बर्याच काळाने आमचा नान्या सक्रिय राजकारणात परत आला, आणि आमचा आनंद बाटलीत मावेनासा झाला. तोबताबड आम्ही आमच्या चौपाटीवरती प्यार्टी आयोजीत केली. सगळी चौपाटी सजली होती, बार टेंडर, कॅप्टन, वेटर सगळे नवीन धुतलेले कपडे घालून सेवेला हजर झाले होते, मात्र नान्याच्या चेहर्यावरती उदास उदास भाव दाटून राहिले होते. गप्प गप्प नान्या काय मला बघवेना. शेवटी गुमसुम मध्ये २ पेग झाल्यावरती मी नान्यावरती सरळ डाफरलोच.
मी :- नान्या, काय मयतीला जौन आला बे ? असा का बसला आहेस ?
नाना :- पर्या काय सांगू तुला ? मला ४ दिवस झाले वेताळाने पकडले आहे. त्याने मला काही प्रश्न विचारले आहेत आणि त्यांची उत्तरे बुधवारच्या रात्री द्यायलाच हवी असे सांगितले आहे रे. आज बुधवार रात्र आहे आणि मी विचारच करू शकलेलो नाही.
मी :- अरे असे काय विचारले बे त्याने ? मला सांग आपण भिडू आज जाऊन त्याला.
मी येवढे बोललो आणि नान्या फ्लॅशबॅक मध्ये गेला ...
रविवारी मी नको नको म्हणत असताना देखील नान्या पार्टी झाल्यावरती रात्री १२ च्या सुमाराला नाना एकटाच घराकडे निघाला होता..
अचानक त्याला पाठीवरती ओझे जाणवायला लागले, बघतो तर काय.. वेताळ खुद्द पाठीवरती हजर. नान्याने विक्रम वेताळ बघितलेले असल्याने वेताळाने डायरेक्ट गोष्टच सांगायला सुरुवात केली.
एक खूप मोठे जंगल होते... जंगलात अनेक छोटी मोठी राज्ये, विहिरी, समुद्र सुखाने नांदत होती. आपल्या राज्यात मौजमजा करावी आणि अधे मध्ये शेजारच्या राज्यात काड्या साराव्यात, त्यांच्या नावाने खडे फोडावेत असे उद्योग चालू होते. जंगलातले अनेक रहिवासी हे एकाचवेळी अनेक राज्यांचे नागरिकत्व बाळगून असल्याने दंगल जोरात सुरू असायची. ह्या जंगलात एक आयटम राज्य होते. ह्या राज्याचा राजा भारी हिकमती होता. तो पाणी अडवायचा, जिरवायचा आणि वेळ पडली तर कृत्रिम पाऊस देखील पाडायचा. त्यामुळे त्याचे राज्य कायम हिरवेगार असायचे. सगळीकडे हिरवेगार गवत असायचे, फळे फुले लगडलेली असायची, त्यामुळे शाकाहारी प्राणी इकडेच धाव घ्यायचे. शाकाहारी प्राण्यांच्या मुबलकतेमुळे मांसाहारी प्राण्यांचा देखील ह्या जंगलावरती भारी जीव होता. हे सगळे बघून शिकारी देखील आपले मचाण इकडेच बांधायला लगबग करायचे. असे हे मोस्ट हॅपनींग प्लेस असलेले राज्य होते.
सगळे काही सुखसमाधानाने चाललेले असतानाच अचानक ह्या राज्याचा राजा राज्य सोडून निघून गेला. कोणी म्हणाले त्याने पापाचे प्रायश्चित्त केले, तर कोणी म्हणाले त्याला हुसकावून लावले. पाप म्हणजे काय तर राजाने काही प्राण्यांच्या शिकारी मधला वाटा पळवून नेला. जे झाले ते झाले... प्रचंड गदारोळ, राज्य बुडाले इ. इ. चर्चा देखील मागे पडल्या आणि राज्याचा कारभार पुन्हा सुरळीत झाला. नव्या राजाने नवी घडी बसवली.
ह्या नव्या अमदानीत सामान्य प्रजा नेहमीच्या व्यवहारात मग्न होती, मात्र पडद्यामागे अनेक कारवायांना ऊत आला होता. राजाने नव्याने नेमलेल्या काही अधिकार्यांना आता जंगलाचे कायापालट करण्याचे स्वप्न पडू लागले होते. जुन्या अधिकार्यांचा रुबाब कायम होता पण त्यांना पूर्वीचे निष्ठावंत नागरिक आता देशद्रोही वाटू लागले होते. आपल्या माणसांची वर्णी लावण्यासाठी सगळ्यांची धडपड चालू होती. अशातच राज्यात दुही माजली आणि काही दुखावलेल्या रहिवाशांनी आपले वेगळे राज्य स्थापन केले. मग झाडे कोणाची, समुद्र कोणाचा असे वाद सुरू झाले.
काही जुन्या अधिकार्यांनी मग आपले सुपीक डोके लढवले आणि राज्यात नव्या नागरिकांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. हे नवे नागरिक तसे 'आपण बरे आणि आपले काम बरे' अशा वृत्तीचे. अधिकार्यांनी मग त्यांना नव्या नव्या स्वप्नांचे गाजर दाखवायला सुरुवात केली. त्यांना अधिकार मिळवा, तुमचे हक्क मिळवा अशा काड्या सारायला सुरुवात केली. नवे नागरिक भांबावले, त्यांना काय करावे, कसे करावे सुचेना. शेवटी प्रसिद्धी आणि अधिकार कोणाला नको असतो ? ते पण ह्या भूलथापांना बळी पडले आणि एका नव्याच नाटकाला सुरुवात झाली.
जुन्या अधिकार्यांच्या पाठिंब्याने मग ह्या नव्या निष्ठावंताच्या मेळाव्यांना, परिषदांना सुरुवात झाली. पडद्याआडून बरीच सूत्रे हालवली जात होती, मात्र पडद्यासमोरच्या नाटकात फक्त नव्या नागरिकांचाच अभिनय दिसत होता. ह्या सगळ्याला जोर म्हणून मग जुन्या निष्ठावंताच्या गटावरती दबाव आणायला सुरुवात झाली. कधी कर चुकवला म्हणून शिक्षा कर, तर कधी राजाज्ञा डावलली म्हणून हद्दपारी कर, तर कधी एकांतात भेटी घेऊन दमदाटी कर असे प्रकार सुरू झाले. नवीन अधिकारी हे सगळे खेळ बघत होते, मात्र कुठल्याश्या अगम्य कारणाने ते ह्यात हस्तक्षेप करतच नव्हते. ह्या सगळ्यामुळे नुसती अनागोंदीच माजली होती.
अशातच एका जुन्या जाणत्या अधिकार्याने शाकाहारी - मांसाहारी, झाडावरचे- जमिनीवरचे अशा वर्ण आणि जातीद्वेषाचे बीज राज्यात रोवले आणि एकच धुमाकूळ माजला. 'सय्या भये कोतवाल.. अब डर काहे का ?'. नव्या नागरिकांनी आणि वर्णद्वेषींनी एकच गल्ला केला. काही हुशार लोकांनी जुन्या स्कोर सेटिंगला सुरुवात केली. राज्याला पार रसातळाला न्यायचाच विडा जणू उचलला गेला.... आणि मग एकवेळ अशी आली की समंजस नागरिकांनी आपला राज्यातला वावरच कमी केला.
नाना, आता मला सांग हे राज्य वाचवायचे कसे ?
ह्या राज्याची अवस्था ओसाडगावासारखी होऊ नये म्हणून काय करायला हवे ?
जुन्या अधिकार्यांच्या सत्तालोलुपतेला आळा कसा घालावा ?
सगळ्या नागरिकांच्यात सामंजस्य कसे आणावे ?
समुद्र आणि विहीर दोन्ही आपलेच आहेत हे दोन्हीकडच्यांना समजवावे कसे ?
वैतागून राज्यकारभारातुन अंग काढून घेतलेल्या मंत्र्यांना परत आणावे कसे ?
"तू विक्रमादित्य नाहीस म्हणून तुला बुधवार पर्यंत वेळ देत आहे. बुधवारी रात्री जर ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत तर कायमच तुझ्या समोरच्या ग्लासचे आणि बाटलीचे १०० तुकडे होऊन तुझ्याच टेबलाशी लोळण घ्यायला लागतील. " येवढे बोलून वेताळ परत पानटपरीवरती जाऊन बसला.
मी आणि नान्या ह्या प्रश्नांची उकल करतो आहेच, पण तुम्ही देखील काही हातभार लावावात ही अपेक्षा.
वाचने
8923
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
च्यायला!!
+१
In reply to च्यायला!! by कवितानागेश
बिंधास्त रहा,
>>>>"तू विक्रमादित्य नाहीस
माताय, या वेताळाचा प्रॉब्लेम
उत्तर दिलं नाही म्हणून बाटली
In reply to माताय, या वेताळाचा प्रॉब्लेम by सूड
>>तुम्हाला लैच मजा येते अस
In reply to उत्तर दिलं नाही म्हणून बाटली by स्पा
अरे तुम्हाला काय
In reply to >>तुम्हाला लैच मजा येते अस by सूड
परत तेच?
आपण याकार्यार्थ एक सप्त
मागे एकदा कोणीतरी " बुधवारचा
त्या कुंडलीवरुन सोलुशन
अरे...? नवीन मालिका आली...
बुधवार
अर्रे वेताळा कुठे फेडशील ही
(No subject)
हा वेताळाचा फटु आहे का? डोळा
In reply to (No subject) by बिपिन कार्यकर्ते
चालु द्यात ...
विक्रम आणि वेताळ
+१
In reply to विक्रम आणि वेताळ by पैसा
वेताळ बराच हुशार आहे
आणि कारभार हाती घेउन वेताळ
In reply to वेताळ बराच हुशार आहे by गणपा
ही आली हडळ. ह. घ्या. बाकी
In reply to आणि कारभार हाती घेउन वेताळ by प्रीत-मोहर
वेताळाला नानुडीची मान आहे ना.
In reply to आणि कारभार हाती घेउन वेताळ by प्रीत-मोहर
ओ सायेब.....
In reply to वेताळ बराच हुशार आहे by गणपा
हान तीच्या मायला.
काही प्रतिप्रश्न विक्रमाचे
॥ गणपती बाप्पा मोरया ॥
In reply to काही प्रतिप्रश्न विक्रमाचे by पैसा
स्टेनो
In reply to ॥ गणपती बाप्पा मोरया ॥ by परिकथेतील राजकुमार
+111111111221
In reply to काही प्रतिप्रश्न विक्रमाचे by पैसा
पैसा ताईंसाठी जोरदार
In reply to काही प्रतिप्रश्न विक्रमाचे by पैसा
असाच गाभा असलेला एक लेख.....
ह्याची आठवण झाली
तो काय उत्तर देणार ?
वसाडी भरली तुला वाश्या...
In reply to तो काय उत्तर देणार ? by सुहास..
श्श्या! वाश्या तुझ्याकडून ही
In reply to तो काय उत्तर देणार ? by सुहास..
(No subject)
In reply to श्श्या! वाश्या तुझ्याकडून ही by प्यारे१
klkI
;)
In reply to klkI by ऋषिकेश
आता ते त्या वेताळकथेतील
In reply to ;) by पैसा