Skip to main content

तुम्हाला काय /कोण सेक्सी वाटते

लेखक शुचि यांनी गुरुवार, 21/06/2012 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
इन्टरनेटमुळे नजर जवळ जवळ मेल्यासारखीच झाली आहे. नानाविध, अनसेन्सॉर्ड फीती, छायाचित्रे जालावर मुबलक उपलब्ध असतात. अशा काळात "सेक्सी" म्हणजे काय याचा उदाहरणासहीत उहापोह करणारा हा लेख नक्कीच वाचनीय आहे. जरी हा अमेरीकन लोकांच्या दृष्टीकोनातून लिहीलेला असला तरी काही उदाहरणे विलक्षण कातील आहेत. उदाहरणार्थ - कोका कोलाची जाहीरात आणि त्यामधील हसरी अन अतिशय बांधेसूद तरुणी, विशेषतः पार्श्वभूमीवरील होकारार्थी उद्गार-
From May 30, 2012
याच लेखामधील, दुसरे मला आवडलेले उदाहरण एका नर्तकीचे (सारा बरस)आहे जिची चित्रफीत खाली डकविली आहे. काही फोटो (मॅन्स शॅडोज) अप्रतिम आहेत. मिपाकरांना काय "सेक्सी" वाटते ते जाणून घेण्यास आवडेल. इतके वाईन, दारु, धर्म, राजकारण, प्रेम सगळे विषय बोलतो मग याच विषयाने काय घोडे मारले आहे ;) माझ्यापासून सुरवात करते - (१) मला स्त्रियांची चित्रे (पेंटींग्ज्स), पोर्टेट्स (खरी छायाचित्रे नाही) अतिशय आवडतात. जालावर अशी चित्रे पहात असताना मी जवळ जवळ संमोहीत होते. (२) "प्रेटी वूमन" मधील "रिचर्ड जेरे" चा संयत अभिनय मला सेक्सी वाटला. (३) "साहब-बीवी और गुलाम" मधील मीना कुमारीची गाणी व गाण्यातील अभिनय शृंगार आदि, नाईट्स इन व्हाईट सॅटीन-मूडी ब्लूज, सजना है मुझे सजना के लिये - सौदागर वगैरे काही गाणी खूप आवडतात, सेक्सी वाटतात.

वाचने 197653
प्रतिक्रिया 347

प्रतिक्रिया

या धाग्यावर स्त्रिया प्रतिसाद देत नाहीयेत, कारण १. महिला अतिशय हुषार असतात. कुठे गप्प राहिलेलं फायद्याचं आहे हे आम्हाला आधी कळतं. अगदी महिलांचे डु आयडी घेतलेले पुरुष सदस्य सुद्धा या धाग्यावर प्रतिसाद देत नाहीयेत यावरून ग्यानबाची मेख समजून घ्या. २. आपल्या मनात काय आहे हे गावभर बोंबलून कशाला सांगा? विशेषतः जेव्हा एखाद्या स्मितहास्याचा वापर करून आपली कामं होत असतील तर "तुझ्यात काय नाही "हे सांगून आपल्या पायावर धोंडा पाडून का घ्या? ३. महिलांना सर्वात उत्तम गोष्टीचा ध्यास असतो. सेक्सी वाटतं म्हणा हवं तर. मग सुपरमॅन आणि रजनीकांत यांना पाहिल्यानंतर आणखी कोणी सेक्सी कसा वाटेल?

In reply to by पैसा

या प्रतिसादाबद्दल पैसातैंचे पुरुष सदस्यांच्या वतीने विशेष आभार. याच मुद्द्यावर महाविद्यालयीन जीवनात असलेल्या आमच्या समजांवर जरा लिहितो... अभ्यासाकडे लक्ष देणारे, शिस्तीत राहून प्रात्यक्षिके व वर्गात उपस्थित राहणारे, मुलींशी बोलताना जरा अंतरावरून बोलणारे तरुण मुलगे मुलींना अजिबात आवडत नाही. त्यांचा उपयोग फक्त अभ्यासासंबंधित मदत मिळवण्याकरिता होतो. प्रात्यक्षिक व वर्गात अनुपस्थित राहून बाहेर चकाट्या पिटणारे, एखादेवेळी वर्गात आलेच तर उशिरा येऊन मागच्या रांगेत बसणारे, भडक कपडे घालणारे, दाढीचे खुंट वाढवणारे, शिवराळ भाषा वापरणारे व बहुतांश वेळा फुकाडे असे तरुण मात्र मुलींना फार आवडतात. आता आम्ही समजायचो कारण डोळ्यासमोर तशी उदाहरणे दिसायची. आता यामागची मुलींची मानसिकता कुणी समजावून सांगणार असेल तर बरे होईल.

In reply to by शिल्पा ब

उत्तर एकदम पर्फेक्ट आहे. गंमत अशी आहे की पुढे जाऊन याच मेंगळट मुलांचा लग्नाच्या बाजारातला भाव एकदम वधारलेला असतो.

In reply to by शिल्पा ब

प्रत्येक स्त्रिला मित्र म्हणून सलमान खान आणि घरात नवरा म्हणून अमोल पालेकर हवाय आणि पुरुषाला मैत्रिण म्हणून मल्लिका शेरावत आणि स्वत:ची पत्नी नूतन हवीये. एकही माईका लाल स्वत:च्या बायकोला तूच माझी वहिदा म्हणत नाही आणि स्वत:च्या पतीला कुणी अमिताभ होऊ देत नाही. हे काय गणित आहे असा सवाल आहे!

In reply to by संजय क्षीरसागर

हेच म्हणायचे होते पण व्यवस्थितपणे मांडता आले नाही. बादवे -सर्व अभ्यासू मुलांतर्फे गरजेच्या वेळी वापर करून घेणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध....! ;-). (कोल्ह्यांना द्राक्षे आंबट ;-))

In reply to by संजय क्षीरसागर

पण उदाहरण तेव्हढं कसंनुसं वाटलं... मला मैत्रीण म्हणुन देखील मल्लीकाबाई चालणार नाहि... आणि नुतनसारखी बायको मिळणार असती तर मी लग्नच केलं नसतं :) अर्धवटराव

In reply to by टवाळ कार्टा

>>पण मी मेंगळट नव्हतो (आणि आताही नाही)....मग??? हे स्वतःहून सांगायची गरज का पडावी? बादवे - मेंगळट असण्याचेही बरेच फायदे असतात बरं का. जसे कुणी अवाजवी अपेक्षा वगैरे ठेवत नाही. अवांतर - यावरून अक्षय -प्रिती -सलमान यांचा जानेमन नावाचा टुकार चित्रपट आठवला.

In reply to by श्रीरंग_जोशी

मुलीना डॅशींग मुलं आवडतात ... डेअरींग लागतं हो एवढ सगळं करायला ... ;) नाहितर ते पूस्तकी कीडे काय कामाचे?? फक्त सबमिशनच्यावेळी काय तो त्यांचा उपयोग होतो :P

द टॉक अमेरिकन दूरचित्रवाणीवरील एका चर्चाविषयक कार्यक्रमात मॅडोनाच्या नव्या कारनाम्याबद्दल चर्चा करण्यात आली. गेल्याच आठवड्यात इस्तंबूल येथे मॅडोनाचा कार्यक्रम झाला. ती तिच्या वयाला शोभेल असे वागत नाहीये असा सूर होता चर्चेचा...

एक शेर आहे. ना सुरत है, ना सीरत है, ना दौलत है, ना ताकत है, तुममे ऐसा क्या है जो तुमसे जलेगा कोयी. 'से जलेगा' ऐवजी 'पे मरेगा' ही चालेल. बाकी सेक्सी कोण/काय वाटेल हे शब्दात सांगता येण अवघड आहे. तरी प्रयत्न करते. फिजिकल ब्युटी मैटर्स. रेखिव फिचर्स, प्रमाणबद्ध बांधा (जाड नको बारीक नको बॉडी बिल्डर हि नको), डोळ्यात प्लिजंट/अप्रोचेबल भाव हवा, वागणे जंटलमनली हवे (despo, childish, arrogant behaviour strict NO) मला केटरिना आवडते आणि अँजेलीना जोली ही आवडते. दिपिका, ऐर्श्वया, प्रियंका, मधुबाला, मेर्लिन, जे लो, स्कारलेट नाही आवडत. एलिझाबेथ टेलर, क्रिस्टन, कैरा, वाहीदा रेहमान आवडतात. अक्षय, अर्जुन, जॉन अब्राहम आवडतात आणि टॉम क्रुझ, ओरलँडो, मेथ्यू ही आवडतात. पीट, रिचर्ड, हेरिसन, लिओनाद्रो, सनी देवल, हाशमी, शाहरुख, सलमान, आमीर नाही आवडतात.

In reply to by एमी

>> एक शेर आहे. ना सुरत है, ना सीरत है, ना दौलत है, ना ताकत है, तुममे ऐसा क्या है जो तुमसे जलेगा कोयी. 'से जलेगा' ऐवजी 'पे मरेगा' ही चालेल. धाग्याच्या विषयावर वेगळ्या कोनाने विचार केला तर काही उदाहरणे डोळ्यासमोर आली. शाळा, महाविद्यालय, कार्यालय या सर्व ठिकाणी चारचौघात उठून दिसणारी काही थोडकीच व्यक्तिमत्त्वे असतात. त्यांची खालील वैशिष्ट्ये असू शकतात १. नीटनेटके कपडे व मेक-अप २. सकारात्मक देहबोली ३. वागण्या बोलण्यातली शिस्त ४. चेहऱ्यावर अचूक असे भाव ५. कमालीचा आत्मविश्वास असे लोक लिंगनिरपेक्षरित्याही इतरांना संमोहित करू शकतात. उदा. काही यशस्वी डॉक्टर, कार्यालयातील मोठ्या पदावरील लोक, मनुष्यबळ विकास विभागात काम करणारे, शाळा / महाविद्यालयात शिकवणारे विद्यार्थीप्रिय शिक्षक / शिक्षिका वगैरे. त्यांच्यापासून संमोहित होणाऱ्यांना आतून असे वाटत असते की जर आपणही असे बनलो तर? अनेक लोकांना अश्या लोकांशी कुठल्याही कारणाखेरीज एखादवेळेस संवाद साधावा वाटतो.

In reply to by एमी

अजून थोडे... आधीच छान दिसणार्या मुलांना क्लिनशेव्ह किँवा दाढीमिशी ऐवजी अनशेव्हड लूक छान दिसतो. छोटी छोटी दाढीमिशी एकदम सेक्सी. मला simbi/law clg road वर छान दिसणारे मुलं मुली सिगरेट पिताना (दुरुन पहायला) खूप सेक्सी वाटतात. छान वासाची सिगरेट असती तर जवळुनही आवडले असते.

In reply to by एमी

>>छान वासाची सिगरेट असती तर जवळुनही आवडले असते. जसे सात्विक कोंबडी मिळाली असती तर श्रावणातही खाल्ली असती ; -). पाहुणेतै - असं नाही वाटत का या प्रकारच्या भ्रामक कल्पनांमुळे सरळमार्गी असणारे तरुण - तरुणी नशापाण्याच्या आहारी जातात.

In reply to by श्रीरंग_जोशी

:) मी फक्त मला काय सेक्सी वाटते ते सांगितलं... मला सेक्सी वाटते म्हणुन कोणी सिगरेट पित नाही...आणि इतरांना नशेच्या आहारी गेलेत असे वाटु नये म्हणुन कोणी सिगरेट पिणे सोडत नाही...

In reply to by मृत्युन्जय

हि प्रतिक्रिया वाचा. आपल्या भाषेत, क्रियापदांचे प्रत्यय बदलतात की कर्त्याच्या लिंगाप्रमाणे.

In reply to by एमी

अजुन थोडं १. खाली लिहल्याप्रमाणे मुलीँचे collar bones, मुलांचे strong jaw line, हनुवटी वरची खळी २. मुलांचे गळ्याचे हाड. शब्द???...(Rajit kapoor) ३. घोगरा आवाज (Arjun Rampal) ४. muscular पाठ आणि खांदे इतर काही गुण मुलांसाठी १. गिटार वाजवत बॉलीवूड रोमँटीक/sad गाणी म्हणणे २. स्वयंपाक करणे आणि मुलीला आग्रहाने खाऊ घालणे ३. मुलगी काय म्हणतेय ते लक्ष देउन ऐकणे आणि समजून घेणे. (not interupting n jumping to conclusions) ४. मुलीला मनापासुन आणि खळखळुन हसवणारी मुलं (P G Wodehouse)एकदम सेक्सी. sense of humour is very tricky quality. sarcasm n personal nasty coments is NOT soh.

In reply to by प्रेरणा पित्रे

हा हा हा मला जंगल मधला फरदिन आणि सोल्जर मधला बॉबी पण सेक्सी वाटतो... बाकी कालच The Girl With The Dragon Tattoo वाचुन झालं...त्यामुळे सध्या मला Lisbeth प्रचंड सेक्सी वाटतेय...

In reply to by प्रेरणा पित्रे

The Peacemaker मधली निकोल किडमन. अ‍ॅग्रेशन आणि डॉमिनन्स मुळे अपील होते. (खतरा मराठी सेन्टेन्स झाले आहे हे ;-)) गिरीजा ओक (या गाण्यात) सोज्वळ दिसते. म्हणूनच सेक्सी वाटते. ये हे प्रेम मधली प्रीती जांगीयानी... बरीच मोठी यादी आहे.. धागा खाली गेला असे वाटले की प्रतिसाद दिला जाईल. ;-)

In reply to by मोदक

हम्म्म The Peacemaker पाहीला नाही पण निकोल च्या डोळ्यांचा रंग खूपच सेक्सी आहे. आणि Sebastian Vettel, Jude Law च्या डोळ्यांचा रंग पण खूप सेक्सी. आणि आक्रमकता, वर्चस्व पहायच म्हणलं तर मला टर्मिनेटर २ मधली Linda Hamilton खूप सेक्सी वाटली. अजुन येउदेत सावकाश...

In reply to by मोदक

अरे हो केज आणि क्लूनी पण आवडतात की मला (एवढी मोठी यादी आहे की त्या यादीत कोण कोण आहे ते पण विसरुन जाते) ब्रॉसनन आधी एका प्रतिसादात आलाय. हा जो क्लूनी आहे ना त्याच्याकडे पाहीलं की वाटतं 'मूर्ख/बावळट/वेँधळट सारखा काही घोळ घातला आणि हतबल होऊन त्याच्याकडे गेलो तर तो एक छानशी smile देईल डोक्यावर दोन तीनदा pat करेल आणि अगदी सहजपणे matter आपल्या हातात घेईल आणि लगेच सगळं ठीक होईलं' एकदम pleasant, approachable, dependable, mature, intelligent gentleman : - )

In reply to by एमी

ब्रॅड पीट पण तसाच वाटत असावा... फक्त तो क्लूनी सारखा pat करताना खट्याळपणे आणखी बरेच काहीतरी करेल असे वाटते... ;-) La Isla Bonita वाल्या Alizee ची सर कशालाही नाही. स्वतः Alizee... पाय संयतपणे थिरकवणारा तो ठेका.. ते गाणे व त्याचा अर्थ. जबराट आहे सगळे.

In reply to by मोदक

नाय पीटोबा नाय आवडत मला पण जोली खूप आवडते आणि तिचा पहीला नवरा पण खूप सेक्सी होता. music आणि गाणी ची फारशी आवड/जाण नाही मला. तशी मी जरा अरसिकच आहे. पण i understand music can giv high/kick. बादवे रेखाच्या व्हटावरचा तीळ नकलीच असला तरी जाम सेक्सी आहे.

In reply to by एमी

शब्द. Last night I dreamt of San Pedro Just like I'd never gone, I knew the song A young girl with eyes like the desert It all seems like yesterday, not far away Tropical the island breeze All of nature wild and free This is where I long to be La isla bonita And when the samba played The sun would set so high Ring through my ears and sting my eyes Your Spanish lullaby I fell in love with San Pedro Warm wind carried on the sea, he called to me Te dijo te amo I prayed that the days would last They went so fast I want to be where the sun warms the sky When it's time for siesta you can watch them go by Beautiful faces, no cares in this world Where a girl loves a boy, and a boy loves a girl Last night I dreamt of San Pedro It all seems like yesterday, not far away

चला या सेक्सी धाग्याच्या निमित्तानी,आपण कुठे आणी कसं असायला हवं याचा अभ्यास जाहला.धन्य वाटले. ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

