ईंग्रजी बाळ्या आणि देशी कार्टं
नमस्कार मंडळी,
हा धागा काढायचं प्रयोजन सांगणं थोडं कठीण आहे पण तसं पहाता आपण सर्वच यात कदाचित मोडतो म्हणून. खरं तर मालिका लिहायला हवी पण आजकाल लोकांना फास्ट्फुडची सवय आहे म्हणून थोडक्यात. ;)
ईंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं हे सर्वज्ञात आहेच, पण जी छाप आपल्यावर पडली आहे ती पिढ्यान् पिढ्या राहील असे दिसते. तशी ती इंग्रजांनी राज्य केलेल्या सर्व देशात दिसते खरी, पण आपल्याकडे जरा जास्तच, नाही का? ;)
आत्मापरीक्षण तसेच आलेले काही स्वानुभव मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
अनिवासी भारतीय : अतिशय क्लिष्ट मुद्दा.. बरं मुद्दा मुद्द्यासहितच मांडतो.
१. काही लोक्स १ महिन्यासाठी भारताबाहेर जातात ( काही नेपाळ मधे पण) आणि फोरेन रिटर्न असं लग्नाच्या बायोडेटा मधे लिहितात.
२. आल्यावर हे लोक्स "शी भारतात किती घाण आहे, लोकं किती चुकीचं ईंग्रजी बोलतात, आय हेट धिस" वगैरे बोलतात.
३. यांना नीट मराठी बोलता येत नाही, २०-३० वर्षे भारतात राहिल्यानंतर पण, भारतात राहिलो याचं दु:ख यांना फार.
४. आम्ही कसे फोरवर्ड आहोत, आणि तुम्ही कसे घाणेरडे आहात हे दाखवण्यात यांना फार स्वारस्य असते.
५. भारताच्या पॉलिटीक्स मधे हे लोकं फार नाक खुपसतात, जसं काय ह्यांच्या सांगण्याने सो कॉल्ड भारतीय पॉलिटीशियन अॅक्शन घेणार आहेत.
अजुन बरेच मुद्दे आहेत, प्रतिसादक मांडतीलच.
बरं एमएनसी मधे काम करणारे..
१.यांना असं वाटतं की हे आभाळातून टपकले आहेत. रोज "आम्ही अॅडव्हान्स्ड आहोत" अशी आरोळी ठोकणारे संध्याकाळी बायकोला शिव्या घालत.. काय कलयुग आला आहे, बायको नवर्याची सेवा करत नाही" असं म्हणत आराम खुर्चीवर बसणारे.
२. आयटीवाल्यांनी भारताची कशी वाट लावली हा यांचा रोजचा चर्चेचा विषय, त्यांचे पगार कसे कमी करावेत हा गहन चर्चेचा विषय.
आई-बाप, काका-मामा
१. आमचा मुलगा फॉरेन मधे काम करतो.
२. मुलगी आयटीतली पाहिजे.
३. आमच्या मुलाला ६ लाख पगार आहे. (डॉलरचा पगार रुपयात कन्वर्ट करुन, तिथे तो भिक मागून का राहिना)
ईतर
१. ए, चांगलं ईंग्लिश बोलता येतं का?
२. पिझ्झा हट, अय्या.. जावु ना.. ते भाकरी झोपडी नको..
३. क्रेझी जॉन.. किती छान.. वेडा माध्या हॉटेल नको
मी स्वतः एकदा हापिसच्या कँटीन (खानावळीमधे) गेलो होतो, तिथे "डिलाइट कॉर्नर" नावाचा एक "स्टॉल" होता, मी विचार केला की जर हा मराठीत ( आनंदी कोपरा) किंवा हिंदीत (खुश कोना) असतं तर आपण गेलो असतो का?
आपण आजही एखाद्याच्या ई़ंग्रजी बोलण्यावरुन तो/ती किती हाय-फाय आहे हे न-जाणतेपणे ठरवतो. त्याच्या/तिच्या राहणीमानावरुन "सो चिप" किंवा "सो गुड" म्हणतो. हे खरं आहे ना. एखादा/दी भारताबाएर राहुन आला/ली आहे की नाही यावरुन आपण अनुमान लावतो.. ते कितपत बरोबर आहे?
पण हे कितपत खरं आहे? हा प्रश्न उभा आहे.. तुमच्याकडे उत्तर आहे का? आणखीन अपेक्षित आहे प्रतिसादामधून..
आपला,
मराठमोळा
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हाssण तेझ्याsss!
कसले उत्तर आणि
असे लोकं पाहीलेत बॉ! महीना -
(No subject)
आयडी हॅक झाला का?
फारीन रिटर्न्ड
डिलाईट कॉर्नरबद्दल अजून जाणून
हे
हे
थोडी असहमती
ममो, काय हे? कितीवेळा तेच
रेवती तै, १ नंबर प्रतिसाद,
हा हा हा
थोडि माझिहि असहमति अहे
अनिवासी भारतीय
हम्म...
काळजी नसावी
आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे वाटते.........
तुम्ही लैच सिरियसली घेतलं
ममो, धागा शतकी करण्याची उत्तम
हं?
हॅ हॅ हॅ
निदान
>>ममो, धागा शतकी करण्याची
मान गये. अलगद सचिनला चर्चेत
>>म्हण्जे सचिनसारखं मलाही
.
काही लोकांना "जेन्युइन"
है शाब्बास
सहमत
नाही हो! उलट आम्ही आम्रिकेला
रंगदेवता आणि नाट्यरसिकांना
इट्स माय व्ह्यू, यू नो.....
आत्तापर्यंतचा सर्वांत भारी
उत्तम प्रतिसाद!
काका, स्लमडॉग शिनेमा पाहून
पेठकर काका, ऑनेस्ट आणि
ममो, असे लोक असतील, आहेतही...
असतात काही काही जणं....
जोरदार!
पेटत्या होळीत आमची २ लाकडं
चालू द्या !!
+१
लोकं जर त्याच त्याच चर्चेला
चणे फुटाणे? अरे, आता तू
+१
सहमत आहे. लवकरच त्याची पाकृ
मला वाटतं टाकलीही होती, पण ती
पॉपकॉर्न आणि अंडं समान असतं
वैदिक