✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ईंग्रजी बाळ्या आणि देशी कार्टं

म
मराठमोळा यांनी
Wed, 06/13/2012 - 21:07  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी, हा धागा काढायचं प्रयोजन सांगणं थोडं कठीण आहे पण तसं पहाता आपण सर्वच यात कदाचित मोडतो म्हणून. खरं तर मालिका लिहायला हवी पण आजकाल लोकांना फास्ट्फुडची सवय आहे म्हणून थोडक्यात. ;) ईंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं हे सर्वज्ञात आहेच, पण जी छाप आपल्यावर पडली आहे ती पिढ्यान् पिढ्या राहील असे दिसते. तशी ती इंग्रजांनी राज्य केलेल्या सर्व देशात दिसते खरी, पण आपल्याकडे जरा जास्तच, नाही का? ;) आत्मापरीक्षण तसेच आलेले काही स्वानुभव मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. अनिवासी भारतीय : अतिशय क्लिष्ट मुद्दा.. बरं मुद्दा मुद्द्यासहितच मांडतो. १. काही लोक्स १ महिन्यासाठी भारताबाहेर जातात ( काही नेपाळ मधे पण) आणि फोरेन रिटर्न असं लग्नाच्या बायोडेटा मधे लिहितात. २. आल्यावर हे लोक्स "शी भारतात किती घाण आहे, लोकं किती चुकीचं ईंग्रजी बोलतात, आय हेट धिस" वगैरे बोलतात. ३. यांना नीट मराठी बोलता येत नाही, २०-३० वर्षे भारतात राहिल्यानंतर पण, भारतात राहिलो याचं दु:ख यांना फार. ४. आम्ही कसे फोरवर्ड आहोत, आणि तुम्ही कसे घाणेरडे आहात हे दाखवण्यात यांना फार स्वारस्य असते. ५. भारताच्या पॉलिटीक्स मधे हे लोकं फार नाक खुपसतात, जसं काय ह्यांच्या सांगण्याने सो कॉल्ड भारतीय पॉलिटीशियन अ‍ॅक्शन घेणार आहेत. अजुन बरेच मुद्दे आहेत, प्रतिसादक मांडतीलच. बरं एमएनसी मधे काम करणारे.. १.यांना असं वाटतं की हे आभाळातून टपकले आहेत. रोज "आम्ही अ‍ॅडव्हान्स्ड आहोत" अशी आरोळी ठोकणारे संध्याकाळी बायकोला शिव्या घालत.. काय कलयुग आला आहे, बायको नवर्‍याची सेवा करत नाही" असं म्हणत आराम खुर्चीवर बसणारे. २. आयटीवाल्यांनी भारताची कशी वाट लावली हा यांचा रोजचा चर्चेचा विषय, त्यांचे पगार कसे कमी करावेत हा गहन चर्चेचा विषय. आई-बाप, काका-मामा १. आमचा मुलगा फॉरेन मधे काम करतो. २. मुलगी आयटीतली पाहिजे. ३. आमच्या मुलाला ६ लाख पगार आहे. (डॉलरचा पगार रुपयात कन्वर्ट करुन, तिथे तो भिक मागून का राहिना) ईतर १. ए, चांगलं ईंग्लिश बोलता येतं का? २. पिझ्झा हट, अय्या.. जावु ना.. ते भाकरी झोपडी नको.. ३. क्रेझी जॉन.. किती छान.. वेडा माध्या हॉटेल नको मी स्वतः एकदा हापिसच्या कँटीन (खानावळीमधे) गेलो होतो, तिथे "डिलाइट कॉर्नर" नावाचा एक "स्टॉल" होता, मी विचार केला की जर हा मराठीत ( आनंदी कोपरा) किंवा हिंदीत (खुश कोना) असतं तर आपण गेलो असतो का? आपण आजही एखाद्याच्या ई़ंग्रजी बोलण्यावरुन तो/ती किती हाय-फाय आहे हे न-जाणतेपणे ठरवतो. त्याच्या/तिच्या राहणीमानावरुन "सो चिप" किंवा "सो गुड" म्हणतो. हे खरं आहे ना. एखादा/दी भारताबाएर राहुन आला/ली आहे की नाही यावरुन आपण अनुमान लावतो.. ते कितपत बरोबर आहे? पण हे कितपत खरं आहे? हा प्रश्न उभा आहे.. तुमच्याकडे उत्तर आहे का? आणखीन अपेक्षित आहे प्रतिसादामधून.. आपला, मराठमोळा
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22813 वाचन

💬 प्रतिसाद (104)

प्रतिक्रिया

काड्या ? नाही नाही या तर

नाना चेंगट
गुरुवार, 06/14/2012 - 19:22 नवीन
काड्या ? नाही नाही या तर समिधा. फक्त या आधुनिक समिधा असुन पुराणमतवादी वैदिक यज्ञाच्या पुनरुज्जीवनासाठी आहेत हो ! असा संशय घेऊ नका त्यांच्यावर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

समिधाच सख्या या..

मेघवेडा
Fri, 06/15/2012 - 13:28 नवीन
'आंतर(जाल)अग्नि क्षणभर तरी फुलवावा' म्हणून का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

उच्च!

नंदन
Sat, 06/16/2012 - 00:27 नवीन
>>> 'आंतर(जाल)अग्नि क्षणभर तरी फुलवावा' म्हणून का? उच्च! :) शिवाय ह्या कवितेतही 'दूरस्थ कुणी' आहेच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

हा, हा....

प्रदीप
Sat, 06/16/2012 - 17:37 नवीन
'समिधां'चा उल्लेख झाल्यावर कुणीतरी हा फुलटॉस सोडणार नाही असे वाटले होतेच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

मगर इसका नाम तो इंग्लिश है.

सूड
गुरुवार, 06/14/2012 - 14:01 नवीन
असा हुच्चपणा फक्त अनिवासी वैगरे दाखवतात असं नाही. ह्याच वीकांतात घडलेला किस्सा. मुरुडला गेलो होतो, रात्रीची जेवणं झाली आणि सोबतच्यांपैकी दोघांना आईस्क्रीम खाण्याची लहर आली. शोधत निघालो वाटेत 'कावरे' आईस्क्रीमच्या एका दुकानात गेलो. तिथला पेशवाई फ्लेवर नवीन वाटला म्हणून ट्राय केला. बर्‍यापै़की होता चवीला. सोबतचे दोघेही 'शाह'. खाताना चापून खाल्लं पण त्यांनी खिशात हात घालेपर्यंत मी पैसे देऊन टाकले होते. दुसर्‍या दिवशी परत यांना आईस्क्रीम खायची लहर आली. वाटेत 'हॅवमोर'चा व्हॅनिलाचा एकेक कप सफाचट केला दोघांनी. नंतर माझ्याशी चर्चा: शाह ज्युनियरः दादा, मेरे को वो कल का कावरे का पेशवाई बिल्कुल पसंद नही आया, उससे ये 'हॅवमोर' का व्हॅनिला अच्छा था. (काल तेच चवीचवीनं खाल्लं होतं) मी: क्या हुआ उस में क्या बुरा था ? शा ज्यु: वो इंडियन ब्रँड था ना. मी: तो ये 'हॅवमोर' भी इंडियन ही है. (माहित नाही पण ठोकून दिलं.) शा ज्यु: मगर इसका नाम तो इंग्लिश है. या वाक्यावर काय बोलावं तेच कळेना.
  • Log in or register to post comments

च्यायला या मानसिक

बॅटमॅन
गुरुवार, 06/14/2012 - 15:38 नवीन
च्यायला या मानसिक गुलामांच्या.......हा किस्सा वाचून मीपण मनातल्या मनात अवाक् झालो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हा हा हा बघ तुला नवा धडा

रेवती
गुरुवार, 06/14/2012 - 19:12 नवीन
हा हा हा बघ तुला नवा धडा मिळाला. ;) हवं तर 'लेसन' म्हण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ळॅसन

आनंदी गोपाळ
Fri, 06/15/2012 - 13:51 नवीन
णवा ळेसण लक्साट ठेवा. शा लोकांसाठी पैशे भरत जाउ नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मला काही कळाले नाही.

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 06/14/2012 - 14:10 नवीन
ममोला नक्की काय विचार मांडायचे आहेत तेच कळाले नाही. माझ्या बघण्यात तर अगदी उलट परिस्थिती आहे. परदेशातून एखादी व्यक्ती भारतात आली, की एखादा देव अथवा असामान्य माणूस आल्यासारखे इथले काही लोक त्याच्या मागे पुढे करायला लागतात. तो माणूस कितीही माय मराठीत गप्पा मारायला उत्सुक असला तरी बळंच 'यू सी' ' यू क्नो व्हॉट' वैग्रे करत त्याला जेरीला आणतात. माझ्या माहितीत असे बरेच अनिवासी आहेत ज्यांना भारतात आल्यावरती बस, लोकल इ. मधून प्रवास करायला काहिही हरकत नसते. पण इथलेच काही महाभाग त्यांना 'तु होता तेंव्हा बरीच चांगली परिस्थीती होती रे. आता टोटल वर्स्ट. ट्रॅफिकची पार वाट लागली आहे. सगळे असुरक्षित आहे. मी बेटर तुला न्यायला येतो, किंवा तू रिक्षा कर.' असली महान माहिती ऐकवतात. मग उद्या तो परदेशात जाऊन बोंबलला, तर त्याला दोष का द्या ? हे परदेशी मित्र भेट ठरवा म्हणायला लागले, की इथल्या आमच्या मित्रांना ताबडतोब किव्हाज, पिझा हट असली ठिकाणेच आठवतात. कारण आलेला माणूस तिथेच जायला उत्सुक असणार किंवा तो दुसरीकडे कुठे बसूच शकणार नाही अशी आपणच आपली समजूत करुन घेतलेली असते. मी वैयक्तिकरीत्या मिपावरच्या देखील बर्‍याच अनिवासी / परदेशात कामानिमीत्त राहून आलेल्या मिपाकरांना भेटलेलो आहे. कोणाच्याही वागण्या बोलण्यात मला वरीलपैकी कुठलाही दोष कधीच आढळलेला नाही. अगदी 'खुर्ची कशाला च्यायला !' असे म्हणत माझ्या दुकानाच्या पायर्‍यांवरती पाय पसरुन मस्त बसून गप्पा मारणारे सहजराव, मुसु ही उदाहरणे तर अगदी बोलकी. हा धागा काढणार्‍या हलकट माणसाला देखील अनेकदा भेटलो आहे. त्याच्या देखील वागण्यात असे काही दोष आढळले नाहीत. निदान शेवटच्या भेटीपर्यंत तरी. ;)
  • Log in or register to post comments

परा, तुझ्या म्हणण्यात तथ्य

मराठमोळा
Fri, 06/15/2012 - 07:16 नवीन
परा, तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे खरं. सगळेच अनिवासी अर्ध्या हळकुंडात पिवळे होत नाहीत, आणि सगळेच ईंग्रजी तो बाळ्या असं म्हणत नाहीत. जे जे ईंग्रजी किंवा पाश्चात्य ते ते उत्तम, बरोबर आहे अशी बहुतांश लोकांची समजूत झालेली आहे, मग ते ईंग्रजी बोलणं असेल किंवा खरेदीसाठी एखादा पाश्चात्य ब्रँड. ईंग्रजी खाणं स्टँडर्ड असते आणि आपले नाही. सगळी फॅशन बाहेरुनच भारतात येते. काही उदाहरणं देतो. १. माझा एक महाभाग मित्र ५ महिने भारताबाहेर राहुन आला. आल्यानंतर त्याने किती तरी दिवस सगळ्यांना तो भारतीय नाही याचीच जाणीव करुन देत होता. "मला इथलं हवामान सहन होत नाही.", "मला इथल्या जेवणाची सवय राहिली नाही" ,"ऑईली जेवण मला चालत नाही" असे एक ना अनेक २. या केस मधे एक भारतीय मराठी जोडपं ऑस्ट्रेलियात आल्यापासून स्थानिक लोक नसतील इतके स्वतः फिरंगी झाले आहेत. ऑफिसमधे जेवण करायला हा व्यक्ती फिरंगी जेवण आणतो, भारतीय लोकांबरोबर जेवण टाळतो, येता-जाता भारतीय लोकांच्या चुका शोधणे, त्यावर फिरंग लोकांसोबत जोक करणे असले प्रकार करतो, त्याला भारतात वाढलो याचं खुप दु:ख आहे आणि भारतात होता तेव्हा तो किती "चीप" रहात होता, आता कसा हाय फाय आहे. लवकरच त्याला भूत्काळ विसरायचा आहे कारण तो आता भारतीय राहिलेला नाही. अशी बरीच उदाहरणे देता येतील, मराठी बोलण्याची लाज वाटणारे, वर सूडने उदाहरण दिलं तसं ईंग्रजी नाव असेल तर भारी, इतर बकवास असा फरक करणारे. लोक सुद्धा कुणी परदेशात गेला असेल तर त्याचं कौतुक करणार आणि एखाद्याच नशीब नसेल तर मग त्याला कमी लेखणार. चांगलं ईंग्लिश बोलता येणे ही काळाची गरज असली तरी कित्येक लोकं आहेत की ज्यांना ईंग्रजी येत नसलं तरी त्यांनी अभिमान वाटावा अशी कारकिर्द घडवली आहे. युरोपात देखील कितीतरी देशात लोकांना नीट ईंग्रजी बोलता येत नाही पण ते त्यांच्या देशात काम चांगलं करीत आहेत. एक तेलगु मुलगा होता माझ्या आधीच्या कंपनीमधे, तो कंपनीला म्हणायचा की मला ऑनसाईटला पाठवा, पैसे मी देतो, पगार अर्धा दिला तरी चालेल पण पाठवा. कारण काय तर म्हणे हुंडा डबल मिळेल ऑनसाइटला जाउन आला की. :) नोकरीच्या निमित्ताने परदेशात जाणे, स्थायीक होणे, मोठ्या कंपनीत काम करणे, काळाबरोबर चालणे ह्या ओघाने येणार्‍या आणि ज्याच्या त्याच्या ईच्छेच्या गोष्टी आहेत, पण मग यात खोटेपणा नसावा, स्वत:ची लाज वाटु नये आणि आपल्यामुळे आपल्या देशाचा, माणसांचा अपमान होऊ नये याची काळजी घेतली जावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अशा

चिरोटा
Fri, 06/15/2012 - 11:44 नवीन
पण अशा लोकांची संख्या कमी होत आहे. किंबहुना 'ईतके वर्षे बाहेर रहात असला तरी अजूनही खूप साधा आहे.(मुल्ये वगैरे) विसरला नाही' अशांची संख्या जास्त आहे. आमचा एक मित्र युरोपातून वर्षातून एकदा मुंबईत आला की लोकल ट्रेनने मुद्दामून जातो.नातेवाईकांमध्ये ही 'बातमी' कशी होईल ह्याची तयारी व्यवस्थित तो करतो.आणि एक मित्राला फिरताना कांदा भजी खायची लहर येते.मग हॉटेलात जाण्याऐवजी/घरी खाण्याऐवजी त्याला कुठल्याशा टपरीवरच कांदाभजी खायची असते.तशी कांदाभजी न्यु जर्सीत कुठेच मिळत नाही असे कौतुकही होते.आणि एका मित्र भारतात आला की त्याला जुनी मराठी पुस्तके वाचायची असतात्.जी.ए./कुरुंदकर वगैरे लेखकांची पुस्तके ते जाताना घेवून जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

पूर्वी मीसुद्धा असं

एम.जी.
गुरुवार, 06/14/2012 - 15:50 नवीन
पूर्वी मीसुद्धा असं लिहायचो... एनाराय झाल्यापासून नाही लिहीत.. काही खरं नसतं. माझा एक मेव्हणा कुठेही गेलो की बिल भरताना " रुपयात इतके म्हणजे तुमच्याकडचे किती " असं विचारून कन्व्हर्ट करतो आणि त्यानंतर " इतके म्हणजे तुम्हाला फार नाही..." असं म्हणून मलाच बिलं भरायला लावतो...
  • Log in or register to post comments

काय हो मराठमोळा साहेब तुम्ही कधी गेलात परदेशात ?

तात्या विंचु
Fri, 06/15/2012 - 03:14 नवीन
काय हो मराठमोळा साहेब तुम्ही कधी गेलात परदेशात ? एकदा जावून या आणी बोला ... :-)
  • Log in or register to post comments

आले होते की ममो अमेरिकेत. मला

रेवती
Fri, 06/15/2012 - 03:33 नवीन
आले होते की ममो अमेरिकेत. मला वाटतं ऑस्ट्रेलियातही होते काही दिवस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तात्या विंचु

मध्ये मुंबईला आला होता काही

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 06/15/2012 - 10:17 नवीन
मध्ये मुंबईला आला होता काही महिने. आता पुण्याचा माणूस पुण्याबाहेर पडला म्हणजे परदेशी जाण्यासारखेच झाले की नाही. परत गेल्यावर पर्वतीपेक्षा जीवदानी उंच आहे म्हणत होता. दिल्ली दरबार सारखी बिर्याणी पुण्यात मिळत नाही असे पण म्हणाला. आणि चक्क सारसबागेतील तळ्यापेक्षा ठाण्याचा तलाव चांगला आहे असेही म्हणाला. आत्ता बोला, स्वदेशाचा अभिमान सोडून असे परदेशाचे गुणगान करणे शोभते का ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तात्या विंचु

ठ्ठो!!!!!

प्रदीप
Fri, 06/15/2012 - 10:52 नवीन
:) :) :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

+१

बिपिन कार्यकर्ते
Fri, 06/15/2012 - 12:00 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

+२

श्रावण मोडक
Fri, 06/15/2012 - 15:08 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

विमे अ‍ॅज युज्वल इन

प्यारे१
Fri, 06/15/2012 - 11:08 नवीन
विमे अ‍ॅज युज्वल इन फॉर्म...! इट्स अ ब्राईट सन्नी डे हिअर अ‍ॅन्ड वी हॅव ममो ऑन स्ट्राईक विथ विमे अ‍ॅट द अदर एन्ड. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

हाण्ण!

नंदन
Fri, 06/15/2012 - 12:05 नवीन
आता पुण्याचा माणूस पुण्याबाहेर पडला म्हणजे परदेशी जाण्यासारखेच झाले की नाही. परत गेल्यावर पर्वतीपेक्षा जीवदानी उंच आहे म्हणत होता. दिल्ली दरबार सारखी बिर्याणी पुण्यात मिळत नाही असे पण म्हणाला. आणि चक्क सारसबागेतील तळ्यापेक्षा ठाण्याचा तलाव चांगला आहे असेही म्हणाला. आत्ता बोला, स्वदेशाचा अभिमान सोडून असे परदेशाचे गुणगान करणे शोभते का ??
अगागागा! दंडवत स्वीकारावा, विमे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

>>आता पुण्याचा माणूस

सूड
Fri, 06/15/2012 - 13:52 नवीन
>>आता पुण्याचा माणूस पुण्याबाहेर पडला म्हणजे परदेशी जाण्यासारखेच झाले की नाही. ह्या वाक्यासाठी हॅट्स ऑफ !! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

विमे विमे कुठे फेडणार ही

मराठमोळा
Fri, 06/15/2012 - 14:34 नवीन
विमे विमे कुठे फेडणार ही पापं? ;) आता पुणेकरांना यात खेचायची गरज होती का? आणि मी आपलं मुंबईला रहाणं नको नकोसं झालं असताना आपलं मानलं, एका पुणेकराने सगळा जाज्वल्य अभिमान बाजूला ठेवून मुंबईची तारीफ केली तर वर हे ऐकायला लागतय... अरेरे.. डोळे पाणावले. बाकी चालु द्या.. मुंबईकर विमे, धाग्याचा पुरेपूर अभ्यास केलाय आणि अलर्ट लावून बसलाय जणू :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

चला

रमताराम
Fri, 06/15/2012 - 14:48 नवीन
इतके बार फुसके गेले पण 'पुणे' म्हटलं (रामबाणच हो, वाया कसा जाईल) की लग्गेच धागा धडधडू लागला. नाना, चल ये समिधा टाकायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

आमच्याकडे अजुन एक - दोन

मृत्युन्जय
Fri, 06/15/2012 - 15:06 नवीन
आमच्याकडे अजुन एक - दोन रामबाण आहेत म्हटलं ;) सनातन पुणेरी ब्राह्मण ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

त्यांनी काय करायच?

आनंद घारे
Fri, 06/15/2012 - 06:29 नवीन
आजकाल काही काही लोकांच्या घरातच एकादा विंग्रजी बाळ्या / बाळी आणिक एकादं देशी कार्ट/ कार्टी असतात. लई पंचाईत होते बघा!
  • Log in or register to post comments

नाही, पण मी काय म्हणते, असे

कवितानागेश
Fri, 06/15/2012 - 08:09 नवीन
नाही, पण मी काय म्हणते, असे उगीच देश देश , भाषा भाषा , वरण भात वगरै आग्रह करत रहाणे म्हनजे मागालसेपणाचे लक्षण नाही का? कधी 'ग्लोबल' होणार आपण लोक्स? त्याशिवाय प्रगती कशी व्हायची? शिवाय आपण 'विश्वबंधुत्व'वाले नाही का? मग का बरे परदेशाला असे कमी लेखायचे? ........ ......... .......... ..... असेच काहीबाही...... पुरे. :)
  • Log in or register to post comments

शतक साठी

नाखु
Fri, 06/15/2012 - 09:57 नवीन
माझि एक धाव..
  • Log in or register to post comments

इंग्रज?

मेघवेडा
Fri, 06/15/2012 - 15:38 नवीन
नाही, पण मी काय म्हणतो, 'इंग्रजी' बाळ्याचा विषय असताना सगळे अमेरिकेला धरून का बसलेत? अमेरिकन्स आणि इंग्रजांत काही फरक आहे की नाही म्हटलं?
  • Log in or register to post comments

असेल असेल. फरक असेल पण जगात

रेवती
Fri, 06/15/2012 - 17:50 नवीन
असेल असेल. फरक असेल पण जगात भारी अमेरिकावारी! ;) (मग इकडे आमचे कंबरडे मोडलेले का असेना!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

+१

रमताराम
Fri, 06/15/2012 - 18:06 नवीन
ह्या बाकी बराबर हां. जल्ला ते अमेरिकन म्हंजे इंग्लिश लोकांच्या उलटे हो. हे लोक चा पितात ते काफी. हेंच्याकडे डावीकडून गाडी चालवतात त्यांच्याकडे उजवीकडून. हे शिष्टाचाराचे पक्के तर ते अर्धी चड्डी घालून रस्त्याने बर्गर खात खात जाणार, हेंच्याकडं बटन खाली केलं का लैट चालू व्हतोय तर तेंच्याकडं वर केल्यावं. येकडाव कशाबाबत मी 'तुमी लोक असं उलट काऊन करतावं, तसं काऊन नाय करत, सोपं हाय न्हवं?' आसं इचारलं तर 'नो, दॅट इज सो ब्रिटिश' आसं उत्तर येका पाकिस्तानी-आम्रिकनानं धिलं व्हतं, आता बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

यू!

मेघवेडा
Fri, 06/15/2012 - 18:54 नवीन
एकदा दोघांचं भांडण चालू असता आम्रिकन कार्ट्यानं चिडून इंग्लिश बाब्याला म्हटलं "We'll take you out" इंग्लिश बाब्या उत्तरला "No wonder you spell 'colour' as 'color' mate!" ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

अरेच्या

रमताराम
Sat, 06/16/2012 - 00:13 नवीन
पण mate हा टिपिकल अमेरिकन शब्द ना. मला नेहमीच गंमत वाटत आली आहे. कुणीसं आम्रिकन म्हटले की अरे 'रुम-पार्टनर' म्हणत नाही आम्ही, रूम-मेट म्हणतो. पार्टनर चा अर्थ जोडीदार असा घ्यायचा. हे म्हणजे उलटच झालं की नाही. 'The one who 'mates' is called a partner and the one who doesn' mate, is called a mate' आहे की नाही गंमत. :) या आम्रिकनांचं डोकंच उलटं ब्वॉ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

मला तर पार्ट-नर हा शब्दही

आनंदी गोपाळ
Sat, 06/16/2012 - 12:55 नवीन
मला तर पार्ट-नर हा शब्दही गमतीदारच वाटतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

आलं यांच इंगंडप्रेम उफाळुन

गणपा
Fri, 06/15/2012 - 18:31 नवीन
आलं यांच इंग्लंड प्रेम उफाळुन लगेच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

अपेक्षाभंग...

योगप्रभू
Fri, 06/15/2012 - 17:55 नवीन
बाळ्या हे बाळी शब्दाचे अनेकवचन समजून उत्सुकतेने धागा वाचू लागलो, पण पुढे विषय गंभीर तत्त्वज्ञानाचा आल्याने अपेक्षाभंग झाला. :)
  • Log in or register to post comments

अरे काय हे

रमताराम
Fri, 06/15/2012 - 18:43 नवीन
निम्म्या गवर्‍या गेल्या की हो, आं? आता 'हरिभजनाविण काळ घालवू नको रे' प्रभूदेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

अनुभव

श्रावण मोडक
Fri, 06/15/2012 - 20:55 नवीन
त्यांचे एक अनुभवकथन येणार आहे लवकरच - पांढरे केस, हिरवे मन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

शीर्षक बदललंय...

योगप्रभू
Sat, 06/16/2012 - 09:45 नवीन
श्रामो, ते अनुभवकथन माझे नाही. लिहिलेच तर ते 'तरुण आहे गात्र अजुनि' नावाने लिहीन. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

अच्छा

रमताराम
Sat, 06/16/2012 - 11:23 नवीन
म्हणजे हे सांगण्यासाठी/पटवण्यासाठी पुस्तक लिहायची वेळ आलीये म्हणायची....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

थोडा बदल आहे ररा

चतुरंग
Sat, 06/16/2012 - 02:31 नवीन
'नारीभजनावीण काळ घालवू नको रे' असं आहे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

खरं आहे

रमताराम
Sat, 06/16/2012 - 11:22 नवीन
रंगाशेट, विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे की नित्यानंद (स्पेलिंगी 'निथ्यानंद') स्वामींनी ह्युमन क्लोनिंगचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांचे क्लोन्स देशाच्या वेगवेगळ्या भागात त्यांचे मठ स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. पुण्यातही एकजण आहे म्हणे असे परवाच एका पत्रकार मित्राने सांगितले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

पण अकाली आजोबा नाही झालो अजुन...

योगप्रभू
Sat, 06/16/2012 - 09:41 नवीन
रमता, अरे अभी तो हम जवान है. उगा अकाली वृद्धत्व मिरवण्यात काय गंमत? तुला भजनच्या ऐवजी भोजन म्हणायचे होते का? चांगल्याच कळा आहेत तुझ्या अंगात. मला भजनाचा उपदेश करायचा आणि स्वतः जंगलवाटांवरचे कवडसे न्याहाळत बसायचं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

अरे रे !

परिकथेतील राजकुमार
Sat, 06/16/2012 - 11:51 नवीन
शिनिअर शिटिझन्सनी एक तरुण उगवत्या सदस्याचा धागा हायजॅक केलेला बघून शरम वाटली. विषयांतर करणरे इतके प्रतिसाद पाहून मिपाकरांना दिलेल्या सुटीचा किती प्रचंड गैरवापर होतो आहे हे पाहून खूप वाईट वाटले..! सदर धाग्याचा श्री बिपिन कार्यकर्ते, रमताराम, योगप्रभु आणि चतुरंग यांनी खरडफळा सजमून जो दुरुपयोग केला आहे याची मिपाचा सदस्य म्हणून मला अत्यंत लाज वाटते...! मिपावर जास्तीत जास्त मोकळे व खेळकर वातावरण ठेवले आहे याचा गैरफायदा कसा घ्यावा याचं हा धागा म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे... वरील चौघांच्या अनावश्यक आणि वाहवत जाणार्‍या विषयांतराकरता मी उर्वरीत मिपाकरांची हात जोडून क्षमा मागत आहे.. परातात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

अरेरे

रमताराम
Sat, 06/16/2012 - 13:12 नवीन
नित्यानंदांच.... आय मिन योगप्रभूचं अध्यात्माचं दुकान चालू झालं की आपलं बुडणार हे ध्यानात येऊन स्वामी परेंद्रांनी जो त्रागा चालवला आहे हे पाहून एक अध्यात्मिक मिपाकर म्हणून शरम वाटली. ता.क.: स्वामी योगेंद्रांच्या मठात कार्यकारी अधिकार्‍याची जागा परेंद्रांना द्यावी असे योगेंद्रस्वामी म्हणत होते परवा. मठाचे सगळे आर्थिक व्यवहार सांभाळायला एवढा लायक माणूस दुसरा कुठला, असं म्हणत होते. ता.क.२: त्याबदल्यात ते किरकोळ फेवर मागत आहेत ते म्हणजे सौंदर्यफुफाट्याचा डेटा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अज्ञान !

परिकथेतील राजकुमार
Sat, 06/16/2012 - 13:31 नवीन
नित्यानंदांच.... आय मिन योगप्रभूचं अध्यात्माचं दुकान चालू झालं की आपलं बुडणार हे ध्यानात येऊन स्वामी परेंद्रांनी जो त्रागा चालवला आहे हे पाहून एक अध्यात्मिक मिपाकर म्हणून शरम वाटली.
परवाच आमची व योगप्रभूंची एक अत्यंत खाजगी बैठक झाली, ज्यात आम्ही व त्यांनी ह्यापुढे एकत्रच दुकान चालवायचे ठरवले आहे. ह्या निर्णयाला आशिर्वाद द्यायला परमश्रेष्ठ श्री. यक्कु स्वामी खुद्द उपस्थीत होते. आता बोला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

आपलं काय ठरलंय?

नंदन
Sat, 06/16/2012 - 13:34 नवीन
हा परस्पर-खोड-सामंजस्याचा ऐतिहासिक पुणे करार आठवला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

बिंगो

रमताराम
Sat, 06/16/2012 - 20:40 नवीन
एकुण गुपितं काढून घेण्याचं आमचं कौशल्य वादातीत आहे हे पुन्हा सिद्ध झाले. थोडक्यात हिटलर नि मुसोलिनी आधीच भेटले होते तर. मग याबाबत आमच्यासारख्या स्टॅलिनला अंधारात ठेवणे ओघाने आलेच. पण शेवटी तुमचं स्टॅलिनग्राड आम्हीच करू, समजलात. (मठाचे उत्पन्न परस्पर लाटले गेल्याने चिडलेला) कॉ. रमताराम. (अर्र, हा प्रतिसाद कोटिभास्करांना कस्काय पडला?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

चारचाकी मध्ये पण असच काहिस आहे..लोकाचं

इंद्रवदन१
Fri, 06/15/2012 - 22:43 नवीन
मारुती गाडी कमी दर्ज्याची समजली जाते आणि हो‌‍‍ंडआ हुच्च ....
  • Log in or register to post comments

विमे आता पुणेकरांच्या रडारवर

निनाद मुक्काम …
Fri, 06/15/2012 - 23:56 नवीन
विमे आता पुणेकरांच्या रडारवर आला आहे : पण हश्या हक्काने वसूल करणारा प्रतिसाद होता. परा ह्यांच्या प्रतिसादात त्याने अनिवासी लोकांच्या पाठीमागे रुंजी घालणार्या भारतीयांबद्दल म्हटले आहे. ह्यावरून वार्यावरची वरात आठवली. पु ल देशपांड्यांना गावात ते मुंबईहून आले आहेत हे कळल्यावर गावकरी त्यांना मुंबईज्वर कसा चढला आहे हे "दिल देखे देखो" असा चाचा करत दाखवून देतात. आमच्या कॉलेजातील एका मित्राच्या पंजाबी परिवारात लग्नासाठी अमेरिकेहून भावंड आली होती. तेव्हा मित्राच्या आईने संगीत मध्ये मुलांना विंग्रजी गाण्यावर नाचायला लावले व प्रत्येक वेळी आपण मुंबईत म्हणजे चेंबूर च्या सिंधी केंप मध्ये नेहमी यु ए से चा माल कसा वापरतो हे अभिमानाने सांगितले ( मागाहून कळले की ह्यांचे यु एस ए म्हणजे उल्लासनगर , सिंधी , असोशिएशन ला म्हणतात. पेठकर व शुची च्या प्रतिसादाशी सहमत. आपले ठेवावे झाकून आणि लोकांचे पहायचे वाकून ह्याच प्रवृत्तीने मी अनिवासी भारतीय ह्या नात्याने माझ्या परदेशी पत्नीस मुंबई व भारत दर्शन घडवतो. माझ्या प्रत्येक भारतभेटीत मी भारताच्या विविध राज्यांना भेट देऊन माझाच देश जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. पुढील भारतभेटीत गोव्यावर स्वारी करण्याचे आधीच मिपावर जाहीर केले आहे. योग्य वेळी गवी व टीम गोवा व इतर मिपाकरांचे मार्गदर्शन घेण्यात येईलच. माझ्या निरीक्षणातून मला असे जाणवले की आमच्या लहानपणी आमचे केनेडा व अमेरिकेतून नातेवाईक व भावंडे आली की आम्ही एक न्यून गंडाने पछाडले जाऊन त्यांना तुमचे घर त्या होम अलोन मधील केविन एवढे मोठे आहे का ? त्यांनी आणलेल्या विडीयो गेम वर भिकार्यासारखे तुटून पडणे. एखादे पेन किंवा अंगावरील झबले अमेरिकेतून आले आहे हे समस्त डोंबिवली ला कळे पर्यंत अंगाहून न काढणे व आठवीत मिळालेल्या परदेशी पेनातून शाळांत परीक्षेचा पेपर लिहिणे इत्यादी प्रकार केले. आता मात्र माझ्या शाळेतील वर्गातील अर्धी मुले अनिवासी आहेत व सगळे चेपू वर आहेत. पण आम्ही भारतात येतो तेव्हा आम्हाला कोणीही वेगळी खास वागणूक देत नाही. अनिवासी शब्दाचे अवमूल्यन भारतीय चलनापेक्षा जास्त झाले आहे. व ह्यांचे मला एक भारतीय म्हणून खूप अभिमान वाटतो. भविष्यातील महासत्ता असे परकीय आपले वर्णन करतात. माझे डोंबिवलीतील काही मित्र आता मुंबईत टोलेजंग इमारतीत नवं श्रीमंतांचा झगा चढवून हम किसीसे कम नही अश्या आवेशात आमच्याशी वागतात. हे पाहून जीव सुखावतो. ह्याच भारतीय उच्च मध्यमवर्गीय वर्गावर तमाम बहुराष्ट्रीय कंपन्या डोळा ठेवून असतात. पदवी नंतर आता काय? असे प्रश्नार्थी चेहरे आजकाल दिसत नाहित. अमेरिकन व इतर प्रगत देशातील नोकर्या स्तलांतरित झाल्याने आजकाल भारतात नवीन वर्ग उदयास आला आहे. आयटीत आम्ही आयटी मध्ये आहोत असे न प्रत्यक्ष न सांगता सर्वकाही सांगून जाणारा वर्ग येथे आहे. अश्या सर्व परीस्थितित अनिवासी भारतात येतो आणि महिनाभराच्या अनुभव व आठवणीची सुदाम्याची शिधोरी घेऊन मायदेशी परततो. पैलतीरी वर्षभर ह्याचं शिधोरीतील पोहे चघळून चघळून त्यास जगायचे असते. आता एखाद्या शितावरून उगाच भाताची परीक्षा करण्यास काय हाशील आहे.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद आवडला...

श्रीरंग_जोशी
Sat, 06/16/2012 - 00:17 नवीन
निनादराव - अगदी मनापासून लिहिलंय तुम्ही. शेवटचा परिच्छेद तर मनाला स्पर्शून गेला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा