१९ मे की २० मे यावर यथासांग काथ्याकूट होऊन १९ मे रोजी कट्टा (एकदाचा) ठरला. ठाणे मुंबईत आहे का नाही इ. इ. प्रश्न उद्भवू नयेत याची खबरदारी म्हणून परळ (हुच्चभ्रूंनी "अप्पर वरळी" असे वाचावे) येथील "व्हेज ऑलवेज" ही जागा ठरवण्यात आली (धन्स टू प्रासभौ). नेमके याच नावाचे एक हॉटेल के.ई.एम.समोर (परळ - ईस्ट) येथे असल्याने माझा गोंधळ झालाच. मग अमोल खरे, वि.मे. यांच्या 'मार्ग'दर्शनानंतर योग्य जागी पोहोचलो. मी येईपर्यंत हॉटेलच्या आवारात खुर्च्या मांडून अमोल खरे, स्पा, चचा, सौरभ उप्स, जयपाल, प्रास, पुष्कर, विमे यांची गप्पांची मैफल रंगली होतीच.
थोड्याच वेळात मस्त कलंदर - निखिल देशपांडे जोडीचेही आगमन झाले. अनेक सदस्य प्रथमच भेटत असल्याने पहिली ओळख परेड झाली. ७ वाजत आल्याने सर्वजण हॉटेलात प्रवेशकर्ते होऊन नव्याने गप्पांचे फड रंगले. हास्य-विनोदाचा स्वर इतका टिपेला पोचला की तिथल्या कॅप्टनने अगदी क्रिप्टीक शैलीत आवाज कमी करायला सांगितले. त्याच्या सूचनेचा अर्थ लावण्यात कमीत कमी १० मिनिटे गेली. ११ मिपाकरांना एका वाक्यात बुचकळ्यात टाकणार्या त्या कॅप्टनचे मला खरोखरच कौतुक वाटले. नवमिपाकर मी-कस्तुरीचेही तेवढ्यात आगमन झाल्याने पुन्हा एक ओळख परेड झाली.
तिघात एक या हिशेबाने टेबलवर ४ मेनुकार्डे, नव्हे, मेनुबुक्स येऊन पडली. त्या पुस्तकांचा आकार बघूनच अनेकांनी मेनु ठरवण्याच्या जबाबदारीतून आपले अंग काढून घेतले. अभ्यासू प्रासभौनाच ही जबाबदारी सोपवण्यात आली. इकडे विमे व मक यांनी 'शाळा' व 'गमभन' या कलाकृतींचा तौलनिक अभ्यास अन्य सदस्यांपुढे मांडला. महाविद्यालयीन एकांकिकांचे कमर्शियल नाटकात रुपांतर करताना येणार्या अडचणी इतक्या प्रभावी शैलीत सांगितल्या की "हा माणूस टीसीएसमध्ये का मरतोय?" असा प्रश्न कुणालाही पडावा. दुसर्या बाजूला प्रास-पुष्कर-जयपाल कायद्याचा किस पाडत होते.
समोर आलेल्या स्टार्टर्सचा फडशा पाडत असतानाच दोन गहन प्रश्न समोर आले ते म्हणजे- १] नि.दे.- म.क. यांतील खरा संपादक कोण? व २] स्पाचा/ची 'सत्या' कोण? दोन्ही प्रश्नांना ज्या तर्हेने बगल देण्यात आली त्यावरुन तिघेही मुरलेले मिपाकर आहेत याची (पुन्हा) खात्री पटली.
प्रासभौंच्या बाजूला बसलेल्या कस्तुरीचा आवाज क्वचित का होईना, पण येत होता. मग तिने (कंटाळून की वैतागून?) जागा बदलली व मकतैपाशी बसली. मक व कस्तुरीचे बोलणे हे जॉब इंटरव्ह्यु किंवा वायवा एक्झामपेक्षा वेगळे वाटतच नव्हते. चचा व सौरभ उप्स श्रवणभक्तीत दंग होते.
मेन कोर्स येईपर्यंत पूर्वनियोजित कामांसाठी प्रास व कस्तुरी यांनी कल्टी घेतली होती. मग मिपावरील सिझलिंग आयडींबद्दल चर्चा करत सिझलर्स संपले देखील. बाहेर बरेच लोक उभे असल्याचे दिसत असल्याने त्यांच्यावर थोडे उपकार करत बिल देऊन बाहेर आलो. निदे - मक यांना काही कारणाने लवकर निघायचे असल्याने आपसूकच सर्वजण पांगलो. तीन-साडेतीन तास चाललेल्या गप्पाही कमीच असतात. निदे-मक-विमे यांना निरोप देऊन मी, जयपाल, स्पा, सौरभ उप्स, चचा व अमोल खरे परळ स्टेशनकडे मार्गस्थ झालो. तिथे अमोलला निरोप दिला व टिटवाळा गाडीत गप्पांचा सिलसिला पुन्हा चालू झाला. स.प.रा. यांनी इथे सूक्ष्मलहरीरुपात अवतीर्ण होऊन संवाद साधला. शेवटपर्यंत चचाने एकही कविता ऐकवली नाही याबद्दल त्याचा निषेध करत सर्वजण तृप्त मनाने सुखरुप घरी पोचले.
वाचने
11087
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!!!
फटु टाकाया वाईस येळ लागला तवा माफी असावी.
In reply to मस्त!!! by पैसा
वाटला बुवा कट्टा झाल्यासारखा....
In reply to फटु टाकाया वाईस येळ लागला तवा माफी असावी. by jaypal
हं...
In reply to फटु टाकाया वाईस येळ लागला तवा माफी असावी. by jaypal
बारा
In reply to हं... by श्रावण मोडक
व्वा व्वा... एकंदरीत धम्माल
In reply to फटु टाकाया वाईस येळ लागला तवा माफी असावी. by jaypal
असेच म्हणतो....
In reply to व्वा व्वा... एकंदरीत धम्माल by सुहास झेले
असेच म्हणतो..
In reply to असेच म्हणतो.... by कुंदन
मस्त
In reply to फटु टाकाया वाईस येळ लागला तवा माफी असावी. by jaypal
एक शंकाय: ती टबात्लो (आमच्या
In reply to मस्त by रमताराम
हे ठिकाण धर्म (?? बहुधा
In reply to मस्त!!! by पैसा
पनीर फोटूमुळे
सविस्तर वृत्तांत्त कुठे आहे.
छायाचित्रं नसल्याने कट्ट्यास मजा आल्याचे विशेष जाणवले नाही.
In reply to सविस्तर वृत्तांत्त कुठे आहे. by प्रभाकर पेठकर
ए फोटू कुठाय ? फोटु फोटु फोटु
फोटू फोटू फोटू....!
काय गडबड चालवली आहे रे
मस्तच रे पण...
<रत्नांग्री> यां पेंक्षां
टॅग
In reply to <रत्नांग्री> यां पेंक्षां by बिपिन कार्यकर्ते
चांलूं टँगं
In reply to टॅग by श्रावण मोडक
अर्रर्र
In reply to टॅग by श्रावण मोडक
काल संध्याकाळी ५ ला स्पाचा
Spelling Mistake ???
In reply to काल संध्याकाळी ५ ला स्पाचा by अमोल खरे
प्रूफ
घोर अपमान. आम्ही आडनावाला
In reply to प्रूफ by नितिन थत्ते
आम्ही डोळ्यांनी फोटो पाहू तेव्हाच विश्वास ठेवू.
In reply to प्रूफ by नितिन थत्ते
अरे अन्या शेवटी का होईना मी
कारण काय असावे याचा अंदाज
In reply to अरे अन्या शेवटी का होईना मी by सूड
आज्जीं भारीच मनकवडी हों !!
In reply to कारण काय असावे याचा अंदाज by रेवती
अन्या दातार, अमोल, जयपाल
नेहमीपेक्षा हा कट्टा गुणी
In reply to अन्या दातार, अमोल, जयपाल by रेवती
काजळस्पाजळ होतं बरं त्यांच्याकडे?मजा आली
मटार उसळ खा! शिक्रण पोळी खा! चैन करा!
मित्रा
In reply to मटार उसळ खा! शिक्रण पोळी खा! चैन करा! by कापूसकोन्ड्या
सौरभ +++११११११
In reply to मित्रा by मी-सौरभ
विचार करण्यासाठी
In reply to सौरभ +++११११११ by जेनी...
विचार करण्यासाठी
In reply to सौरभ +++११११११ by जेनी...
उन्नीस / बीस, उन्नीस / बीस ठरत असतांना
जर अपेक्षित असा शब्द नसेल तर मी तुला रुपये ५००/- देईन असे वाचावे
In reply to उन्नीस / बीस, उन्नीस / बीस ठरत असतांना by लीलाधर
वृत्तांत आवडला. मुंबई कट्टा
काय हे?
In reply to वृत्तांत आवडला. मुंबई कट्टा by प्रचेतस
समांतर वेळेत मनसोक्त
कट्ट्याला आलेल्या सर्वांचे
मस्त कट्टा झालेला
वेटर च्या मदतीने काढलेला सर्व उपस्थित मी पा करअचा फोटो.
एकमेकाना भेटायला जातात की
In reply to वेटर च्या मदतीने काढलेला सर्व उपस्थित मी पा करअचा फोटो. by सौरभ उप्स
आहो बाई म्या काय म्हनतु
In reply to एकमेकाना भेटायला जातात की by जेनी...
ही ही ही .........
In reply to आहो बाई म्या काय म्हनतु by jaypal
छान आहे कट्टा वृत्तान्त!! आणि
In reply to वेटर च्या मदतीने काढलेला सर्व उपस्थित मी पा करअचा फोटो. by सौरभ उप्स
कुठल्या कट्ट्याला म्हणताय ?
In reply to छान आहे कट्टा वृत्तान्त!! आणि by मृगनयनी
रेशो....
In reply to कुठल्या कट्ट्याला म्हणताय ? by विश्वनाथ मेहेंदळे
काका, मुंबईचे गणित नंतर
In reply to रेशो.... by प्रभाकर पेठकर
मज उचित लिन्का सापडत
In reply to काका, मुंबईचे गणित नंतर by विश्वनाथ मेहेंदळे
अभिरुची..
In reply to मज उचित लिन्का सापडत by मृगनयनी
धन्यवाद पेठकर काका!
In reply to अभिरुची.. by प्रभाकर पेठकर
असे का ? की मुम्बईच्या
In reply to छान आहे कट्टा वृत्तान्त!! आणि by मृगनयनी
हं...
In reply to छान आहे कट्टा वृत्तान्त!! आणि by मृगनयनी
आता फोटो आले असले तरी चटावरचे
मस्त चविष्ट पनीर सोले(असाच काहीस नाव होत).
सुले..
In reply to मस्त चविष्ट पनीर सोले(असाच काहीस नाव होत). by सौरभ उप्स
अप्पर वरळीत जमलेला मराठमोळा
वा वा वा! फुल्टु धम्माल
कॅप्टन
ही माझी अॅडिशन...
आता पुढला जोरदार कट्टा दक्षिण
In reply to ही माझी अॅडिशन... by प्रास
मी येणार हे नक्की !!
In reply to आता पुढला जोरदार कट्टा दक्षिण by विश्वनाथ मेहेंदळे
वा वा ... बरिच मजा केलेलि