Skip to main content

तुम्हाला काय /कोण सेक्सी वाटते

लेखक शुचि यांनी गुरुवार, 21/06/2012 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
इन्टरनेटमुळे नजर जवळ जवळ मेल्यासारखीच झाली आहे. नानाविध, अनसेन्सॉर्ड फीती, छायाचित्रे जालावर मुबलक उपलब्ध असतात. अशा काळात "सेक्सी" म्हणजे काय याचा उदाहरणासहीत उहापोह करणारा हा लेख नक्कीच वाचनीय आहे. जरी हा अमेरीकन लोकांच्या दृष्टीकोनातून लिहीलेला असला तरी काही उदाहरणे विलक्षण कातील आहेत. उदाहरणार्थ - कोका कोलाची जाहीरात आणि त्यामधील हसरी अन अतिशय बांधेसूद तरुणी, विशेषतः पार्श्वभूमीवरील होकारार्थी उद्गार-
From May 30, 2012
याच लेखामधील, दुसरे मला आवडलेले उदाहरण एका नर्तकीचे (सारा बरस)आहे जिची चित्रफीत खाली डकविली आहे. काही फोटो (मॅन्स शॅडोज) अप्रतिम आहेत. मिपाकरांना काय "सेक्सी" वाटते ते जाणून घेण्यास आवडेल. इतके वाईन, दारु, धर्म, राजकारण, प्रेम सगळे विषय बोलतो मग याच विषयाने काय घोडे मारले आहे ;) माझ्यापासून सुरवात करते - (१) मला स्त्रियांची चित्रे (पेंटींग्ज्स), पोर्टेट्स (खरी छायाचित्रे नाही) अतिशय आवडतात. जालावर अशी चित्रे पहात असताना मी जवळ जवळ संमोहीत होते. (२) "प्रेटी वूमन" मधील "रिचर्ड जेरे" चा संयत अभिनय मला सेक्सी वाटला. (३) "साहब-बीवी और गुलाम" मधील मीना कुमारीची गाणी व गाण्यातील अभिनय शृंगार आदि, नाईट्स इन व्हाईट सॅटीन-मूडी ब्लूज, सजना है मुझे सजना के लिये - सौदागर वगैरे काही गाणी खूप आवडतात, सेक्सी वाटतात.

वाचने 197653
प्रतिक्रिया 347

प्रतिक्रिया

In reply to by जेनी...

सहमत. अशा चित्रांमधे स्त्रियांच्या चेहर्यावर अगतिक/असहाय्य/लज्जा हेच भाव दिसतात. पण त्याच चित्रांमधल्या पुरुषांच्या चेहर्यावर फारच वेगवेगळे भाव दिसतात. eg Jean Léon Gérôme यांचे Selling slaves in rome आणि Phryne revealed before the Areopagus...what a variety of expressions!!! यामागे पण स्त्रिया दांभिक असतात हेच कारण असेल का? की अशा चित्रांमधे भाव पहायचाच नाही फक्त सौँदर्यच पहायच? तेच पहिल्या दोन चित्रांमधे स्त्रिया 'बघ्यां'मधे आहेत पण त्यातही चेहर्यावरचे भाव फार काही वेगवेगळे नाहीत. आता याला काय म्हणणार...फारच आतल्या गाठीच्या असतात बॉ स्त्रिया... पण चित्रगुप्त म्हणतायत त्याप्रमाणे फक्त सौँदर्य/ कलागुण पहावे. उगाच भाव, उद्देश शोधायला जाऊ नये कशाला उगीच डोक्याला ताप किती चान, सुंदर, अप्रतिम म्हणलं की झालं : - )

In reply to by एमी

चित्रांमधील 'चेहर्‍यावरचे भाव' हे वेगळेच प्रकरण आहे. माझ्या लहानपणी रघुवीर मुळगावकर यांची चित्रे दिवाळी अंक, कॅलेंडरे, रावळगाव टॉफीचे डबे, इ वर बघायला मिळायची. मराठी लोकात मुळगावकर फार प्रसिद्ध होते. ('रंगसम्राट रघुवीर मुळगावकर यांच्या सिद्धहस्त कुंचल्यातून उतरलेले सप्तरंगी मुखपृष्ठ' अशी जाहिरात यायची) गंमत म्हणजे त्यांचे कोणतेही चित्र बघितल्याबरोबर "चेहर्‍यावरचे भाव कित्ती सुंदर आहेत ना" असे उद्गार मंडळी काढायची. चित्रातले इतर भाग त्यांनी बघितलेच नाहीत की काय, असे वाटायचे. मला त्या लहान वयातही याचे अंमळ आश्चर्य वाटायचे. पुढे नववीत असताना मी दासबोध वाचू लागलो, त्यात समर्थ रामदास शिवाजी महाराजांना दूरवरचे काहीतरी (हात उचलून बोटाने) दाखवत आहेत, असे चित्र होते. त्यातील रामदासांचा अगदी बायकी लुसलुशीत हात, दोघांच्या आकृत्यांमधील फिल्मी नजाकत, हे बघून हसू यायचे. हाच विषय मायकेलअँजेलोने कसा हाताळला असता, याची मी कल्पना करायचो. (अर्थात तसे काही करायची माझी स्वतःची लायकी नव्हती) वरील बुगेरोच्या चित्रासारखे चित्र तयार व्हायला अनेक महिने चित्रावर काम करावे लागते. तसेच प्रत्येक आकृती साठी मॉडेलला त्या त्या पोझ मधे बसवून चित्रण करावे लागते. एवढा दीर्घ काळ चेहर्‍यावर अमूक एक भाव दाखवत बसणे मॉडेलला शक्यच नसते. त्यामुळे बर्‍याच चित्रांमधे खरेतर चित्रकाराने भाव वगैरे मुद्दाम काही केलेलेच नसते. मोघमपणे हसरा, रडका, आश्चर्यमग्न वगैरे चेहरे रंगवलेले असतात. अर्थात काही चित्रे याला अपवाद असतातही. परंतु बहुतेकदा चित्रात 'चेहर्‍यावरचे भाव' दिसणे, हा प्रेक्षकाचा कल्पनाविलास असतो. प्रेक्षकांच्या-रसिकांच्या एखाद्या चित्राविषयीच्या कल्पना, आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यात महदंतर असते, पण बहुतेक चित्रकार याची वाच्यता करत नसतात. ते त्यांचे गुपीत असते.

In reply to by एमी

कुठल्याहि स्त्रीच सौंदर्य भावविरहित पहाण्यात काय मजा? ज्या स्त्रीच्या चेहेर्‍यावर अगणित भाव ,नखरे ,डोळ्यात दिसणारे ,पापणीत खेळणारे ,गालावर रेंगाळणारे ,ओठावंरचे चंचल भाव ... हे सगळं दिसतं ती स्त्री सेक्सी दिसते ,मोहक दिसते पण चेहेर्‍यावर शुन्य भाव दिसणारी स्त्री कशी काय मादक असु शकते ? तसे भावशुन्य पूरुषही मंद वाटतात मला... चेहेर्‍यावर लज्जा ( लाज ) दिसण म्हणजे सौंदर्याचा अलंकार ,पण ती लाज जर अगतिकतेमुळे आली असेल तर ती मादकता नव्हे .

In reply to by जेनी...

स्त्रीसौंदर्याविषयी तुम्ही जे लिहिले, ते अगदी उचित आहे, परंतु हे सारे चित्रात उतरवण्याएवढी लायकी फारच कमी चित्रकारांमधे असते. मी इथे फक्त चित्रांबद्दल बोलत आहे.

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त , साधा सरळ प्रश्न आहे .... राग येणार नाही अशी खात्रीदेखिल आहे .. विचारतेच .. तुम्हि ही चित्र इथे या धाग्यावर दीलीत ...धाग्याच नाव " काय सेक्सी वाटते " तुमच्या चित्रात नक्की काय सेक्सी वाटतय? पूरुषांसाठी स्त्रीचं शरीरच सेक्सी ,दुसरा तिसरा विचार त्याच्या मनात येत नाहि ,जोशींची प्रतिक्रिया उत्तम बसते इथे . पण स्त्रीयांच तस नसतं स्त्रीच्या मनात एखाद्या पूरुषाचं रूप बसलं की ती नंतर त्याच्यातल्या गुनांमध्ये स्वतहाला इनवोल्व करण्याचा प्रयत्न करते, त्याच्या बाह्यशरिरापेक्षा त्याच्यात असणार्‍या क्वालिटीच तीला जास्त सेक्सी वाटु लागतात .. त्याच्या हसण्या बोलण्या ,अगदी त्याच्या चिडण्यावरही फीदा होतात मग. त्यामुळे अर्थातच अशा चित्रांअकडे बघन्याचा स्त्रीचा द्रुष्टिकोन आणि पूरुषांचा वेगळा पडतो ...आणि म्हणुनच मतभिन्नताही दिसुन येते .

In reply to by जेनी...

सेक्सी म्हणजे नेमके काय? याविषयी या धाग्यात अतिशय वेगवेगळे विचार मांडले गेले आहेत. मी इथे जी चित्रं दिलीत, त्यात मला स्वतःला काहीही सेक्सी वाटत नाही. मी त्यांच्याकडे कलात्मकतेच्या दृष्टीकोनातूनच फक्त बघू शकतो. मला अनेक गोष्टी आकर्षक, सुंदर, मनोरम, मोहक इ. इ. वाटतात, पण मी त्या मला सेक्सी वाटतात, असे कधीच म्हणणार नाही. या शब्दाचा असा उपयोग करणे मलातरी चुकीचे वाटते. सेक्सी या शब्दाचा मूळ अर्थ 'कामोत्तेजक', कामातुर करणारे, वा जास्त स्पष्ट म्हणजे 'संभोगेच्छा निर्माण करणारे' असा आहे, आणि त्याच अर्थाने तो वापरला जावा, असे माझे मत आहे. बाकी मी माझ्या प्रतिसादात जी चित्रे का डकवतो, त्यांचा मुख्य हेतु वाचकांच्या नजरेखालून विविध चित्रे जावीत, हा असतो. बघा: http://www.misalpav.com/node/22023#comment-409636

In reply to by चित्रगुप्त

आमच्या हापिसातून बघताना मिपावरचं एकही चित्र दिसत नाही. त्यामुळे आमच्यासाठी 'चित्र गुप्त' राहते आणि बाकीच्या मुद्द्यांवरचा गदारोळ तेवढा दिसतो :)

In reply to by चैतन्य दीक्षित

बापरे...गदारोळ वगैरेचा माझा उद्देश नाही हम्म... @चित्रगुप्त तुमचा वेगवेगळी चित्र देण्यामागचा उद्देश चांगलाच आहे. आणि तुम्हाला त्यात कामातुर वगैरे काही वाटत नाही तेही चांगलच आहे. फक्त तुम्ही स्वतः कलाकार असल्याने त्या काळची समाज, चित्र काढुन घेणारा व चित्र काढणारा यांची मानसिकता समजाउन सांगाल अशी अपेक्षा होती...परा जास्तच आक्रमकतेने बोलल्याने तुम्ही थोडे कचरताहात असेही वाटलेले...पण तुमच्यामुळेच ती चित्र पहायला मिळाली बाकी माहीती गुगलुन मिळेल.

In reply to by एमी

त्या काळची समाज, चित्र काढुन घेणारा व चित्र काढणारा यांची मानसिकता ... इ.इ. विषयी त्या त्या लोकांनी जर प्रामाणिकपणे खरे खरे जर लिहून ठेवलेले उपलब्ध असेल, तरच ते वाचून काही कळू शकते. बाकी मी एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे बरेच समिक्षक, विद्वान इ. काही विशिष्ट हेतुनेसुद्धा लिहित असतात. ते कितपत ग्राह्य मानावे, हा पण प्रश्न.

In reply to by चित्रगुप्त

चित्रांशी वाचकांचा परिचय व्हावा, ह्या हेतूने धाग्याच्या विषयाशी बादरायण संबंध असलेली चित्रे आपण डकवत असता, हे समजले. त्याविषयी आनंदच आहे. पण ह्या धाग्यावरील ती चित्रे डकवल्यावर 'त्या' दोन चित्रांविषयी आपणच धागाविषयाशी संबंधित दोन प्रश्न विचारलेत. बहुधा धागाविषयाशी संबंध अधोरेखित करण्याच्या हेतूने आपण तसे केले असावेत. त्यामुळे, व सदर खुलासा अगोदरच न दिल्यामुळे पुढील चर्चा घडली.

In reply to by चित्रगुप्त

मिपावरील अजाण बालकांचे चित्त विचलित करणारी ही चित्रमालिका बघून अस्वस्थ झालो. लज्जेने मान खाली गेली (तिथेही सातव्या क्रमांकाची दोन चित्रे दिसलीच.) पहिल्या चित्रात कोपर्‍यातील राजवाडा आणि एका स्त्रीच्या हातातील गुच्छ लक्षवेधक आहेत. झाडांची पानेही जिवंत वाटतात. तरुण पिढी कशाला 'सेक्सी' म्हणेल याचा नेम नाही. परवा एक गाणे ऐकले. 'मेरी पँट भी सेक्सी, मेरा शर्ट भी सेक्सी' कैवल्यमूर्ती करुणावतारी!

पराचे अभ्यासपुर्ण प्रतिसाद पण सेक्सी वाटु लागले आहेत.

पाहता तुम्हाला जास्तीत जास्त `रोमँटिक' इतकंच म्हणायचं असावं पण हल्ली सेक्सी हा शब्द कशालाही वापरतात (म्हणजे मुली सुद्धा `काय सेक्सी चहा आहे!' म्हणतात) म्हणून तुमची गल्लत झाली असावी . असो, आता इथे आलोच आहे तर नक्की अर्थ असा आहे: हिंदी चित्रपटातल्या सर्व नट्या सर्वतोपरी अनुभव संपन्न असतात तरीही जी नटी आपल्या देहबोली, मुद्राभिनय आणि संवादातनं तिची ही पहिलीच वेळ आहे असं जास्तीतजास्त निरागसतेनं दाखवते ती सर्वात सेक्सी ! तिला करोडो चाहते आणि अमाप यश मिळतं कारण प्रत्येक चाहत्याला वाटतं की अरे, किती अनभिज्ञ, एकदा आपल्याला भेटायला हवी मग सगळं आगदी हळूवारपणे समजाऊन द्यू !!

In reply to by संजय क्षीरसागर

सूर्याची प्रार्थना अतिशय आवडत असल्याकारणाने ती टॅग लाईन आहे. आणि ती स्माईली कहर क्यूट आहे :) पण दोन्हींचा माझ्या स्वभावाशी अगदी गाढ संबंध नाही म्हणजे इतका तरी नाही की मी स्वतःला त्या दोहोंतच व्यक्त आणि कैद करेन. आपला अर्थ आवडला. खूप हसते आहे :)

In reply to by शुचि

बघ आई आकाशांत सूर्य हा आला, पांघरून अंगावर भरजरी शेला केशराचे घातले हे सडे भूवरीं, त्यावरून डौलानें ये त्याची ही स्वारी. ही कविता 'कौन परदेसी मेरा दिल ले गया, जाते जाते मीठा मीठा गम दे गया' ह्या हिन्दी गाण्याच्या चालीवरही म्हणता येते आहे. किंबहुना, जेंव्हा जेंव्हा मी ह्या वरील कवितेच्या ओळी वाचतो तेंव्हा तेंव्हा मला 'कौन परदेसी....' हे गाणेच आठवते.

In reply to by प्रभाकर पेठकर

या चालीवर ही कविताही सेक्सी वाटू शकेल (गाण्यातली मधुबाला आठवून)

In reply to by संजय क्षीरसागर

अनुभव संपन्न असतात तरीही जी नटी आपल्या देहबोली, मुद्राभिनय आणि संवादातनं तिची ही पहिलीच वेळ आहे असं जास्तीतजास्त निरागसतेनं दाखवते ती सर्वात सेक्सी !
नेमकी कसली पहिलीच वेळ? जरा स्पष्ट लिहा की. एवढा खुल्या दिलाचा विषय चाललाय, आणि तुमचं आपलं तत्वज्ञानात्मक गूढ लेखन. ;-)

भारत्तात , अवळी पडळेला पाऊस मला जाम आवडतो ! काही मुलींचे हसणे ( मा.दि.) फारच मादक असते ! बकुळी आणि रातराणीची फुले , म्हणजे हर्बल वायग्राच ! ओल्ड स्पाईस आफटर शेव चा वास कमालीचा मादक आहे ! भरपूर तंगडतोड , ट्रेक झाल्यावर गार पाण्याची अंघोळ ! थंड्गार संध्याकाळी किशोरी अमोण्करांचा आवाज हा अनुभव घ्याच .आवाज फार मादक आहे ! लग्न / समारंभात , नुकत्यात वयात आलेल्या मुलीने नेसलेली साडी हा फटाकाच ! पाहाटेच्या व सकाळच्या संधिकाली वेळी मोकळा समुद्र किनारा भायाण सेक्सी वाटतो. हिल स्टेशन वर चे बहुतेक पॉईंट्स ( जेथे भणाण-णारा वारा असतो ) हे विलक्षण ऊत्तेजित करतात. सध्या पुरे ...काय ?

हे मंडल अनेक वर्षांपासून जालावर आहे आणि माझ्या मनावर नेहमी भुरळ घालत आलेले आहे. मंडलाचे नाव आहे "अनाहत चक्र मंडल". हृदयाकाश चक्राशी निगडीत हे मंडल आणि विशेषतः त्याची रंगसंगती, नाजूक पाकळ्या,आकार, चांदणी आकृतीबंध इतके मोहक, जादूमय वाटतात की अधून मधून सारखे हे माझ्या डेस्कटॉपवर पार्श्वभूमी बनून राहते. कोणाही स्त्रीने या रंगसंगतीचा पेहेराव केला की तो पेहराव मला अतिशय आकर्षक वाटल्याशिवाय राहात नाही असे लक्षात आले आहे.

आमच्या कालिदासरावांनी त्यांच्या मते सेक्सी स्त्रीचे वर्णन मेघदूतात केले आहे, थोड्याफार फरकाने आमचीही तिच व्याख्या आहे. म्हणजे काही "फीचर्स" बद्दल मतभेद होऊ शकतील, पण एकूणात मामला तोच. "तन्वी श्यामा शिखरिदशना पक्वबिम्बाधरोष्ठी; मध्ये क्षामा चकितहरिणीप्रेक्षणानिम्ननाभि:; श्रोणीभारात् अलसगमना, स्तोकनम्रा स्तनाभ्यां; या तत्र स्यात्, युवतिविषया, सृष्टिराद्येव धातु:|| यात हसणे, बोलणे वैग्रे फीचर्स अ‍ॅड केली की झाली आमची परिपूर्ण 'सेक्साड' सौंदर्यवती :) रा.रा. मल्लनाग वात्स्यायन यांची सर्वांत लाडकी स्त्री "पद्मिनी" (जोहारवाली नव्हे हां ;)) देखील आमची परम फेव्हरीट आहे हेवेसांनल.

In reply to by बॅटमॅन

बॅट्मॅन जमले तर - कालीदासाच्या श्लोकाचा अर्थ द्या ना. पद्मिनी ची लक्षणे जर सार्वजनिक रीत्या सांगता येण्यासारखी असतील तर ती देखील सांगा ही विनंती :)

In reply to by शुचि

मेघदूतातला बहुतेक ८४वा श्लोक असावा वरती दिलेला. अर्थ सिंपल आहे- डोळे, दात, कटि, जघनवक्षादि अवयवांची व तज्जनित गतीची स्पेसिफिकेशन्स दिलेली आहेत. बाकी पद्मिनीची लक्षणे डीटेलवारी आठवत नाहीत, पण फिगर, स्वभाव, काही अदा, एकूणात अभिरुची व सेक्शुअल आवडीनिवडी या आधारे क्लासिफाय केलेले आहे. आकर्षकपणात तिच्यानंतर उतरत्या क्रमाने येतात त्य चित्रिणी, शंखिनी व हस्तिनी या प्रकारच्या स्त्रिया.

In reply to by योगप्रभू

मतदार यादी? राजकारणात आपल्याला शष्प विंट्रेस्ट नाही शिवाय आलसः परं दैवतं ;), सबब वय कधीचे झाले तरीदेखील नाव नै नोंदवले. पण मी वयाने लै छोटा वैग्रे नै बरं का हां :)

In reply to by बॅटमॅन

पण माझाही एक श्लोक :) सा वामा सोन्नताङ्गा घनजघनभरैर्मन्दमन्दं चलन्ती (फिगर, चालणे वगैरे) सान्या तिर्यक्कटाक्षैर्हरति खलु मनो लज्जयान्या सुनम्रा | (तिरपे कटाक्ष, लज्जा इ.) काचित्क्रीडामिषेण स्वतनुचपलतां दर्शयन्तीव रम्या (वर मंद चालणे होते, इथे तनुचपलता:)) कं नो वैविध्यमेतत्पुरुषमिहमहामोहबद्धं करोति || (इतकं वैविध्य असेल तर कुणाला मोह होणार नाही?) अर्थात- स्त्रियांच्यात आवडण्यासारख्या इतक्या गोष्टी असतात की त्या वैविध्यामुळे मोहित होणार नाही असा पुरुष सापडणेच शक्य नाही :)

In reply to by चैतन्य दीक्षित

स्वरचित असेल तर तुमच्या प्रतिभेला साष्टांग प्रणिपात _/\_ नसेल तरी आशयात "विषय" मस्त भरला आहे हेवेसांनल :)

सिंहकटी,गजगामिनी,मधुर भाषिणी... स्त्रीया सेक्सी न वाटाव्या तर नवलच ! ;) बाकी सेक्साट हसणारी पाखरं तर जीव घेतात... ;) पाखरं अन् त्यांची पाखरुगिरी काय इचारु नका ! ;) बाकी,सोप्यासोपस मांड्यांमधे १० हत्तीचे बळ ! असो..."विषय" न-संपणारा आहे.

>> सजना है मुझे सजना के लिये - सौदागर वगैरे काही गाणी खूप आवडतात, सेक्सी वाटतात म्हणजे काय पडद्यावरचे गाणे की गाणार्‍या गायिकेमुळे तुम्हाला तसे वाटले

In reply to by शुचि

बहुधा तुम्ही हा चित्रपट A Few Good Men (1992) पाहिला नसावा किंवा पाहिला असेल तर टॉम असताना डेमी कडे कशाला पाहायचे असे झाले असेल. चित्रपटातील सुरुवातीच्या गंभीर दृश्यात प्रणयात्मक असे काहीही नसताना गणवेशातील डेमी संमोहित करून टाकते. मन्रो मन्रो आहे, आपण मधुबालाची तुलना करतो का कुणाशी? अवांतर - सांप्रतच्या काळात सर्वाधिक वेगवान शतक ठोकणारा धागा बनलाय हा. अभिनंदन!!

पुरूषांना स्त्रियांमधे काय सेक्सी वाटतं याची लाखो उदाहरणं आहेत आणि ती सगळ्यांना ठावूक पण आहेत. आम्हाला कुतुहूल होतं ते हे की स्त्रियांना पुरुषामधे काय सेक्सी वाटतं? ते कुठल्याच प्रतिसादामधे नाही आलं म्हणून थोडी निराशा झाली. दुसरं असं की तुम्ही बायका आप्पलपोट्या असता. (ह. घ्या.) म्हणजे असं कि तुम्ही एखादी गोष्ट केली (उदा. मेकप, चांगला ड्रेस, इ. इ.) तर त्याचा फिडबॅक आजुबाजुच्या पुरुषांकडून कुठल्या ना कुठल्या रुपात तातडीने मिळतो. केलेल्या इन्व्हेस्ट्मेंट्ची पोचपावती लगेच मिळते. पुरुषांच तस नाही. एक कॉम्प्लिमेंट किंवा एक सिग्नल द्याल तर शप्पथ. त्यामुळे आम्ही नेहमीच चाचपडत असतो. हा. हा पाशवीपणा आहे. :) कधी कधी 'पाशवी/आक्रमकता' पणा पण 'सेक्सी' वाटतो ती गोष्ट वेगळी. -(व्हॉट वुमेन वाँट? हा प्रश्न पडलेला) एक

In reply to by एक

हाहा ...... बायका या धाग्यावर प्रतिसाद देत नाहीयेत काय करू? :) पण मी रिचर्ड जेरेचे उदाहरण दिले - त्यातही तो पैसेवाला आहे, देखणा आहे हे फक्त नाही तर तो अतिशय सौजन्यशीलदेखील आहे हे तितकेच महत्त्वाचे. दुसरे "टायटॅनिक" मधील त्या प्रसिद्ध दृष्यात - ती हात हवेत पंखांसारखे फैलावून आनंद घेत आहे पण तो मात्र तिचा आनंद बघत आहे/ निरखत आहे असे आहे.
पुरषाने दिलेले हे "अनडिव्हायडेड अटेन्शन" (संपूर्ण संपूर्ण लक्ष) मला तरी सेक्सी वाटते. तेच आहे ना - स्त्रिया शरीरसुख आणि भावनाप्रधानता या दोन गोष्टी वेगळ्या करुच शकत नाहीत.

In reply to by एक

आम्हाला कुतुहूल होतं ते हे की स्त्रियांना पुरुषामधे काय सेक्सी वाटतं? ते कुठल्याच प्रतिसादामधे नाही आलं म्हणून थोडी निराशा झाली.
काय हे भौ, स्त्रिया जालावर व्यक्त होण्यास कचरतात हे माहित नाही होय ?? त्यातून सेक्स बद्दल बोलायचे म्हणजे.... शिव शिव !!! अवांतर:- स्त्रिया या बाबतीत (सेक्स वगैरे) जनरली अत्यंत दांभिक असतात असे माझे स्पष्ट मत आहे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

अवांतराशी पूर्णतः सहमत. अर्थात चर्चाप्रस्तावाचे आणि प्रस्तावकाचे कौतुक आहेच.

In reply to by बॅटमॅन

@बॅट्मॅन आणि प्रा डॉ बिरुटे - कौतुक नाही हो. पण उधृत केलेला तो माझा आवडता लेख आहे. किती विविधरीतीने, खोलवर आणि इंटीमेटली (जवळून) कला आपल्याला भीडते ते त्या लेखातून कळते बरे तो लिहीला आहे मानसशास्त्राच्या प्राध्यापकाने. नक्कीच त्याचा काही एक अधिकार आहेच या विषयात. पण नेहेमीप्रमाणे प्रस्ताव गबाळ्यासारखा मांडला आहे. प्रतिसादांनी त्याचे मूल्य वाढविले आ॑हे.

In reply to by एक

स्त्रीयानाही पूरुष सेक्सी वाटतात... थोडी ओबळ ढोबळ प्रतिक्रिया वाटेल पण लिहितेच. माझी काहि मतं पूरुषांबद्दलची.... सकाळी ऑफीसला जाताना तयार होणारा पूरुष अजुन पाहाण्यात नाहि पण संध्याकाळी थकलेला ... सकाळपासुनचे सगळे टेन्शन्स झेलुनही चेहेर्‍यावर मंद स्मित ठेवनारा... घरी जायची ओढ डोळ्यात असलेला पूरुष खुप सेक्सी वाटतो... कॉफीचा घोट घेता घेता जाडसर भुवया उन्चावुन हळूवार पापण्याना छेडत आजुबाजुला पहाणारा पूरुष कधी पाहुन बघा..... ते कलीजा खलास वालं प्रकरण एकदम ;) ह्म्म्म सगळ्यात जास्त आवडतो तो शेविंग केलेल्या दुसर्‍या दिवसातला पूरुष हलकीशी हिरवळ पसरलेली असते चेहेर्‍यावर... त्या हिरवळीत त्याचं हसण म्ह्न्जे ....अवेळी येणार्‍या पावसाचे धुंदावलेले तुषार..... हाय :) काही पूरुषाना खुर्चीत बसल्यावर एकदम रेलुन बसायची सवय असते... त्यात ,हाताला कोपरात फोल्ड करुन त्यच्या,बोटांपैकीं अंगठा आणि त्या शेजारचं बोट ,ह्या दोन्ही बोटानी खालच्या ओठाशी खेळणारा पूरुष इतका मनमोहक वाटतो की बास. वयक्तिक मतं आहेत.... ( मला सुबोध भावे जाम सेक्सी वाटतो ):)

In reply to by जेनी...

>>ह्या दोन्ही बोटांनी खालच्या ओठाशी खेळणारा पुरुष ह्या विरुद्धची कृती करणारा सुदेश बेरी (सुराग मालिकेतला) आठवला. तो गुन्हा अन्वेषणाचे काम करताना नसलेल्या मिशीवरून दोन बोटे फिरवायचा... अवांतर - मिशीवरून आठवले - अशी बरीच उदाहरणे पाहायला मिळतात की लग्न ठरलेले असताना वाद्गत्त वधू होणाऱ्या नवऱ्याला मिशी असेल तर काढून टाक असा तगादा लावते. काही नवरे काढतात काही नाहीच काढत. माझ्या निरीक्षणाप्रमाणे पुरुषांच्या मिशीबाबत स्त्रियांची टोकाची मते असतात बहुतेकदा. दोनपैकी काहीही चालवून घेणारी उदाहरणे विरळा.

In reply to by श्रीरंग_जोशी

सन्माननीय स्त्री सदस्यांनी पुरुष उरलेल्या प्रश्नांचीही उत्तरे दिली तर धागा द्विशतक नक्कीच गाठेल.

In reply to by श्रीरंग_जोशी

हा हा हा काय मिशीच्या मागे लागला तुम्ही...it depends on gal...नवर्याला हट्टाने मिशी ठेवायला लावणारी एक मुलगी भेटलीय मला, पण बाकी मिशी दाढी बद्दल फार बोलणं नाय झालं कोणाशी... सुरुवाती पासुन मिशीत पाहीलेले लोक अचानक cleanshave करुन आले की खुप कसेतरीच दिसतात eg साहिब बिबी और गुलाम मधला गुरुदत्त, लम्हे मधला अनिल कपूर, अझरुद्दीन, गांगुली...पण तेच cleanshave वाले अक्षय, अर्जुन, सुधांशु मला मिशीत ही आवडले...

छान चर्चा, काही प्रतिसाद सोडले तर फारशी समाधानकारक चर्चा नाही असं माझं मत आहे, चर्चा प्रस्ताव धाडसानं मांडल्याबद्दल चर्चाप्रस्तावाचं कौतुक आहेच.असो. रामायण-महाभारतातील धागेदोरे नावांच श्री.र.भीडे यांचं एक पुस्तक माझ्या संग्रही आहे. सीतेचे सौंदर्य, या प्रकरणात [पृ.क्र.४१] सीतेने स्वत:च्या सौंदर्याचं वर्णन केलं आहे. अर्थात वाल्मिकीनी यानिमित्तानं कोणतीच कसर असं वर्णन करतांना सोडलेलं नाही,असं माझं मत आहे. अर्थ खालीलप्रमाणे पुस्तकात दिला आहे. सीता म्हणते- '' माझे केस मऊ, सारखे आणि काळे कुळकुळीत आहे. भुवया एकमेकींपासून विलग असून पिंडर्‍या गोल गरगरीत आहेत. त्यावर लव नाही. दात सलग एकसारखे असून त्यात फटी पडत नाही. डोळ्यांची ठेवण शंखाकृती आहे. हात, पाय, घोटे, मांड्या प्रमाणात असून गुबगुबीत आहेत. नखे गोलाकार व गुळगुळीत आहेत. हाताची बोटे निमुळती आणि सारखी आहेत. ती तुळतुळीत (दिसतात) स्तन मोठे, पुष्ट आणि एकमेकाला भिडणारे असून स्तनाग्रे बारीक व स्तनात किंचित रुतली आहेत. बेंबी खोल असून तिचा देठ पुढे आला आहे. अंगावरील लव मुलायम असून पायाची बोटे व तळवे हे बारा भाग जमिनीला व्यवस्थितपणे टेकतात. पाय लालबुंद असून त्यांचावरील यवचिन्ह स्पष्ट (दिसते). हाताची बोटे जुळती असून त्यात फटी नाहीत. लाक्षणिकांनी मला मंदिस्मिता मानले आहे.'' संस्कृतचे जाणकार अधिक व्यवस्थित अर्थ समजावून सांगतील म्हणून त्यांच्यासाठी- केशा: सूक्ष्मा समा नीला भ्रुवौ चासंहते मम वृत्ते चारोमके जडःघे दन्ताश्चाविरला मम शड्खे नेत्रे करौ पादौ गुल्फावूरु समौ चितौ अनुवृत्तनखा: स्निग्धा: समाश्चाड्गुलयो मम स्तनौ चाविरलौ पीनौ: मामकौ मग्नचूचुकौ मग्ना चोत्सेधनी नाभि: पाश्चोर्रस्कं च मे चित् म मम वर्णो मणिनिभो मृदन्यड्गरुहाणि च प्रतिष्ठतां द्वदशभिर्मामूचु: शुभलक्षणाम् समग्रयवमचिद्रं पाणिपादं च वर्णवत् मन्दस्मितेत्येव च मां कन्यालाक्षाणिका विदु: (युद्ध. ४८/९-१४) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आहे तर आहे, उगीच वृथा संकोच कशाला तो बाळगायचा? अशा भावनेने केलेले वर्णन अप्रतिम आहे हेवेसांनल.

In reply to by बॅटमॅन

या महाकाव्यात कालिदासाने (पहिल्या की दुसर्‍या पर्वात) पार्वतीचे केलेलं वर्णन लाजवाब आहे. तिच्या पोटांना पडलेल्या तीन वळ्या हा जणू तिच्या वक्षरूपी स्वर्गापर्यंत पोहोचण्याचा सोपान आहे असं वर्णन आहे.. नक्की श्लोक आठवत नाहिये रघुवंशात 'इन्दुमतीस्वयंवरवर्णनं' नावाचा भाग आहे. त्यात तिच्या नाभीचं वर्णन 'विवर्तमनोज्ञनाभी' (नदीतल्या भोवर्‍याप्रमाणे जिची नाभी आहे अशी) असं वर्णन आहे. जयदेवाच्या गीतगोविंदात राधेच्या नाभीजवळ असलेल्या रोमावलीचं जे वर्णन आहे ते अत्यंत 'सेक्सी' आहे. हे असं सुचतं कसं ? असा प्रश्न पडतो जेव्हा केव्हा वाचतो तेव्हा. सप्तशतीमधल्या शेवटच्या तीन रहस्यांमध्ये, देवीचं जे वर्णन येतं त्यातही 'वृत्तपीनघनस्तनी' (गोल, पुष्ट असे स्तन) किंवा 'दीर्घौ लम्बावतिस्थूलौ तावतीवमनोहरौ' असं देवीच्या स्तनांचंही वर्णन आहे. व.पु. काळेंच्या कुठल्याशा कॅसेटवरचा एक श्लोक आठवला- पयोधरानां किल वृष्टिपातो पयोधराणां शिखरेषु पूर्वं तथैव यूनामपि दृष्टिपातो पयोधराणां शिखरेषु पूर्वं | (जसे पयोधर= ढग, पहिल्यांदा पर्वतशिखरांवर वृष्टी करतात तसेच तरूणांचे लक्षही आधी 'पयोधरां'कडेच जाते :)

In reply to by चैतन्य दीक्षित

गीतगोविंदामधीलच कृष्णाचे हे वर्णन आठवले पयोधरांवरूनः धीर समीरे यमुना तीरे वसति वने वनमाली | गोपी पीनपयोधरमर्दन चंचल करयुगशाली ;) राधेच्या रोमावलीचे वर्णन खरंच अत्यंत सेक्सी आहे! खर्रं तर संपूर्ण गीतगोविंदच सेक्सी वर्णनांनी भरलेला आहे. त्या वळ्या व नाभीबद्दलचे श्लोक व्यनि केलेत तर आभारी राहीन ;)

काही वर्ष दक्षिणभारतात रहात असल्यामुळे की काय माहित नाही, पण गोर्‍या नितळ कांतीच्या, थोड्याश्या गुबगुबीत, बेंबीच्या खाली साडी घातलेल्या बायका मला सेक्सी वाटतात. :) इतकं बोलून मी या धाग्यावरून रजा घेतो.

In reply to by दादा कोंडके

{ साडी + केश रचना/सफाई + होर्लेक्स (मजबुत, ताकतवर जिस्म का राज)} - कुठलही सेक्स अपील अर्धवटराव

In reply to by दादा कोंडके

वाल्मिकीनी कोणतीच कसर सोडलेली नाही, तुम्ही हा फोटो टाकून सगळ्या प्रतिसादांची कसर भरुन काढली ! शेवटी पुरुषाची रसिकताच स्त्रीला मोहक बनवते हे खरं! अरसिक पुरुष दुर्मिळ आणि रसिक स्त्री दुर्लभ!

In reply to by दादा कोंडके

हे सेक्सी छायाचित्र ह्या प्रतिसादात प्रकाशित झाल्यापासून, जेंव्हा जेंव्हा हा धागा उघडला आणि ह्या छायाचित्रास ओलांडून जाण्याचा दुर्धर प्रसंग आला तेंव्हा तेंव्हा इथे पुन्हःपुन्हा थबकून, डोळे भरून पाहिल्या खेरीज पुढे जाऊच शकलो नाही. आपल्या उद्देशात अत्यंत यशस्वी ठरलेले छायाचित्र आहे हे.

In reply to by प्रभाकर पेठकर

या छायाचित्रातील अभिनेत्री आहे नमिता. हिचे भरपूर फोटो जालावर आहेत. Namita, किंवा Namitha असे गुगला.

In reply to by चित्रगुप्त

छे: छे: अति परिचयात अवज्ञा. तिची जास्त ओळख करून घ्यायची नाहिए की तिची अनेक छायाचित्र पाहण्याचा/संग्रही ठेवण्याचाही विचार नाही. हे एवढे एक चित्र खुप झालं. आणि तेही सारखं सारखं पाहात राहून नजर मारून टाकायची नाहिए. जेंव्हा कधी ह्या धाग्यावर नविन प्रतिसाद येईल आणि अगदी नाईलाजाने हे चित्र 'ओलांडायची' वेळ आलीच तर जरा थबकून निरखायचं. बाकी सर्व कल्पने मध्ये.

In reply to by प्रभाकर पेठकर

छे: छे: अति परिचयात अवज्ञा. तिची जास्त ओळख करून घ्यायची नाहिए की तिची अनेक छायाचित्र पाहण्याचा/संग्रही ठेवण्याचाही विचार नाही. हे एवढे एक चित्र खुप झालं. आणि तेही सारखं सारखं पाहात राहून नजर मारून टाकायची नाहिए. जेंव्हा कधी ह्या धाग्यावर नविन प्रतिसाद येईल आणि अगदी नाईलाजाने हे चित्र 'ओलांडायची' वेळ आलीच तर जरा थबकून निरखायचं. बाकी सर्व कल्पने मध्ये.
!!!

In reply to by श्रावण मोडक

हम्म्म्म..! श्रावण बाळा, मोठा झालास बरं..!

In reply to by दादा कोंडके

कळत नकळत मालिकेमधील हर्षदा खानविलकर यांची एक अदा!! यावरून मला अंदाज करावासा वाटतो की इतिहासातील कारस्थानी स्त्रिया देखील अश्याच अपीलिंग असाव्यात.