मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मोकलाया दाहि दिश्या

सतिश · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
निसतेले सुर ओन्जलितुन ते मल कुन्वित आहे शावस घेत्तो मोकले की मी अत्ता निविरुत आहे एकु द्या मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातु नी म्रुदुगन्ध मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि रत्रिच्य तिमिरत होति धालली जी आसवे दवबिन्दु होउअन भेतलि मज उमलत्या पुश्पासवे पानाफुलातुन निर्झरतुन श्रुश्तिची ही स्पन्दने उतुन्ग लाता रानवारा देती मज ही आमन्त्रने हलूच ते धग चुम्बनि जाती फुलाचे तातवे औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते क्शितिजासही माझ्ह्या मनाचे कवदसे थाउक होते नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो सओअहले क्रुतुचे बघाया हा पहा मी चाललो आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झुकल्य जराश्या आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा कवि सुरेश्चन्द्रा जोशि ९५२५१२४९१५१३

वाचने 270438 वाचनखूण प्रतिक्रिया 333

यक्वितेला १० वर्से पुर्नजाली प्न्न तिची ज्दादु कही ओसरली नही पुद्ची १०० वर्से तरी ही क्वीता वाचेलीजाइयील पैजार्बुव्वा,

नाखु गुरुवार, 03/28/2019 - 07:04
कालातीत कलाकृती आणि मिपाधुरीणांचा प्रतिसाद असलेलं लोकोत्तर काव्यपुष्प

विजुभाऊ गुरुवार, 03/28/2019 - 10:06
तदमाताय या क्वितेला धा वर्से पुर्न झाली की. ही कविता कधीच विस्मरणात जाणार नाही

सुबोध खरे Tue, 05/21/2019 - 09:42
दर काही कालावधी नंतर कुणी तरी हा धागा वर काढतो आणि परत चेहऱ्यावर हसू फुटतं. या धाग्याने आपले किती मनोरंजन केले आहे त्याची गणतीच करता येणार नाही.

विजुभाऊ Tue, 03/31/2020 - 16:48
हा हा हा. विस्मराणतच गेली होती मिपावरच्या हॉल ऑफ फेम मधली सर्वोच्च कविता

In reply to by रुपी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/07/2020 - 11:19
हे राम. आज कोणी उकरुन काढली ही कविता बघायला आलो. कितीक कविता आल्या आणि गेल्या पण या कवितेचं स्थान अढळ आहे. काव्य स्पर्धा सुरु करण्यापूर्वी या कवितेची फ्रेम करुन फ्रेमला हार घालून दोन मिनिट उभे राहुन मगच स्पर्धा सुरु करायला पाहिजे. -दिलीप बिरुटे (सतीशचा लाईटाइम फ्यान)

इरसाल Wed, 10/14/2020 - 14:25
११ वर्ष, ७ महिने आणी १६ दिवस पुर्ण. चला पुन्हा वाचुया नी पुन्हा लोळुया.

विटेकर Wed, 10/14/2020 - 14:38
एखाद्या कलाक्रुतीचे मूल्यमापन करताना त्या कलाकृतीची भविष्यात सावली किती लांब पडली यावरुन करता येते. या मोजपट्टीवर या कलाकृतीला यशस्वी म्हन्टले पाहिजे

In reply to by मुक्त विहारि

राघव Tue, 04/06/2021 - 12:05
तेही खरंय म्हणा! आजकाल तर कुणी ही कविता वर काढली की धागा उघडायच्या आधीच हसून घेतो..! :-) बाकी, "आणली का ही पुन्हा वर.." असा प्रतिसाद देण्यासाठीच आलो होतो! =))

चौथा कोनाडा Fri, 04/09/2021 - 17:44
पण त्यांच्याच
दाबुन हुन्दक्आना या स्पुन्धतात भिन्ति हलुवर काकाणचि किण्किण थाम्बलेलि
http://misalpav.com/node/5019#comment-1102321 या कवितेला फक्त १३, ७००+ इतकीच टिचकी आहे ! 😁 ये सरासर ना-इन्साफी हैं मायलॉर्ड !

२००९ पासून २०२१ पर्यंत दरवर्षी प्रतिसाद घेतलेला मिपावरील हा एकमेव धागा असावा. यापुढेही दरवर्षी किमान एक प्रतिसाद तरी हा धागा घेईलच याविषयी शंका नको.

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर Wed, 07/24/2024 - 21:29
छान! ह्या अलौकिक, अजरामर कवितेला समर्पक 'Imagery' नसणे एवढीच एक कमी होती, ह्या भन्नाट 'रमलचित्राने' ती पण आज पूर्ण झाली म्हणायची 😀 काय तो चित्रातल्या आजोबांचा 'ऑरा', काय ती भौतिकशास्त्राच्या प्रचलित नियमांना सपशेल खोटे ठरवणाऱ्या चमत्कारिक स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ नमुना म्हणता येईल अशा विलक्षण आकाराची इमारत आणि तिच्यावर लावलेल्या त्या डिश अँटेना सारख्या विचित्र वस्तू आणि काय ती भोवतालच्या अगम्य शब्दांची पखरण आणि काय ते खालचे चित्रकाराचे तेवढेच अगम्य नाव... सगळंच कविते इतकंच भारी! आज पुन्हा हि कविता वाचून जेवढे मनोरंजन झाले तेवढेच हे चित्र पाहूनही झाले 😂 😂 😂

In reply to by टर्मीनेटर

चौथा कोनाडा गुरुवार, 07/25/2024 - 17:57
हा .... हा .... हा .... ! .. आता उलटं करुया .... हे 'रमलचित्र" द्यायचे अन यावर कविता रचायला सांगायची !

In reply to by टर्मीनेटर

गवि Fri, 07/26/2024 - 14:54
डिश अँटेना सारख्या विचित्र वस्तू
त्या विविध आकारांच्या वॉकिंग स्टिक्स दिसत आहेत. त्या वृद्धाच्या असाव्यात, त्या कुबड्या त्याने गाडून टाकल्या आणि आता तो मोकळा झाला.

चित्रगुप्त Sat, 07/27/2024 - 15:32
माझ्या थोड्याशा अनुभवातून हे समजले की निसर्गदृष्ये, ह्याप्पी बड्डेचे केक, अनामिक व्यक्ती वगैरेंसाठी रमलचित्रे ठीक असली तरी जास्त खोलात जाऊन विषयानुसार बारकावे, तपशील दिले तरिही चित्र काय आणि कसे बनून येईल हे काहीच सांगता येत नाही.

या अजरामर कवितेवर २०२५ मधील हा पहिला प्रतिसाद. २०२३ मध्ये यावर एकही प्रतिसाद आला होता तसे २०२५ मध्ये व्हायला नको म्हणून नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच हा प्रतिसाद लिहित आहे.

In reply to by विजुभाऊ

चौथा कोनाडा Wed, 01/08/2025 - 19:18
हार्दिक अभिनंदन, सर्व वाचकांचे ! या सर्वात्म करमणूक धाग्या साठी अभिनंदन करणे हे कर्तव्यच नाही का !

In reply to by विजुभाऊ

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 01/09/2025 - 09:41
मोकलायाची एकूण वाचने सव्वादोन लाखांच्यावर
दुसर्‍या क्रमांकावर माझा केजरूके गुलाम हाच धागा आहे का? आतापर्यंत १ लाख ६८ हजार पेक्षा जास्त वाचने झाली आहेत :)

चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 01/01/2026 - 22:47
या अजरामर कवितेवर २०२६ मधील हा पहिला प्रतिसाद. २०२३ मध्ये यावर एकही प्रतिसाद आला होता तसे २०२६ मध्ये व्हायला नको म्हणून नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच हा प्रतिसाद लिहित आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म Fri, 01/02/2026 - 01:29
बरं झालं तुंम्ही या कवितेला प्रतिसाद दिलात. मी ती आणखी एकदा वाचली. आणि खरं सांगायचं तर मुद्राराक्षसाचा गोंधळ दुर्लक्षित केला, तर एक तरल, चांगली कविता वाचली असे वाटले. केवळ आणि केवळ टायपोने या कवितेचा गळा कापला होता. त्यामुळे ती अशी वाचली तर सुपर डुपर विनोदी आणि तशी वाचली तर एक वेगळीच भावना पकडू पाहणारी सुंदर कविता आहे, असे वाटले खरे!