Skip to main content

ईंग्रजी बाळ्या आणि देशी कार्टं

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 13/06/2012 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, हा धागा काढायचं प्रयोजन सांगणं थोडं कठीण आहे पण तसं पहाता आपण सर्वच यात कदाचित मोडतो म्हणून. खरं तर मालिका लिहायला हवी पण आजकाल लोकांना फास्ट्फुडची सवय आहे म्हणून थोडक्यात. ;) ईंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं हे सर्वज्ञात आहेच, पण जी छाप आपल्यावर पडली आहे ती पिढ्यान् पिढ्या राहील असे दिसते. तशी ती इंग्रजांनी राज्य केलेल्या सर्व देशात दिसते खरी, पण आपल्याकडे जरा जास्तच, नाही का? ;) आत्मापरीक्षण तसेच आलेले काही स्वानुभव मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. अनिवासी भारतीय : अतिशय क्लिष्ट मुद्दा.. बरं मुद्दा मुद्द्यासहितच मांडतो. १. काही लोक्स १ महिन्यासाठी भारताबाहेर जातात ( काही नेपाळ मधे पण) आणि फोरेन रिटर्न असं लग्नाच्या बायोडेटा मधे लिहितात. २. आल्यावर हे लोक्स "शी भारतात किती घाण आहे, लोकं किती चुकीचं ईंग्रजी बोलतात, आय हेट धिस" वगैरे बोलतात. ३. यांना नीट मराठी बोलता येत नाही, २०-३० वर्षे भारतात राहिल्यानंतर पण, भारतात राहिलो याचं दु:ख यांना फार. ४. आम्ही कसे फोरवर्ड आहोत, आणि तुम्ही कसे घाणेरडे आहात हे दाखवण्यात यांना फार स्वारस्य असते. ५. भारताच्या पॉलिटीक्स मधे हे लोकं फार नाक खुपसतात, जसं काय ह्यांच्या सांगण्याने सो कॉल्ड भारतीय पॉलिटीशियन अ‍ॅक्शन घेणार आहेत. अजुन बरेच मुद्दे आहेत, प्रतिसादक मांडतीलच. बरं एमएनसी मधे काम करणारे.. १.यांना असं वाटतं की हे आभाळातून टपकले आहेत. रोज "आम्ही अ‍ॅडव्हान्स्ड आहोत" अशी आरोळी ठोकणारे संध्याकाळी बायकोला शिव्या घालत.. काय कलयुग आला आहे, बायको नवर्‍याची सेवा करत नाही" असं म्हणत आराम खुर्चीवर बसणारे. २. आयटीवाल्यांनी भारताची कशी वाट लावली हा यांचा रोजचा चर्चेचा विषय, त्यांचे पगार कसे कमी करावेत हा गहन चर्चेचा विषय. आई-बाप, काका-मामा १. आमचा मुलगा फॉरेन मधे काम करतो. २. मुलगी आयटीतली पाहिजे. ३. आमच्या मुलाला ६ लाख पगार आहे. (डॉलरचा पगार रुपयात कन्वर्ट करुन, तिथे तो भिक मागून का राहिना) ईतर १. ए, चांगलं ईंग्लिश बोलता येतं का? २. पिझ्झा हट, अय्या.. जावु ना.. ते भाकरी झोपडी नको.. ३. क्रेझी जॉन.. किती छान.. वेडा माध्या हॉटेल नको मी स्वतः एकदा हापिसच्या कँटीन (खानावळीमधे) गेलो होतो, तिथे "डिलाइट कॉर्नर" नावाचा एक "स्टॉल" होता, मी विचार केला की जर हा मराठीत ( आनंदी कोपरा) किंवा हिंदीत (खुश कोना) असतं तर आपण गेलो असतो का? आपण आजही एखाद्याच्या ई़ंग्रजी बोलण्यावरुन तो/ती किती हाय-फाय आहे हे न-जाणतेपणे ठरवतो. त्याच्या/तिच्या राहणीमानावरुन "सो चिप" किंवा "सो गुड" म्हणतो. हे खरं आहे ना. एखादा/दी भारताबाएर राहुन आला/ली आहे की नाही यावरुन आपण अनुमान लावतो.. ते कितपत बरोबर आहे? पण हे कितपत खरं आहे? हा प्रश्न उभा आहे.. तुमच्याकडे उत्तर आहे का? आणखीन अपेक्षित आहे प्रतिसादामधून.. आपला, मराठमोळा

वाचने 23047
प्रतिक्रिया 104

प्रतिक्रिया

कसले काय? कलयूग आले आहे , असे म्हणायचे आणि गप्प बसायचे.

:) असे लोकं पाहीलेत बॉ! महीना - सहा महीने येउन गेले की भारतात अगदी आम्ही कसे हाय फाय, मधुनच चुकीचं का होईना इंग्रजी बोलणे, सारखं इकडे - तिकडे तुलना (जसं काही हे भारताबाहेरच जन्मलेत अन मोठे झालेत) वगैरे हास्यास्पद प्रकार पाहीलेत. कीव येते दुसरं काही नाही.

आपण आजही एखाद्याच्या ई़ंग्रजी बोलण्यावरुन तो/ती किती हाय-फाय आहे हे न-जाणतेपणे ठरवतो. त्याच्या/तिच्या राहणीमानावरुन "सो चिप" किंवा "सो गुड" म्हणतो. हे खरं आहे ना. एखादा/दी भारताबाएर राहुन आला/ली आहे की नाही यावरुन आपण अनुमान लावतो.. ते कितपत बरोबर आहे?
हे आपण मध्ये कोण कोण येतात? बाकी सफाईदार इंग्रजी वरून व्यक्ती हाय्-फाय आहे की नाही हे ठरवायची पद्धत ब्रिटिश काळापासून आहे.तीच गोष्ट विलायतेत जावून परत येणार्‍यांची. प्रश्न- भारतिय प्रशासकिय सेवा,भारतिय विदेश सेवा,मोठ्या भारतिय्/बहुतांशी एम्.एन्.सी.ज मधील मुख्य कार्यकारी अधिकारी इंग्रजी माध्यमातून शिकलेले असतात.ह्या बद्दल मराठमोळा ह्यांचे मत काय?

.

या विषयावर पूर्वीही अनेक चर्चांमधून हे मुद्दे मांडले गेले आहे व सरकत्या विपत्रांतून बरीच विनोदनिर्मितीही झाली आहे.परंतु माझ्या निरीक्षणात तरी आपण उल्लेखलेल्या प्रवृत्तींची उदाहरणे फारच कमी आहेत. या विषयावरची मते अतिरंजितच का असतात हे मोठे कोडे आहे. कदाचित २५-३० वर्षांपूर्वी परदेशी जाणे खरंच विशेष बाब असायची. गेल्या १२-१५वर्षात यात विशेष असे काहीच राहिले नाहीये.

ममो, काय हे? ;) कितीवेळा तेच ते! आता इथे आलेच आहे तर जरा देतेच प्रतिसाद. ;) मी तर बै, येताजाता माझा हिरवेपणा सिद्ध केल्याशिवाय रहात नाही. आम्ही कस्से ग्रेट आहोत हे सांगत फिरते. जे लोक अमेरिकेशिवाय इतर देशात आहेत त्यांना कमी लेखते (तेही लोक मला कमी लेखतात हे विसरून जाते). गेल्या काही वर्षात झालय काय, भारतात डर्टी वाटत असतानाही येते आणि सगळ्या वस्तू, पदार्थ, कपडा महाग असल्याबद्दल नाक मुरडते. आजूबाजूच्या लोकांचा श्वास अडकतो, क्काय? तुला हे महाग वाटतं? आम्हाला नै ब्वॉ वाटत असं म्हणतात. काय करावे कळत नाही. घरी रोज भाजी पोळी, भात आमटी खाण्यापेक्षा पौष्टिक पिझ्झा आणि बर्गर याशिवाय काह्ही म्हणता काह्ही खात नाही. ;) चला, जरावेळ खोडसाळपणा करून झाला. :)

थोडि माझिहि असहमति अहे. हे सर्व आधि होते आता फार कमि आहे. आम्च्या कार्यलयातिल ३ मराठी मुलि एकमेकिअन्शि हिन्दि मधे बोलतात, का ते कलत नहि. आनि जेव्हा मि स्वता मराठि बोलतो तेव्हा मराठीत बोलतात

या बाबत माझा अनुभव. मी गेली ४५ वर्षॅ अमेरिकेत स्थायीक आहे. घर आहे, दोन गाड्या आहेत, वगैरे वगैरे. जेव्हा जेव्हा मी भारतात भेटीला जातो त्यावेळी माझ्या बोलण्या, चालण्या, वागण्यावरून घरचे म्हणतात की तू अमेरीकेत रहातोस हे खरे वाटत नाही. (गमतीने उलट मीच विचारतो की मी काय केल्याने तुमची खात्री पटेल?) आता बोला. त्यामुळे असा सामान्य नित्कर्ष काढणे योग्य नाही असे वाटते.

In reply to by गावरान

फक्त आंतरजालावर काय करावं हे सांगतो. पटल्यास बाकिचं बघू. :) १. ताबडतोब सगळ्या मराठी संकेतस्थळावर वावर वाढवावा. नाहितर तिकडे जाउन मराठी अभिव्यक्तीची खाज भावण्यासाठी दिडक्या खर्च करून संकेतस्थळं कशाला काढलियेत? लवकरच संपादक पदावर वर्णी लागण्याची सुद्धा शक्यता आहे. २. मधनं मधनं नॉस्टेल्जिक व्हावं ३. आपण इथल्या व्यवस्थेला कंटाळून आपली माणसं सोडून जरी तिकडे गेला असला तरी "भारताची प्रगती" यावर लेख प्रसवावा. इथं राहणार्‍या लोकांना पटणार नाही पण कुंथुन कुंथून विदा द्यावा आणि लोकांना पटवावं. :) आणखी लिहिलं तर पब्लिक मारायला येइल म्हणून थांबतो. ;)

In reply to by दादा कोंडके

आणखी लिहिलं तर पब्लिक मारायला येइल म्हणून थांबतो. जालावरील मार "virtual" च असतो. :-)

मराठमोळा साहेब, आपल्या काही विचारांशी असहमत आहे.. तरी आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे वाटते. १. अनिवासी भारतीय : अनिवासी भारतीय म्हणजे जो भारताबाहेर वर्षातून १८०+ दिवस राहतो आणि परदेश मध्ये आपला आयकर भरतो तो. आपण उगीच गोड गैरसमज करून घेतला आहे कि परदेशात जाऊन आलेला अनिवासी भारतीय !! असे अतिशहाणे ( म्हणजे परदेश वारी करून आलेले , अनिवासी नाही ) यांना मराठी बोलता येत नाही असे नसून आपण त्यांच्याशी फाजील इंग्रजी बोलतो.असे लोक्स जर काही वेडेवाकडे बोलत असतील तर त्यांच्या सरळ सरळ श्रीमुखात देण्याची तयारी असावी. २. एमएनसी मधे काम करणारे: आपल्याला भेटलेले नमुने असतील तुम्ही म्हणता तसे ( सगळे अपवाद तुम्हालाच का येऊन भेटले हा चर्चेचा विषय ठरेल ).. पण ह्या अपवादांना प्रमाण ठरवून असा सामान्य नित्कर्ष काढणे योग्य नाही असे वाटते. विचार वाचून पडलेले काही प्रश्न: १. किती वेळा आपण मुलांना घेऊन कावरे / गणु शिंदे / तत्सम मराठी माणसाच्या दुकानात icecream घेऊन दिला आहे ? देताना बघितला आहे ? आपल्याला सोस वाडीलाल, Naturals चा. Mc donalds चा burger चांगला आणि आमचा वडापाव तेवढा unhygenic ठरतो !! २. आई बाप कौतुक करतात म्हणता ? मग तुम्ही बाप म्हणून काय असा म्हणणार का कि माझा मुलगा वाया गेला. भारतात शिकला आणि आता गोर्या साहेबाची चड्डी धूत बसला आहे ? ३. मराठी माणूस सल्ला देताना कायम आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकून दुसर्याला असे का सांगत बसतो कि सरकारी शाळा उत्तम ? ४. आपल्याला ठराविक विषयात ब्रह्मज्ञान आहे अशी समजूत करून ठिकठिकाणी अक्षता वाटणारे पुण्यात , मुंबईत, भारतात नाहीत ? ( जे तुमच्या लेखी अनिवासी भारतीय / एमएनसी मधे काम करणारे वैगेरे वैगेरे नाहीत असे ) ५. माझ्या बघण्यात पुण्यनगरीत एक जोशी आहेत. त्यांचा घोषा एकच.. "शिक्षक व्हा.. शाखेत जा.. देशाचे भले करा.." त्यांचा बाळ्या मात्र परदेशात जाऊन संडास घासतो त्याचे काय ? स्वतः जोशी काका कर्जतच्या पुढे कधी गेलेले ऐकले नाही.. ६. अमुक अमुक मराठी कादंबरी / पुस्तक / चित्रपट / नाटक भिक्कार कसा हे भरभरून लिहिणारे आणि रा-one कसा महान चित्रपट आहे, शाहारूक कसा क्लास आहे सांगणारे अनेक दिसतात ? त्यांचे श्राद्ध कोण घालणार ? ( कुठलेही मराठी दैनिक उघडा आणि वाचा भरभरून ही मुक्ताफळे ).. मुळात प्रश्न असा विचारा की असे काय आहे कि ज्यामुळे अनिवासी भारतीयांना भारतामधील त्रूटी दिसतात ? आणि आपण काय करू शकू की ज्याने परिस्थिती सुधारेल ? १. नागरिक समज ( सिविक sense ) नसलेली जनता ? २. आपल्या तुंबड्या भरणारे राजकारणी लोक्स ? ३. पायाभूत सुविधांचा अभाव ? ४. नको तिथे पिंका टाकत बसलेले विचारवंत ( स्वयंघोषित !! लोकमान्य न्हवे ! ) ५. ... जेथे खायला नाही २ घास तेथे सुग्रास अन्नाची स्वप्ने कसली दाखवताय ? ( खाणे प्रतीकात्मात म्हंटले आहे, उगाच शब्दछल नको.. ) अवांतर : नाना पाटेकरने मध्ये कुठेतरी एक किस्सा सांगितला होता कि पुण्यातील एका ब्राह्मण घरातील ( सदाशिव पेठ / नारायण पेठ / कसबा तत्सम विभागात राहणारी ) मुलीने समर्थांच्या फोटोकडे बघून " why is he not wearing pants ?" असा सवाल टाकला होता. आजुबाजूला किती लोक मूर्चित झाले आणि किती लोक्स हसले ह्याला पुरावा नाही. पण हे उदाहरण आपण दार्शनिक मानून आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे वाटते. असो.. मला आपले जे दिसते ते लिहिले हो.. हलके घ्या आणि रागाऊ नका. बन्या बापू

In reply to by बन्या बापु

तुम्ही लैच सिरियसली घेतलं बुवा.. तुमच्या विचारांचा आदर आहे, मला हे जनरलाईझ करायचं नाहीये. पण काही नमुने भेटतात त्यांची कीव येते. म्हणून गंमत केली थोडीशी. :)

In reply to by मराठमोळा

ममो, धागा शतकी करण्याची उत्तम संधी आहे. आउट ऑफ द ऑफ स्टंप समजून सोडतोस काय? फुलटोस आहे, उचलून मार. !!!!

In reply to by Nile

निळोबा, तुझ्या इंग्रजीवरून तुम्ही यनाराय वाटंत नाही बरं का.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

>>ममो, धागा शतकी करण्याची उत्तम संधी आहे. आउट ऑफ द ऑफ स्टंप समजून सोडतोस काय? फुलटोस आहे, उचलून मार. !!!! हाहाहा.. नको बुवा, आजकाल फुल्टॉस उचलून मारले की सिक्सरच्या ऐवजी कॅच जातात चुकुन. आपले ग्राऊंड शॉट्स खेळलेले बरे, म्हण्जे सचिनसारखं मलाही म्हणता येईल "मी रेकॉर्ड साठी खेळत नाही, देशासाठी आणि टीमसाठी खेळतो" :P

In reply to by मराठमोळा

मान गये. अलगद सचिनला चर्चेत आणला. क्या बात है, क्या बात है !!!! शतक नक्की. इतके कमी म्हणून की काय, खाली हुंड्याचा विषय पण आहेच. वा वा !! :-)

In reply to by मराठमोळा

>>म्हण्जे सचिनसारखं मलाही म्हणता येईल "मी रेकॉर्ड साठी खेळत नाही, देशासाठी आणि टीमसाठी खेळतो" अछ्छा...मग देशासाठी खेळणार्यांची नावे सांगा द्रविड आणि कुंबळेपण .... हे दोघे * सोडुन आणखी कोण आहे?? *मी अझरच्याकाळानंतर बद्दल बोलत आहे...त्या आधीचे मला माहीत नाही

In reply to by बन्या बापु

पुण्यातील एका ब्राह्मण घरातील ( सदाशिव पेठ / नारायण पेठ / कसबा तत्सम विभागात राहणारी ) मुलीने समर्थांच्या फोटोकडे बघून " why is he not wearing pants ?" असा सवाल टाकला होता. ह्यात मूर्च्छीत होण्यासारखे काही नाही. 'रामदास स्वामी धोतर का नेसत नव्हते' हा प्रश्न चौथीत असताना मलाही पडला नव्हता. मोठ्या मुलीने असा प्रश्न विचारला असेल तर नक्कीच ती भारतात राहणारी नसावी. अथवा ब्राह्मण घरातल्या मुलांना असे प्रश्न कधीच पडू शकत नाहीत.

काही लोकांना "जेन्युइन" कारणांनी परदेशी जावावेसे वाट॑ते जसे ऊठसूठ मनावर ओरखडे उमटवणारी बेकारी-गरीबी न बघवणे, आरक्षण मान्य नसणे, प्रदूषणमुक्ती हवी असणे, लाचखोरीपासून मुक्ती हवी असणे किंवा अन्य काहीही वैयक्तिक कारण असू शकेल. मी असे म्हणत नाही की हे सर्व दोष भारतात आहेत पण या तृटी कदाचित परदेशात नसतील असा स्वप्नाळूपणा कुठेतरी या लोकांना वाटतो. याबद्दल त्यांना गुन्हेगार धरता येणार नाही. प्रत्येकालाच वाटते की - आपल्याला ज्या खस्ता भोगाव्या लागल्या तशा खस्ता आपल्या पुढच्या पीढीस भोगाव्या लागू नये. _______________________ आई-वडीलांचे म्हणाल तर प्रत्येक आई-वडीलांना मुलांच्या कर्तुत्वाबद्दल अभिमान असतो. त्यात वावगे ते काय? _________________________ बाकी राहणीमानावरून "सो चीप/सो गुड" वगैरे ठरविणे, उथळपणाच वाटतो. राहणीमानापेक्षा अधिक अर्थपूर्ण निकषांवर मैत्री आधारीत हवी हे नक्की. ___________________________ बाकी जे अनिवासी भारतीय माझ्या पहाण्यात आले आहेत ते स्वतः च "शी डिड वेन्ट" वगैरे चूकीचे इग्लिश स्वतःच बोलत असल्याने कोणालाच नाव ठेवत नाहीत ;), त्यांना आपल्या नातेवाईकांची व भारताची आठवण येते, भारतात घाण आहे वगैरे बोलण्यापेक्षा भारतात चांगले काय, हेच आता आठवले जाते कारण "दुर्मीळता"

In reply to by शुचि

पहिल्या वाक्यात 'डायवर्शन' चा बोर्ड लागलाय. आता शंभरी काय दोनशे नक्की. नेहमीच्या मल्लांना पाचारण करतो आहे. :) (म्हणजे त्यांना पाचारण करण्याची गरज नाहीच, गुगल अ‍ॅलर्ट लावलेले असतातच त्यांनी. मी आपलं फुकटचं श्रेय उपटतोय इतकंच.)

In reply to by शुचि

काही लोकांना "जेन्युइन" कारणांनी परदेशी जावावेसे वाट॑ते जसे ऊठसूठ मनावर ओरखडे उमटवणारी बेकारी-गरीबी न बघवणे, आरक्षण मान्य नसणे, प्रदूषणमुक्ती हवी असणे, लाचखोरीपासून मुक्ती हवी असणे किंवा अन्य काहीही वैयक्तिक कारण असू शकेल. मी असे म्हणत नाही की हे सर्व दोष भारतात आहेत पण या तृटी कदाचित परदेशात नसतील असा स्वप्नाळूपणा कुठेतरी या लोकांना वाटतो. याबद्दल त्यांना गुन्हेगार धरता येणार नाही. प्रत्येकालाच वाटते की - आपल्याला ज्या खस्ता भोगाव्या लागल्या तशा खस्ता आपल्या पुढच्या पीढीस भोगाव्या लागू नये. सहमत!! बाकी जे अनिवासी भारतीय माझ्या पहाण्यात आले आहेत ते स्वतः च "शी डिड वेन्ट" वगैरे चूकीचे इग्लिश स्वतःच बोलत असल्याने कोणालाच नाव ठेवत नाहीत इथे तर डबल सहमत ;)

नाही हो! उलट आम्ही आम्रिकेला जाताना आम्ही इथून गव्हाचं पीठ तिथे घेऊन जातो आणि मऊसूत पोळ्या खातो आणि भारतात आल्यावर मात्र (इथल्यासारखं) पिझ्झा-बर्गर खातो.. :) :P

रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करुन पुन्हा सहर्ष सादर करीत आहोत.... अगणित अंकी नाटक.... बाब्या नि कार्टं. कलाकार : नेहमीचेच यशस्वी . लेखनः / दिग्दर्शन : आपापले. . . . . .

अमराठी माणसाने मोडकंतोडकं मराठी बोललं तरी आपण कौतुक करतो. पण कोणी चुकीचे इंग्रजी बोलला की नेमक्या चुकीवर बोट ठेऊन आपण त्याचे सर्व व्यक्तिमत्त्वच डागाळून टाकतो. इंग्रजी भाषेला एवढ्या उच्चपदावर कोणी आणि का नेऊन बसविले? आपणच. विचारांपेक्षा भाषेला आपण जास्त मान देतो आहोत. विदेशात राहून, काही निमित्ताने, भारतास भेट दिल्यावर खुप गोष्टींवर टिका केली जाते. भारतात राहून काही सोयीसुविधा, सामाजिक भान ह्या गोष्टी आपण कधी तरी नुसत्याच ऐकलेल्या आणि पुस्तकांमधून वाचलेल्या असतात. पण, परदेशात त्या प्रत्यक्ष अनुभवल्यावर त्यांचे महत्त्व जाणवून आणि त्या अनुषंगाने आयुष्यात येणार्‍या सहजतेने भारावून माणूस अशी टिका करतो. त्या मागे ह्या सुधारणा करणे शक्य असूनही भारतात त्यांना ना राजकारण्यांकडून महत्त्व दिले जाते ना समाजाकडून, ह्या बद्दलचे वैषम्य असते. भारताबद्दल प्रचंड अभिमान असतो. भारतियांच्या हुशारीबद्दल, उपलब्ध कौशल्याबद्दल असणार्‍या रास्त अभिमानातून जन्मलेल्या काही अपेक्षा असतात. प्रचंड भ्रष्टाचाराने पोखरलेल्या भारताबद्दल बोलताना असा विचार असतो की राजकारणी पैसे खातात तर खा पण त्याच बरोबर आवश्यक त्या सुधारणाही करा. १० रुपयातील १ रुपया खाऊन ९ रुपये समाजकारणासाठी वापरले तर लोकं तक्रार करणार नाहीत. पण आपल्या कडे १० तील ६-७ रुपये खाण्याकडे कल दिसून येतो. तसाच मुद्दा आरक्षणाबद्दल आणि सामाजिक स्वच्छतेबद्दल. मुंबईतच (आता नक्की विभाग आठवत नाही, पण कुर्ला-मानखुर्द असावा) एका १५ फुट खोल नाल्याच्या काठी झोपडपट्टी आहे. त्या नाल्याची भिंत सिमेंटने बांधलेली आहे. ह्या भिंतीला लागून सार्वजनिक संडास बांधलेले आहेत. त्या संडासातून मैला भिंतीवरून ओघळून थेट त्या नाल्यात पडतो. जेवायला बसले असताना 'ते', अगणित जुलाब वाहून तयार झालेले, भिंतीवरील पिवळ्या रंगाचे, रोगण कधी आठवले तर माणूस जेवणही अर्धे सोडून उठून जाईल. अशा 'देखाव्यातूनच' स्लम डॉग मिलेनियर सारख्या हॉलीवूड चित्रपटांना 'ते' दृश्य सुचतं. पण आपले 'कलाकार' स्वत्व विसरून ऑस्कर स्विकारायला धावतात. भारत तो चित्रपट भारतात सर्वत्र अभिमानाने प्रदर्शित करतो. भारतिय सेन्सॉर बोर्डही त्यात गैर मानत नाही. एवढी नजर मेलेली आहे. फक्त अमिताभ बच्चनने त्या सीनला आक्षेप घेतला होता. असो. तर वरील झोपडपट्टीची 'ती' भिंत स्थानिक पालिकेस, पोलीसांस, नगरसेवकांस दिसत नाही का? ह्यावर जर एखाद्या अनिवासी भारतियाने काही भाष्य केले किंवा किळस व्यक्त केली तर ती त्या अनिवासी भारतियाची चुक आहे का? अनिवासी किंवा निवासी भारतियांनी अशा गोष्टी पाहूनही अभिमानच बाळगावा का? हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशी अस्वच्छतेची अनेक उदाहरणे देता येतील. गुंडगिरी, अन्याय्य राजकिय हस्तक्षेप, असुरक्षितता, रहदारीतील बेशिस्तता, सामाजिक असंवेदनशिलता ह्यांचे परिणाम आता हळू हळू आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचले आहेत. भारतात चांगले काही नाहीच का? तर तसे नाही. कित्येक चांगल्या गोष्टी जाणवतात. परदेशात त्या पासून आपण वंचित राहतो हे सतत जाणवत असतं. जसं, रुक्ष व्यावहारिकता. (इथे आखातात) निसर्ग, काही अंशी अजूनही उरलेला आपलेपणा, धान्य-भाज्यांची चव, ताजेपणा आणि सर्वात मुख्य हवेतील परिचित सुगंध, मातीशी जोडलेलं नातं. सार्वजनिक सेवा पुरवताना आकारलेला स्वस्त सेवाकर (तो वाढवून चांगली सेवा द्यावी), रेल्वे, एस्टीची स्वस्त आणि सर्वदूर पुरविली जाणारी सेवा. बरीच मोठी यादी देता येईल. मी तर रजेवर येतो तेंव्हा रस्त्याने चालताना शेजारच्या इमारतीतून येणारे जेवणाचे सुगंध, कुकरच्या शिट्ट्या, दुध तापवलेला खरपुस वास, पोळ्या करतानाचा खमंग वास, मोठ्याने लावलेला रेडिओ (हल्ली नाही ऐकू येत), चट्टेरी लेहेंगा घातलेले आजोबा, गॅलरीत कपडे वाळत गालणारी गृहिणी, इमारतिच्या खाली उभी राहून चवथ्या मजल्यावरील आपल्या मैत्रीणीला 'ए मालविकाSSSSSSSS' अशी साद घालणारी चिमुरडी किंवा हातात क्रिकेटची बॅट घेऊन मैदानावर निघालेला कोणी 'सचिन', कॉलनीच्या रस्त्यात भेटलेल्या कोणा बाईला 'काकू, 'सौरव' आहे घरी?' असा प्रश्न करतो ते पाहूनही परदेशात मी काहीतरी 'मिस' करतोय हे जाणवतं. असो. काही काही माणसे (अनिवासी आणि निवासीही) अर्ध्या हळकुंडात पिवळी होणारी असतात. सर्व समाजात असतात. काही अनिवासी, निवासी भारतियांना दोष देतात स्वतःला उच्चभ्रू समजतात तर काही निवासी, अनिवासींना स्वार्थी, स्वत:ला 'शहाणे' समजणारे वगैरे मानतात. त्यांचे शेरे ऐकून सोडून द्यायचे. मनावर घ्यायचे नाहीत. माझे भारतावर प्रेम आहे आणि जे जे देश मी पाहीले तिथल्या सर्व चांगल्या चांगल्या गोष्टी भारताय याव्यात सर्व निवासींनाही त्याचा लाभ व्हावा, समाजाचे प्रबोधन होऊन सामाजिक स्वच्छता, समन्वय नांदावा असे मनापासून वाटते. परदेशात का गेलो? तर एक संधी मिळाली म्हणून. भारतात राहूनही आपण अधिक आर्थिक लाभ देणार्‍या वेगवेगळ्या नोकर्‍या बदलतो तसेच अधिक आर्थिक लाभ दिसल्याने 'नोकरी' बदलली इतकेच. भारत घाणेरडा आहे म्हणून देश सोडून बाहेर पडलो असे अजिबात नाही. जय हिन्द.

In reply to by प्रभाकर पेठकर

काका, स्लमडॉग शिनेमा पाहून आलेल्या आमच्या हिरव्या मित्राला व त्यांच्या पत्नीला (दोघांचे वय ६५ च्या आसपास) माझ्या मुलाच्या मुंजीला भारतात यायची इच्छा होती पण त्यांनी स्लमडॉगमधल्या गोष्टी कितपत खर्‍या आहेत असे घाबरून विचारायला का सुरुवात केली ते आता समजले. मी तो चित्रपट पाहिला नाही. शेवटी ते आले नाहीतच. ;)

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकर काका, ऑनेस्ट आणि विचारपुर्वक प्रतिसाद आवडला आणि तुमचे म्हणणे पुर्णपणे पटले :) पण मग अर्ध आयुष्य भारतात काढल्यानंतर काही महाभागांना अचानक भारतीय असल्याची, स्वतःच्या भाषेची, लोकांची लाज वाटायला लागते. त्यांच काय करायचं?

In reply to by मराठमोळा

ममो, असे लोक असतील, आहेतही... मान्य. पण कितीसे असतात रे असे लोक? साधारण टक्केवारी काय असेल? माझ्या अनुभवावरून सांगतो... मला बाहेर असताना भेटलेले एनाराय आणि इथे असताना भेटलेले एनाराय यांच्यावरून... बहुतेक लोकांना ओढ असते इथली. संस्कार, स्मृती काही विसरू म्हणता विसरत नाही. सुरूवातीला गफ्फा मारणारे लोकही ५ / ६ वर्षं झाली की मऊ होतात. बरेचसे लोक इथल्या मातीशी, लोकांशी संपर्क ठेवून असतात. इथे आंजावरच असे लोक सापडतील की आपल्याला. त्यामुळे काही लोकांच्या वागण्यामुळे, (त्यातही बोलणारे सगळेच नाक वर करून बोलणारे नसतात काही खर्‍या पोटतिडिकिनेही बोलणारे असतात), सगळ्याच एनाराय लोकांवर ठप्पा मारणे योग्य वाटत नाही.

In reply to by मराठमोळा

पण मग अर्ध आयुष्य भारतात काढल्यानंतर काही महाभागांना अचानक भारतीय असल्याची, स्वतःच्या भाषेची, लोकांची लाज वाटायला लागते. त्यांच काय करायचं? श्री. मराठमोळासाहेब, माझ्या प्रतिसादातच तुमच्या वरील प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. तरिपण, तुमच्या संदर्भासाठी तेच इथे पुन्हा उदघृत करतो: काही काही माणसे (अनिवासी आणि निवासीही) अर्ध्या हळकुंडात पिवळी होणारी असतात. सर्व समाजात असतात. काही अनिवासी, निवासी भारतियांना दोष देतात, स्वतःला उच्चभ्रू समजतात तर काही निवासी, अनिवासींना स्वार्थी, स्वत:ला 'शहाणे' समजणारे वगैरे मानतात. त्यांचे शेरे ऐकून सोडून द्यायचे. मनावर घ्यायचे नाहीत.

तसही अता भारतात काय ठेवलय? सगळीकडे नुसती अनागोंदी, लूटमार, भ्रष्टाचार... काहीही धड करत नाहीत... करायला गेलं तर पैसे खायचे साधन म्हणून बघतात.... दर पावसाळ्यात सगळीकडच्या रस्त्यांची बोंब... तिकडे अगदी खेडेगावातही चकाचक रस्ते असतात.... हे आपल्याकडे साध मुंबै-दिल्ली-बंगळूर मधे पण दिसत नाही. लोक पण किती घाण करतात इंडियात... पचापचा थुंकतायत काय, रोडच्या कडेलाच काय बसतात, घरातला कचरा रोड वर फेकतात... गाड्या चालवताना शिस्त नाही... वर माजुर्डेपणा करणार... मुंबै चे शांघाय, कोकण चे कॅलिफोर्निया करायला ब्रह्मदेव जरी खाली आला तरी त्याच्या बापालाही ते शक्य होणार नाही. कारण हे करायला जी शिस्त आणि इच्छाशक्ती लोकांच्यात लागती ती काडीचीही नाही इकडच्या लोकांत... उलट हे लोक शांघायचे मुम्बै आणि कॅलिफोर्निया चे कोकण करतील तिकडे नेउन सोडले तर.... लोक नाक मुरडणार नाय तर काय करणार असल्या लोकांना आणि पर्यायाने देशाला... तुम्ही उगच त्यांचे फालतू पुळके घेउ नका .

In reply to by नाना चेंगट

असेच म्हणतो. आम्ही फॉरेन रिटर्न (की रिटर्न्ड?) नसल्याने आमचा पास.

लोकं जर त्याच त्याच चर्चेला कंटाळली नसतील तर शतकी - त्रीशतकी होण्यासाठी बरंच पोटेंशियल ठासुन भरलय या धाग्यात. ;) निवासी अनिवासी, मराठी-हिंदी व्हाया इंग्रजी, आयटी विरुद्ध सर्व, वरण-भात विरुद्ध पिझ्झा. चालुद्या आपला पास. मनीच्या बातां : गण्या चणे-फुटाणे आणायला हवेत. दोन घटका मज्जा घ्यावी. ;)

In reply to by रेवती

कालच एका काकांनी 'वैदिक पॉपकॉर्न'ची रेसिपी शोधली आहे म्हणे.

In reply to by राजेश घासकडवी

पॉपकॉर्न आणि अंडं समान असतं ? असेल असेल आम्ही काय पुराणमतवादी, तुम्हा आधुनिक लोकांचं काय चालतं ते आम्हाला काय माहित? असो.

In reply to by पैसा

काड्या ? नाही नाही या तर समिधा. फक्त या आधुनिक समिधा असुन पुराणमतवादी वैदिक यज्ञाच्या पुनरुज्जीवनासाठी आहेत हो ! असा संशय घेऊ नका त्यांच्यावर :)

In reply to by मेघवेडा

>>> 'आंतर(जाल)अग्नि क्षणभर तरी फुलवावा' म्हणून का? उच्च! :) शिवाय ह्या कवितेतही 'दूरस्थ कुणी' आहेच :)

In reply to by नंदन

'समिधां'चा उल्लेख झाल्यावर कुणीतरी हा फुलटॉस सोडणार नाही असे वाटले होतेच!!

असा हुच्चपणा फक्त अनिवासी वैगरे दाखवतात असं नाही. ह्याच वीकांतात घडलेला किस्सा. मुरुडला गेलो होतो, रात्रीची जेवणं झाली आणि सोबतच्यांपैकी दोघांना आईस्क्रीम खाण्याची लहर आली. शोधत निघालो वाटेत 'कावरे' आईस्क्रीमच्या एका दुकानात गेलो. तिथला पेशवाई फ्लेवर नवीन वाटला म्हणून ट्राय केला. बर्‍यापै़की होता चवीला. सोबतचे दोघेही 'शाह'. खाताना चापून खाल्लं पण त्यांनी खिशात हात घालेपर्यंत मी पैसे देऊन टाकले होते. दुसर्‍या दिवशी परत यांना आईस्क्रीम खायची लहर आली. वाटेत 'हॅवमोर'चा व्हॅनिलाचा एकेक कप सफाचट केला दोघांनी. नंतर माझ्याशी चर्चा: शाह ज्युनियरः दादा, मेरे को वो कल का कावरे का पेशवाई बिल्कुल पसंद नही आया, उससे ये 'हॅवमोर' का व्हॅनिला अच्छा था. (काल तेच चवीचवीनं खाल्लं होतं) मी: क्या हुआ उस में क्या बुरा था ? शा ज्यु: वो इंडियन ब्रँड था ना. मी: तो ये 'हॅवमोर' भी इंडियन ही है. (माहित नाही पण ठोकून दिलं.) शा ज्यु: मगर इसका नाम तो इंग्लिश है. या वाक्यावर काय बोलावं तेच कळेना.

ममोला नक्की काय विचार मांडायचे आहेत तेच कळाले नाही. माझ्या बघण्यात तर अगदी उलट परिस्थिती आहे. परदेशातून एखादी व्यक्ती भारतात आली, की एखादा देव अथवा असामान्य माणूस आल्यासारखे इथले काही लोक त्याच्या मागे पुढे करायला लागतात. तो माणूस कितीही माय मराठीत गप्पा मारायला उत्सुक असला तरी बळंच 'यू सी' ' यू क्नो व्हॉट' वैग्रे करत त्याला जेरीला आणतात. माझ्या माहितीत असे बरेच अनिवासी आहेत ज्यांना भारतात आल्यावरती बस, लोकल इ. मधून प्रवास करायला काहिही हरकत नसते. पण इथलेच काही महाभाग त्यांना 'तु होता तेंव्हा बरीच चांगली परिस्थीती होती रे. आता टोटल वर्स्ट. ट्रॅफिकची पार वाट लागली आहे. सगळे असुरक्षित आहे. मी बेटर तुला न्यायला येतो, किंवा तू रिक्षा कर.' असली महान माहिती ऐकवतात. मग उद्या तो परदेशात जाऊन बोंबलला, तर त्याला दोष का द्या ? हे परदेशी मित्र भेट ठरवा म्हणायला लागले, की इथल्या आमच्या मित्रांना ताबडतोब किव्हाज, पिझा हट असली ठिकाणेच आठवतात. कारण आलेला माणूस तिथेच जायला उत्सुक असणार किंवा तो दुसरीकडे कुठे बसूच शकणार नाही अशी आपणच आपली समजूत करुन घेतलेली असते. मी वैयक्तिकरीत्या मिपावरच्या देखील बर्‍याच अनिवासी / परदेशात कामानिमीत्त राहून आलेल्या मिपाकरांना भेटलेलो आहे. कोणाच्याही वागण्या बोलण्यात मला वरीलपैकी कुठलाही दोष कधीच आढळलेला नाही. अगदी 'खुर्ची कशाला च्यायला !' असे म्हणत माझ्या दुकानाच्या पायर्‍यांवरती पाय पसरुन मस्त बसून गप्पा मारणारे सहजराव, मुसु ही उदाहरणे तर अगदी बोलकी. हा धागा काढणार्‍या हलकट माणसाला देखील अनेकदा भेटलो आहे. त्याच्या देखील वागण्यात असे काही दोष आढळले नाहीत. निदान शेवटच्या भेटीपर्यंत तरी. ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

परा, तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे खरं. सगळेच अनिवासी अर्ध्या हळकुंडात पिवळे होत नाहीत, आणि सगळेच ईंग्रजी तो बाळ्या असं म्हणत नाहीत. जे जे ईंग्रजी किंवा पाश्चात्य ते ते उत्तम, बरोबर आहे अशी बहुतांश लोकांची समजूत झालेली आहे, मग ते ईंग्रजी बोलणं असेल किंवा खरेदीसाठी एखादा पाश्चात्य ब्रँड. ईंग्रजी खाणं स्टँडर्ड असते आणि आपले नाही. सगळी फॅशन बाहेरुनच भारतात येते. काही उदाहरणं देतो. १. माझा एक महाभाग मित्र ५ महिने भारताबाहेर राहुन आला. आल्यानंतर त्याने किती तरी दिवस सगळ्यांना तो भारतीय नाही याचीच जाणीव करुन देत होता. "मला इथलं हवामान सहन होत नाही.", "मला इथल्या जेवणाची सवय राहिली नाही" ,"ऑईली जेवण मला चालत नाही" असे एक ना अनेक २. या केस मधे एक भारतीय मराठी जोडपं ऑस्ट्रेलियात आल्यापासून स्थानिक लोक नसतील इतके स्वतः फिरंगी झाले आहेत. ऑफिसमधे जेवण करायला हा व्यक्ती फिरंगी जेवण आणतो, भारतीय लोकांबरोबर जेवण टाळतो, येता-जाता भारतीय लोकांच्या चुका शोधणे, त्यावर फिरंग लोकांसोबत जोक करणे असले प्रकार करतो, त्याला भारतात वाढलो याचं खुप दु:ख आहे आणि भारतात होता तेव्हा तो किती "चीप" रहात होता, आता कसा हाय फाय आहे. लवकरच त्याला भूत्काळ विसरायचा आहे कारण तो आता भारतीय राहिलेला नाही. अशी बरीच उदाहरणे देता येतील, मराठी बोलण्याची लाज वाटणारे, वर सूडने उदाहरण दिलं तसं ईंग्रजी नाव असेल तर भारी, इतर बकवास असा फरक करणारे. लोक सुद्धा कुणी परदेशात गेला असेल तर त्याचं कौतुक करणार आणि एखाद्याच नशीब नसेल तर मग त्याला कमी लेखणार. चांगलं ईंग्लिश बोलता येणे ही काळाची गरज असली तरी कित्येक लोकं आहेत की ज्यांना ईंग्रजी येत नसलं तरी त्यांनी अभिमान वाटावा अशी कारकिर्द घडवली आहे. युरोपात देखील कितीतरी देशात लोकांना नीट ईंग्रजी बोलता येत नाही पण ते त्यांच्या देशात काम चांगलं करीत आहेत. एक तेलगु मुलगा होता माझ्या आधीच्या कंपनीमधे, तो कंपनीला म्हणायचा की मला ऑनसाईटला पाठवा, पैसे मी देतो, पगार अर्धा दिला तरी चालेल पण पाठवा. कारण काय तर म्हणे हुंडा डबल मिळेल ऑनसाइटला जाउन आला की. :) नोकरीच्या निमित्ताने परदेशात जाणे, स्थायीक होणे, मोठ्या कंपनीत काम करणे, काळाबरोबर चालणे ह्या ओघाने येणार्‍या आणि ज्याच्या त्याच्या ईच्छेच्या गोष्टी आहेत, पण मग यात खोटेपणा नसावा, स्वत:ची लाज वाटु नये आणि आपल्यामुळे आपल्या देशाचा, माणसांचा अपमान होऊ नये याची काळजी घेतली जावी

In reply to by मराठमोळा

पण अशा लोकांची संख्या कमी होत आहे. किंबहुना 'ईतके वर्षे बाहेर रहात असला तरी अजूनही खूप साधा आहे.(मुल्ये वगैरे) विसरला नाही' अशांची संख्या जास्त आहे. आमचा एक मित्र युरोपातून वर्षातून एकदा मुंबईत आला की लोकल ट्रेनने मुद्दामून जातो.नातेवाईकांमध्ये ही 'बातमी' कशी होईल ह्याची तयारी व्यवस्थित तो करतो.आणि एक मित्राला फिरताना कांदा भजी खायची लहर येते.मग हॉटेलात जाण्याऐवजी/घरी खाण्याऐवजी त्याला कुठल्याशा टपरीवरच कांदाभजी खायची असते.तशी कांदाभजी न्यु जर्सीत कुठेच मिळत नाही असे कौतुकही होते.आणि एका मित्र भारतात आला की त्याला जुनी मराठी पुस्तके वाचायची असतात्.जी.ए./कुरुंदकर वगैरे लेखकांची पुस्तके ते जाताना घेवून जातो.

पूर्वी मीसुद्धा असं लिहायचो... एनाराय झाल्यापासून नाही लिहीत.. काही खरं नसतं. माझा एक मेव्हणा कुठेही गेलो की बिल भरताना " रुपयात इतके म्हणजे तुमच्याकडचे किती " असं विचारून कन्व्हर्ट करतो आणि त्यानंतर " इतके म्हणजे तुम्हाला फार नाही..." असं म्हणून मलाच बिलं भरायला लावतो...

In reply to by तात्या विंचु

आले होते की ममो अमेरिकेत. मला वाटतं ऑस्ट्रेलियातही होते काही दिवस.

In reply to by तात्या विंचु

मध्ये मुंबईला आला होता काही महिने. आता पुण्याचा माणूस पुण्याबाहेर पडला म्हणजे परदेशी जाण्यासारखेच झाले की नाही. परत गेल्यावर पर्वतीपेक्षा जीवदानी उंच आहे म्हणत होता. दिल्ली दरबार सारखी बिर्याणी पुण्यात मिळत नाही असे पण म्हणाला. आणि चक्क सारसबागेतील तळ्यापेक्षा ठाण्याचा तलाव चांगला आहे असेही म्हणाला. आत्ता बोला, स्वदेशाचा अभिमान सोडून असे परदेशाचे गुणगान करणे शोभते का ??

In reply to by प्रदीप

+१

In reply to by बिपिन कार्यकर्ते

+२

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

विमे अ‍ॅज युज्वल इन फॉर्म...! इट्स अ ब्राईट सन्नी डे हिअर अ‍ॅन्ड वी हॅव ममो ऑन स्ट्राईक विथ विमे अ‍ॅट द अदर एन्ड. ;)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

आता पुण्याचा माणूस पुण्याबाहेर पडला म्हणजे परदेशी जाण्यासारखेच झाले की नाही. परत गेल्यावर पर्वतीपेक्षा जीवदानी उंच आहे म्हणत होता. दिल्ली दरबार सारखी बिर्याणी पुण्यात मिळत नाही असे पण म्हणाला. आणि चक्क सारसबागेतील तळ्यापेक्षा ठाण्याचा तलाव चांगला आहे असेही म्हणाला. आत्ता बोला, स्वदेशाचा अभिमान सोडून असे परदेशाचे गुणगान करणे शोभते का ??
अगागागा! दंडवत स्वीकारावा, विमे! :)