✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पाणी अडवा, पाणी मिळवा

प
परिकथेतील राजकुमार यांनी
गुरुवार, 05/10/2012 - 11:16  ·  लेख
लेख
महाराष्ट्राचा बराचसा भाग सध्या दुष्काळसदृष्य परिस्थितीमुळे भरडला जात आहे. पाणीटंचाईचा सामना शहरातील लोकांनाही करावा लागत आहे. पुण्यातही सध्या जवळपास ३० टक्के पाणीकपात सुरु आहे. पाऊस लांबल्यास परिस्थिती अधिकच बिकट होण्याचा संभव आहे. उन्हाळा सुरु झाल्यावर पाणीटंचाईचे प्रश्न नेहमीच उभा राहतो. पण या प्रश्नाची सोडवणुक करण्याचे अगदी सोपे मार्ग आपल्या हाती आहेत. पावसाळ्यात वाहुन वाया जाणार्‍या पाण्याचा योग्य वापर केल्याने या समस्येचे स्वरुप बरेच सुकर होईल असे तज्ञांचे मत आहे. परंतु हे करावे कसे, पावसाचे पाणी अडवल्यास होणारे फायदे किती व कोणते याबाबत पुरेशी माहिती मिळवणे बरेच अडचणीचे जाते. या अडचणींवर तोडगा काढण्याच्या उद्देशाने डीएनए वृत्तपत्राने येत्या शुक्रवारी (११ मे रोजी) सायंकाळी सहा वाजता पुण्यातील आयसीसी ट्रेड सेंटरमधील सुमन मूलगावकर हॉलमधे एका परिसंवादाचे आयोजन केले आहे. पुणे मनपाचे अधिकारी, भूजल संशोधन केंद्रामधील तसेच अन्य तज्ञ, बांध॑काम व्यावसायिक आणि विकसक, ज्यांनी यापुर्वीच पावसाचे पाणी अडवले आहे अशा विविध सोसायट्या आणि पावसाचे पाणी अडवू इच्छिणारे नागरिक यांना एकत्र आणुन त्यांच्यात वैचारिक आदान प्रदान घडवणे हा त्यामागील हेतू आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामुल्य असला तरी नावनोंदणी अनिवार्य आहे. नावनोंदणी करण्यासाठी puneinbox@dnaindia.net या ईमेल अ‍ॅड्रेसवर आपले नाव कळवावे किंवा DNAVOP RAIN असे लिहुन आणि त्यापुढे आपले नाव लिहुन ५७५७८ या मोबाईल नंबरवर एसएमएस पाठवावा. ('नो किडिंग' ह्या कार्यक्रमाच्या माहितीच्यावेळी अनेकांनी असे कार्यक्रम अथवा उपक्रम ह्यांची माहिती आगोदर मिळत नसल्याची तक्रार केल्याने ह्यावेळी खास आगोदर माहिती देण्यात येत आहे. धन्यवाद.) माहितीस्त्रोत :- प्रसन्न केसकर
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
समाज
जीवनमान
तंत्र
राहणी
विज्ञान
लेखनप्रकार (Writing Type)
बातमी
शिफारस
मदत
माहिती

प्रतिक्रिया द्या
2082 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

आजच डीएनएमधे वाचले.. बरं झालं

ऋषिकेश
गुरुवार, 05/10/2012 - 11:18 नवीन
आजच डीएनएमधे वाचले.. बरं झालं इथेही माहिती दिलीस ती
  • Log in or register to post comments

चांगला उपक्रम, अशीच एक बातमी

खेडूत
गुरुवार, 05/10/2012 - 11:56 नवीन
चांगला उपक्रम, अशीच एक बातमी नुकतीच वाचली होती. http://www.esakal.com/esakal/20120321/5536392389179837178.htm एक दुरुस्ती : सुमन नव्हे, सुमंत मुळगावकर
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

रणजित चितळे
गुरुवार, 05/10/2012 - 12:06 नवीन
...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

उत्तम उपक्रम आणि उत्तम माहिती

स्पा
गुरुवार, 05/10/2012 - 12:09 नवीन
उत्तम उपक्रम आणि उत्तम माहिती
  • Log in or register to post comments

परिकथेतील राजकुमार साहेब, अतिशय चांगला उपक्रम

निश
गुरुवार, 05/10/2012 - 16:31 नवीन
परिकथेतील राजकुमार साहेब, अतिशय चांगला उपक्रम व त्याबद्दल तुम्ही दिलेली माहीती पण अतिशय उपयुक्त. तुमचे आभार. मी ही माझ्या पुण्यातल्या नातलगाना व मित्राना नक्की सांगिन ह्या उपक्रमाला जाउन यायला.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा