✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

'मुंबई' कट्टा १९ मे २०१२

अ
अन्या दातार यांनी
Sun, 05/20/2012 - 12:40  ·  लेख
लेख
१९ मे की २० मे यावर यथासांग काथ्याकूट होऊन १९ मे रोजी कट्टा (एकदाचा) ठरला. ठाणे मुंबईत आहे का नाही इ. इ. प्रश्न उद्भवू नयेत याची खबरदारी म्हणून परळ (हुच्चभ्रूंनी "अप्पर वरळी" असे वाचावे) येथील "व्हेज ऑलवेज" ही जागा ठरवण्यात आली (धन्स टू प्रासभौ). नेमके याच नावाचे एक हॉटेल के.ई.एम.समोर (परळ - ईस्ट) येथे असल्याने माझा गोंधळ झालाच. मग अमोल खरे, वि.मे. यांच्या 'मार्ग'दर्शनानंतर योग्य जागी पोहोचलो. मी येईपर्यंत हॉटेलच्या आवारात खुर्च्या मांडून अमोल खरे, स्पा, चचा, सौरभ उप्स, जयपाल, प्रास, पुष्कर, विमे यांची गप्पांची मैफल रंगली होतीच. थोड्याच वेळात मस्त कलंदर - निखिल देशपांडे जोडीचेही आगमन झाले. अनेक सदस्य प्रथमच भेटत असल्याने पहिली ओळख परेड झाली. ७ वाजत आल्याने सर्वजण हॉटेलात प्रवेशकर्ते होऊन नव्याने गप्पांचे फड रंगले. हास्य-विनोदाचा स्वर इतका टिपेला पोचला की तिथल्या कॅप्टनने अगदी क्रिप्टीक शैलीत आवाज कमी करायला सांगितले. त्याच्या सूचनेचा अर्थ लावण्यात कमीत कमी १० मिनिटे गेली. ११ मिपाकरांना एका वाक्यात बुचकळ्यात टाकणार्या त्या कॅप्टनचे मला खरोखरच कौतुक वाटले. नवमिपाकर मी-कस्तुरीचेही तेवढ्यात आगमन झाल्याने पुन्हा एक ओळख परेड झाली. तिघात एक या हिशेबाने टेबलवर ४ मेनुकार्डे, नव्हे, मेनुबुक्स येऊन पडली. त्या पुस्तकांचा आकार बघूनच अनेकांनी मेनु ठरवण्याच्या जबाबदारीतून आपले अंग काढून घेतले. अभ्यासू प्रासभौनाच ही जबाबदारी सोपवण्यात आली. इकडे विमे व मक यांनी 'शाळा' व 'गमभन' या कलाकृतींचा तौलनिक अभ्यास अन्य सदस्यांपुढे मांडला. महाविद्यालयीन एकांकिकांचे कमर्शियल नाटकात रुपांतर करताना येणार्या अडचणी इतक्या प्रभावी शैलीत सांगितल्या की "हा माणूस टीसीएसमध्ये का मरतोय?" असा प्रश्न कुणालाही पडावा. दुसर्या बाजूला प्रास-पुष्कर-जयपाल कायद्याचा किस पाडत होते. समोर आलेल्या स्टार्टर्सचा फडशा पाडत असतानाच दोन गहन प्रश्न समोर आले ते म्हणजे- १] नि.दे.- म.क. यांतील खरा संपादक कोण? व २] स्पाचा/ची 'सत्या' कोण? दोन्ही प्रश्नांना ज्या तर्हेने बगल देण्यात आली त्यावरुन तिघेही मुरलेले मिपाकर आहेत याची (पुन्हा) खात्री पटली. प्रासभौंच्या बाजूला बसलेल्या कस्तुरीचा आवाज क्वचित का होईना, पण येत होता. मग तिने (कंटाळून की वैतागून?) जागा बदलली व मकतैपाशी बसली. मक व कस्तुरीचे बोलणे हे जॉब इंटरव्ह्यु किंवा वायवा एक्झामपेक्षा वेगळे वाटतच नव्हते. चचा व सौरभ उप्स श्रवणभक्तीत दंग होते. मेन कोर्स येईपर्यंत पूर्वनियोजित कामांसाठी प्रास व कस्तुरी यांनी कल्टी घेतली होती. मग मिपावरील सिझलिंग आयडींबद्दल चर्चा करत सिझलर्स संपले देखील. बाहेर बरेच लोक उभे असल्याचे दिसत असल्याने त्यांच्यावर थोडे उपकार करत बिल देऊन बाहेर आलो. निदे - मक यांना काही कारणाने लवकर निघायचे असल्याने आपसूकच सर्वजण पांगलो. तीन-साडेतीन तास चाललेल्या गप्पाही कमीच असतात. निदे-मक-विमे यांना निरोप देऊन मी, जयपाल, स्पा, सौरभ उप्स, चचा व अमोल खरे परळ स्टेशनकडे मार्गस्थ झालो. तिथे अमोलला निरोप दिला व टिटवाळा गाडीत गप्पांचा सिलसिला पुन्हा चालू झाला. स.प.रा. यांनी इथे सूक्ष्मलहरीरुपात अवतीर्ण होऊन संवाद साधला. शेवटपर्यंत चचाने एकही कविता ऐकवली नाही याबद्दल त्याचा निषेध करत सर्वजण तृप्त मनाने सुखरुप घरी पोचले.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
धर्म
समाज
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
माहिती

प्रतिक्रिया द्या
11012 वाचन

💬 प्रतिसाद (68)

प्रतिक्रिया

मस्त!!!

पैसा
Sun, 05/20/2012 - 12:58 नवीन
वृत्तांत मस्त लिहिलायस रे अन्या! फोटो कुणी काढलेत की नाही?
  • Log in or register to post comments

फटु टाकाया वाईस येळ लागला तवा माफी असावी.

jaypal
Sun, 05/20/2012 - 20:02 नवीन
ठरल्या प्रमाणे आम्ही सगळे म्हणजे स्पा, मी, चचा,खरे, पुश्कर ई. किरकोळ मंडळी हाटेलच्या बाहेर ६:३० पासुन जमा झालो होतो पण हाटेल मालक आम्हाला आत घ्यायलाच तयार नव्हता. शेवटी प्रास भाई आणि मन्या फेणे आत जाउन आले ( काय करुन आले कोणास ठाउक ?) आणि ताबोड्तोड प्रवेश मिळाला. ;-) १) डावी कडुन चतुरचाणाक्य, सौरभ उप्स, स्पा उर्फ मन्याफेणे Image removed. २) तहान भागवुन घेताना प्रास Image removed. ३) स्पाच वर्णन करताना पुष्कर आणि कौतक भरल्या नजरेने पाहताना खरे ( ते म्हणत होते की मुर्ती लाहन पण किर्ती कीती कीती महान ;-)) Image removed. ४) डावि कडुन मस्तकंलदर. निखिल देशपांडे, विश्वनाथ मेहंदळे व प्रास Image removed. ५) डावि कडुन विश्वनाथ मेहंदळे,प्रास, जयपाल व अन्या दातार Image removed. ६) डावी कडुन सौरभ उप्स, स्पा, अमोल खरे, पुष्कर वर्तक Image removed. ७) स्थानापन्न होत असताना मिपाकर Image removed. ८)पुर्व तयारी Image removed. ९) Image removed. १०) पनिर शोले एवढी जबराट डिश होती की, फोटो काढे पर्यंत दोन्ही बाजुकढील दोन्,दोन तुकडे गायब. त्यो वेटर पण हैरण झाल्ता राव. Image removed. वेगवेगळे पदर्थ येत होते आणि फोटो काढायच्या आत डिश को-या आयला हे काय झंगाट ?वेटर, कॅप्टन आणि मी हाडबडलोच. वेटर कोल्हापुरचा होता. त्याने मला कान मंत्र दिला ..."साहेब फोटोचा नाद भरल्या पोटीच चांगला असतो." ;-) ११) Image removed. १२) Image removed. स्टार्टर तसेच मेन कोर्स मधिल पास्ता, विविध प्रकारचे सिजलर्स ई.खाण एकदम टेस्टी होत आणि त्या वर गप्पांचा तडका कहर होता.( सायबानु म्हनुन फटु काढायच ईसरलो, एक डाव माफी :-( ) मैफलीच्या सुरवातीस विजुभाऊंनी दुरध्वनी वरुन शुभेच्छा दिल्या तर पराच्या फोननी शेवट गोड केला. ( प-याशी फोन वर बोलताना मी त्याच्यावर बरीच स्तुती सुमनं उधळीत होतो आणि तो सगळ ख-यानेच घेतहोता ;-)) रामदास काका, मास्तर्,विजुभाउ, परा आम्ही सगळ्यांनी खरच तुम्हा सगळ्यांना मीस केल रे!!! तुम्हाला काल खुपच उचकी लागली असेल नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

वाटला बुवा कट्टा झाल्यासारखा....

प्रभाकर पेठकर
Sun, 05/20/2012 - 20:11 नवीन
हम्म्म्म्म! आता कसं? कट्टा झाल्यासारखं वाटलं. "साहेब फोटोचा नाद भरल्या पोटीच चांगला असतो." अहो, फोटोंचाच काय कुठलाही नाद भरल्या पोटीच करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

हं...

श्रावण मोडक
Mon, 05/21/2012 - 11:06 नवीन
प-याशी फोन वर बोलताना मी त्याच्यावर बरीच स्तुती सुमनं उधळीत होतो आणि तो सगळ ख-यानेच घेतहोता
हं... किती वाजले होते त्यावेळी? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

बारा

jaypal
Mon, 05/21/2012 - 23:03 नवीन
आता कुणाचे ते विचारु नका. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

व्वा व्वा... एकंदरीत धम्माल

सुहास झेले
Mon, 05/21/2012 - 14:08 नवीन
व्वा व्वा... एकंदरीत धम्माल केलेली दिसतेय :) :) म्या मिसलो, पुढल्या कट्ट्याला भेटू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

असेच म्हणतो....

कुंदन
Mon, 05/21/2012 - 14:21 नवीन
>>म्या मिसलो, पुढल्या कट्ट्याला भेटू +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले

असेच म्हणतो..

सूड
Mon, 05/21/2012 - 14:25 नवीन
>>पुढल्या कट्ट्याला भेटू +२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

मस्त

रमताराम
Tue, 05/22/2012 - 19:08 नवीन
एक शंकाय: ती टबात्लो (आमच्या कडे असाच उच्चार करतात) सॉसची 'बाटली आडवी' का आहे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

एक शंकाय: ती टबात्लो (आमच्या

बिपिन कार्यकर्ते
Tue, 05/22/2012 - 20:07 नवीन
एक शंकाय: ती टबात्लो (आमच्या कडे असाच उच्चार करतात) सॉसची 'बाटली आडवी' का आहे? Wink
आमच्याकडे अशीच ठेवतात! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

हे ठिकाण धर्म (?? बहुधा

कापूसकोन्ड्या
Mon, 05/21/2012 - 22:03 नवीन
हे ठिकाण धर्म (?? बहुधा खाण्याचा आणि चकाट्या पिटायचा असावा) समाज मौजमजा प्रकटन माहिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

पनीर फोटूमुळे

अत्रुप्त आत्मा
Sun, 05/20/2012 - 21:11 नवीन
पनीर फोटूमुळे Image removed.
  • Log in or register to post comments

सविस्तर वृत्तांत्त कुठे आहे.

प्रभाकर पेठकर
Sun, 05/20/2012 - 13:45 नवीन
छायाचित्रं नसल्याने कट्ट्यास मजा आल्याचे विशेष जाणवले नाही. छोट्याशा वृत्तांतात लघुरुप शब्दांचा मुक्त वावर आणि वापर, माझ्या सारख्या मूढ सदस्यास, वृत्तांत गोंधळविणारा वाटला. 'आजच्या तरूणांची भाषा' असे म्हणून, चाळीशी पुसून, सकाळपासूनचा चहाचा चवथा कप तोंडास लावला.
  • Log in or register to post comments

छायाचित्रं नसल्याने कट्ट्यास मजा आल्याचे विशेष जाणवले नाही.

मोदक
Sun, 05/20/2012 - 14:55 नवीन
छायाचित्रं नसल्याने कट्ट्यास मजा आल्याचे विशेष जाणवले नाही. +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

ए फोटू कुठाय ? फोटु फोटु फोटु

पियुशा
Sun, 05/20/2012 - 14:18 नवीन
ए फोटू कुठाय ? फोटु फोटु फोटु ;)
  • Log in or register to post comments

फोटू फोटू फोटू....!

अत्रुप्त आत्मा
Sun, 05/20/2012 - 21:08 नवीन
Image removed. फोटू फोटू फोटू....! झ्याक आले हायती... Image removed.
  • Log in or register to post comments

काय गडबड चालवली आहे रे

अमोल खरे
Sun, 05/20/2012 - 16:05 नवीन
काय गडबड चालवली आहे रे सर्वांनी...... जयपाल आजोबांनी त्यांच्या महागड्या सॅमसंग गॅलेक्सी टॅब मधुन सुंदर फोटो काढले आहेत. टाकतील ते थोड्याच वेळात. मी माझी डिटेल प्रतिक्रिया टाकेन काही वेळाने. अन्याला काल सर्वांनी प्रेशराईज करुन कोणत्याही परिस्थितीत आज धागा टाकच रे असा दम देऊन ठेवला होता म्हणुन त्याने बिचा-याने आज लगेच वृत्तांत टाकला. काल मस्त मजा आली. आम्हा बाकीच्यांच्या प्रतिक्रिया वाचुन आणि फोटो पाहुन तुम्हाला त्याचा अंदाज येईलच. जाता जाता - रामदास काका, सर्वसाक्षी काका आणि ज्यांच्यामुळे आम्ही मिपावर एकमेकांनी ओळखायला लागलो त्या तात्यांची उणीव खुप जाणवली. ते तिघे काल आले असते तर आणखीन मजा आली असती.
  • Log in or register to post comments

मस्तच रे पण...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 05/20/2012 - 16:19 नवीन
वृत्तांत आवडला. कट्टा वृत्तांत आवडला यासाठी की लेखनात प्रचंड स्मायल्या दिसल्या नाहीत, उगाच टींबटींब, बाण, असं विनाकारण लक्षवेधक काहीही न दिसल्यामुळे कट्टा वृत्तात सुसह्य आणि वाचनीय झाला. धन्स. :) कट्टा वर्णनात फोटो पाहिजेच होते अर्थात बाकीचे सदस्य आता भर घालतीलच म्हणून फोटोच्या प्रतिक्षेत. >>>>> १] नि.दे.- म.क. यांतील खरा संपादक कोण ? च्यायला, या गोष्टींचा कधीच विचार मनात डोकावला नाही. अधिक तपशील काही वाचायला मिळेल काय... [दोघेही ह.घे. घेतील] -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

<रत्नांग्री> यां पेंक्षां

बिपिन कार्यकर्ते
Sun, 05/20/2012 - 16:31 नवीन
<रत्नांग्री> यां पेंक्षां वृंत्तांतं टांकंलां नंसंतां तंरीं चांलंलें अंसंतें हों, झंप्यां ... हें अंसें चंटांवंरंच्या श्रांध्दांसांरंखें उंरंकंलेंनींतं!!
  • Log in or register to post comments

टॅग

श्रावण मोडक
Mon, 05/21/2012 - 12:25 नवीन
टॅग बंद कर की म्हाताऱ्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

चांलूं टँगं

स्मिता.
Mon, 05/21/2012 - 13:50 नवीन
मंगं चांलूं टँगंमंधें तुंम्हीं सुंद्धां तंसेंचं लिंहांयंचें होंतें ;) *बिकांनी सुरू केलेला टॅग लिहायला फारच अवघड असल्याने आधीच संपवला.* असो, कट्टा भारीच चर्चात्मक झालेला वाटतोय. अन्या, अमोल आनि जयपाल यांनी तुकड्या-तुकड्यात टाकलेला वृत्तांत आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

अर्रर्र

रमताराम
Tue, 05/22/2012 - 19:12 नवीन
किती उद्धटपणा हा हल्लीच्या पिढीचा. बिपिन आपला आहे म्हणून ऐकून घेतो झालं. खुद के साथ बांतां*: ररा तुला काम्पिटिशन लौन दिली ती ही बिपिनची. श्रामो लै ड्याम्बिस मानूस. *प्रताधिकार रंगाकाकांचा असला तरी आम्हाला वाप्रायची परवानगी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

काल संध्याकाळी ५ ला स्पाचा

अमोल खरे
Sun, 05/20/2012 - 16:46 नवीन
काल संध्याकाळी ५ ला स्पाचा फोन. म्हणे "कुठे आहात खरे" ? मी पण मख्खपणे त्याला "मी आत्ता बोरिवलीत आहे पण निघतोय आता, पोहोचतो आता लगेच ६ पर्यंत" असे म्हणालो. त्यावर त्याने हताशपणे "ये रे बाबा लवकर" असं म्हणुन फोन ठेवला. मी शार्प ६.३० ला पोहोचलो. :) तेव्हा तिथे स्पा, सौरभ उप्स, चचा आणि पुश्कर गोल करुन गप्पा मारत बसले होते. मी पण त्यांना जॉईन झालो. मग माननीय विमे आले आणि आम्ही आत जाऊन बसुया म्हणुन हॉटेल मध्ये शिरलो तर तिकडे लाद्या पुसत होते, बाहेर जा म्हणाले. मग परत बाहेर आलो. मोठा ग्रुप आहे बघितल्यावर आम्हाला बसायला खुर्च्या मांडुन दिल्या. वारा छान वाहत होता त्यामुळे बाहेर पण खुप मजा येत होती. एकेक जणांना फोन करुन तो येतोय / नाही येत याचा अंदाज घेणं सुरु होतं. तेवढ्यात अन्या दातार चा फोन आला. अरे तुम्ही कुठे आहात असं गोंधळुन विचारत होता. मी इकडे तिकडे पाहिलं तर एकजण शॉर्ट्स आणि टीशर्ट मध्ये फोनवर बोलत फिरत होता. मी उत्साहात अन्याला तु शॉर्ट्स घालुन आलायस का रे ? असं विचारलं, तर बिचारा बावचळला. मग थोड्या वेळाने हा भाई केईएम समोर असलेल्या नाव समान असलेल्या हॉटेल मध्ये आहे असं कळलं. मग तो तेथुन १५ मिनिटांत आला आणि आम्हाला जॉईन झाला. मग मकी आणि निदे आले आणि आम्ही सर्व जण आत गेलो. तोपर्यंत जयपाल पण आले होतेच. मग आत परत गप्पांची मैफल रंगली. अनेक विषय डिस्कस केले गेले, ज्यामध्ये अवलिया कोण ? (हा प्रश्न दर कट्ट्याला बाय डिफॉल्ट असतोच आणि त्याचं उत्तर कोणाकडेच नसतं), धमु का ऑनलाईन नसतो, आणि असे अनेक प्रश्न चर्चिले गेले. ( खरड / व्यनि पाठवुन "कोणते प्रश्न रे ?" असं विचारु नये. म्हणजे खरड पाठवा हवं तर पण उत्तर मिळणार नाही). अनेक ईंटरेस्टिंग गोष्टी कळल्या. हे सर्व चालु असताना लज्जतदार पदार्थ येत होते. पनीर च्या अनेक डिश टेस्ट केल्या. प्रास दादांचं सिलेक्शन मस्त होतं. एकेक डिश अप्रतिम चवीची होती. विमे, पुशकर (नाव बरोबर लिहिलाय. ह्याला पुशकर बदलुन घ्यायचाय. सारखं कोणीतरी ढकलताय असं वाटतं त्याला बहुदा) अनेक नवीन गोष्टी सांगत होते. निदे आणि मकीला सतावणं चालुच होतं. पण निदे बिचारा शांतपणे सर्व ऐकुन घेत होता. बोलता बोलता २-२.५ तास असेच निघुन गेले. एकदा मी आपणही लाईव्ह अपडेट्स देऊ असं म्हणालो पण मागील ठाणे कट्ट्याच्या वेळेस लोकांचं निम्म लक्ष अपडेट्स देण्यात होते आणि त्यामुळे गप्पा नीट रंगल्या नाहीत असं काहीजणांच मत पडलं. पण काहीही असलं तरी सॉल्लिड म्हणजे सॉल्लिड मजा आली. परत एकदा तात्या, रामदास काका आणि सर्वसाक्षी काकांची कमतरता जाणवली. ते असते तर जास्त मजा आली असती. ते सर्वजण काही कामात बिझी असल्याने येऊ शकले नाहीत. पण ह्या एका मिपामुळे मी टोटली अनोळखी लोकांना बिन्धास्तपणे भेटु शकलो. ह्याच मिपामुळे अन्या दातारला त्याने कधीही न पाहिलेल्या मिपाकरांना भेटावसं वाटलं, ह्याच मिपामुळे स्पा इतक्या रात्रीपर्यंत थांबुन ठाकुर्लीपर्यंत गेला. हे सर्व तात्यांमुळे झाले. मिपा असंच बहरत राहो आणि असे कट्टे वरचेवर होवोत हीच इच्छा. कालच्या कट्ट्याला हजर असलेले बाकी मिपाकर ह्यात भर घालतीलच.
  • Log in or register to post comments

Spelling Mistake ???

वपाडाव
Mon, 05/28/2012 - 17:49 नवीन
ह्याच मिपामुळे अन्या दातारला त्याने कधीही न पाहिलेल्या मिपाकरांना भेटावसं वाटलं....
काहीतरी स्पेलिंग मिस्टेक झालीये वाटते... अन्या दातारने पुण्यात ४-५ कट्टे केले आहेत. २ ट्रेका केल्यात. तेही वर्षभरापुर्वी... अन तरीही न पाहिलेले मिपाकर असे म्हटल्याबद्दल "खर्‍यांचा" निषेध... -(दातारांचा व्हर्च्युअल अन रियल मित्र) वप्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

प्रूफ

नितिन थत्ते
Sun, 05/20/2012 - 18:25 नवीन
कट्टा नक्की झाला का याविषयी शंका आहे. तुम्ही कॉन्स्पिरसी करून खोटा वृत्तांत कशावरून दिलेला नाही. आम्ही डोळ्यांनी फोटो पाहू तेव्हाच विश्वास ठेवू.
  • Log in or register to post comments

घोर अपमान. आम्ही आडनावाला

अमोल खरे
Sun, 05/20/2012 - 19:23 नवीन
घोर अपमान. आम्ही आडनावाला जागतो. फोटो पाहाल तेव्हा खात्री पटेलच तुमची. :) कॉलिंग जयपाल...कॉलिंग जयपाल....कॉलिंग जयपाल...कॉलिंग जयपाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

आम्ही डोळ्यांनी फोटो पाहू तेव्हाच विश्वास ठेवू.

कापूसकोन्ड्या
Mon, 05/21/2012 - 08:21 नवीन
अहो बड्या आसामी आहेत त्या! ते काय फोटो पण मॅनेज करतील. प्रत्यक्ष हजरी महत्वाची. पण चला आता टाकलेच आहेत ना फोटो, मग जळजळ विसरून मोठ्या मनाने ठेवुया विश्वास अन काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

अरे अन्या शेवटी का होईना मी

सूड
Sun, 05/20/2012 - 18:43 नवीन
अरे अन्या शेवटी का होईना मी पण फोन केला होता की रे !! ते लिहीलंच नाहीस. बाकी काही अपरिहार्य कारणास्तव येणे झाले नाही.
  • Log in or register to post comments

कारण काय असावे याचा अंदाज

रेवती
Sun, 05/20/2012 - 20:38 नवीन
कारण काय असावे याचा अंदाज आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आज्जीं भारीच मनकवडी हों !!

सूड
Mon, 05/21/2012 - 11:37 नवीन
आज्जीं भारीच मनकवडी हों !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अन्या दातार, अमोल, जयपाल

रेवती
Sun, 05/20/2012 - 20:41 नवीन
अन्या दातार, अमोल, जयपाल यांचे वृत्तांत, फोटू आवडले. निदे बिचारा शांतपणे सर्व ऐकुन घेत होता. मकची कृपा आहे ही. ;) नेहमीपेक्षा हा कट्टा गुणी मुलांचा का वाटला? ;) एकंदरीतच इनो घेण्याची वेळ.
  • Log in or register to post comments

नेहमीपेक्षा हा कट्टा गुणी

वपाडाव
Mon, 05/21/2012 - 15:07 नवीन
नेहमीपेक्षा हा कट्टा गुणी मुलांचा का वाटला?
घोर गैरसमज !! आज्जे, काजळ स्पाजळ होतं बरं त्यांच्याकडे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मजा आली

सौरभ उप्स
Mon, 05/21/2012 - 01:15 नवीन
कट्टा उत्तम झाला राव.. माझा हा पहिलाच कट्टा होता. स्पा ला आधीपासून ओळखत होतो, चचा व विमे यांना रायगड दौर्यावर भेटलो होतो त्यामुळे हे तिघे सोडले तर बाकी सगळ्यांशी पहिल्यांदाच भेट झाली, सर्वांना भेटून खूप छान वाटले .....
  • Log in or register to post comments

मटार उसळ खा! शिक्रण पोळी खा! चैन करा!

कापूसकोन्ड्या
Mon, 05/21/2012 - 08:29 नवीन
करा लेको मजा करा! मटार उसळ खा! शिक्रण पोळी खा! चैन करा! एकतर सगळ्यांनी जमायचे, वर पोट्भर गप्पा मारायच्या हादड हादड हादडायचे आणि वर फोटो पाठवून आम्हाला खिजवायचे कुठे फेडाल ही पापे? फोटो बाकी मस्तच हं! पुढच्या कट्ट्याला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

मित्रा

मी-सौरभ
Mon, 05/21/2012 - 15:48 नवीन
कट्टयाचं ठीकाण पुणे नव्हत तर मूम्बै होतं तेव्हा खा लेको पानी पुरी खा! पाव भाजी खा!! असं म्हटलं पाहिजे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कापूसकोन्ड्या

सौरभ +++११११११

जेनी...
Mon, 05/21/2012 - 20:33 नवीन
सौरभ +++११११११ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

विचार करण्यासाठी

कापूसकोन्ड्या
Mon, 05/21/2012 - 22:10 नवीन
विचार करण्याची प्रक्रिया ही माणसाच्या मनात असते तो कुठे असतो किंवा कुठले वृत्तांत वाचतो यावर नसते असे मोठे लोक (अर्थातच पुण्याचे, दुसरे कुठले?) म्हणतात ना रे झंप्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

विचार करण्यासाठी

कापूसकोन्ड्या
Mon, 05/21/2012 - 22:10 नवीन
विचार करण्याची प्रक्रिया ही माणसाच्या मनात असते तो कुठे असतो किंवा कुठले वृत्तांत वाचतो यावर नसते असे मोठे लोक (अर्थातच पुण्याचे, दुसरे कुठले?) म्हणतात ना रे झंप्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

उन्नीस / बीस, उन्नीस / बीस ठरत असतांना

लीलाधर
Mon, 05/21/2012 - 08:30 नवीन
अखेर (उन्नीस) १९ तारखेला कट्टा ठरला आणि मग काय स्पा उर्फ (मन्या फेणे) यांनी कट्ट्याला अपेक्षित मिपाकरांची यादी धाग्यावर दिली. यावरुन हाटेल्च्या बाहेर काही काळ व्यतित करावा लागल्याने मग स्पा आणि विमे यांच्यात पैज लागली विमे म्हणे स्पा अरे तु अपेक्षित असे धाग्यावर नमुद केलेच नाहीस मग काय तर स्पा गप्प बसेल तर तो स्पा कसला? लगेच त्याने एक हाती पैजेचा विडा उचलला आणि विमेपुढे आव्हान उभे केलेन की मी जर अपेक्षित असा शब्द धाग्यावर नमुद केला आहे जर असा शब्द असेल तर मला रुपये ५००/- द्यायचे आणि जर नसेल तर तु मला रुपये ५००/- द्यायचे... शेवटी स्पाने बाजी मारली पण हार मानेल तो विमे कसला त्याने स्पष्ट्च सांगितले की मी कुठे मान्य केले तुला रुपये ५००/- देईन म्हणून.... शेवटी एकदा हाटेलात गेल्यावर ओळख परेड झाली आणि कट्ट्याला खर्र्या अर्थाने सुरुवात झाली :) यात नव्याने ओळख झालेले मिपाकर: नि.दे, स्वाती तै, अमोल खरे, पुशकर मग काय गप्पा टप्पा आणि खादाडी खादाडी आणि नुसती खादाडी
  • Log in or register to post comments

जर अपेक्षित असा शब्द नसेल तर मी तुला रुपये ५००/- देईन असे वाचावे

लीलाधर
Mon, 05/21/2012 - 08:48 नवीन
जर अपेक्षित असा शब्द नसेल तर मी तुला रुपये ५००/- देईन असे वाचावे चुकुन चूक झाली राव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

वृत्तांत आवडला. मुंबई कट्टा

प्रचेतस
Mon, 05/21/2012 - 08:53 नवीन
वृत्तांत आवडला. मुंबई कट्टा जेव्हा सुरु होता तेव्हा पुण्यात पुणेकरांचाही राजधानीमध्ये समांतर कट्टा चालू असल्याने जळजळ झाली नाही. मोदक, ५० फक्त, प्यारेकाका, गणामास्तर, कवि गणेशा, पिंगू आणि अस्मादिकांनी मिळून आमरसाचा मनसोक्त आस्वाद घेतल्या गेला.
  • Log in or register to post comments

काय हे?

कापूसकोन्ड्या
Mon, 05/21/2012 - 22:00 नवीन
म्हणजे मुबै आणि पुणे दोन्ही कडे नसलेल्यांचे हाल का करता? वाटले पुण्याचे लोक आमच्या बाजूने असतील तर कसेल काय, ते पण कट्ट कट्ट खेळत होते तर ! असुया ही निसगदत्त भावना चक्रवाढ पद्धतीने वाढली ना? पण आम्ही पण केंव्हा तरी असेच येउ हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

समांतर वेळेत मनसोक्त

पिंगू
Mon, 05/21/2012 - 09:22 नवीन
समांतर वेळेत मनसोक्त अनलिमिटेड भोजनाचा फन्ना उडवला गेल्याने इनो घ्यायची वेळ टळली.. - पिंगू
  • Log in or register to post comments

कट्ट्याला आलेल्या सर्वांचे

पुश्कर
Mon, 05/21/2012 - 11:32 नवीन
कट्ट्याला आलेल्या सर्वांचे आभार. मी सगळ्यांना पहिल्यांदाच भेटत होतो तरी पण कोणी अनोळखी वाटले नाहीत . खूप विषयांवर बोललो , चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेतला... असेच कट्टे वरचेवर होऊदे .
  • Log in or register to post comments

मस्त कट्टा झालेला

प्यारे१
Mon, 05/21/2012 - 11:46 नवीन
मस्त कट्टा झालेला दिसतोय. बाकी मुंबई कट्ट्याला ठाणेकरांची उपस्थिती अम्मळ कमीच दिसते आहे. ;) अवांतरः फोटो ४ मध्ये निदेंनी अशी 'गलगले स्टाईल' पोझ का घेतली आहे बरे?
  • Log in or register to post comments

वेटर च्या मदतीने काढलेला सर्व उपस्थित मी पा करअचा फोटो.

सौरभ उप्स
Mon, 05/21/2012 - 13:16 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

एकमेकाना भेटायला जातात की

जेनी...
Mon, 05/21/2012 - 20:36 नवीन
एकमेकाना भेटायला जातात की फक्त हाटेलात खायला जातात ..प्रश्न पडलाय राव :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

आहो बाई म्या काय म्हनतु

jaypal
Mon, 05/21/2012 - 23:01 नवीन
या की एक डाव कट्ट्यावर आं, मग दाखवितो तुम्हाला .................................मज्जा. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

ही ही ही .........

जेनी...
Tue, 05/29/2012 - 18:38 नवीन
ही ही ही ......... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

छान आहे कट्टा वृत्तान्त!! आणि

मृगनयनी
Tue, 05/22/2012 - 11:22 नवीन
छान आहे कट्टा वृत्तान्त!! आणि फोटो पण!.. फक्त 'मिसळपाववर मुम्बईच्या स्त्रियांचे प्रमाण तुलनेने कमी आहे'... याची प्रचिती फोटोतून आली. :) (रेशो- १० : १ असा आहे) ;) असे का ? की मुम्बईच्या स्त्रिया जास्त बिझी असतात? आमच्या पुण्यातल्या कट्ट्याला किमान हा रेशो १० : ४/५ असा तरी असतो.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा