✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पुणे कट्टा: १ मे २०१२

प
प्रचेतस यांनी
Sat, 04/28/2012 - 19:18  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकरहो, पुण्यातील मिपाकरांसाठी एक बातमी अशी की तब्बल एक वर्षानंतर पुण्यात पुन्हा एकदा बार्बेक्यू नेशन येथे कट्टा आयोजीत करण्यात आला आहे. मागच्या बार्बेक्यू नेशनच्या कट्ट्याला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे सदर कट्टा त्याच ठिकाणी पुन्हा एकदा करण्यात येत आहे. दिवस :- मंगळवार दिनांक१-मे -२०१२ स्थळ :- वाकड-बार्बेक्यू नेशन-सयाजी रूफ टॉप, पुणे-मंबई बाह्यवळण मार्ग. वेळ :- संध्याकाळी ७ च्या सुमारास तूर्तास नक्की असलेले कट्टेकरी :- धन्या, ५० फक्त, मोदक, गणेशा, गणामास्तर, वपाडाव, अत्रुप्त आत्मा, प्यारे१, सूड, वल्ली इच्छुकांनी मला, ५० फक्त आणि धन्या यांना व्यनि करावा. म्हणजे ऐन वेळेस काहीं बदल झाल्यास कळवता येईल. कृपया तिघांनाही व्यनि करावा, म्हणजे एकाने काहीं उत्तर दिल्यास बाकी दोघांना माहित राहील. हे मुंबई कट्टा ह्या धाग्याचे विडंबन नसून खरेच असा कट्टा आयोजीत करण्यात आला आहे याची कृपया नोंद घ्यावी. फक्त धागा जाहीर करण्यात आमच्याआधी मुंबईकरांनी बाजी मारली. :) माणशी साधारण ५७५ ते ६५० (व्हेज-नॉनव्हेज) असा खर्च अपेक्षित आहे. मेनू आणि इतर तपशील पुढील संकेतस्थळावर मिळेल. http://www.barbeque-nation.com
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
23326 वाचन

💬 प्रतिसाद (107)

प्रतिक्रिया

हे मुंबई कट्टा ह्या धाग्याचे

धन्या
Sat, 04/28/2012 - 19:23 नवीन
हे मुंबई कट्टा ह्या धाग्याचे विडंबन नसून खरेच असा कट्टा आयोजीत करण्यात आला आहे याची कृपया नोंद घ्यावी. फक्त धागा जाहीर करण्यात आमच्याआधी मुंबईकरांनी बाजी मारली.
हे ढिक्स्लेमर नसतं तर खरंच विडंबन वाटलं असतं. असो. आयोजकांच्या यादीत आमचं नाव पाहून अंगावर मुठभर मास चढलं आहे. (एरव्ही कार्यालयात एक साधा टेलेफोनिक कॉल तुला सेटप करता येत नाही असा नेहमी उद्धार होतो आमचा. ;) )
  • Log in or register to post comments

+१

सुहास झेले
Sat, 04/28/2012 - 23:09 नवीन
अगदी ह्येच म्हणतो ..... ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

:(

सोत्रि
Sat, 04/28/2012 - 20:20 नवीन
करा लेको, कट्टे करा , खा खा मटार उसळ खा, शिकरणं खा... - (कट्टा वृत्तांताची वाट बघणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments

हेच आणि असंच ;-)

यकु
Sun, 04/29/2012 - 00:57 नवीन
करा लेको, कट्टे करा , खा खा मटार उसळ खा, शिकरणं खा...
पानं खा, गफ्‍फांचे फड रंगवा, मनगटाला अत्तरं लावा ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

आयला, वल्ली आणि त्यातून असा

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 04/28/2012 - 22:01 नवीन
आयला, वल्ली आणि त्यातून असा धागा म्हणजे विडंबन नाही यावर विश्वास ठेवणे कठीण. "लांडगा आला रे आला" होऊ नये हो वल्ली दादा !!!!
  • Log in or register to post comments

विडंबनाचं कंत्राट आत्मुसकडे

प्रचेतस
Sat, 04/28/2012 - 22:22 नवीन
विडंबनाचं कंत्राट आत्मुसकडे असते.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

@विडंबनाचं कंत्राट आत्मुसकडे

अत्रुप्त आत्मा
Tue, 05/01/2012 - 11:48 नवीन
@विडंबनाचं कंत्राट आत्मुसकडे असते. >>>मी नाही दह्यातली,आणी कढी लावा ताकातली ;-) असं म्हणतात ते हेच अगदी Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वाह वा.

चिंतामणी
Sat, 04/28/2012 - 23:09 नवीन
>>>हे मुंबई कट्टा ह्या धाग्याचे विडंबन नसून खरेच असा कट्टा आयोजीत करण्यात आला आहे याची कृपया नोंद घ्यावी. हे बरे केले की जाहीरपणे सांगीतले "विडंबन नाही". कट्ट्यास शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

काय हे चिंतामणी काका, फक्त

प्रचेतस
Sun, 04/29/2012 - 10:09 नवीन
काय हे चिंतामणी काका, फक्त शुभेच्छा. तुम्ही पण कट्ट्याला येणं आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

वल्लीशेठ

चिंतामणी
Mon, 04/30/2012 - 16:55 नवीन
काही पूर्वनियोजीत कार्यक्रमामुळे येउ शकत नाही. क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

काका बिज्जि असतात बॉ .....

जेनी...
Tue, 05/01/2012 - 10:16 नवीन
काका बिज्जि असतात बॉ .....:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

पुणे कट्टा: १ मे २०१२

हर्षद खुस्पे
Sat, 04/28/2012 - 23:19 नवीन
आम्हि आलो तर चालेल का? म्हणजे आम्हि नविन आहे . आणी कोणाची ओळख नाहि.....म्हणुन विचरल
  • Log in or register to post comments

अवश्य या....

मोदक
Sat, 04/28/2012 - 23:32 नवीन
अवश्य या.... ओळखी व्ह्ययला सुरूवात होईलच. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद खुस्पे

छान आहे

अँग्री बर्ड
Sat, 04/28/2012 - 23:35 नवीन
छान आहे, बड्या असामीच तिथे स्वागताला असल्याने यायला संकोच वाटतो. शिवाय दमडीचा प्रश्न आहेच. असो, दुरून पाहू झापातून
  • Log in or register to post comments

बड्या असाम्या कोणीच नाहीत,

प्रचेतस
Sun, 04/29/2012 - 10:10 नवीन
बड्या असाम्या कोणीच नाहीत, सर्व आपलेच साधेसुधे मिपाकर आहेत, तेव्हा संकोच करू नये. अवश्य यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अँग्री बर्ड

शुभेच्छा

अन्या दातार
Sun, 04/29/2012 - 11:21 नवीन
(नेहमीप्रमाणेच) कट्ट्यास शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

मि आलो तं चालन का भिका दामु

भिकापाटील
Sun, 04/29/2012 - 11:42 नवीन
मि आलो तं चालन का भिका दामु जगदाळे
  • Log in or register to post comments

या की बिंधास. सर्व मिपाकरांनी

प्रचेतस
Sun, 04/29/2012 - 11:59 नवीन
या की बिंधास. सर्व मिपाकरांनी यावं हीच अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिकापाटील

तुमच्या पुणे कट्ट्याला

पियुशा
Sun, 04/29/2012 - 12:58 नवीन
तुमच्या पुणे कट्ट्याला हार्दीक हार्दीक शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

सर्व कट्यांना घाऊक 'शुभेच्छा'..!

प्रभाकर पेठकर
Sun, 04/29/2012 - 20:15 नवीन
'मी पा'हतोय. जरा भारताबाहेर पडलो तर झाले ह्यांचे कट्टे सुरू. 'मुंबई कट्टा' काय, लगेच 'पुणे कट्टा' काय..! आता मुंबईकर 'चिंचपोकळी कट्टा' करतील. नाहीतर 'धारावी कट्टा' करतील की लगेच पुणेकर 'सासवड कट्टा' करतील नाहीतर 'निगडी कट्टा' करतील. आम्ही आपले बापुडवाण्या चेहर्‍याने ह्यांना 'शुभेच्छा' देत बसतो आहे. :( :-( :sad:
  • Log in or register to post comments

काका

कुंदन
Sun, 04/29/2012 - 23:50 नवीन
काका, दुबै कट्ट्याला येणार का ? १५ मे ते ३० मे मध्ये ठरवुयात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

जरूर....

प्रभाकर पेठकर
Mon, 04/30/2012 - 02:11 नवीन
ठरवा तारीख. गुरुवार, शुक्रवार सोडून असेल तर उत्तम. माझे, आठवड्यातील, व्यवसायाचे मुख्य दिवस आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

काका तुम्ही भारतात आले कधी

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 04/30/2012 - 00:40 नवीन
काका तुम्ही भारतात आले कधी आणि गेले कधी तेच कळेना, मग कट्टा कसा करणार ? नंदनने तत्परतेने फोन केला ना. तुम्ही परत कधी येणार आहात ते कळवा, आपण एक कशाला, दोन कट्टे करू !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

धन्यवाद.

प्रभाकर पेठकर
Mon, 04/30/2012 - 02:13 नवीन
जमवूया. मी भारतात येई पर्यंत बहुतेक पावसाळा उजाडेल. पण, नक्कीच जमवूया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

अस्सल मुंबईकराला पावसाची काय

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 05/01/2012 - 13:55 नवीन
अस्सल मुंबईकराला पावसाची काय भीती हो काका ? मागच्या पावसाळ्यात गाड्यांचा प्रॉब्लेम असताना केला होता की एक कट्टा. तुम्हाला चालत असेल तर भर पावसात मरीन ड्राईव्ह ला एक कट्टा करू....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

अगदी ...अगदी....

प्रभाकर पेठकर
Wed, 05/02/2012 - 01:06 नवीन
भर पावसात मरीन ड्राईव्ह ला एक कट्टा करू.... जरूर करू. मला आवडेलच. पण मनात, सर्वांनी मिळून, २-३ दिवस कोंकण करावं असा विचार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

अरे वा !!! आंधळा मागतो एक

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 05/02/2012 - 10:31 नवीन
अरे वा !!! आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

अरे वा वा.. अलभ्यलाभ..

गवि
Wed, 05/02/2012 - 10:39 नवीन
कोंकणात कट्टा.. चला... कुठे, कधी, केव्हा? मी कोणाकोणाला कुठून पिकप करायचे? ठाणे पनवेल मार्गात कुठेही थांबावे. पहाटे लवकरच निघू. आणखी कोणकोण येताहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

मी येतोय.

प्रचेतस
Wed, 05/02/2012 - 10:58 नवीन
मी येतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

कोंकण कट्टा...

प्रभाकर पेठकर
Wed, 05/02/2012 - 11:45 नवीन
अरे! हो...हो...हो... जरा थांबा. माझे येण्याचे नक्की तर ठरू द्या. १०-२० दिवस आधी पक्की योजना आखून बार उडवून देऊ कोंकणाचा (कोंकनाचा टंकणार होतो).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मी पण यायला तयार आहे

सूड
Wed, 05/02/2012 - 11:58 नवीन
मी पण यायला तयार आहे कोकणातल्या कट्ट्याला, वीकांतास कट्टा नसेल तर महिनाभर आधी हिंट दिलीत तर बरं. म्हणजे तश्या सुट्ट्या टाकायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

मान्य..

प्रभाकर पेठकर
Wed, 05/02/2012 - 12:22 नवीन
मान्य. तसा प्रयत्न करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मेल्यांनो जरा बरा दिवस नाही

मृत्युन्जय
Mon, 04/30/2012 - 09:32 नवीन
मेल्यांनो जरा बरा दिवस नाही का रे सापडला. त्या छत्रपतींना गेले २ महिने विचारतोय सरुटॉबानेचा कट्टा कधी तर सांगायला तयार होइनात आणि असे चोरीछुपे कट्टा ठरवुन मोकळे झालात होय रे? माझ्या नावचे ३ व्हेज स्टार्टर्स आणि १ डेझर्ट बाजूला काढुन ठेवा नाहितर पचायचे नाहित तुम्हाला ते. बाकी कट्टय्याला (जळजळी) शुभेच्छा. ऐष करो लेको.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा! बारबेक्यु नेशन्स

ऋषिकेश
Mon, 04/30/2012 - 09:37 नवीन
शुभेच्छा! बारबेक्यु नेशन्स म्हंजे अन्लिनिटेट खाणं आणि (म्हणूनच) अनलिमिटेट गप्पा :) धमाल करालच (ते सांगायला नकोच) फटु टाकून नक्की जळवा! :)
  • Log in or register to post comments

मी येण्यास इच्छुक आहे....

प्रेरणा पित्रे
Mon, 04/30/2012 - 10:45 नवीन
क्रुपया व्यनि कसा करायचा ते सांगावे....
  • Log in or register to post comments

उजव्या बाजूच्या कॉलममध्ये

प्रचेतस
Mon, 04/30/2012 - 13:49 नवीन
उजव्या बाजूच्या कॉलममध्ये आपल्या आयडीच्या नावाखाली 'संदेश' अशी लिंक दिसेल. त्यावर क्लिक करून संदेश पाठवता येईल. किंवा आपण ७.३० च्या सुमारास सयाजीपाशी हजर राहिलात तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रेरणा पित्रे

मी येणार आहे.

बिपिन कार्यकर्ते
Mon, 04/30/2012 - 13:21 नवीन
मी येणार आहे. :)
  • Log in or register to post comments

प्रेषक बिपिन कार्यकर्ते Mon,

विजुभाऊ
Mon, 04/30/2012 - 16:05 नवीन
प्रेषक बिपिन कार्यकर्ते Mon, 30/04/2012 - 13:21. मी येणार आहे. Smile बिपिन कार्यकर्ते ग कुणीतरी येणार येणार ग.पाहुणा कुणी येणार येणार ग........
  • Log in or register to post comments

हे असे होणारे कट्टे आणि

निनाद मुक्काम …
Mon, 04/30/2012 - 17:16 नवीन
हे असे होणारे कट्टे आणि त्यांची रसभरीत वर्णने पाहून जीवात घालमेल सुरु आहे. ह्यावेळी जीवाची मुंबई करावी ह्या हेतूने पत्नीला टांग देऊन दोन आठवडे मी एकटाच भारतवारी करण्याच्या बेतात आहे. मग हम हे और कट्टे
  • Log in or register to post comments

निनादरावांच्या जुन्या ओळखींचा

प्रास
Mon, 04/30/2012 - 21:45 नवीन
निनादरावांच्या जुन्या ओळखींचा फायदा मिपासाठी करवून पुढला एखादा (म्हमई) कट्टा त्यांच्यासोबत पंचतारांकित स्थानात साजरा करावा असा एक अत्युच्च विचार डोक्यात घोळत आहे. काय म्हणता निनादराव? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

जाहीर

श्रावण मोडक
Mon, 04/30/2012 - 23:24 नवीन
ह्यावेळी जीवाची मुंबई करावी ह्या हेतूने पत्नीला टांग देऊन दोन आठवडे मी एकटाच भारतवारी करण्याच्या बेतात आहे. मग हम हे और कट्टे
धाडस आहे बॉ असं काही तरी जाहीर लिहिता म्हणजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

हॅहॅहॅ

पैसा
Mon, 04/30/2012 - 23:36 नवीन
तिला बिचारीला मराठी येत नाही त्यामुळे हे तिच्या कानावर जायची शक्यताच नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

तिच्या कानावर जायची

निनाद मुक्काम …
Tue, 05/01/2012 - 00:58 नवीन
हे बाकी खरे आहे. कोणी मिपाकर जर्मन भाषेत पारंगत असला म्हणजे आमची घटका भरली. पण विनोदाचा भाग सोडला. तर ह्या भारत भेटीत स्टाफ रेट वर लीला केम्केंस्की मध्ये दिवस मुंबई मुक्काम त्यात घरी लगीनसराई व उरलेले दिवस भारत भ्रमण म्हणजे मला जीवाची मुंबई करायला मिळालीच नाही. कीर्तीचा वडापाव खाणे नशिबी नव्हते. म्हणून पुढची भारतभेट एकट्याने करायची व मजबूत नाटके सिनेमे ( ज्या बद्दल मिपावर चांगले लिहून आले असेल तर ) आणी जुन्या व नव्या मित्र मैत्रिणीशी भरपूर मराठीत गप्पा मारणार आहे. येथे गेल्या सहा महिन्यात कोणाशीही मराठी बोललो नाही आहे. आपण ह्या भाषेत संवाद साधत आयुष्याची २२ वर्ष भारतात घालवली ह्यावरील विश्वास गढूळ होत चालला आहे. म्हणून लिहिण्याच्या निमित्ताने का होई ना मराठीत लिहिता होतो ( हेच माझ्या लेखापेक्षा प्रतिसाद मोठा होण्याचे एक कारण असेल ) तर पुढील भारतभेटीत एककलमी कार्यक्रम मी मराठीचा आणी मराठी माझी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

प्रास भाउ जरूर माझ्याकडून

निनाद मुक्काम …
Mon, 04/30/2012 - 23:32 नवीन
प्रास भाउ जरूर माझ्याकडून जेवढे जमेल तेवढे करून पंचतारांकीत कट्टा नक्की करू.
  • Log in or register to post comments

सॉरी !

सुहास..
Mon, 04/30/2012 - 23:47 नवीन
सॉरी !
  • Log in or register to post comments

मी येणार आहे.

हर्षद खुस्पे
Tue, 05/01/2012 - 00:08 नवीन
मी येणार आहे. :) सम्पर्क कुठे करायचा ते सांगावे हि विंनंती
  • Log in or register to post comments

व्यनिद्वारे फोन नं पाठवत

प्रचेतस
Tue, 05/01/2012 - 08:29 नवीन
व्यनिद्वारे फोन नं पाठवत आहे. सयाजीला डायरेक्ट ७:३० पर्यंत आलात तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद खुस्पे

इनो.

रेवती
Tue, 05/01/2012 - 00:33 नवीन
इनो.
  • Log in or register to post comments

+१

विकास
Wed, 05/02/2012 - 01:12 नवीन
:( बाकी कट्ट्यांसदर्भात एक प्रश्न: खर्‍या आणि ड्युप्लिकेट अशा दोन्ही आयडीज ना कसे बोलवावे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

खर्‍या आयडीज्....

प्रभाकर पेठकर
Wed, 05/02/2012 - 01:20 नवीन
खर्‍या आयडीज् ना बोलवा, डुप्लीकेट आयडीज् वृत्तांत लिहीतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा