Skip to main content

पुणे कट्टा: १ मे २०१२

लेखक प्रचेतस यांनी शनिवार, 28/04/2012 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, पुण्यातील मिपाकरांसाठी एक बातमी अशी की तब्बल एक वर्षानंतर पुण्यात पुन्हा एकदा बार्बेक्यू नेशन येथे कट्टा आयोजीत करण्यात आला आहे. मागच्या बार्बेक्यू नेशनच्या कट्ट्याला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे सदर कट्टा त्याच ठिकाणी पुन्हा एकदा करण्यात येत आहे. दिवस :- मंगळवार दिनांक१-मे -२०१२ स्थळ :- वाकड-बार्बेक्यू नेशन-सयाजी रूफ टॉप, पुणे-मंबई बाह्यवळण मार्ग. वेळ :- संध्याकाळी ७ च्या सुमारास तूर्तास नक्की असलेले कट्टेकरी :- धन्या, ५० फक्त, मोदक, गणेशा, गणामास्तर, वपाडाव, अत्रुप्त आत्मा, प्यारे१, सूड, वल्ली इच्छुकांनी मला, ५० फक्त आणि धन्या यांना व्यनि करावा. म्हणजे ऐन वेळेस काहीं बदल झाल्यास कळवता येईल. कृपया तिघांनाही व्यनि करावा, म्हणजे एकाने काहीं उत्तर दिल्यास बाकी दोघांना माहित राहील. हे मुंबई कट्टा ह्या धाग्याचे विडंबन नसून खरेच असा कट्टा आयोजीत करण्यात आला आहे याची कृपया नोंद घ्यावी. फक्त धागा जाहीर करण्यात आमच्याआधी मुंबईकरांनी बाजी मारली. :) माणशी साधारण ५७५ ते ६५० (व्हेज-नॉनव्हेज) असा खर्च अपेक्षित आहे. मेनू आणि इतर तपशील पुढील संकेतस्थळावर मिळेल. http://www.barbeque-nation.com
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 23450
प्रतिक्रिया 107

प्रतिक्रिया

In reply to by अत्रुप्त आत्मा

हे युद्ध क्षेत्रीचे काही फोटू ;-) १)युद्धपूर्व स्थिती-डावीकडुन...पिंगू.अ.आ.,सूड,५०फक्त २)धन्या,वल्ली,पिंगू ३)उजव्या रांगेत पहिले गणामास्तर आणी शेवटचे नाद-खुळा...बाकि पूर्व परिचित ४)फायर ऑन-रणचंडी हवनकुंड ५)मित्रहो धनाजींची भावमुद्रा कोणते मुद्रितभाव शोधते आहे बरे..? ;-) मुख्ययुद्धाचे फोटो-(कुणी काढले असल्यास ;-) ) टाकेल ;-) ६)अता डायरेक्ट शेवटची डेझर्टची रणधुमाळी---- ७)आ-रक्त आईस्क्रिम ८)५०राव सोकाजींच्या अठवणीने बचैन झाल्याचे हे प्रत्यंतर.. ;-) नंतर तो शॉट ग्लास तसाच सोडून दिला म्हणे... ;-) ९) शेवट योद्धे(ही) हलाल ;-) जाहले

In reply to by अत्रुप्त आत्मा

भटजी, वृत्तांत झकासच हो. मंडळी, आता विचारलंच आहे म्हणून सांगतो ती डेझर्टस् भरलेली प्लेट माझी बरं का !! ( कोणीही विचारलं नसलं तरी असं सांगायचं असतं ;)) तेवढे डेझर्टचे प्रकार खाऊन नंतर दोन स्कूप मँगो आणि एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम येवढंच खाल्लं. तिथले स्टार्टर्स बाकी भन्नाट होते.

In reply to by अत्रुप्त आत्मा

पाय? पाय कुठ हाईत तुमच? हिकड लाउन द्या, आमी पाया करुन खाउ! धन्य धन्य जाहलो आम्ही हा वृतांत वाचुन. एकुण काट्याचमच्याची लढाई जिंकुन विरश्री संचारलेल्या एकुण एक विराला आमचा दंडवत.

In reply to by स्पंदना

वा...वा...वा... काय अप्रतिम आणी मनाफासून परतिसाद दिलात हो तुंम्ही...! मनात परचंड आनंद दाटुन आला... @पाय? पाय कुठ हाईत तुमच? हिकड लाउन द्या, आमी पाया करुन खाउ!>>> त्या पेक्षा आपला भेजा द्या ना पाठवुन,आमी बी भेजा फ्राय करून खाऊ...! ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

>>त्या पेक्षा आपला भेजा द्या ना पाठवुन,आमी बी भेजा फ्राय करून खाऊ...! >> ह्ये काय असतय आनि? भेजा? त्यो र कुठ अस्तोय? आन असला तर त्यो मिथ्य अस्तो की अमिथ्य?

अत्रुप्त आत्मा यांनी दैनिक पुढारीच्या रविवार पुरवणीतील 'खबरनामा' नामक सोमाजी बिन गोमाजी लिखित अविस्मरणीय सदर नक्कीच वाचलेले असावे असा आमचा स्पष्ट अभिप्राय आहे :) (संध्याकाळ प्रभृतींपेक्षा पुढारीचा नक्कीच फ्यान असलेला आणि फेकानंदबरोबर त्याची तुलना होत असलेली पाहून वैतागलेला)

In reply to by बॅटमॅन

@नक्कीच वाचलेले असावे असा आमचा स्पष्ट अभिप्राय आहे >>> नाय हो दादा...उलट त्यांनाच हे वाचायला धाडुन द्या.. ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

सांगतो ;) पण तुमी वाचलं नाय का ते? नसेल तर पुढारीचा रविवार अंक घ्या, बहार नामक पुरवणी घ्या आणि खबरनामा नामक सदर वाचा जरूर :)

भन्नाट ... जाम मज्जा करताय राव तुमिलोग :( आता जरा नाव पन सांगा सेपरेट फोतु लावुन आमि नवि माणस ...योद्ध्यान्ची नाव त्याच्या छयाचित्रन्सोबत द्या कि ह्यातल्या ५० रुपयना बघायची इच्छ आहे :) अवांतर : पून्याच्या लोकाना हसायच वावड आहे काय ??? :)

In reply to by जेनी...

पहिल्याच फोटोत समोर उजवीकडून पहिले आहेत ते ५० फक्त. पून्याच्या लोकांच्या हसण्याबद्दल आम्हाला काय माहित? ;)

In reply to by गणामास्तर

पून्याच्या _____________ याला म्हणतात पूणेकर :( नीदान प्रतिसादाना ( प्रतिसादात )तरि मुक्तपणे बागडु द्या ओ :(

In reply to by जेनी...

अवांतर : पून्याच्या लोकाना हसायच वावड आहे काय ???
म्हणजे तुम्ही अजुन पुणेकरांना पुरते ओळखलेले दिसत नाही. ;) - (पुणेरी) सोकाजी

In reply to by जेनी...

>>अवांतर : पून्याच्या लोकाना हसायच वावड आहे काय ??? त्याचं कायै काकू, से चीऽऽऽज असं म्हणून काढलेले फोटो कृत्रिम वाटतात. त्यामुळे गप्पाटप्पा चालू असताना हे फोटो काढलेत.

In reply to by सूड

ओह्ह अस्स आहे होय सूड काका .....?? :-o अहो पण " गप्पा मारताना हसु नका " अशी कुठे पाटि लावलि होति काय काका ??;)

In reply to by जेनी...

एका काकूंना एका नवयुवकाला बळेबळे काका म्हटलेलं पाहून अंमळ मौज वाटली. "अजूनी यौवनात मी" या त्रिकालाबाधीत सत्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. ;)

In reply to by धन्या

बघा की राव, एक तर का़कू छाप प्रश्न विचारायचे आणि काकू म्हटलं की राग येतो. असो, पूजाबै तुम्ही काका म्हणालात तरी आम्हाला काही फरक पडत नाही. :D

ही 'बखर कट्ट्याची' आवडली. फोटो क्र. ८: कोणालातरी आमची (हे आदरार्थी एकवचन) कट्ट्याला, तृप्त पोटाने का होईना पण आठवण झाली हे पाहून डोळे पाणावले... कुठे आहे माझा रुमाल.... ;) - (धारातीर्थी पडलेला) सोकाजी‍

भटजीबुवा, लै भारी वृत्तांत. बार्बेक्यू नेशनचे स्टार्टर्स नेहमीप्रमाणेच झकास होते. पनीर टिक्का, झुकिनी पॉलेंटा, ग्रिल्ड मशरूम्स, ग्रिल्ड पायनापल, हरियाली कबाब, क्रिस्पी कॉर्न आणि आमचे सर्वात आवडते कॅज्युन स्पाईस पॉटेटो. सगळेजण अगदी मनसोक्त खात होते. पहिला वीर धराशायी झाला तो नाद खुळा, पाठोपाठ भटजीबुवांचा झेंडाही खाली झुकला. आत्माजींना आम्ही भरपूर छळल्यामुळे ते बार्बेक्यूच्या सळ्या घेऊन आम्हांवर धावून येण्याच्या तयारीतच होते. मग हळूहळू सर्वानींच स्टार्टर्स संपवून लेमन कोरीएंडर सूप कडे मोर्चा वळवला. स्टार्टर्स मजबूत हाणल्यामुळे मुख्य जेवण तसे अगदी कमीच खाल्ले गेले पण त्यातला मेनू पण झकास होता. पनीर पसंदा, दम आलू पंजाबी, व्हेज झोंबीओ का असाच काहीसा पदार्थ, दाल ए दम, व्हेज बिर्याणी, कर्ड राईस, सॅलड्स चे १०/१२ प्रकार. पण खाऊन खाऊन तरी किती खाणार. नाईलाजाने फारसे न खाताच डेझर्टकडे वळण्यात आले. फळांचे विविध प्रकार दिमतीला हजर होतेच. अंगुरी गुलाबजाम, फिरनी, पायनापल पुडींग, आंबा आणि व्हॅनिला आईस्क्रीम. डेझर्ट भरपूर रिचवून झाल्यावर आम्ही खास पुणेरी प्रश्न विचारते झालो. 'येथे बडीशेप मिळेल काय?' तर ती काउंटरवर मिळेल असे सांगण्यात आले. अर्थात बडीशेपेच्या पुड्या आम्ही मूठभर भरून घेतल्या हे सांगणे न लगे. नंतर खाली येऊन मनसोक्त गप्पा मारून आम्ही सर्व आपापल्या घरी चलते झालो.

एकदाचे ठरवून " बार्बेक्यो नेशन" सज्ज जाहला " मिपा" तला फॅक्शन वल्ली मुळातला माणूसच जंक्शन पन्नासला खादाडीचे मुळातच अट्रॅक्शन मोदकाने केले मेनूचे डिक्शन सुडाचे सर्वांवर कडक अटेंशन एक नवा करतोय ऑबझरवेशन गणामास्तर विचारतो घेउ का एक ट्युशन ? आले चौराचे फोन कनेक्शन मो, व, अ आ ने साधले कनवरसेशन खादाडीचे मग ऱंगले सेशन शेवटी बोडक्यावर बसले टॅक्सेशन कोणीतरी म्हणाला फोटूचे नाही मेन्शन "कट्टा " हे नाही ना फिक्शन ? कोणीतरी केले फोटूचे सिलेक्शन अ आ ने लढाईचे उचलले एक्सप्रेशन एकदाचे न्युज चे झाले ट्रान्समिशन संशयाच्या वादळाचे झाले डिप्रेशन " त्यां" च्या खिशाचे झाले कॉनट्रॅक्शन जळ्ण्याचे का व्हावे आपल्याला मोशन ? त्यानी साधले आनंदाचे फंक्शन आपलेही त्यात असू द्या कॉन्ट्रीब्युशन जय हिंद , जय महाराष्ट्र !!

लई भारी ओ भटजी, बाकी तुम्ही फार मोठ्या मनाचे बरं का. या रणात सर्वात जास्त जखमी झाला ते तुम्हीच, तरीसुद्धा आख्ख्या रिपोर्टात एकदा सुद्धा आ.वे. किंवा दु दु दु असे शब्द वापरले नाहीत. असो. वर्षातुन एकदाच जावं असं ठिकाण आहे हे, आणि भटजींची पनीर डायरेक ग्रिल वर भाजायची आयडिया लई भारी होती. नादखुळा पहिल्यांदाच भेटले पण तसं वाटलं नाही. काजुन्पोटॅटो तर भारी आहेतच त्यात कालचे क्रिस्पि कॉर्न सुद्धा चांगले होते, तो वेटर दिवसभर डोकोमोच्या जाहिरातीत दाखवतात तसं चार चार दाणे देत होता, पण छे असल्या बाबतीत काय चालु देतोय आम्ही त्याचं. बाकी ब-याच चुकवाचुकवी नंतर बिकांची झालेली भेट लक्षात राहिल. आता अजुन नविन ठिकाणं हुडकायला हवीत कट्ट्यासाठी, कट्ट्याला कळालेली एक तात्पुरती वाईट बातमी म्हणजे शाजी महिना दिड महिना बंद असणार आहे रिनोव्हेशन साठी, काल रात्री कोयलाला गेलो होतो तर ते पण शिफ्ट होतंय. अन्याव अन्याव आहे नुसता. अवांतर - कट्टापुर्व गप्पांमध्ये भटजींनी केलेले मार्गदर्शन अत्यंत मोलाचे होते, त्याबद्दल त्यांनी एक लेखमाला लिहावी ही नम्र विनंती.

In reply to by ५० फक्त

कोणते बुवा ते मार्ग-दर्शन ? मजला एकची स्मरण द्या ना? नाट्यपद...नाट्यपद... सुचतय मला ;-)

मस्त.. होय ते बेक्ड पोटॅटो सर्वात मस्त असतात.. आणि सर्व स्टार्टर्सची नुसती चव घ्यायची म्हटली तरी पोट फुल्ल होऊन मेन कोर्सच्या दिशेने वळावंसंही वाटत नाही.. अर्थात मग डेझर्टस सोडायची नाहीत अशा उद्देशाने डेझर्ट काऊंटरकडे गर्दी होते. मला वाटतं बा. ने. चा हाच पॅटर्न असावा म्हणून कदाचित ते मेन कोर्स अगदी कमी प्रमाणातच बनवून ठेवत असतील.. वृत्तांत आणि भरपेट खाऊन तृप्त झालेले मित्रगण पाहून समाधान जाहले.. बहोत खूब..

आणि वल्लीचे पहिले वहिले शतक सविस्तर प्रतिक्रिया लवकरच

In reply to by अत्रुप्त आत्मा

लई भारी ओ भटजी, बाकी तुम्ही फार मोठ्या मनाचे बरं का. या रणात सर्वात जास्त जखमी झाला ते तुम्हीच, तरीसुद्धा आख्ख्या रिपोर्टात एकदा सुद्धा आ.वे. किंवा दु दु दु असे शब्द वापरले नाहीत.
का हो बुवा, का? का???

कट्टा सॉलिड्ड झालेला दिसतो आहे, वृत्तांत ,फोटो मस्तच! स्वाती