✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

तुम्हाला काय /कोण सेक्सी वाटते

श
शुचि यांनी
गुरुवार, 06/21/2012 - 07:37  ·  लेख
लेख
इन्टरनेटमुळे नजर जवळ जवळ मेल्यासारखीच झाली आहे. नानाविध, अनसेन्सॉर्ड फीती, छायाचित्रे जालावर मुबलक उपलब्ध असतात. अशा काळात "सेक्सी" म्हणजे काय याचा उदाहरणासहीत उहापोह करणारा हा लेख नक्कीच वाचनीय आहे. जरी हा अमेरीकन लोकांच्या दृष्टीकोनातून लिहीलेला असला तरी काही उदाहरणे विलक्षण कातील आहेत. उदाहरणार्थ - कोका कोलाची जाहीरात आणि त्यामधील हसरी अन अतिशय बांधेसूद तरुणी, विशेषतः पार्श्वभूमीवरील होकारार्थी उद्गार-
From May 30, 2012
याच लेखामधील, दुसरे मला आवडलेले उदाहरण एका नर्तकीचे (सारा बरस)आहे जिची चित्रफीत खाली डकविली आहे. काही फोटो (मॅन्स शॅडोज) अप्रतिम आहेत. मिपाकरांना काय "सेक्सी" वाटते ते जाणून घेण्यास आवडेल. इतके वाईन, दारु, धर्म, राजकारण, प्रेम सगळे विषय बोलतो मग याच विषयाने काय घोडे मारले आहे ;) माझ्यापासून सुरवात करते - (१) मला स्त्रियांची चित्रे (पेंटींग्ज्स), पोर्टेट्स (खरी छायाचित्रे नाही) अतिशय आवडतात. जालावर अशी चित्रे पहात असताना मी जवळ जवळ संमोहीत होते. (२) "प्रेटी वूमन" मधील "रिचर्ड जेरे" चा संयत अभिनय मला सेक्सी वाटला. (३) "साहब-बीवी और गुलाम" मधील मीना कुमारीची गाणी व गाण्यातील अभिनय शृंगार आदि, नाईट्स इन व्हाईट सॅटीन-मूडी ब्लूज, सजना है मुझे सजना के लिये - सौदागर वगैरे काही गाणी खूप आवडतात, सेक्सी वाटतात.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
196639 वाचन

💬 प्रतिसाद (347)

प्रतिक्रिया

मला.......

चौकटराजा
गुरुवार, 06/21/2012 - 07:54 नवीन
बेळगावचे चित्रकार के बी कुलकर्णी यांच्या चित्रातील पाठमोरी ललना . तसेच चित्रकार प्रताप मुळीक यांच्या शैलीत साकार होणारी ललना " सेक्सी" वाटते. मादक असा सेक्सीचा अर्थ घेतला आहे.
  • Log in or register to post comments

केवळ एक कुतूहल म्हणून विचारते

शुचि
गुरुवार, 06/21/2012 - 08:03 नवीन
केवळ एक कुतूहल म्हणून विचारते - पाठ आकर्षक वाटते की चेहेरा लपविलेला म्हणजे चित्रातील "मिस्टरी" आपल्याला आकर्षित करते :) ....... मला स्वतःला मिस्टरी (गूढता/सुप्तता) चे खूप आकर्षण वाटते. जसे सर्क द्यु सोलेल या लास व्हेगास ला होणार्‍या कार्यक्रमाचे अनेक प्रकार आहेत पण मला त्यातील त्यातील सर्क द्यु सोलेल- मिस्टीर हाच पहावासा वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

पाठ आकर्षक वाटते की चेहेरा

पक पक पक
गुरुवार, 06/21/2012 - 09:08 नवीन
पाठ आकर्षक वाटते की चेहेरा लपविलेला म्हणजे चित्रातील "मिस्टरी" आपल्याला आकर्षित करते आता पहिले लक्ष पाठीकडेच गेले असणार ना ,अन पाठ सेक्सी दिसल्यामुळेच मग चेहरा पहाण्याची उर्मी मनात दाट्ली असेल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

ह्म्म्म्म्म्म, सेक्सी य

मराठमोळा
गुरुवार, 06/21/2012 - 07:54 नवीन
ह्म्म्म्म्म्म, सेक्सी य शब्दाची व्याख्या आधी तयार करावी लागेल. सुंदरता आणि शृंगार या दोन भिन्न गोष्टी आहेत. कुणाला कधी कोण सुंदर वाटेल हा फिजिक्स, केमीस्ट्री आणि बायोलॉजीकल अभ्यासाच्या विषय आहे, तुम्ही म्हण्ता तसं ( तुम्ही स्त्री आहात असं गृहीत धरून) स्त्रीयांना एखादी स्त्री सेक्सी वाटणे, किंवा पुरुषाला पुरुष हादेखील चर्चेचा विषय ठरु शकतो. लेख आणखी विस्तारीत असता तर मुळ विषय काय आहे आणि चर्चा कशावर करायची हे कळाले असते. ;)
  • Log in or register to post comments

छ्या...

श्रावण मोडक
गुरुवार, 06/21/2012 - 07:56 नवीन
चरचरीत फोडणी - या लेखाचे शीर्षक. निःसत्व ढोकळा - लेखनातील आशय. आजची सकाळ वाईट जाणार होती तर... तरीही हा धागा उघडून ठेवावा म्हणतोय... ;-)
  • Log in or register to post comments

१०००१% सहमत

सुनील
गुरुवार, 06/21/2012 - 21:58 नवीन
शीर्षक वाचून अपेक्षा फारच वाढलेल्या होत्या ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

धागा

श्रावण मोडक
Wed, 06/27/2012 - 13:30 नवीन
धागा उघडाच ठेवला. सार्थक झाले. आता धागा क्रमांक दोन सुरू करा लेको... लई त्रास होतोय प्रतिसाद शोधताना. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

वन ओव्हर

विकास
गुरुवार, 06/21/2012 - 08:03 नवीन
वन ओव्हर कॉस सी
  • Log in or register to post comments

मला नीट कळले नाही वन ओव्हर

शुचि
गुरुवार, 06/21/2012 - 08:08 नवीन
मला नीट कळले नाही :( वन ओव्हर कॉस सी म्हणजे? कृपया विस्तार करावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

ट्रीग्नॉमेट्री...

विकास
गुरुवार, 06/21/2012 - 08:11 नवीन
1/cos c = Sec C शिंपल गणित (पाश्चिमात्य पद्धतीने, वैदीक नाही. ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

हेहेहेहे हा तर आपला

बॅटमॅन
गुरुवार, 06/21/2012 - 10:34 नवीन
हेहेहेहे हा तर आपला ष्ट्यांडर्ड प्रतिसाद ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

ट्रिग्नॉमेट्री

सुनील
गुरुवार, 06/21/2012 - 21:45 नवीन
शिंपल गणित (पाश्चिमात्य पद्धतीने, वैदीक नाही. हे हो काय विकासराव? तुम्हाला त्रयोगुणमितिदर्शनम् ह्या प्राचीन ग्रंथाबद्दल काहीच माहिती नाही? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

हम्म्म

सोत्रि
गुरुवार, 06/21/2012 - 09:02 नवीन
जसा Fuck हा शब्द नाम, क्रियापद, उभयान्वयी अव्यय, विषेशण, क्रियाविषेशण असा कसाही वापरला जाण्याच्या ताकतीचा आहे, तसाच Sexy हा शब्द. त्याची व्याप्ती फार मोठी आहे. ह्या लेखात नेमके काय अपेक्शित आहे ते कळल नाही सबब माझा पास. -( सेक्सी) सोकाजी
  • Log in or register to post comments

"FUCK" वर ओशोंची क्लीप ऐकली असेलच... ;-)

मोदक
गुरुवार, 06/21/2012 - 09:18 नवीन
"FUCK" वर ओशोंची क्लीप ऐकली असेलच... ;-) [इच्छुकांनी व्यनी करावा.]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

मला पाहीजे

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/21/2012 - 16:29 नवीन
मला पाहीजे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

>> -( सेक्सी) सोकाजी असं

आशु जोग
Fri, 06/22/2012 - 23:24 नवीन
>> -( सेक्सी) सोकाजी असं स्वतःनीच म्हणायचं वाटतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

खुलासा

सहज
गुरुवार, 06/21/2012 - 09:20 नवीन
सेक्सी ह्या शब्दाचा नक्की अर्थ काय घ्यायचा? १) provoking or intended to provoke sexual interest: २) interesting, exciting, or trendy: १) म्हणजे बघा रिचर्ड गिअर चा संयत अभिनय पाहून हा इसम आत्ताच्या आत्ता माझ्या मिठीत असावा आणि... २) की अरे वा! जर अशी भुमीका कोण्या अन्य अभिनेत्याला करायची झाली तर त्याने ही अशी करावी , आदर्शवत, चपखल, योग्य वढवलेली, परफेक्ट भूमीका. इतकी मी ह्या खोट्या खोट्या कथेतही स्व:ताला हरवून बसले. असा अर्थ? अजुन काही उदाहरणे म्हणजे.. १) हा शर्ट/ड्रेस माझ्या जोडीदाराने घातला तर मला आत्ताच्या अत्ता त्याला/तिला .... २) एखादी म्हणेल हा दागिना मी घातला तर माझा मूड दिवसभर छान असतो, अमुक ब्रँड्चा पर्फ्युम सकाळी लावला तरी अगदी रात्रीपर्यंत टिकतो. ह्या हेअरकट मधे मीच मला सुंदर वाटते. एखादा म्हणेल अमुक गॅजेट/ऑब्जेक्ट घेउन बरेच दिवस झाले तरी आजही ते नव्या सारखे सुंदर दिसते, तितकेच इफिशियंटली चालते. अमुक खेळाडू आज अगदीच भारी खेळला, सचिनने मारलेले स्ट्रेट कट, कव्हर ड्राईव्स.. ------- भाग १ जो आहे त्याला सेक्सी म्हणणे हे साधारणता विशिष्ट एन्ड रिझल्ट ओरीएन्टेड असते. व भाग २ आहे जो स्वताचाच मूड चांगला करतो, फिल गुड रिलेटेड विदाउट द नीड ऑफ अनदर पर्सन ऑर फिजीकल अ‍ॅक्शन. अवांतर - माफी मागतो. मला वाटते सेक्सी हा शब्द न वापरताही तितकाच/तोच निर्मल आनंद विविध क्रियांमधे उपभोगता येण्यासारखा आहे. तो शब्द वापरुन आपण काहीतरी स्पेशल, हिप, ट्रेंडी आहोत हेच दाखवायचे असेल तर तो हेतू साध्य होत असेलही म्हणा. मला पडणारा प्रश्न सेक्सी हा शब्द उच्चारायची गरजच का पडते? हा शब्द न वापरता कोणताही अंतिम हेतू सहजसाध्य आहेच. इथे मला फक्त वरणभात भाषा, शी बै अच्र्त बाव्ल्त असे काही म्हणायचे नाही. ललित लेखकाला स्व:ताच्या भाषेत जे काय लिहायचे आहे त्याच्या स्वातंत्र्याचा आदर आहेच. पण बोलाचालीच्या भाषेत, एकमेकांशी सार्वजनीक संवादात गरज आहे? हे असे एक एक शब्दाचे स्वातंत्र्य घेत पुढच्या पिढीला जास्त ज्ञानी करत, आपण त्यांची निरागसता लवकर तर संपवत नाही आहोत ना? अशी एक शंका येते. होपफुली आय एम राँग. पण लहान मुलांची निरागसता जितकी जास्त जपता येईल तितकी जपावी असे मला तरी वाटते. मागे लिटील चँप्स की तसल्याच एका कार्यक्रमामधे सेक्सी सेक्सी शब्द असलेली गाणी ८ - १० वर्षाची लहानगी म्हणाली होती असे अंधुकसे आठवते. किंवा अगदीच "प्रौढ" असे अंगविक्षेप नाचात बसवणे हेही आढळते. अर्थात हे माझे मत आहे. इतरांवर लादण्याचा प्रकार नाही. सेक्सी, शिट, ओह फक, बास्टर्ड्,अजुन कुठली शिवी, वाऽऽअ अप?, यो मॅन असले शब्द आपल्या रोजच्या शब्द कोशात असायची खरच गरज आहे का? असले शब्द वापरुन वापरुन / तेच लक्षात ठेवून आजवर प्रचलित असलेले त्यातल्या त्यात अलंकारीत, अर्थवाही शब्द आपण विसरत चाललो आहोत काय? असो हे अवांतर फार झाले. शुचिताई माफ करा. एकंदर कोणाला कशात काय वाटतं - यात आता पुन्हा व्यक्ती तितक्या प्रकृती ते तुमचं आमचं सेम असतं अशी आवडनिवड असणारच.
  • Log in or register to post comments

सहज कृपया माझा खालचा प्रतिसाद

शुचि
गुरुवार, 06/21/2012 - 09:36 नवीन
सहज कृपया माझा खालचा प्रतिसाद पहा. मी आधी तो प्रतिसाद टंकला आणि मग आपला प्रतिसाद पाहीला. "सेक्सी" शब्द त्या लेखातून जसाच्या तसा उचलला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

नवीन लेख?

सुनील
गुरुवार, 06/21/2012 - 21:55 नवीन
एवढा मोठा प्रतिसाद टाकण्यापेक्षा सहजराव एखादा जहाला आणि मादक लेख का टाकत नाहीत? सेक्सी, शिट, ओह फक, बास्टर्ड्,अजुन कुठली शिवी, वाऽऽअ अप?, यो मॅन असले शब्द आपल्या रोजच्या शब्द कोशात असायची खरच गरज आहे का? असले शब्द वापरुन वापरुन / तेच लक्षात ठेवून आजवर प्रचलित असलेले त्यातल्या त्यात अलंकारीत, अर्थवाही शब्द आपण विसरत चाललो आहोत काय? मराठी व्यक्तीला तरी शब्दांची कमतरता पडू नये! :) एकंदर कोणाला कशात काय वाटतं - यात आता पुन्हा व्यक्ती तितक्या प्रकृती ते तुमचं आमचं सेम असतं अशी आवडनिवड असणारच. +१ कुणाला मधुबाला मादक वाटते तर कुणाला एक गोड चेहेर्‍याचं पिंप (मराठी शब्द!) वाटतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

ममो, श्रामो, सोत्रि - सेक्सी

शुचि
गुरुवार, 06/21/2012 - 09:40 नवीन
ममो, श्रामो, सोत्रि - सेक्सी म्हणजे मादक, कामोत्तेजीत करणारे, आव्हानात्मक, संमोहीत करणारे, धुंदावणारे, वेडावणारे यापैकी सर्व अथवा काहीही धरा ना. काहींना स्त्रियांचे "हिप्स स्वे" (नितंबांची डौलदार लय) सेक्सी वाटेल तर कोणाला स्त्रीच्या केवळ नजरेतील जादू, काही पुरुषांना स्त्रियांचे पाय/पाऊले आवडतात तर काहींना ओठ, काही स्त्रियांना पुरषांचे मौन आणि तरीही नजरेतील वचक आवडू शकतो तर माझ्या एका मैत्रिणीला टाय-सूट मधीलच फोटो आवडायचे (डेअर आय से टर्न ऑन करायचे) वेल ......... हे झाले शारीरीक सौंदर्याचे प्रकार तसेच कला प्रकारही असतील ना जे की धुंदावून सोडतात. तो विषय आहे. विशेषतः कलाप्रकारातील आपल्याला आवडणारी उदाहरणे. हा विषय मी नीट मांडावयास हवा होता. पण या प्रतिसादानंतर मला वाटते थोडा स्पष्ट होईल.
  • Log in or register to post comments

लीस्ट लांबलचक आहे...

अर्धवटराव
गुरुवार, 06/21/2012 - 10:17 नवीन
स्त्रियांच्या बाबतीत म्हणाल तर ज्या क्षणी स्त्रि इतर कुठल्याही फाफट पसार्‍यातुन कमोत्तकजतेकडे वळते ( वा एखादी नटी तसा अभिनय करते) तो क्षण मला भयंकर सेक्सी वाटतो. अर्थात, याबाबत एक हाय पास फिल्टर आहे... हुमा खान, मल्लीका शेरावत वगैरे त्यातुन कट होतात. पंजाबी ड्रेस + लांबसडक केस + जरा उंच बांधा+ गोरा वर्ण + थोडा कडक सुर तुफान सेक्सी वाटतं. सावळ्या वर्णाला टपोरे/मीनाक्षी डोळे (द्विरुक्ती झाली) + सरळ नाक + मंजुळ सुर... एक्दम समा बन गया वाटतं. काहि भडक रंगांचे कॉम्बीनेशन्स आणि लाईट कलरच्या छटा सेक्सी वाटतात... त्याच्याशी संध्याकाळची शीतल हवा रिलेट करता आली पाहिजे मात्र. ज्येनुइन मराठी गजल (मालवुन टाक दीप वगैरे), निवांत भाव दर्शवणारे संगीत , पाण्याच्या थेंबांचा हळुवार टप टप आवाज एकदम जानदार. पेंटींग वगैरे मध्ये म्हणाल तर कमनीय बांधा क्लीक होतो. असो... यादी बरीच लांब होईल :) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

क्या बात है! एकदम रसिक

शुचि
गुरुवार, 06/21/2012 - 10:25 नवीन
:) क्या बात है! एकदम रसिक प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

२) "प्रेटी वूमन" मधील "रिचर्ड

जेनी...
गुरुवार, 06/21/2012 - 10:23 नवीन
२) "प्रेटी वूमन" मधील "रिचर्ड जेरे" चा संयत अभिनय मला सेक्सी वाटला ________________________ ऊऊऊऊऊऊऊऊऊउ........आपण तर लाखोंदा फीदा रीचर्डच्या ' प्रीटी वूमन ' मधल्या अ‍ॅक्टींगवर :)
  • Log in or register to post comments

हाहा ........ खरच ग. अफलातून

शुचि
गुरुवार, 06/21/2012 - 10:30 नवीन
हाहा ........ खरच ग. अफलातून आहे. शेवटी दातात गुलाबाचं फूल घेऊन शिडी चढत तो तिच्याकडे जातो ..... एवढा मोठा मिलीयोनेअर (म्हणजे चित्रपटात) , त्यात देखणा, त्यात सौजन्यशीलतेचा कळस पण तिच्यासाठी....... आई ग!!! ..... आणि पार्श्वभूमीवर ते जीवघेणं मधुर संगीत ......... माझं काळीज ठाव सोडतं त्या सीनला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

हा सिन का? :-)

दिपक
गुरुवार, 06/21/2012 - 11:03 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

होय हाच तो सीन. धन्यवाद शोधून

शुचि
गुरुवार, 06/21/2012 - 12:18 नवीन
होय हाच तो सीन. धन्यवाद शोधून येथे टाकल्याबद्दल. पण या सीनची जादू संपूर्ण सिनेमा पाहील्यावर , त्या पटकथेच्या पार्श्वभूमीवर पहातानाच कळून येते. असा "एकटा" (आयसोलेटेड) सीन पहाताना मंत्रमुग्ध व्हायला होत नाही. त्या विशिष्ठ जिगसॉ पझलमध्येच तो फिट बसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

व्यक्ती तितक्या प्रकृती....

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 06/21/2012 - 11:14 नवीन
सेक्सी म्हणजे मादक, कामोत्तेजीत करणारे, आव्हानात्मक, संमोहीत करणारे, धुंदावणारे, वेडावणारे यापैकी सर्व अथवा काहीही धरा ना. व्याख्या काही पटली नाही. 'सेक्सी म्हणजे मादक, कामोत्तेजीत करणारे' इथेच 'सेक्सी' शब्दाची व्याक्या संपते. (असे मला वाटते). आव्हानात्मक, संमोहीत करणारे, धुंदावणारे, वेडावणारे यापैकी सर्व अथवा काहीही..... ह्यात 'सेक्सी' काय आहे? चित्रकाराला एखादे चित्र, छायाचित्रकाराला एखादे दृश्य, एखादी प्रकाश योजना, कुस्तीगिराला एखादी ,तगड्या पहिलवानाबरोबरची, कुस्ती आव्हानात्मक वाटू शकेल पण ती 'सेक्सी' कशी होईल? एखाद्या फर्ड्या वक्त्याचे भाषण 'संमोहित' करणारे असू शकते पण म्हणून ते काही 'सेक्सी' ठरत नाही. इथिओपियाच्या 'त्या' उपासमारीने मरणासन्न बालकाचे आणि त्याच्या मरणाची वाट पाहणार्‍या गिधाडाचे छायाचित्रही एखाद्याला संमोहित करेल अशा ताकदीचे होते पण ते 'सेक्सी' नव्हते. 'धुंदावणारे' 'वेडे करणारे' ('वेडावणारे' नाही. त्यात एकाने दुसर्‍याला 'वाकुल्या' दाखविणे अभिप्रेत आहे) निसर्गात खुप काही आहे. पावसाळ्यातील हिरवागार निसर्ग, थंडीत धुक्यात लपेटलेला परिसर, मस्त मातीचा सुगंध, फुलांचा सुगंध 'धुंदावणारा' असू शकतो. व्याख्येतील 'सेक्सी म्हणजे मादक, कामोत्तेजीत करणारे' असा थेट अर्थ घेतला तर ती एक भावना असल्याकारणाने सर्वांसारखी समान असू शकत नाही. ती २ +२ = ४ इतकी रुक्ष, व्यावहारीक नसते. व्यक्तीगणिक बदलणारी असते. पुरुषाला स्त्री आणि स्त्रिला पुरुष 'सेक्सी' वाटणे नैसर्गिक आहे. (पुरुषाला पुरुष आणि स्त्री ला स्त्री 'सेक्सी' वाटू शकते पण तो वेगळा आणि गहन विषय बाजूला ठेऊ या.) पुरुषांच्या 'सेक्सी' स्त्री बद्दलच्या कल्पनांमध्ये स्त्रियांच्या अनेकविध वैशिष्ट्यांचा समावेश असतो. सुंदर चेहरा, गोरा रंग, प्रमाणबद्ध-बांधेसूद शरीर, आवाजातील गोडवा, उंची, चालण्याची, बोलण्याची लकब इ.इ.इ. सर्वसाधारण बाबी असल्या तरी व्यक्तिमत्त्वातील 'चुंबकिय आकर्षकता' (Magnetism) ह्याचीही प्रखर भूमिका 'सेक्सी' शब्दात सामावलेली आहे. एखाद्याला सावळा रंग, किंचित घोगरा आवाज, मादक डोळे, हाताचे थंडगार तळवे, काहीही उद्दीपित करू शकतात. त्याच्यासाठी त्या एका वैशिष्ट्यासाठी ती स्त्री 'सेक्सी' वाटत असते. काही जणांना ऐश्वर्या राय 'सेक्सी' वाटते तर काही जणांना सुश्मिता सेन तिच्या आकर्षकतेमुळे 'सेक्सी' वाटते. माधुरी तिच्या अदांमुळे 'सेक्सी' वाटते तर हेलन तिच्या कॅब्रे मुळे 'सेक्सी' ठरायची. व्यक्ती तितक्या प्रकृती आणि आपापल्या प्रकृतीला झेपतील अशा 'सेक्सी'पणाच्या कल्पना.
  • Log in or register to post comments

पेठकरांचा प्रतिसाद जास्त

मृगनयनी
गुरुवार, 06/21/2012 - 12:29 नवीन
पेठकरांचा प्रतिसाद जास्त प्रगल्भ वाटतोय!!... रच्याकने, मला तर बॉलिवुड'मध्ये 'कल्की कोलचीन' जास्त सेक्सी वाटते!!! ;) ;) ;) उगीच का अनुराग'सारख्या काश्यप'कुलवन्शीयाने ती'स आपली धर्मपत्नी बनविले!!! ;) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

पेठकर जी, वरती मी जो लेख उधृत

शुचि
गुरुवार, 06/21/2012 - 12:38 नवीन
पेठकर जी, वरती मी जो लेख उधृत केला आहे, त्याचे लेखक आहेत - नाओम श्पॅन्सर - मानसशास्त्राचे एक प्राध्यापक. त्यांनी स्वतः जालावरील "त्यांना" सेक्सी वाटणार्‍या कलाकृतींचा मागोवा घेतला आहे. यामध्ये त्यांनी सारा बरस या नर्तकीचे नृत्य उल्लेखिले आहे. तिच्या हातांच्या "एलेगंट" (सुडौल) हालचाली आणि विशेषतः तिने नृत्यसमयी हाती घेतलेला गुलाब. "त्यांच्या मते" तिचे नृत्य सेक्सी आहेच. पण ते हा प्रश्न करतात की गुलाबाहून सेक्सी काय असू शकते? आता बोला. या लेखात त्यांनी जी जी उदाहरणे दिलेली आहेत ती याच वस्तुस्थितीकडे अंगुलीनिर्देश करतात की या शब्दाचा अर्थ कामोत्तेजना इतका कोता नसून त्याची व्याप्ती अधिक आहेच पण त्याहूनही एक सुंदर वस्तुस्थिती मला जाणवली ती ही की - कलाप्रियता आणि संवेदनशीलता यांच्या बेमालूम मिश्रणातून खूप उत्तम कलाकृती आपल्याला मानसिक पातळीवर "सेक्श्युअली अपील" होत असतात. आपल्याला ते जाणवतं अथवा नाही हा भाग अलाहिदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

एक प्रयत्न....

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 06/21/2012 - 13:13 नवीन
शुची जी, मी जो लेख उधृत केला आहे, त्याचे लेखक आहेत - नाओम श्पॅन्सर - मानसशास्त्राचे एक प्राध्यापक. त्यांनी स्वतः जालावरील "त्यांना" सेक्सी वाटणार्‍या कलाकृतींचा मागोवा घेतला आहे. संपला विषय. एखाद्या मानसशास्त्राच्या प्राध्यापकाने केलेली विधाने खोटी ठरविणारा मी कोण? मिपाकरांना काय "सेक्सी" वाटते ते जाणून घेण्यास आवडेल. ह्या वाक्याने माझी फसगत झाली. फक्त मिपाकरांनाच काय पण, एकूणात पुरुषजातीला काय 'सेक्सी' वाटत असेल, ह्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न माझ्या कुवती नुसार मी केला. अर्थात, मानसशास्त्राच्या प्राध्यापकासमोर माझ्यासारख्या शरीरशास्त्राच्या अभ्यासकाच्या मतांना कोण विचारतो? जाऊ दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

नाही नाही. आपण म्हणालात तेच

शुचि
गुरुवार, 06/21/2012 - 13:31 नवीन
नाही नाही. आपण म्हणालात तेच त्यांनीही म्हटले आहे. २+२=४ अ॑से गणित येथे लावता येत नाही. ही भावना असल्या कारणाने मूल्यमापन करता येत नाही. आपला प्रतिसाद प्रगल्भ आहेच आहे. त्या प्राध्यापकानेदेखील हेच म्हटले आहे की ही निसरडी व्याख्या उदाहरणांच्या द्वारे मांडायचाअल्पसा॑ प्रयत्न ते करत आहेत. (The following is a sampling of sexy web finds: clips of art, dance, film and music that capture-for me-the slippery, intoxicating essence of what sexy is.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

शेवटी ठुमकते शरीर असो किंवा

बॅटमॅन
गुरुवार, 06/21/2012 - 13:19 नवीन
शेवटी ठुमकते शरीर असो किंवा त्याला मिळालेली अमूर्त गोष्टींची जोड असो, आरूनफिरून सेक्श्युअली अपील होण्यापर्यंतच गाडी आली ना? विषय कट. सेक्स म्हणजे या ना त्या प्रकारे कामोत्तेजना होणे हाच ढोबळ आशय तुमच्या प्रतिसादावरून जाणवतो आहे. पेठकरकाका तरी यापेक्षा वेगळे असे काय म्हणाले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

निखल्या कै तरी गफलत होतेय

जेनी...
गुरुवार, 06/21/2012 - 22:02 नवीन
निखल्या कै तरी गफलत होतेय तुझी ' सेक्स ' नै रे ' सेक्सी ' अर्थ बदलतात की रे :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सेक्स हे नाम तर सेक्सी हे

बॅटमॅन
गुरुवार, 06/21/2012 - 23:17 नवीन
सेक्स हे नाम तर सेक्सी हे विशेषण, जरा गफलत झाली तरी भापो तीच गं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

निखल्या कै तरी गफलत होतेय

जेनी...
गुरुवार, 06/21/2012 - 22:02 नवीन
निखल्या कै तरी गफलत होतेय तुझी ' सेक्स ' नै रे ' सेक्सी ' अर्थ बदलतात की रे :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

प्रतिसाद

lakhu risbud
गुरुवार, 06/21/2012 - 23:33 नवीन
पेठकर काकांचा सहजरावांचा,अर्धवटरावांचा प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पुरुषाम्च्या बाबतीत सेक्सी की

विजुभाऊ
Sat, 06/23/2012 - 11:39 नवीन
पुरुषाम्च्या बाबतीत सेक्सी की काय ते कसे ठरवायचे? शोलेतला राकट अमजद खान सेक्सी ठरतो का? सलमान खानप्रमाणे बर्‍याच चित्रपटातला उघडावाघडा हरीष पटेल सेक्सी ठरतो का? नाजूक चणीचा शाहीद कपूर सेक्सी ठरतो का? देखणा दिसणारा फिरोज खान सेक्सी ठरतो का? बुलंद गडगडाटी आवाजाचा अमरीश पुरी सेक्सी ठरतो का? स्लीम देव आनंद /ढोल्या राजकपूर / सदैव गंभीर दिलीप कुमार/ चौकोनी ठोकळा विश्वजीत यापैकी कोणाला सेक्सी म्हणता येईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

आणि डोक्यावर केस नसलेला

नाना चेंगट
Sat, 06/23/2012 - 11:40 नवीन
आणि डोक्यावर केस नसलेला शाकाल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

उत्तम चर्चा

स्पा
गुरुवार, 06/21/2012 - 11:44 नवीन
अविनाश कु. श्रिराम दिवट आदि मान्यवरान्च्या प्रतिक्शेत . :-) अनसेक्सि स्पा
  • Log in or register to post comments

"अनसेक्सि स्पा" सविस्तर

शैलेन्द्र
गुरुवार, 06/21/2012 - 13:44 नवीन
"अनसेक्सि स्पा" सविस्तर खुलाशाबद्दल अनेकांनी धन्यवाद दीले असतील.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

सविस्तर खुलाशाबद्दल अनेकांनी

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 06/21/2012 - 18:50 नवीन
सविस्तर खुलाशाबद्दल अनेकांनी धन्यवाद दीले असतील.. Image removed. Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

"अनसेक्सि स्पा"सविस्तर

शैलेन्द्र
गुरुवार, 06/21/2012 - 13:50 नवीन
प्रकाटाआ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

आठवण

तिमा
गुरुवार, 06/21/2012 - 20:50 नवीन
अविनाश कु. श्रिराम दिवट आदि मान्यवरान्च्या प्रतिक्शेत या प्रतिसादावरुन 'कुणाच्यातरी पंचांगात बारा महिने भाद्रपद' असा मागे एक वाचलेला शेरा आठवतो. तो आठवून हंसू आले. बाकी 'कुणाला काय सेक्सी वाटेल ते आजकाल सांगता येत नाही ,' हे निरीक्षण नोंदवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

बाकी 'कुणाला काय सेक्सी वाटेल

शुचि
गुरुवार, 06/21/2012 - 20:56 नवीन
बाकी 'कुणाला काय सेक्सी वाटेल ते आजकाल सांगता येत नाही ,' हे निरीक्षण नोंदवतो.
हाहा ..... खाली संजयजींनी म्हटले आहेच आजकाल मुली काहीही सेक्सी म्हणतात. काय सेक्सी चहा आहे वगैरे =)) मी कवाची त्यावरून हसतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

फारच उशिरा कळलं

एमी
गुरुवार, 06/21/2012 - 21:10 नवीन
फारच उशिरा कळलं तुम्हाला...'सेक्सी नुडल्स' हा शब्दप्रयोग मी २००२ मधे ऐकलाय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

हा हा हा

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 06/21/2012 - 12:40 नवीन
उदाहरणार्थ - कोका कोलाची जाहीरात आणि त्यामधील हसरी अन अतिशय बांधेसूद तरुणी, विशेषतः पार्श्वभूमीवरील होकारार्थी उद्गार-
ते होकारार्थी उद्गार म्हणजे खरेतर एका प्रसिद्ध वन लाइनरची कमाल आहे. "Sex is not the answer. Sex is the question. 'Yes' is the answer."
  • Log in or register to post comments

गहन विषय

जे.पी.मॉर्गन
गुरुवार, 06/21/2012 - 12:47 नवीन
पुढच्या कट्ट्याला हा विषय झीरो अवरला चर्चिला जावा अशी मागणी करत आहे. मला खात्री आहे की २ - ४ पेग्जनंतर अश्या प्रतिक्रिया यायला लागतील की एक ग्रंथ छापायला लागेल ! 'सेक्सी' म्हणजे काय हे असं शब्दांत मांडण्यासारखं नाही हो शुचितै ! उगाच एक विचारचक्र सुरू केलंत. छ्या... कुठून हा धागा वाचायला घेतला... आत वाचनखुण मारावी लागणार ! ;) जे पी
  • Log in or register to post comments

ग्रंथ नाही, ग्रंथमाला म्हणा

बॅटमॅन
गुरुवार, 06/21/2012 - 13:02 नवीन
ग्रंथ नाही, ग्रंथमाला म्हणा जेपी साहेब ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जे.पी.मॉर्गन

पेठकर काकांची व्याख्या जास्त रास्त आहे.

jaypal
गुरुवार, 06/21/2012 - 12:48 नवीन
जुन्या जमान्यातील हुमाखान, बिंदु, सिल्क स्मिता,हेलन्,जयश्री टी,मेडोना,समंताफॉक्स पासुन ते अलिकडील माधुरी,काजोल, मिनाक्षी श्रीदेवी, मनिषा,केतरीना, प्रियांका पर्यंत ब-याच जणी मला सेक्सी वाटत आल्या आहेत. माझा मुड चांगला असतो तेंव्हा ब-याच गोष्टी मला सेक्सी दिसतात आणि मुड खराब असेल तेंव्हा ब-याच सेक्सी गोष्टीं कडे बघुन मुड चांगला बनवतो. ;-)
  • Log in or register to post comments

>>माझा मुड चांगला असतो

बॅटमॅन
गुरुवार, 06/21/2012 - 13:01 नवीन
>>माझा मुड चांगला असतो तेंव्हा ब-याच गोष्टी मला सेक्सी दिसतात आणि मुड खराब असेल तेंव्हा ब-याच सेक्सी गोष्टीं कडे बघुन मुड चांगला बनवतो. Wink शीक्रेटं अशी उघडत नका जाऊ हो जैपालभौ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा