मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फूटबॉल युरो चषक - २०१२ : शुभारंभ आणि गुणतक्ता

छोटा डॉन · · जनातलं, मनातलं
नमस्कार मंडळी. क्रिकेटचा वर्ल्डकप झाला आणि भारतात दिवाळी साजरी झाली, त्यानंतर सगळ्यांचा जीव लटकवुन ठेवलेले तेंडल्यांचे शतकांचे महाशतक झाले आणि पुन्हा एकदा लोकांनी दिवाळी केली. झालेच तर क्रिकेटचे भारतीय धंदेवाईक व्हर्शन 'आयपीएल' ही झाले. मध्यंतरी बुद्धिबळ विश्वचषकही झाला आणि विश्वनाथन आनंदने तो जिंकुन कमाल केली. सध्या फ्रेंच ओपन स्पर्धेचा धुमाकुळही चालु आहे आणि नदाल नेहमीसारखा क्ले कोर्टवर एकेक प्रतिस्पर्ध्यांना शब्दशः धूळ चारत आहे. कालच भुपती-सानिया मिर्झा जोडीने मिक्स डबल्सच्या विजेतेपदावर कब्जा केला, टेनिसमधुन अलमोस्ट आउट झालेली ग्लॅमगर्ल मारिय शेरपोव्हा ह्या वर्षी अगदी भन्नाट खेळत आहे. ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे इंग्लिश प्रिमियर लीग, बुंडेसलीगा, स्पॅनिश लीग इत्यादीही पार पडल्या. 'मॅन्चेस्टर सिटी'ने त्यांच्या सपोर्टरचे प्राण कंठाशी आणुन का होईना पण ईपीएलवर कब्जा केला आणि बर्‍याच वर्षांनंतर इंग्लिश लीगला नवा विजेता मिळाला. तिकडे स्पेनमध्ये 'रियाल माद्रिद'ने अत्यंत आक्रमकपणे खेळत बलाढ्य बार्सिलोनाचे वर्चस्व संपुष्टात आणले. कोणाच्या ध्यानीमनी नसताना सर्व अंदाज चुकवत इंग्लिश लीगमध्ये ६ व्या नंबरावर असणार्‍या 'चेल्सी'ने चँपियन्स लीगला गवसणी घातली आणि ह्या क्लबचा मालक असलेल्या रोमन अब्राहिमोविचचे ओतलेले करोडो डॉलर्स सार्थकी लागले. . . एकंदरीत बरेच काही घडले, घडत आहे. अजुन काही दिवसांनी लंडनमध्ये 'ऑलंपिक्स-२०१२'चे रणशिंग फुंकले जाईल आणि ह्या खेळाच्या जागतीक कुंभमेळ्याला देशोदेशीचे भक्त लंडनमध्ये हजरी लावतील. . . पण हे सर्व घडत असताना अजुनही काही घडत आहे, इन्फॅक्ट आज त्याची सुरवात होणार आहे. UEFA European Football Championship ..... अर्थात युरो-२०१२ !!! दर ४ वर्षांनी येणारा फूटबॉलचा विश्वचषक जेवढा प्रतिष्ठेचा असतो तेवढेच महत्व युरोपात ह्या स्पर्धेला आहे. जेवढी खुन्नस भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचला असते तेवढीच खुन्नस इथे जर्मनी-नेदरलँड ह्या सामन्याला असते, विश्वचषकाचे गेले ३ वेळेचे विजेते स्पेन, इटली आणि फ्रान्स इथे पुन्हा एकमेकांना भिडणार आहेत. जगातत्या सगळ्यात बेस्ट फूटबॉल लीग्स जिथे खेळल्या जातात आणि त्यांच्या प्लेयर्सवर आख्ख्या जगातले पाठिराखे फिदा असतात ते जर्मनी, स्पेन, इंग्लंड, इटली त्याच सुपरस्टारना घेऊन इथे एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. लोकप्रिय ब्राझिल, अर्जेंटिना वगैरे जरी ह्या स्पर्धेचा भाग नसले तरी ह्या त्यामुळे ह्या स्पर्धेच्या थरारात तसुभरही फरक पडत नाही. युरो चषक विश्वचषक नसला तरी त्याचे महत्व विश्वचषकाहुन किंचितही कमी नाही. आज ह्या स्पर्धेचा शुभारंभ होत आहे. ह्यावेळेसचे यजमान देश आहेत 'युक्रेन' आणि 'पोलंड'. तुम्ही ह्या संघांचा खेळ पाहणार असाल तर उत्तम आहे, पण त्याहुन काही पाहण्यासारखे असेल तर ते म्हणजे ह्या दोन्ही संघांचे पाठीराखे. अत्यंत आक्रमक, गोंधळी, दंगेखोर आणि आपल्या टिमसाठी पागल असे सपोटर्स आपण शोधायला गेलो तर त्या यादीमध्ये ह्या २ देशांच्या पाठीराख्यांचे नाव अग्रक्रमाने येईल. प्रतिस्पर्धी टिम्सना ह्यांच्या खेळाचे टेन्शन जरी म्हणावे एवढे नसले तरी ह्यांच्या होम-ग्राउंडवर ह्यांच्या 'क्रेझी' सपोटर्ससमोर कसे खेळायचे ह्याचे टेन्शन नक्कीच असणार. असो, आज सुरवात होत आहे व त्यासाठी हे ४ शब्द .... बाकी संघांची माहिती वगैरे देण्यात जास्त पॉइन्ट नाही कारण काही तुरळक अपवाद वगळता सर्वच बलाढ्य संघांचे प्लेयर्स जे विश्वचषकात खेळले तेच इथे खेळणार आहेत. दावेदारही जवळपास तेच आहेत .... जग्गजेते आणि युरोचे गतविजेते असलेले स्पेन, गतविश्वचषकानंतर कात टाकलेला फ्रांन्स, नेहमीच लढावय्या म्हणुन ख्याती असलेली जर्मनी, अंमळ थकलेली परंतु आपल्या अफाट डिफेन्सने समोरच्याला दमवु शकणारी इटली, स्टारडम मिरवणारे आणि दुखापतीने ग्रासलेले इंग्लंड, विश्वचषकात अंतिम फेरीत धडक मारणारे नेदरलँड, अत्यंत धोकादायक परंतु शेवटच्या फेर्‍यात कचखाऊ म्हणुन ख्याती असलेले रोनाल्डोचे पोर्तुगाल, भल्याभल्यांना धूळ चारु शकणारा २००४ चा विजेता ग्रीस, विश्वचषकाला क्वालिफाय न झाल्याचे उट्टे काढण्यास अतुर असलेले क्रोएशिया. असो, आता ह्या धाग्यावर गुणतक्ता देतो आणि आरंभीचे ४ शब्द संपवतो. हा धागा काही संपुर्ण स्पर्धेचे कव्हरेज नाही, जशी जशी स्पर्धा पुढे जाईल तसे काळानुरुप नवे धागे काढता येतील. केवळ ह्या स्पर्धेची पार्श्वभुमी देणे आणि गुणतक्त्याची स्थापना करणे एवढेच ह्या धाग्याचे कर्त्यव्य. युरो चषक २०१२ !!!
स्पर्धेच्या रोजच्या सामन्यांच्या अद्ययावत निकाल, झालेले गोल्स, विजयी-पराभुत संघांच्या बदलत्या क्रमवारी आणि त्यानुसार पुढच्या फेरीसाठीच्या पात्रतेची शक्यता, मिळालेले एकुण गुण आदी बाबी ध्यानात घेऊन एक तक्ता बनवला आहे. ह्या तक्त्यावर नजर टाकली तर सर्व आवश्यक माहिती "एका नजरेत" मिळेल असा विश्वास आहे. तक्ता बनवताना शक्य तितकी अधिक माहिती तक्यात देण्याचा प्रयत्न केला आहे. हा तक्ता शक्यतो "रोज अद्ययावत होईल" .... !!! १. निळ्या रंगातल्या ओळीमध्ये स्थान असलेले संघ "पुढच्या फेरीसाठी पात्र" ह्या गटात मोडतात गडद निळा त्या गटातला "क्रमांक-१" चा संघ आणि फिकट निळा "क्रमांक-२" चा संघ कोण आहे ते सांगतो. २. पिवळ्या रंगाच्या ओळीत आलेले संघ "पहिल्या फेरीनंतर स्पर्धेतुन बाहेर फेकले ( पक्षी : नॉक आउट ) होतील. आम्हाला अशी आशा आहे की हा तक्ता मिपाकरांना नक्कीच उपयोगाचा होईल. टीप : सर्व प्रकारच्या सुचना, टिप्पण्या, सुचवण्या आणि सल्ले ह्यांचे स्वागत असेल. हे सर्व तुमच्यासाठीच आहे त्यामुळे तुमचे मत नक्कीच महत्वाचे असेल आणि ते नक्की विचारात घेतले जाईल. धन्यवाद ! गट - अ :

संघ : झेक रिपब्लिक, ग्रीस, पोलंड, रशिया

क्रमांक राष्ट्रध्वज राष्ट्र खेळलेले सामने विजय अनिर्णीत पराजय केलेले गोल स्विकारलेले गोल गोल फरक गुण
रशिया
ग्रीस
पोलंड
झेक रिपब्लिक -३

============================================================================= गट - ब :

संघ : डेन्मार्क, जर्मनी, नेदरलँड, पोर्तुगाल

क्रमांक राष्ट्रध्वज राष्ट्र खेळलेले सामने विजय अनिर्णीत पराजय केलेले गोल स्विकारलेले गोल गोल फरक गुण
डेन्मार्क
जर्मनी
नेदरलँड -१
पोर्तुगाल -१

============================================================================= गट - क :

संघ : क्रोएशिया, आयर्लंड, इटली, स्पेन

क्रमांक राष्ट्रध्वज राष्ट्र खेळलेले सामने विजय अनिर्णीत पराजय केलेले गोल स्विकारलेले गोल गोल फरक गुण
क्रोएशिया
स्पेन
इटली
आयर्लँड -२

============================================================================= गट - ड :

संघ : इंग्लंड, फ्रान्स, स्विडन, युक्रेन

क्रमांक राष्ट्रध्वज राष्ट्र खेळलेले सामने विजय अनिर्णीत पराजय केलेले गोल स्विकारलेले गोल गोल फरक गुण
इंग्लंड
फ्रान्स
स्विडन
युक्रेन

============================================================================= आणि हो, आज पहिला सामना यजमान पोलंड आणि ग्रीस ह्यांच्यामध्ये खेळवला जाईल व त्याला आता काही मिनिटातच सुरवात होईल, एंजॉय दी मॅच ! सर्व छायाचित्रे आंतरजालावरुन साभार ...

वाचन 11270 प्रतिक्रिया 0