"पूजा आणि पाहुणे" यांच्याशी सहमत!!!.... क्लीन शेव केलेल्या मुलांपेक्षा चेहर्‍यावर थोडीशी हिरवळ ठेवलेली मुलं जास्त सेक्सी वाटतात!!!.. नुसत्या मिशीपेक्षा थोडीशी दाढी ठेवलेली मुलं... ..मस्त वाटतात.. फक्त त्यांची हाईट ५'७" पेक्षा जास्त पाहिजे!!!...आणि "के.एस." चा कुठल्याही फ्लेवरचा स्ट्रॉन्गली मारलेला डिओ... पुजा.... यु आर्र राईट्ट्ट्ट्ट!!... सुबोध भावे'चे साधे लूक्स पण जबराट सेक्सी वाटतात!!!... कपाळावर आलेले...त्याचे कर्ली हेअर....आईग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गग.... :) हिज सेक्सी लिप्स... उफ्फ्फ!!!.. आय गेट मॅड!!! तसा जत्रा'तल्या "ये गं ये ये मैना" या गाण्यातल्या अन्कुश' पण रापचीक फ्लर्ट वाटतो!!.. ;) पण सुबोध'चा जवाब नै!!!!!! .... ;)

In reply to by मृगनयनी

बालगंधर्व बघुन आमच्या काहि हलकट मित्रांनी अश्याच काहिश्या प्रतिक्रिया दिल्या होत्या... अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

बालगंधर्व बघुन आमच्या काहि हलकट मित्रांनी अश्याच काहिश्या प्रतिक्रिया दिल्या होत्या...
अ.रा. ... =)) =)) बालगन्धर्व'मध्ये सुबोध जरी स्त्री-वेषात असला तरी त्याचं पौरुषत्व जाणवत राहतं!!.. त्याचं मार्दव... आपल्याला खुणावत राहतं!!!!! :) 'परवरदीगार' गाण्यातले त्याचे लूक्स पाहून क्षणभर "गोहरबाई"चा हेवा वाटला.. ;) याउलट नटरन्ग'मध्ला अ.कु. प्युअर नाच्या वाटतो... अगदी 'हाईट बॉडी' भारी असूनही!!!

In reply to by मृगनयनी

आइला सुब्याचे ओठ...... थोडं वर्ण्न करु का?? ;) त्याच्या खालच्या ओठाचा मधला भाग दुभागल्या सारखा आहे.. खालच्या वरच्या ओठांच्या कडा ओठांच्या नैसर्गीक रंगापेक्षा साधारण गर्द रंगाच्या ...इतक्या उठावदार ... नशा आणणार्‍या गोड गोड वाटतात..... :) हसल्यानंतर ब्रॉड होणारे त्याचे ओठ म्हणजे वादळात हरवलेली अधांतरी बोट मंद स्मित करणारे त्याचे सेक्सी ओठ म्हणजे मिठात विरघळणार्‍या ट्किलाचे घोट :D

In reply to by जेनी...

पूsssssss जा ssssssss ... बास्स्स गं बाई बास्स.... ई अम जुस्त उनब्ले तो चोन्त्रोल म्य्सेल्फ!!!...;) ____/\____ ;) या... बट इट्स ट्रु.. दॅट हिज लिप्स आर सिम्प्ली किसेबल...... ;) ;) ;) रानभूल'मधला बर्‍यापैकी व्हिमझीकल सुभ्या... जबराट रान्टी आणि सेक्सी वाटतो!... अश्या माणसाकडून 'टीझ' करून घेण्यातही वेगळीच नशा असते... आय जस्ट लाईक इट!!!!! :)

In reply to by मृगनयनी

खि खि खि...मला गोल गोबरा चेहरा (प्रिती झिंटा, सुबोध) किँवा चौकोनी चपटा चेहरा (ऐश, दिया, जॉय मुखर्जी) नाय बा सेक्सी वाटत...मुलीँचा Oval आणि मुलांचा Rectangular चेहरा सेक्सी वाटतो. मस्त strong jaw line पाहीजे मुलांना. आणि गालांपेक्शा हनुवटी वरची खळी (Nawazuddin siddiqui) जास्त सेक्सी वाटते. आणि मुलीँचे collar bones पण सेक्सी वाटतात.

In reply to by एमी

ह्म्म्म.. मला पुर्वी जॉन'च्या गालावरची खळी जाम आवडायची... पण 'दोस्ताना' पाहिल्यापासून जॉन मला 'पराया' झालाय..... ;) ;) तसा तुमच्या म्हणण्याप्रमाणे अक्षयकुमारचा चेहरा रेक्टॅन्ग्युलर आहे.. पण त्याच्यात कुठलंच सेक्स अपील वाटत नाही.. हां.. त्याच्या काही जुन्या पिक्चरामध्ये तो हॅन्ड्सम वाटायचा... पण सेक्सी नै वाटला कधी... उलट मला कधी कधी त्याच्याबरोबर असलेला 'सुनील शेट्टी' सेक्सी वाटतो... ;) एकदम चिम्पांझी लूक्स... एकदम नॅचरल!!!! हि इज ऑल्सो हॅविन्ग रेक्टॅन्ग्युलर फेस..... सुनील शेट्टी इज प्युअर वाईल्ड!... त्याचे बारीक डोळे पाहिले.. की असं वाटतं.. की हा इतका भुकेला आहे.. की याला कुणीही चालेल!! =)) =))
मस्त strong jaw line पाहीजे मुलांना. आणि गालांपेक्शा हनुवटी वरची खळी (Nawazuddin siddiqui) जास्त सेक्सी वाटते. आणि मुलीँचे collar bones पण सेक्सी वाटतात.
+++++ सहमत!!!! हनुवटीवरची खळी... आणि गालावर किन्वा हनुवटीवर एखादे 'शौर्यनिशाण' असेल.. तर लई भारी!!!!... (शौर्यनिशाण म्हणजे एखादी जुनी कापल्याची किन्वा एखाद्या जखमेची खूण.. लहानपणापासून जपलेली.. आणि तीही चेहर्‍यावरच्या सेक्सी हिरवळीत लपलेली.. ;) ) आणि गुलाबी ओठ ..आईश्शपथ!!!... हसताना अशी मुलं खरंच मारून टाकतात मुलींना..... ;) ;) एकदम रॉ लूक्स्स...... :) आणि मुलींचे कॉलर बोन्स' माईट बी आवडत असतील मुलांना .. पण त्या मुली एकदम किडकिडीत वगैरे नसाव्यात... नाहीतर त्या मुली कुपोषित वाटतात... :|

In reply to by मृगनयनी

हम्म... अक्षय, अर्जुन, जॉन, अभय देवल मला नेहमीच सेक्सी वाटतात. आणि सुधांशु पांडे, रोनीत रॉय, रजीत कपूर...पिअर्स ब्रोसनन, रॉबर्ट डोउने Jr, बीली झेन...हेन्सी क्रोनिए, केनेडी Jr, बेकहम...मराठीत रविँद्र महाजनी, रमेश देव...लय मोठी यादी हाय... हा हा सुनिल शेट्टी खरच चिँपाझि दिसतो, मला नाय आवडत...शेवटी प्रत्येकाची आवड वेगळी...हा पण शौर्यखूण चा मुद्दा मान्य :-)

In reply to by मृगनयनी

शौर्यखुनावर एकदम फीदा.... त्याहीपेक्षा मानेच्या शीरेवर असणारा तीळ ... अगदी जीव ओवाळुन टाकावासा वाटावा इतका मादक...मला तो किसेबल वाटतो :) थोडी उंच असणारी माण .... तीही अगदी भरलेली... त्यावर हलक्याशा ब्राव्न ब्लॅक रंगाचा अगदी हाताच्या अंतरावरुन दीसणारा तीळ ... जशी जशी मान वळेल तसा तो ही हलतो .... बोलतोच म्हनाना;) जीवंत वाटतो ......

In reply to by एमी

येस मुलींचे कॉलरबोन सेक्सी वाटतात मला क्रीकेटपट्टु युवराज त्याचे अ‍ॅटिट्युड्स जाम सेक्सी वाटतात , अभिशेक बच्चनची दाढी सेक्सी वाटते,रीचर्ड चे डोळे सेक्सी वाटतात... ..... बाकि अजुन खुप आहे , ते नंतर हळुहळु दील के राज खोलने मे मज्जा आती ह्ये ;)

In reply to by जेनी...

हम्म. अजुन येउदेत सावकाश... मुलांच तेच ते तेच ते आणि तेच ते चालुय... बोअरिंग...yawn बाकी पूजा आणि मृगनयनी तुम्हा दोघीना माझ्याकडून कोणताही धोका/स्पर्धा नाही...आपली आवड वेगवेगळी आहे wink

In reply to by एमी

पा...... =)) =)) सहमत गं.... मुलांचे तेच ते चालूये.. ( बहुतेक ते आपल्या सौभाग्यवतींना घाबरत असावेत!!! ;) ;) ;) ) बाकी आपली आवड वेगळी आहे... ता.क.- सुनील शेट्टी मला कितीही सेक्सी वाटत असला.. तरी मी नेहमीच त्याची तुलना चिम्पान्झी'शी करत आलीये... पू........ तुला आणि मला सुभ्या.. कितीही सेक्सी वाटत असला.. तरी सुबोध त्याच्या मन्जिरीशी प्रामाणिक आहे... त्यामुळे आपण त्याचे फक्त वर्णनच करू शकतो... ;) ;)

In reply to by जेनी...

गप्पा मस्तपैकी "एंजॉय" करणारी स्मायली आहे का कुठे.. पूजा, मॄगनयनी, लिमा, प्लिज..कंटिन्यु.. -(डोळे मिटले असले तरी कान सताड उघडे ठेवून 'नोट्स' घेणारा) एक.

In reply to by मृगनयनी

>>... मुलांचे तेच ते चालूये.. --मिपा च्या एकंदर अनुभवावरुन मला खात्री आहे कि मुलांनी काडि लावण्याचे काम अगदी व्यवस्थीत केलय.. आणि आता ते दुरुन गम्मत बघताहेत :P अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

: - ) येस आय एम शुअर की मुलांच तेच ते चालुय... एक तर त्यांची सेक्सी काय वाटत ही वर्णनं फारच जुनाट आणि बोअरिंग आहेत (त्यातल्या त्यात सुरुवातीचे काही प्रतिसाद आणि चित्रगुप्त यांचा चित्र असलेला प्रतिसाद इंटरेस्टिँग होता पण त्यावर लगेच हल्लाबोल करुन पुन्हा तेच ते चालु झालं)... आणि दुसरं म्हणजे आपण कोणत्याच द्रुष्टीने सेक्सी नाहीय हे लक्षात आल्याने शांत बसलेत... आणि तिसरं म्हणजे आपला पराभव झालाय हे मान्य करण्याऐवजी आपणच काडी लावलीय असं प्रिटेन्ड करतायत... ; - )

In reply to by एमी

कसय ना, स्त्रिवर्गाला नवं काहि सुचलं तर पाहिजे ना सेक्सीपण दाखवायला... म्हणुन आम्हाला जुन्या बोअरींग कल्पनेतुनच काम भागवावं लागतं :P दुसरं असं कि आम्हाला कुठं फुलासारखं सुंदर, सेक्सी वगैरे दिसायचय... सुंदर सुगंधी मकरंद चाखायला मिळावा बस्स.. एव्हढी माफक अपेक्षा ;) आम्हि आपले काळेकुळकुळीत भ्रमरच बरे :D आणि पराभवाचं म्हणाल... तर असले पराभव ज्या पुरुषाला नाहि लाभले तो करंटाच म्हणावा. शराब चाखावी ति मदहोशी करताच... उगा आपलं रांजणं रिचवुन देखील मी जागचा हालत नाहि वगैरे विजयीभाव म्हणजे तद्दन मुर्खपणा :) हा धागा असाच उत्तरोत्तर १००० प्रतिसादांपर्यंत रंगावा आणि आम्हाला दिलखेचक जानलेवा चितपट करणारे नखरे वाचायला मिळावे हि इच्छा :) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

हे हे हे.. पण ते सीता, शकुंतला, पार्वती आणि वाल्मिकी, कालिदास यांचा आधार घेणं म्हणजे फार फार बोअर...तुम्हाला काय वाटतय ते तुमच्या भाषेत मनापासून सांगा ना...मला तर्रि आणि पेठकर यांचे सुरुवातीचे प्रतिसाद आवडले... आणि अगदी Fifty Shades Triology नाही तरी Playboy पर्यँत तरी या...अजुनही कामसुत्र आणि खजुराहो मधेच अडकलाय...जुनीच वाइन असली तरी बाटली तरी नविन आणा...

In reply to by एमी

कमाल वाटते मिपावर एवढे पूरुष आहेत .. पण तेच तेच प्रतिसाद ,त्याच त्याच काळ्याकुळकुळीत भ्रमराशीच स्वतहाची तुलना .. बाकि कै नै जमत तर नीदान लिखान तरी सेक्सी करा कुणा कुणाच लिहिनही जबर्‍या सेक्सी वाटतं ... प्रेमपत्र जाम सेक्सी वाटतं त्यात हटकुन केलेले काहि शब्दांचे वापर .... म्हणजे ..चढता श्वास ,धडधडणारं काळीज , ओठानी टिपावासा वाटनारा शहारा , अबोल वेदनेची जानीव .. मिठितला स्पर्श ,आवेग ,संवेदना , धुंद ,मंद ,मदमस्त ,मोहक , मदन .बरेच .. जस की ... " थंड गार वातावरणातही वाफाळलेले श्वास ..तुझ्या उबदार मिठीवर ..भरदार छातीवर माझ्या श्वासांचे पाश ......मिटलेल्या पापण्यांवर पडणारा हलकासा स्नोव ....तू तुझ्या ओठांनी उचलतोयस ....घट्ट बांधून ठेवलयस तू स्वतःला माझ्यासोबत ..जणू एकही क्षण तुला मिस करायचा नाहीय ..आणि त्या क्षणांना मी माझ्या श्वासात भरून घेण्याची घाई करतेय ..ओठांवर रेंगाळलेले तुझे ओठ ..त्याना संपूर्णपणे आपलसं करण्याचा प्रयत्न करतेय .तुझ्या केसात मी इतकी रमलेय कि खेळता खेळता बरीच पुढे गेली ..तुझे श्वास सर्वांगावर ..शहार्‍यांची फुंकर घालून सर्वांगाला स्पर्शानं भिजवत होते .....आणि मी त्यात मनसोक्त भिजत होती .अगदी धुंद होवून ." असच काहि वाचलं तरी लिहिणारी व्यक्ती काय सेक्सी असेल अस आपलं उगा वाटुन जातं ;)

In reply to by जेनी...

अहो त्याचीच तर वानवा आहे. चावडीवर धुंद गप्पागोष्टी करणारी प्रतिभा नेमकं कीबोर्ड हाती घेतल्यावर कुठे तोंड काळं करते कोण जाणे. तसं सेक्सी गोष्टींची फेरिस्त पार काश्मिर ते कन्याकुमारी जायची... उदाहरण द्यायचं झालं तर... मुक्करदर का सिकंदर मधली आंघोळीची तयारी करुन "वफा जो ना कि तो" गाणं म्हणणार्‍या रेखाचा वस्त्रसंभार, १९४२ अ लव्ह स्टोरी मधे डोळे मिटुन चुंबन दृष्यात विरघळलेली मनिषा कोईरालाची तिरपी गोरीपान मान ... बरं नको ते व्हर्च्युअल वर्ल्ड... पहिलाच प्रोजेक्ट स्क्रॅप झाल्यावर थोड्याश्या घाबरलेल्या-गोंधळलेल्या फ्रेशर मुलींचे चेहेरे, कामाचा प्रचंड ताण असताना रात्री २ वाजता कॉफीचा मग टेबलवर ठेऊन बॉडी स्ट्रेच करत डोकं मागे रेलुन डोळे मिटुन शांतपणे विचार करणार्‍या आमच्या ऑफीसच्या गौरांगनांच्या पापण्या , भरपुर एरोबीक्स केल्यानंतर घामाने भिजलेले, कमनीय शरिराला चिकटलेले वर्काऊट टॉप्स, वातानुकुलीत जीम मध्ये अश्या घामेजलेल्या ताटव्यांमधुन फिरताना जाणवणारा एकप्रकारचा उष्मा, सरदारजींचे जोक्स ऐकुन झाल्यावर सगळा ग्रुप हसत असताना त्यात खरच हसण्यासारखं काय होतं म्हणुन खाजगीत विचारणार्‍या नुकत्याच मोठ्या झालेल्या आमच्या मैत्रीणींचे बालीश प्रश्न, कुणी रस्त्यावर छेडखानी केली तर त्याची कॉलर धरणार्‍या मा*, भे* वगैरे शिव्या देणारे ओठ, रविवारी ब्युटी पार्लरमध्ये भरपूर खर्च केल्याची साक्ष देणारे- स्लिव्हलेस आणि थ्रीफोर्थ मधुन अगदी कॉन्फीडण्ट्ली प्रदर्शीत होणारे सुंदर सुंदर हात-पाय. प्रत्येक एकतर्फी-दुतर्फी प्रेमभंगानंतर "आता पुन्हा नाहि" अशी १ महिना मुश्किलसे टिकणार्‍या प्रतिज्ञेतील वज्रनिर्धार दाखवणारा नाकावर वर-खाली होणारा नाजुक फ्रेमचा चश्मा... जाउ दे. लिस्ट खरच खुप लंबीचौडी आहे... पण प्रतिभेतील कद्रुपणा नडतो ना. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

ये हुई ना बात........!! हेच तर अपेक्षित होतं. स्वतहाच्या शैलीत लिहिलयत , सॉलिड एकदम जवळच्या वातावरणात खुप काही सेक्सी असतं बस्स्स वो नजर होनी चैये ;)

In reply to by जेनी...

सहमत गं!.. पूsssssssss ते रन्गीला'तलं "ऐ रामा ये क्या हुआ.. क्यों ऐसे हमे सताने लगे" हे गाणं प्रवासात रात्री ऐकायचं.. एखादी इनोव्हा गाडी मस्त वरन्धा घाटातून किन्वा तत्सम घाटातून सफाईदार पणे वळणं घेत घेत जाते आहे... आणि मस्त डीम लाईट मध्ये आपण तिच्यात बसून हे गाणं ऐकतोये.... आईशपथ्थ्थ्त!!!!!!! अशक्य आनि अवर्णनीय!!!... किन्वा मग एखाद्या कोकणातल्या सी-बीचवर मस्त लाटांशी खेळून सात-साडेसातच्या नन्तर जवळपासच्या कौलारू घरात मस्त गरम पाण्याने अन्घोळ करून.. नन्तर थोडेसे ओलेसे वाटत असताना... ओल्या केसांच्या बटा सावरताना...मस्त एखादा सेक्सी परफ्युम स्लीवलेस कुडत्यावर मारून ....घरी परतताना हे गाणं ऐकणं.. म्हणजे पर्वणी असते... .. अश्या वेळेस गाडीतल्या निळसर प्रकाशात आपल्या प्राणप्रियाच्या गरम उबदार मस्क्युलर दन्डाचा आपल्याला नकळत स्पर्श होणं. किन्वा मग..उगीचच काच खाली किन्वा वर घेण्याच्या निमित्ताने त्याचं आपल्या अन्गावर नकळत रेलणं...आणि.. तो काच वरखाली करण्याचा निष्फळ प्रयत्न करताना. वर झालेल्या त्याच्या हातांमुळे..त्याच्या ताज्या डिओ'चा वास आपल्या नाकात भरून घेणं...म्हणजे दुधात साखर..!!!.. आणि तो निळसर प्रकाश थोड्या वेळासाठी ड्रायव्हरने बन्द केल्यानन्तर त्या दन्डासकट त्याच्या हाताचा विळखा आपल्याभोवती पडणं. आणि आपल्या प्राणप्रियाचे गरम श्वास आपल्या परफ्युमशी स्पर्धा करणं...आपल्या लिप्स्टीकचे रन्ग त्याच्या ओठात मिसळून जाणं... ... म्हणजे आपणच साखर होऊन दुधात विरघळून गेल्यासारखे वाटते... बस्स... हेच्च गाणं.. पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते...... :) तात्पर्यः- रन्गीला'तलं.. हे गाणं ऐकणं.. म्हणजे..... सेक्सी होणं!!!..... ;)

In reply to by मृगनयनी

आयीगं ...... नैनी मार डाला........!! दोन मिनटांसाठी तर मी खरच गाडीतल्या निळ्या प्रकशात विहार करुन आली ;) मस्क्युलर दंडाचा सहज म्ह्नुन दाखवलेला पण ' सहज ' नसलेला स्पर्श..... बस मध्ये एखादा स्मार्ट देखना भरदार छातीचा तरुण हेरुन त्याच्याशी त्याच्याहि नकळत नजरेचा खेळ खेळण .... आणी बस मधुन उतरताना ( नशिबाने साथ दिलि आणि एकाच स्टॉपवर उतरलो तर ) मुद्दाम्हुन त्याच्यापूढे अ‍ॅटीट्युड दाखवत चेहेर्‍यावर असेल नसेल तितका कॉन्फिडंस आणुन त्याच्या , आपल्यावर खिळलेल्या नजरेला आनखी छेडण ... काय सेक्सी सीन असतो तो .... धम्माल ;)

In reply to by जेनी...

आआअईईईग्ग्ग्ग्ग!!!!!!!!... पूजा'जी.... तुमचे चरणकमल कुठेत? ;) =)) फ्लर्टिन्ग'ची पण हद्द असते यार! ;) ;) ;) असो.. पण कधीतरी असा अनुभव पण मजा देऊन जातो.. फक्त अश्या वेळी खेळवणारे आपण पाहिजे.. आणि आपल्याला पाहिजे तसा खेळणारा 'तो' पाहिजे... आणि हा बसप्रवास किमान ४ तासाचा तरी हवा..... नैतर तितकीशी मजा नाही येत! ;) ;)

In reply to by मृगनयनी

नैनी एकदा असा पूणे मुंबई प्रवास केला होता " नैन लड जै के " वाला पण बसमधुन उतरल्यावर भारी पडला ... :( त्यापेक्षा अर्धा ते पाऊन तासाची मजा बास होते ;) त्यातच इतके तीर मारायचे की त्याचे निशाण नीदान त्याला आठवडाभर तरी मिटवता येणार नाहित ;) एकदा तरी मित्रांजवळ बोलताना " यार .. क्या लडकी थी ! " असा उल्लेख आलाच पाहिजे ... :P असं नजरेनं घायाळ करुन सोडण आणि त्यावर पून्हा पून्हा आपल्या फीतुर डोळ्यानी जिवघेनं वार करण .. जोडीला खळखळतं हसण ठेवायचं ओठांवर ... बास्स्स की पक्षी जाळ्यात.. ;)

In reply to by जेनी...

