|| चिरन्जीवी परशुराम ||
परशुराम ;-
भगवान महाविष्णुचा सहावा अवतार असणार्या "परशुरामा"बद्दल काही जातीय कारणास्तव बरीच उलटीसुलटी चर्चा ऐकायला मिळते. परशुरामाबद्दल काही तरी ऐकीव माहितीआधारे बरेच लोक त्याला अविवेकी ठरवतात. परन्तु परशुरामाचे खरे रूप अत्यन्त सच्चे, मातृ-पितृ भक्त असेच आहे. तसेच त्याने कोणावरही कुठलाही अन्याय केलेला नाही...उलट भगवान परशुरामामुळे लोकांचे कल्याणच झाले आहे. यावर प्रकाश टाकणारा हा लेख! -
महिष्मती नगरीचा क्षत्रियकुलोत्पन्न राजा क्रतुवीर व राणी राकावती यांना गुरु-दत्तात्रेय कृपेने पुत्रपाप्ती झाली. त्या पुत्राचे नाव- कार्तवीर्यार्जुन. यास जन्मतः दोन्ही हात नव्हते, पाचव्या वर्षानन्तर दत्तकृपेने अचानक हजार हात उत्पन्न झाले. म्हणून त्याला सहस्त्रार्जुन असेही म्हटले जाई. तेव्हा दत्तगुरुंनी त्यास उपदेश केला, की 'कार्तवीर्यार्जुन हा क्षत्रियांचा स्वामी होईल, तिन्ही लोकांत समर्थ्यवान होईल. पण लोभीपणा व दु:संगतीमुळे जर देव, गुरु, सन्त इ.चा अपमान, अव्हेर जर कार्तवीर्यार्जुनाकडून होईल.. तर त्याचा स्वतःचा तर नाश होईलच पण सार्या क्षत्रियकुलाचा विध्वंस होऊन तो अपकीर्तीला पात्र ठरेल."
कार्तवीर्यार्जुन खूपच शक्तिशाली होता. त्याने लन्केचा राजा- रावण यासही बन्दीवान बनवून ठेवले होते. रावणाच्या वडिलांनी- पौलस्तिऋषींनी मध्यस्थी करून गोड बोलून रावणाची सुटका करवून घेतली. पण यामुळेच कार्तवीर्यार्जुनाचा मद दिवसेंदिवस वाढीस लागला. दत्तगुरुंनी सांगितलेल्या गोष्टी, नम्रपणा इ. तो विसरू लागला. ते पाहून नारद मुनींनी त्याला सावध करण्याचा प्रयत्न केला. पण तो निष्फल ठरला. सहस्त्रार्जुनाच्या राज्यात सज्जन, ऋषीमुनी यांचा छळ होऊ लागला होता. दत्तगुरुंच्या आशीर्वादामुळे आपल्या सहस्त्र बाहूंच्या शक्तीने तो इन्द्रलोकीची सम्पत्ती हिरावू इच्छित होता. त्यामुळे सर्व देवांनी शंकर आणि आदिमायेची प्रार्थना केली. व सहस्त्रार्जुनाचा नाश करण्याची भावना व्यक्त केली. शिवपार्वतीने 'तथास्तु' म्हणून त्यांची मनोकामना पूर्ण करन्याचे आश्वासन दिले.
रेणुक राजा व भोगावती राणी यांनी 'त्रिवेणीसंगम' येथे जाऊन केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञाचे फलित म्हणजेच "रेणुका" होय. जी साक्षात आदिमायेचे- पार्वतीचे रुप होती. अश्विनीकुमारांच्या कृपेने नवतारुण्य-आरोग्य प्राप्त झालेल्या, भृगुवन्शीय च्यवनऋषींचा पुत्र ऋचिक व गाधिराजाची कन्या सत्यवती यांच्या पोटी जन्मलेले "जमदग्नि" ऋषी हे साक्षात शंकराचे अंश होते.
अगस्त्यमुनींच्या सांगण्याप्रमाणे पूर्वसन्केतानुसार ब्राह्मण जमदग्नीमुनी व क्षत्रिय रेणुकादेवी यांचा विवाह झाला. रेणुकेस वसु, विश्ववसु, बृहदभानु, बृहतकण्व असे चार पुत्र झाले. त्यानन्तर जमदग्निऋषींनी भगवान नारायणाच्या सामर्थ्याने सिद्धमन्त्र जपून एक "चरू" बनवून रेणुकेस दिला. त्यायोगे भगवान विष्णु पुत्ररुपाने जमदग्नि-रेणुका मातेच्या पोटी जन्माला आले. तो दिवस- अक्षयतृतीया. त्या समयी एकाएकी कार्तवीर्यार्जुनाच्या राजधानीचे शिखर फुटुन चुराडा झाले. क्षत्रिय बायकांच्या मन्गळसूत्राला हिसका बसला. हाच महाविष्णुचा सहावा अवतार! - 'परशुराम'
इकडे नवीन बालकाचे नाव- "रामभद्र" असे ठेव्ले गेले. तेव्हापासून जमदग्नि ऋषी व इतर शिष्यांचे वसतिस्थान असणार्या 'सिद्धाचल पर्वता'स 'रामशृन्ग पर्वत' असे म्हटले जाऊ लागले. आठव्या वर्षी रामभद्राचा व्रतबन्ध झाल्यावर जमदग्निऋषींनी त्याच्याकडून अध्यायनही करवून घेतले. मातापित्याच्या सेवेत रामभद्र तत्पर असताना एके दिवशी क्षत्रियांच्या छळामुळे त्रासून गेलेले गालव, मातन्ग, शांडिल्य, कौंडिण्य इ महर्षि रामशृन्ग पर्वतावर जमदग्नि ऋषींच्या आश्रयास आले. ऋषी-महर्षिंना क्षत्रियांपासून होणार्या त्रासाचे वर्तमान कळताच त्या ऋषींना जमदग्निंनी आपल्या आश्रमात ठेवुन घेतले. रामभद्रा'ला धनुर्विद्या शिकण्यासाठी कैलास पर्वतावर पाठवले. व क्षत्रियांची मस्ती उतरवण्यासाठी जमदग्नींनी उग्र तपाला प्रारम्भ केला.. त्यामुळे 'क्रोधदेवता' त्यांना प्रसन्न झाली. त्यांचे तप चालू असताना ते भन्ग करण्यासाठी कार्तवीर्यार्जुनाने अनेक प्रयत्न केले. पण ते फोल ठरले.
तिकडे "रामभद्र" कैलासपर्वतावर साक्षात शिवाकडून धनुर्विद्या शिकला. पार्वतीमातेकडून त्याने "अंबिकास्त्र" मिळवले. कार्तवीर्याकडून व इतर राजांकडून होत असलेला ऋषेमुनींचा छळ वाढतच होता. त्यामुळे जमदग्निंच्या आज्ञेनुसार रामभद्राने कैलासपर्वतावरील आपली साधना अधिक वाढवली.
सासरच्या रीतीप्रमाणे लग्न झाल्यानन्तर रेणुकामाता रोज सकाळी नदीवर जाऊन वाळूची घागर बनवून त्यात पाणी भरून डोक्यावर सापाची चुम्बळ करून त्यावर घागर घेऊन शिवपूजेसाठी पाणी येत असे. परन्तु जमदग्नि ऋशींची तपस्या चालू असताना एके दिवशी पाण्यास रेणुकामाता गेली असता चित्ररथ नावाच्या गन्धर्वाची व त्याच्या पत्नीची जलक्रीडा तिच्या दृष्टीस पडली. ते पाहून आपल्यालाही आपल्या पतीसह अशीच क्रीडा करता आली असती तर!.. असा स्त्रीसुलभ विचार तिच्या मनात डोकावला. पण दुसार्याच क्षणाला मनाच्या चन्चलपणाचा धिक्कार करून तिने आपले मन पाणी भरण्याकडे केन्द्रित केले. पण त्यावेळी तिला रोजच्यासारखी वाळूची घागर बनवता नाही आली. सापाची चुम्बळ बनवताना साप हातातून निसटून गेला. व पाण्याशिवाय घरी यावे लागले. शिवपूजेला पाणी न मिळाल्याने क्रोधायमान झालेल्या जमदग्नि ऋषींनी तिला पाणी न आणण्याचे कारण विचारल्यावर तिने खरे काय ते सांगितले. त्यामुळे ते जास्तच चिडले व रेणुकेस चालते होण्यास सांगितले व तिस शाप दिला, की तुझे तोन्ड आणि शरीर काळे ठिक्कर पडेल. व तसे खरोखर झाले. बाहेर पडलेल्या रेणुकेला दु:ख अनावर होत होते. अश्या वेळी तिला "एकनाथ व जोगिनाथ" हे २ शिवयोगी भेटले. तिने त्यांना वन्दन केले. तेव्हा तिचे मनोगत जाणून शिवयोग्यांनी तिला सांगिअले, की "समोरील सरोवरात रोज स्नान करून शिवलिन्गाची पूजा कर. व पाच घरी भिक्षा मागून अर्धी भिक्षा आम्हास दे व अर्धी तू खा. तुझे शरीर व मन पुन्हा पूर्ववत होईल" त्याप्रमाणे रेणुका देवी वागल्यानन्तर ती पुन्हा गौरवर्णीय व स्थिरमनाची बनली. शिवयोग्यांचा निरोप घेण्यासाठी ती गेली असता ते म्हणाले,' अजून काही दिवसांनी तुला तीन घटका वैधव्य प्राप्त होईल. त्यानतर मात्र तुझे सौभाग्य अखंडित राहील."
दुसर्या दिवशी शिवगुरुंचा आशीर्वाद घेऊन रेणुकादेवी आपल्या आश्रमाकडे निघाले. ती तिथे पोचताच जमदग्निंच्या वर प्रसन्न झालेल्या क्रोधदेवतेमुळे ते रेणुकेवर प्रचन्ड चिडले व क्रोधायमान होऊन म्हणाले," ज्याअर्थी तू इतके दिवस आश्रमाबाहेर होतीस.. त्या अर्थी तुला इथे थारा नाही. तू चालती हो!" त्यामुळे वारंवार माफी मागून रेणुकादेवीने त्यांना विनवले. जमदग्नि ऋषींचा सन्ताप अनावर होऊन त्यांनी आपल्या चार ज्येष्ठ पुत्रांना बोलावले व रेणुकेकडे बोट दाखवून सांगितले, की "तुमच्यापैकी कोणी हिचा वध करू शकत असेल.. तर करा." तेव्हा "पित्यापेक्षा माता हजार पटींनी श्रेष्ठ असते, त्यामुळे आम्ही हे अविचारी पापकृत्य करणार नाही." असे चारी पुत्रांनी पित्यास स्पष्ट सान्गितले. त्यामुळे जमगग्निंमधल्या क्रोधदेवतेने चौघा पुत्रांना "मृत व्हा" असा शाप दिला. व क्षणार्धात ते चारी जण मृत्यू पावले. रेणुकामाता ते पाहून शोक करू लागली.
त्यावर जमदग्नींनी रामभद्राला हाक मारली. तोच रामभद्र कैलासपर्वतावरून आला. चारही पुत्रांप्रमाणे जमदग्निंनी त्यालाही मातेचा वध करायची आज्ञा केली. नाहीतर चौघा भावांप्रमाणेच त्याचाही वध करण्याची जमदग्निंनी तयारी होती. वडिलांवर प्रसन्न झालेली क्रोधदेवता रामभद्रास माहित होती. ऋषी-मुनी सज्जनांना छळणार्या कार्तवीर्यार्जुनादि क्षत्रियांच्या नाशासाठी प्रसन्न करून घेतलेल्या या क्रोधदेवतेचा उपयोग अॅक्चुली अनुचित कारणासाठी होतोय.. हे रामभद्राने जाणले. त्यामुळे नाईलाजाने मातेचा वध करण्यापलीकडे उपाय नाही, हेही रामभद्रास कळून चुकले. परन्तु मातेचा वध केल्यानंतर शान्त झालेल्या क्रोधदेवतेकडून जमदग्नि पुनश्च रेणुकामातेस जिवन्त करू शकतील.. असा विश्वासही त्यास होता. त्यामुळे सारासार विवेक बुद्धी वापरून रामभद्राने रेणुकामातेचा वध केला. व पित्याची आज्ञा अमलात आणली. साहजिकच खूष झालेल्या जमदग्निंनी रामभद्रास वर मागायला सांगितले. तेव्हा रामभद्राने " मातेस व चौघा बन्धुंस पुनः जिवन्त करावे आणि त्यांना मृत्यूचे स्मरणही राहू नये, असे करावे. तसेक्ष या सर्व गोष्टींना काराणीभूत असलेली जी क्रोधदेवता, तिचा त्याग करावा" असे सांगितले. त्याप्रमाणे रामभद्राचे वचन कबूल करून त्या पाचही जणांना जमदग्नि ऋषींनी उठवले. व क्रोधदेवतेला त्यांना जाण्याची आज्ञा केली. अणि त्यावर ते पूर्ववत् संसार करू लागले.
परन्तु या सगळ्यामुळे रामभद्राला मातृहत्येचे पातक लागले. त्यामुळे या पापातून कसे मुक्त व्हावे, असा प्रश्न त्यांनी पित्याला विचारला. तेव्हा जमदग्नींनी त्यास मन्त्रोपदेश करून भागीरथीतीरी शिवाराधना करण्यास सांगितले. त्याप्रमाणे रामभद्राने शन्करास प्रसन्न करून घेतले. शन्कराने रामभद्रास कैलास पर्वतावर बोलावून नेले. तिथेच षण्मुखस्वामींपासून रामभद्रास चौदा विद्या, चौसष्ठ कलांचे ज्ञान अवगत झाले. पुढे श्रीगणेशाला रामभद्रास "परशु" दिला. आणि रामभराचे "परशुराम" असे नामाभिधान केले. व मातापित्यांना भेटून येण्यास सांगितले. तेव्हा 'परशुराम' पुन्हा रामशृन्ग पर्वतावर येऊन मातापित्यांच्या सेवेत रत राहू लागले. परशुरामाने प्राप्त केलेल्या शस्त्रास्त्र विद्येमुळे, दिव्य परशुमुळे, शिवपार्वती व गणेशाच्या आशीर्वादामुळे जमदग्नि ऋषींनी सर्व ऋषीमुनींना निविघ्नपणे यज्ञयागादि करण्यास सांगितले. त्यावर काही कारणास्तव परशुराम पुन्हा कैलासावर गेले.
इकडे नारदमुनी रामशृन्ग पर्वतावर जमदग्नि ऋषींच्या आश्रमात आले, तेव्हा जमदग्नि-रेणुकेचा इन्द्रदेवाने लग्नात भेट दिलेल्या कामधेनूच्या सहाय्याने चाललेला संसार पाहून त्यांना आनन्द झाला. आपल्या आराध्य दैवताच्या म्हणजे विष्णुच्या सहाव्या अवताराची-परशुरामाची व शन्कराची आठवण त्यावर ते कैलासावर गेले. शिवाने नारदांसमोर परशुरामाचे व त्याच्या सामर्थ्याचे वर्णन केले. ते ऐकून कार्तवीर्यार्जुनाचा नाश होण्याची वेळ जवळ आल्याचे नारदांनी ओळ्खले व त्यांना आनन्द झाला.
त्या आनंदाच्या भरात ते कार्तवीर्यार्जुनाच्या महिष्मती नगराकडे वळले. व त्याचा अतिथीउपचार स्वीकारल्यावर त्यास जमदग्निंकडच्या कामधेनूबद्दल सांगून अशी दिव्य गोमाता सहस्त्रार्जुनाकडे असावयास हवी असेही आमिष त्याच्या मनात निर्माण केले. तसेच जमदग्निमुनींनी क्रोधदेवतेचा त्याग केल्यामुळे आता त्यांच्यापासून कार्तवीर्यास कोणताही धोका नसल्याचेही नारदांनी त्यास सांगितले.
