'मुंबई' कट्टा १९ मे २०१२
१९ मे की २० मे यावर यथासांग काथ्याकूट होऊन १९ मे रोजी कट्टा (एकदाचा) ठरला. ठाणे मुंबईत आहे का नाही इ. इ. प्रश्न उद्भवू नयेत याची खबरदारी म्हणून परळ (हुच्चभ्रूंनी "अप्पर वरळी" असे वाचावे) येथील "व्हेज ऑलवेज" ही जागा ठरवण्यात आली (धन्स टू प्रासभौ). नेमके याच नावाचे एक हॉटेल के.ई.एम.समोर (परळ - ईस्ट) येथे असल्याने माझा गोंधळ झालाच. मग अमोल खरे, वि.मे. यांच्या 'मार्ग'दर्शनानंतर योग्य जागी पोहोचलो. मी येईपर्यंत हॉटेलच्या आवारात खुर्च्या मांडून अमोल खरे, स्पा, चचा, सौरभ उप्स, जयपाल, प्रास, पुष्कर, विमे यांची गप्पांची मैफल रंगली होतीच.
थोड्याच वेळात मस्त कलंदर - निखिल देशपांडे जोडीचेही आगमन झाले. अनेक सदस्य प्रथमच भेटत असल्याने पहिली ओळख परेड झाली. ७ वाजत आल्याने सर्वजण हॉटेलात प्रवेशकर्ते होऊन नव्याने गप्पांचे फड रंगले. हास्य-विनोदाचा स्वर इतका टिपेला पोचला की तिथल्या कॅप्टनने अगदी क्रिप्टीक शैलीत आवाज कमी करायला सांगितले. त्याच्या सूचनेचा अर्थ लावण्यात कमीत कमी १० मिनिटे गेली. ११ मिपाकरांना एका वाक्यात बुचकळ्यात टाकणार्या त्या कॅप्टनचे मला खरोखरच कौतुक वाटले. नवमिपाकर मी-कस्तुरीचेही तेवढ्यात आगमन झाल्याने पुन्हा एक ओळख परेड झाली.
तिघात एक या हिशेबाने टेबलवर ४ मेनुकार्डे, नव्हे, मेनुबुक्स येऊन पडली. त्या पुस्तकांचा आकार बघूनच अनेकांनी मेनु ठरवण्याच्या जबाबदारीतून आपले अंग काढून घेतले. अभ्यासू प्रासभौनाच ही जबाबदारी सोपवण्यात आली. इकडे विमे व मक यांनी 'शाळा' व 'गमभन' या कलाकृतींचा तौलनिक अभ्यास अन्य सदस्यांपुढे मांडला. महाविद्यालयीन एकांकिकांचे कमर्शियल नाटकात रुपांतर करताना येणार्या अडचणी इतक्या प्रभावी शैलीत सांगितल्या की "हा माणूस टीसीएसमध्ये का मरतोय?" असा प्रश्न कुणालाही पडावा. दुसर्या बाजूला प्रास-पुष्कर-जयपाल कायद्याचा किस पाडत होते.
समोर आलेल्या स्टार्टर्सचा फडशा पाडत असतानाच दोन गहन प्रश्न समोर आले ते म्हणजे- १] नि.दे.- म.क. यांतील खरा संपादक कोण? व २] स्पाचा/ची 'सत्या' कोण? दोन्ही प्रश्नांना ज्या तर्हेने बगल देण्यात आली त्यावरुन तिघेही मुरलेले मिपाकर आहेत याची (पुन्हा) खात्री पटली.
प्रासभौंच्या बाजूला बसलेल्या कस्तुरीचा आवाज क्वचित का होईना, पण येत होता. मग तिने (कंटाळून की वैतागून?) जागा बदलली व मकतैपाशी बसली. मक व कस्तुरीचे बोलणे हे जॉब इंटरव्ह्यु किंवा वायवा एक्झामपेक्षा वेगळे वाटतच नव्हते. चचा व सौरभ उप्स श्रवणभक्तीत दंग होते.
मेन कोर्स येईपर्यंत पूर्वनियोजित कामांसाठी प्रास व कस्तुरी यांनी कल्टी घेतली होती. मग मिपावरील सिझलिंग आयडींबद्दल चर्चा करत सिझलर्स संपले देखील. बाहेर बरेच लोक उभे असल्याचे दिसत असल्याने त्यांच्यावर थोडे उपकार करत बिल देऊन बाहेर आलो. निदे - मक यांना काही कारणाने लवकर निघायचे असल्याने आपसूकच सर्वजण पांगलो. तीन-साडेतीन तास चाललेल्या गप्पाही कमीच असतात. निदे-मक-विमे यांना निरोप देऊन मी, जयपाल, स्पा, सौरभ उप्स, चचा व अमोल खरे परळ स्टेशनकडे मार्गस्थ झालो. तिथे अमोलला निरोप दिला व टिटवाळा गाडीत गप्पांचा सिलसिला पुन्हा चालू झाला. स.प.रा. यांनी इथे सूक्ष्मलहरीरुपात अवतीर्ण होऊन संवाद साधला. शेवटपर्यंत चचाने एकही कविता ऐकवली नाही याबद्दल त्याचा निषेध करत सर्वजण तृप्त मनाने सुखरुप घरी पोचले.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कुठल्या कट्ट्याला म्हणताय ?
रेशो....
काका, मुंबईचे गणित नंतर
मज उचित लिन्का सापडत
अभिरुची..
धन्यवाद पेठकर काका!
असे का ? की मुम्बईच्या
हं...
आता फोटो आले असले तरी चटावरचे
मस्त चविष्ट पनीर सोले(असाच काहीस नाव होत).
सुले..
अप्पर वरळीत जमलेला मराठमोळा
वा वा वा! फुल्टु धम्माल
कॅप्टन
ही माझी अॅडिशन...
आता पुढला जोरदार कट्टा दक्षिण
मी येणार हे नक्की !!
वा वा ... बरिच मजा केलेलि