) ) - आपला (सल्लागार)

ही कविता अजरामर आहे हे पुनरेकवार सिद्ध झाले. "यदा मिपायां हास्यस्य ग्लानिर्भवति भारत | अभ्युत्थानं जिलेबीनां तदा काव्यं सृजाम्यहम् || परित्राणाय काकूनां ट्रोलसंहरणायच | हास्यसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||"

In reply to by बॅटमॅन

यदा मिपायां हास्यस्य ग्लानिर्भवति भारत | अभ्युत्थानं जिलेबीनां तदा काव्यं सृजाम्यहम् || परित्राणाय काकूनां ट्रोलसंहरणायच | हास्यसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे || इती भगवान बट्टमणम् ।

In reply to by रातराणी

अरे नेकी और पूछपूछ. टीशर्ट जरुर बनायेंगे. . तेवढं जरा साइजचं...... म्हणजे कीडसपासून ट्रीपल एक्सेल पर्यंत बनवतो आपण. पण..... ;)

In reply to by कहर

०२५१ हा एसटीडी कोड अंबरनाथचा आहे. जुन्या काळी राज्यातल्या राज्यात परगावचा क्र. लावायचा असेल तर शुन्याऐवजी ९५ लावावे लागत असे.

मरा लेको परत हसून हसून खा बॉस च्या शिव्या . . (वेळ जात नसला कि बुकमार्क उघडून परत परत हसण्यासारखं दुसरं सुख नाही )