Skip to main content

तुम्हाला काय /कोण सेक्सी वाटते

लेखक शुचि यांनी गुरुवार, 21/06/2012 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
इन्टरनेटमुळे नजर जवळ जवळ मेल्यासारखीच झाली आहे. नानाविध, अनसेन्सॉर्ड फीती, छायाचित्रे जालावर मुबलक उपलब्ध असतात. अशा काळात "सेक्सी" म्हणजे काय याचा उदाहरणासहीत उहापोह करणारा हा लेख नक्कीच वाचनीय आहे. जरी हा अमेरीकन लोकांच्या दृष्टीकोनातून लिहीलेला असला तरी काही उदाहरणे विलक्षण कातील आहेत. उदाहरणार्थ - कोका कोलाची जाहीरात आणि त्यामधील हसरी अन अतिशय बांधेसूद तरुणी, विशेषतः पार्श्वभूमीवरील होकारार्थी उद्गार-
From May 30, 2012
याच लेखामधील, दुसरे मला आवडलेले उदाहरण एका नर्तकीचे (सारा बरस)आहे जिची चित्रफीत खाली डकविली आहे. काही फोटो (मॅन्स शॅडोज) अप्रतिम आहेत. मिपाकरांना काय "सेक्सी" वाटते ते जाणून घेण्यास आवडेल. इतके वाईन, दारु, धर्म, राजकारण, प्रेम सगळे विषय बोलतो मग याच विषयाने काय घोडे मारले आहे ;) माझ्यापासून सुरवात करते - (१) मला स्त्रियांची चित्रे (पेंटींग्ज्स), पोर्टेट्स (खरी छायाचित्रे नाही) अतिशय आवडतात. जालावर अशी चित्रे पहात असताना मी जवळ जवळ संमोहीत होते. (२) "प्रेटी वूमन" मधील "रिचर्ड जेरे" चा संयत अभिनय मला सेक्सी वाटला. (३) "साहब-बीवी और गुलाम" मधील मीना कुमारीची गाणी व गाण्यातील अभिनय शृंगार आदि, नाईट्स इन व्हाईट सॅटीन-मूडी ब्लूज, सजना है मुझे सजना के लिये - सौदागर वगैरे काही गाणी खूप आवडतात, सेक्सी वाटतात.

वाचने 197516
प्रतिक्रिया 347

प्रतिक्रिया

बेळगावचे चित्रकार के बी कुलकर्णी यांच्या चित्रातील पाठमोरी ललना . तसेच चित्रकार प्रताप मुळीक यांच्या शैलीत साकार होणारी ललना " सेक्सी" वाटते. मादक असा सेक्सीचा अर्थ घेतला आहे.

In reply to by चौकटराजा

केवळ एक कुतूहल म्हणून विचारते - पाठ आकर्षक वाटते की चेहेरा लपविलेला म्हणजे चित्रातील "मिस्टरी" आपल्याला आकर्षित करते :) ....... मला स्वतःला मिस्टरी (गूढता/सुप्तता) चे खूप आकर्षण वाटते. जसे सर्क द्यु सोलेल या लास व्हेगास ला होणार्‍या कार्यक्रमाचे अनेक प्रकार आहेत पण मला त्यातील त्यातील सर्क द्यु सोलेल- मिस्टीर हाच पहावासा वाटतो.

In reply to by शुचि

पाठ आकर्षक वाटते की चेहेरा लपविलेला म्हणजे चित्रातील "मिस्टरी" आपल्याला आकर्षित करते आता पहिले लक्ष पाठीकडेच गेले असणार ना ,अन पाठ सेक्सी दिसल्यामुळेच मग चेहरा पहाण्याची उर्मी मनात दाट्ली असेल....

ह्म्म्म्म्म्म, सेक्सी य शब्दाची व्याख्या आधी तयार करावी लागेल. सुंदरता आणि शृंगार या दोन भिन्न गोष्टी आहेत. कुणाला कधी कोण सुंदर वाटेल हा फिजिक्स, केमीस्ट्री आणि बायोलॉजीकल अभ्यासाच्या विषय आहे, तुम्ही म्हण्ता तसं ( तुम्ही स्त्री आहात असं गृहीत धरून) स्त्रीयांना एखादी स्त्री सेक्सी वाटणे, किंवा पुरुषाला पुरुष हादेखील चर्चेचा विषय ठरु शकतो. लेख आणखी विस्तारीत असता तर मुळ विषय काय आहे आणि चर्चा कशावर करायची हे कळाले असते. ;)

चरचरीत फोडणी - या लेखाचे शीर्षक. निःसत्व ढोकळा - लेखनातील आशय. आजची सकाळ वाईट जाणार होती तर... तरीही हा धागा उघडून ठेवावा म्हणतोय... ;-)

In reply to by श्रावण मोडक

शीर्षक वाचून अपेक्षा फारच वाढलेल्या होत्या ;)

In reply to by श्रावण मोडक

धागा उघडाच ठेवला. सार्थक झाले. आता धागा क्रमांक दोन सुरू करा लेको... लई त्रास होतोय प्रतिसाद शोधताना. ;-)

In reply to by विकास

शिंपल गणित (पाश्चिमात्य पद्धतीने, वैदीक नाही. हे हो काय विकासराव? तुम्हाला त्रयोगुणमितिदर्शनम् ह्या प्राचीन ग्रंथाबद्दल काहीच माहिती नाही? ;)

जसा Fuck हा शब्द नाम, क्रियापद, उभयान्वयी अव्यय, विषेशण, क्रियाविषेशण असा कसाही वापरला जाण्याच्या ताकतीचा आहे, तसाच Sexy हा शब्द. त्याची व्याप्ती फार मोठी आहे. ह्या लेखात नेमके काय अपेक्शित आहे ते कळल नाही सबब माझा पास. -( सेक्सी) सोकाजी

सेक्सी ह्या शब्दाचा नक्की अर्थ काय घ्यायचा? १) provoking or intended to provoke sexual interest: २) interesting, exciting, or trendy: १) म्हणजे बघा रिचर्ड गिअर चा संयत अभिनय पाहून हा इसम आत्ताच्या आत्ता माझ्या मिठीत असावा आणि... २) की अरे वा! जर अशी भुमीका कोण्या अन्य अभिनेत्याला करायची झाली तर त्याने ही अशी करावी , आदर्शवत, चपखल, योग्य वढवलेली, परफेक्ट भूमीका. इतकी मी ह्या खोट्या खोट्या कथेतही स्व:ताला हरवून बसले. असा अर्थ? अजुन काही उदाहरणे म्हणजे.. १) हा शर्ट/ड्रेस माझ्या जोडीदाराने घातला तर मला आत्ताच्या अत्ता त्याला/तिला .... २) एखादी म्हणेल हा दागिना मी घातला तर माझा मूड दिवसभर छान असतो, अमुक ब्रँड्चा पर्फ्युम सकाळी लावला तरी अगदी रात्रीपर्यंत टिकतो. ह्या हेअरकट मधे मीच मला सुंदर वाटते. एखादा म्हणेल अमुक गॅजेट/ऑब्जेक्ट घेउन बरेच दिवस झाले तरी आजही ते नव्या सारखे सुंदर दिसते, तितकेच इफिशियंटली चालते. अमुक खेळाडू आज अगदीच भारी खेळला, सचिनने मारलेले स्ट्रेट कट, कव्हर ड्राईव्स.. ------- भाग १ जो आहे त्याला सेक्सी म्हणणे हे साधारणता विशिष्ट एन्ड रिझल्ट ओरीएन्टेड असते. व भाग २ आहे जो स्वताचाच मूड चांगला करतो, फिल गुड रिलेटेड विदाउट द नीड ऑफ अनदर पर्सन ऑर फिजीकल अ‍ॅक्शन. अवांतर - माफी मागतो. मला वाटते सेक्सी हा शब्द न वापरताही तितकाच/तोच निर्मल आनंद विविध क्रियांमधे उपभोगता येण्यासारखा आहे. तो शब्द वापरुन आपण काहीतरी स्पेशल, हिप, ट्रेंडी आहोत हेच दाखवायचे असेल तर तो हेतू साध्य होत असेलही म्हणा. मला पडणारा प्रश्न सेक्सी हा शब्द उच्चारायची गरजच का पडते? हा शब्द न वापरता कोणताही अंतिम हेतू सहजसाध्य आहेच. इथे मला फक्त वरणभात भाषा, शी बै अच्र्त बाव्ल्त असे काही म्हणायचे नाही. ललित लेखकाला स्व:ताच्या भाषेत जे काय लिहायचे आहे त्याच्या स्वातंत्र्याचा आदर आहेच. पण बोलाचालीच्या भाषेत, एकमेकांशी सार्वजनीक संवादात गरज आहे? हे असे एक एक शब्दाचे स्वातंत्र्य घेत पुढच्या पिढीला जास्त ज्ञानी करत, आपण त्यांची निरागसता लवकर तर संपवत नाही आहोत ना? अशी एक शंका येते. होपफुली आय एम राँग. पण लहान मुलांची निरागसता जितकी जास्त जपता येईल तितकी जपावी असे मला तरी वाटते. मागे लिटील चँप्स की तसल्याच एका कार्यक्रमामधे सेक्सी सेक्सी शब्द असलेली गाणी ८ - १० वर्षाची लहानगी म्हणाली होती असे अंधुकसे आठवते. किंवा अगदीच "प्रौढ" असे अंगविक्षेप नाचात बसवणे हेही आढळते. अर्थात हे माझे मत आहे. इतरांवर लादण्याचा प्रकार नाही. सेक्सी, शिट, ओह फक, बास्टर्ड्,अजुन कुठली शिवी, वाऽऽअ अप?, यो मॅन असले शब्द आपल्या रोजच्या शब्द कोशात असायची खरच गरज आहे का? असले शब्द वापरुन वापरुन / तेच लक्षात ठेवून आजवर प्रचलित असलेले त्यातल्या त्यात अलंकारीत, अर्थवाही शब्द आपण विसरत चाललो आहोत काय? असो हे अवांतर फार झाले. शुचिताई माफ करा. एकंदर कोणाला कशात काय वाटतं - यात आता पुन्हा व्यक्ती तितक्या प्रकृती ते तुमचं आमचं सेम असतं अशी आवडनिवड असणारच.

In reply to by सहज

सहज कृपया माझा खालचा प्रतिसाद पहा. मी आधी तो प्रतिसाद टंकला आणि मग आपला प्रतिसाद पाहीला. "सेक्सी" शब्द त्या लेखातून जसाच्या तसा उचलला आहे.

In reply to by सहज

एवढा मोठा प्रतिसाद टाकण्यापेक्षा सहजराव एखादा जहाला आणि मादक लेख का टाकत नाहीत? सेक्सी, शिट, ओह फक, बास्टर्ड्,अजुन कुठली शिवी, वाऽऽअ अप?, यो मॅन असले शब्द आपल्या रोजच्या शब्द कोशात असायची खरच गरज आहे का? असले शब्द वापरुन वापरुन / तेच लक्षात ठेवून आजवर प्रचलित असलेले त्यातल्या त्यात अलंकारीत, अर्थवाही शब्द आपण विसरत चाललो आहोत काय? मराठी व्यक्तीला तरी शब्दांची कमतरता पडू नये! :) एकंदर कोणाला कशात काय वाटतं - यात आता पुन्हा व्यक्ती तितक्या प्रकृती ते तुमचं आमचं सेम असतं अशी आवडनिवड असणारच. +१ कुणाला मधुबाला मादक वाटते तर कुणाला एक गोड चेहेर्‍याचं पिंप (मराठी शब्द!) वाटतं!

ममो, श्रामो, सोत्रि - सेक्सी म्हणजे मादक, कामोत्तेजीत करणारे, आव्हानात्मक, संमोहीत करणारे, धुंदावणारे, वेडावणारे यापैकी सर्व अथवा काहीही धरा ना. काहींना स्त्रियांचे "हिप्स स्वे" (नितंबांची डौलदार लय) सेक्सी वाटेल तर कोणाला स्त्रीच्या केवळ नजरेतील जादू, काही पुरुषांना स्त्रियांचे पाय/पाऊले आवडतात तर काहींना ओठ, काही स्त्रियांना पुरषांचे मौन आणि तरीही नजरेतील वचक आवडू शकतो तर माझ्या एका मैत्रिणीला टाय-सूट मधीलच फोटो आवडायचे (डेअर आय से टर्न ऑन करायचे) वेल ......... हे झाले शारीरीक सौंदर्याचे प्रकार तसेच कला प्रकारही असतील ना जे की धुंदावून सोडतात. तो विषय आहे. विशेषतः कलाप्रकारातील आपल्याला आवडणारी उदाहरणे. हा विषय मी नीट मांडावयास हवा होता. पण या प्रतिसादानंतर मला वाटते थोडा स्पष्ट होईल.

स्त्रियांच्या बाबतीत म्हणाल तर ज्या क्षणी स्त्रि इतर कुठल्याही फाफट पसार्‍यातुन कमोत्तकजतेकडे वळते ( वा एखादी नटी तसा अभिनय करते) तो क्षण मला भयंकर सेक्सी वाटतो. अर्थात, याबाबत एक हाय पास फिल्टर आहे... हुमा खान, मल्लीका शेरावत वगैरे त्यातुन कट होतात. पंजाबी ड्रेस + लांबसडक केस + जरा उंच बांधा+ गोरा वर्ण + थोडा कडक सुर तुफान सेक्सी वाटतं. सावळ्या वर्णाला टपोरे/मीनाक्षी डोळे (द्विरुक्ती झाली) + सरळ नाक + मंजुळ सुर... एक्दम समा बन गया वाटतं. काहि भडक रंगांचे कॉम्बीनेशन्स आणि लाईट कलरच्या छटा सेक्सी वाटतात... त्याच्याशी संध्याकाळची शीतल हवा रिलेट करता आली पाहिजे मात्र. ज्येनुइन मराठी गजल (मालवुन टाक दीप वगैरे), निवांत भाव दर्शवणारे संगीत , पाण्याच्या थेंबांचा हळुवार टप टप आवाज एकदम जानदार. पेंटींग वगैरे मध्ये म्हणाल तर कमनीय बांधा क्लीक होतो. असो... यादी बरीच लांब होईल :) अर्धवटराव

२) "प्रेटी वूमन" मधील "रिचर्ड जेरे" चा संयत अभिनय मला सेक्सी वाटला ________________________ ऊऊऊऊऊऊऊऊऊउ........आपण तर लाखोंदा फीदा रीचर्डच्या ' प्रीटी वूमन ' मधल्या अ‍ॅक्टींगवर :)

In reply to by जेनी...

हाहा ........ खरच ग. अफलातून आहे. शेवटी दातात गुलाबाचं फूल घेऊन शिडी चढत तो तिच्याकडे जातो ..... एवढा मोठा मिलीयोनेअर (म्हणजे चित्रपटात) , त्यात देखणा, त्यात सौजन्यशीलतेचा कळस पण तिच्यासाठी....... आई ग!!! ..... आणि पार्श्वभूमीवर ते जीवघेणं मधुर संगीत ......... माझं काळीज ठाव सोडतं त्या सीनला :)

In reply to by दिपक

होय हाच तो सीन. धन्यवाद शोधून येथे टाकल्याबद्दल. पण या सीनची जादू संपूर्ण सिनेमा पाहील्यावर , त्या पटकथेच्या पार्श्वभूमीवर पहातानाच कळून येते. असा "एकटा" (आयसोलेटेड) सीन पहाताना मंत्रमुग्ध व्हायला होत नाही. त्या विशिष्ठ जिगसॉ पझलमध्येच तो फिट बसतो.

सेक्सी म्हणजे मादक, कामोत्तेजीत करणारे, आव्हानात्मक, संमोहीत करणारे, धुंदावणारे, वेडावणारे यापैकी सर्व अथवा काहीही धरा ना. व्याख्या काही पटली नाही. 'सेक्सी म्हणजे मादक, कामोत्तेजीत करणारे' इथेच 'सेक्सी' शब्दाची व्याक्या संपते. (असे मला वाटते). आव्हानात्मक, संमोहीत करणारे, धुंदावणारे, वेडावणारे यापैकी सर्व अथवा काहीही..... ह्यात 'सेक्सी' काय आहे? चित्रकाराला एखादे चित्र, छायाचित्रकाराला एखादे दृश्य, एखादी प्रकाश योजना, कुस्तीगिराला एखादी ,तगड्या पहिलवानाबरोबरची, कुस्ती आव्हानात्मक वाटू शकेल पण ती 'सेक्सी' कशी होईल? एखाद्या फर्ड्या वक्त्याचे भाषण 'संमोहित' करणारे असू शकते पण म्हणून ते काही 'सेक्सी' ठरत नाही. इथिओपियाच्या 'त्या' उपासमारीने मरणासन्न बालकाचे आणि त्याच्या मरणाची वाट पाहणार्‍या गिधाडाचे छायाचित्रही एखाद्याला संमोहित करेल अशा ताकदीचे होते पण ते 'सेक्सी' नव्हते. 'धुंदावणारे' 'वेडे करणारे' ('वेडावणारे' नाही. त्यात एकाने दुसर्‍याला 'वाकुल्या' दाखविणे अभिप्रेत आहे) निसर्गात खुप काही आहे. पावसाळ्यातील हिरवागार निसर्ग, थंडीत धुक्यात लपेटलेला परिसर, मस्त मातीचा सुगंध, फुलांचा सुगंध 'धुंदावणारा' असू शकतो. व्याख्येतील 'सेक्सी म्हणजे मादक, कामोत्तेजीत करणारे' असा थेट अर्थ घेतला तर ती एक भावना असल्याकारणाने सर्वांसारखी समान असू शकत नाही. ती २ +२ = ४ इतकी रुक्ष, व्यावहारीक नसते. व्यक्तीगणिक बदलणारी असते. पुरुषाला स्त्री आणि स्त्रिला पुरुष 'सेक्सी' वाटणे नैसर्गिक आहे. (पुरुषाला पुरुष आणि स्त्री ला स्त्री 'सेक्सी' वाटू शकते पण तो वेगळा आणि गहन विषय बाजूला ठेऊ या.) पुरुषांच्या 'सेक्सी' स्त्री बद्दलच्या कल्पनांमध्ये स्त्रियांच्या अनेकविध वैशिष्ट्यांचा समावेश असतो. सुंदर चेहरा, गोरा रंग, प्रमाणबद्ध-बांधेसूद शरीर, आवाजातील गोडवा, उंची, चालण्याची, बोलण्याची लकब इ.इ.इ. सर्वसाधारण बाबी असल्या तरी व्यक्तिमत्त्वातील 'चुंबकिय आकर्षकता' (Magnetism) ह्याचीही प्रखर भूमिका 'सेक्सी' शब्दात सामावलेली आहे. एखाद्याला सावळा रंग, किंचित घोगरा आवाज, मादक डोळे, हाताचे थंडगार तळवे, काहीही उद्दीपित करू शकतात. त्याच्यासाठी त्या एका वैशिष्ट्यासाठी ती स्त्री 'सेक्सी' वाटत असते. काही जणांना ऐश्वर्या राय 'सेक्सी' वाटते तर काही जणांना सुश्मिता सेन तिच्या आकर्षकतेमुळे 'सेक्सी' वाटते. माधुरी तिच्या अदांमुळे 'सेक्सी' वाटते तर हेलन तिच्या कॅब्रे मुळे 'सेक्सी' ठरायची. व्यक्ती तितक्या प्रकृती आणि आपापल्या प्रकृतीला झेपतील अशा 'सेक्सी'पणाच्या कल्पना.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकरांचा प्रतिसाद जास्त प्रगल्भ वाटतोय!!... रच्याकने, मला तर बॉलिवुड'मध्ये 'कल्की कोलचीन' जास्त सेक्सी वाटते!!! ;) ;) ;) उगीच का अनुराग'सारख्या काश्यप'कुलवन्शीयाने ती'स आपली धर्मपत्नी बनविले!!! ;) =)) =)) =))

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकर जी, वरती मी जो लेख उधृत केला आहे, त्याचे लेखक आहेत - नाओम श्पॅन्सर - मानसशास्त्राचे एक प्राध्यापक. त्यांनी स्वतः जालावरील "त्यांना" सेक्सी वाटणार्‍या कलाकृतींचा मागोवा घेतला आहे. यामध्ये त्यांनी सारा बरस या नर्तकीचे नृत्य उल्लेखिले आहे. तिच्या हातांच्या "एलेगंट" (सुडौल) हालचाली आणि विशेषतः तिने नृत्यसमयी हाती घेतलेला गुलाब. "त्यांच्या मते" तिचे नृत्य सेक्सी आहेच. पण ते हा प्रश्न करतात की गुलाबाहून सेक्सी काय असू शकते? आता बोला. या लेखात त्यांनी जी जी उदाहरणे दिलेली आहेत ती याच वस्तुस्थितीकडे अंगुलीनिर्देश करतात की या शब्दाचा अर्थ कामोत्तेजना इतका कोता नसून त्याची व्याप्ती अधिक आहेच पण त्याहूनही एक सुंदर वस्तुस्थिती मला जाणवली ती ही की - कलाप्रियता आणि संवेदनशीलता यांच्या बेमालूम मिश्रणातून खूप उत्तम कलाकृती आपल्याला मानसिक पातळीवर "सेक्श्युअली अपील" होत असतात. आपल्याला ते जाणवतं अथवा नाही हा भाग अलाहिदा.

In reply to by शुचि

शुची जी, मी जो लेख उधृत केला आहे, त्याचे लेखक आहेत - नाओम श्पॅन्सर - मानसशास्त्राचे एक प्राध्यापक. त्यांनी स्वतः जालावरील "त्यांना" सेक्सी वाटणार्‍या कलाकृतींचा मागोवा घेतला आहे. संपला विषय. एखाद्या मानसशास्त्राच्या प्राध्यापकाने केलेली विधाने खोटी ठरविणारा मी कोण? मिपाकरांना काय "सेक्सी" वाटते ते जाणून घेण्यास आवडेल. ह्या वाक्याने माझी फसगत झाली. फक्त मिपाकरांनाच काय पण, एकूणात पुरुषजातीला काय 'सेक्सी' वाटत असेल, ह्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न माझ्या कुवती नुसार मी केला. अर्थात, मानसशास्त्राच्या प्राध्यापकासमोर माझ्यासारख्या शरीरशास्त्राच्या अभ्यासकाच्या मतांना कोण विचारतो? जाऊ दे.

In reply to by प्रभाकर पेठकर

नाही नाही. आपण म्हणालात तेच त्यांनीही म्हटले आहे. २+२=४ अ॑से गणित येथे लावता येत नाही. ही भावना असल्या कारणाने मूल्यमापन करता येत नाही. आपला प्रतिसाद प्रगल्भ आहेच आहे. त्या प्राध्यापकानेदेखील हेच म्हटले आहे की ही निसरडी व्याख्या उदाहरणांच्या द्वारे मांडायचाअल्पसा॑ प्रयत्न ते करत आहेत. (The following is a sampling of sexy web finds: clips of art, dance, film and music that capture-for me-the slippery, intoxicating essence of what sexy is.)

In reply to by शुचि

शेवटी ठुमकते शरीर असो किंवा त्याला मिळालेली अमूर्त गोष्टींची जोड असो, आरूनफिरून सेक्श्युअली अपील होण्यापर्यंतच गाडी आली ना? विषय कट. सेक्स म्हणजे या ना त्या प्रकारे कामोत्तेजना होणे हाच ढोबळ आशय तुमच्या प्रतिसादावरून जाणवतो आहे. पेठकरकाका तरी यापेक्षा वेगळे असे काय म्हणाले?

In reply to by प्रभाकर पेठकर

पुरुषाम्च्या बाबतीत सेक्सी की काय ते कसे ठरवायचे? शोलेतला राकट अमजद खान सेक्सी ठरतो का? सलमान खानप्रमाणे बर्‍याच चित्रपटातला उघडावाघडा हरीष पटेल सेक्सी ठरतो का? नाजूक चणीचा शाहीद कपूर सेक्सी ठरतो का? देखणा दिसणारा फिरोज खान सेक्सी ठरतो का? बुलंद गडगडाटी आवाजाचा अमरीश पुरी सेक्सी ठरतो का? स्लीम देव आनंद /ढोल्या राजकपूर / सदैव गंभीर दिलीप कुमार/ चौकोनी ठोकळा विश्वजीत यापैकी कोणाला सेक्सी म्हणता येईल?

अविनाश कु. श्रिराम दिवट आदि मान्यवरान्च्या प्रतिक्शेत . :-) अनसेक्सि स्पा

In reply to by स्पा

अविनाश कु. श्रिराम दिवट आदि मान्यवरान्च्या प्रतिक्शेत या प्रतिसादावरुन 'कुणाच्यातरी पंचांगात बारा महिने भाद्रपद' असा मागे एक वाचलेला शेरा आठवतो. तो आठवून हंसू आले. बाकी 'कुणाला काय सेक्सी वाटेल ते आजकाल सांगता येत नाही ,' हे निरीक्षण नोंदवतो.

In reply to by तिमा

बाकी 'कुणाला काय सेक्सी वाटेल ते आजकाल सांगता येत नाही ,' हे निरीक्षण नोंदवतो.
हाहा ..... खाली संजयजींनी म्हटले आहेच आजकाल मुली काहीही सेक्सी म्हणतात. काय सेक्सी चहा आहे वगैरे =)) मी कवाची त्यावरून हसतेय.

उदाहरणार्थ - कोका कोलाची जाहीरात आणि त्यामधील हसरी अन अतिशय बांधेसूद तरुणी, विशेषतः पार्श्वभूमीवरील होकारार्थी उद्गार-
ते होकारार्थी उद्गार म्हणजे खरेतर एका प्रसिद्ध वन लाइनरची कमाल आहे. "Sex is not the answer. Sex is the question. 'Yes' is the answer."

पुढच्या कट्ट्याला हा विषय झीरो अवरला चर्चिला जावा अशी मागणी करत आहे. मला खात्री आहे की २ - ४ पेग्जनंतर अश्या प्रतिक्रिया यायला लागतील की एक ग्रंथ छापायला लागेल ! 'सेक्सी' म्हणजे काय हे असं शब्दांत मांडण्यासारखं नाही हो शुचितै ! उगाच एक विचारचक्र सुरू केलंत. छ्या... कुठून हा धागा वाचायला घेतला... आत वाचनखुण मारावी लागणार ! ;) जे पी

जुन्या जमान्यातील हुमाखान, बिंदु, सिल्क स्मिता,हेलन्,जयश्री टी,मेडोना,समंताफॉक्स पासुन ते अलिकडील माधुरी,काजोल, मिनाक्षी श्रीदेवी, मनिषा,केतरीना, प्रियांका पर्यंत ब-याच जणी मला सेक्सी वाटत आल्या आहेत. माझा मुड चांगला असतो तेंव्हा ब-याच गोष्टी मला सेक्सी दिसतात आणि मुड खराब असेल तेंव्हा ब-याच सेक्सी गोष्टीं कडे बघुन मुड चांगला बनवतो. ;-)

In reply to by jaypal

>>माझा मुड चांगला असतो तेंव्हा ब-याच गोष्टी मला सेक्सी दिसतात आणि मुड खराब असेल तेंव्हा ब-याच सेक्सी गोष्टीं कडे बघुन मुड चांगला बनवतो. Wink शीक्रेटं अशी उघडत नका जाऊ हो जैपालभौ ;)

बर्‍याच उद्बोधक चर्चेनंतर आता काही चित्रे बघुया: या ललनांना हे बालक 'सेक्सी' वाटते, असे म्हणावे काय? William-Adolphe Bouguereau (1825-1905) - Admiration (1897) आणि या बालकांना एकमेकांविषयी वाटणार्‍या आकर्षणाला काय म्हणायचे? William-Adolphe Bouguereau (1825-1905) - Young Woman Contemplating Two Embracing Children (1861) कामुकतेपेक्षाही ही चित्र त्यातील कलागुणां मुळे जास्त भावतात:(Amadeo Modigliani ची चित्रे) द्रौपदी वस्त्र-हरणाचा ग्रीक अवतार ? Jean-Léon Gérôme, Phryne revealed before the Areopagus (1861) प्राचीन रोम मधे बोली लावून अशीही खरेदी करता यायची : Jean Leon Gerome Selling Slaves in Rome देरे कान्हा...चोळी अन लुगडी (पहाडी शैली): फ्रेंच चित्रकार Jean Jacques Henner याचे एक म्युझियमच आहे, त्याची दोन चित्रे: (सर्व चित्रे विक्कीमिडियावरून साभार).

In reply to by चित्रगुप्त

"प्राचीन रोममधील बोली" चित्रातील रूपगर्विता आवडली. कांती, केसांचा रंग, शरीराची पुष्टता सर्वच. खालील प्रेक्षकवर्गातील खळबळ पाहता ती निर्विवाद सौंदर्यवती आहे असे वाटते. - हे माझे, सर्वसामान्य व्यक्तीचे मत. आपल्यासारख्या ज्येष्ठ (मानाने) चित्रकाराचे मत वेगळे असू शकेल.

In reply to by चित्रगुप्त

वरची दोन बालकांची चित्रे आणि त्यावरच्या प्रतिक्रिया तद्दन अनावश्यक आणि चुकीच्या वाटल्या.

In reply to by परिकथेतील राजकुमार

...वरची दोन बालकांची चित्रे आणि त्यावरच्या प्रतिक्रिया तद्दन अनावश्यक आणि चुकीच्या वाटल्या... त्या दोन चित्रांविषयी मी जे प्रश्न उपथित केले आहेत, त्यांची माझ्यामते उत्तरे अशी आहेतः १. या ललनांना हे बालक 'सेक्सी' वाटते, असे म्हणावे काय? उत्तरः नाही. त्रिवार नाही. २. आणि या बालकांना एकमेकांविषयी वाटणार्‍या आकर्षणाला काय म्हणायचे? उत्तरः काहीही म्हणू नये. बर्‍याच गोष्टी शब्दात व्यक्त करता येण्याजोग्या नसतातच मुळी. अश्या उहापोहात पडण्याऐवजी चित्राच्या सौदर्‍याचा आस्वाद घ्यावा.

In reply to by चित्रगुप्त

त्या दोन चित्रांविषयी मी जे प्रश्न उपथित केले आहेत, त्यांची माझ्यामते उत्तरे अशी आहेतः १. या ललनांना हे बालक 'सेक्सी' वाटते, असे म्हणावे काय? उत्तरः नाही. त्रिवार नाही. २. आणि या बालकांना एकमेकांविषयी वाटणार्‍या आकर्षणाला काय म्हणायचे? उत्तरः काहीही म्हणू नये. बर्‍याच गोष्टी शब्दात व्यक्त करता येण्याजोग्या नसतातच मुळी. अश्या उहापोहात पडण्याऐवजी चित्राच्या सौदर्‍याचा आस्वाद घ्यावा.
दोन्ही उत्तरे जर नाही अशी असतील तर मग ही चित्रे इथे टाकण्याचे प्रयोजनच काय ? आणि मुळात चित्रे टाकताना तुम्ही फक्त प्रश्नच विचारलेले आहेत, त्या चित्रांना विरोध झाल्यावरती तुम्ही उत्तरे घेऊन हजर झालात. लेखकाने स्वतः, अथवा त्यांना शक्य नसल्यास संपादकांनी प्रतिसादात योग्य तो बदल करावा. अशी चित्रे टाकून विनाकारण वाद माजणे योग्य नाही.

In reply to by परिकथेतील राजकुमार

Amadeo Modigliani ची पेंटीग्ज सोडली तर बाकी सगळी पेंटीग्ज एकसोएक आहेत. अत्यंत नजाकतीनं रेखाटली आहेत आणि सर्वांच्या चेहेर्‍यावर निरागसता आहे. चित्रगुप्त कलाकार आहेत त्यामुळे न्यूडिटी बद्दल त्यांचा दृष्टीकोन व्यापक आहे, त्यांचा प्रतिसाद थोडा हुकला असला तरी ते नाऊमेद होऊ नयेत असं वाटतं.

In reply to by चित्रगुप्त

१. या ललनांना हे बालक 'सेक्सी' वाटते, असे म्हणावे काय? उत्तरः नाही. त्रिवार नाही.
मग, तुमच्या मते त्यांना त्या बालकाबद्दल काय वाटत आहे, किंबहुना त्या सगळ्या स्त्रीयांचे नक्की काय चालले आहे, असे तुम्हाला वाटते, ह्याविषयी काही लिहा की? (का 'द स्क्रीम' प्रमाणे हेही काही अति तरल, गूढ वगैरे आहे?)
२. आणि या बालकांना एकमेकांविषयी वाटणार्‍या आकर्षणाला काय म्हणायचे? उत्तरः काहीही म्हणू नये. बर्‍याच गोष्टी शब्दात व्यक्त करता येण्याजोग्या नसतातच मुळी. अश्या उहापोहात पडण्याऐवजी चित्राच्या सौदर्‍याचा आस्वाद घ्यावा.
महा भंपक उत्तर. कसले घंटा सौंदर्य आहे त्या चित्रात? अगदी गुळगुळीत तर्‍हेने सगळे चितारले आहे. माझी वरील दोन्ही प्रश्नांना उत्तरे अशी आहेतः १. होय. २. बालसुलभ कुतुहल.

In reply to by प्रदीप

+१ 'कसले घंटा सौँदर्य त्या चित्रात? अगदी गुळगुळीत तर्हेने सगळे चितारले आहे' ही दोन वाक्ये सोडून बाकी सर्व प्रतिसादाशी सहमत.

In reply to by प्रदीप

सौंदर्याचा नवीन प्रकार कळाला... "घंटा सौंदर्य" म्हणुन तर मिपा आवडते आपल्याला. अर्धवटराव

In reply to by प्रदीप

@ ... कसले घंटा सौंदर्य आहे त्या चित्रात? अगदी गुळगुळीत तर्‍हेने सगळे चितारले आहे.... .... अगदी गुळगुळीत तर्‍हेने रंगवलेल्या चित्रांत सौंदर्य खरोखरच नसते, तर ते कुणालाही जाणवले नसते, जसे खरोखरच्या दाट अंधारात कुणालाही दिसत नाही... बाकी कुणी डोळे मिटून म्हणत असेल की मला दिसत नाही, तर त्याला एवढेच म्हणू शकतो, अरे बाबा डोळे तर उघड. ...आधुनिक कलेच्या प्रादुर्भावापासून असा प्रचार केला गेला, की त्यापूर्वीची सर्व कला ही हीन दर्जाची होती, आणि आधुनिक कलाच काय ती खरी कला होय.... याउलट पूर्वीची यथातथ्य चित्रणाची कला हीच श्रेष्ठ कला, आधुनिक कला म्हणजे भ्रष्ट, बेगडी, विकृत कला, अश्या दुसर्‍या टोकाचा प्रचारही केला जातो. ... अश्या प्रकारच्या सर्व प्रचारांमागे काही विशिष्ट लोकांचे (मुखत्वेकरून आर्थिक-) हितसंबंध गुंतलेले असतात. उदा. ज्यांनी अमूक एका प्रकारची कला विकत घेऊन ठेवण्यात पैश्यांची गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर केलेली असते असे लोक, त्या -त्या कलेचे 'डीलर' व कलावंत, असा सर्व कंपू त्या प्रकारच्या कलाकृतींची किंमत नेहमी चढती राहून फायदा मिळवता यावा, म्हणून अनेक हिकमती योजून त्या कलेचा प्रचार करत असतात. एकाअर्थी यातून अनेक कलावंत, समीक्षक, विद्वान इ. त्यांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीत्या खरीदून ठेवलेले असतात, असे म्हणता येईल. कुणाला काय आवडावे वा आवडू नये, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक मामला असला, तरी आपल्या बहुतांश आवडीनिवडी व मते ही कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या प्रचारातून, जाहिरातबाजीतून हेतुतः निर्माण केली गेलेली असतात, हे थोडेसे आत्मपरिक्षण केल्यास ज्याचे त्याला कळून यावे. अमूक एका प्रकारची चित्रे, संगीत, साहित्य इ. एकाद्याला आवडावे, यात वावगे काहीच नाही, परंतु यामुळे आपण अन्य प्रकातील सौंदर्‍यानुभूतींना वंचित होतो, हेही खरे. मला स्वतःला प्रगैतिहासिक कलेपासून जगभरात केले गेलेले सर्व प्रकारचे कलाप्रयोग, सर्व प्रकारचे संगीत, हे प्रेक्षणीय-श्रवणीय वाटते. भारतीय राग संगीत ऐकतानाचे निकष पाश्चात्य संगीत ऐकताना लावू नयेत, म्हणजे झाले. तसेच 'गुळगुळीत' कलेचे निकष 'खडबडीत' कलेला लावू नयेत, अभिजात कलेचे निकष बाल-चित्रकला वा आदिवासी कलेला लावू नयेत, आधुनिक कलेचे निकष जुन्या कलेला लावू नयेत. अश्या प्रकारे ज्यात जे आहे, ते पूर्वग्रह न बाळगता बघावे, यातच सर्व कलांचे रसग्रहण करता येते.

In reply to by चित्रगुप्त

त्या दोन चित्रांच्या सौंदर्याविषयी-- त्यांच्या ट्रॅडिशनल स्टाईलविषयी-- कसलेही पूर्वग्रह माझ्या मनात नाहीत. पारंपारीक स्टाईल, अथवा आधुनिक स्टाईल, असल्या कुठल्याच कप्प्यात चित्रकला बसवू नये; किंबहुना संगीत, वाड्गमय ह्यातील काहीही अशा तर्‍हेने कसल्याही कप्प्यांत बसवू नये असे मला प्रकर्षाने वाटते. मला स्वतःला जुने हिंदी चित्रपटसंगीत खूप आवडते, त्याबद्दल मी खरे तर पॅशनेट आहे. पण म्हणून तेच तेव्हढे चांगले व आताचे सगळे वाईट्ट- वाईट्ट असा माझा भाव नसतो. मी ह्या नव्या तर्‍हेच्या संगीताशी स्वतःस 'रिलेट' करू शकत नाही, इतकेच मी त्याविषयी म्हणतो. त्याविषयी मी जहरी उद्गार काढत नाही. मला जे वाटले ते नको तितक्या तिखट शब्दांत सांगितले हे खरे. पण त्याचे कारण तुम्ही ह्या चित्रातून केवळ सौंदर्य पहा, त्यात काय चितारले आहे ह्याकडे दुर्लक्ष करा (तुमचे असे शब्द नव्हते, पण एकंदरीत भाव हा होता) असे गुळमुळीत विधान केले आहेत, ते आहे. चित्र वास्तववादी शैलीतील आहे, त्यात काहीही गूढ, अ‍ॅब्स्ट्रॅक्ट आहे असे (मलातरी) दिसत नाही, तसे ते असल्याचे तुम्ही दर्शवत नाही आहात. तरीही त्यात जी घटना आहे, त्याकडे दुर्लक्ष करा, व नुसत्या सौंदर्याचा आस्वाद घ्या, हे कशाला? खरे तर चित्र गुळगुळीत नाही, गुळ्गुळीत तुमचा त्यांच्याविषयींचा येथे दिसणारा अ‍ॅप्रोच आहे. अलिकडेच व्हिक्टोरीयन काळातील समाजाचे दर्शन घडवणारे 'Mrs. Robinson's Disgrace' हे माहितीपूर्वक पुस्तक गाजत आहे. व्हिक्टोरीयन काळातील ही एक विवाहीत स्त्री एका डॉक्टरच्या प्रेमात पडली. ह्यानंतर तिचे त्या डॉक्टरशी खरोखरीच कसलेही शारीरसंबंध आले किंवा नाहीत, ह्याविषयी नक्की माहिती नाही. परंतु तिच्या रोजनिशीत ती तशा अर्थाने बरेच काही नंतर लिहीत गेली. एकदा तिच्या नवर्‍याच्या हातात ती डायरी पडली. त्याने घटस्फोटाची मागणी केली. त्या केसच्या सुनावणीत, तिच्या रोजनिशीतील नोंदींच्या सत्यासत्यतेविषयी बरीच चर्चा झाली. खरे तसे काहीच घडले नव्हते, ती स्त्री तसे लिहून केवळ तिच्या भावनांना वाट मोकळी करून देत होती, असा युक्तिवाद केला गेला. केसचा निकाल तिच्या विरूद्ध लागला. ही खरेच घडलेली गोष्ट आहे. तेव्हाच्या काळातील युरोपातील समाज किती दबलेल्या स्थितीत होता ह्याची ह्या पुस्तकाच्या निमीत्ताने सध्या चर्चा होत आहे. तेव्हा ह्या चित्रातही त्या तशा दबलेल्या सेक्सच्या भावनांना, थोड्या विचीत्र (perverted म्हणा, हवे तर) तर्‍हेने पहिल्या चित्रातील स्त्रिया वाट करून देत आहेत का? ह्याविषयी टिपण्णीची आपल्याकडून अपेक्षा होती. अन्यथा हीच चित्रे चर्चेत कशाला? निसर्गचित्रे का नाहीत? (आणि तशी ती येथे टाकली तर त्यांचा मूळ धाग्याच्या चर्चेशी संबंध काय, हा प्रश्न येणारच!) ह्याविषयी तुम्ही मौन बाळगून आहात. तुमची गुळमुळीत उत्तरे वाचून ही चित्रे'तुम्हाला काय/कोण सेक्सी वाटते' ह्या धाग्यावर तुम्ही का टाकलीत, ह्या परिकथेतील राजकुमार ह्यांनी सरळ विचारलेल्या प्रश्नाचे तुम्ही काहीही उत्तर देत नाही. इथेही तुम्ही ह्या चित्रांच्या विषयींच्या तुमच्याच प्रश्नांना ह्यात सेक्सचा संबंध नाही असे सुचवताहात. एकंदरीत ह्यावरून मला जी. एं. च्या एका कथेतील एका गुर्जीची आठवण आली. ते रस्त्यात दुरून दिसतांच कथानायक आक्रसून जातो. कारण आता ते आपणांस रस्त्यात पकडणार, भवतालाच्या बकाल वास्तवातूनही, डोळ्यातून टिपे काढत, चमचाभर मांगल्य काढणार, ... हे त्याला जाणवले.

In reply to by प्रदीप

या किंवा अन्य धाग्यात मी जे चित्रमय प्रतिसाद देत असतो, त्यांचा मुख्य हेतु वाचकांच्या नजरेखालून विविध चित्रे जावीत, हा असतो. याचे कारण लहानपणापासून आपल्या कानावर विविध प्रकारचे संगीत पडत असल्याने संगीताविषयी बर्‍यापैकी जाण आपल्यात असते, तसे चित्रकलेकलेविषयी मात्र होताना दिसत नाही. चित्र दिसले, तरी त्यातील कलागुण वा सौंदर्य बघण्यापेक्षा बरेचजण त्यातील अर्थ शोधणे वगैरे उहापोहात अडकतात... 'चित्रे बघायला मिळणे' या हेतुमुळे धाग्याच्या विषयाशी बादरायण संबंध असलेली चित्रे सुद्धा मी देत असतो. बाकी या दोन्ही चित्रांच्या निर्मितीमागे कलावंताची काय कल्पना होती, वगैरे त्याने लिहून ठेवलेले असल्यास कळू शकेल.(असे लेखन मिळाल्यास कळवावे) अन्यथा ज्याची-त्याची कल्पना. या धाग्यात 'सेक्सी' या शब्दाच्या अनेक अर्थछटा सांगितल्या गेल्या आहेत. त्यापैकी आकर्षक, प्रेक्षणीय, सुंदर इ.इ. अर्थाने ते बालक त्या स्त्रियांना 'सेक्सी' वाटते आहे, असे म्हणू शकतो, परंतु त्याला बघून त्या कामातुर झाल्या असल्याचे चित्रकाराला दाखवायचे आहे, असे मलातरी वाटत नाही. दुसर्‍या चित्रातील दोन बालके ही दैवी बालके आहेत की मानवी वगैरे जरा शोध घ्यावा लागेल... त्यातून उलगडा होइल. तुम्ही दिलेले 'बालसुलभ कुतुहल' हा विषय सुद्धा चित्रकाराच्या मनात असू शकतो.

In reply to by चित्रगुप्त

>>>>मी जे चित्रमय प्रतिसाद देत असतो, त्यांचा मुख्य हेतु वाचकांच्या नजरेखालून विविध चित्रे जावीत, हा असतो. मला आपण डकवलेली चित्र आवडतात. सौंदर्य कलागुण चित्रातुन कसे व्यक्त होतात ते मला समजुन घेण्यास आपले प्रतिसाद मदतही करतात. आपण चित्र डकवीत राहावे. आपले मन:पूर्वक आभार. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

...आपण चित्र डकवीत राहावे.... हा प्रतिसाद मला नवनवीन चित्रे हुडकून इथे देण्यास प्रेरणा देत राहील. धन्यवाद.

In reply to by चित्रगुप्त

वॉशिन्ग्टन डीसी च्या " नॅशनल म्युझीअम ऑफ अफ्र्रीकन आर्ट " ह्या म्युझीअम मधल्या एका दालनात अशीच चित्र प्रदर्शनाला ठेवलि आहेत ,फक्त फोटो काढन्यास मनाई आहे . पण मला त्या चित्रांमध्ये प्रत्येक स्त्रीच्या चेहेर्‍यावर अगतिकपणा दिसला :( सेक्सी नाहि वाटले .