राहून राहून वाटतं आहे की तुझा असा कधी विमानात प्रवास झाला आहे का? माझा झाला आहे.. २४ तासाचा प्रवास फारच लवकर संपल्यासारखा वाटला होता. ;)

In reply to by जेनी...

खरंतर लिस्ट खूप मोठ्ठी आहे पण ही थोडी उदाहरणार्थ.. नजरेला नजर मिळवणारी स्त्री.. खरंतर नजरेतून स्त्री बरच काही बोलू शकते पण ते तेव्हढावेळ वाचत बसायला मुलात गट्स असावे लागतात. "सहज केला" असं दाखवून केलेला स्पर्श. अनुभवावरून असं लक्षात आलं कि हे "सहज" वगैरे काही नसतं . इट्स स्ट्रॅटेजिक. आम्हाला कळतं बट वी प्ले अलाँग. ;) भर पार्टीत कोणाच्याही लक्षात न येता टेबलाखाली सुरू केलेला फूट-प्ले ;) अभिनयाची कसोटी लागते ती इथे. आपण सुंदर दिसत आहोत आणि लोकं वेडी होत आहेत हे माहित असलेली पण ते लपवण्याचा प्रयत्न करणारी. परफ्युम चा वापर कुठे आणि कसा वापरावा हे माहित असलेली. एकाच परफ्यूम चा वास वेगळ्या ठिकाणी वेगळा येतो. त्याचा मादकपणा मनगट, मानेचा कानाजवळचा भाग, इ. इ..... ;) असा वाढत जातो. रोमान्स मधे पुरुषाकडून तिला काय हवय हे स्प्ष्ट सांगू शकणारी (वसूल करून घेणारी असेल तर उत्तमच) .थोडक्यात लीड घेणारी. मेकप करणारी फारच नेमकं म्हणजे लिपस्टिक लावत असतानाची. बादवे, तसा मी थोडा भाग्यवंत. नाटकात कामं करत असताना काही सुंदर सुंदर मुलींनी माझापण मेकप केला आहे. मला लिपस्टिक (स्टेज मेकपला लावावी लागते. शंका नको.) लावताना त्या स्वःता का तोंड ओपन करत होत्या कळालं नाही. पण नजारा अच्छा था! सो नो कम्प्लेंटस! मला स्वःत ला माझ्यापेक्षा उंच असलेल्या मुली सुद्धा आवडतात. त्यांच्यात एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो. सध्या इतकच पुरे.. -एक

In reply to by एक

आज काय खरं नाय ... कुठे होता रे एवढा वेळ??? कसले भन्नाट भेद खोलताय.... मस्त!! आत्ताशी कुठे हा धागा रंगात आलाय अस मी म्हणेन ;) मुलांचा अजुन एक प्लस पॉइंट ... पूढच्या केसांचे नॅच्युरली पडनारे फ्लिक्स ... बोलता बोलता केसात बोटं फिरवायची स्टाइल ....खालि बघताना अगदी नजरेकडे झुकणारे अलगद रस्ता बदलुन ट्र्न घ्यावा अश्या तोर्‍यात डोळ्यावर येणारे केस ..... खल्लास ;)

In reply to by जेनी...

आम्ही जंटलमन ना त्यामुळे 'सगळ्याच' ठिकाणी लेडीज फर्स्ट हे तत्त्व पाळतो. ;) म्हणून इतका वेळ बोलत नव्हतो. तसही हुकुमी पत्त्यांची हळूहळू उतारी करण्यातच मजा आहे की नाही? तो केसांचा विषय मात्र उगाच काढलास. :( आमचे कुरळे केस तू म्हणतेस तसं वागत नाहीत ना. :( बादवे.. माझ्या वरच्या उदा मधे एक राहिलं. : हाय हिल्स घालणार्‍या मुली..चालताना अप्रतीम तर दिसतातच पण खुर्ची वर बसल्यावर , एक पाय दुसर्‍या पायावर टाकून जेव्हा पायाच्या बोटांवर तो सँडल चाळा म्हणून खेळवतात.. तो प्रकार जास्त जिवघेणा असतो. त्यात स्कर्ट आणि स्टॉकिंग्ज असतील तर जीव तिथल्यातिथे गेलाच!

In reply to by एक

हेहेहे .... कुरळ्या केसांची पण रंगाने सावळी त्यात चौकोणी चेहेरा... ओठांच्या जराशी खाली ओठाना लागुनच एखादा जीवघेना तीळ ... नजर करडी ... पण त्यात एक अनोळखी भाव जो फक्त काहि ठिकाणीच स्वताहाच अस्तित्व दाखवतो अशी नजरच इतकी आकर्षक आणि मादक वाट्ते की अजुन काय बोलु यार बास्स्स :) ( फक्त एक शंका वाट्ते की त्या कुरळ्या केसात लाडेलाडे घुसवलेली बोटं सहिसलामत बाहेर येत असतिल काय ?? :-o ) :D