Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 03/29/2012 - 15:28
स्वयंप्रेरणा :- ज्या http://www.misalpav.com/node/21154 या धाग्या वरुन हे गीत स्फुरले, त्या धाग्याचे हे गीत म्हणजे स्वयं-उपशमनच आहे ;-) भगवंता रे भगवंता,खरच सांग.....हे काय झाले? टाकला होता डोसा मग, आम्लेट कसे बाहेर आले? ॥धृ॥ तवा तापवुन वाटी मला,त्यांनीच होती हतात दिली। पण रवा-मसाला सांगुन त्यात,यांनी अंडी मॅश केली॥ फसवुन माझ्या हतात वाटी,ठेऊन ते पळुन गेले। टाकला होता डोसा मग, आम्लेट कसे बाहेर आले?॥१॥ ग्यास बारिक ठेऊन मी,टाकू लागलो घट्टं डोसा। पिठच मेलं अंग सोडी,जणु तवा व्हावा नकोसा॥ आच नीट ठेऊनही,डोसे बरेच जळुन गेले। टाकला होता डोसा मग, आम्लेट कसे बाहेर आले?॥२॥ खायला येऊ असे सांगुन,काही खरच येऊन गेले। मार्केटिंग करणारे मात्र, मार-के-टिंगss करुन गेले॥ वास नीट घेतला तेंव्हा,कळले नेमके कुठे जळले। टाकला होता डोसा मग, आम्लेट कसे बाहेर आले?॥३॥ पिठात नाक खुपसलं तेंव्हा, अंड्याचा त्यात आला वास। अंडं चिकट/बुळबुळीत म्हणुन,पीठ अमल्याचा झाला भास॥ टाकुन दिले पीठ मी अन,कालचे दुकान बंद केले। टाकला होता डोसा मग, आम्लेट कसे बाहेर आले?॥४॥ आता दुकान लावताना मी,अंडीच घेऊन बसणार आहे। मग जे डोसा कुरतड्तील त्यांना,बुदुक बुदुक मारणार आहे॥ चला आता जातो मीही,आज लैच काम केले। आज पासुन नवा धंदा,जे काही केले ते आंम्हीच केले॥५॥
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on गुरुवार, 03/29/2012 - 15:34

Permalink

खल्लास

.
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on गुरुवार, 03/29/2012 - 15:36

Permalink

प्रकाटाआ

.
  • Log in or register to post comments

Submitted by सांजसंध्या on गुरुवार, 03/29/2012 - 15:47

Permalink

मेरा नाम चिन चिन चू.. या

मेरा नाम चिन चिन चू.. या चालीवर मस्त बसतंय :D बाकि डोसा आम्लेट.. हहपुवा
  • Log in or register to post comments

Submitted by अमृत on गुरुवार, 03/29/2012 - 16:02

In reply to मेरा नाम चिन चिन चू.. या by सांजसंध्या

Permalink

ऑम्लेट दोसा

प्रकार इकडे साऊथ मधे कॉमन आहे कवयित्री बाई. :-) अमृत
  • Log in or register to post comments

Submitted by सांजसंध्या on गुरुवार, 03/29/2012 - 22:33

In reply to ऑम्लेट दोसा by अमृत

Permalink

ओह ! माहीत नव्हतं हे.. थँक्स

ओह ! माहीत नव्हतं हे.. थँक्स
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 03/29/2012 - 16:09

In reply to मेरा नाम चिन चिन चू.. या by सांजसंध्या

Permalink

'जाई-न विचारीत रानफूला'

>>मेरा नाम चिन चिन चू..या चालीवर मस्त बसतंय कैच्याकै. 'जाई-न विचारीत रानफूला' या चालीवर आत्ताच म्हणून पाह्यलं, झक्कास जमतंय.
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on गुरुवार, 03/29/2012 - 16:29

In reply to 'जाई-न विचारीत रानफूला' by सूड

Permalink

सुडक्या...

असं बोलु कसं शकतोस रे... तुला म्हैत्ये का कुणाला बोलतो आहेस ते? जीव प्यारा नाही का तुला !!!
  • Log in or register to post comments

Submitted by सांजसंध्या on गुरुवार, 03/29/2012 - 22:32

In reply to सुडक्या... by वपाडाव

Permalink

अरेच्चा.. ! इतकी जळजळ ?

अरेच्चा.. ! इतकी जळजळ ?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 03/29/2012 - 18:45

In reply to मेरा नाम चिन चिन चू.. या by सांजसंध्या

Permalink

@मेरा नाम चिन चिन चू.. या

@मेरा नाम चिन चिन चू.. या चालीवर मस्त बसतंय >>> येस...येस... एक नंबर बसतीये चाल... व्वा..व्वाss...व्वा...व्वाss...! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on गुरुवार, 03/29/2012 - 15:50

Permalink

मस्त...

भटजीबुवा, आसलं काहीतरी होउ द्या...
  • Log in or register to post comments

Submitted by अमृत on गुरुवार, 03/29/2012 - 16:04

Permalink

बुंदीचा लाडू

मस्त जमलाय. बाकी आपल्या विडंबन निपुणतेवर आम्ही फिदा आहोत हे सांगणे न लगे. अमृत
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 03/29/2012 - 16:43

Permalink

अफाट तुमची काव्यप्रतिभा.

अफाट तुमची काव्यप्रतिभा. _/\_ आमचेही दोन. विडंबनाच्या तव्यावर भाजले तुम्ही फाफडे पाणी सगळे वाहून गेले, उरले रिकामे डबडे. भटजी असूनी तुम्ही खाल्ले की हो पापलेट आता तरी कळ्ळं का बाहेर का आले आम्लेट
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on गुरुवार, 03/29/2012 - 16:48

In reply to अफाट तुमची काव्यप्रतिभा. by प्रचेतस

Permalink

_/\_

सद्गुरू! सद्गुरु! चला दोन विडंबक गुर्जी सापडले. गंडाबंधन कधी करायचं वल्लीशेट? त्या सूडरावांना म्हणावं अशा एखाद्या गुरुगिरुचं पाय धऽर नि नीट बशीव की रेऽ नीऽटं. का उगाच धागे टाकून गावभर पुसायला लागलाऽय म्हंतो मीऽ.
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on गुरुवार, 03/29/2012 - 17:02

In reply to अफाट तुमची काव्यप्रतिभा. by प्रचेतस

Permalink

__/\__ आमच्या बी दोन ओळी आपकी

__/\__ आमच्या बी दोन ओळी आपकी शान मे ;) हे अत्रुप्त आत्म्या हे तु काय केले? वाचुनी तुझी विडंबन, मी हसुन हसुन मेले अचानक का अशी तुझ्या प्रतिमेस बहार आली सुस्तावलेल्या समस्ताच्या कि - बोर्ड ला जाग आली लाविले तु मोगर्याचे रोप्,त्यास धोतर्याचे फुल का आले ;) अन वर म्हणतसे " का हसती मज मी निरागस ,बाकी सगळे दुष्ट मेले ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अमृत on गुरुवार, 03/29/2012 - 17:13

In reply to __/\__ आमच्या बी दोन ओळी आपकी by पियुशा

Permalink

झालं

तुला पण पछाडलं म्हणायचं या अ. आ. नी. सध्या या पछाडण्याचा प्रादुर्भाव झालेला आहे मिपा वर. कृ. ह. घे. अमृत
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 03/29/2012 - 18:43

In reply to __/\__ आमच्या बी दोन ओळी आपकी by पियुशा

Permalink

मरू नकोस पिवशा तू,अता आमच्या

मरू नकोस पिवशा तू,अता आमच्या धंद्यात सामिल हो... केस-सुटलेली कविता आली,तर बांध तिच्यावर विडंबनाचा बो ;-) माझ्या प्रतिभेस बहार अशीच अचानक येत असते... तुलाही जमतय,तूही ये,हळूहळू आस्ते...आस्ते... मोगर्‍याच्या जागी धोत्र्याचे बी,फसवुन माझ्या हतात दिले व्वा....!तुलाही चांगलच कळतय की,कोण निरागस,कोण-दुष्टं** मेले**... ;-) **>> पिवशाचा हा दुष्टांवरचा निरागस राग पहाता,आंम्हाला-दार उघड बये,दार उघड... या चालीवर... राग अवर बये,राग अवर... असे विडंबन करायचा आदेश अंतर्मन-बांदेकरांकडुन येत आहे.. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 03/29/2012 - 18:27

In reply to अफाट तुमची काव्यप्रतिभा. by प्रचेतस

Permalink

फाफडे भाजायला आम्हाला,भरिस

फाफडे भाजायला आम्हाला,भरिस पाडलं तुंम्ही आणी विकायच्या वेळी,नेमके झालात कमी ;-) भटजी असुन आंम्ही,कुठे खाल्लं पाप-लेट आता कळ्ळं कसं येतं,अचानक बाहेर आम्लेट :-p
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 03/29/2012 - 22:09

In reply to फाफडे भाजायला आम्हाला,भरिस by अत्रुप्त आत्मा

Permalink

सतत विडंबने टाकूनी नवकवींवर

सतत विडंबने टाकूनी नवकवींवर बाण सोडलात तुम्ही ढाल घेऊनी तो अडवाया मध्येच उभे राह्यलो आम्ही. ही विडंबने आहेत गंमतीशीर मनात ठेवू नका अढी डोश्याऐवजी आम्लेट येऊनी पातळ का हो तुमची कढी. :P
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 03/29/2012 - 23:42

In reply to सतत विडंबने टाकूनी नवकवींवर by प्रचेतस

Permalink

@सतत विडंबने टाकूनी नवकवींवर

@सतत विडंबने टाकूनी नवकवींवर बाण सोडलात तुम्ही ढाल घेऊनी तो अडवाया मध्येच उभे राह्यलो आम्ही. >>> नविन माहिती ;-) @ही विडंबने आहेत गंमतीशीर मनात ठेवू नका अढी>>> ब्वार..ब्वार... डोश्याऐवजी आम्लेट येऊनी पातळ का हो तुमची कढी. >>> Image removed.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on गुरुवार, 03/29/2012 - 17:25

Permalink

_/\_ _/\_ _/\_

जबरदस्त !!! वल्लीशेठ तुमच्या दोन ओळी पण एकदम भारी ... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अमितसांगली on गुरुवार, 03/29/2012 - 18:09

Permalink

लय भारी ......

कवितेपेक्षा विडंबनच जास्त आवडायला लागले आहे .......
  • Log in or register to post comments

Submitted by सुकामेवा on गुरुवार, 03/29/2012 - 18:30

Permalink

जबरदस्त !!!

जबरदस्त !!! एक नंबर हसुन हसुन पक्की वाट लागली आहे .................... बाकी वल्लीनी पण इडंबन करुन त्यात छान भर घातली आहे वाचुन इडंबन कलिजा खलास झाला इडंबन करणारर्‍याना आम्ही मुजरा केला |
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on गुरुवार, 03/29/2012 - 19:54

Permalink

कवितेपेक्षा विडंबनच जास्त

कवितेपेक्षा विडंबनच जास्त आवडायला लागले आहे .......
:D खरंच मूळ कविताच न लिहीता डायरेक्ट विडंबन लिहीता येते का रे भाऊ ? - (विचारात पडलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 03/29/2012 - 20:33

In reply to कवितेपेक्षा विडंबनच जास्त by सोत्रि

Permalink

@डायरेक्ट विडंबन करता येतं का

@डायरेक्ट विडंबन लिहिता येतं का रे भाऊ?>>> :-D मूळ दारवां शिवाय कॉकटेल करण्याइतकच सोप्पं आहे ते...! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 03/29/2012 - 22:24

In reply to @डायरेक्ट विडंबन करता येतं का by अत्रुप्त आत्मा

Permalink

मॉकटेल ?

तुम्हाला मॉकटेल म्हणायचं आहे का ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on गुरुवार, 03/29/2012 - 23:48

In reply to मॉकटेल ? by सूड

Permalink

धन्स!

धन्यवाद सूडक्या ! - (आभारी) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 03/30/2012 - 00:14

In reply to मॉकटेल ? by सूड

Permalink

@तुम्हाला मॉकटेल म्हणायचं आहे

@तुम्हाला मॉकटेल म्हणायचं आहे का ? >>> तसं म्हटलं तरी फारसा फरक पडत नाही,त्यालाही काही मुळ घटकद्रव्य(सोडा/सरबते,स्क्वॅश) लागतातच... ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on गुरुवार, 03/29/2012 - 19:58

Permalink

मरनार मी एक दिवस .ही दुसरि

मरनार मी एक दिवस .ही दुसरि वेळ आहे बर का :( आत्मोजि हे चुकिच आहे .. आज्पासुन हापिसात मिपा उघडायचा नाहि . बेक्कार बेक्कार हसवता तुम्हि .. जय हो विडंबन बाबा कि :D :D
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on गुरुवार, 03/29/2012 - 20:09

Permalink

विडंबन भारीच, पण...

भटजी बुवा, तुमची काव्यप्रतिभा जबरदस्त आहे यात वादच नाही पण अलिकडे तुम्ही वारंवार लिहीत असलेली विडंबनं वाचून खुप कंटाळा आलाय. तुमच्याकडून आता एखाद्या गंभीर काव्याची अपेक्षा आहे. कधी लिहताय बोला?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 03/29/2012 - 23:46

In reply to विडंबन भारीच, पण... by किसन शिंदे

Permalink

@पण अलिकडे तुम्ही वारंवार

@पण अलिकडे तुम्ही वारंवार लिहीत असलेली विडंबनं वाचून खुप कंटाळा आलाय. >>> जी किसनद्येवा... मान्य हाय... :-) @तुमच्याकडून आता एखाद्या गंभीर काव्याची अपेक्षा आहे. कधी लिहताय बोला?>>> शिरियसली इचार करनेत येइल... प्रामाणिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद :-)
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Fri, 03/30/2012 - 10:34

In reply to @पण अलिकडे तुम्ही वारंवार by अत्रुप्त आत्मा

Permalink

भटजी बुवा

जोवर पडतायत तोवर विडंबन पडू द्यात... एकदा(चं) शिरेस झालात की मंग काय खरं नाय :) धन्याच्या उदा. वरन बोध घ्यावा ही नम्र विनंती. (तुमचा हितचिंतक माणुस)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 03/29/2012 - 20:55

Permalink

अत्रुप्त आत्म्याचे त्रुप्त

अत्रुप्त आत्म्याचे त्रुप्त करणारे विडंबन :) झकास जमलंय.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 02/01/2016 - 19:12

Permalink

कविता वर आणतोय.

कविता वर आणतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by अन्नू on Mon, 02/01/2016 - 23:31

Permalink

हा हा हा..

शैतान खुश हुआ! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 02/02/2016 - 07:58

In reply to हा हा हा.. by अन्नू

Permalink

दुत्त दुत्त!

दुत्त दुत्त!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 02/02/2016 - 08:42

In reply to दुत्त दुत्त! by अत्रुप्त आत्मा

Permalink

निव्वळ म हा न.....

निव्वळ म हा न.....
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 02/02/2016 - 10:14

In reply to निव्वळ म हा न..... by प्रचेतस

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 02/02/2016 - 15:39

In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा

Permalink

अश्लील!!

अश्लील!!
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Tue, 02/02/2016 - 15:44

In reply to अश्लील!! by सूड

Permalink

अश्लील!! काय आहे त्यात ?...

हातात धरुन तर उभे आहेत गुरुजी, त्यान्ची तलवार हो...
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 02/02/2016 - 16:50

In reply to अश्लील!! काय आहे त्यात ?... by पगला गजोधर

Permalink

पगलाजी,

पगलाजी, जे त्यांच्या डोळ्यात ठेवलय, ते आपल्या मनात नैय्ये ना!..
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Tue, 02/02/2016 - 16:56

In reply to पगलाजी, by अत्रुप्त आत्मा

Permalink

गुर्जी

काय तुमच्या मनांत, सांगा त्यांच्या डोळ्यात कानांत …
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 02/02/2016 - 17:29

In reply to गुर्जी by पगला गजोधर

Permalink

कान त्यांचा त्यांच्या मापाचा

कान त्यांचा त्यांच्या मापाचा , कसा-भरेल ???,,, कुणी ठरवायचा? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 02/02/2016 - 18:43

In reply to पगलाजी, by अत्रुप्त आत्मा

Permalink

ते आपल्या मनात नैय्ये ना!..

ते आपल्या मनात नैय्ये ना!..
होय हो होय!! तुमच्या मनात लिबलिबित गोष्टी असतात ते विसरलोच होतो मी!! =))
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 02/02/2016 - 18:44

In reply to ते आपल्या मनात नैय्ये ना!.. by सूड

Permalink

म्हंजे, जिल्बी, आम्लेट, डोसा

म्हंजे, जिल्बी, आम्लेट, डोसा असं हो!!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 02/02/2016 - 19:47

In reply to म्हंजे, जिल्बी, आम्लेट, डोसा by सूड

Permalink

@तुमच्या मनात लिबलिबित गोष्टी

@तुमच्या मनात लिबलिबित गोष्टी असतात ते विसरलोच होतो मी!! >> अगदी अगदी.. जाणीवपूर्वक लक्षात ठेवावं अश्याच तर मुल्य-वान गोष्टी टुम्ही लक्षात ठेविता.. होय की नै..सूडूक्सर!
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 02/02/2016 - 20:02

In reply to @तुमच्या मनात लिबलिबित गोष्टी by अत्रुप्त आत्मा

Permalink

तुमच्याच शब्दरचना!! लक्षात न

तुमच्याच शब्दरचना!! लक्षात न राहतील तर काय? =))
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Tue, 02/02/2016 - 21:52

Permalink

अरेरे, हे ऑमलेट खायचे राहुन

अरेरे, हे ऑमलेट खायचे राहुन गेले होते. मस्त झालेय...
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Wed, 02/03/2016 - 12:53

Permalink

बारातली

काव्यप्रतीभा "सोळात"ही तितकीच भेदकपणा टिकवून आहे. सभीक्षक नाखु
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 13386 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com