नमस्कार मित्रहो,
मागच्या माझ्या लेखात पानिपतची पुर्व पिठीका मी मांडली ,मागचा लेख निश्चीत पणे छोटा होता त्याबद्दल क्षमस्व .
तसेच मागच्या लेखामधील प्रतिक्रीया वाचताना काही मान्यवरांच्या प्रतिक्रीया खटकल्या ते उगाचच या लेख मालीकेला ब्राह्मण विरोधी असे लेबल लावताना आढळले,त्यामुळे काही गोष्टी स्पष्ट करु इच्छीतो .
पानिपत ही घटना तत्कालिन मराठी राजकारणावर मोठा परीनाम करणारी ठरली,या पराभवाला आज २५० वर्षांपेक्षा जास्त काळ होउनही या घटनेची लोकांवर अजुनही मोठी मोहीनी आहे,या पराभवाची कारणमिमांसा अनेकांनी केलेली आहे,व अजुनही होत आहे.त्याचाच विचार करुन मिपा च्या व्यासपिठावर याची गंभीर चर्चा व्हावी हीच प्रामाणिक इच्छा आहे.
सदर विषय व्यापक तर आहेच तसेच वादग्रस्तही आहे, विषयात संघर्ष तर आहेच,त्याच बरोबर नाट्यही आहे ,ही मराठ्यांच्या लक्ष बलिदानाची शोकांतिका आहे ,त्यामुळेच आजही ही घटना लाखो मराठी मनांमध्ये घर करुन बसली आहे ,युध्दाच्या कथा नेहमीच रम्य असतात त्यामुळे अनेक कादंबरीकारांना हा विषय आवड्तो.
अशा मुळेच मला वाटले की पानिपत ची माहीति मिपाकरांसाठी थोडी विस्ताराने व आतापर्यंत फारशी पुढे न आलेल्या माहीती मधुन द्यावी ,म्हणुन हा प्रयत्न आहे .
मात्र काही सन्माननीय मिपाकरांना असे वाटते आहे तुम्ही काहीही लिहा मात्र त्यामधे ब्राम्हणांबद्दल काही लिहले तर ते आम्हाला मान्य नाही , मुळात या पराभवाच्या काळात पेशवाइ असल्याने ,पानिपत च्या पराभवाच्या अनेक कारणांमधे पेशव्यांच्या चुकीच्या कारभारावर बोट ठेवले जाते,जशी सगळ्या मुद्द्यांची चर्चा होते तशी याचीही व्हायला नको का?पण काहींना त्यामुद्द्याकडे कोणी वळले की लेखणी परजण्याची हुक्की येते,ते ही झाले पाहीजे किंबहुना त्याची साधकबाधक चर्चा व्हावी याच हेतुने हा धागा काढलेला आहे ही नम्र सुचना आहे .त्यामुळे लेखातील कोणत्याही मुद्द्यावर आक्षेप असल्यास आपण त्याचे सप्रमाण खंडन करु शकता त्याचे स्वागतच केले जाइल,मात्र उगाचच या गंभीर विषयाला फालतु प्रतिसाद देउन जातिवाचक वळण देण्याचा जे लोक प्रयत्न करीत आहेत ,त्यांना त्याच भाषेत प्रतिवाद करण्याची ही क्षमता आम्ही निश्चीत बाळगतो याची खात्री देतो.
पानिपत पुर्व उत्तरेकडिल राजकारण
पानिपत पुर्व उत्तरेतील घडामोडि पाहताना तेथील मराठा सरदारांचे अर्थकारण,तसेच पुर्ण मराठी सत्तेचे अर्थकारण समजणे आवश्यक आहे .मराठी सत्तेचा अर्थप्राप्तीचा मुख्य मार्ग हा विविध प्रांतातुन त्यांना मिळणारी चौथाइ हा होता.साहजीकच उत्तरेतील वेगवेगळ्या सत्ताधीशांशी जे करार मराठ्यांनी केले त्या मागे चौथाइ हेच महत्वपुर्ण कारण होते.या चौथाइ मधील काही भाग स्वतःला ठेउन उर्वरीत भाग केंद्र सत्तेकडे जमा करणे हे आवश्यक होते.मात्र बाजीरावानंतर हा भरणा केंद्र सत्तेकडे करण्यास सरदार फारसे उत्सुक नव्हते.तसेच केंद्र सत्तेकडुनही या रकमेचा विनियोग मराठी सत्तेच्या उभारणी साठी कितपत होत होता याबद्दल शंकाच होती.
या चौथाइ साठी तसेच आपली स्वसत्ता बळ्कट करण्यासाठी उत्तरेतील काही स्वधर्मीय शास़कही दुखावले गेलेले आढळतात ,१७५२ चा पेशवे -मुघल बादशहा यांच्यातील करार हा पानिपत ला खर्या अर्थाने कारणीभुत ठरला असे मानले जाते् हा करार पेशव्यांतर्फे शिंदे-होळ्कर तर मुघल बादशहा तर्फे वजीर सफदरजंग याने केला.या कराराला पार्श्वभुमी अब्दाली च्या स्वारीची होती. या कराराने मुघल बादशहा ची बाहेरच्या शत्रुंपासुन संरक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांवर आली ,तसेच पेशव्याला आग्रा,अजमेर,लाहोर्,मुलतान,सिंधव रोहीलखंड या प्रदेशांची चौथाइ मिळाली.जो प्रदेश मराठ्याना मिळाला होता त्यातील आग्रा जाटांच्या तर अजमेर राजपुतांच्या ताब्यात होते,म्हणजे जो प्रदेश मराठ्यांना मिळणार होता तो मुघलांच्या ताब्यात नव्हता तर मराठ्यांना जाट व रा़जपुतांशी लढवणयाचा हे मुघलांचे कारस्थान होते .मात्र हे रजकारण समजुन न घेता रघुनाथ रावाच्या उत्तरेच्या स्वारीत आग्रा घेण्यास जाटांबरोबर लढा द्यावा लागला.
मराठ्यांनी सुरजमल जाटाच्या कुंभेरी च्या किल्ल्याला वेढा दिला,या वेढ्यात मल्हारावाचा मुलगा खंडेराव हा तोफगोळ्याच्या माराने ठार झाला.मल्हारावाने संतापुन कुंभेरीची माती खणुन यमुनेत टाकेन अशी प्रतिज्ञा केली .मल्हारावाचा लढाइचा आवेश वाढला,होळ्करी सैन्य सुडाच्या भावनेतुन त्वेषाने लढु लागले,जाट घाबरला त्याने मराठ्यांशी संधी ची बोलणी सुरु केली ,मात्र आता मल्हारराव संधीच्या विरोधात होता.त्याच्या सारख्या वयवृध्द सेनानीचा सल्ला डावलणे राघोबाला ही अश्यक्य होते.परीनांमी सुरजमल जाटाची पत्नी हंसिया जाट जी जयापा शींदेला भाउ मानत होती ,तिने जयाप्पाला राखी पाठवुन मदतीची याचना केली ,साहजीकच शिंद्यांनी मध्यस्थी केली आणी जाट व मराठे यांच्यात तह झाला.
या तहातच शिंदे -होळ्कर यांच्यातील दुही निर्माण झाली जी पुढे अब्दालीच्या स्वारीच्या वेळि मराठ्याना फार महागात पडली ,कारण शिंदे-होळकर हे उत्तरेतील मराठ्यांच्या सत्तेच्या रथाची दोन चाके होती ,मराठ्यांच्या सामर्थ्याचा दबदबा हे दोन सरदार एकत्र रहण्यानेच होता.या मात्तबर सरदारांमधील फुट संपुर्ण मराठेशाहीलाच ग्रासणारी ठरली,पानिपत हे तर एक निमित्त होते,कोणत्याही मोठ्या संघर्षाला सामोरे जाताना आपआपसातील मतभेद असल्यास एकदिलाने लढणे अवघड होते. या शिवाय उत्तरेतील जाट राजाची नाराजी मराठ्यांनी ओढवुन घेतली ते वेगळेच हाच जाट अब्दालीच्या स्वारीच्या वेळी मराठ्यांचा पक्ष सोडुन ऐनवेळी निघुन गेला वेळी मराठ्यांचा पक्ष सोडुन ऐनवेळी निघुन गेला.थोडक्यात मुघलांच्या या राजकारणामुळे सुरजमल जाट मराठ्यांचा शत्रु झाला.मुघलांचे हे राजकारण समजावे इतकी दुरदृष्टी त्या काळात मराठा नेतृत्वात नव्हती हेच दुर्दैव होते.
इथे काहींना हे वाटेल की साम्राज्य विस्तार करताना संघर्ष हा अभिप्रेतच असतो,मात्र पानिपताच्या पार्श्व्भुमीवर जिथे नजीबाने या संघर्षाला धर्मयुध्दाचे स्वरुप दिले तिथे मराठ्यांनीही स्वधर्मिय शासकांना मैत्रीच्या भावनेने जोडणे गरजेचे होते.
मारवाड वारसा हक्काच्या प्रकरणातही शिंद्यानी माधोसिंगाची बाजू घेउन बिजेसिंगाशी वैर पत्करले ,परीनामी जयाप्पा शिंदे सारखा मोहरा मराठे गमावला,शिवाय राजपुतांची सहानभुती गमावली ते वेगळेच .जयपुर गादी प्रकरणातही इश्वरसिंग व माधवसिंगामधे पैशाच्या आमिषाने मराठ्यांनी मध्यस्थी केली परीनामी पानिपतच्या संघर्षात मारवाड,जयपुर्,बुंदि ,कोटा येथील राजपुत तटस्थ राहीलेले दिसतात.
या काळातील पेशव्यांच्या राजकारणाचा एक दुष्परीनाम म्हणजे जुने शत्रु समुळ नष्ट न करता आपल्या शत्रुत त्यांनी आणखी भर टाकली.
इकडे मुघलांच्या अंतर्गत प्रशासनात ढवळाढवळ करत मराठ्यांनी गाजीउद्दीन चा मुलगा इमाद -उल्-मुल्क याला दिल्लिचा वजीर बनवला
ळातील पेशव्यांच्या राजकारणाचा एक दुष्परीनाम म्हणजे जुने शत्रु समुळ नष्ट न करता आपल्या शत्रुत त्यांनी आणखी भर टाकली.
इकडे मुघलांच्या अंतर्गत प्रशासनात ढवळाढवळ करत मराठ्यांनी गाजीउद्दीन चा मुलगा इमाद -उल्-मुल्क याला दिल्लिचा वजीर बनवला.याच वजीराने राघोबा व होळकरांच्या मदतीने बादशहा अहमदशाह याला मारुन आलमगीर हा नवीन बाद्शाह बनवला
इकडे मुघलांच्या अंतर्गत प्रशासनात ढवळाढवळ करत मराठ्यांनी गाजीउद्दीन चा मुलगा इमाद -उल्-मुल्क याला दिल्लिचा वजीर बनवला.याच वजीराने राघोबा व होळकरांच्या मदतीने बादशहा अहमदशाह याला मारुन आलमगीर हा नवीन बाद्शाह बनवला .व त्या मोबदल्यात मराठ्यांना ८० लाख रु.देण्याचे कबुल केले,जे प्रत्यक्षात त्याने कधीहि दिलेले दिसत नाहित्.उलट मराठ्यांच्या मदतीने त्याने बादशाही जनानखान्यावर हल्ला केला,त्याच्या पाठीशी मराठे असल्याने उत्तरेतील मुस्लीम सरदार वर्गही मराठ्यांच्या विरोधात गेला,शिवाय बादशाही जनानखान्याची प्रमुख मलीका जमानी हीच पुढे अब्दालीला हिंदुस्थानात बोलावण्याच्या कारस्थानात प्रमुख होती.
वजीर इमाद्ला पाठींबा देउन मराट्।यांनी काय साधले?उलट याचा तोटाच मराठा राजकारणाला झाला,इमाद्ला वजीर बनवण्याने शिदे -होळकरांचा उत्तरेतील राजकारणाचा पायाच उखडला गेला,कारण यामुळे मराठ्यांच्या विश्वासातील जुना वजीर सफ्दरजंग हा दुरावला गेला वजीर सफदरजंग हा अब्दालीच्या विरोधात होता किंबहुना अब्दालीच्या विरोधात मराठे-मुघलांची मोट बांधुन संघर्ष करण्याची त्याची तयारी होती,तो विचार आता मागे पडला,आणी सफदरजंग मराठ्यांच्या विरोधात गेला,साहजीकच त्याचा मुलगा सुजाउदौला हा मराठ्यांच्या बाजुने न येता अब्दालीला जाउन मिळाला .
शिवाय इमादने ८०लाख रु.तर दिलेच नाही त्यामुळे या स्वारीतही राघोबा कर्ज करुनच
वजीर इमाद्ला पाठींबा देउन मराट्।यांनी काय साधले?उलट याचा तोटाच मराठा राजकारणाला झाला,इमाद्ला वजीर बनवण्याने शिदे -होळकरांचा उत्तरेतील राजकारणाचा पायाच उखडला गेला,कारण यामुळे मराठ्यांच्या विश्वासातील जुना वजीर सफ्दरजंग हा दुरावला गेला वजीर सफदरजंग हा अब्दालीच्या विरोधात होता किंबहुना अब्दालीच्या विरोधात मराठे-मुघलांची मोट बांधुन संघर्ष करण्याची त्याची तयारी होती,तो विचार आता मागे पडला,आणी सफदरजंग मराठ्यांच्या विरोधात गेला,साहजीकच त्याचा मुलगा सुजाउदौला हा मराठ्यांच्या बाजुने न येता अब्दालीला जाउन मिळाला .
शिवाय इमादने ८०लाख रु.तर दिलेच नाही त्यामुळे या स्वारीतही राघोबा कर्ज करुनच परतला,शिवाय याच प्रकरणात इमादाचा हस्तक म्हणुन नजीबखान रोहीला उदय पावला.जो मराठ्यांच्या द्रुष्टीने पुढे फार त्रासदायक ठरला.
राघोबाच्या या स्वारीत तसे पाहीले तर मराठ्यांच्या द्रुष्टीने लाभदायक काहीच झाले नाही,उलट मराठे परत आल्यानंतर १९५६-५७ साली अब्दालीने दिल्ली लुटली.इकडे पुण्यास मात्र पेशव्याने ब्राम्हणांच्याआशिर्वादाने दिल्ली ताब्यात आली म्हणुन श्रावणमासात त्याना अमाप दक्षीणा वाट्ली.
उत्तरेत वरील सर्व घडामोडि होत असताना खुद्द नानासाहेब पेशव्याने वरील घडामोडीत लक्ष घालणे आवश्यक होते,ते न झाल्याने त्याचे एकत्रीत परीनाम मराठ्यांना पानिपतामधे भोगावे लागले.
क्रमशः
वाचने
7046
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचतो आहे. धागा डकवताना चुका
+१, सहमत
In reply to वाचतो आहे. धागा डकवताना चुका by प्रचेतस
बरं ठिक - चला चर्चा करुच.
यकु, या लेखाच्या सुरुवातीलाच
In reply to बरं ठिक - चला चर्चा करुच. by यकु
या लेखाच्या सुरुवातीलाच मी
In reply to यकु, या लेखाच्या सुरुवातीलाच by प्राध्यापक
@ यकू...
In reply to बरं ठिक - चला चर्चा करुच. by यकु
लेख वाचत आहे
चुक दाखवल्याबद्दल धन्यवाद,ते
In reply to लेख वाचत आहे by रणजित चितळे
तुमचे सगळे लिहून झाल्यावर
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ,
In reply to तुमचे सगळे लिहून झाल्यावर by जयंत कुलकर्णी
जयंत काकांशी सहमत.. (लेखाचा
मोठ्या लेखातील फक्त शेवटच्या
सुरजमल जाट बद्दल
मन्धाजी,तुम्ही सुरजमलजाटाच्या
In reply to सुरजमल जाट बद्दल by लॉरी टांगटूंगकर
एक सुचना मागच्या धाग्याची लिन्क द्यावी
(पाणीपतकालीन महाराष्ट्र
छत्रपती शाहू महाराजांना दूषणे देणे योग्य नव्हे...
In reply to (पाणीपतकालीन महाराष्ट्र by शैलेन्द्र
माझा अभ्यास कदाचीत कमी पडत
In reply to छत्रपती शाहू महाराजांना दूषणे देणे योग्य नव्हे... by योगप्रभू
आराम
In reply to माझा अभ्यास कदाचीत कमी पडत by शैलेन्द्र
विश्वास पाटील यांच्या "पानिपत"
गोईंग गुड !!
लेख पुर्णपणे पटला नसला तरी