त्यावर नारदांच्या सांगण्यानुसार कार्तवीर्यार्जुन ७०० सैन्य व सातशे घोड्यांसह राम्शृन्ग पर्वतावर गेला. तेव्हा जमदग्नि-रेणुकामातेने त्यांचे उचित स्वागत करून सर्वांना पन्चपक्वान्नाचे जेवण दिले. तेव्हा कार्तवीर्यार्जुनाला जमदग्निंकडे असलेल्या 'कामधेनू'बद्दल खात्री पटली. व त्याने जमदग्निंकडे कामधेनू'ची मागणी केली. तेव्हा जमदग्नि म्हणाले," हे राजन, तुझ्याजवळ अलोट सम्पत्ती, हजारो दास-दासी व सेवक आहेत. तेव्हा तुला कामधेनू काय कामाची? आम्हा ऋषीमुनींकडे कामधेनू असल्यामुळे लोकांच्या कल्याणासाठी, तसेच वातावरण पवित्र ठेवण्यासाठी यज्ञ याग करायला व हरिस्मरणाला आम्हाला भरपूर वेळ मिळत आहे. त्यामुळे ही कामधेनू आमच्याकडेच राहू देत."
तेव्हा त्यांचे बोलणे न ऐकता कार्तवीर्यार्जुनाने बलात्काराने कामधेनू हरण करायचा प्रयत्न केला. तिचे चारी पाय दोरीने आवळून बान्धताच कामधेनूने ते बन्धन एका क्षणार्धात सोडून जमीनीवर जोराने पाय आपटले. व क्षणार्धात तेथे हजारो गाई उत्पन्न झाल्या. आणि त्यांनी शिन्गे खुपसून कार्तवीर्यार्जुनाच्या सैन्यास ठार मारले. व कामधेनू पुनश्च जमदग्निंच्या जवळ येऊन उभी राहिली.
त्यामुळे कार्तवीर्यार्जुनाचा अत्यंत सन्ताप झाला. व तो जमदग्निंना ठार मारण्यासाठी पुढे सरसावला. तोच कामधेनू त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या पुढे एखाद्या पहाडासारखी उभी राहिली. पण जमदग्नि तिला उद्देशून म्हणाएल," हे नदिनी, जे विधिलिखित आहे, ते तू पुसू नकोस. या राजाची इच्छा पुरी होऊ देत." त्यावर कामधेनू नाईलाजाने दूर झाली. व कार्तवेर्यार्जुनाने जमदग्निऋषींचा शिरच्छेद केला.
तो दिवस म्हणजे- मार्गशीर्ष शुद्ध १४, कृत्तिका नक्षत्र व रात्रीचा पहिला प्रहर होता. त्यावर कार्तवीर्यार्जुन पुन्हा कामधेनूस धरायला गेला असता ती अदृश्य झाली. ते पाहून कार्तवीर्यार्जुन भयभीत झाला आणि आपल्या राजधानीस गेला.
अश्याप्रकारे शिवयोगींनी रेणुकेस सांगितलेले भवितव्यही खरे ठरले. त्यामुळे रेणुका वैधव्यदु:ख असह्य होऊन "परशुरामा"स हाका मारू लागली. तोच परशुराम कैलासावरून क्षणार्धात आश्रमात आले. व त्यांनी मातेला धीर दिला, की " तू काळजी करू नकोस, सूर्योदय होताच स्थिती पालटुन्न जाईल." त्यावर ऋचिक, वसिष्ठ, अगस्त्य, विठोब, शिरशृन्ग इ. ऋषींनी रेणेकेस बोध केला. तोपर्यन्त अरुणोदय झाला. तेव्हा अगस्त्यमुनींनी वसिष्ठांच्या कमंडलूतील पाणी (जमदग्निंच्या वडिलांच्या)ऋचिक्मुनींच्या हातावर घातले. ऋचिकमुनींनी ते पाणी सन्जीवनी मन्त्राने अभिमन्त्रित करून जमदग्निंच्या मृत शरीरावर शिम्पडले. आणि भविष्यवाणीनुसार जमदग्नि पुन्हा शिवस्मरण करीत उठून बसले. तोच स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली. नाना वाद्ये वाजू लागली. आनन्दोत्सव साजरा झाला. अगस्त्यमुनी व ऋचिक मुनींनी शिव-पार्वती-गणेशाची स्तुती करून परशुरामास सर्व देवांना शान्त करन्यासाठी शान्तीहोम करण्यास सांगितले. व ज्या कारणास्तव परशुरामाने आत्तापर्यन्त इतके सामर्थ्य मिळवले.. त्या कार्यास आरम्भ करण्यास सांगितले. म्हणजेच सर्वांचा छळ करणार्या कार्तवीर्यार्जुनाचा आणि इतर तत्सम क्षत्रियांचा नाश करून पृथ्वीवरील भार हलका करण्यास सांगितले.
पितामहांकडून आलेली आज्ञा घेऊन परशुरामकार्तवीर्यार्जुनाच्या महिष्मती नगरीत आला व सामर्थ्याच्या बळाने मदोन्मत्त झालेल्या सहस्त्रार्जुनाकडे युद्धभिक्षा मागितली. कार्तवीर्यार्जुन परशुरामाला प्रथमच बघत होता. तोपर्यन्त त्याने परशुरामाबद्दल ऐकलेल्या गोष्टीची व त्याच्या पसरलेल्या कीर्तीची खात्री पटली. जरी कार्तवीर्यार्जुन युद्धाला उभा राहिला.. तरी त्याच्या दुष्कर्माचा अन्त जवळ आल्यामुळे मनातून तो अत्यन्त भयभीत झाला होता. "गोहत्या, स्त्रीहत्या, ब्रह्महत्या इ. पाप करण्याबद्दल नेहमी सावध रहा." हा दत्तगुरुंनी दिलेला उपदेश कार्तवीर्यार्जुनाने पालान केला नाही. त्यामुळे त्याच्याकडून गुरुआज्ञेचा भन्ग झाल्याचेही पाप घडले.
परशुरामाने आधी शस्त्रास्त्रेकरून सहस्त्रार्जुनाचे सैन्य मारून टाकले. नन्तर अम्बिकास्त्र सोडून प्रथम कार्तवीर्यार्जुनाचे हात तोडले. परन्तु कार्तवीर्यार्जुनास सहस्त्र बाहूंचे वरदान असल्यामुळे एकीकडे परशुराम सहस्त्रार्जुनाचे हात तोडत आहे.. व दुसरीकडे ते परत उत्पन्न होत आहेत.. असे चालले. उत्प्न्न झालेल्या हातांमुळे कार्तवीर्यार्जुन युद्ध करतच राहिला. एकवीस वेळा असे घडल्यावर परशुराम चिन्तीत झाला.
यामुळेच "परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली." असे म्हटले जाते.
तोच आकाशवाणी झाली, की "अर्जुनाच्या पोटातील अमृताची कुपी काढलीस तर खचित विजयी होशील!" त्याप्रमाणे परशुरामाने केल्यावर सहस्त्रार्जुनाचा वध तो करू शकला. व स्वार्थी, क्षत्रियधर्म विसरलेल्या, ऋषीमुनींचा छळ करून अत्याचार करणार्या दुराचारी क्षत्रियांपासून पृथ्वीला मुक्त केले. त्यानन्तर परशुरामाने मातापित्यांस वन्दन करून सर्वांना अभयदान दिले.
त्यावर अगस्तिमुनींनी सर्वांना याची आठवण करून दिली, की ""दुष्टांचा संहार करण्यासाठी व सज्जनांचे रक्षण करण्यासाठी इन्द्रादि देवांनी प्रार्थना केल्यावरून देवमाता अदितीने दीर्घ तपश्चर्या करून शन्कराकडून वर मिळवला आणि र्णुक राजाच्या यज्ञ कुन्डात ती प्रकट झाली. तिने शिवस्वरूप असणार्या जमदग्निंना वरून परशुरामाला जन्म दिला. परशुराम भगवान विष्णुचा सहावा अवतार. त्याच्यामुळे कार्तवीर्यार्जुनाचा नाश झाला. त्यामुळे महापतिव्रता रेणुकामातेला कुणी कधीही विसरू नका.""
परशुरामाने दुश्ट क्षत्रियांचा संहार करताना जे चांगले सद्धर्मी क्षत्रिय होते.. ते वाचले व परशुरामाला शरण आले. त्या सर्वांना परशुरामाने माता रेणुकेचे दर्शन घडविले. व माता रेणुकेने त्या सर्वांना जोगिन्दर तीर्थात स्नान करून गोरग्रीबांना अन्नदान करन्यास सांगितले. त्यानतर चिरन्जीवी परशुराम पुन्हा हिमालयात निघून गेला.
मिथिला नगरीचा क्षत्रिय राजा- जनक याच्याकडे परशुराम आपले शिवधनुष्य घेऊन आला असता लहान सीता त्याचा घोडा करून खेळू लागली.. तेव्हा चिरन्जीवी परशुरामाने जनकराजास सान्गितले, की "हिच्या स्वयंवरात जो कोणी हे धनुष्य पेलेल व याची प्रत्यंचा मोडेल.. त्याच्याशीच हिचा विवाह होईल." त्यानुसार महाविष्णुच्या सातव्या अवतारात प्रभू रामचन्द्राने या शिवधनुष्याची प्रत्यंचा मोडली व सीतेने त्यांस वरले.
परशुरामाने स्वतःच्या वास्तव्यासाठी सह्याद्री पर्वतावरून शरसन्धान करून अरबी समुद्रास मागे हटवले. व तिथे कोंकणभूमी वसविली. तसेच परशुरामाचे वास्तव्य कर्नाटकातील पवित्र 'गोकर्ण' क्षेत्री असल्याचेही मानतात. चिपळूण येथे 'लोटे परशुराम' हे त्यांचे जाज्वल्य स्थान मानले जाते. तसेच तळकोकणातील परशुराम मन्दिर प्रसिद्ध आहे. काही कोकणस्थ ब्राह्मणांचे कुलदैवत परशुराम आहे.
परशुरामाची आई- माता रेणुका हिचे अस्तित्व 'माहूर गडा'वर असून ते साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. रेणुकामाता देखील महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक कुटुम्बांची कुलदेवता आहे. तिनेच आपल्या पुत्राला -रामभद्राला उर्फ परशुरामाला चिरन्जीवी बनवले होते.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पोट धरधरून हस्तोय
परशुरामाबद्द्ल छान माहीती
ह्या इतिहासापासुन अनभिज्ञ
वि.मे माझ्या शाळेच नाव डॉन
@ वि.मे. कुठं डोकं फोडतोय
वि.मे माझ्या शाळेच नाव डॉन
@ वि.मे. पुराण अन इतिहास हा
डोन बाबाची शाळा राम आणि
पोटातील अमृत ... रावणाच्या
उत्तम माहिती...
@ मुक्तविहारी'जी.. ह्म्म्म
हम्म्म
-
"कार्तवीर्यार्जुनि नाम राजा"
-
तो श्लोक
-
अनुभव सांगितला तर हसाल पण
किती वेळा म्हणायचं हा श्लोक?
नविन माहिती
नवीन माहिती वाचायला मिळाली.
परशुरामाच्या कथा
छान माहीती!!
थॅन्क्स पैसा ताई, हेमांगी
मात्रु हत्या / स्त्री हत्येचे
तुमच्यासारख्या लोकांना आपल्या
हाण्ण!
लेखिकेसारख्या धार्मिक अन
हो हो...आपण सुसंस्कृत आहात
@ jaipal - "परशुरामाने
मुळात
आता
कैच्याकै
तुम्ही
अरेच्या !! तुम्हीच प्रश्न
गोष्ट म्हणून वाचायला छान
छान
चौंडक!!
चौंडक, जे आपण जोगत्यांच्या
या कथेतुन नक्की काय सांगायचे
अनाक्रोनिजम
अवांतराशी सहमत
नाना
जयपालशी सहमत.
शिल्पाशी सहमत.
मोदकशी सहमत.
परशुराम - सीता- दत्तगुरु--
<<<तसेच "दत्तगुरुं"चे
शिल्पातैनी विचारलेल्या
छुपा अजेंडा